शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

आपण व आपले उत्सव -- रक्षाबंधन भाग १

       आपण व आपले उत्सव--- रक्षाबंथन 
                      (भाग १)

नमस्कार  मंडळीं,
वयोमानानुसार  तब्येतीच्या कुरबुरी सुरू होणे हे स्वाभाविक आहे. केस पांढरे होणे, दृष्टी कमी होणे, ऐकू कमी होत जाणे, सांधेदुखी सुरू होणे असे आजार साठी ओलांडल्यानंतर बहुतांश लोकांना होतात असे डॉक्टरांनीच सांगितले. त्यावर मी डॉक्टरांना म्हटले की 'हे सारे आजार एक प्रकारे आपला भार सांभाळणाऱ्या धरणीमातेकडे भरलेला कर आहे. ' यावर डॉक्टर हसत हसत म्हणाले  ' तुम्ही CAच्या भाषेत आजाराचे वर्णन केले .'  मंडळी, पैशाचे सोंग घेता येत नाही. तसेच निरोगीपणाचा आव आणू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पथ्यपाणी व औषध घेत राहिलो तर तब्येतीत सुधारणा होते हे मला अनुभवयास आले. जवळपास एक वर्षांनंतर ब्लॉगवर आपल्या भेटीस आलो आहे.  

सन २०१७ ला हिंदू नववर्ष प्रतिपदा गुढी पाडव्याच्या दिवशी  ' विचारमंथन ' ब्लॉगची मुहूर्तमेढ रोवली. ब्लॉगवर राजकीय घडामोडींवरील लेखांची संख्या थोड्या प्रमाणात अधिक असली तरी 'आपण व आपली दैवते',  'आपण व आपले उत्सव ', 'तस्मात उत्तीष्ठं कौन्तेय  युद्धाय कृतीनिश्चय:।'  'कर्मण्ये वाधिकारणास्ते मा फलेषु कदाचन |' 'सर्वात मौल्यवान शिक्षण कोणते?,  पर्यावरण,    
' चित्रपट व समाजमन '  सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विषयांवर ही लेख लिहले आहेत. आपणांस हे केवळ ठाउकच नव्हे तर अशा लेखांवर ही आपण माझे कौतुक  केले आहे. वस्तुत: मी लेखक नाही. आपल्या संस्कृतीच्या अभ्यासकांनी विविध विषयांवर लिहून  ठेवलेल्या पुस्तकांचा आधार घेत मी लिखाण करतो.  आपल्या सारख्या वाचकांच्या प्रतिसादांतून लेख  लिहण्याची इतकी प्रेरणा मिळत आहे की मी आपला सदैव ऋणी राहणार हे निश्चित. तोच माझा स्वर्गीय आनंद आहे .

रक्षाबंधन हा उत्सव अनादि  काळापासून  आपल्या देशात साजरा होत आहे. म्हणून  या उत्सवावर आपल्याशी संवाद करावा अशी प्रबळ इच्छा निर्माण झाली. म्हणून मी लेखणी हातात घेतली. सन २०२४ पर्यंत दर वर्षाला सरासरी लेखांची संख्या तीस ते पस्तीस होती. आता तितकी संख्या मी पार पाडू शकेन असे मला वाटत नाही. याची आपणांस  जाणीव आहे या बाबतीत माझ्या मनात शंका नाही.  
समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे ' दिसमाजी काही तरी लिहावे. ' समर्थ रामदास स्वामींचे पुढचं वाक्य या ठिकाणी मांडण्पा इतकी क्षमता माझ्यात नाही.
 
लेखनासाठी विषयाचे विशेषत: राजकीय क्षेत्रात जगभर भरघोस पीक उगवत आहे. त्यासंबंधी आश्चर्य वाटत नाही. राजकारण एक असे क्षेत्र आहे की सकाळी माध्यमात जे पीक उगवते ते दुपारी कोमजून जाते आणि दूसरेच पीक उगवते. संध्याकाळ होताच दुपारचे पीक कोमजून जाते. कारण Throughout  the world politics has become a matter of perception and narrative only. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील घडामोडीं संबंधित चर्चा, मुलाखती, लेख इत्यादींची सर्व प्रकाराच्या माध्यमांत प्रचंड गर्दी झालेली दिसते. गर्दीतून गोंधळ होत असतो. This is also one of the laws of Nature.  असे असले तरी ब्लॉगवर राजकीय लेख लिहणार आहे .

