इंडी आघाडी व मविआ चे राजकारण इतक्या सूड भावनेने प्रेरीत आहे की ही सूडभावना त्यांच्या कार्यकर्त्यात सुद्धा शिरली आहे. याचा अनुभव मला आला आहे. मी आनंदराव पवार सरस्वती विद्यालयाची (वझिरा बोरीवली(प) सचीव पदाची जबाबदारी सांभाळतो आहे. या खेपेस प्रथमच आनंदराव पवार शाळा हे मतदान केंद्र झाले होते. त्यामुळे आपल्या केंद्रात शंभर टक्के मतदान व्हावे ही इच्छा प्रबळ झाली. तसे पाहता मतदाता जागृती अभियानात मी पहिल्यादांचा भाग घेतो असे नाही. वझिरात जनजागरणाच्या कार्यक्रमात भाग घेण्याची ही चौथी खेप आहे. या अभियानात माझ्या सोबत आणखिन तिघेजण होते. त्यापैकी एक कार्यकर्ता ज्या सहकारी सोसायटीत राहतो तिथे आम्ही दोघांनीच अभियानाची जबाबदारी स्विकारली. बाकी दोघांना दुसर्या सोसायटीत जावयास सांगितले.
मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग --५)
आम्ही दोघजण सोसायटीच्या तळमजल्याच्या पॅसेज मध्ये होतो तेव्हा त्या सोसायटीचा एक सदस्य भेटला. त्या सदस्याशी सोबतच्या कार्यकर्त्याने माझी ओळख करून दिली. मतदाता जागृती अभियाना साठी आनंदराव पवार शाळेचा सेक्रेटरी म्हणून मी आलो आहे अशी ओळख झाली. त्यावरून मी संघाचा स्वयंसेवक आहे हे त्या गृहस्थाच्या लक्षात आले. त्यांनी मला विचारले, 'काय हो तुम्ही बोरीवली मतदार संघात बाहेरील उमेदवार का
आणला ?' मी उत्तर दिले 'मला याबाबतचे फारसे काही माहिती नाही.' त्या गृहस्थाने म्हटले, बोरीवलीतल्या कार्यकर्त्यावर नेहमी बाहेरचा उमेदवार लादला जातो हे चूकीचे आहे ना? असा प्रश्न विचारला. मी उत्तर दिले, ' तुमचं म्हणणं बरोबर आहे . पण राजकारण आपल्या हातात नसते.' त्यावर ते गृहस्थ म्हणाले 'सर्व बाबीत केंद्रातून आदेश येतो तो तुम्ही का स्विकारता? मी उत्तर दिले ' आपण बरे आपले काम बरे ! वादविवाद करण्यासाठी आम्ही आलेलो नाही ' असे म्हणून मी शेवटी त्यांना सौम्य भाषेत म्हटले, " मला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तो प्रश्न असा आहे, उद्धव ठाकरे म्हणतात की बंद खोलीत अमित शहा यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यावयाचे कबूल केले होते. ते दिले नाही म्हणून आम्ही भाजपाला धडा दिला. पुरावा देण्याची जबाबदारी तक्रार करण्यार्ची असते. पुरावा नसताना काही तरी आरोप करणे हेच मूळी संघर्षाचे कारण असते. अमित शहा किमान मातोश्री वर आले होते. आघाडीच्या बैठकांसाठी जनाब ठाकरे स्वतः कसे गेले दिल्लीला? " यावर ते गृहस्थ हसले आणि म्हणाले मी श्रीराम जन्मभूमी श्रीराम मंदिर च्या निधी संकलनात भाग घेऊन सोसायटीतून पन्नास हजाराहून अधिक निधी गोळा करून दिला आहे. ते गृहस्थ माझ्या पेक्षा धाकटे असल्याने मी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. नंतर ते बाहेर गेले.
आम्ही दोघे लिफ्टमधून शेवटच्या मजल्यावर गेलो. त्या सोसायटीतले अभियान संपवून नंतर आम्ही दुसरी कडे गेलो. ते गृहस्थ मविआ च्या घटक पक्षाचे कार्यकर्ते आहेत की नाही आम्ही विचारपूस केली नाही. पण सोशल मिडीया असो वा सामाजिक समारंभात, अथवा बस व रेल्वे स्थानक, बागबगीचा, बाजार इत्यादी स्थानी राजकारणावर नको तितकी चर्चा होते आणि त्यातून वादविवाद विकोपाला जातात हे अलिकडे नित्याचे झाले आहे. यावर मी एका लेखात माझे मत सविस्तर मांडले आहे.
वरील अनुभव मी येथे शेअर केला याचे कारण मविआच्या घटक पक्षातल्या कार्यकर्त्यांना जागोजागी हुज्जत घालण्याची सवय जडली आहे. अशा हुल्लडबाजीचे जनकत्व राष्ट्रीय स्तरावर सोनिया गांधी व ममता बॅनर्जी व महाराष्ट्रातील मविआ त्यात ही विशेषतः उद्धव ठाकरे व जितेंद्र आव्हाड. थोडक्यात घराणेशाही पक्षच राजकारणाचा पोत खाली आणण्यास जबाबदार आहेत. ' यथा राजा तथा प्रजा ' हा नियम घराणेशाही पक्षात आज ही अस्तित्वात आहे. आपल्या येथील घराणेशाही पक्षांतील युवराजांचे वर्तन राजेशाही व हुकूमशाही सारखे असते. मग त्या पक्षांचे कार्यकर्ते उर्मठच बनणार ना ! चीनशी काँग्रेस पक्षाने करार केला आहे खरा पण त्या चीन मध्ये लोकशाही नाहीच. मग घराणेशाही तरी कशी येणार चीन मध्ये ? विद्यमान राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबातील सदस्य राष्ट्राध्यक्ष होणारा नसतो. कारण साम्यवादी पक्षाच्या राजवटीत हूकुमशाही असते व तीच पक्षाचं सर्वोच्च कार्यकारिणी असते.
आपल्या येथील घराणेशाही पक्षांना मग ते उत्तरेतील असो वा दक्षिणेतील, पश्चीमेकडील असो वा पुर्वेकडील, त्यांच्या वारसांचा जम बसावा म्हणूनच संसदीय लोकशाही प्रणाली हवी असते. कारण त्यातूनच पक्षाचा ताबा मिळतो. एकदा की पक्षाचा ताबा मिळविला की संसद, विधानसभा आपोआप ताब्यात येतात. कारण बापजाद्यांनी लुटलेली प्रचंड माया असते ती वारस हक्काने मिळतेच ना ! ती माया एकप्रकारे आपल्या घराण्यातील पुढच्या पिढींना राजकीय क्षेत्रात करिअर साठी केलेली सुलभ सोय होय. शेवटी राजकारण सुद्धा जिथे ' दाम करी काम ! ' असेच एक क्षेत्र आहे.
क्रमशः
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)
गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...
-
मंडळी, मागील लेखात आपण असुरक्षिततेच्या भावनेपोटी, मनुष्य समूहात राहू लागला आणि नंतर समाज व्यवस्था उभी राहीली, हे पाहिलं. त्याच लेखात स...
-
आज जेष्ठ शु१३ शके १९४२ शिवराज शक ३४७ गुरूवार दिनांक ४जून २०२०. आजच्या दिवशी म्हणजे जेष्ठ शु१३ शके १५९६ अर्थात ६ जून १६७४ रोजी शिवाजी महार...
-
अलीकडे Whats App वर एक पोस्ट आली. ती अशी आहे, "Desires dictates our priorities, priorities shape our choices, and choices determi...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा