विचारमंथन
बुधवार, ९ सप्टेंबर, २०२६
आपण व आपले उत्सव--मातृदिन (भाग 1)
शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६
आपण व आपले उत्सव -- रक्षाबंधन भाग १
रक्षाबंथन या उत्सावाच्या नावातील रक्षा आणि बंधन या दोन शब्दांचा स्वतंत्र रित्या अभ्यास केल्यानंतर रक्षाबंधनाचा उत्सव भाऊ-बहिणी पुरता मर्यादीत नाही हे कळते. विद्यमान जागतिक राजकारण तसेच विदेशी शक्तीच्या आहारी गेलेल्या काही विरोधी पक्षांच्या नेत्यांना जडलेल्या अवदासा मुळे रक्षाबंधन उत्सवाची व्यापकता वाढविण्याचा प्रयत्न देशाच्या कानाकोपऱ्यातून होणे आवश्यक झाले आहे. सीमेवरून होऊ शकणार्या धोक्यापासून एक नागरिक म्हणून प्रत्येकाला सजग राहावे लागेल. रक्षाबंधन उत्सव हा केवळ उत्सव नसून मानव म्हणून जो जन्म मिळाला आहे त्याची सार्थकता ठरावी ही शिकवण त्यातून मिळाते. आपला देश सुरक्षित राहीला तरच आपली संस्कृती टिकेल. संस्कृती टिकली तरच आपले उत्सव टिकतील.
वाचकहो , रक्षाबंधन उत्सवाच्या एक दिवस अगोदर X वर भाजपाचे प्रकांड पंडीत श्रद्धेय डाॅ. सुधांशु त्रिवेदी यांनी संस्कृत श्लोकाने सुरवात करीत रक्षाबंधनाच्या दिलेल्या हार्दिक शुभेच्छा वाचल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला. तसे पाहता सामान्यात: हार्दिक शुभेच्छाचं स्वरूपच गोड असते. असे असले तरी X वरील डॉक्टर सुधांशु त्रिवेदी यांच्या हार्दिक शुभेच्छा वाचल्यानंतर आपल्या रक्षाबंधन उत्सवाची सुंदरता व व्यापकताचं विलोभनिय दर्शन झाले. म्हणून Xवरील त्यांच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या समोर प्रथम ठेवत या लेखाची सुरुवात करतो.
रक्षाबंधन उत्सवाच्या अनेक कथा आपल्या पुराणात आहेत. आपल्या समाजातील बहुतांश लोकांनी त्या कथा वाचल्या आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे आपल्याला
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पुजनीय पांडुरंगशास्त्री आठवलेजींनी संस्कृति - पुजन या ग्रंथात ' श्रावणी पौर्णिमा ' वर केलेल्या व्याख्यान द्वारे रक्षाबंधन उत्सवाची महत्ता व पावित्र्य मांडले आहे ते आपल्या समोर सारांश रुपात ठेवतो आहे.
" रक्षाबंधन म्हणजे प्रेम-बंधन. आजच्या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते आणि त्याच बरोबर त्याला ह्रदयाच्या प्रेमाने बांधते आणि त्याच्या रक्षणाची कामना करते. हा उत्सव म्हणजे पराक्रम, प्रेम, संयम आणि भक्ती यांचा संगम होय. रक्षाबंधनाचा उत्सव म्हणजे दृष्टि परिवर्तनाचा सण. बहिणीने हातात राखी बांधताच भावाचा दृष्टिकोन बदलून जातो. बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी तो स्वत:वर घेतो. त्यामुळे बहीण समाजात निर्भय बनून फिरु शकते. "
स्त्रीकडे विकृत नजरेने न पाहता पवित्र दृष्टी हा महान संदेश देणाऱ्या रक्षाबंधन उत्सव कुटुंबा पुरता मर्यादीत न राहता त्याचे सामाजीकरण होणे आवश्यक आहे. शक्ती उपासना या लेख मालिकेत जिहादी वृत्तीची टोळी प्रेमाचे नाटक करीत शालेय व महाविद्यालयीन मुलींना कसे आपल्या पाशात घेतात यावर सविस्तर माहिती मी मांडली आहे. कुटुंब प्रमुखांनी आपआपल्या गावात, चाळीत, गृहसंस्थात सामुहिक रित्या जागरूक राहून जिहादी वृत्तीच्या टोळीचा वावर आसपासच्या शाळा व महाविद्यालय परिसरात दिसला तर लागलीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा उपयोग करून त्या टोळीचा नायनाट करण्याची हिम्मत व शक्ती निर्माण करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठीच रक्षाबंधन उत्सवाची रचना ऋषिमुनींनी आखली आहे. समाजात हिम्मत व शक्तीची वृद्धी सांघिकतातूनच होत असते .
सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५
दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)
मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग- ६)
आपल्या देशाच्या लोकशाहीला खरा धोका घराणेशाहीच्या पक्षांचा आहे. जागतिक लिबरल लाॅबीला आपल्या देशातले फक्त मोदी सरकार उलथावयाचे नसून केंद्रस्थानी काँग्रेस म्हणजे गांधी घराण्याची सत्ता व सर्व राज्यांत प्रान्तिय पक्षाचे सुभेदार अशी मध्ययुगीन सरंजमशाही, म्हणजेच चीनी साम्राज्याची वसाहत भारतात स्थापन करावयाची आहे. अशा सरंजमशाही- घराणेशाही च्या विरोधात मतदारात जागृती होत आहे. याची चुणूक उत्तर कोकणातील वसई, नालासोपारा व पालघर मतदार संघात पाहायला मिळाली आहे. मला विशेष आनंद झाला. कारण वरील तिन्ही मतदार संघातील भाजपाचा विजय हा आमच्या तालूक्यातला म्हणजे वसई चा. आमच्या गावाचा म्हणजे नालासोपाराचा विजय आणि तिसरा पालघर मतदार संघाचा म्हणजे आमच्या जिल्ह्याचा.
या तिन्ही मतदारसंघातील विजय अपूर्व आहे. हा विभाग माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या परिवाराचा बालकिल्ला. यंदा प्रथमच ठाकूर परिवाराचा पराभव झाल्यामूळे महाराष्ट्रात या विभागातील भाजपाचा विजय अनेक राजकीय अभ्यासकांचा चर्चेचा विषय झाला आहे.
नालासोपारा मतदारसंघातून निवडणून आलेले भाजपा उमेदवार आमच्या गावातले. आमच्या नाळा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत पढई नावाची छोटी वाडी आहे. जागृत दत्तमंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मी प्राथमिक शाळेत असताना सन १९५८ ला तत्कालीन युवक कै भालचंद्र आप्पा म्हात्रे, कै वासुदेवदादा म्हात्रे, श्री बाळकृष्ण अण्णा नाईक या त्रिमूतींने कै दामुआप्पा म्हात्रे, कै बबनतात्या म्हात्रे श्री गजानन वामन म्हात्रे इत्यादींच्या सहकार्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरू केली. संघस्थान अर्थातच आमच्या गावातल्या पुर्वाश्रमींनी सन १९४९ ला बांधलेले प्रसिद्ध श्री दत्तमंदिर हेच आहे. तमाम गावकरी सध्या श्री दत्त जन्मोत्सव व दत्तमंदिराच्या अमृत महोत्सवाच्या सोहळ्याच्या तयारीत आहेत. या आनंदाच्या सोहळ्यात राजन नाईक यांचा तसेच वसई व पालघर विधानसभा मतदारसंघातला भाजपाचा विजयाने आमचा आनंद द्विगुणीत केला आहे.
राजन नाईक हे आमच्या गावातले. ज्यांनी शाखा सुरू केली अशा पाच-सहा युवकांपैकी श्री बाळकृष्ण नाईक हे राजन नाईक यांचे पिताश्री. राजन नाईक हे ही बालपणापासून संघ स्वयंसेवक आहेत. व्यवसाय निमित्ताने त्यांचा नालासोपारा येथील जनतेशी संपर्क झाला. ते यशस्वी व्यवसायिक व दिलदार समाजसेवक आहेत. त्यांचा नालासोपारात व्यवसाय असला तरी रात्री ते झोपायला पढई गावातल्या घरी येतात.
