मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग- ६)

आपल्या देशाच्या लोकशाहीला खरा धोका घराणेशाहीच्या पक्षांचा आहे. जागतिक लिबरल लाॅबीला आपल्या देशातले फक्त मोदी सरकार उलथावयाचे नसून  केंद्रस्थानी काँग्रेस म्हणजे गांधी घराण्याची सत्ता व सर्व राज्यांत प्रान्तिय पक्षाचे सुभेदार अशी मध्ययुगीन सरंजमशाही, म्हणजेच चीनी साम्राज्याची वसाहत भारतात स्थापन करावयाची आहे. अशा सरंजमशाही- घराणेशाही च्या विरोधात मतदारात जागृती होत आहे. याची चुणूक उत्तर कोकणातील वसई, नालासोपारा व पालघर मतदार संघात पाहायला मिळाली आहे. मला विशेष आनंद झाला. कारण वरील तिन्ही मतदार संघातील भाजपाचा विजय हा आमच्या तालूक्यातला म्हणजे वसई चा. आमच्या गावाचा म्हणजे नालासोपाराचा विजय आणि तिसरा पालघर मतदार संघाचा म्हणजे आमच्या जिल्ह्याचा. 

या तिन्ही मतदारसंघातील विजय अपूर्व आहे. हा विभाग माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या परिवाराचा बालकिल्ला. यंदा प्रथमच ठाकूर परिवाराचा पराभव झाल्यामूळे महाराष्ट्रात या विभागातील भाजपाचा विजय अनेक राजकीय अभ्यासकांचा चर्चेचा विषय झाला आहे.

नालासोपारा मतदारसंघातून निवडणून आलेले भाजपा उमेदवार आमच्या गावातले. आमच्या नाळा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत पढई नावाची छोटी वाडी आहे. जागृत दत्तमंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मी प्राथमिक शाळेत असताना सन १९५८ ला तत्कालीन युवक कै भालचंद्र आप्पा म्हात्रे, कै वासुदेवदादा म्हात्रे, श्री बाळकृष्ण अण्णा नाईक  या त्रिमूतींने कै दामुआप्पा म्हात्रे, कै बबनतात्या म्हात्रे  श्री गजानन वामन म्हात्रे  इत्यादींच्या  सहकार्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरू केली. संघस्थान अर्थातच आमच्या गावातल्या पुर्वाश्रमींनी सन १९४९ ला बांधलेले प्रसिद्ध श्री दत्तमंदिर हेच आहे. तमाम गावकरी सध्या श्री दत्त जन्मोत्सव व  दत्तमंदिराच्या अमृत महोत्सवाच्या सोहळ्याच्या तयारीत आहेत. या आनंदाच्या सोहळ्यात राजन नाईक यांचा तसेच वसई व पालघर विधानसभा मतदारसंघातला भाजपाचा विजयाने आमचा आनंद द्विगुणीत केला आहे. 

राजन नाईक हे आमच्या गावातले. ज्यांनी शाखा सुरू केली अशा पाच-सहा युवकांपैकी श्री बाळकृष्ण नाईक हे राजन नाईक यांचे पिताश्री. राजन नाईक हे ही बालपणापासून संघ स्वयंसेवक आहेत. व्यवसाय निमित्ताने त्यांचा नालासोपारा येथील जनतेशी संपर्क झाला. ते यशस्वी व्यवसायिक व दिलदार समाजसेवक आहेत. त्यांचा नालासोपारात व्यवसाय असला तरी रात्री ते झोपायला पढई गावातल्या घरी येतात. 

सन १९६४ साली पंचक्रोशीतल्या समाजबांधवानी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची शोकसभा घेऊन पहिल्या पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली ती पढई वाडीतच. सन १९७७ च्या आणिबाणीच्या निषेधार्थ झालेल्या सत्याग्रहाचे नियोजन केंद्र आमचे गाव होते. श्री दत्तात्रेय म्हात्रे, श्री सदानंद म्हात्रे व अनंत म्हात्रे, या तिघानी सत्याग्रहात भाग घेतला होता. आजही ही पढई नावाची ही वाडी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई चे अधिवेशन, पंचक्रोशीतले रेल्वे कर्माचार्यांचे संपकाळातले केंद्र स्थान, वसई तालुका स्तरावरील जनता पार्टीचे पहिल्या अधिवेशनाचे स्थळ, उत्तर मुबंईतले खासदार माजी रेल्वमंत्री व उत्तर प्रदेशचे राज्यपाल श्रीराम नाईक यांचे प्रचार-दरम्यान निवासाचे स्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बोरीवली भाग सन १९९९ च्या वार्षिक नियोजन बैठकीचे स्थान, तसेच विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजनाचे यजमान म्हणून पढई ओळख ठेवून आहे.  

राजकारणातल्या घराणेशाहीवर मी लेखाद्वारें टिका करीत असतो. घराणेशाही पक्षांच्या कार्यकर्त्यांना भाजपात काय होत आहे याकडेच अधिक लक्ष असते. ती एक खोड आहे. लोकसभेच्या निवडणूकात चांगले यश प्राप्त झाल्यामूळे बोरीवलीत काही ठिकाणी ' इथे माज उतरवला जातो ' असे बॅनर्स रस्त्यावर लावलेले दिसले होते. अशी कृत्यें करणे ही मविआच्या कार्यकर्त्यांची खोड झाली आहे. मविआंच्या कार्यकर्त्यांची  प्रत्यक्ष बूथ, वार्ड, व  वस्तीत जाऊन पक्ष बळकट करण्याची सवयच मोडली आहे. यांच्या पक्षात पक्षप्रमुख म्हणजे मालक व कार्यकर्ते म्हणजे मजूर. त्यामूळे वरून जे काही आदेश येतात ते निमूटपणे स्विकारतात. सोनिया गांधी व राहूल गांधीनी काँग्रेस पक्ष चीन देशाच्या गोठयात बांधून ठेवला आहे. उद्धव ठाकरेने बाळासाहेबांच्या शिवसेनेला मौल्लवींच्या चरणीं ठेवले आहे. शरद पवारांना आपल्या पक्षाचं काय करावयाचे आहे हेच कळेनासे झाले आहे. शेवटी शरद पवार आपल्या पक्षाला काँग्रेसच्या गोठ्यात ठेवतील असे दिसते.

या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते व समर्थक भाजपाच्या अंतर्गत काय चालत आहे यावर पोटतिडकीने हुज्जत घालत असतात. अर्थात स्वतःचा मेंदू गहाण ठेवलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांशी  हूज्जत घालण्याने दोघांचा वेळ वाया जातो. उगीच वादविवाद करून ब्लडप्रेशर नावाच्या रोगाला का आमंत्रण द्यावे ? आमच्याकडे आदेश नसतो. असते ती फक्त आज्ञा.  संघाच्या दिक्षेतून मिळालेल्या प्रेरणेतून स्वयंसेवक  समाजोन्नतीच्या अनेक क्षेत्रात संस्था उभारतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फक्त स्वयंसेवकांवर संस्कार करतो. स्वयंसेवकांचे कार्य हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख आहे. 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका निमीत्ताने निवडणूक आयोग मतदारांसाठी अनेक सुविधा पुरवित आहे. हे प्रत्यक्ष पाहायला मिळाले. शंभर टक्के मतदानासाठी निव्वळ जाहिरात करून थांबत नाही. ज्यांना प्रकृती अस्वास्थ्याने मतदार केंद्रावर जाऊन मतदान करता येत नाही, त्यांच्यासाठी त्यांच्या घरी जाऊन गुप्तपणे मतदान करण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे. टपाला मत पद्धतीत सुधारणामुळे मतदानाचा टक्का वाढत आहे. प्रत्येक पंचक्रोशीत मतदान केंद्राची संख्या, कर्मचारी, पोलीस दल, अधिकार्यांची संख्या वाढवित आहे. 

