गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

शक्ती देवता : भाग ९





तसे पाहता आता माझ्याकडे फारसे काही लिहिण्यासारखे राहिले नाही. जितकी कुवत होती तितकं वेडवाकडं मांडले.  या ब्रह्मांडाचं स्वरूप उत्पत्ती, स्थिती, आणि लय असे आहे. असे असले तरी शक्ती देवता अजरामर आहे. तिचे प्रत्यक्ष दर्शन तर या युगात किती ही जन्म घेतले तरी अशक्य आहे. तरी या लेखमालिकेच्या शेवटा कडे जावे लागणार आहे. कारण आपण देहरूपाने किती काळ जगणार हो ?  दिवस-रात्र असे चक्र आहे. ते प्रत्येक क्षेत्राला लागू आहे. मृत्यु हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे. ते स्विकारून या लेख मलिकेच्या  समारोप करू या.

ब्रह्मांडात तेजोमय सूर्यदेव सामावलेला आहे तो जीवाची उत्पतीकारक तर त्यातला चंद्र हा मातेत असलेली शितलता होय. कुठल्याही वस्तु निर्मितीत जी शक्ती लागते तिचं आधुनिक नाव 'ऊर्जा '  आहे. ऊर्जाचे प्रकार दोन आहेत. एक धन, दुसरा ऋण. म्हणजे पुरूष आणि प्रकृती नव्हे काय ? प्रत्येक वस्तुची निर्मिती, ती मानवाच्या हातांनी तयार झालेली असो वा यंत्राच्या साहाय्याने ! तिचे मूळ स्वरूप ती ऊर्जा देवी. असे असले तरी निर्माण केलेली वा झालेली वस्तु तेजोमय तसेच शितल ही असते.
ज्यांना आपण अनेक कला मानतो त्या सार्या शक्तीदेवीची रूपे आहेत. हे विश्व नादब्रह्म आहे. साहित्य-संगीत- कला मग त्या लेखणीतील असो, वा गायक-गायिकेच्या कंठातील सुरवटींने सजलेले गीत -कविता असो, किंवा मानवाच्या हातातल्या शक्तीतून तसेच यंत्रशक्तीतून निर्माण झालेला विविध वाद्यांतुन येणारा तो 'ताल ' असो. या सार्या गोष्टी ब्रह्मांडात मानवाच्या जन्माच्या अनेक शतकाआधी पासून  विराजमान आहेत.

एके ठिकाणी मी संगीताची व्याख्या वाचली होती. बस जे सुचलं होतं ते त्या व्याख्येत भर टाकून थोडीशी मोठी केली आहे --
" कळकाच्या बेटांतून वारा वाहू लागला, समुद्राच्या लाटांचा चौघडा वाजू लागला, धबधब्याच्या एक सुरी आवाजाने ताल निर्माण झाला, आंब्याच्या झाडावरून कोकीळेच्या कंठातून सनई वाजू लागली, उंच उंच ताडा-माडाच्या माना डोलू लागल्या, होता होता मानवाच्या कंठातील सुरावटींनी अंती त्या नादब्रह्माला आकार, उकार दिले ! हाच तो त्रिवेणी संगम जिथे साहित्य, संगीत व कला या तिन्ही देवता आपल्याला त्यांचे विलोभनीय दर्शन देतात. 

संगीतात असलेले राग पट्टीच्या गायकाच्या कंठातून बाहेर पडले तर पाऊस पडतो, अग्नी निर्माण होतो. इत्यादी गोष्टी अंधश्रद्धा नसाव्यात. संगीताच्या सानिध्यात भात गहू ज्वारी सारखी पिकें, मुग, मसूर तुळ या डाळी, वाल, वटाणा, राजमा, इत्यादी, कडधान्यें, आंबा, फणस, सफरचंद, मोसंबी, पेरू, इत्यादी फळं, टोमेटो, कोबी, दुधी, भेंडी पडवळ, इत्यादी भाजीपाला १०० टक्के शुद्ध तसेच अधिक उत्पन्न निघते हे आधुनिक विज्ञानाच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेत सिद्ध झाले आहे. विज्ञान आणि खगोलशास्त्राचे अभ्यासक श्री मोहन आगाशेंच्या ' मला उत्तर हवे आहे '  या शिर्षका च्या तीन पुस्तकांवरून या संबंधीची पुष्टी मिळते. 