सन १९६४ साली पंचक्रोशीतल्या समाजबांधवानी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची शोकसभा घेऊन पहिल्या पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली ती पढई वाडीतच. सन १९७७ च्या आणिबाणीच्या निषेधार्थ झालेल्या सत्याग्रहाचे नियोजन केंद्र आमचे गाव होते. श्री दत्तात्रेय म्हात्रे, श्री सदानंद म्हात्रे व अनंत म्हात्रे, या तिघानी सत्याग्रहात भाग घेतला होता. आजही ही पढई नावाची ही वाडी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई चे अधिवेशन, पंचक्रोशीतले रेल्वे कर्माचार्यांचे संपकाळातले केंद्र स्थान, वसई तालुका स्तरावरील जनता पार्टीचे पहिल्या अधिवेशनाचे स्थळ, उत्तर मुबंईतले खासदार माजी रेल्वमंत्री व उत्तर प्रदेशचे राज्यपाल श्रीराम नाईक यांचे प्रचार-दरम्यान निवासाचे स्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बोरीवली भाग सन १९९९ च्या वार्षिक नियोजन बैठकीचे स्थान, तसेच विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजनाचे यजमान म्हणून पढई ओळख ठेवून आहे.
राजकारणातल्या घराणेशाहीवर मी लेखाद्वारें टिका करीत असतो. घराणेशाही पक्षांच्या कार्यकर्त्यांना भाजपात काय होत आहे याकडेच अधिक लक्ष असते. ती एक खोड आहे. लोकसभेच्या निवडणूकात चांगले यश प्राप्त झाल्यामूळे बोरीवलीत काही ठिकाणी ' इथे माज उतरवला जातो ' असे बॅनर्स रस्त्यावर लावलेले दिसले होते. अशी कृत्यें करणे ही मविआच्या कार्यकर्त्यांची खोड झाली आहे. मविआंच्या कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष बूथ, वार्ड, व वस्तीत जाऊन पक्ष बळकट करण्याची सवयच मोडली आहे. यांच्या पक्षात पक्षप्रमुख म्हणजे मालक व कार्यकर्ते म्हणजे मजूर. त्यामूळे वरून जे काही आदेश येतात ते निमूटपणे स्विकारतात. सोनिया गांधी व राहूल गांधीनी काँग्रेस पक्ष चीन देशाच्या गोठयात बांधून ठेवला आहे. उद्धव ठाकरेने बाळासाहेबांच्या शिवसेनेला मौल्लवींच्या चरणीं ठेवले आहे. शरद पवारांना आपल्या पक्षाचं काय करावयाचे आहे हेच कळेनासे झाले आहे. शेवटी शरद पवार आपल्या पक्षाला काँग्रेसच्या गोठ्यात ठेवतील असे दिसते.
या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते व समर्थक भाजपाच्या अंतर्गत काय चालत आहे यावर पोटतिडकीने हुज्जत घालत असतात. अर्थात स्वतःचा मेंदू गहाण ठेवलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांशी हूज्जत घालण्याने दोघांचा वेळ वाया जातो. उगीच वादविवाद करून ब्लडप्रेशर नावाच्या रोगाला का आमंत्रण द्यावे ? आमच्याकडे आदेश नसतो. असते ती फक्त आज्ञा. संघाच्या दिक्षेतून मिळालेल्या प्रेरणेतून स्वयंसेवक समाजोन्नतीच्या अनेक क्षेत्रात संस्था उभारतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फक्त स्वयंसेवकांवर संस्कार करतो. स्वयंसेवकांचे कार्य हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका निमीत्ताने निवडणूक आयोग मतदारांसाठी अनेक सुविधा पुरवित आहे. हे प्रत्यक्ष पाहायला मिळाले. शंभर टक्के मतदानासाठी निव्वळ जाहिरात करून थांबत नाही. ज्यांना प्रकृती अस्वास्थ्याने मतदार केंद्रावर जाऊन मतदान करता येत नाही, त्यांच्यासाठी त्यांच्या घरी जाऊन गुप्तपणे मतदान करण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे. टपाला मत पद्धतीत सुधारणामुळे मतदानाचा टक्का वाढत आहे. प्रत्येक पंचक्रोशीत मतदान केंद्राची संख्या, कर्मचारी, पोलीस दल, अधिकार्यांची संख्या वाढवित आहे.