मतदान केंद्रावर जेष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोयी पुरवित आहे. त्यामुळे मतदान करण्यात अडचण येत नाही. उन्हाच्या तडाख्यात उभे राहावे लागू नये म्हणून मतदान केंद्र वाढवून केंद्रावर मंडप ही घातलेले दिसत आहेत. मतदान केंद्रांना शुभकार्याच्या मंडपाचे स्वरूप आलेले पाहावयास मिळत आहे. पाणी, व्हिलचेअरच्या खुर्च्या इत्यादी सुविधामूळे मतदान केंद्राना आधूनिकतेचं स्वरूप आले आहे. या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहावयास मिळाल्या. प्रत्येक केंद्रावर झेपेल इतकेच मतदान संख्या ठेवली. त्यामूळे मतदान सुरळीत व जलद गतीने होत असल्याचा अनुभव मिळाला. पण--

पण मतदान जलद गतीने होत असल्यामूळे मतदान केंद्रावर गर्दी दिसत नव्हती. त्यामूळे राजकीय पक्षांच्या निरीक्षकांना ही मतदान कमी होत आहे असे वाटत होते. शेवटी मतदान केंद्रातील टक्केवारी पोलिंग एजंट कडून कळली तेव्हा राजकीय पक्षांच्या विशेषतः महायुतीच्या कार्यकर्त्याना हायसे वाटले. निवडणूक आयोगावर टिका करणार्यांनी प्रथम निवडणूक आयोग पुरवित असलेल्या सोयी पाहाव्यात. उगीच मोर्चा, घेराव करण्याच्या भानगडीत विरोधी पक्षांची स्थिती आणखिन खालावत जाईल असे मला वाटते. राहीला प्रश्न विरोधी पक्ष कमकुवत होत गेले तर देशाची लोकशाही संपुष्टात येईल अशी जी  भिती दाखवून विरोधी पक्ष व त्यांचे समर्थक मिडीया हाऊसेस मतें मागत आहेत, त्यावरील चर्चा निरर्थक आहे. कारण विरोधी पक्षांकडे भाजपा सरकारावर टिका करण्याचा राजकीय मुद्दाच राहीला नाही हे मतदारांना ठाऊक झाले आहे. या शिवाय या तथाकथित सेक्युलर व घराणेशाही पक्षांची दुकाने बंद झाली तरी अनेक आक्रमणें होऊन जी सनातन संस्कृती आज ही सुस्थितीत आहे, तीला जराही धक्का लागणार नाही. उलट आपला देश अधिकाधिक प्रगत व  सशक्त होत जाणार आहे अशी खात्री बहुतांश मतदारांना वाटत आहे.



महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग --५)

 इंडी आघाडी व मविआ चे राजकारण इतक्या सूड भावनेने प्रेरीत आहे की ही सूडभावना त्यांच्या कार्यकर्त्यात सुद्धा शिरली आहे. याचा अनुभव मला आला आहे. मी आनंदराव पवार सरस्वती विद्यालयाची (वझिरा बोरीवली(प)  सचीव पदाची जबाबदारी सांभाळतो आहे. या खेपेस प्रथमच आनंदराव पवार शाळा हे मतदान केंद्र झाले होते. त्यामुळे  आपल्या केंद्रात शंभर टक्के मतदान व्हावे ही इच्छा प्रबळ झाली. तसे पाहता मतदाता जागृती अभियानात मी पहिल्यादांचा भाग घेतो असे नाही. वझिरात जनजागरणाच्या कार्यक्रमात भाग घेण्याची ही चौथी खेप आहे.   या अभियानात माझ्या सोबत आणखिन तिघेजण होते. त्यापैकी एक कार्यकर्ता ज्या सहकारी सोसायटीत राहतो तिथे आम्ही दोघांनीच अभियानाची जबाबदारी स्विकारली. बाकी दोघांना दुसर्या सोसायटीत जावयास सांगितले.


आम्ही दोघजण सोसायटीच्या तळमजल्याच्या पॅसेज मध्ये होतो तेव्हा त्या सोसायटीचा एक सदस्य भेटला. त्या सदस्याशी सोबतच्या कार्यकर्त्याने माझी ओळख करून दिली. मतदाता जागृती अभियाना साठी आनंदराव पवार शाळेचा सेक्रेटरी म्हणून मी आलो आहे अशी ओळख झाली. त्यावरून मी संघाचा स्वयंसेवक आहे हे त्या गृहस्थाच्या लक्षात आले. त्यांनी मला विचारले, 'काय हो तुम्ही बोरीवली मतदार संघात बाहेरील उमेदवार का 
आणला ?'  मी उत्तर दिले  'मला याबाबतचे फारसे काही माहिती नाही.' त्या गृहस्थाने म्हटले, बोरीवलीतल्या कार्यकर्त्यावर नेहमी बाहेरचा उमेदवार लादला जातो हे चूकीचे आहे ना? असा प्रश्न विचारला. मी उत्तर दिले, ' तुमचं म्हणणं बरोबर आहे . पण राजकारण आपल्या हातात नसते.' त्यावर ते गृहस्थ म्हणाले  'सर्व बाबीत केंद्रातून आदेश येतो तो तुम्ही का स्विकारता?  मी उत्तर दिले  ' आपण बरे आपले काम बरे ! वादविवाद करण्यासाठी आम्ही आलेलो नाही '  असे म्हणून मी शेवटी त्यांना सौम्य भाषेत म्हटले, " मला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तो प्रश्न असा आहे, उद्धव ठाकरे म्हणतात की बंद खोलीत अमित शहा यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यावयाचे कबूल केले होते. ते दिले नाही म्हणून आम्ही भाजपाला धडा दिला. पुरावा देण्याची जबाबदारी तक्रार करण्यार्ची असते. पुरावा नसताना काही तरी आरोप करणे हेच मूळी संघर्षाचे कारण असते. अमित शहा किमान मातोश्री वर आले होते. आघाडीच्या बैठकांसाठी जनाब ठाकरे स्वतः कसे गेले दिल्लीला? " यावर ते गृहस्थ हसले आणि म्हणाले मी श्रीराम जन्मभूमी श्रीराम मंदिर च्या निधी संकलनात भाग घेऊन सोसायटीतून पन्नास हजाराहून अधिक निधी गोळा करून दिला आहे. ते गृहस्थ माझ्या पेक्षा धाकटे असल्याने मी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. नंतर ते बाहेर गेले. 

आम्ही दोघे लिफ्टमधून शेवटच्या मजल्यावर गेलो. त्या सोसायटीतले अभियान संपवून नंतर आम्ही दुसरी कडे गेलो. ते गृहस्थ मविआ च्या घटक पक्षाचे कार्यकर्ते आहेत की नाही  आम्ही विचारपूस केली नाही. पण सोशल मिडीया असो वा सामाजिक समारंभात, अथवा बस व रेल्वे स्थानक, बागबगीचा, बाजार इत्यादी स्थानी राजकारणावर नको तितकी चर्चा होते आणि त्यातून वादविवाद विकोपाला जातात हे अलिकडे नित्याचे झाले आहे. यावर मी एका लेखात माझे मत सविस्तर मांडले आहे.

वरील अनुभव मी येथे शेअर केला याचे कारण मविआच्या घटक पक्षातल्या कार्यकर्त्यांना जागोजागी हुज्जत घालण्याची सवय जडली आहे. अशा हुल्लडबाजीचे जनकत्व राष्ट्रीय स्तरावर सोनिया गांधी व ममता बॅनर्जी व महाराष्ट्रातील मविआ त्यात ही विशेषतः उद्धव ठाकरे व जितेंद्र आव्हाड. थोडक्यात घराणेशाही पक्षच राजकारणाचा पोत खाली आणण्यास जबाबदार आहेत.  ' यथा राजा तथा प्रजा ' हा नियम घराणेशाही पक्षात आज ही अस्तित्वात आहे. आपल्या येथील घराणेशाही पक्षांतील युवराजांचे वर्तन राजेशाही व हुकूमशाही सारखे असते. मग त्या पक्षांचे कार्यकर्ते उर्मठच बनणार ना ! चीनशी काँग्रेस पक्षाने करार केला आहे खरा पण त्या चीन मध्ये लोकशाही नाहीच. मग घराणेशाही तरी कशी येणार चीन मध्ये ? विद्यमान राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबातील सदस्य राष्ट्राध्यक्ष होणारा नसतो. कारण साम्यवादी पक्षाच्या राजवटीत हूकुमशाही असते व तीच पक्षाचं सर्वोच्च कार्यकारिणी असते.

आपल्या येथील घराणेशाही पक्षांना मग ते उत्तरेतील असो वा दक्षिणेतील, पश्चीमेकडील असो वा पुर्वेकडील, त्यांच्या वारसांचा जम बसावा म्हणूनच संसदीय लोकशाही प्रणाली हवी असते. कारण त्यातूनच पक्षाचा ताबा मिळतो. एकदा की पक्षाचा ताबा मिळविला की संसद, विधानसभा आपोआप ताब्यात येतात. कारण बापजाद्यांनी लुटलेली प्रचंड माया असते ती वारस हक्काने मिळतेच ना ! ती माया एकप्रकारे आपल्या घराण्यातील पुढच्या पिढींना राजकीय क्षेत्रात करिअर साठी केलेली सुलभ सोय होय.  शेवटी राजकारण सुद्धा  जिथे ' दाम करी काम ! ' असेच एक क्षेत्र आहे.
                         
क्रमशः

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग --४)

गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रातील राजकारणावर मी ३८ लेख पब्लीश केले आहेत. या शिवाय 'केंद्र-राज्य संघर्ष - महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया बंगाल' ' या लेखमालेतही महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा मांडली आहे. ' शिवसेनेतील फूट की काळाने शिवसेनेवर उगारलेला सूड ?' 'उद्धव ठाकरे खलनायक ठरत आहेत का?' ' शिवसेनाने गमाविलेल्या संधी, ' ' शरद पवार ना चाणक्य ना वारकरी फक्त संधीसाधू राजकारणी, 'राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट आणि घराणेशाही पक्षांची पडझड , सरकारचे डोके ठिकाणावर आहे का , इत्यादी शिर्षकाचे लेख त्या ३८ लेखात आहेत. तसेच ' राजकीय पक्षांच्या दिशा व दशा ' या शिर्षकाची राष्ट्रीय तसेच प्रान्तीय पक्षांची वर्तमान व भविष्याची स्थिती ती राज्यनिहाय एक  लेखमाला ही पब्लीश केली आहे. त्यामूळे मागील दोन तीन महिन्यात राजकारणावर अधिक काही लिहावे असे मला वाटले नाही. म्हणून मी  राजकीय लेख लिहणे थांबविले होते. 

