शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

आपण व आपले उत्सव - रक्षाबंधन

आपण व आपले उत्सव--- रक्षाबंधन 


नमस्कार  मंडळीं,

  
वयोमानानुसार  तब्येतीच्या कुरबुरी  सुरू होणे हे स्वाभाविक आहे. It is law of nature. त्यामुळे  जवळपास एक वर्ष मी  ब्लॉगवर आपल्या भेटीस आलो नाही.  ब्लॉगवर राजकीय घडामोडींवरील लेखांची संख्या थोड्या प्रमाणात अधिक असली तरी 'आपण व आपली दैवते',  'आपण व आपले उत्सव ', 'तस्मात उत्तीष्ठं कौन्तेय  युद्धाय कृतीनिश्चय:।'  'कर्मण्ये वाधिकारणास्तू | ' पर्यावरण,  ' चित्रपट व समाजमन '  सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विषयांवर ही लेख लिहले आहेत. आपणांस हे केवळ ठाउकच नव्हे तर अशा लेखांवर ही आपण माझे कौतुक  केले आहे. वस्तुत: मी लेखक नाही. मला आपल्या उत्सवातूनच तसेच आपल्या सारख्या वाचकांच्या प्रतिसादांतून लेख  लिहण्याची प्रेरणा मिळत आली आहे.  

रक्षाबंधन हा उत्सव अनादि  काळापासून  आपल्या देशात साजरा होत आहे. म्हणून  या उत्सवावर आपल्याशी संवाद करावा अशी प्रबळ इच्छा निर्माण झाली. म्हणून मी लेखणी हातात घेतली. सन २०१७ ला हिंदू नववर्ष प्रतिपदा 
गुढीपाडव्याच्या दिनी  ' विचारमंथन '  ब्लॉग ची मुहूर्तमेढ रोवली. सन २०२४ पर्यंत दर वर्षाला सरासरी लेखांची संख्या तीस ते पस्तीस होती. आता तितकी संख्या मी पार पाडू शकेन असे मला वाटत नाही. लेख लिहीण्यासाठी लागणाऱ्या विषयाचे विशेषत: राजकीय क्षेत्रात जगभर भरघोस पीक उगवत आहे. त्यासंबंधी आश्चर्य वाटत नाही. पण राजकारण एक असे क्षेत्र आहे की सकाळी ज्या जमिनीत जे पीक उगवले त्या जमिनीत दुपारी दूसरेच पीक उगवते. कारण Politics has became a matter of perception and narrative only. अशा स्थितीमुळे राजकीय क्षेत्रात  लेख लिहण्याची गती वाढत आहे. उलट माझी गती  मंद होत आहे  . आपणांस याची जाणीव आहे या बाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. पण आपल्या पासून दूर  राहिल्याची खंत आहे, ती कमी करण्याचा प्रयत्न या  लेखापासून सुरु करीत आहे.

आपल्या संस्कृती मधील उत्सवांवर चर्चा, संवाद किंवा लेख इत्यादी उपचार उत्सवाच्या समाप्ती नंतर  करू नयेत असे बंधन नाही. हीच आपल्या संस्कृती ची महत्ता आहे.  मागे  नवरात्रोत्सव व विजयादशमी उत्सवा च्या समाप्ती नंतर मी  
' शक्ती उपासना ' या शिर्षकाचे  नऊ लेख ब्लॉगवर पब्लिश केले आहेत. आपल्या उत्सवातूनच आपल्याला उत्साह तसेच  बळ प्राप्त होत असते. ते बळ आणि उत्सव सतत वाढत जावे जेणेकरून आपल्या संस्कृतीचे व आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी समाजात एकोपा वाढला पाहीजे हीच विविध उत्सावातून शिकवण मिळत असते.