म्हणून संगीत,गायन,कला, आणि  शब्दब्रह्म जे साहित्य निर्माण करते, ही सारी शक्ती देवतेचे विविध रूपे ठरतात. एखाद पुस्तक आपण वाचावयास बसलो की त्यात गर्क होऊन जातो ही शब्दांची शक्ती. एखाद्या गायकांच्या कार्यक्रमात आपण तल्लीन होतो ही गायक आणि साथीदारांची सांघिक शक्ती होय. विविध कला आपल्याला मोहक वाटतात याचे कारण कलाकारांत असलेली शक्ती देवी होय.
 
पंचमहाभूते ही सुद्धा शक्ती ची रूपें आहेत. मानवाच्या शरीरात ही पंचमहाभूते अस्तित्वात आहेत. दररोज आपण अन्न घेतो. त्या अन्नाची चव ही एक पाककला तर अन्नातून मिळते ती शक्ती म्हणजे अन्नपुर्णा देवी होय. मुळात अन्न आपल्याला जमिनी पासून मिळते. प्रथम बीजरोपण होते. सुर्य सागराच्या जलाची वाफ करतो. आकाश जल घेते आणि त्या खारट जलाचं रूपांतर गोड पाण्यात करून ढगात ठेवते. वायू ढगांची अशी काही घुसळण करतो की ते पाणी पावसाच्या रूपात धरतीवर पडते (ढगांच्या गडगडातून वीज चमकते. ते पाहून पाण्यातून आणि वायूतून ही ऊर्जा निर्माण होते याचं माणसास ज्ञान झाले आणि सूर्य तर सौर उर्जा च.) धरती ते पाणी घेते आणि अन्न देते. म्हणून ती जमीन भुमाता होते. शेवटी निर्मिती शक्ती म्हणजेच शक्ती देवीची विविध रूपें आहेत. ही रूपे अवतरली ती मानवात असलेल्या विविध शक्ती च्या संगमातून. त्या आहेत बौद्धिक शक्ती, मानसिक शक्ती आणि शारिरीक शक्ती. म्हणजेच जगदंबेचं दर्शन होय. पण पहिला जल, थल, वा खग असा जीव निर्माण झाला तो प्रकृती आणि पुरूषाच्या मिलनातूनच होय.

ब्रह्मांडात असलेल्या त्या देव-देवता फुलाला सांगतात," तु सुगंध दरवळत राहा, कोकीळेला सांगतात तु कुंजन करीत राहा, मानवाला म्हणतो, तु निसर्गात असलेला स्वर सुर आणि ताल पकड म्हणजे तुझे मन आणि कर्म शुद्ध राहील. कारण हे विश्व नादब्रम्ह आहे.

आता देवी माणसाला सांगते," तुला दोन कर दिले आहेत, त्याला तु सहस्त्र कर ; म्हणजे विविध प्रकारच्या कला, साधने, यंत्रे आणि वस्तु च्या निर्मितीतुन तु स्वतः अनेक देवतांना जन्म देशील ;

" तुला दोन डोळे दिले आहेत त्याला सहस्त्र 'डोळे' जोड म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे जाशील ; तुला डोकं दिलं आहे, तुला बुद्धी दिली आहे, तुला मन दिलं आहे, आणि शरीर दिलं आहे, आता तु सहस्त्र शरीर धारण कर ;
म्हणजेच सांघिकतेला साद घालत जा. त्यातूनच ' जियो और जिने दो ' असा मंत्र ऐकू येईल. मग बघ तुझी शक्ती इतकी वाढेल की तुच ही सृष्टी खर्या अर्थाने सृजन करशील.' हाच तो संदेश सार्या मानवजातीला ईश्वर पार्वती देत आहेत असे मला वाटते.

जय अंबे !

शक्ती देवता : भाग ८


शक्ती देवता या विषयावर सुरू झालेली आपली चर्चा थेट विश्वाच्या उत्पत्ती पर्यंत मागे जाते, तेव्हा आपल्याला समजू लागते की जसे एखाद्या वस्तु निर्मितीत कच्चा माल, उर्जा लागते, तद्वत विश्वाच्या उत्पत्तीत ही कुठली तरी शक्तीची गरज लागली असणारच. ती शक्ती दिसत नाही पण जाणवली तर जातेच ना ! त्या शक्ती देवीचे व्यापक रूप कसे आहे ते या भागात पाहू या.