मविआचा धुव्वा का उडाला याची  छोटी-मोठी अनेक कारणें आहेत ती माझ्या कुवतीनुसार आपल्या समोर ठेवावीत म्हणून मी लेखमालिका लिहावयास घेतली. त्यातील काही कारणें अशी आहेत की ते पुढील    २० ते २५ वर्षे मविआ व इतर विरोधी पक्षांचा पिच्छा सोडणार नाहीत. ती महत्वाची अशी आहेत-

१) माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते पी चिंदबरम यानी भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीवर खोट-नाटं व सर्वात गंभीर असे भगवा दशहतवादाचे नॅरेटिव्ह तयार करून युपीए सरकारच्या काळात सनातन साधु-संताचा केलेला छळ मतदार विसरले नाहीत. 

२)युपीएच्या राजवटीत (सन २००४ ते २०१३ मध्ये) न भूतो न भविष्य असा झालेला प्रचंड भ्रष्टाचार मतदारांच्या स्मरणात आज ही आहे. 

३) उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते वेळी पोलीस यंत्रणेचा उपयोग पत्रकार- संपादकांना फरफटत कस्टडीत ठेवणे, रहस्यमय हत्या घडविणे व अशा हत्या नैसर्गिक मृत्यु दाखविण्याचा सपाटा, भ्रष्टाचार,  सर्वत्र १४४ कलम लावले असताना कोरोना च्या साथीत पालघरला जमावाने केलेल्या दोन साधुंच्या निर्घूण हत्या 

४)कोरोनो काळात औषधोपचार मध्ये झालेला भ्रष्टाचार तसेच छोटे-मोठ्या घटनांवर पडदा घालणे इत्यादी  पापकृत्यांनी भरलेला उद्धव ठाकरे सरकारचा कारभार हे एक गंभीर कारण लोकांच्या स्मरणात होते. 

५) सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींवर भर सभेत  'मोतका सौदागर' असे म्हणत  देशातील राजकारणाला दिलेले सुडाचे स्वरूप.  

६) सोनिया गांधीचे युवराज राहूल गांधी, केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादींवर  जाहीर सभेत फार जहरी भाषेत टिका करीत असतात. राहूल गांधी फक्त आपल्या देशात नव्हे तर इतर देशात जातात तेव्हा ही आपल्या देशाच्या प्रत्येक व्यवस्थेवर निरंतर टिका करीत असतात. हा शहाणपणा नाही आणि बालीशपणा ही नाही. त्यांचे मानसिक संतुलन वेळोवेळी ढासळते की काय अशी शंका येते. 

सूड भावना ही एक प्रकारे अजगरासारखा विळखा घालून आपल्याला कमकुवत करत असते याचे भान राजकीय नेत्यांनी विशेषतः राहूल गांधी, उद्धव ठाकरे, नाना पाटोळे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, स्टॅलीन, अरविंद केजरीवाल, आणि डाव्या पक्षांचे नेते व कार्यकर्ते (जे नक्षलवाद्यांना पाठींबा देतात)  ठेवावयास हवे.अन्यथा राजकीय नेत्यांची आचार विचार आणि निर्णय घेण्याच्या ज्या शक्ती देहात विराजमान आहेत त्या सैरभैर होण्याची शक्यता असते. अशा स्थितीतून अराचजकतेचा जन्म होतो. असे जागतिक इतिहास सांगतो. काही इतिहास तज्ञ, राजकीय व सामाजिक अभ्यासक व चिंतनकार आपल्याला इशारावजा सल्ला देत असतात,  ते चूकीचे नाही.

आपला महाराष्ट्र  'पुरोगामी विचाराचा, सर्वधर्मसमभाव बाळगणारा, शाहू फूले, आणि आंबेडकरांचा ' असा सततचा घोष करणारी मंडळीच महाराष्ट्रात जातीवादाचे  व मुस्लीमाचे तुष्टीकरण करण्यात गुंतले आहेत. सापाला दुध दिले तरी तो विषच ओकतो. असा अनुभव देशाच्या फाळणीतून आपण घेतला आहे. सर्वसमावेशकता अंगी बाळगणे निश्चीतच चांगली गोष्ट आहे पण अल्पसंख्याकांचे लाड करून त्यांना डोक्यावर बसविण्याची हाव जी विरोधी पक्षांना लागली आहे, ती देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करेल असे बहुसंख्यांक हिंदु समाजाला आता वाटू लागले आहे. हेच कारण आहे ज्यामूळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकाचा निकाल अनाकलनीय आला असावा असे मला वाटते. असेच मत मी, ' त्रिपूरा येथे अफवा आणि धुडघूस महाराष्ट्रात कसा ? ' या शिर्षकाचे २१ नोव्हेंबर २०२१ला पब्लीश केलेल्या दोन लेखात वाचावयास मिळेल. 

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी  महाराष्ट्रातील राजकारण खालच्या पातळीवर आणून ठेवले आहे. अखिल भारतीय स्तरावर सोनिया गांधी व राहूल गांधी या जोडीने काँग्रेसची स्थिती खिळखीळी करून ठेवली आहे. महाराष्ट्रात सन २०१४ ला केंद्रात भाजपा प्रणित एनडीए सरकार अस्तित्वात आल्यापासून विरोधी पक्ष सैरभैर झालेले दिसतात. त्यामूळे ॲक्सीस इंडीया या संस्थेने महायुतीला महाराष्ट्रात १७५ पर्यंत जागा मिळतील असे जे भाष्य केले होते त्यावर लिबरल मंडळीनी दुर्लक्ष केलेले दिसले. ॲक्सीस इंडीया संस्थेने एकूण ७५ ओपिनीयन पोल केले आहेत. त्यापैकी ७० पोल खरे ठरले आहेत. याकडे दुर्लक्ष करून मविआ आता आंदोलनजिवीच्या मार्गावरून जाऊ इच्छीते. काय म्हणावे ? कुत्र्याचं शेपुट नळीत घातले तरी शेवटी वाकडेच राहते. 

महाराष्ट्रत प्रथमच एकतर्फी मतदान झालेले दिसले अशी सबब मांडून विरोधी पक्ष चुनाव आयोगाच्या विरोधात मोर्चा, धरणे इत्यादी नाटकं करण्याचे सत्र सुरू केले, तरीही हाती काही यश येणार नाही. उलट न्यायालय मविआवर ताशोरे ओढतील. सामान्य मतदारांना ही ठाऊक झाले आहे की विरोधी पक्षांचे मोर्चे विदेशी शक्तीच्या साह्याने देशात अस्थिरता निर्माण व्हावी हाच हेतू असतो. मराठा आरक्षण, संविधान बचाव, किसान आंदोलन, वल्फ बोर्ड च्या मोहीम, गणेश व नवरात्र या दोन महोत्सवात मुस्लीम समाजाची दादागिरीने अडथळे आणणे, लव जिहाद, आतंकवादी घटना यांच्या पाठीमागे देशविदेशी लिबरल लाॅबीच आहे.

मुस्लीम समाजाचे तुष्टीकरण कागोदपत्री स्वरूपात मौल्लवी कडे सुपूर्त करण्यापर्यंत मविआ ची मजल पोहचली. मग 'सजग रहो', सौ टक्का मतदान करो, बटोंगे तो कटोंगे, एक है तो सेफ है इत्यादी प्रतिक्रीया येणे हे स्वाभाविक आहे. सन १९८८-८९ च्या दरम्यान काँग्रेसचे वरीष्ठ व विद्वान नेते बॅ गाडगिळांनी काँग्रेसला हिंदू हिताकडे दुर्लक्ष करणे महाग पडेल असा इशारा दिला होता. पण काँग्रेसने दुर्लक्ष केले. काल-परवा माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सुद्धा भगवा दशहतवादाचे खोटे नॅरेटिव्ह काँग्रेसने करावयास नको होते असे स्पष्टपणे म्हटले आहे.

क्रमशः-

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग -- ३)

संघ, भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व निवडणूक आयोगावर दोष ठेवून काय साध्य होणार आहे ? सन २०१४ पासून लिबरल पत्रकार व राजकीय अभ्यासक सतत विदेशी धनशक्तीच्या साह्याने नेगेटिव्ह नॅरेशनाच्या आधारे विरोधी पक्षांना आधार देत आहेत.  असा आधार म्हणजे वजन वाढविण्यासाठी एखाद्या पेंशटला औषधें दिल्यासारखे आहे. त्यातून वजन वाढते पण त्यातून तो पेंशट  बलवान व शक्तीवान होतोच असे नाही ? पण मविआच्या नेतेमंडळींनी तो पेंशट वृद्ध होत नाही असा समज करून घेतला. ही एक प्रकारे राजकीय क्षेत्रातली अंधश्रद्धा ठरली. आश्चर्य असे की तथाकथित पुरोगामी, उदारमतवादी व अंधश्रद्धा निर्मुलनाचे शिल्पकारांची ही स्थिती  ! लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण !

गेल्या लोकसभेच्या निवडणूकाच्या प्रचारात ' संविधान बचाओ ' असे नेगेटिव्ह नॅरेशनचा वापर करून दलीत, पिडीत मतदारांत संभ्रम झाला पण तो तात्पुरता टिकला.भाजपाचे संसदेतील संख्याबळ कमी झाले पण तेच नॅरेटिव्ह राज्यातील विधानसभा निवडणूकात उपयोगी पडेल अशी भ्रामक समजूत मविआने करून घेतली. हे ही एक महत्वाचे कारण आहे की ज्यामूळे अनाकलनीय असा निकाल  लागला. महायुतीचा विजय व मविआचा पराभव होईल असे दिसत होतेच. मविआचा दारूण पराभव झाला एवढाच भाग काय तो आश्चर्यचा, नवलाचा व अनाकलनीय स्वरूपाचा आहे. 

या व्यतीरिक्त इथे आणखिन एक मुद्दा मी मांडतो आहे जो हरियाणात आणि महाराष्ट्रात काँग्रेस प्रणित आघाडी ला महाग पडला. राहूल गांधीनी लोकसभेच्या निवडणूक प्रचारात  संविधान नष्ट होईल म्हणून भाजपाला मत देऊ नका असे जे विधान केले होते , त्यात काही दम नव्हता. ते एक खोटं नॅरेटिव्ह होते हे लोकांना कळून आले. संसंदेच्या अधिवेशनात भाजपाचे तडफदार युवक खासदार अनुराग ठाकूर यांनी राहूल गांधीकडे नजर ठेवून ' भारतिय संविधान के कितने पृष्ठ है यह तो आप प्रथम बताये ?' असा प्रश्न भरगच्च खासदारांच्या उपस्थित संसंदेत विचारला तेव्हा राहूल गांधीना नानी आठवली असेल इतकी फजिती झालेली लोकांनी टिव्ही वरून पाहिलेली होती. म्हणे हे भारताचे भावी पंतप्रधान !

उबाठा च्या कार्यकर्त्यांना बोरीवली मतदार संघात भाजपाने बाहेरच्या उमेदवारांला का तिकीट दिले यावर हुज्जत घालावीसी वाटली पण  इटालीयन सोनीया गांधीना काँग्रेसचे अध्यक्षपद का दिले, राजकारणाची जरा ही जाण नसलेल्या राहूल गांधीना काँग्रेसचे सर्वसर्वा केल्याबद्दल जाब विचारतात का?  उबाठा सेनेचे प्रमूख उद्धव ठाकरे राहूल गांधी आणि सोनिया गांधीना वाकून नमस्कार करताना पाहतात तेव्हा ठाकरें चा राग का येत नाही ? स्व बाळासाहेब ठाकरे हिंदु हृदयसम्राट होते असे राहूल गांधी मानावयास तयार आहेत का असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जेव्हा जाहिरसभेत समोर ठेवला, त्यावर राहूल गांधीनी का उत्तर दिलेलं नाही. ते बाजूला ठेवू. पण उद्धव ठाकरेंचे भक्त काय करीत होते ? जे स्वतःला मर्द समजून घेत आहेत ते चूप का राहीले ? धिक्कार असो तुमच्या मर्दपणाचा व फुसक्या दादागिरीचा !

महाराष्ट्रातील मतदारांनी विधानसभा निवडणूका होण्याअगोदर संसंदेच्या अधिविशेनात भाजपाच्या अनुराग ठाकूर यांनी राहूल गांधीचा आवाज बंद केलेला पाहिला. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना खोलीतून बाहेर काढले होते, तेही विडीओतून पाहिले. आम्ही वाकणार नाही अशा फुसक्या गर्जना हवेतच विरल्या. अशा छोट्या छोट्या पण महत्वाच्या घटनातून ही मतदार कोणाला मत द्यावयाचे हे ठरवित असतो.

एकंदरीत जे अनाकालनीय घडले असे आपल्याला वाटते ते होणार होतेच. ते अटळ होते. ' करावे तसे भरावे ' हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा अनाकालनीयय घटना घडते व ती आपल्या विरोधात होते, तेव्हा त्यातील सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे क्रमप्राप्त असते. पण मविआ चे नेते मंडळी एवीएम मशीनवर पर्यायाने केंद्र सरकार वर टिका करीत आहेत. म्हणे, भाजपा सरकार एवीएम मशीन मध्ये काहीतरी गडबड करून ठेवते आहे. हे विरोधी पक्षांचे रडगाणं न्यायालयाने या अगोदर फेटाळून लावलेले आहेच. अन्याय करणार्या, धातांत खोटे बोलण्यार्यांना सहानुभूती कधी मिळत नसते. उलट अशांचे पाय चिखलात आणखिन रूतत जातात व सर्वनाश होतो. मग ते क्षेत्र कुठलेही असो.

क्रमशः--

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांचा निकाल अनाकलनीय की आकलनीय ? (भाग--२)

आपल्या मतांचा एक टक्का घसरला तर तो वाढविण्यासाठी भाजपा जितकी मेहनत घेतो तितकी मेहनत इंडी आघाडीचे व मविआचे पक्ष घेत नाहीत. मला वाटतं विरोधी पक्षांचे नेते मंडळी विदेशातून मिळणार्या धनाच्या राशीवर व नेगेटिव्ह नॅरेशनवर अधिक विसंबून राहतात. विरोधी पक्ष जे वादे करतात, ज्या योजनेची कल्पना मांडून आश्वासन देतात, पण विजय झाला की ती आश्वासने पुरी करीत नाहीत. कर्नाटक व तेलंगणात सत्ता हाती मिळाल्यानंतर काँग्रेस कडून  जाहीरनाम्यातील एक ही योजना कार्यान्वित झालेली नाही. 

महाष्ट्रातील मविआचे नेते मंडळी निवडणूक निकाला संबंधीत निवडणूक आयोगा विरूध्द आंदोलन मोहीम सुरू करणार आहे, अशी बातमी कानीं आली आहे. त्यातून काय साध्य होणार आहे ? काही नाही. पण विदेशी शक्तीकडून धन मिळत असते त्यावर पाणी का म्हणून सोडावे असे हे एक व्यवहारी कारण मविआ पाशी आहे. दुसरे असे की मविआच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची  इतकी नामुष्की झाली आहे की त्यांना चेहरा लपवावासा वाटतो. त्यासाठी औषध हवे आहे. तेच ते निवडणूक आयोग वर मोर्चा आणि घेराव !  हे अपेक्षितच होते. मविआच्या दारूण पराभवा मुळे मविआ चे समर्थक असलेला मिडीया वर्ग तोंडघशी पडल्यामुळे निवडणूक निकाला संबंधीत चर्चा करताना तीच मंडळी  मविआ नेत्यांना धारेवर घेत असतांना दिसत आहे. 

एबीपीच्या खांडेकर उद्धव ठाकरेंना म्हणाले ''अहो, तुमचा पक्ष फोडला, बाप पळविला, तुमच्या पक्षाची निशाणी पळविली, आणि शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांना  गद्दार- गद्दार असे किती दिवस हिणवित राहणार?, हा तुमचा पक्षांतर्गत मामला आहे. मतदारांसाठी हा मुद्दा जुना झाला आहे '' असे म्हणत आपली नाराजी स्पष्ट केली.  काल परवा कुमार केतकर यांनी मविआचे नेते मंडळी इविएम मॅनेजमेंटवर जे आरोप करतात तो ' एक रडीचा डाव आहे. ' असे स्पष्टपणे म्हणाले. काही हिंदी भाषिक अजय दुबे सारखी पुरोगामी  संपादक मंडळी सुद्धा मविआला विजयाची संधी असुनही पराभूत झाल्याबद्दल कडक शब्दात कानउघडणी केली आहे. त्यांनी सुद्धा एविएम मशीन मधील हेराफेरीचा आरोप  ' नाच ना आये अंगन तेडा ' या स्वरूपाचा आहे असे म्हटले आहे. एनडीटिव्हीचे संजय पुगालिया, ज्यांनी एके काळी काॅग्रेसच्या मिडीया सेल मध्ये काम केले आहे त्यांनी तर राहूल गांधी जोपर्यंत काॅग्रेसचे सर्वेसर्वा राहणार तोपर्यंत काॅग्रेस निवडणूका हरत राहणार. काॅग्रेसचे धोरण ॲन्टी डेवलपमेन्ट, ॲन्टी नेशन, ॲन्टी हिंदू, घराणेशाही व त्यातून चंचल वृत्तीने पक्ष चालविणे, प्रत्येक प्रदेश काॅग्रेस अतंर्गत असलेले तंट्यावर तोडगे न काढता मामला वार्यवर सोडून देण्याची श्रेष्ठींची सवय इत्यादी कारणांची यादी उदाहरणा सह मांडली आहे. जी काॅग्रेसची स्थिती तशीच मविआची, तशीच इंडी आघाडीची स्थिती आहे.