मतदान केंद्रावर जेष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोयी पुरवित आहे. त्यामुळे मतदान करण्यात अडचण येत नाही. उन्हाच्या तडाख्यात उभे राहावे लागू नये म्हणून मतदान केंद्र वाढवून केंद्रावर मंडप ही घातलेले दिसत आहेत. मतदान केंद्रांना शुभकार्याच्या मंडपाचे स्वरूप आलेले पाहावयास मिळत आहे. पाणी, व्हिलचेअरच्या खुर्च्या इत्यादी सुविधामूळे मतदान केंद्राना आधूनिकतेचं स्वरूप आले आहे. या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहावयास मिळाल्या. प्रत्येक केंद्रावर झेपेल इतकेच मतदान संख्या ठेवली. त्यामूळे मतदान सुरळीत व जलद गतीने होत असल्याचा अनुभव मिळाला. पण--
पण मतदान जलद गतीने होत असल्यामूळे मतदान केंद्रावर गर्दी दिसत नव्हती. त्यामूळे राजकीय पक्षांच्या निरीक्षकांना ही मतदान कमी होत आहे असे वाटत होते. शेवटी मतदान केंद्रातील टक्केवारी पोलिंग एजंट कडून कळली तेव्हा राजकीय पक्षांच्या विशेषतः महायुतीच्या कार्यकर्त्याना हायसे वाटले. निवडणूक आयोगावर टिका करणार्यांनी प्रथम निवडणूक आयोग पुरवित असलेल्या सोयी पाहाव्यात. उगीच मोर्चा, घेराव करण्याच्या भानगडीत विरोधी पक्षांची स्थिती आणखिन खालावत जाईल असे मला वाटते. राहीला प्रश्न विरोधी पक्ष कमकुवत होत गेले तर देशाची लोकशाही संपुष्टात येईल अशी जी भिती दाखवून विरोधी पक्ष व त्यांचे समर्थक मिडीया हाऊसेस मतें मागत आहेत, त्यावरील चर्चा निरर्थक आहे. कारण विरोधी पक्षांकडे भाजपा सरकारावर टिका करण्याचा राजकीय मुद्दाच राहीला नाही हे मतदारांना ठाऊक झाले आहे. या शिवाय या तथाकथित सेक्युलर व घराणेशाही पक्षांची दुकाने बंद झाली तरी अनेक आक्रमणें होऊन जी सनातन संस्कृती आज ही सुस्थितीत आहे, तीला जराही धक्का लागणार नाही. उलट आपला देश अधिकाधिक प्रगत व सशक्त होत जाणार आहे अशी खात्री बहुतांश मतदारांना वाटत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग --५)
इंडी आघाडी व मविआ चे राजकारण इतक्या सूड भावनेने प्रेरीत आहे की ही सूडभावना त्यांच्या कार्यकर्त्यात सुद्धा शिरली आहे. याचा अनुभव मला आला आहे. मी आनंदराव पवार सरस्वती विद्यालयाची (वझिरा बोरीवली(प) सचीव पदाची जबाबदारी सांभाळतो आहे. या खेपेस प्रथमच आनंदराव पवार शाळा हे मतदान केंद्र झाले होते. त्यामुळे आपल्या केंद्रात शंभर टक्के मतदान व्हावे ही इच्छा प्रबळ झाली. तसे पाहता मतदाता जागृती अभियानात मी पहिल्यादांचा भाग घेतो असे नाही. वझिरात जनजागरणाच्या कार्यक्रमात भाग घेण्याची ही चौथी खेप आहे. या अभियानात माझ्या सोबत आणखिन तिघेजण होते. त्यापैकी एक कार्यकर्ता ज्या सहकारी सोसायटीत राहतो तिथे आम्ही दोघांनीच अभियानाची जबाबदारी स्विकारली. बाकी दोघांना दुसर्या सोसायटीत जावयास सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग --४)
गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रातील राजकारणावर मी ३८ लेख पब्लीश केले आहेत. या शिवाय 'केंद्र-राज्य संघर्ष - महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया बंगाल' ' या लेखमालेतही महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा मांडली आहे. ' शिवसेनेतील फूट की काळाने शिवसेनेवर उगारलेला सूड ?' 'उद्धव ठाकरे खलनायक ठरत आहेत का?' ' शिवसेनाने गमाविलेल्या संधी, ' ' शरद पवार ना चाणक्य ना वारकरी फक्त संधीसाधू राजकारणी, 'राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट आणि घराणेशाही पक्षांची पडझड , सरकारचे डोके ठिकाणावर आहे का , इत्यादी शिर्षकाचे लेख त्या ३८ लेखात आहेत. तसेच ' राजकीय पक्षांच्या दिशा व दशा ' या शिर्षकाची राष्ट्रीय तसेच प्रान्तीय पक्षांची वर्तमान व भविष्याची स्थिती ती राज्यनिहाय एक लेखमाला ही पब्लीश केली आहे. त्यामूळे मागील दोन तीन महिन्यात राजकारणावर अधिक काही लिहावे असे मला वाटले नाही. म्हणून मी राजकीय लेख लिहणे थांबविले होते.
मविआचा धुव्वा का उडाला याची छोटी-मोठी अनेक कारणें आहेत ती माझ्या कुवतीनुसार आपल्या समोर ठेवावीत म्हणून मी लेखमालिका लिहावयास घेतली. त्यातील काही कारणें अशी आहेत की ते पुढील २० ते २५ वर्षे मविआ व इतर विरोधी पक्षांचा पिच्छा सोडणार नाहीत. ती महत्वाची अशी आहेत-
१) माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते पी चिंदबरम यानी भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीवर खोट-नाटं व सर्वात गंभीर असे भगवा दशहतवादाचे नॅरेटिव्ह तयार करून युपीए सरकारच्या काळात सनातन साधु-संताचा केलेला छळ मतदार विसरले नाहीत.
२)युपीएच्या राजवटीत (सन २००४ ते २०१३ मध्ये) न भूतो न भविष्य असा झालेला प्रचंड भ्रष्टाचार मतदारांच्या स्मरणात आज ही आहे.
३) उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते वेळी पोलीस यंत्रणेचा उपयोग पत्रकार- संपादकांना फरफटत कस्टडीत ठेवणे, रहस्यमय हत्या घडविणे व अशा हत्या नैसर्गिक मृत्यु दाखविण्याचा सपाटा, भ्रष्टाचार, सर्वत्र १४४ कलम लावले असताना कोरोना च्या साथीत पालघरला जमावाने केलेल्या दोन साधुंच्या निर्घूण हत्या
४)कोरोनो काळात औषधोपचार मध्ये झालेला भ्रष्टाचार तसेच छोटे-मोठ्या घटनांवर पडदा घालणे इत्यादी पापकृत्यांनी भरलेला उद्धव ठाकरे सरकारचा कारभार हे एक गंभीर कारण लोकांच्या स्मरणात होते.
५) सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींवर भर सभेत 'मोतका सौदागर' असे म्हणत देशातील राजकारणाला दिलेले सुडाचे स्वरूप.
६) सोनिया गांधीचे युवराज राहूल गांधी, केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादींवर जाहीर सभेत फार जहरी भाषेत टिका करीत असतात. राहूल गांधी फक्त आपल्या देशात नव्हे तर इतर देशात जातात तेव्हा ही आपल्या देशाच्या प्रत्येक व्यवस्थेवर निरंतर टिका करीत असतात. हा शहाणपणा नाही आणि बालीशपणा ही नाही. त्यांचे मानसिक संतुलन वेळोवेळी ढासळते की काय अशी शंका येते.