विश्वाची उत्पत्ती संबधी जे अर्धनारीनटेश्वर रुप वर्णिले जाते, ते पुर्णपणे विज्ञानाच्या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. एक पेशीय तून द्विपेशीय, द्विपेशीय तून त्रिपेशीय असे होत प्राणीमात्र जन्मत गेले असे विज्ञान म्हणते. तर आपले धर्मशास्त्र सांगते, तो स्वेच्छामय परमेश्वर सृष्टीच्या प्रारंभी स्वतः दोन रुपांनी प्रगट झाला. त्यांची नावे आहेत एक शिव म्हणजे पुरूष तर दुसरी शक्ती म्हणजे प्रकृती म्हणजे उमा होय.

" स्वेच्छामयः स्वेच्छाया च द्विधारूपी बभूव | स्त्रीरूपो वामभागांशी दक्षिणांशः पुमान् स्मुतः || " याचा अर्थ परमेश्वराच्या डावीकडील अंशाला स्त्री म्हणतात आणि उजवीकडील अंशाला पुरूष मानतात. म्हणून तर अनेक स्त्रीयांनी सुद्धा रणांगणावर पराक्रम केल्याचा इतिहासात दाखले सापडतात. आपल्या अमृतानुभव या ग्रंथाच्या प्रारंभी श्री ज्ञानेश्वर महाराज याच स्वरूपात ईश्वराला वंदन करतात.
 ' ऐसी ही निरूपाधिके
जगाची जिथे जनके
तिथे वंदिली मिया मूळिके
देवोदेवो ||
जया एकसत्तेचे बैसणे
दोघां एका प्रकाशनाचे लेणे
जे अनादी एकपणे
नांदती दोघे || '
सृष्टीच्या उत्पत्ती बाबत अंबा मातेच्या स्त्रोतात ही म्हटले आहे,
" मिळवूनी पंचमहाभूतांचा मेळ |
अंबे त्वां रचिला ब्रह्मांड गोळ || "

परमेश्वर एक आहे असे भारतवर्षात अनादी काळापासून मानले जात आहे. अर्धनारीनटेश्वर प्रतिक कसले आहे ? तो एक वैज्ञानिक दाखला आहे. आद्य शंकराचार्य अद्वैत विचारसरणीचे होते पण तसेच ते द्रष्टा होते. हिंदु समाज अभंग राहावा म्हणून पंचायतन पुजा पद्धत सुरू केली. त्यात देवीला स्थान आहेच.

पुरूष स्त्री शिवाय राहू शकत नाही तसेच स्त्री पुरूष शिवाय राहू शकत नाही. समाज जीवनाचा हा मूलाधार आणि विवेक सांभाळला नाही तर व्यक्तीगत जीवन खुंटते आणि सामाजिक जीवन विस्कळीत होते. घराला घरपण उरले नाही तर धर्माची घडी विस्कळते. अर्थ आणि काम साधले जात नाही मग मोक्ष तरी कसा मिळणार ?

लक्ष्मी ही सुद्धा शक्तीचे रूप च होय. अगस्ती ऋषी रचित महालक्ष्मीच्या स्तोत्रात स्पष्टपणे म्हटले आहे,
' पान्डीत्यं शोभते नैव न शोभन्ते गुणा नरः | शीलंत्व नैव शोभते महालक्ष्मी त्वया विना | ' 
( आपल्याकडे फक्त पांडीत्य असेल पण कुटुंबाचा निर्वाह करता येत नसेल तर व्यवहारी जगात आपला टिकाव लागणार नाही. तसेच आपण केवळ वाड-वडीलांकडून मिळालेली संपत्तीत वाढ करू शकत नसाल तर तेव्हा ही तुमची टर उडवली जाईल. पैसा असुन तुमच्या कडे पांडित्य असेल तर लोक तुमच्याकडे गौरवाने पाहतील. तुमचे शील, आणि  गुण ही पैशाने शोभून दिसतात.)