अशा हतबल स्थितीत असलेली मविआ व इंडीची नेते मंडळी  निवडणूक आयोगावर  पक्षपाताचा आरोप दाखवित मोर्चा व घेरावाचे कार्यक्रम करीत आहेत. या पाठीमागे उद्देश एकच आहे, तो म्हणजे  विदेशी मिडीया तून आपल्याला व आपल्या युवराजांना फूकट प्रसिद्धी मिळणार आहे, या शिवाय धन ही मिळणार मग त्यावर पाणी का सोडावे हा विचार ? विचार नव्हे  हा विकार आहे. कारण पैशाची हाव ! मोर्चा, धरणे, व घेराव इत्यादी कार्यक्रमासाठी साठी मविआचे नेते मंडळी, कार्यकर्त्यांनांच राबवतील आणि त्यांचे वारसदार मात्र या कालावधीत फाईव्ह स्टार हाॅटेल मध्ये वास्तव्य करतील. त्यांना कुठे घाम गाळावा लागणार आहे ?

 मोर्चा, धरणे, उपवास इत्यादी शस्त्रे मविआने उगारली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण मविआचे सरकारच मूळी भाजपाच्या (अर्थात फडणवीसच्या) पाठीत खंजीर खुपसून अस्तित्वात आलेले होते. शरद पवार जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले ते स्वपक्षातील बड्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसून झाले. तसेच आपल्या  स्वपक्षातील नेते मंडळींना दिलेल्या जबाबदारीची व मंत्रीपदाची रचना सतत बदलत ठेवून (म्हणजे लहरी तैमूर लंग स्टाईलने) त्यांनी स्वतः लोकशाही बुरखा पांघरत 'हम करेसो कायदा'  हीच पक्ष चालविण्याची रीत ठेवली.

सन २०१९ साली पाठीत खंजिर खुपसून राजकारण करणार्या यादीत उद्धव ठाकरे यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात कोरले गेले आहे. आपल्या देशाच्या इतिहासात स्वजनांच्या पाठीत खंजीर खुपसून राजाच्या गादीवर बसण्याचे पेटेंट जुलमी, खुनशी वृत्तीचा मोगल राजा, ज्याने सत्तेसाठी आपल्या बांधवांची ही मुंडके उडीवली होती, त्या औरंगजेब कडे जाते. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकात औरंगजेबची औलाद  कोण आहेत हा एक मुद्दा अदृष्य स्वरूपात होता. महाराष्ट्रातील मतदारांनी कुठल्याही प्रकाराचा उताविळपणा न करता शांतपणे व दृढ निश्चयाने मविआ मधील औरंगजेबच्या औलादांना घरचा रस्ता दाखविला आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार,  संजय राऊत, राहूल गांधी आणि नाना पाटोळे यांना निवडणूकाच्या निकालाने त्यांची जागा दाखवून दिली. याची आणखिन काही कारणें खालील प्रमाणे आहेत --

१)आम्ही मतदाता जागृती अभियान  चे कार्य करताना घरोघर शंभर टक्के मतदान करा अशी आम्ही विनंती करीत होतो, त्या त्या वेळी प्रत्येक सोसायटीतल्या प्रत्येक फ्लॅट मधून  १०० टक्के  मतदान करणारच आहोत असे ठाम आश्वासन आम्हाला मतदारां तर्फे मिळत होते. 

२)भाजपाचे महाराष्ट्रातले चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनी, ' हो, हे धर्मयुद्ध आहे ! ' असे ठणठणीत आवाजात जाहीर सभेतून उद्गार काढले  तेव्हाच ते वाक्य मतदारपर्यंत पोहचले असल्याची जाणीव आम्हांला प्रत्येक फ्लॅटमधील रहिवाशांच्या चेहर्यावरून स्पष्ट दिसत होती. याचा अर्थ विरोधी पक्षांची नियत अधर्माकडे वळाली आहे हे मतदारांना कळले आहे. त्यामुळेच मतदानाची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतें पडली. निवडणूकाचा निकाल आला तो मविआचा संपुर्ण निकाल लावून. 

३) विधानसभेच्या सन २०१९ च्या निवडणूकाचा जनादेश भाजपा व अखंड शिवसेनेच्या निवडणूक पुर्व युतीला होता. तसेच ५ वर्षे पुर्ण केलेल्या युती (फडणवीस) सरकारच्या कामगिरीचा  होता. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरें यांना अवदासा आठवली आणि त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन मविआ आघाडी सरकारचे मुख्यमंत्री पद बळकाविले. वस्तुस्थिती अशी होती की उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनी सन २०१९ च्या मतदानाच्या अगोदरच काँग्रेस व भाजपा ला मिळणार्या मतात घट कशी होईल यावर युक्ती आखलेली होती. ती त्यांनी पार पाडली. मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी उद्धव ठाकरें यांनी आघाडी धर्म पाळला नाही. म्हणूनच सन २०१९ पासूनच महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण लागले. अडीच वर्षात सरकार पडल्यानंतर पुढील अडीच वर्षात  मविआने आपला सर्व वेळ महायुतीच्या नेत्यांवर टिका करण्यात खर्ची केला. महायुतीने सत्तेवर आल्यानंतर विकासाच्या प्रकल्पांना गती देण्यास सुरूवात केली.  

दुसर्या बाजूला मविआने जगभरच्या लिबरल लाॅबीने तयार केलेले नेगेटिव्ह नॅरेशन्स जादुच्या कांड्या समजत अत्यंत तिखट शब्दात मांडावयास सुरूवात केली. थोडा फार फायदा लोकसभेच्या निवडणूकात झाला. त्यातून हिंदु समाजात फूट पाडण्याच्या योजनेतून विधानसभेत इतका प्रचंड विजय मिळेल की केंद्र सरकार हादरलं जाईल अशी मविआच्या नेत्यांना आशा वाटू लागली. त्यामूळे मविआ नेते वाजवी पेक्षा अधिक शेफारले. परीणाम असा झाला की मविआच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी उघडपणे स्पर्धा सुरू झाली. त्यातून हिंदू समाज दुखावत गेला यावर मविआच्या नेत्यांचे दुर्लक्ष झाले. इथेच मविआच्या पराभवाची बी नियतीने धर्म रक्षणासाठी रोवली असावी.

४)उद्धव ठाकरे हे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक ठरले. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. ते भाजपा, मोदी अमित शहा, फडणवीस यांचा पराकोटीचा द्वेष करतात. एका जाहीर सभेतील उद्धव ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीसला उद्देशून केलेले वक्तव्य असे आहे ' एक तर मी राहीन नाही तर तू ' ! या संबंधीत एका पत्रकाराने देवेंद्र फडणवीस यांना  ' तुम्ही यावर काय प्रतिक्रीया द्याल ? ' असा प्रश्न विचारला, तेव्हा फडणविसांनी शांतपणे पण स्पष्ट उत्तर दिले, ' यावर कसली प्रतिक्रीया मागता हो ?' 

                                   क्रमाश:--

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग --१)



महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकाचा निकाल लागला. महायुतीचा प्रचंड विजय झाला. असा एकतर्फी निकाल महाराष्ट्रात आजपावेतो आला नव्हता  हे सत्य आहे ; अनेक संस्थाचे ओपिनियन पोल चूकले हे ही सत्य आहे ; राजकीय अभ्यासकांचे भाष्य खोटी ठरली हे ही सत्य आहे. 

या वर्षीच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकात महाराष्ट्र राज्यातून मविआने महायुतीपेक्षा अधिक जागा पटकाविल्या हे ही सत्य. तेव्हा मविआच्या नेते मंडळीपासून ते गल्लीतल्या कार्यकर्त्यानी  महायुती च्या नेत्यापासून ते महायुतीच्या कार्यकर्त्याची भरपेट टर उडविली.  महायुतीला अपेक्षापेक्षा कमी जागा मिळाल्या.पण महायुतीने जो निकाल लागला तो खिलाडू वृत्तीने स्विकारला आणि आपण कुठे कमी पडलो यावर चिंतन करून पुढे येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकात चांगले यश मिळविण्याच्या कामाला लागली. पण मविआ यशाच्या नशेत डुबली. 

विधानसभेच्या निवडणूकांची घोषणा झाली ; एकामागून एक दिवस सरत चालला. उमेदवारांची यादी, फार्म भरण्याचे दिवस जवळ येऊ लागले. पण मविआच्या घटक पक्षात जागा वाटप आणि मुख्यमंत्रीपदावर दावा या संबंधीत शाब्दिक युद्ध सुरू झाले. तर महायुतीचे घटक पक्ष मतदारां समोर समन्वयाचं विलोभनिय दर्शन पेश करीत होते. 

