सोमवार, ६ डिसेंबर, २०२१
किसान आंदोलनातील राजकारण -- कोण जिकंल कोण हरलं?
रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१
त्रिपुरात अफवा पण महाराष्ट्रात धुडघूस कसा ? (भाग-१)
रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१
महाराष्ट्रातले राजकारण -- बदलते पण भरकटणारे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षाचे नेते श्री देंवेद्र फडणवीसांनी दिवाळी नंतर बाॅम्ब फोडणार आहे असे म्हटले होते. त्याप्रमाणे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकने कुर्ला येथे अन्डरवर्ल्ड डाॅन दाउद इब्राहीमच्या मालकीची जमीन आघाडी सरकारच्या काळात कवडी मोलात खरेदी केली आहे, हे पुराव्यासकट दाखविले. यात भ्रष्टाचार झालाच शिवाय सरकारचा महसूल ही गेला आणि महत्वाचं म्हणजे most wanted अशा गुन्हेगार दाऊद इब्राहीमशी संबंध उघड झाले. त्यासंबंधीत नवाब मलिकने त्यांचे जमीन खरेदी प्रकरण हे कायदेशीर आहे असे उत्तर दिले. पण दाऊद इब्राहीमशी संबंध हा कायद्याचा भंग झालाय त्याचे काय? मी हैड्रोजन बाॅम्ब फोडणार आहे आणि त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसाचे अन्डरवर्ल्डशी संबंध आहेत हे दाखविणार आहे अशी घोषणा ही त्यांनी केली. दुसर्या दिवशी नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन काही फोटो दाखवित फडणवीस वर आरोप केले. तो पोरखेळ झाला. त्यावर भाजपाच्या ॲडव्होकेट शेलारांनी प्रत्येक आरोपाचे फोटो सकट संयमाने खंडन करून मुख्यमंत्री ठाकरेंनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा अशी विनंती केली.
शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०२१
अनिल देशमुखांची इडीने केलेली अटक आणि भ्रष्टाचारा विरोधी सुरू झालेली लढत
रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१
आर्यन खानला मिळालेला जामीन आणि त्या भोवती फिरणारे राजकारण
राहता राहीला प्रश्न शरद पवार केंद्र सरकारवर करीत असलेल्या आरोपांचा. मविआ सरकार स्थापन केल्यानंतर आपल्याला देशभरातून मोदी सरकार विरोधी आघाडी उभी करण्यासाठी आमंत्रणे येत होती असे पवार म्हणाले होते त्याचे काय झाले? कपटाने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले हे मांजराने डोळे मिटून दुध पिण्याच्या प्रकारासारखे आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन केले हे जर शरद पवाराचे कपट नसेल तर केंद्र सरकारने तुमच्या कुंटुंबियांवर आयकराच्या धाडी टाकल्या त्याला कपट कृती कशी मानता ? ती राजकीय चाल कशी मानता येईल? शरद पवार पेट्रोल डिझेल च्या किमती वाढल्या आहेत यावर टिका करीत आहेत. पवार साहेब केंद्रातील सरकारमध्ये दहा वर्षे मंत्री होते. तेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कधी वाढल्याच नाहीत का? आता ते शेतकर्यांचा कैवारी बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण ते केंद्रात सलग दहा वर्षे कृषी मंत्री असताना शेतकरी हितासाठी त्यांनी किती