पैशाचा जसा प्रभाव नसावा असे आपल्याला वाटते तसे अभाव ही नसावा. पुष्कळदा पैशाचा अभावाच्या पाठीमागील सत्य हे आहे की आपण उद्यमशिलता वाढवत नाहीत. दुसरे असे की पैशाबद्दल कमालीची अनास्था. बेकारी ही समस्या फक्त आपल्या देशातच आहे असे नाही. कोरोना संकटामूळे बहुतांशी देशात आर्थिक मंदी आली आहे.  कोरोना काळात नोकर्या गमावून बसलेल्या बांधव आणि भगिनींनी घरपोच जेवण फराळ, भाजीपाला हा व्यवसाय सुरू केलेला आपण अनुभवलं आहे. व्यवसायाच्या संधी जो शोधतो तो लौकर आत्मनिर्भर बनतो. इंग्रजीत म्हटले जाते Opportunity is a course of action which is immediately possible. दुसरं असे की Growth is the evidence of life. वाढदिवस साजरा करण्याचा सोहळा म्हणजे  आपली आर्थिक, बौद्धिक, आणि  शारिरीक आणि मानसिक उन्नतीचा दाखला ठरावा. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, चैतन्य म्हणजे जीवन आणि नैराश्य म्हणजे मृत्यु होय.
 
संसार रथाला दोन चाके आहेत. ही दोन्ही चाके सबल आणि प्रगतीशील असली पाहिजेत. घरात आणि बाहेर, पारिवारीक जीवनात आणि सामाजिक जीवनात समतोल साधला जावा हीच उद्दिष्टे आपल्या पुर्वाश्रमीनी डोळ्यासमोर ठेवून अनेक उत्सवाची योजना आखली आहे. त्या योजनेचं वैशिष्टं म्हणजे सारे उत्सव ऋतुमानानुसार आहेत. त्या उत्सवांमार्फत एक प्रकारे पर्यावरणाचं संतुलन बिघडू द्यावयाचे नाही, हा हेतू स्पष्ट दिसतो.

ऋतुमनानाुसार आपण आहार घ्यावा. असा जो आग्रह धरला जातो, त्यासंबंधी आधुनिक शरीर विज्ञान आणि औषध शास्त्राने सहमती दर्शवली आहे. ऋतुनुसार आहार घेतल्याने आपल्या शरीरातील कफ, वात, पित्त याचं संतुलन होते. त्यातून आपली शारिरीक, मानसिक आणि बौद्धिक शक्तीचे  संवर्धन होते. सर्वात महत्वाचं म्हणजे कोरोना काळापासून अधिक चर्चा होत आहे ती म्हणजे रोग प्रतिकार शक्ती ! तिचे संवर्धन होते. तीच ती शक्तीदेवी !

या शक्तीदेवीचे अनेक अवतार आहेत. म्हणजेच ही शक्ती ब्रह्मांडात खचाखच भरलेली आहे. जर पार्वती, लक्ष्मी आणि शारदा इत्यादी एकाच शक्ती देवतेची रूपें आहेत तसेच ब्रह्मः विष्णु आणि महेश हे त्रिदेव सुद्धा एकाच ईश्वराची तीन रूपे आहेत. या सत्याची पुष्टी मिळू शकते, असे दोन दाखले आपल्या समोर मांडतो आणि  या लेखाची समाप्ती करतो.

श्री दत्तगुरूचा अवतार म्हणजे त्रिदेवांचं रूप. हे दत्तात्रेय स्वामी अत्री-अनुसूयाचे पुत्र आहेत. त्यासंबंधीची कथा सर्वांना ज्ञात आहे. या कथेतला बोध काय आहे ते पाहु या.
अत्री म्हणजे जे तीन नव्हेत ते ! आणि अनुसूया म्हणजे समाजात  विष्णु श्रेष्ठ की शंकर श्रेष्ठ या संबंधीची भक्त गणात सुरू झालेला संघर्ष म्हणजेच असूया, ती नष्ट व्हावी, समाजात अनुसूयाचे राज्य यावे यासाठी त्या विश्वातील तीन मुख्य शक्तींचा जन्म म्हणजे दत्तदेव.  अनुसयाचे पतिव्रत इतकं तेजस्वी होतं की त्रिदेवांना अनुसयाची मागणी पुरी करावी लागली आणि तीन बालकं रूपात जन्म घ्यावा लागला. ज्यांची नावे ब्रह्म (सोम म्हणजेच चंद्र), दुर्वास (शिव) आणि शेवटी विष्णुरूपी देवाचा जन्म होण्यास थोडा वेळ लागला, तेव्हा ब्रह्म आणि शिवाचा ही अंश अनुसूयाच्या  गर्भात आला आणि दत्तात्रेय रूपी  विष्णु जो जगाचा उद्धार आणि कल्याणासाठी म्हणजे तात्काळ संकट निवारण करण्यासाठी समोर दर्शन देतो तो दत्त आणि अत्रींचा पुत्र असा हा दत्तात्रेय ! (अत्रेः आपत्यं पत्रान् आत्रेयः) भगवान विष्णु सारखा शंख आणि चक्र हाती, आणि शीवा सारखं अंगाला भस्म लावलेला व हातात कमंडलु आणि त्रिशूळ असा तो जगद्गुरु दत्तात्रेयस्वामी, ज्याचा जन्म अनुसूयाच्या तपशक्तीतूनच झाला. इथे ही शक्तीदेवतेचं दर्शन होते.