निवडणूका झाल्या. महायुतीने मविआचा दारूण पराभव केला. दारूण पराभवाने गलीतगात्र झालेले मविआच्या घटक पक्षांचे नेते मंडळी, त्यांचे समर्थक मिडीया व राजकीय अभ्यासक 'महायुतीचा विजय ' ही  एविएम मशीनची करामत आहे असे म्हणत हा निकालच धुडकावित आहेत. 

जी गोष्ट प्रथमच घडते म्हणून ती खोटी आहे, त्यात दगाबाजी आहे, असे आरोप करणे म्हणजे आपली बुद्धी गहाण ठेवण्यासारखी आहे. दुसरे असे की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणूकात एखाद्या  आघाडीचा दारूण पराभव होऊ नये असे देशाच्या संविधानात कलम ठेवले आहे का व त्यासाठी महाराष्ट्र राज्याला स्पेशल दर्जा मिळालेला आहे का? तसे काही ही नाही. महाराष्ट्रात भाजपाची ताकद कमी होती, पण ती भूतकाळाची गोष्ट आहे.  जगातला सर्वात अधिक सदस्य संख्या असलेला पक्ष भाजप आहे. माझे तर स्पष्ट मत असे आहे की विधानसभा निवडणूकातला महायुतीचा विजय हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार व राहूल गांधी यांच्यावर काळाने उगारलेला सूड आहे. काळाने उगारलेला सूड हा अनाकलनीयच असतो.

ब्रम्हांडात अनेक चमत्कारीक घटना दर दिवशी घडत असतात. त्यावर आधुनिक विज्ञानाच्या अत्याधूनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने संशोधन करून ही अशा चमत्कारी घटनांचे कारण लागलीच सापडत नसते. त्यावर वर्षानुवर्ष  संशोधन झाल्यावर चार ते पाच टक्के उत्तर हाती लागते. 

सारे पोल खोटे ठरले आहेत ही सबब निवडणूकीच्या निकालासंबंधीत संशय व्यक्त करून ना न्यायालयात केस उभी राहील, ना जनतेच्या दरबारात केस उभी राहील. कारण निवडणूक आयोग मविआची यासंबंधीतली तक्रार तडकाफडकी फेटाळून लावणार ! तसे पाहता मविआ व इंडी आघाडीची माता सोनिया गांधी, युवराज राहूल गांधी  इतर होयबा नेतमंडळी व कार्यकर्ते, लिबरल पत्रकार संपादक व अभ्यासक इत्यादी मंडळीने आत्मपरिक्षण करणे आवश्यक आहे. पण आत्मपरीक्षण हा शब्दच मुळी  घराणेशाही पक्षांच्या शब्दकोशातच नाही.            
             
काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून सोनिया गांधीने हिंदू समाजाच्या हिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत, भगवा आतंकवादाचे खोटे-नाटे नॅरेशन जगभरात पसरविण्याची मोहीम राबविली तर दुसर्या बाजूस धर्मांध मुस्लिमांच्या दिवसागणिक वाढत जाणार्या मागण्यांची पुर्तता करू असे काँग्रेस प्रणित राष्ट्रीय स्तरावरील इंडी आघाडी व महाराष्ट्रातील मविआ च्या लेखी आश्वासनामूळे हिंदू समाज हळूहळू जागा होत आहे. जागा होत असलेल्या हिंदूना कुठल्या तरी भितीने ग्रासून ठेवण्याच्या क्लुप्त्या विरोधी पक्ष व त्यांचे समर्थक मिडीया व विचारवंत लढवित असतात. हे नित्याचे होऊन बसले आहे. 

युक्रेन व रशिया मधील सुरू असलेल्या युद्धात भारताची भूमिका लंगडी पडत आहे, तसेच इजराईल व इराण देशामधील युद्धात ही भारताची भूमिका सावध आहे, भारत कचाट्यात सापडला आहे, जागतिक स्तरावर भारत एकाकी पडला आहे, इत्यादी खोटे-नाटे नॅरेटिव जे घुमते आहे, त्यातून जनसामान्याचा संभ्रम वाढवयाचा, मग मोदी सरकारची लोकप्रियता कमी होत भारतात अराजक माजले जाईल असा प्रचार विरोधी पक्षांचे चमचे असलेला मिडीया हाऊसेस करीत आहेत. पण--

वस्तुस्थिती भितीदायक नाही उलट आपल्याला अभिमान वाटेल अशी आहे. भारत आर्थिक, सामरिक, उद्योगिक, व परराष्ट्रीय संबंधात इतका सक्षम झालेला आहे की अमेरिका, रशिया व चीन सारखे देश भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत करीत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात धाडसी तितके संयमी व लोकप्रिय नेते गणले जात आहेत.  हे जनसामान्यांना ठाऊक झाले आहे.  जगभरातील लिबरल विचारवंत, संपादक मंडळीं, सतत गोबेल्स तंत्राने  भारत सरकार, भाजपा, आणि हिंदु संस्कृतीच्या विरूद्ध नेगेटिव्ह नॅरेशन पसरवित असतात. हे जनसामान्यांना पक्के ठाऊक झाले आहे. पण बहुतांश हिंदु समाज बांधव आक्रमक किंवा रागाच्या भरात प्रतिक्रीया देत नाहीत. पण मतदान  'राष्ट्र प्रथम' याच भावनेने करीत असतो. त्यांमुळे लिबरल मंडळीच्या नेगेटिव्ह नॅरेशनस् दिवाळी संपल्यावर उरलेल्या फटाक्या सारखे फूसके बार ठरत आहेत.

आतापर्यंत मणीशंकर अय्यर, दिग्विजयसिंग व राहूल गांधीच्या वक्तव्याने भाजपाला प्रत्येक निवडणूकीत फायदा होत गेलेला आहे. बांगला देशात अराजक माजले व तेथील पंतप्रधानांना हद्दपार केले, तसेच काही तरी भारतात होईल असे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांनी केलेले वक्तव्य  मविआ व इंडी आघाडीला अदृष्य स्वरूपात महाग पडले पण महायुतीला मोठी मदत देऊन गेले असे मला वाटते. कुठल्याही पक्षाच्या नेत्याने केलेलं वक्तव्य जर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या देशहिताला ठेंच पोहचणारे वाटते,  तेव्हा त्या नेत्याने देशद्रोह केला अशी सर्वसामान्यांची समजूत होते आणि ती खरी ही आहे. सलमान खुर्शिद यांना बांगला देशातल्या हिंदू समाजावर अत्याचार होत आहे या बद्दल   यत्किंचीत दया आली नाही. 

अमेरिका व पाक पुरस्कृत दशहतवाद्यांतर्फे मोदी सरकार उलथून पडावे अशी आशा सलमान खुर्शिद तसेच इंडीचे नेते मंडळी  मविआचे नेते - कार्यकर्ते, लिबरल पत्रकार-संपादक धरून बसतात. वर्षभर अभ्यास न करता काही विद्यार्थी IMP प्रश्नोत्तरांचा आधार घेतात तसेच मविआ व इंडी आणि प्रान्तीय पक्ष देशी-विदेशीच्या अभ्यासकांनी केलेले आयते नॅरेशन्सवर भर देतात. काही नॅरेशन्स ऑउट ऑफ डेट असतात. परीणाम  ' सपशेल नापास !'  शरद पवार, उद्धव ठाकरे व राहूल गांधी यांचा प्रवास मणीशंकर अय्यर यांच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. म्हणूनच निवडणूकांचा निकाल एकतर्फी लागला. महाराष्ट्रातल्या मतदारांनी कसलाही गवगवा न करता, (गनिमी काव्याने म्हणा हवे तर) मविआला सपशेल झिडकारले. 

निवडणूकीतला अनाकलनिय निकाल म्हणजे सारासार विचार करून, दृढ निश्चयाने, शांत चित्ताने, राष्ट्रहीत सर्वोच्च मानून धर्माच्या रक्षणासाठी जनतेने केलेलं मतदान होय. संघ परिवाराचा ' सजग रहो ' या इशाराला मतदारांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद आहे. आपण एखादे काम मनःपुर्वक करतो तेव्हा त्यात अद्भूत यश मिळते. हा सृष्टीचा नियम व एक वैशिष्ट्य आहे. याची जाण असुनही मविआचे नेतेमंडळी आपल्या धोरणात व वागण्यात बदल करणार नसतील तर काय म्हणावे ? एकच उत्तर आहे ते म्हणजे ' विनाशकाले विपरीत बुद्धी ! '

एखादी गोष्ट घडते, ती अनाकलनीय का वाटते या संबंधीचं एक सामान्य उदाहरण आपल्या समोर मांडतो. गेल्या आठवड्यात मी एका लग्न समारंभा साठी गावी गेलो होतो. दुसर्या दिवशी संध्याकाळी नालासोपारा ते बोरीवली कडे येणार्या रेल्वे गाडीने आलो. बोरीवली स्टेशनवर डब्यातून उतरलो. तेव्हा फ्लॅटफार्मवर एक -दोन नव्हे तब्बल आठ तिकीट इन्स्पेक्टर उतरणार्या प्रवाशाकडून टिकेट टिकेट असे म्हणत तपासणी करू लागले. मी तिकीट दाखविले आणि गम्मत पाहावी या हेतूने बाजूला उभा राहून पाहू लागलो. उतारू प्रवाशांपैकी सहा-सात जणांना विना तिकीट प्रवास करणार्यांना नियमानुसार ताब्यात घेतले. उतारूंची संख्या फार होती. त्यामानाने टिकीट इन्स्पेक्टरांची संख्या फार कमी होती. मी ब्रिजवरून चढत असतांना पुढे चालत असलेले आमच्या डब्यातले दोन उतारू' देवाची कृपा आपण वाचलो ' असे म्हणत असल्याचे ऐकले. विना तिकीट प्रवास करणारे काही प्रवासी अडकले तर काही अनायासे सुटले. हे असे का व्हावे ? मी माझ्या मनाशी प्रश्न विचारला. विना तिकीट प्रवास करणारे काही उतारू अडकले तर काही सुटले. सारं तर्कशास्त्र धुंडाळून पाहिले. उत्तर मिळाले नाही. 