जवळपास एक वर्षभर दूर राहिल्याची खंत आहे, ती कमी करण्याची सुरवात रक्षाबंधन सारख्या पवित्र उत्सवा संबंधित लेखाने करावी अशी  इच्छा झाली. आपल्या संस्कृती मधील उत्सवांवर चर्चा, संवाद किंवा लेख इत्यादी उपचार उत्सवाच्या समाप्ती नंतर  करू नयेत असे बंधन नाही. हीच आपल्या संस्कृती ची महत्ता आहे.  मागे  नवरात्रोत्सव व विजयादशमी उत्सवा च्या समाप्ती नंतर मी  ' शक्ती उपासना ' या शिर्षकाचे  नऊ लेख ब्लॉगवर पब्लिश केले आहेत. आपल्या उत्सवातूनच आपल्याला उत्साह तसेच  बळ प्राप्त होत असते. आपल्या संस्कृतीचे व आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी समाजात एकोपा वाढला पाहीजे हीच विविध उत्सावातून शिकवण मिळत असते.

रक्षाबंथन या उत्सावाच्या नावातील रक्षा आणि बंधन या दोन शब्दांचा स्वतंत्र रित्या अभ्यास केल्यानंतर रक्षाबंधनाचा उत्सव भाऊ-बहिणी पुरता मर्यादीत नाही हे कळते. विद्यमान जागतिक राजकारण तसेच विदेशी शक्तीच्या आहारी गेलेल्या काही विरोधी पक्षांच्या नेत्यांना जडलेल्या अवदासा मुळे रक्षाबंधन उत्सवाची व्यापकता वाढविण्याचा प्रयत्न  देशाच्या कानाकोपऱ्यातून होणे आवश्यक झाले आहे.  सीमेवरून  होऊ शकणार्या धोक्यापासून  एक नागरिक म्हणून प्रत्येकाला सजग राहावे  लागेल. रक्षाबंधन उत्सव हा केवळ उत्सव नसून मानव म्हणून जो जन्म मिळाला आहे त्याची सार्थकता ठरावी ही शिकवण त्यातून मिळाते. आपला देश सुरक्षित राहीला तरच आपली संस्कृती टिकेल. संस्कृती टिकली तरच आपले उत्सव टिकतील.  

वाचकहो , रक्षाबंधन उत्सवाच्या एक दिवस अगोदर X वर भाजपाचे प्रकांड पंडीत श्रद्धेय डाॅ. सुधांशु त्रिवेदी यांनी संस्कृत श्लोकाने सुरवात करीत रक्षाबंधनाच्या दिलेल्या हार्दिक शुभेच्छा    वाचल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला. तसे पाहता सामान्यात: हार्दिक शुभेच्छाचं स्वरूपच गोड असते. असे असले तरी  X वरील डॉक्टर सुधांशु त्रिवेदी यांच्या हार्दिक शुभेच्छा वाचल्यानंतर आपल्या रक्षाबंधन उत्सवाची सुंदरता व व्यापकताचं विलोभनिय दर्शन झाले. म्हणून Xवरील त्यांच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या समोर प्रथम ठेवत या लेखाची सुरुवात करतो.

" येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः।
तेन त्वाम् अभिबध्नामि रक्षे मा चल मा चला॥"
(अर्थात जिस रक्षा सूत्र से महान शक्तिशाली दानवेन्द्र राजा बलि को बांधा गया था, उसी सूत्र मैं तुम्हें बांधती हूं, जो तुम्हारी रक्षा करेगा, हे रक्षा तुम स्थिर रहना, स्थिर रहना।)
रक्षाबंधनके अवसरपर, रक्षासुत्र  बांधते समय बोला जानेवाला यह श्लोक याद दिलाता है की भारतिय  संस्कृतीमे असुर माने जानेवाले  राजा बलिमे यदि कोई गुण है तो उसका भी सन्मान और रक्षाबंधन किया जाता है | मुझे लगता है की इससे अधिक  उदार और  उदात्त  विचार पुरे विश्वमे देखनेको नही मिल सकता | If any so called self proclamaid liberal can find it in any other  culture ?  अत: हम सब आजके  इस पावन पर्व पर इस महान संस्कृती पर होनेवाले प्रत्यक्ष और वैचारिक दुष्प्राप्य के आकमण से रक्षा का संकल्प भी देना चाहिये | " डॉक्टर सुशांधु यांच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना पसंत पडल्या असाव्यात या बाबत माझ्या मनात किंचीत ही शंका नाही. 