आता आद्य शंकराचार्यांनी मांडलेला एक दृष्टांत आपल्या समोर ठेवतो. ' एक शिष्य भगवान विष्णुकडे जातो आणि प्रश्न विचारतो, ' देवा रामेश्वर हे लिंग आहे. मग ते रामेश्वर कसे? भगवान विष्णु उत्तर देतात,
' रामस्य ईश्वर सः रामेश्वर ' (षष्ठी तत्पुरुष समास )म्हणजे रामाचा
(माझा) ईश्वर शंकर आहे. मी त्याचा सेवक आहे. 

त्या शिष्याला वाटले विनयामुळे  भगवान विष्णू असे म्हणतात. म्हणून तो  शंकराकडे  जातो. त्याने शंकराला विचारले, तुम्ही भगवान विष्णुचे ईश्वर आहात का? त्यावर शंकर देव म्हणाले, ' भगवान विष्णूने चातुर्याने मला त्याचा ईश्वर घोषित केलं. रामेश्वर हे लिंग आहे हे सत्य आहे. परंतु  रामेश्वराचा अर्थ असा आहे,  ' रामः ईश्वरः यस्य रामेश्वर '(बहुर्विहि समास ) ज्याचा ईश्वर राम आहे तो मी लिंग रूपात रामेश्वर येथे आहे.

तो शिष्य गोंधळून जातो आणि ब्रह्म देवाकडे जातो आणि म्हणतो, " हा काय गोंधळ आहे, भगवान विष्णु शंकराला स्वतःचा ईश्वर मानतात, आणि शंकर विष्णुला ईश्वर मानतात. खरें उत्तर काय ? " त्या वर ब्रह्मदेव म्हणतात, ' रामः एव ईश्वरः ' (कर्मधारय समास) राम म्हणजेच ईश्वर. अर्थात विष्णू व शंकर यांच्यामध्ये अभेद आहे. दोन्ही एकाच ईश्वराची रूपे आहेत.

क्रमशः

शक्ती देवता : भाग ७


शक्तीरूपी जगज्जननी चा शोध घ्यावयास आपल्याला विश्वाच्या उत्पत्ती पर्यंत मागे जावे लागते. पाश्चात्य विचारवंतांनी तसेच वैज्ञानिकांनी विश्वाची उत्पत्ती म्हणजे एक अपघात मानले आहे. म्हणजेच विश्वाची उत्पत्ती बिग बँगतून (महास्पोटातून) झाली. हे सत्य आहे. यावर दुमत नाही. आपल्या धर्मशास्त्रात विश्वाची उत्पत्ती म्हणजे ईश्वराची लीला मानली आहे. ईश्वराची लीला मानणे म्हणजे आपण विज्ञान विरोधी आहोत असे नाही. त्यासाठी मी आपल्या समोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ नेते माननीय श्री सुरेशजी सोनी यांच्या 'भारत--अतीत, वर्तमान और भविष्य ' या पुस्तकातील उतारा मांडतो आहे,

" सामान्यतः प्राचीन काल से सभ्यताओंका विकास नदियोंके किनारे हुआ | अतः हम देखते है कि सरस्वती, सिन्धु , गंगा, दजला ( ट्रायग्रीस) फरात ( युक्रेटिस) नील, हवांग-हो, आमुदरिया आदि के किनारे सभ्यताएँ विकसित हुई | इन विकसित सभ्यताओं का गहराई से अध्ययन करें तो इनके दार्शनिक विचार, सृष्टि-कथाएँ, देवता, मान्यताएँ, भाषासाम्य, पुरातत्व सामग्री आदिमे साम्यता का सुत्र दिखाई देता है | तो इस साम्य का कारण क्या है?

इस प्रश्न का उत्तर देते हुए प्रख्यात मार्क्सवादी समालोचक डाँ राम विलास शर्मा कहते है , " दुनिया की किसी कथा, देवता और भाषाँओंका साम्य के मूल को खोजते जाएँगे, तो अंत मे ऋग्वेद की शरण मे आना पडेगा | उदाहरण के लिएँ नासदिय सूक्त मे सृष्टी के पूर्व की स्थिती, सृष्टी के प्रारंभ का जो वर्णन है, उसकी छाया दुनिया की अन्य सभ्यताओं में दिखाई देती 
है | ऋग्वेद मे कहा है --
 " तब न सत था न असत था
न दिन था न रात थी
न पृथ्वी थी न अन्तरिक्ष
न मृत्यु न अमरत्व
जब अन्धकार से अन्धकार ढाक था,
तब वह एकमेव स्पन्दन रहित तत्व 
था, उसके मन मे बहुत होने की इच्छा हुई और सृष्टी का प्रारंभ हो गया | "

श्री सोनीजीनी पुढे युरोप मधील स्कॅडिनेविया मध्ये बाराव्या शतकात प्राचीन गद्य आणि पद्य साहित्यात अशाच प्रकारची रचना आढळली चा दाखला दिला आहे.

पुढे श्री सोनीजी कोलम्बसचा तथाकथित अमेरिकेच्या शोधापुर्वी तिथे विशाल इन्का साम्राज्य होते अशी सत्य माहिती देतात आणि तेथेही ऋग्वेद च्या वरील सुक्ताच्या समानार्थी पद्य पंक्ती आढळल्या असे सांगत त्यांनी पंक्ती मांडल्या आहेत. त्या खाली दिल्या आहेत-

" अनन्य अवकाश के उच्छवास मे उसका निवान्त था | विश्व तमोमय था, सब ओर जल ही जल था,
न उषा काल की आभार थी,
न प्रकाश था | उसने सोचा--
इस प्रकार मै अस्तित्व हीन हो जाऊंगा, मै अनंत हो जाऊंग
वह तेजोमय हुआ
सब ओर प्रकाश ही प्रकाश फैला ! "

या चर्चेचा अर्थ हाच की जे चैतन्य होते, त्याला वाटले मी आता अनंत होईन . मग ते तेजोमय झाले. मग सर्वत्र प्रकाश, प्रकाश आणि प्रकाश पसरला. विज्ञान ही असेच म्हणते. 
आता पर्यंतच्या चर्चेतून या विश्वाच्या उत्पत्ती पाठीमागे कुठली तरी शक्ती आहे या बाबत आपली सहमती झाली असावी असे मी गृहीत धरतो आहे.  म्हणून या लेखमालिकेच्या भाग १ मध्ये भगवद् गीताला गीताई असे संबोधले जाते म्हणून ती सुद्धा शक्ती देवताचं  एक रूप आहे असा जो ओझरता उल्लेख केला आहे, त्या संबंधी थोडासा विस्तार करण्याची हीच योग्य जागा आहे असे मला वाटत आहे.

बंगलोर मधील Mental Institute चे संस्थापक डाॅ गोविंद स्वामी म्हणतात, " Mahabharat is the greatest work on Pshycho Pathalogy." महाभारतात ' व्यक्ती तितक्या प्रकृती' या शाश्वत सिद्धांताचं दर्शन पदोपदी होते. युधिष्ठीर सारखा सज्जन तिथे आहे तसा शकुनी सारखा कपटी ही तिथे आहे. डाॅ गोविंद स्वामी भगवद् गीता संबंधीत म्हणतात की Bhagvad Gita is the greatest work on Psycho Therapy. मनुष्याच्या जीवनात खरं-खोटं, पाप-पुण्य, आसक्ती-विरक्तीत, यश-अपयश इत्यादी संबंधीत मनात जे सदैव  दंद्व सुरू असतात. त्यांच निराकरण करण्यासाठी प्रेरणा माणसाला मिळत असते. भगवद् गीताचा प्रभाव संबंधीत डाॅ गोविंद स्वामी एक उदाहरण आपल्या समोर मांडतात ते खाली देत आहे.