सूड भावना ही एक प्रकारे अजगरासारखा विळखा घालून आपल्याला कमकुवत करत असते याचे भान राजकीय नेत्यांनी विशेषतः राहूल गांधी, उद्धव ठाकरे, नाना पाटोळे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, स्टॅलीन, अरविंद केजरीवाल, आणि डाव्या पक्षांचे नेते व कार्यकर्ते (जे नक्षलवाद्यांना पाठींबा देतात) ठेवावयास हवे.अन्यथा राजकीय नेत्यांची आचार विचार आणि निर्णय घेण्याच्या ज्या शक्ती देहात विराजमान आहेत त्या सैरभैर होण्याची शक्यता असते. अशा स्थितीतून अराचजकतेचा जन्म होतो. असे जागतिक इतिहास सांगतो. काही इतिहास तज्ञ, राजकीय व सामाजिक अभ्यासक व चिंतनकार आपल्याला इशारावजा सल्ला देत असतात, ते चूकीचे नाही.
आपला महाराष्ट्र 'पुरोगामी विचाराचा, सर्वधर्मसमभाव बाळगणारा, शाहू फूले, आणि आंबेडकरांचा ' असा सततचा घोष करणारी मंडळीच महाराष्ट्रात जातीवादाचे व मुस्लीमाचे तुष्टीकरण करण्यात गुंतले आहेत. सापाला दुध दिले तरी तो विषच ओकतो. असा अनुभव देशाच्या फाळणीतून आपण घेतला आहे. सर्वसमावेशकता अंगी बाळगणे निश्चीतच चांगली गोष्ट आहे पण अल्पसंख्याकांचे लाड करून त्यांना डोक्यावर बसविण्याची हाव जी विरोधी पक्षांना लागली आहे, ती देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करेल असे बहुसंख्यांक हिंदु समाजाला आता वाटू लागले आहे. हेच कारण आहे ज्यामूळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकाचा निकाल अनाकलनीय आला असावा असे मला वाटते. असेच मत मी, ' त्रिपूरा येथे अफवा आणि धुडघूस महाराष्ट्रात कसा ? ' या शिर्षकाचे २१ नोव्हेंबर २०२१ला पब्लीश केलेल्या दोन लेखात वाचावयास मिळेल.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकारण खालच्या पातळीवर आणून ठेवले आहे. अखिल भारतीय स्तरावर सोनिया गांधी व राहूल गांधी या जोडीने काँग्रेसची स्थिती खिळखीळी करून ठेवली आहे. महाराष्ट्रात सन २०१४ ला केंद्रात भाजपा प्रणित एनडीए सरकार अस्तित्वात आल्यापासून विरोधी पक्ष सैरभैर झालेले दिसतात. त्यामूळे ॲक्सीस इंडीया या संस्थेने महायुतीला महाराष्ट्रात १७५ पर्यंत जागा मिळतील असे जे भाष्य केले होते त्यावर लिबरल मंडळीनी दुर्लक्ष केलेले दिसले. ॲक्सीस इंडीया संस्थेने एकूण ७५ ओपिनीयन पोल केले आहेत. त्यापैकी ७० पोल खरे ठरले आहेत. याकडे दुर्लक्ष करून मविआ आता आंदोलनजिवीच्या मार्गावरून जाऊ इच्छीते. काय म्हणावे ? कुत्र्याचं शेपुट नळीत घातले तरी शेवटी वाकडेच राहते.
महाराष्ट्रत प्रथमच एकतर्फी मतदान झालेले दिसले अशी सबब मांडून विरोधी पक्ष चुनाव आयोगाच्या विरोधात मोर्चा, धरणे इत्यादी नाटकं करण्याचे सत्र सुरू केले, तरीही हाती काही यश येणार नाही. उलट न्यायालय मविआवर ताशोरे ओढतील. सामान्य मतदारांना ही ठाऊक झाले आहे की विरोधी पक्षांचे मोर्चे विदेशी शक्तीच्या साह्याने देशात अस्थिरता निर्माण व्हावी हाच हेतू असतो. मराठा आरक्षण, संविधान बचाव, किसान आंदोलन, वल्फ बोर्ड च्या मोहीम, गणेश व नवरात्र या दोन महोत्सवात मुस्लीम समाजाची दादागिरीने अडथळे आणणे, लव जिहाद, आतंकवादी घटना यांच्या पाठीमागे देशविदेशी लिबरल लाॅबीच आहे.