रक्षाबंधन उत्सवाच्या अनेक कथा आपल्या पुराणात आहेत. आपल्या समाजातील बहुतांश लोकांनी त्या कथा वाचल्या आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे आपल्याला 
यु ट्यूबवरील विडीओ द्वारे आपल्या बहुतांश उत्सवांची माहिती ऐकावयास मिळते. म्हणून या ठिकाणी फक्त भगवान श्रीविष्णू च्या वामन अवतार काळात घडलेली रक्षाबंधनाची कथा  थोडक्यात मांडतो.  

बळी राजा दानशूर  होता. इंद्रपद जिंकल्या इतकी ताकद त्याला मिळत गेली. त्यातुनच  देव व असुर यांच्यामध्ये  घनघोर युद्ध सुरु झाले होते. देव  पक्षाचा पराभव दिसू लागला, इंद्रदेवाचे आसन धोक्यात आले तेव्हा इंद्राच्या पत्नीने आपल्या पतीच्या उजव्या हाताच्या मनगटावर रक्षा सूत्र बांधले. येथूनच रक्षाबंधनाची सुरवात झाली आहे असे मानले जाते. 

वरील कथेतून हे स्पष्ट होते की राजेशाही राज्यव्यवस्थेत युद्ध- स्थितीत राजाचा विजय व्हावा म्हणून त्याच्या पत्नीने पतीच्या हाताला रक्षा सुत्र बांधण्याची रीत होती. राजाचा विजय म्हणजे राज्यातील प्रजेचं रक्षणच की !. आपल्या देशात सन १५३४-३५ च्या सुमारास गुजरातच्या सुलतान बहादूरशहाने प्रचंड सैन्यासह मेवाडच्या चित्तोडगडावर आकमण केले होते. तेव्हा राणी कर्णावतीने आपल्या राज्याच्या रक्षणासाठी      मोगल बादशहा  हुमायुनला भाऊ मानुन राखी पाठविली होती. हुमायुनने कर्णावतीच्या  राणीचा आदर राखत आपले सैन्य पाठविले हौते. पण दुर्दैव असे की ते सैन्य मेवाडला पोहोचण्यास उशीर झाला होता. मेवाड राज्याचा पराभव झाला होता. पुढे हुमायुनने मेवाड जिंकून ते राज्य कर्णावतीच्या मुलाला बहाल केले. यातुन राखी ची म्हणजे रक्षा सुत्राचं पावित्र्य आणि बळाची प्रचिती येते.

बळी राजाचा प्रभाव तिन्ही लोकात वाढला होता.त्यामुळे असुरांनी थैमान घालण्याची सुरवात केली होती. हा प्रकार ऐकुन बळी राजाचे आजोबा भक्त प्रल्हाद नाराज झाले होतेच. देवांनी भगवान विष्णूला अवतार घेण्याची विनंती केली.  भगवान विष्णूनीं बटूचे रूप घेऊन बली राजाकडून तीन पावलांची भूमी मागितली.  बटूच्या दोन पावलात बळी राजाचे साम्राज्य संपले. बटूचे तिसरे पाऊल ठेवावयास जागा शिल्लक  राहिली नाही. बळी राजाने वामन देवास तिसरे पाऊल स्वत:च्या माथ्यावर ठेवण्याची विनंती केली. वामनाने तिसऱ्या पावलाने बळी राजा पातळात गेला. भगवान वामनाने बळी राजाच्या दानशूरतेचं कौतूक केले आणि  बळीराजाला त्रिलोक पैकी पाताळ लोक स्वाधीन केला. बळी राजाने वामनाकडून एक वचन मागितले होते. ते म्हणजे पाताळातील राजमहालाच्या द्वारावर भगवान वामनाने तिष्ठत राहावे. वामनाने ते मान्य करुन पाताळात बळीच्या दारात तिष्ठत राहिले. इथे वैकुंठात आपले पतीराज परत आले नाही म्हणून माता लक्ष्मीदेवी चिंतेत पडली. तिने नारद मुनींना विचारले तेव्हा त्यांनी हकिकत सांगितली. नंतर महालक्ष्मी बळी राजाच्या घरी जाऊन बळीच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून आपल्या पतीला वैकुंठात घेऊन जाण्याची विनंती केली. ती बळीने मान्य केली. रक्षाबंधन उत्सवात पावित्र्य  किती अमर्याद आहे या कथेतून उमजते.
                   धन्यवाद!
( या लेखाचा भाग --२ सोबत जोडला आहे.)
----------------------------------------------------------