कामें केलीत? ती जनतेपुढे ठेवा की ! महाराष्ट्रातील मंत्र्यावर वसूली कांड आणि भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. ते खोटे आहेत का? तसे असते तर अनिल देशमूख का फरार आहेत? का परमवीर सिंग फरार आहेत? अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप का होत आहेत? आणि त्यांच्या विरूद्धात खटला का उभा राहिला नाही. सुशांतसिगच्या हत्येत मुख्यमंत्री ठाकरेंच्या मुलाचे नाव का आले ? सहकारी बँक, सहकारी साखर कारखाने कोणी लुटले? महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे यश पद्मश्री बाळासाहेब विखे-पाटील आणि वसंतदादा पाटील सारख्या प्रामाणिक नेत्यांच्या प्रयत्नांना जाते. या दोन नेत्यांच्या पाठीत खंजीर तुम्हीच खुपसला की नाही? शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष देशात तर सोडाच पण पश्चीम महाराष्ट्रातही रूजला नाही. याचे कारण पवारांची सत्तेची आणि त्यातून मिळणार्या पैशाची लालच वाढत गेली. पैशाच्या जोरावर इतर पक्षातील नेते खरेदी करून त्यांचा पक्ष फक्त फुगीर झाला पण ताकदवान झाला नाही. मोदी-शहा हे काही एखाद्या राज्यातील जिल्हा स्तरावरील नेते नाहीत. त्यांना शह देण्याच्या प्रयत्नात पवार साहेब थकून गेले आहेत. पवार साहेबांनी पुर्वी माजी पंतप्रधान स्वर्गीय नरसिंह रावाशी दोन हात केले आणि शेवटी त्यांना दिल्लीतून महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर परत पाठविले. तेव्हापासून शरद पवारांचं पंतप्रधान होण्याची संधी कायम स्वरूपात नष्ट झाली. त्यामूळे त्यांचा पक्ष ही पश्चीम महाराष्ट्रा पुरता सिमीत झाला. सुश्री ममता बॅनर्जीना पवार विश्वासू वाटत नाहीत. राहूल गांधीनी पंतप्रधान डाॅ मनमोहन सिंगाचा किती आदर केला आहे, हे त्यांनी सरकरच्या निर्णयाचा कागद भर रस्त्यात फाडला तेव्हा दिसले आहे. मग राहूल गांधी शरद पवारांना नेता कसा मानतील ? मायावती समोर पवार साहेब उभे राहू शकत नाहीत. अखिलेश यादवांनी आपल्या पित्याला जबरदस्तीने निवृत्त केले आहे मग ते शरद पवारांना नेता कसे मानतील ? दक्षिणेकडील कुठल्या एका स्थानिक नेत्यांने राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे ऐकले आहे. या पेक्षा अधिक काही तेथून शरद पवारांच्या हाती काही लागणार नाही. मला वाटतं शरद पवारांनी जाणता राजा या पदवीतून बाहेर यावे आणि स्वतःहाला जाणण्याचा प्रयत्न करावा. पुजनिय आचार्य विनोबा भावेंचा ' स्व रूप ओळखा ' हा उपदेश शरद पवारांनी स्विकारावा असे मनोमन वाटते. जर तो उपदेश स्विकारायाचा नसेल तर उरलेल्या आयुष्यात त्यांची राजकारणातील घसरण शिघ्र गतीने होत जाईल असे दिसते. मविआ सरकारचे जन्मदाता असुनही ज्यांना मुख्यमंत्री पदावर बसविले आहे असे उद्धव ठाकरें ही स्वतंत्रपणे आपल्या राजकीय चाल खेळत आहेत. शरद पवार सध्या आपल्या हयातीतील सर्वात बॅड पॅच मधून जात आहेत. म्हणून आपली अधीक बेअब्रू होण्यापेक्षा त्यांनी स्वेच्छेने राजकारणातून निवृत्ती घेणे हेच इष्ट ठरेल.
गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१
जागतिक राजकारण आणि भारत (भाग ३) अमेरिकेचे धोरण
मागील लेखात आपण विद्यमान जागतिक राजकीय स्थिती संदर्भात अमेरीकेच्या धोरणावर चर्चा केली. अर्थात सोबत ओघाने येणार्या भारत अमेरिका मधील संबंधावर सुद्धा चर्चा केली. तो लेख वाचल्यानंतर एक तल्लख बुद्धीचे परंतु संयमी, आणि अभ्यासू असे माझे जेष्ठ परम स्नेही बोरीवलीतील श्री दत्ताजी बिवलकरांनी त्यांची प्रतिक्रीया नम्रपणे माझ्या पुढ्यात ठेवली. ती अशी आहे, " माजी राष्ट्राध्यक्ष श्री ट्रंप च्या कारकिर्दितील भारत-अमेरिकामध्ये असलेले घट्ट संबंध, विद्यमान राष्ट्रध्यक्ष श्री बायोडन काळात तितके घट्ट संबंध राहणार नाहीत असा आपल्या येथील सर्वसामान्यांचा जो समज होता तो चूकीचा ठरला असल्याचे वाटते. त्यामागील कारणें काय आहेत यावर चर्चा राहिली, आणि ती कारणें वाचण्यात आणि ऐकण्यात आले नाही. म्हणून पुढील लेखात यावर प्रकाश टाकल्यास बरें होईल " मी दत्ताजींना खुप धन्यवाद दिले आणि लेखाचा सामारोप करण्याच्या घाई-गडबडीत तो मुद्दा हातून सुटला ही चूक मी मान्य केली. म्हणून या लेखात त्यावर चर्चा करता करता अमेरिकेच्या धोरणावरची चर्चा या लेखात पुर्ण करू या.
दोन देशांमध्ये व्यापार ,तंत्रज्ञान, शस्त्रात्रे, उद्योग, आयात-निर्यात, शिक्षण, कला, इत्यादी बाबीतले द्विपक्षीय करार होत असतात. यामध्ये विना सहकार नाही उद्धार हे तत्व असते. असे असले तरी अशा दोन्ही देशामध्यें त्यातील व्यापार आणि शस्त्रात्रे या बाबतीत स्वार्थ कोणाला सुटला नाही. इतकेच नव्हे तर दोन्ही देशांचे राष्ट्र प्रमुख शिखर परिषदेच्या निमित्ताने स्वदेशातील विशेषतः स्वपक्षात तसेच विरोधी पक्षात आपल्याला लौकर स्पर्धक निर्माण होणार नाही ही इच्छा काही प्रमाणात पुर्ण करून घेत असतात.
चाळीस वर्ष मागच्या कालखंडात वर्तमान काळातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील भव्य-दिव्य अशी क्रान्ती नव्हती. सध्याच्या काळात दोन देशातील प्रमुखांच्या भेटी अगोदर, त्यांच्या दौर्याचे दर्शन, विमान प्रवास मग विमानतळावर उतरल्यानंतरचे स्वागत, ज्या स्थानी पोहचायचे आहे त्या प्रवासातील चकाचक गाड्या, सुरक्षा दलांचा ताफा, त्यांच्या मागे मिडीया हाऊसच्या पत्रकारांच्या अत्याधूनिक कॅमेरा तसेच इतर साधनाने युक्त अशा गाड्या, दोन्ही देशाच्या प्रमुखांची औपचारीक भेट, लंच - डीनर पार्टी, सभागृहातील भाषणें, मग द्विपक्षीय करार,गळाभेट, पत्रकार परिषद इत्यादी गोष्टींचे लाईव कव्हरेज, चर्चा, फोटो सेशनमूळे आपले डोळे दिपून जातात. मला वाटतं मुळातच आपला मेंदु ,आपली दृष्टी आणि मन सहज भाळले जाते. ' आपल्याला जे दिसते ते खरोखरीच सत्य असते की त्याही पलिकडे काही वेगळे सत्य दडलेले असते? राजकारणातील मैत्री 'दुरून डोंगर साजरे ' या स्वरूपाची ही असू शकते असा अनुभव AUKUS च्या निर्मीत अमेरिकेच्या सर्वात जुना मित्र, फ्रान्सने ऑस्ट्रेलियाशी केलेल्या करारात अमेरिकेने विरजण घातले हे आपण पाहिले आणि ऐकले. विशेष म्हणजे पश्चीमी इंडो-पॅसिफिक रीजन मध्ये फ्रान्स एक महाशक्ती मानली जाते. फ्रान्स हा युरोप खंडातील एकमेव देश आहे ज्याचे दोन मिलियन्स नॅशलन्स या रिजन मध्ये आहेत. इतकेच नव्हे तर फ्रान्सचे इंडो-पॅसिफीक रिजनमध्ये जवळपास अकरा स्क्वेअर किलोमिटर्स परिसरात एक्स्लुसिव इकॉनॉमिक झोन्स आहेत. तरीही AUKUS मध्ये फ्रान्सला स्थान मिळाले नाही. आजचे राजकारण हे असे आहे.