मुस्लीम समाजाचे तुष्टीकरण कागोदपत्री स्वरूपात मौल्लवी कडे सुपूर्त करण्यापर्यंत मविआ ची मजल पोहचली. मग 'सजग रहो', सौ टक्का मतदान करो, बटोंगे तो कटोंगे, एक है तो सेफ है इत्यादी प्रतिक्रीया येणे हे स्वाभाविक आहे. सन १९८८-८९ च्या दरम्यान काँग्रेसचे वरीष्ठ व विद्वान नेते बॅ गाडगिळांनी काँग्रेसला हिंदू हिताकडे दुर्लक्ष करणे महाग पडेल असा इशारा दिला होता. पण काँग्रेसने दुर्लक्ष केले. काल-परवा माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सुद्धा भगवा दशहतवादाचे खोटे नॅरेटिव्ह काँग्रेसने करावयास नको होते असे स्पष्टपणे म्हटले आहे.
क्रमशः-
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग -- ३)
संघ, भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व निवडणूक आयोगावर दोष ठेवून काय साध्य होणार आहे ? सन २०१४ पासून लिबरल पत्रकार व राजकीय अभ्यासक सतत विदेशी धनशक्तीच्या साह्याने नेगेटिव्ह नॅरेशनाच्या आधारे विरोधी पक्षांना आधार देत आहेत. असा आधार म्हणजे वजन वाढविण्यासाठी एखाद्या पेंशटला औषधें दिल्यासारखे आहे. त्यातून वजन वाढते पण त्यातून तो पेंशट बलवान व शक्तीवान होतोच असे नाही ? पण मविआच्या नेतेमंडळींनी तो पेंशट वृद्ध होत नाही असा समज करून घेतला. ही एक प्रकारे राजकीय क्षेत्रातली अंधश्रद्धा ठरली. आश्चर्य असे की तथाकथित पुरोगामी, उदारमतवादी व अंधश्रद्धा निर्मुलनाचे शिल्पकारांची ही स्थिती ! लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण !
गेल्या लोकसभेच्या निवडणूकाच्या प्रचारात ' संविधान बचाओ ' असे नेगेटिव्ह नॅरेशनचा वापर करून दलीत, पिडीत मतदारांत संभ्रम झाला पण तो तात्पुरता टिकला.भाजपाचे संसदेतील संख्याबळ कमी झाले पण तेच नॅरेटिव्ह राज्यातील विधानसभा निवडणूकात उपयोगी पडेल अशी भ्रामक समजूत मविआने करून घेतली. हे ही एक महत्वाचे कारण आहे की ज्यामूळे अनाकलनीय असा निकाल लागला. महायुतीचा विजय व मविआचा पराभव होईल असे दिसत होतेच. मविआचा दारूण पराभव झाला एवढाच भाग काय तो आश्चर्यचा, नवलाचा व अनाकलनीय स्वरूपाचा आहे.
या व्यतीरिक्त इथे आणखिन एक मुद्दा मी मांडतो आहे जो हरियाणात आणि महाराष्ट्रात काँग्रेस प्रणित आघाडी ला महाग पडला. राहूल गांधीनी लोकसभेच्या निवडणूक प्रचारात संविधान नष्ट होईल म्हणून भाजपाला मत देऊ नका असे जे विधान केले होते , त्यात काही दम नव्हता. ते एक खोटं नॅरेटिव्ह होते हे लोकांना कळून आले. संसंदेच्या अधिवेशनात भाजपाचे तडफदार युवक खासदार अनुराग ठाकूर यांनी राहूल गांधीकडे नजर ठेवून ' भारतिय संविधान के कितने पृष्ठ है यह तो आप प्रथम बताये ?' असा प्रश्न भरगच्च खासदारांच्या उपस्थित संसंदेत विचारला तेव्हा राहूल गांधीना नानी आठवली असेल इतकी फजिती झालेली लोकांनी टिव्ही वरून पाहिलेली होती. म्हणे हे भारताचे भावी पंतप्रधान !