दुसर्या महायुद्धात अमेरिकेने १६ जुलै १९४५ आधुनिक परमाणू बाॅबचा स्पोट घडवून आणला. तेव्हा त्या बाॅम्बचे जनक ओपन हायमरांनी त्या
उर्जा शक्तीचे मापन करण्यासाठी ठेवलेल्या सर्व यंत्रांच्या अनंत ठीकर्या उडाल्या.  त्यांचं ओपन हाईमर यांनी वर्णन असे केले आहे ---
If the radians of a thousand suns. Were to burst into sky. That would be like, 
the splendor of the mighty one.

वरील वर्णन भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला नऊ हजार वर्षापुर्वी कुरूक्षेत्रावर आपल्या प्रमुख विभूती चं दर्शन दिले आहे त्यांच्याशी तंतोतंत जुळते आहे ते पाहा-

 " दिविसूर्य सहस्त्रस्य भवेत्  युगपत् उत्थिता |" ( अर्थात एक हजार सूर्य एकाच वेळी आकाशात तळपत असलेल्या शक्ती इतकं प्रखर तेजासमान असते. "

जगातल्या अनेक विचारवंतानी भारतातील हिंदु संस्कृती हीच सर्व संस्कृतीची जनक आहे असे मानले आहे. सृष्टी म्हणजे प्रकृती म्हणजे उमा आणि शिव म्हणजे पुरूष असेच आपले धर्मशास्त्र सांगते. स्त्रीपुरूषाचं केवळ साम्य नव्हे तर एकत्व निदर्शित करणारे अर्धनारीनटेश्वर भारतिय जनजीवनाचे आधार आहेत. आचार्य विनोबा यांनी ओम म्हणजे फक्त शिव नसुन त्यातील शब्द अ उ म हे शब्द उलट्या क्रमाने लिहले तर उ म अ असे होते. म्हणजे शिव च्या सोबत उमा होय. या संबंधीत अधिक माहिती ब्लाॅग वरील ९आक्टोबर २०१८
' ईषावास्यम इदं सर्वम् ' या लेखात वाचावयास मिळेल.

आपल्या येथे देव आणि देवता अशा जोडया आहेत. देवीचेच नाव प्रथम जोडले जाते. जसे की उमा-महेश्वरं, लक्ष्मी-नारायण, राधा-दामोदराय. महिलांना आदराने वागविणारी आपली संस्कृती आहे. असे आपण म्हणतो. पण असा अभिमान पोकळ ठरतो. आपल्या पंतप्रधानांनी सुरू केलेली बेटी बचाव मोहीम फक्त स्त्रीभृण हत्या थांबविण्यापुरता मर्यादित नाही. कुमारीकांना लव्ह जिहाद पासून तसेच स्वजनातील गुंडा कडून होणारे छळ, भेदभाव, बलात्कार, इ अत्याचारापासून संरक्षण देणे, ही बाब ही अंतर्भूत आहे. महिलां वरील अत्याचार थांबविण्यासाठी कायदा कडक करावयास हवा असे मला वाटते. पण महिला वर अत्याचार करण्यार्यांना पोलीस खात्यात वा राज्य प्रशासनात एखादा गाॅड फादर भेटतो आणि प्रकरण मिटते. अशा प्रकारे मिटलेल्या अनेक प्रकरणावर न्याय मिळवण्याचा पिच्छा सर्व सामान्यांनी संघटीत शक्तीच्या बळावर सुरू ठेवावयास हवा. 

 
 क्रमशः

शक्ती देवता : भाग ६


आज ही जगात ' जीवो जीवस्य जीवनम् ' हाच न्याय दिसतो. म्हणून शक्तीची उपासना करायला हवी. 'बळी तो कान पिळी ' हाच जागतिक राजकारणाचा नियम आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी तयार केलेल्या परराष्ट्रनीतीने आपल्या देशावर वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत बड्या राष्ट्रानांही होत नाही.