पुर्वीच्या काळात वर्तमानपत्रात फक्त फोटो पाहायला मिळत होते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनडी यांचा चांगल्या पोझमध्ये एकत्र फोटो बालपणी कोठेतरी पाहिल्याचे आठवते. परंतु पुर्वीच्या राजकारणाचा पोत उच्च प्रतिचा होता हे संपुर्णतः खरे नाही. दोन महायुद्धे झालीच. युनोची स्थापना झाली. शीत युद्धाचा काळ अनुभवला. जगभर छोट्या छोट्या चकमकी झाल्या. युद्धें झाली पुढे ही होत राहतील की काय? जगाची रहाटी अशीच असावी का? महाविद्यालयीन दशेत अर्थशास्त्रात माल्थशियन थेअरी ऑफ पॉपूलेशन ने असेच मांडले हे शिकलो आहे.
तसे पाहता पंतप्रधान मोदींची जगभरातील अनेक देश प्रमुखांशी मैत्री आहे. मैत्री शुद्ध असेल पण त्यांचे ध्येय स्वप्नाळू नाही. ही पंतप्रधान मोदींची विशेषता आहे. अमेरिका महासत्ता असल्यामूळे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रंपशी असलेल्या मैत्रीला जागतिक राजकारणात अधिक महत्व आले. या उलट भारतियांच्या मनात बायोडनांची प्रतिमा केवळ ट्रंपचे विरोधक अशी न राहाता निवडणूकी पुर्वीच भारत विरोधी झाली. त्यांची तशी प्रतिमी कोणी केली या प्रश्नांचे उत्तर शोधून सापडणार नाही. अफगणिस्तानात अस्थिरता आणि गोंधळ माजला त्यावेळी आपल्या सरकारने तेथील भारतियांना सुखरूप परत आणण्याच्या कार्याला प्राधान्य दिले. तेथील सत्तांतरात माजलेल्या गोंधळावर लागलीच प्रतिक्रिया दिला नाही. त्यातही बायोडेन अलिकडेच राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत. माझे स्नेही दत्ताजी बिवलकरांचे म्हणणे असे आहे की, ट्रंपना जिंकून येण्याची खात्री असावी म्हणून भारताशी संबंध अफगणिस्तानातील सत्तातंराच्या नंतरही मैत्रीचेच राहतील असे ठरले असावे. ते खरे असावे. कारण कुठल्याही देशात सत्तांतर अर्थातच रितसर होते तेव्हा, मागील पंतप्रधान वा राष्ट्रप्रमूखाने विशेषतः संरक्षण आणि परराष्ट्र खात्यात घेतलेले निर्णय लागलीच बदलले जात नाहीत. हा आधुनिक राज्यव्यवस्थेचा पायंडा आहे.