उबाठा च्या कार्यकर्त्यांना बोरीवली मतदार संघात भाजपाने बाहेरच्या उमेदवारांला का तिकीट दिले यावर हुज्जत घालावीसी वाटली पण इटालीयन सोनीया गांधीना काँग्रेसचे अध्यक्षपद का दिले, राजकारणाची जरा ही जाण नसलेल्या राहूल गांधीना काँग्रेसचे सर्वसर्वा केल्याबद्दल जाब विचारतात का? उबाठा सेनेचे प्रमूख उद्धव ठाकरे राहूल गांधी आणि सोनिया गांधीना वाकून नमस्कार करताना पाहतात तेव्हा ठाकरें चा राग का येत नाही ? स्व बाळासाहेब ठाकरे हिंदु हृदयसम्राट होते असे राहूल गांधी मानावयास तयार आहेत का असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जेव्हा जाहिरसभेत समोर ठेवला, त्यावर राहूल गांधीनी का उत्तर दिलेलं नाही. ते बाजूला ठेवू. पण उद्धव ठाकरेंचे भक्त काय करीत होते ? जे स्वतःला मर्द समजून घेत आहेत ते चूप का राहीले ? धिक्कार असो तुमच्या मर्दपणाचा व फुसक्या दादागिरीचा !
महाराष्ट्रातील मतदारांनी विधानसभा निवडणूका होण्याअगोदर संसंदेच्या अधिविशेनात भाजपाच्या अनुराग ठाकूर यांनी राहूल गांधीचा आवाज बंद केलेला पाहिला. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना खोलीतून बाहेर काढले होते, तेही विडीओतून पाहिले. आम्ही वाकणार नाही अशा फुसक्या गर्जना हवेतच विरल्या. अशा छोट्या छोट्या पण महत्वाच्या घटनातून ही मतदार कोणाला मत द्यावयाचे हे ठरवित असतो.
एकंदरीत जे अनाकालनीय घडले असे आपल्याला वाटते ते होणार होतेच. ते अटळ होते. ' करावे तसे भरावे ' हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा अनाकालनीयय घटना घडते व ती आपल्या विरोधात होते, तेव्हा त्यातील सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे क्रमप्राप्त असते. पण मविआ चे नेते मंडळी एवीएम मशीनवर पर्यायाने केंद्र सरकार वर टिका करीत आहेत. म्हणे, भाजपा सरकार एवीएम मशीन मध्ये काहीतरी गडबड करून ठेवते आहे. हे विरोधी पक्षांचे रडगाणं न्यायालयाने या अगोदर फेटाळून लावलेले आहेच. अन्याय करणार्या, धातांत खोटे बोलण्यार्यांना सहानुभूती कधी मिळत नसते. उलट अशांचे पाय चिखलात आणखिन रूतत जातात व सर्वनाश होतो. मग ते क्षेत्र कुठलेही असो.
क्रमशः--
आपण व आपले उत्सव--मातृदिन (भाग 1)
देवीयों और सज्जनो नमस्कार ! हमारी मातृभूमी को देव-देवताओंकी भूमी माना जाता है | इसका कारन हमारे यहाँ सृष्टी हर साल तीन ऋतु याने बरसात, ठंड...
-
मंडळी, मागील लेखात आपण असुरक्षिततेच्या भावनेपोटी, मनुष्य समूहात राहू लागला आणि नंतर समाज व्यवस्था उभी राहीली, हे पाहिलं. त्याच लेखात स...
-
आज जेष्ठ शु१३ शके १९४२ शिवराज शक ३४७ गुरूवार दिनांक ४जून २०२०. आजच्या दिवशी म्हणजे जेष्ठ शु१३ शके १५९६ अर्थात ६ जून १६७४ रोजी शिवाजी महार...
-
आपण व आपले उत्सव--- रक्षाबंथन (भाग १) नमस्कार मंडळीं, वयोमानानुसार तब्येतीच्या कुरबुरी सुरू होणे हे स्वाभावि...