          आपण व आपले उत्सव 
               रक्षाबंधन (भाग -२) 

आपल्या ॠषीमुनींनी प्रत्येक उत्सावाचे  प्रयोजन अशा प्रकारे केले आहे की त्यातून आपला समाज प्रगतीपथावर राहावा, आपल्या जीवन मूल्यांचा  जगभर  प्रसार व्हावा आणि आपला देश विश्वगुरू राहावा, या हेतूनेच  उत्सवांची रचना ऋतुनुसार आखली आहे. ऋतुनुसार आहार - विहार तसेच विविध  आजारांपासुन रक्षण व्हावे  म्हणून आयुर्वेद निर्माण करुन ठेवला आहे.

स्वाध्याय  परिवाराचे प्रणेते पुजनीय पांडुरंगशास्त्री आठवलेजींनी  संस्कृति - पुजन या ग्रंथात ' श्रावणी  पौर्णिमा ' वर केलेल्या व्याख्यान द्वारे रक्षाबंधन उत्सवाची महत्ता व पावित्र्य मांडले आहे ते आपल्या समोर सारांश रुपात ठेवतो आहे. 
" रक्षाबंधन म्हणजे प्रेम-बंधन. आजच्या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते आणि त्याच बरोबर त्याला ह्रदयाच्या प्रेमाने बांधते आणि त्याच्या रक्षणाची कामना करते. हा उत्सव म्हणजे पराक्रम, प्रेम, संयम आणि भक्ती यांचा संगम होय. रक्षाबंधनाचा  उत्सव म्हणजे दृष्टि परिवर्तनाचा सण. बहिणीने हातात राखी बांधताच भावाचा दृष्टिकोन बदलून जातो. बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी तो स्वत:वर घेतो. त्यामुळे बहीण समाजात निर्भय बनून फिरु शकते. "

राखी बांधण्यापुर्वी  बहिण भावाच्या कपाळाला टिळा लावते, तो टिळा म्हणजे  म्हणजे दोन डोळ्यां शिवाय भोगाला विसरुन भाव-दृष्टिने जगाला पाहण्यासाठी  जणू तिसरा एक पवित्र डोळा होय. भावाच्या हातात रक्षा बांधून बहीण त्याच्या पासून केवळ स्वत:चे रक्षण इच्छिते असे नाही तर समस्त स्त्री जातीला स्वत:च्या भावाचे रक्षण मिळावे अशी व्यापक इच्छा करत असते.  त्याच बरोबर बाह्य शत्रूवर  व आंतरविकारांवर भावाने विजय मिळवावा ही भावना देखील त्यात सावरलेली आहे. "

स्त्रीकडे विकृत नजरेने न पाहता पवित्र दृष्टी  हा महान संदेश देणाऱ्या रक्षाबंधन उत्सव कुटुंबा पुरता मर्यादीत न राहता त्याचे सामाजीकरण होणे आवश्यक आहे. शक्ती उपासना या लेख मालिकेत जिहादी वृत्तीची टोळी प्रेमाचे नाटक करीत शालेय व महाविद्यालयीन मुलींना कसे आपल्या पाशात घेतात यावर  सविस्तर  माहिती मी मांडली आहे.  कुटुंब प्रमुखांनी आपआपल्या गावात, चाळीत, गृहसंस्थात सामुहिक रित्या जागरूक  राहून जिहादी वृत्तीच्या टोळीचा वावर आसपासच्या शाळा व महाविद्यालय परिसरात दिसला तर लागलीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा उपयोग करून त्या टोळीचा नायनाट करण्याची हिम्मत व शक्ती निर्माण करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठीच  रक्षाबंधन उत्सवाची रचना ऋषिमुनींनी आखली आहे. समाजात हिम्मत व शक्तीची वृद्धी  सांघिकतातूनच होत असते .

