सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५
दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)
मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग- ६)
आपल्या देशाच्या लोकशाहीला खरा धोका घराणेशाहीच्या पक्षांचा आहे. जागतिक लिबरल लाॅबीला आपल्या देशातले फक्त मोदी सरकार उलथावयाचे नसून केंद्रस्थानी काँग्रेस म्हणजे गांधी घराण्याची सत्ता व सर्व राज्यांत प्रान्तिय पक्षाचे सुभेदार अशी मध्ययुगीन सरंजमशाही, म्हणजेच चीनी साम्राज्याची वसाहत भारतात स्थापन करावयाची आहे. अशा सरंजमशाही- घराणेशाही च्या विरोधात मतदारात जागृती होत आहे. याची चुणूक उत्तर कोकणातील वसई, नालासोपारा व पालघर मतदार संघात पाहायला मिळाली आहे. मला विशेष आनंद झाला. कारण वरील तिन्ही मतदार संघातील भाजपाचा विजय हा आमच्या तालूक्यातला म्हणजे वसई चा. आमच्या गावाचा म्हणजे नालासोपाराचा विजय आणि तिसरा पालघर मतदार संघाचा म्हणजे आमच्या जिल्ह्याचा.
या तिन्ही मतदारसंघातील विजय अपूर्व आहे. हा विभाग माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या परिवाराचा बालकिल्ला. यंदा प्रथमच ठाकूर परिवाराचा पराभव झाल्यामूळे महाराष्ट्रात या विभागातील भाजपाचा विजय अनेक राजकीय अभ्यासकांचा चर्चेचा विषय झाला आहे.
नालासोपारा मतदारसंघातून निवडणून आलेले भाजपा उमेदवार आमच्या गावातले. आमच्या नाळा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत पढई नावाची छोटी वाडी आहे. जागृत दत्तमंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मी प्राथमिक शाळेत असताना सन १९५८ ला तत्कालीन युवक कै भालचंद्र आप्पा म्हात्रे, कै वासुदेवदादा म्हात्रे, श्री बाळकृष्ण अण्णा नाईक या त्रिमूतींने कै दामुआप्पा म्हात्रे, कै बबनतात्या म्हात्रे श्री गजानन वामन म्हात्रे इत्यादींच्या सहकार्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरू केली. संघस्थान अर्थातच आमच्या गावातल्या पुर्वाश्रमींनी सन १९४९ ला बांधलेले प्रसिद्ध श्री दत्तमंदिर हेच आहे. तमाम गावकरी सध्या श्री दत्त जन्मोत्सव व दत्तमंदिराच्या अमृत महोत्सवाच्या सोहळ्याच्या तयारीत आहेत. या आनंदाच्या सोहळ्यात राजन नाईक यांचा तसेच वसई व पालघर विधानसभा मतदारसंघातला भाजपाचा विजयाने आमचा आनंद द्विगुणीत केला आहे.
राजन नाईक हे आमच्या गावातले. ज्यांनी शाखा सुरू केली अशा पाच-सहा युवकांपैकी श्री बाळकृष्ण नाईक हे राजन नाईक यांचे पिताश्री. राजन नाईक हे ही बालपणापासून संघ स्वयंसेवक आहेत. व्यवसाय निमित्ताने त्यांचा नालासोपारा येथील जनतेशी संपर्क झाला. ते यशस्वी व्यवसायिक व दिलदार समाजसेवक आहेत. त्यांचा नालासोपारात व्यवसाय असला तरी रात्री ते झोपायला पढई गावातल्या घरी येतात.
सन १९६४ साली पंचक्रोशीतल्या समाजबांधवानी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची शोकसभा घेऊन पहिल्या पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली ती पढई वाडीतच. सन १९७७ च्या आणिबाणीच्या निषेधार्थ झालेल्या सत्याग्रहाचे नियोजन केंद्र आमचे गाव होते. श्री दत्तात्रेय म्हात्रे, श्री सदानंद म्हात्रे व अनंत म्हात्रे, या तिघानी सत्याग्रहात भाग घेतला होता. आजही ही पढई नावाची ही वाडी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई चे अधिवेशन, पंचक्रोशीतले रेल्वे कर्माचार्यांचे संपकाळातले केंद्र स्थान, वसई तालुका स्तरावरील जनता पार्टीचे पहिल्या अधिवेशनाचे स्थळ, उत्तर मुबंईतले खासदार माजी रेल्वमंत्री व उत्तर प्रदेशचे राज्यपाल श्रीराम नाईक यांचे प्रचार-दरम्यान निवासाचे स्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बोरीवली भाग सन १९९९ च्या वार्षिक नियोजन बैठकीचे स्थान, तसेच विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजनाचे यजमान म्हणून पढई ओळख ठेवून आहे.
राजकारणातल्या घराणेशाहीवर मी लेखाद्वारें टिका करीत असतो. घराणेशाही पक्षांच्या कार्यकर्त्यांना भाजपात काय होत आहे याकडेच अधिक लक्ष असते. ती एक खोड आहे. लोकसभेच्या निवडणूकात चांगले यश प्राप्त झाल्यामूळे बोरीवलीत काही ठिकाणी ' इथे माज उतरवला जातो ' असे बॅनर्स रस्त्यावर लावलेले दिसले होते. अशी कृत्यें करणे ही मविआच्या कार्यकर्त्यांची खोड झाली आहे. मविआंच्या कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष बूथ, वार्ड, व वस्तीत जाऊन पक्ष बळकट करण्याची सवयच मोडली आहे. यांच्या पक्षात पक्षप्रमुख म्हणजे मालक व कार्यकर्ते म्हणजे मजूर. त्यामूळे वरून जे काही आदेश येतात ते निमूटपणे स्विकारतात. सोनिया गांधी व राहूल गांधीनी काँग्रेस पक्ष चीन देशाच्या गोठयात बांधून ठेवला आहे. उद्धव ठाकरेने बाळासाहेबांच्या शिवसेनेला मौल्लवींच्या चरणीं ठेवले आहे. शरद पवारांना आपल्या पक्षाचं काय करावयाचे आहे हेच कळेनासे झाले आहे. शेवटी शरद पवार आपल्या पक्षाला काँग्रेसच्या गोठ्यात ठेवतील असे दिसते.
या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते व समर्थक भाजपाच्या अंतर्गत काय चालत आहे यावर पोटतिडकीने हुज्जत घालत असतात. अर्थात स्वतःचा मेंदू गहाण ठेवलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांशी हूज्जत घालण्याने दोघांचा वेळ वाया जातो. उगीच वादविवाद करून ब्लडप्रेशर नावाच्या रोगाला का आमंत्रण द्यावे ? आमच्याकडे आदेश नसतो. असते ती फक्त आज्ञा. संघाच्या दिक्षेतून मिळालेल्या प्रेरणेतून स्वयंसेवक समाजोन्नतीच्या अनेक क्षेत्रात संस्था उभारतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फक्त स्वयंसेवकांवर संस्कार करतो. स्वयंसेवकांचे कार्य हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका निमीत्ताने निवडणूक आयोग मतदारांसाठी अनेक सुविधा पुरवित आहे. हे प्रत्यक्ष पाहायला मिळाले. शंभर टक्के मतदानासाठी निव्वळ जाहिरात करून थांबत नाही. ज्यांना प्रकृती अस्वास्थ्याने मतदार केंद्रावर जाऊन मतदान करता येत नाही, त्यांच्यासाठी त्यांच्या घरी जाऊन गुप्तपणे मतदान करण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे. टपाला मत पद्धतीत सुधारणामुळे मतदानाचा टक्का वाढत आहे. प्रत्येक पंचक्रोशीत मतदान केंद्राची संख्या, कर्मचारी, पोलीस दल, अधिकार्यांची संख्या वाढवित आहे.