रक्षा बंथनाच्या उत्सावा संबंधित अधिकाधिक अभ्यास होऊ लागल्यानंतर रक्षाबंधनाचा उत्सव भाऊ-बहिणी पुरता मर्यादीत नसून, विद्यमान जागतिक राजकारण तसेच विदेशी शक्तीच्या आहारी गेलेल्या काही विरोधी पक्षांच्या नेत्यांना जडलेल्या अवदासा मुळे रक्षाबंधन उत्सवाची व्यापकता वाढविण्याचा प्रयत्न  देशाच्या कानाकोपऱ्यातून होणे आवश्यक झाले आहे.  सीमेवरून  होऊ शकणार्या धोक्यापासून  एक नागरिक म्हणून प्रत्येकाला सजग राहावे  लागेल. रक्षाबंधन उत्सव हा केवळ उत्सव नसून  जन्मोजन्मी चे एक बंधन आहे. आपला देश सुरक्षित राहीला तरच आपली संस्कृती टिकेल. संस्कृती टिकली तरच आपले उत्सव टिकतील.  

वाचकहो , रक्षाबंधन उत्सवाच्या एक दिवस अगोदर X वर भाजपाचे प्रकांड पंडीत श्रद्धेय डाॅ. सुधांशु त्रिवेदी यांनी संस्कृत श्लोकाने सुरवात करीत रक्षाबंधनाच्या दिलेल्या हार्दिक शुभेच्छा    वाचल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला. तसे पाहता सामान्यात: हार्दिक शुभेच्छाचं स्वरूपच गोड असते. असे असले तरी  X वरील डॉक्टर सुधांशु त्रिवेदी यांच्या हार्दिक शुभेच्छा वाचल्यानंतर आपल्या रक्षाबंधन उत्सवाची सुंदरता व व्यापकताचं विलोभनिय दर्शन झाले. म्हणून Xवरील त्यांच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या समोर ठेवतो. 

" येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः।
तेन त्वाम् अभिबध्नामि रक्षे मा चल मा चल॥"
(अर्थात जिस रक्षा सूत्र से महान शक्तिशाली दानवेन्द्र राजा बलि को बांधा गया था, उसी सूत्र मैं तुम्हें बांधती हूं, जो तुम्हारी रक्षा करेगा, हे रक्षा तुम स्थिर रहना, स्थिर रहना।)
रक्षाबंधनके अवसरपर, रक्षासुत्र  बांधते समय बोला जानेवाला यह श्लोक याद दिलाता  है की भारतिय  संस्कृतीमे असुर माने जानेवाले  राजा बलिमे यदि कोई गुण है तो उसका भी सन्मान और रक्षाबंधन किया जाता है | मुझे लगता है की इससे अधिक  उदार और  उदात्त  विचार पुरे विश्वमे देखनेको नही मिल सकता | If any so called self proclamaid liberal can find it in any other  culture ?  अत: हम सब आजके  इस पावन पर्व पर इस महान संस्कृती पर होनेवाले प्रत्यक्ष और वैचारिक दुष्प्राप्य के आकमण से रक्षा का संकल्प भी देना चाहिये | " डॉक्टर सुशांधु यांनी दिलेली माहिती आपल्या सर्वांना पसंत पडली  असावी या बाबत माझ्या मनात  किंचीत ही शंका नाही. 

रक्षाबंधन  या उत्सवाची सुरवात  भगवान श्रीविष्णू च्या वामन अवतारात झाली.  बळी राजा दानशूर  होता. पण इंद्रपद जिंकल्या नंतर असुरांनी थैमान घालण्याची सुरवात केल्यामुळे बळी राजाचै आजोबा भक्त प्रल्हाद नाराज झाले होतेच.  वामन देवाने बटूचे रूप घेऊन  बली राजाकडून तीन पावलांची भूमी मागितली.  बटूच्या दोन पावलात बळी राजाचे साम्राज्य संपले. बटूचे तिसरे पाऊल ठेवावयास जागा शिल्लक  राहिली नाही. बळी राजाने वामन देवास तिसरे पाऊल स्वताच्या माथ्यावर ठेवण्याची विनंती केली. वामनाच्या तिसऱ्या  पावलाने बळी राजा पातळात गेला.  बळी राजाने वामनाकडून एक वचन मागितले होते. ते म्हणजे पाताळात वामनाने आपल्या दारात तिष्ठत  राहावे.  वामनाने ते मान्य करुन पाताळात बळीच्या दारात तिष्ठत राहिले.  इथे वैकुंठात आपले पती परत आले नाही म्हणून माता लक्ष्मीदेवीने नारद मुनींना  विचारले तेव्हा त्यांनी हकिकत सांगितली. नंतर महालक्ष्मी बळी राजाच्या घरी जाऊन बळीच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून आपल्या पतीला वैकुंठात घेऊन जाण्याची विनंती केली. ती बळीने मान्य केली. रक्षाबंधन उत्सवात पावित्र्य  किती अमर्याद आहे या कथेतून उमजते.  