अफगणिस्तान मधील गोंधळ हा अमेरिकेने जाणून -बुजून तयार केला आहे का, मध्य तसेच दक्षिण-पुर्व आशिया विभाग अफणणिस्तानाच्या निमित्ताने यातच अडकला जावा का, अशी अमेरिकेचे चाल असल्याचा पुरावा नाही. म्हणून जगभरातील सारेच देश यावर सहमत असतीलच असे नाही. अमेरिकेने हा गोंधळ मुद्दामहून केला आहे, असे गृहीत धरून काही देशाचे जागतिक स्तरावरील राजकारणाचे डावपेंच रचले जात आहेत. हे दिसून येत आहे. याबाबतचा योग्य तो अंदाज बांधून अफगणिस्तानात ज्या देशांचे हितसंबंध गुंतले आहेत, अशा देशांचे परराष्ट्र मंत्री आपले अंदाज आपआपल्या देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांना देत असतात. कुठल्या देशांच्या परराष्ट्र मंत्र्याच्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्याच्या समवेत अधिक बैठका झाल्या आहेत यावरूनही अमेरिकेच्या धोरणासंबंधीचा आपण अंदाज बांधू शकतो. आजपावेतो जी माहिती हाती आली आहे, त्यानुसार अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ॲन्टोनी ब्लिंकीन यांच्या आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री जी एस जयशंकर समवेत अधिक बैठका झाल्या आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये वेळी-अवेळी फोनवरून बोलणे होत असते अशी बातमी आहे. म्हणून भले अमेरिकेने AUKUS मध्ये स्थान दिले नसले तरी क्वार्ड मध्ये भारताचा रोल महत्वाचा आहे याचे भान अमेरिकेला आहे. याचे मुख्य कारण रशिया भारताचा सर्वात जुना मित्र आहे आणि ती मैत्री अजुनही टिकलेली आहे. त्यातही अमेरिकेचा सर्वात जुना मित्र फ्रान्स नाराज आहे आणि तो भारतासोबत आहे. हे ही एक कारण आहे की अमेरिकेचे भारताशी जे संबंध आहेत त्यात बदल झालेला दिसत नाही. आणखिन एक कारण हे आहे, ते म्हणजे अमेरिका, इजरायल, आणि सौदी अरेबिया असा एक ग्रुप जो इराणच्या विरोधात आहे. त्या इराणचा भारत मित्र देश आहे. अमेरिकेने आपले अफगणिस्तानातून सैन्य मागे घेतले तसेच त्याने इराण संबंधीचे धोरण बासनात गुंडाळून ठेवलेले दिसते.
चीनने कितीही आपल्या मनाची तयारी केली असली, आणि तालिबानाला पाठींबा दर्शवला असला तरी उघडपणे जिहादी- आतंकवादी तालिबानाला सहाय्य करण्याचे धाडस चीन या घटकेला करणार नाही. एकंदरीत अफगणिस्तानात गुंतवणूक करण्यास आसूसलेल्या चीनला अडकवून ठेवण्याचे धोरण अमेरिकेचे दिसत आहे. इंडो-पेसेफिक रिजनमध्यें चीनने जे आक्रमक धोरण अवलंबिलेले त्यावर उपाय म्हणून क्वार्डचा जन्म झाला आणि आता AUKUS ची निर्मिती झाली. त्यावर ऑस्ट्रेलियाचे एक तज्ञ सॅम रॉग्गेएवीन यांनी ' Extraordinary and truly historic announcement ' अशी प्रतिक्रीया दिली आहे. याचा अर्थ असाच होतो की सॅम रॉग्गेएवीन यांनी चीनची इंडो पॅसीफिक रिजन मध्ये वेगवान हालचालीचे ' Situation is more alarming ' असे वर्णन केले त्यांचा प्रभाव अमेरिकेचे अध्यक्ष बायडेनवर पडला असावा असे काही जाणकारांनी म्हटले आहे.