मतदान केंद्रावर जेष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोयी पुरवित आहे. त्यामुळे मतदान करण्यात अडचण येत नाही. उन्हाच्या तडाख्यात उभे राहावे लागू नये म्हणून मतदान केंद्र वाढवून केंद्रावर मंडप ही घातलेले दिसत आहेत. मतदान केंद्रांना शुभकार्याच्या मंडपाचे स्वरूप आलेले पाहावयास मिळत आहे. पाणी, व्हिलचेअरच्या खुर्च्या इत्यादी सुविधामूळे मतदान केंद्राना आधूनिकतेचं स्वरूप आले आहे. या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहावयास मिळाल्या. प्रत्येक केंद्रावर झेपेल इतकेच मतदान संख्या ठेवली. त्यामूळे मतदान सुरळीत व जलद गतीने होत असल्याचा अनुभव मिळाला. पण--
पण मतदान जलद गतीने होत असल्यामूळे मतदान केंद्रावर गर्दी दिसत नव्हती. त्यामूळे राजकीय पक्षांच्या निरीक्षकांना ही मतदान कमी होत आहे असे वाटत होते. शेवटी मतदान केंद्रातील टक्केवारी पोलिंग एजंट कडून कळली तेव्हा राजकीय पक्षांच्या विशेषतः महायुतीच्या कार्यकर्त्याना हायसे वाटले. निवडणूक आयोगावर टिका करणार्यांनी प्रथम निवडणूक आयोग पुरवित असलेल्या सोयी पाहाव्यात. उगीच मोर्चा, घेराव करण्याच्या भानगडीत विरोधी पक्षांची स्थिती आणखिन खालावत जाईल असे मला वाटते. राहीला प्रश्न विरोधी पक्ष कमकुवत होत गेले तर देशाची लोकशाही संपुष्टात येईल अशी जी भिती दाखवून विरोधी पक्ष व त्यांचे समर्थक मिडीया हाऊसेस मतें मागत आहेत, त्यावरील चर्चा निरर्थक आहे. कारण विरोधी पक्षांकडे भाजपा सरकारावर टिका करण्याचा राजकीय मुद्दाच राहीला नाही हे मतदारांना ठाऊक झाले आहे. या शिवाय या तथाकथित सेक्युलर व घराणेशाही पक्षांची दुकाने बंद झाली तरी अनेक आक्रमणें होऊन जी सनातन संस्कृती आज ही सुस्थितीत आहे, तीला जराही धक्का लागणार नाही. उलट आपला देश अधिकाधिक प्रगत व सशक्त होत जाणार आहे अशी खात्री बहुतांश मतदारांना वाटत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग --५)
इंडी आघाडी व मविआ चे राजकारण इतक्या सूड भावनेने प्रेरीत आहे की ही सूडभावना त्यांच्या कार्यकर्त्यात सुद्धा शिरली आहे. याचा अनुभव मला आला आहे. मी आनंदराव पवार सरस्वती विद्यालयाची (वझिरा बोरीवली(प) सचीव पदाची जबाबदारी सांभाळतो आहे. या खेपेस प्रथमच आनंदराव पवार शाळा हे मतदान केंद्र झाले होते. त्यामुळे आपल्या केंद्रात शंभर टक्के मतदान व्हावे ही इच्छा प्रबळ झाली. तसे पाहता मतदाता जागृती अभियानात मी पहिल्यादांचा भाग घेतो असे नाही. वझिरात जनजागरणाच्या कार्यक्रमात भाग घेण्याची ही चौथी खेप आहे. या अभियानात माझ्या सोबत आणखिन तिघेजण होते. त्यापैकी एक कार्यकर्ता ज्या सहकारी सोसायटीत राहतो तिथे आम्ही दोघांनीच अभियानाची जबाबदारी स्विकारली. बाकी दोघांना दुसर्या सोसायटीत जावयास सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग --४)
गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रातील राजकारणावर मी ३८ लेख पब्लीश केले आहेत. या शिवाय 'केंद्र-राज्य संघर्ष - महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया बंगाल' ' या लेखमालेतही महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा मांडली आहे. ' शिवसेनेतील फूट की काळाने शिवसेनेवर उगारलेला सूड ?' 'उद्धव ठाकरे खलनायक ठरत आहेत का?' ' शिवसेनाने गमाविलेल्या संधी, ' ' शरद पवार ना चाणक्य ना वारकरी फक्त संधीसाधू राजकारणी, 'राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट आणि घराणेशाही पक्षांची पडझड , सरकारचे डोके ठिकाणावर आहे का , इत्यादी शिर्षकाचे लेख त्या ३८ लेखात आहेत. तसेच ' राजकीय पक्षांच्या दिशा व दशा ' या शिर्षकाची राष्ट्रीय तसेच प्रान्तीय पक्षांची वर्तमान व भविष्याची स्थिती ती राज्यनिहाय एक लेखमाला ही पब्लीश केली आहे. त्यामूळे मागील दोन तीन महिन्यात राजकारणावर अधिक काही लिहावे असे मला वाटले नाही. म्हणून मी राजकीय लेख लिहणे थांबविले होते.
मविआचा धुव्वा का उडाला याची छोटी-मोठी अनेक कारणें आहेत ती माझ्या कुवतीनुसार आपल्या समोर ठेवावीत म्हणून मी लेखमालिका लिहावयास घेतली. त्यातील काही कारणें अशी आहेत की ते पुढील २० ते २५ वर्षे मविआ व इतर विरोधी पक्षांचा पिच्छा सोडणार नाहीत. ती महत्वाची अशी आहेत-
१) माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते पी चिंदबरम यानी भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीवर खोट-नाटं व सर्वात गंभीर असे भगवा दशहतवादाचे नॅरेटिव्ह तयार करून युपीए सरकारच्या काळात सनातन साधु-संताचा केलेला छळ मतदार विसरले नाहीत.
२)युपीएच्या राजवटीत (सन २००४ ते २०१३ मध्ये) न भूतो न भविष्य असा झालेला प्रचंड भ्रष्टाचार मतदारांच्या स्मरणात आज ही आहे.
३) उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते वेळी पोलीस यंत्रणेचा उपयोग पत्रकार- संपादकांना फरफटत कस्टडीत ठेवणे, रहस्यमय हत्या घडविणे व अशा हत्या नैसर्गिक मृत्यु दाखविण्याचा सपाटा, भ्रष्टाचार, सर्वत्र १४४ कलम लावले असताना कोरोना च्या साथीत पालघरला जमावाने केलेल्या दोन साधुंच्या निर्घूण हत्या
४)कोरोनो काळात औषधोपचार मध्ये झालेला भ्रष्टाचार तसेच छोटे-मोठ्या घटनांवर पडदा घालणे इत्यादी पापकृत्यांनी भरलेला उद्धव ठाकरे सरकारचा कारभार हे एक गंभीर कारण लोकांच्या स्मरणात होते.
५) सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींवर भर सभेत 'मोतका सौदागर' असे म्हणत देशातील राजकारणाला दिलेले सुडाचे स्वरूप.
६) सोनिया गांधीचे युवराज राहूल गांधी, केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादींवर जाहीर सभेत फार जहरी भाषेत टिका करीत असतात. राहूल गांधी फक्त आपल्या देशात नव्हे तर इतर देशात जातात तेव्हा ही आपल्या देशाच्या प्रत्येक व्यवस्थेवर निरंतर टिका करीत असतात. हा शहाणपणा नाही आणि बालीशपणा ही नाही. त्यांचे मानसिक संतुलन वेळोवेळी ढासळते की काय अशी शंका येते.
सूड भावना ही एक प्रकारे अजगरासारखा विळखा घालून आपल्याला कमकुवत करत असते याचे भान राजकीय नेत्यांनी विशेषतः राहूल गांधी, उद्धव ठाकरे, नाना पाटोळे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, स्टॅलीन, अरविंद केजरीवाल, आणि डाव्या पक्षांचे नेते व कार्यकर्ते (जे नक्षलवाद्यांना पाठींबा देतात) ठेवावयास हवे.अन्यथा राजकीय नेत्यांची आचार विचार आणि निर्णय घेण्याच्या ज्या शक्ती देहात विराजमान आहेत त्या सैरभैर होण्याची शक्यता असते. अशा स्थितीतून अराचजकतेचा जन्म होतो. असे जागतिक इतिहास सांगतो. काही इतिहास तज्ञ, राजकीय व सामाजिक अभ्यासक व चिंतनकार आपल्याला इशारावजा सल्ला देत असतात, ते चूकीचे नाही.
आपला महाराष्ट्र 'पुरोगामी विचाराचा, सर्वधर्मसमभाव बाळगणारा, शाहू फूले, आणि आंबेडकरांचा ' असा सततचा घोष करणारी मंडळीच महाराष्ट्रात जातीवादाचे व मुस्लीमाचे तुष्टीकरण करण्यात गुंतले आहेत. सापाला दुध दिले तरी तो विषच ओकतो. असा अनुभव देशाच्या फाळणीतून आपण घेतला आहे. सर्वसमावेशकता अंगी बाळगणे निश्चीतच चांगली गोष्ट आहे पण अल्पसंख्याकांचे लाड करून त्यांना डोक्यावर बसविण्याची हाव जी विरोधी पक्षांना लागली आहे, ती देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करेल असे बहुसंख्यांक हिंदु समाजाला आता वाटू लागले आहे. हेच कारण आहे ज्यामूळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकाचा निकाल अनाकलनीय आला असावा असे मला वाटते. असेच मत मी, ' त्रिपूरा येथे अफवा आणि धुडघूस महाराष्ट्रात कसा ? ' या शिर्षकाचे २१ नोव्हेंबर २०२१ला पब्लीश केलेल्या दोन लेखात वाचावयास मिळेल.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकारण खालच्या पातळीवर आणून ठेवले आहे. अखिल भारतीय स्तरावर सोनिया गांधी व राहूल गांधी या जोडीने काँग्रेसची स्थिती खिळखीळी करून ठेवली आहे. महाराष्ट्रात सन २०१४ ला केंद्रात भाजपा प्रणित एनडीए सरकार अस्तित्वात आल्यापासून विरोधी पक्ष सैरभैर झालेले दिसतात. त्यामूळे ॲक्सीस इंडीया या संस्थेने महायुतीला महाराष्ट्रात १७५ पर्यंत जागा मिळतील असे जे भाष्य केले होते त्यावर लिबरल मंडळीनी दुर्लक्ष केलेले दिसले. ॲक्सीस इंडीया संस्थेने एकूण ७५ ओपिनीयन पोल केले आहेत. त्यापैकी ७० पोल खरे ठरले आहेत. याकडे दुर्लक्ष करून मविआ आता आंदोलनजिवीच्या मार्गावरून जाऊ इच्छीते. काय म्हणावे ? कुत्र्याचं शेपुट नळीत घातले तरी शेवटी वाकडेच राहते.
महाराष्ट्रत प्रथमच एकतर्फी मतदान झालेले दिसले अशी सबब मांडून विरोधी पक्ष चुनाव आयोगाच्या विरोधात मोर्चा, धरणे इत्यादी नाटकं करण्याचे सत्र सुरू केले, तरीही हाती काही यश येणार नाही. उलट न्यायालय मविआवर ताशोरे ओढतील. सामान्य मतदारांना ही ठाऊक झाले आहे की विरोधी पक्षांचे मोर्चे विदेशी शक्तीच्या साह्याने देशात अस्थिरता निर्माण व्हावी हाच हेतू असतो. मराठा आरक्षण, संविधान बचाव, किसान आंदोलन, वल्फ बोर्ड च्या मोहीम, गणेश व नवरात्र या दोन महोत्सवात मुस्लीम समाजाची दादागिरीने अडथळे आणणे, लव जिहाद, आतंकवादी घटना यांच्या पाठीमागे देशविदेशी लिबरल लाॅबीच आहे.
मुस्लीम समाजाचे तुष्टीकरण कागोदपत्री स्वरूपात मौल्लवी कडे सुपूर्त करण्यापर्यंत मविआ ची मजल पोहचली. मग 'सजग रहो', सौ टक्का मतदान करो, बटोंगे तो कटोंगे, एक है तो सेफ है इत्यादी प्रतिक्रीया येणे हे स्वाभाविक आहे. सन १९८८-८९ च्या दरम्यान काँग्रेसचे वरीष्ठ व विद्वान नेते बॅ गाडगिळांनी काँग्रेसला हिंदू हिताकडे दुर्लक्ष करणे महाग पडेल असा इशारा दिला होता. पण काँग्रेसने दुर्लक्ष केले. काल-परवा माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सुद्धा भगवा दशहतवादाचे खोटे नॅरेटिव्ह काँग्रेसने करावयास नको होते असे स्पष्टपणे म्हटले आहे.
क्रमशः-
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग -- ३)
संघ, भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व निवडणूक आयोगावर दोष ठेवून काय साध्य होणार आहे ? सन २०१४ पासून लिबरल पत्रकार व राजकीय अभ्यासक सतत विदेशी धनशक्तीच्या साह्याने नेगेटिव्ह नॅरेशनाच्या आधारे विरोधी पक्षांना आधार देत आहेत. असा आधार म्हणजे वजन वाढविण्यासाठी एखाद्या पेंशटला औषधें दिल्यासारखे आहे. त्यातून वजन वाढते पण त्यातून तो पेंशट बलवान व शक्तीवान होतोच असे नाही ? पण मविआच्या नेतेमंडळींनी तो पेंशट वृद्ध होत नाही असा समज करून घेतला. ही एक प्रकारे राजकीय क्षेत्रातली अंधश्रद्धा ठरली. आश्चर्य असे की तथाकथित पुरोगामी, उदारमतवादी व अंधश्रद्धा निर्मुलनाचे शिल्पकारांची ही स्थिती ! लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण !
गेल्या लोकसभेच्या निवडणूकाच्या प्रचारात ' संविधान बचाओ ' असे नेगेटिव्ह नॅरेशनचा वापर करून दलीत, पिडीत मतदारांत संभ्रम झाला पण तो तात्पुरता टिकला.भाजपाचे संसदेतील संख्याबळ कमी झाले पण तेच नॅरेटिव्ह राज्यातील विधानसभा निवडणूकात उपयोगी पडेल अशी भ्रामक समजूत मविआने करून घेतली. हे ही एक महत्वाचे कारण आहे की ज्यामूळे अनाकलनीय असा निकाल लागला. महायुतीचा विजय व मविआचा पराभव होईल असे दिसत होतेच. मविआचा दारूण पराभव झाला एवढाच भाग काय तो आश्चर्यचा, नवलाचा व अनाकलनीय स्वरूपाचा आहे.
या व्यतीरिक्त इथे आणखिन एक मुद्दा मी मांडतो आहे जो हरियाणात आणि महाराष्ट्रात काँग्रेस प्रणित आघाडी ला महाग पडला. राहूल गांधीनी लोकसभेच्या निवडणूक प्रचारात संविधान नष्ट होईल म्हणून भाजपाला मत देऊ नका असे जे विधान केले होते , त्यात काही दम नव्हता. ते एक खोटं नॅरेटिव्ह होते हे लोकांना कळून आले. संसंदेच्या अधिवेशनात भाजपाचे तडफदार युवक खासदार अनुराग ठाकूर यांनी राहूल गांधीकडे नजर ठेवून ' भारतिय संविधान के कितने पृष्ठ है यह तो आप प्रथम बताये ?' असा प्रश्न भरगच्च खासदारांच्या उपस्थित संसंदेत विचारला तेव्हा राहूल गांधीना नानी आठवली असेल इतकी फजिती झालेली लोकांनी टिव्ही वरून पाहिलेली होती. म्हणे हे भारताचे भावी पंतप्रधान !
उबाठा च्या कार्यकर्त्यांना बोरीवली मतदार संघात भाजपाने बाहेरच्या उमेदवारांला का तिकीट दिले यावर हुज्जत घालावीसी वाटली पण इटालीयन सोनीया गांधीना काँग्रेसचे अध्यक्षपद का दिले, राजकारणाची जरा ही जाण नसलेल्या राहूल गांधीना काँग्रेसचे सर्वसर्वा केल्याबद्दल जाब विचारतात का? उबाठा सेनेचे प्रमूख उद्धव ठाकरे राहूल गांधी आणि सोनिया गांधीना वाकून नमस्कार करताना पाहतात तेव्हा ठाकरें चा राग का येत नाही ? स्व बाळासाहेब ठाकरे हिंदु हृदयसम्राट होते असे राहूल गांधी मानावयास तयार आहेत का असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जेव्हा जाहिरसभेत समोर ठेवला, त्यावर राहूल गांधीनी का उत्तर दिलेलं नाही. ते बाजूला ठेवू. पण उद्धव ठाकरेंचे भक्त काय करीत होते ? जे स्वतःला मर्द समजून घेत आहेत ते चूप का राहीले ? धिक्कार असो तुमच्या मर्दपणाचा व फुसक्या दादागिरीचा !
महाराष्ट्रातील मतदारांनी विधानसभा निवडणूका होण्याअगोदर संसंदेच्या अधिविशेनात भाजपाच्या अनुराग ठाकूर यांनी राहूल गांधीचा आवाज बंद केलेला पाहिला. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना खोलीतून बाहेर काढले होते, तेही विडीओतून पाहिले. आम्ही वाकणार नाही अशा फुसक्या गर्जना हवेतच विरल्या. अशा छोट्या छोट्या पण महत्वाच्या घटनातून ही मतदार कोणाला मत द्यावयाचे हे ठरवित असतो.
एकंदरीत जे अनाकालनीय घडले असे आपल्याला वाटते ते होणार होतेच. ते अटळ होते. ' करावे तसे भरावे ' हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा अनाकालनीयय घटना घडते व ती आपल्या विरोधात होते, तेव्हा त्यातील सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे क्रमप्राप्त असते. पण मविआ चे नेते मंडळी एवीएम मशीनवर पर्यायाने केंद्र सरकार वर टिका करीत आहेत. म्हणे, भाजपा सरकार एवीएम मशीन मध्ये काहीतरी गडबड करून ठेवते आहे. हे विरोधी पक्षांचे रडगाणं न्यायालयाने या अगोदर फेटाळून लावलेले आहेच. अन्याय करणार्या, धातांत खोटे बोलण्यार्यांना सहानुभूती कधी मिळत नसते. उलट अशांचे पाय चिखलात आणखिन रूतत जातात व सर्वनाश होतो. मग ते क्षेत्र कुठलेही असो.
क्रमशः--
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांचा निकाल अनाकलनीय की आकलनीय ? (भाग--२)
आपल्या मतांचा एक टक्का घसरला तर तो वाढविण्यासाठी भाजपा जितकी मेहनत घेतो तितकी मेहनत इंडी आघाडीचे व मविआचे पक्ष घेत नाहीत. मला वाटतं विरोधी पक्षांचे नेते मंडळी विदेशातून मिळणार्या धनाच्या राशीवर व नेगेटिव्ह नॅरेशनवर अधिक विसंबून राहतात. विरोधी पक्ष जे वादे करतात, ज्या योजनेची कल्पना मांडून आश्वासन देतात, पण विजय झाला की ती आश्वासने पुरी करीत नाहीत. कर्नाटक व तेलंगणात सत्ता हाती मिळाल्यानंतर काँग्रेस कडून जाहीरनाम्यातील एक ही योजना कार्यान्वित झालेली नाही.
महाष्ट्रातील मविआचे नेते मंडळी निवडणूक निकाला संबंधीत निवडणूक आयोगा विरूध्द आंदोलन मोहीम सुरू करणार आहे, अशी बातमी कानीं आली आहे. त्यातून काय साध्य होणार आहे ? काही नाही. पण विदेशी शक्तीकडून धन मिळत असते त्यावर पाणी का म्हणून सोडावे असे हे एक व्यवहारी कारण मविआ पाशी आहे. दुसरे असे की मविआच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची इतकी नामुष्की झाली आहे की त्यांना चेहरा लपवावासा वाटतो. त्यासाठी औषध हवे आहे. तेच ते निवडणूक आयोग वर मोर्चा आणि घेराव ! हे अपेक्षितच होते. मविआच्या दारूण पराभवा मुळे मविआ चे समर्थक असलेला मिडीया वर्ग तोंडघशी पडल्यामुळे निवडणूक निकाला संबंधीत चर्चा करताना तीच मंडळी मविआ नेत्यांना धारेवर घेत असतांना दिसत आहे.