आपल्या ॠषीमुनींनी प्रत्येक उत्सावाचे   प्रयोजन अशा प्रकारे केले आहे की आपला समाज प्रगतीपथावर राहावा, आपल्या जीवन मूल्यांचा  जगभर  प्रसार व्हावा आणि आपला देश विश्वगुरू राहावा. उत्सवांची रचना ऋतुनुसार आखली आहे. ऋतुनुसार आहार - विहाराची  भलीमोठी पोथी, अनेक मोठ्या आजारावर उपाय म्हणून आयुर्वेद निर्माण  करुन ठेवला आहे.

स्वाध्याय  परिवाराचे प्रणेते पुजनीय पांडुरंगशास्त्री आठवलेजींनी  संस्कृति - पुजन या ग्रंथात ' श्रावणी  पौर्णिमा ' वर केलेल्या व्याख्यान द्वारे रक्षाबंधन उत्सवाची महत्ता व पावित्र्य मांडले आहे ते आपल्या समोर सारांश रुपात ठेवतो आहे. 

" रक्षाबंधन म्हणजे प्रेम-बंधन. आजच्या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते आणि त्याच बरोबर त्याला ह्रदयाच्या प्रेमाने बांधते आणि त्याच्या रक्षणाची कामना करते. हा उत्सव म्हणजे पराक्रम, प्रेम, संयम आणि भक्ती यांचा संगम होय. रक्षाबंधनाचा  उत्सव म्हणजे दृष्टि परिवर्तनाचा सण. बहिणीने हातात राखी बांधताच भावाची दृष्टिकोन बदलून जाते.  बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी तो स्वत:वर घेतो. त्यामुळे बहीण समाजात निर्भय बनून फिरुन शकते. राखी बांधण्यापुर्वी  बहिण भावाच्या कपाळाला टिळा लावते, तो टिळा म्हणजे  म्हणजे दोन डोळ्यां शिवाय भोगाला विसरुन  भाव-दृष्टिने जगाला पाहण्यासाठी  जणू तिसरा एक पवित्र डोळा होय. भावाच्या हातात रक्षा बांधून बहीण त्याच्या पासून केवळ स्वत:चे रक्षण इच्छिते असे नाही तर समस्त स्त्री जातीला स्वत:च्या भावाचे रक्षण मिळावे अशी करते.  त्याच बरोबर बाह्य शत्रूवर  व आंतरविकारांवर भावाने विजय मिळवावा णि भावाचे ही रक्षण व्हावे ही भावना देखील त्यात सावरलेली आहे. "

स्त्रीकडे विकृत नजरेने न पाहता पवित्र दृष्टी  हा महान  संदेश देणाऱ्या रक्षाबंधन उत्सव कुटुंबा पुरता मर्यादीत न राहता  त्याचे सामाजीकरण होणे आवश्यक आहे. शक्ती उपासना या लेख मालिकेत जिहादी वृत्तीची टोळी  प्रेमाचे नाटक करीत शालेय व महाविद्यालयीन मुलींना कसे आपल्या पाशात घेतात यावर  सविस्तर  माहिती मी मांडली आहे.  कुटुंब प्रमुखांनी आपआपल्या गावात, चाळीत, गृहसंस्थात सामुहिक रित्या जागरूक  राहून जिहादी वृत्तीच्या टोळीचा वावर दिसला तर लागलीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा उपयोग करून त्या टोळीचा नायनाट करावा.








































































कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपण व आपले उत्सव - रक्षाबंधन

आपण व आपले उत्सव--- रक्षाबंधन  नमस्कार  मंडळीं,    वयोमानानुसार  तब्येतीच्या कुरबुरी  सुरू होणे हे स्वाभाविक आहे. It is law of nature. त्य...