शेवटी   Law of averages व Law of probability यांचाच आधार घेत माझ्या मनाची घालमेल थांबविली. या विश्वात सर्वात गूढ असे काय या प्रश्नावर विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांनी उत्तर दिले आहे-- 
'हे विश्वच !' जे उतारू पकडले गेले. त्यापैकी काही जण नेहमीच विना तिकीट प्रवास करणारे असू शकतात. त्यांच्यापैकी जे पकडले गेले त्यांना जे घडले ते अनाकलनीय वाटू शकते. तर काहींनी पुन्हा विना तिकीट प्रवास करायचा नाही असे ठरविले असेल. काही जण विना तिकीट प्रवास करणे सुरू ठेवतील. जे सुटले ते देवाची कृपा, नियती नशीब असे समजत असतील. मी ही लेखमालिका लिहावयास बसलो त्याच्या आदल्या दिवशी हा मला आलेला अनुभव आहे. थोडक्यात हेच की महायुतीच्या विजया संबंधीचे आकलन संपुर्णतया होईल आणि तंतोतंती भाष्य वा भाकीत कोणी ही करू शकत नाही. कारण मतदान हे फक्त बुद्धी स्तरावरून होत नसते. तिथे ही मनाला पंसत पडते त्या उमेदवाराला ते दिले जाते. प्रत्येक  क्षेत्रात मतभिन्नता असतेच त्यात नवल ते काय ? मग अशावेळी  ' करावे तसे भरावे ' हेच आपण म्हणतो आणि ऐकतो.

एकंदरीत जे अनाकलनिय घडले असे आपल्याला वाटते ते होणार होतेच. तो निसर्गाचा एक नियम असतो. अनाकलनिय घटना घडते तेव्हा त्यातील सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे क्रमप्राप्त असते. पण मविआचे नेते मंडळी एवीएम मशीनवर पर्यायाने निवडणूक आयोग, केंद्र सरकार वर टिका करीत आहे. विरोधी पक्षांचे असे रडगाणं न्यायालयात टिकले नव्हते. याचा अनुभव त्यांना आला आहेच. निवडणूक आयोगा समोर असलेली मविआ वा इंडी ची याचिका असो वा ठराव सपशेल धुडकावले जाणार हे निश्चीत. अन्याय करणारे, धातांत खोटे बोलणारे इत्यादींना सहानुभूती मिळत नसते. थोडीफार क्वचीत मिळेल पण सतत मिळत नसते. खोटे बोलणार्यांचे, अन्याय करणार्यांचे पाय सतत चिखलात रूतत जातात. नंतर सत्यानाश ओढवतो मग ते क्षेत्र कोणते ही असो. 
                              क्रमशः---

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४

त्रिपुरात अफवा पण महाराष्ट्रात धुडघुस कसा ? (भाग-२)



वाचक हो, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार मध्ये जे दंद्व माजले आहे, त्याचे स्वरूप मला जसे दिसले, भासले त्यातून जे आकलन झाले, ते मी या लेखाच्या भाग १ मध्ये मांडले आहे. ही मांडणी म्हणजे मी दावा मांडला आहे असे नाही. ही घटना गंभीर स्वरूपाची आहे. या घटनेवरील राजकारण संपणार नाही. त्यामूळे या विषयावर चर्चा ही सुरू राहणार आहे. म्हणून या घटनेचा भौगोलिक तसेच निसर्ग नियम, मानसशास्त्र आणि सामान्य ज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहाता आपल्या हाती काय लागते यावर चर्चा करू या.

त्रिपुरात मशीदी जाळल्या, मुस्लीम बांधवांवर हल्ले झाले ही अफवा नसून सत्य घटना आहे असे  आपण मानले तरी फक्त महाराष्ट्रातच दंगली कशा झाल्या हा प्रश्न शिल्लकच राहातो. त्रिपुरा देशाच्या ईशान्या टोकाला आणि महाराष्ट्र देशाच्या पश्चीम टोकाला  म्हणजे जवळपास त्रिपुरा राज्याच्या अगदी विरूद्ध दिशेला.  त्सुनामी, अतिवृष्टी, भुकंप, इत्यादी नैसर्गिक आपत्तीत जी राज्यें एकमेकांच्या शेजारी आहेत, ती राज्यें कमी अधिक प्रमाणात सापडली जातात हा आपला अनुभव आहे. We are all governed by the Laws of Nature.  अग्नी, पाणी, प्रकाश, आणि वायु ही पंचमहाभूतापैकी चार. ही चार महाभूते प्रवाही आहेत आणि पाचवं आकाश नावाचं पंचमहाभूत हे एक माध्यम हे वैज्ञानिक आणि शाश्वत सत्य आणि आपण प्रत्यक्ष अनुभवतो. मानवी शरीर ही पंचमहाभूतांनी बनलेले असते. त्यामूळे मानवी मन जात्याच प्रवाही असते. मानव जेव्हा सुरक्षा तसे एकमेकांच्या अडचणीच्या काळात मदत होईल या कारणाने समुहात राहू लागला, तेव्हा त्या तशा समुहाला  समाजाचं स्वरूप मिळालं. सामन्यतः समाज प्रवाह पतीत असतो. कपड्याच्या दुकानात किंवा चप्पलाच्या दुकांनात ' सेल, ४० टक्के सूट ' अशी पाटी झळकली की त्या दुकानात लोकांची तुबंड गर्दी आपण पाहातो. दंगल करण्याचा किंवा अफवा पसरविण्याचा उगम आपल्या मनात होतो. त्यामूळे दंगली सारख्या घटना ज्या राज्यात प्रथम होतात तेथून त्या शेजारील दुसर्या राज्यात, पुढे दुसर्या राज्याच्या शेजारील राज्यात म्हणजे तिसर्या राज्यात पसरत जातात. यातुनच तर ' दंगलीचे लोण ' असा शब्दप्रयोग आपण व्यवहारात वापरत असतो.  याचा अर्थ त्रिपुरा येथे जर दंगल झाली असती तर त्याची झळ शेजारील राज्यांना पोहचली असती. म्हणजे दंगलीचे लोण प्रथम त्रिपुरा राज्याच्या शेजारील राज्यात पोहचायला हवे होते की नाही. तसे घडले नाही. म्हणजेच त्रिपुरात ना दंगली झाल्या ना मशीदी जाळल्या गेल्या हेच सत्य असावे.

आता सामान्य ज्ञान काय सांगते ते पाहू या.  सर्वसाधारणतः आपल्या नात्यातील वा परिचयातील एखाद्या युवकाच्या अकस्मात मृत्युची बातमी आली की आपण ती बातमी खरी आहे की नाही याची खातरजमा करून घेतो की नाही? त्रिपूरात खरोखरीच मशीदी पाडल्या आहेत का, मुस्लीम बांधवांवर हल्ले झाले आहेत का याची खातरजमा रजा ॲकॅडेमीने केली होती का? समजा तशी खातरजमा रजा ॲकेडेमीने केली असती तर सत्यस्थिती कळली असती. जर त्रिपुरात दंगल झाली असती तर रजा ॲकेडमी सारखी संस्था जिचे ऑफीस मुंबईत आहे आणि ती मुस्लीम समाजाच्या फतवा काढण्याइतकी सक्षम आणि सर्वोच्च संस्या नसताना ती दंगलीची सुरूवात कशी करेल ? आणि महाराष्ट्रात सुरूवात का म्हणून करेल? त्रिपुरात दंगल झाली असतीच तर  मुस्लीम समाजाच्या सर्वोच्च संस्थेने फतवा काढून या दंगलीची सुरूवात महाराष्ट्रात करण्याऐवजी, जिथे पुढील तीन महिन्यानंतर निवडणूका आहेत अशा उत्तर प्रदेश मध्ये केली असती की नाही ? वाचक हो आपल्या देशात झालेल्या धार्मिक दंगलीच्या इतिहासाच्या आधारे हे मी मांडले आहे.