एबीपीच्या खांडेकर उद्धव ठाकरेंना म्हणाले ''अहो, तुमचा पक्ष फोडला, बाप पळविला, तुमच्या पक्षाची निशाणी पळविली, आणि शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांना गद्दार- गद्दार असे किती दिवस हिणवित राहणार?, हा तुमचा पक्षांतर्गत मामला आहे. मतदारांसाठी हा मुद्दा जुना झाला आहे '' असे म्हणत आपली नाराजी स्पष्ट केली. काल परवा कुमार केतकर यांनी मविआचे नेते मंडळी इविएम मॅनेजमेंटवर जे आरोप करतात तो ' एक रडीचा डाव आहे. ' असे स्पष्टपणे म्हणाले. काही हिंदी भाषिक अजय दुबे सारखी पुरोगामी संपादक मंडळी सुद्धा मविआला विजयाची संधी असुनही पराभूत झाल्याबद्दल कडक शब्दात कानउघडणी केली आहे. त्यांनी सुद्धा एविएम मशीन मधील हेराफेरीचा आरोप ' नाच ना आये अंगन तेडा ' या स्वरूपाचा आहे असे म्हटले आहे. एनडीटिव्हीचे संजय पुगालिया, ज्यांनी एके काळी काॅग्रेसच्या मिडीया सेल मध्ये काम केले आहे त्यांनी तर राहूल गांधी जोपर्यंत काॅग्रेसचे सर्वेसर्वा राहणार तोपर्यंत काॅग्रेस निवडणूका हरत राहणार. काॅग्रेसचे धोरण ॲन्टी डेवलपमेन्ट, ॲन्टी नेशन, ॲन्टी हिंदू, घराणेशाही व त्यातून चंचल वृत्तीने पक्ष चालविणे, प्रत्येक प्रदेश काॅग्रेस अतंर्गत असलेले तंट्यावर तोडगे न काढता मामला वार्यवर सोडून देण्याची श्रेष्ठींची सवय इत्यादी कारणांची यादी उदाहरणा सह मांडली आहे. जी काॅग्रेसची स्थिती तशीच मविआची, तशीच इंडी आघाडीची स्थिती आहे.
अशा हतबल स्थितीत असलेली मविआ व इंडीची नेते मंडळी निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप दाखवित मोर्चा व घेरावाचे कार्यक्रम करीत आहेत. या पाठीमागे उद्देश एकच आहे, तो म्हणजे विदेशी मिडीया तून आपल्याला व आपल्या युवराजांना फूकट प्रसिद्धी मिळणार आहे, या शिवाय धन ही मिळणार मग त्यावर पाणी का सोडावे हा विचार ? विचार नव्हे हा विकार आहे. कारण पैशाची हाव ! मोर्चा, धरणे, व घेराव इत्यादी कार्यक्रमासाठी साठी मविआचे नेते मंडळी, कार्यकर्त्यांनांच राबवतील आणि त्यांचे वारसदार मात्र या कालावधीत फाईव्ह स्टार हाॅटेल मध्ये वास्तव्य करतील. त्यांना कुठे घाम गाळावा लागणार आहे ?
मोर्चा, धरणे, उपवास इत्यादी शस्त्रे मविआने उगारली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण मविआचे सरकारच मूळी भाजपाच्या (अर्थात फडणवीसच्या) पाठीत खंजीर खुपसून अस्तित्वात आलेले होते. शरद पवार जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले ते स्वपक्षातील बड्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसून झाले. तसेच आपल्या स्वपक्षातील नेते मंडळींना दिलेल्या जबाबदारीची व मंत्रीपदाची रचना सतत बदलत ठेवून (म्हणजे लहरी तैमूर लंग स्टाईलने) त्यांनी स्वतः लोकशाही बुरखा पांघरत 'हम करेसो कायदा' हीच पक्ष चालविण्याची रीत ठेवली.
सन २०१९ साली पाठीत खंजिर खुपसून राजकारण करणार्या यादीत उद्धव ठाकरे यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात कोरले गेले आहे. आपल्या देशाच्या इतिहासात स्वजनांच्या पाठीत खंजीर खुपसून राजाच्या गादीवर बसण्याचे पेटेंट जुलमी, खुनशी वृत्तीचा मोगल राजा, ज्याने सत्तेसाठी आपल्या बांधवांची ही मुंडके उडीवली होती, त्या औरंगजेब कडे जाते. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकात औरंगजेबची औलाद कोण आहेत हा एक मुद्दा अदृष्य स्वरूपात होता. महाराष्ट्रातील मतदारांनी कुठल्याही प्रकाराचा उताविळपणा न करता शांतपणे व दृढ निश्चयाने मविआ मधील औरंगजेबच्या औलादांना घरचा रस्ता दाखविला आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत, राहूल गांधी आणि नाना पाटोळे यांना निवडणूकाच्या निकालाने त्यांची जागा दाखवून दिली. याची आणखिन काही कारणें खालील प्रमाणे आहेत --
१)आम्ही मतदाता जागृती अभियान चे कार्य करताना घरोघर शंभर टक्के मतदान करा अशी आम्ही विनंती करीत होतो, त्या त्या वेळी प्रत्येक सोसायटीतल्या प्रत्येक फ्लॅट मधून १०० टक्के मतदान करणारच आहोत असे ठाम आश्वासन आम्हाला मतदारां तर्फे मिळत होते.
२)भाजपाचे महाराष्ट्रातले चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनी, ' हो, हे धर्मयुद्ध आहे ! ' असे ठणठणीत आवाजात जाहीर सभेतून उद्गार काढले तेव्हाच ते वाक्य मतदारपर्यंत पोहचले असल्याची जाणीव आम्हांला प्रत्येक फ्लॅटमधील रहिवाशांच्या चेहर्यावरून स्पष्ट दिसत होती. याचा अर्थ विरोधी पक्षांची नियत अधर्माकडे वळाली आहे हे मतदारांना कळले आहे. त्यामुळेच मतदानाची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतें पडली. निवडणूकाचा निकाल आला तो मविआचा संपुर्ण निकाल लावून.
३) विधानसभेच्या सन २०१९ च्या निवडणूकाचा जनादेश भाजपा व अखंड शिवसेनेच्या निवडणूक पुर्व युतीला होता. तसेच ५ वर्षे पुर्ण केलेल्या युती (फडणवीस) सरकारच्या कामगिरीचा होता. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरें यांना अवदासा आठवली आणि त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन मविआ आघाडी सरकारचे मुख्यमंत्री पद बळकाविले. वस्तुस्थिती अशी होती की उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनी सन २०१९ च्या मतदानाच्या अगोदरच काँग्रेस व भाजपा ला मिळणार्या मतात घट कशी होईल यावर युक्ती आखलेली होती. ती त्यांनी पार पाडली. मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी उद्धव ठाकरें यांनी आघाडी धर्म पाळला नाही. म्हणूनच सन २०१९ पासूनच महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण लागले. अडीच वर्षात सरकार पडल्यानंतर पुढील अडीच वर्षात मविआने आपला सर्व वेळ महायुतीच्या नेत्यांवर टिका करण्यात खर्ची केला. महायुतीने सत्तेवर आल्यानंतर विकासाच्या प्रकल्पांना गती देण्यास सुरूवात केली.
दुसर्या बाजूला मविआने जगभरच्या लिबरल लाॅबीने तयार केलेले नेगेटिव्ह नॅरेशन्स जादुच्या कांड्या समजत अत्यंत तिखट शब्दात मांडावयास सुरूवात केली. थोडा फार फायदा लोकसभेच्या निवडणूकात झाला. त्यातून हिंदु समाजात फूट पाडण्याच्या योजनेतून विधानसभेत इतका प्रचंड विजय मिळेल की केंद्र सरकार हादरलं जाईल अशी मविआच्या नेत्यांना आशा वाटू लागली. त्यामूळे मविआ नेते वाजवी पेक्षा अधिक शेफारले. परीणाम असा झाला की मविआच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी उघडपणे स्पर्धा सुरू झाली. त्यातून हिंदू समाज दुखावत गेला यावर मविआच्या नेत्यांचे दुर्लक्ष झाले. इथेच मविआच्या पराभवाची बी नियतीने धर्म रक्षणासाठी रोवली असावी.