वाचक मित्र हो, आपल्या उत्सवांच्या रचना व त्याच्या पाठीमागील प्रयोजनाचा थोडाफार अभ्यास केल्यानंतर उत्सवांची खोली थोडाफार प्रमाणात आपल्याला कळू शकते. मला रक्षाबंधन उत्सवा संबंधित जे थोडेफार आकलन झाले आहे ते सांगून या लेखाची समाप्ती करतो. 

" रक्षाबंधन ' या उत्सवाचं एक आगळं-वेगळं स्वरूप आहे असे मला वाटते. वैदिक काळात आपल्या देशातील राजे -महाराज आपआपल्या राज्यात अश्वमेध यज्ञ, होम, विविध शांती,  युवराजाचाा गुरुकुलात प्रवेश, पुढे  राज्याभिषेक इत्यादी विधी पार पाडणारा, पुरोहित विधीच्या आसनावर बसणाऱ्या यजमानांच्या उजव्या हातात रक्षा सुत्र बांधून विधीकार्याची सुरवात करीत असत. आजही आपण आपआपल्या कुटुंबात गृह प्रवेश, मुलगा-मुलीचा विवाह, बालकाचं बारसं, सत्यनारायणाची पूजा इत्यादी विधी यजमानाच्या उजव्या  हाताला 
रक्षा-सुत्र बांधल्या शिवाय सुरवात होत नाही. या सर्व प्रसंगी आपल्यातील चंचलता, क्रोध, मोह इत्यादींचा नाश होउन त्या जागी एकाग्रता, मृदुता  निर्मोह इत्यादींचा आधारवड आपल्याला मिळतो. 

आपल्या हातालाच राखी बांधली जाते याचे कारण आपला हात पुरूषार्थचे प्रतिक मानले जाते. सकाळी हाताचे दर्शन घेतो तेव्हा आपला पुरुषार्थ जागृत होतो. मी कुठलेही कठीण कार्य करु शकतो असा आत्मविश्वास बळावतो. तर सायंकाळी देवघरात दिवा लावतो. दिव्याची प्रार्थना करतो. अति आत्मविश्वास संकटात फेकुन देतो. दिवा विनम्रतेचं प्रतिक आहे. म्हणून आपणांस आपल्या पुरुषार्थ किंवा कठीण कार्यात मिळालेले यश  ईश्वराची कृपा असल्याची भावना आपल्या मनात जन्मत: रुजलेली असते ती दिवसेंदिवस वाढत असते असे मला वाटते. ' जसे आपल्या घरातील देवघरात सायंकाळी जो दिवा लावतो त्या दिव्याची ज्योत, तेल,आणि वात हे ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग यांच्या  मधील एक अलौकिक समन्वय आहे, असे माझ्या वाचनात आले आहे. तसेच रक्षासुत्र म्हणा वा राखी त्यातील तीन धागे तिन्ही योगाचे प्रतिक असावे.
                     धन्यवाद !

   







































































1 टिप्पणी:

  1. विष्णुजी,
    प्रथम आपल्याला, चिर-स्वास्थ्य तथा अखंड लेखन प्रेरणा मिळण्यासाठी मन':पुर्वक शुभेच्छा व नमस्कार.
    मध्यंतरी तुमचं लिखाण बंद झाल्याने खंत वाटली पण आता नियमित विचार मंथन सुरू राहिल ही आशा.
    आजचा विषय रक्षा बंधन हा आपला पवित्र व पारंपरिक सण आहेच, पण सर्व सामान्यासाठी व काहीं अंशी सिनेमाच्या प्रभावामुळे हा सण, बहिण भावांच्या नैसर्गिक स्नेह व आदरापुरता मर्यादित राहीला.
    पण संघ स्वयंसेवकांना याचं व्यापक महत्व, परस्पर अकृत्रिम स्नेह, समाज कर्तव्य आदि गोष्टी ज्ञात आहेत.
    आपल्या पुढच्या-मातृशक्ती- विषयावरील लेखाची आतुरतेने वाट पहात आहे.
    धन्यवाद व नमस्कार.

    उत्तर द्याहटवा

आपण व आपले उत्सव--मातृदिन (भाग १)

आपण व आपले उत्सव-- मातृदिन   देवीयों और सज्जनो नमस्कार ! हमारी मातृभूमी को देव-देवताओंकी भूमी माना जाता है | इसका कारन हमारे यहाँ सृष्टी हर ...