आता आपण सामान्य ज्ञानाच्या दुसर्या कोनातून पाहू या. जर का रजा ॲकेडेमीने त्रिपुरात झालेल्या दंगलीची खातरजमा केली नसेल तर तिने आपली स्वाभाविक वृत्ती ठेचली असेल असे मानावे लागेल (कारण खातरजमा करणे ही सहज प्रवृत्ती.) पण तसे संभवत नाही. कारण स्वाभाविक वृत्ती वा प्रवृत्ती सहजा सहजी ठेचून काढता येत नाही. स्वाभाविक प्रवृत्ती वा विकृती म्हणा  इत्यादीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रचंड तपस्या लागते. ती शक्ती आपल्या येथील फक्त अध्यात्मिक गुरू आणि संत-महंतानी प्राप्त केलेली आहे. रजा ॲकेडेमी ही तशी सामान्य संस्था पण  शिक्षण आणि सेवा संस्था असल्यामूळे तिच्यात थोडा तरी चांगूलपणा टिकणारच. म्हणजे तिने थोडी फार का असेना, पण त्रिपुरात खरोखरीच दंगल झाली आहे का? खातलजमा केली असती आणि दंगल झाली असती तर दंगल करण्यासाठी रजा ॲकेडमी नसतीच, आणि दंगलीचं ठिकाण ही महाराष्ट्रीतील मुस्लीम बाहूल जिल्हे नसते. याचा अर्थ असा आहे की त्रिपुरात मशीदी नष्ट केल्या, मुस्लीम बांधवांवर हल्ले केले ही अफवाच होती.  त्यामूळे रजा ऑकेडेमीला अफवाची खातरजमा करून घेण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. त्यामूळे अगोदर ठरल्याप्रमाणे महाराष्ट्रात रजा ॲकेडेमी तर्फे मोर्चा, बंद, दगडफेक आणि हिंदु बांधवांवर हल्ले झाले आहेत. ते काम रजा ॲकेडेमीने पार पडले असावे. कारण त्या संस्थाने आपले नाक नाही त्या ठिकाणी खुपसून मोर्चा काढून जवळपास तीन वेळा महाराष्ट्रात  हिंसाचार आणि फोडतोड केली आहे. यावरून हे सारे प्रकरण भाजपा विरोधी पक्षांनी रचलेले एक कारस्थान आहे याबाबत दुमत नसावे असे मला वाटते.

या कारस्थानाच्या पाठीमागे  एकूण चार हेतू असावेत. ते खालील प्रमाणे आहेत --
१)  किसान आंदोलनातील हवा कधीच संपली आहे. त्यामूळे भाजपा शासीत एखादं राज्य बरखास्त करण्याची मागणी साठी कारस्थान करावे लागणार होते. त्यात त्रिपुरा राज्याची निवड केली आणि आगामी काळात जास्तीत जास्त विरोधी पक्षांना सामील करून बंद, मोर्चे इत्यादी नाटकांच्या संयुक्त कवायती करण्याची योजना तयार करणे.   

२) महाराष्ट्रातील मविआ सरकाराच्या  दुष्कृत्यांमूळे इभ्रतेचे जे धिंडवडे उडाले आहेत त्यावरून मराठी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा हा प्रयत्न आहे. 

३) दोन विदेशी शक्तीच्या लाॅब्यांचा एकत्रित उपयोग करून घेण्याची एक छोटीसी लिटमस टेस्ट यशस्वी करणें.

४)महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्याचा जो प्रयोग उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केला आहे त्यात काॅग्रेस पक्षाला गौण स्थान दिल्याने काॅग्रेसजन अगदी राहूल गांधी पासून ते महाराष्ट्रातील गाव पातळी पर्यंत नाराज आहेत. त्यासाठी एखादी सांप्रादायिक घटना, भाजपाने घडविली आहे असे भासवून भाजपाशी लढत देण्यासाठी एकत्र राहीले पाहीजे  ही जाणीव काॅग्रेसला करून देणे.

वरील पैकी चौथ्या हेतू ची कल्पना काॅग्रेसला दिली नसली तरी त्या पाठीमागील कारस्थानाची कल्पना काॅग्रेसने हेरली नसेल इतके काॅग्रेसचे श्रेष्ठी खुळे नाहीत. शेवटी काॅग्रेसच भाजपा सोडून सर्व विरोधी पक्षांची आई आणि बाप आहे. यातील बाप हा शब्द काॅग्रेसच्या राजकारणाच्या दृष्टीने अधिक उचीत ठरतो. पण हे कारस्थान तर घडले आहेच त्यामूळे  काॅग्रेसला त्रिपुरा सरकार विरूद्धच्या लढ्यात सामील व्हावे लागणार आहे तसेच महाराष्ट्रात ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत भाजपा विरूद्ध आखलेल्या टिका सिरीज मध्ये भाग घ्यावा लागेल. कारण मामला आहे हिंदू-मुस्लीमाचा. वस्तुतः मुस्लीम मतपेटीचा. म्हणजे तथाकथित पुरोगामी विरोधी पक्षांतर्गत स्पर्धेचा.

एकंदरीत या चर्चेअंती  त्रिपूरा आणि महाराष्ट्रात जे कटकारस्थान रचले त्या पाठीमागील मास्टर माईन्ड शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेस हे पक्ष आहेत हा निष्कर्ष निघतो. याचे कारण असे आहे की त्रिपुरात दंगल पेटविण्याची यांच्यात धमक नाही. म्हणून तिथे ऑन लाईन वरून अफवा सोडून देण्याचे कार्य उरकले. आणि महाराष्ट्रात दंगल घडविली. कारण भारतातल्या सर्व विरोधी पक्षात  शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेसचे अस्तित्व पणाला लागले आहे. दंगलीचे स्वरूप  ही असे ठेवले होते की दंगलीची चौकशी आपल्या राज्याच्या गृहखात्यापर्यंत सिमीत राहील. या पाठीमागचे खरें कारण म्हणजे आगीशी खेळ करताना या दोन्ही पक्षांचे हात-पाय पोळून निघाले आहेत. त्यातच या दोन्ही पक्षांतील मंत्र्यांच्या भ्रष्टाचारांची प्रकरणे बाहेर आली आहेत.  विद्यमान मविआ सरकारच्या काळात काॅग्रेसच्या एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. म्हणून ज्या मराठी मतदारांना भाजपाला मते द्यावयाची नाहीत त्यांच्यासाठी काॅग्रेस हा ऑप्शन चांगला आणि पसंतीचा होऊ शकतो. याच भितीमूळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची झोप उडाली आहे. एकदा खोटे बोलले की पुढे शंभर वेळा खोटे बोलावे लागते. तसेच  एक कारस्थान केले की शंभर कारस्थान करावे लागतात. उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकामागोमाग कारस्थाने करीत चालले आहेत. पण त्यासाठी शक्ती फक्त या दोन्ही पक्षांचीच खर्च होत आहे. म्हणून  विरोधी पक्षांची आघाडी व्हावी असे शरद पवार काल म्हणाले आहेत आणि त्यांचीच री संजय राऊत ओढत आहेत आता त्यांच्या कपाळी हीच पाळी आली आहे.  शरद पवारांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न नुसते भंगलेच नाही तर ते आता मोडून तुटून नवाब मलिकांच्या भंगारखान्यात जमा झाले आहे. तर उद्धव ठाकरेंना आपल्याच घरातील पितृस्वरूप वाघाची डरकाळी ऐकू येत नाही. कारण २०१९ च्या निवडणूका जाहीर झाल्यापासून त्यांच्या दोन्ही कानात सतत शरद पवार गुणगुणत आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे असे काही चक्रव्युहात अडकले आहेत की यांची अवस्था उत्तर प्रदेश मध्ये सपा आणि बसपाची झाली आहे तशीच होणार आहे, तर मविआ सरकारातील यांचा घटक पक्ष काॅग्रेसला महाराष्ट्रात उभारी मिळेल असे स्पष्ट दिसू लागले आहे.

बाकी महाराष्ट्रातील या दंगलीतील  दोषींचा तपास, आरोपींची निश्चिती करून एफआयआर नोंदणे नंतर न्यायालयात खटला उभा राहणे इत्यादी गोष्टीसाठी एक वर्षाहून अधिक काळ जाणार आहे ही बाब आपल्याला अंगवळणी पडली आहे. पण त्रिपुरा सरकार मात्र अफवा मागील सत्य शोधण्याचा कसून प्रयत्न करणार आणि त्यात विदेशी शक्तीचा हात सापडला तर महाराष्ट्रातील दंगलीचा तपास एनआयए या केंद्रीय एजन्सीकडे जाईल. तेव्हाच कदाचीत महाराष्ट्र सरकार बरखास्त झालेले दिसेल. कारण मोदी सरकारने  कृषी बिलें मागे घेऊन विरोधी पक्षांना निष्प्रभ केल्याची बातमी या लेखाची (भाग २) समाप्ती करतेवेळीच आली आहे. त्यावर चर्चा पुढच्या भेटीत करू या.

आपण व आपले उत्सव--मातृदिन (भाग १)

आपण व आपले उत्सव-- मातृदिन   देवीयों और सज्जनो नमस्कार ! हमारी मातृभूमी को देव-देवताओंकी भूमी माना जाता है | इसका कारन हमारे यहाँ सृष्टी हर ...