४)उद्धव ठाकरे हे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक ठरले. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. ते भाजपा, मोदी अमित शहा, फडणवीस यांचा पराकोटीचा द्वेष करतात. एका जाहीर सभेतील उद्धव ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीसला उद्देशून केलेले वक्तव्य असे आहे ' एक तर मी राहीन नाही तर तू ' ! या संबंधीत एका पत्रकाराने देवेंद्र फडणवीस यांना ' तुम्ही यावर काय प्रतिक्रीया द्याल ? ' असा प्रश्न विचारला, तेव्हा फडणविसांनी शांतपणे पण स्पष्ट उत्तर दिले, ' यावर कसली प्रतिक्रीया मागता हो ?'
क्रमाश:--
शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग --१)
बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४
त्रिपुरात अफवा पण महाराष्ट्रात धुडघुस कसा ? (भाग-२)
वाचक हो, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार मध्ये जे दंद्व माजले आहे, त्याचे स्वरूप मला जसे दिसले, भासले त्यातून जे आकलन झाले, ते मी या लेखाच्या भाग १ मध्ये मांडले आहे. ही मांडणी म्हणजे मी दावा मांडला आहे असे नाही. ही घटना गंभीर स्वरूपाची आहे. या घटनेवरील राजकारण संपणार नाही. त्यामूळे या विषयावर चर्चा ही सुरू राहणार आहे. म्हणून या घटनेचा भौगोलिक तसेच निसर्ग नियम, मानसशास्त्र आणि सामान्य ज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहाता आपल्या हाती काय लागते यावर चर्चा करू या.
गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४
शिक्षक दिन - व्यापकता व महत्व (भाग २)
बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४
शिक्षक दिन - व्यापकता आणि महत्व (भाग-१ )
बुधवार, ५ जून, २०२४
निसर्ग आणि मानवामधील ऋणानुबंध भाग--३
निसर्ग आणि मानव मधील ऋणानुबंध भाग - २
निसर्ग आणि मानवामधील ऋणानुबंध भाग - १
शुक्रवार, १७ मे, २०२४
लोकसभा निवडणूका- २०२४ इंडी आघाडीच्या प्रचाराच स्वरूप मुस्लीमांच तुष्टीकरण व हिंदू हिताकडे दुर्लक्ष (भाग- ५ व ६)
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षांच्या काही नेत्यांनी राजकारण हा समाजसेवेचा मार्ग न मानता आपला स्वतःचा धंदा मानला. वाडवडिलांचा धंदा, व्यवसाय हे एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे, पुढे तिसर्या पिढीकडे चालत आलेले असतात. ही मानवाची स्वाभाविक प्रवृत्ती. त्यात अनेक प्रकार आहेत. मानवी जीवनाचा इतिहास पाहता सम व्यवसायी लोक समूहात राहणे पसंत करू लागले. या व्यवस्थेचं नाव वर्ण व्यवस्था. वर्णव्यवस्था म्हणजे जातीव्यवस्था नव्हे. या संबंधीत अधिक माहिती चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः या शिर्षकाचा माझ्या ब्लाॅग वरील लेखात आहे, ती आपण वाचू शकता.
मुद्दा हा आहे की वडील डॉक्टर असले की मुलगा डॉक्टर बनणे, वडील दुकान चालवत असतील तर पुढची पिढी दुकान चालविणे अशी जी स्वाभाविक वृत्ती असते तीला समाज मान्यता देत असतो. राजकारण हा धंदा किंवा व्यवसाय नव्हे.
राजकारणातील घराणेशाहीला समाज मान्यता देतो पण आमदारकी, खासदारकी पूरता सिमीत असणे आवश्यक आहे. पक्षच एखाद्या परिवाराच्या मालकीचा होणे हे फार घातक ठरू शकते. राहूल गांधीचा पिंड राजकारणाचा नसावा. यावर मी एका लेखात सविस्तरपणे लिहले आहे. केवळ बापजाद्यांनी राजकारण केले म्हणून चौथ्या पिढीतील मुलांना राजकारणात पाठविणे अन्यायाचे ठरते. कारण त्यांच्या कडे राजकारण क्षेत्रात काम करण्यासाठी असलेली गती व मती पूर्णतः लोप झालेली असते. हा निसर्गाचा नियम आहे.
राजकारणात घराणेशाहीचा उदय प्रथम काँग्रेस पक्षात झाला. स्वाभाविकतः काँग्रेस पक्षांची जी पिल्लावळ आहे अशा प्रान्तीय पक्षांत ही, ती शिरली यात नवल ते कसले ? राजकारणातील आपली घराणेशाही जिवंत ठेवावयाची असेल तर हिंदू समाजातील जाती-जमातीमध्ये भांडणे लावण्याची क्लुप्ती लढविणे क्रमप्राप्त ठरते. हा वारसा काँग्रेसला अर्थातच ब्रिटीश राजवटीकडून देणगी रूपात मिळालेला. तसेच प्रजेची हिंदू व अहिंदू अशी ओळख व विभागणी, ही आपल्या देशावर दिर्घकाळ राज्य करण्यासाठी ब्रिटीशांनी अवलंबलेली नीती. जिचे नाव ' फोडा आणि झोडा ' असे आहे.
तीच नीती स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाने स्विकारली. मग ज्या हिंदू बांधवाचे जबरदस्तीने धर्मांतर झाले अशा मुस्लिम व ख्रिस्ती बांधवांना अल्पसंख्यांकाचा दर्जा देणे, सोयी व सवलती देणे, जगभरातील मुस्लीम व ख्रिस्ती देशातील स्वयंसेवी संस्थातून मुस्लीम व ख्रिस्ती संस्थांना मिळणार्या अपाम पैशाचा आकडा व त्या पैशाचा विनियोग कसा होतो यावर सोयिस्कर रित्या दुर्लक्ष करणे, त्या पैशातून अधिकाधिक हिंदू समाज बांधवांचे विविध प्रलोभने दाखवून धर्मातंर झाले, तरी त्यावर ही दुर्लक्ष करणे, इत्यादी क्लुप्त्या स्वातंत्र्यानंतर काॅग्रेसने ब्रिटीशांपेक्षा अधिक सराईतपणे वापरल्या. काॅग्रेसमधून बाहेर पडून ज्यांनी स्वतःचे पक्ष स्थापन केले अशा प्रांतीय पक्षांनी काॅग्रेसपेक्षा अधिक निर्लज्जपणे अल्पसंख्यांकाचे लाड करीत आहेत.