एकंदरीत अफगणिस्तानातील अमेरिकेने आपले सैन्य माघारी घेतल्यानंतर अमेरिकेचे राजकारण ज्या दिशेने पुढे जात आहे त्यावरून जगातील विशेषतः पुर्व आशियायी देश जपान, नार्थ कोरिया , साऊथ कोरीया इत्यादी, तसेच दक्षिण -पुर्व आशियायी देश, आणि अफगणिस्तानाच्या सिमा ज्या देशांशी जोडल्या आहेत अशा सार्या देशांच्या परराष्ट्र खात्याला आपल्या संरक्षण खात्याशी कोऑरडीनेशन करूनच आपले राजकारण रेटावे लागत आहे असे दिसते. असे असले तरी अमेरेकेचे बायडोन आणि चीनचे शी जिनपिंग यांच्यातही फोनवरून बोलणे झाल्याचे वृत्त आले आहे. म्हणून प्रत्यक्ष तिसरे महायुद्ध होईल की ही शीतयुद्ध पर्वाची सुरूवात होत आहे , यावरील चर्चा आपण पुढील भागात करू या.
रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१
जागतिक राजकारण आणि भारत भाग २ (अमेरिकेचे धोरण )
जागतिक राजकारण आणि भारत या विषयावरील चर्चेचा दुसरा भाग सादर करताना मागील लेखाच्या शेवटी ज्या देशांचा उल्लेख केला आहे, अशा देशांचे विद्यमान राजकारण कुठल्या दिशेने चालले आहे आणि पुढे कसे राहील यावर क्रमशः चर्चा करू या. असे असले तरी पश्चीम आशियायी, नाटोतील सदस्य देश, आफ्रीखा खंडातील देश लॅटीन अमेरिकन देश पुर्व आशियायी, दक्षिण पुर्व आशियायी देश यांची विद्यमान जागतिक राजकारणावरच्या भूमिकेला महत्व नाही असे नाही. त्यांच्या भूमिकेवर ही चर्चा करावी लागणार आहे. म्हणून या लेखाचे भाग किती होतील हे सांगता येत नाही. मी पुन्हा नम्रपणे सांगतो की मी काही राजकारणातला तज्ञ नाही. पण जे काही ऐकतो, वाचतो, त्यातून व्यक्त होण्याचा हा प्रयत्न आहे. आपण सारे जण आधूनिक विज्ञानाच्या अत्याधूनिक माहिती व तंत्रज्ञानाच्या उपकरणातून जगात काय चाललं आहे यासंबंधी माहिती गोळा करीत मेंदूत साठवत असतो. त्यातील बातम्या किती खर्या-खोट्या हा आधुनिक तंत्रज्ञानाचा शाप नाही तर ते काही मिडीया हाऊस च्या हातून होणारे पाप आहे. तरीही आपण वाचतो आणि त्यावर आपले मत तयार करून शेअर करतो. वस्तूतः मी लेख लिहीत नाही. मी चर्चेच्या माध्यमातून माझे मत मांडतो, आणि चर्चेला शब्द सीमा नसते. आमच्या वसई तालूक्यातील भुईगावातील माझे जेष्ठ साहित्यप्रेमी मित्र कै मधूशेठ नाईक यांनी सन १९८९ ला नवीन घर बांधले. त्या घराला त्यांनी नाव दिले आहे ' संवाद '. ते सतत आग्रहाने मांडत होते की " सततचा संवाद ठेवा, चांगले बोलायला पैसे मोजावे लागत नाही." आपल्या संस्कृतीत म्हटले आहे -
दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)
गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...
-
मंडळी, मागील लेखात आपण असुरक्षिततेच्या भावनेपोटी, मनुष्य समूहात राहू लागला आणि नंतर समाज व्यवस्था उभी राहीली, हे पाहिलं. त्याच लेखात स...
-
आज जेष्ठ शु१३ शके १९४२ शिवराज शक ३४७ गुरूवार दिनांक ४जून २०२०. आजच्या दिवशी म्हणजे जेष्ठ शु१३ शके १५९६ अर्थात ६ जून १६७४ रोजी शिवाजी महार...
-
अलीकडे Whats App वर एक पोस्ट आली. ती अशी आहे, "Desires dictates our priorities, priorities shape our choices, and choices determi...