इतकेच नव्हे हिंदूच्या मंदिरातील पैसा सरकार नैसर्गिक आपत्ती काळात उपयोग करते. त्यात ख्रिश्चन व मुस्लिम बांधवांना मदत देत असते. दोन भावांना सर्व बाजूने लाड करावयाचे व हिंदू भावाला सावत्र मुलासारखे वागविणे हे भारत मातेला तरी आवडेल का, याचा विचार सर्व राजकीय पक्षांनी करायला हवा. यातील विशेष बाब अशी आहे की साम्यवादी पक्ष देव धर्म मानत नाहीत तरी सुद्धा ख्रिस्ती व मुस्लीम समाजाचे लाड करतात पण हिंदू संस्कृतीचा द्वेष करीत असतात. ज्या राज्यात साम्यवादी पक्षांची सत्ता होती व आज आहे अशा केरळ राज्यात तसेच पुर्वीचा साम्यवाद्यांचा बालकिल्ला असलेल्या पश्चीम बंगालमध्ये तृणमूल काॅग्रेस हिंदू संघटनांवर, अध्यात्मिक गुरू व संस्था आणि संघ परिवाराचा पराकोटीचा छळ करीत आहेत. मोदी सरकार कुठल्याही अल्पसंख्याकांवर अन्याय करीत नाही आणि करणार ही नाही. पण हिंदू हिताकडे दुर्लक्ष व अन्याय करणारे पक्ष, विदेशी संस्था, नक्षलवादी, व दशहतवादी इत्यादी मंडळींवर कडक कारवाई मोदी सरकार करेल असे दिसते.
काँग्रेस असो वा प्रान्तीय पक्ष असोत भाजपाने अल्पसंख्याकांच्या लांगूनचालनावर आक्षेप घेतला की भाजपा सांप्रदायिक पक्ष आहे असे एकमूखाने टिका करीत राहिले. पण अती तिथे माती या न्यायानुसार हिंदू समाज जागरूक होत गेला आणि सन २०१४ ला केंद्रात भाजपाचे सरकार आले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाले. स्वातंत्र्यानंतर राजकारणात धार्मिक, व जातीय धृवीकरण कोण करीत आले आहे हे गेल्या दोन लोकसभेच्या निवडणूकां च्या प्रचारातून व निवडणूकांच्या निकाला द्वारें स्पष्ट झाले आहे.
मुलतः सर्वधर्मसमभाव व समाजवाद या दोन्ही कल्पना विदेशी बनावटीच्या आहेत. भारतात प्राचीन काळापासून गुण्यागोंविदाने राहणे ही एक स्वाभाविक वृत्ती मानली जात होती. पारशी, ज्यू, तसेच युरोपातून व्यापार करणारे फ्रेंच, इंग्लीश, पोर्तुगिज, डच इत्यादींना व्यापारासाठी आपल्या समाजाने कधी विरोध केला नाही. उलट स्वागतच केले. यापैकी युरोपियन व मध्ययुगातील इस्लामी आक्रमकांनी आपल्या समाजाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. तसाच गैरफायदा स्वातंत्र्यानंतर सत्ताधारी काँग्रेस पक्षाने नवीन रूपात घेणे सुरू ठेवले आणि आज ही तीच वृत्ती काँग्रेस नेत्यांची अनुभवयास येत आहे. कारण काँग्रेसची सुत्रे नेहरू-गांधी घराण्याकडेच राहिली. शेवटी आधूनिक शरीर विज्ञान, तंत्रज्ञान व डीएनए थेअरी याहून अधिक वेगळे काही सांगत नाही आणि उपाय देत नाही. त्यामूळेच काॅग्रेस लयास गेली आहे.
दुर्दैवाने इंडी आघाडी घटक पक्षांची अल्पसंख्याकांना प्रलोभने दाखवित मतें मागण्याची जी खोड आहे ती काही केल्या जात नाही. त्यातून जे धृवीकरण होत आहे त्याला भाजपा जबाबदार आहे असा आरोप करणार्या लिबरल मिडीया हाऊसेस मूळे विरोधी पक्षांचा माज कमी होण्याऐवजी वाढतो आहे. त्यातूनच देशातील लोकसभा पासून ते ग्रामपंचायत स्तरावरील प्रत्येक निवडणूकीतल्या प्रचाराची पातळी घसरविण्याची सुरूवात विरोधी पक्षांचे नेतेच करताना दिसत आहेत. देशाच्या दुर्दैवाने त्यात अग्रणी स्थानावर राहूल गांधी आहेत, ज्यांचे गुरू सॅम पित्रोदा आहेत. आजच्या काँग्रेसच्या या नेत्याचे व त्यांच्या गुरूचे वागणे, बोलणे पाहता, ' सुनो गुरू ' या काव्यसंग्रहात श्री रमेश श्रीवास्तवांनी महात्मा गांधीजींना उद्देशून मांडलेल्या पंक्ती आठवल्या आहेत. त्या येथे मांडून या भागाची समाप्ती करतो.
" मेरा दावा है बापू
तू आज अगर जिंदा होता,
तो गोडसेकी गोलीसे मरता न मरता
आत्महत्या जरूर कर लेता
आत्महत्या जरूर कर लेता || "
क्रमशः-
---------------------------------------------
लोकसभा निवडणूका २०२४
इंडी आघाडीच्या प्रचाराचं स्वरूप मुस्लिम समाजाचं तुष्टीकरण व हिंदू हिता कडे दुर्लक्ष (भाग-५ व ६)
(भाग-५ व भाग-६)
आपल्या लेखात डॉ. शरदजी हेबाळकर, ट्राॅटस्की नावाच्या रशियन साम्यवादी नेत्याने जे काही म्हटले होते ते आपल्या समोर मांडतात. " Only in a socialist society can the average humanity rise to the level of Plato and Marxs."
(" केवळ समाजवादी रचनेतून प्लेटो आणि मार्क्स यांनी सांगितलेल्या आर्थिक पातळीवर सर्वसामान्य मानव पोहचेल ") यावर थोर समाजवादी विचारवंत लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी जे म्हटले, ते विचारप्रवृत्त करणारे आहे. असे सांगत डॉ. शरदजी हेबाळकर पुढे लिहतात, जयप्रकाश नारायण यांनी घोषित केले,
" However some years back, it became clear to me that socialism as we understand it today can not take mankind to the subline goal of freedom, equality, brotherhood and peace."
( " काही वर्षापुर्वी माझ्या हे स्पष्टपणे लक्षात आले की, आम्ही समजतो तो समाजवाद मानवी जीवनात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, आणि शांती यांची प्रतिष्ठापना करू शकत नाही.")
डॉ. शरदजी म्हणतात, " ही काही समाजवाद आणि साम्यवाद याचींच केवळ शोकांतिका नाही. वैचारिक परिवर्तनाच्या दृष्टीकोनातून या घटनाचा वेध घेतला पाहिजे, असे म्हणत त्यांनी हा विचार अधिक स्पष्ट होण्यासाठी प्रख्यात विचारवंत एम एन राॅय, यांनी केलेला विचार मांडला आहे तो असा आहे.
'' Until the intellectual, cultural, spiritual autmospere of the country was changed, it was not possible to bring about a political and economical reconstruction of the country." (" जोपर्यंत वैचारिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक वातावरणात परिवर्तन होत नाही, तो पर्यंत देशाची आर्थिक व राजकीय पूनर्रचना करणे शक्य नाही ")
" आर्थिक काय किंवा राजकीय काय, पुनर्रचनेचा पाया हा वैचारिक, सांस्कृतिक व अध्यात्मिकच राहणार. वैचारिक क्रान्तीच्या परिभाषेत सांगायचे तर स्वामी विवेकानंद कट्टर समाजसुधारक होते, पण " गर्वसे कहो, हम हिंदू है " हाच परिवर्तनाचा, समाज सुधारणेचा व राष्ट्रोन्नतीचा पाया आहे, याच्याशी त्यांनी तडजोड केली नाही. रूढ अर्थाने संन्याशाला धर्म नसतो, नाव नसते. स्वामी विवेकानंद हे संन्यासी होते."
पुढे डॉ.शरदजी, योगी अरविंदानी त्यांच्या सुप्रसिद्ध उत्तरपाडा भाषणात धर्म, राष्ट्र व राष्ट्रीयता यांची जी निःसंदिग्ध कल्पना मांडली होती ती आपल्या समोर ठेवतो.
" सनातन धर्मच आमच्याकरिता राष्ट्रयिता आहे. हिंदू राष्ट्र सनातन धर्माला घेऊनच निर्माण झाले आहे. त्याला घेऊनच चालले आहे आणि घेऊनच वाढत आहे. जेव्हा सनातन धर्माची हानी होते , तेव्हा या राष्ट्राचीही अवनती होते. सनातन धर्म हीच राष्ट्रीयता आहे."
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याहून वेगळे काही मांडले नाही. संघ परिवारातील ज्या संस्था आहेत, त्यातलाच एक सदस्य भाजपा आहे. लालू प्रसाद यादव, उदयनिधी स्टॅलीन, राहूल गांधी व त्यांचे गुरू सॅम पित्रोदा, शरद पवार इत्यादीं नेते मंडळी ज्या पद्धतीने हिंदुत्व, सनातन धर्म, पंतप्रधानावर, संघावर व भाजपावर टिका करीत आहेत त्यातून त्यांच्या पक्षांचेच नुकसान होणार आहे हे निश्चीत.
याच लेखात डॉ. शरदजींनी माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय प्रमोद महाजनांना आलेला अनुभव मांडला आहे. आणिबाणीच्या काळात भूमीगत असताना प्रमोद महाजन प्रख्यात विचारवंत कै नरहर कुरूंदकर यांना भेटावयास गेले होते. चर्चेच्या ओघात कुरूंदकर त्यांना म्हणाले, " संघावर बंदी घालून श्रीमती इंदिरा गांधी यांनी चूक केली." प्रमोद महाजन यांनी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहिले. कुरूंदकर पुढे म्हणाले, " त्यांच्या (इंदिराजींच्या) हे लक्षात आले नाही की संघावर बंदी घालणे, म्हणजे हवेवर बंदी घालण्यासारखे आहे. समुद्राच्या लाटांवर बंदी घालण्यासारखे आहे. "
डॉ. शरदजींनी प्रमोद महाजनांना आलेला अनुभव वाचल्यानंतर मला कुठेतरी माझ्या वाचनात आलेली काही माहिती आठवली. ती मी आपल्यापुढे ठेवतो आहे. ' आपल्या आयुष्याच्या अखेरीस विख्यात अष्टपैलू विचारवंत आचार्य अत्रेंजींना भारतीय जंनसंघांची (म्हणजे आताच्या भाजपाची ) राजकीय भूमिका देशाच्या हिताची वाटल्यामुळे ते जनसंघाच्या व्यासपिठावर प्रमूख अतिथी म्हणून उपस्थित होते. '
इतकेच नव्हे तर देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू जे पक्के समाजवादी व सर्वधर्मसमभाव विचारसरणीचे असुनही आयुष्याच्या अखेरीस सन १९६१ मदुराई येथील काँग्रेस अधिवेशनात त्यांनी हिंदु संस्कृती संबंधीत गौरवौद्गार काढत स्वतःची चूक मान्य केलेली आहे.
डॉ. शरदजी आपल्या लेखात लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी ३ नोव्हेंबर १९७७ ला पाटण्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गात स्वयंसेवकां समोर जे भाषण दिले ते असे आहे --
" तुम्ही सर्वजण शीलसंपन्न आणि सदगुणसंपन्न असून निष्ठापुर्वक कार्य करण्यासाठी प्रतिज्ञाबध्द झाला आहात, याची मला जाणीव आहे. आपल्या देशाला तुम्ही नवा आकार द्यावा आणि नवभारताचे शिल्पकार बनावे अशी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. आपल्या प्राचीन सासंकृतिक वारसाचे सामर्थ्य तुमच्या पाठिशी आहे. आजच्या घडीला आपल्या देशात जे परिवर्तन घडत आहे त्याच्या आघाडीला तुम्हीच आहात. तुमच्या संघटनेशी तुलना करता येईल अशी अन्य कोणतेही संघटना नाही. हे मला ठाऊक आहे. "
वाचक मित्र हो, आपल्या देशात देश व राष्ट्र म्हणजे काय तसेच हिंदू, हिंदूत्व, सनातन संस्कृती यावर एक वाक्य लिहू न शकणारी,एक वाक्य बोलू न शकणारी घराणेशाही पक्षांचे अनेक वारस आज देशभरातील प्रत्येक राज्यातील राजकारणात प्रमूख म्हणून दिमाखाने वावरत आहेत. ही मंडळी वर नमूद केलेल्या थोर पुरूषांचे नातू नात शोभतील अशी आहेत. इतकेच नाही तर वर नमूद केलेल्या थोर साम्यवादी व समाजवादी महानुभवाचा वारसा घेऊनच इंदिराजी, शरद पवार, लालू प्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, स्टॅलिन इत्यादींनी राजकारण केले. आज त्याच बापजाद्यांची राजकारणातली सद्दी का संपत आली आहे, याची कारणें शोधण्याचा प्रयत्न राहूल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, सुप्रिया सुळे, उदयनिधी स्टॅलीन इत्यादींनी केला असता तर बदलत्या काळाची पावले त्यांना थोडीफार तरी समजली असती. उठसूठ मोदी, भाजपा आणि संघावर टिका करून निवडणूका जिंकण्याचा काळ संपला आहे हे लक्षात ठेवावे.
लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी सन १९७७ ला पाटण्यातल्या शिबिरात ज्या युवक संघ स्वयंसेवकांचे कौतूक केले त्यातील काही स्वयंसेवक आज भाजपात उच्चपदावर तसेच केंद्र सरकार व भाजप शासीत राज्यात मंत्रीपदावर कार्यरत आहेत. म्हणूनच भारताची सर्वच क्षेत्रात जगातील महाशक्ती कडे लाटचाल होत आहे.
--------------------------------------------
दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)
गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...
-
मंडळी, मागील लेखात आपण असुरक्षिततेच्या भावनेपोटी, मनुष्य समूहात राहू लागला आणि नंतर समाज व्यवस्था उभी राहीली, हे पाहिलं. त्याच लेखात स...
-
आज जेष्ठ शु१३ शके १९४२ शिवराज शक ३४७ गुरूवार दिनांक ४जून २०२०. आजच्या दिवशी म्हणजे जेष्ठ शु१३ शके १५९६ अर्थात ६ जून १६७४ रोजी शिवाजी महार...
-
अलीकडे Whats App वर एक पोस्ट आली. ती अशी आहे, "Desires dictates our priorities, priorities shape our choices, and choices determi...