शस्त्रात्रे अद्ययावत बनत आहेत. विद्यमान केंद्र सरकार संरक्षण खात्यासाठी बजेट मधील तरतुद दर वर्षी वाढवित आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतंत्रता ही साक्षात देवी भगवती चे रूप आहे हे आपल्या धगधगत्या जीवनयात्रेतून आणि तळपत्या लेखणीतून शब्दात साकारले आहे. शक्ती गमावून बसणे म्हणजेच स्वातंत्र्य गमाविणे. पाठोपाठ लक्ष्मी निघून जाते. हा अनुभव आपण एक हजार वर्षाहून अधिक काळ असलेल्या गुलामीत घेतला आहे. त्या कटु आठवणीतून धडा घेत मोदी सरकारने अग्नीपथ कल्पना कृतीत आणली असावी असं मला वाटतं.  पोस्ट कोरोना जगात आर्थिक मंदीची शक्यता मोदी सरकारने वेळीच हेरली आणि देशात आत्मनिर्भरतेचा नारा आणला आहे. अत्याधुनिक शस्त्रात्रे असलेल्या काही देशांना युद्धाची खुमखुमी वाढलेली दिसते. पण  तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता नाही. फार तर जग पुन्हा शीतयुध्दाच्या स्थितीत आणण्याचे प्रयत्न ते देश  करतील. हे शीत युद्धाचे स्वरूप अमेरिका विरूद्ध चीन असे असेल असा अंदाज वर्तविलेला असला तरी तो खोडून काढण्याची तयारी रशिया करीत आहे असे दिसते. या संबंधीचे दोन दाखले स्पष्ट दिसत आहेत. त्यातील पहिला दाखला म्हणजे युक्रेन शी सुरू केलेले युद्ध आणि शस्त्रात्रांच्या बाबतीत  रशिया दाखवित असलेला आक्रमकता. दुसरा दाखला म्हणजे  भारताच्या कुटनीतीची रशिया कडून  सतत होत असलेली प्रशंसा हा आहे.  चीनला कुठल्याही परिस्थीतीत नंबर दोन क्रमाकांची महासत्ता होऊ न देण्याचा प्रयत्न रशिया अप्रत्यक्षपणे करीत राहणार असे वाटते. एकंदरीत शस्त्रात्राचा व्यापार वाढावा आणि त्यातून कोरोना काळात ढिली झालेली आपआपली आर्थिक स्थिती सुधारावी हे एकमेव ध्येय अमेरिका आणि रशियाचे आहे.  अशा स्थितीत विद्यमान केंद्र सरकारने देशाच्या परराष्ट्र धोरणात कणखरपणा आणून भारत आपल्या हिताला तिलांजली देणार नाही तसेच भारताचे परराष्ट्र धोरण कुणाच्या ही दबावाला  बळी पडणार नाही, असे स्पष्टपणे मांडले. सोबत जगाला विकास हवा असेल, तर भारताचा अनादी काळापासून चालत आलेल्या  विश्वास, सहकार, आणि शांती या त्रयीसुत्रीचा मार्ग जगाने स्विकारावा हा संदेश ही दिला आहे. अलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना  'युद्ध हा विनाशाचा मार्ग आहे.' असे सांगत शीतयुद्धाची स्थिती सुद्धा पोस्ट कोरोना जगताला परवडणारी नाही असे अमेरिका आणि रशियाला जाणीव करून दिली आहे. एका परीने अनेक शतके खंडीत झालेली शक्तीची उपासना मोदी सरकारने पुन्हा सुरू केली आहे असे मला दिसते. शेवटी शक्ती देवताचं स्वरूप जसे शस्त्रात्रांत  असते तसे ते जागतिक स्तरावरील परराष्ट्र धोरणाच्या युक्तीवादात ही असते. शक्तीचे आणखीन रूप म्हणजे युक्ती. 

लक्ष्मीदेवी म्हणजे दुर्गा मातेचा अंशच होय. कोल्हापूरची महालक्ष्मी देवी अंबामाता या नावाने ही ओळखली जाते. इंद्रदेव रचित स्तोत्रात महालक्ष्मीचे वर्णन पाहा --
आदि-अंत रहिते देवी
आदि शक्ती महेश्वरी ; |
योगजे योगसंभूते
महालक्ष्मी नमोस्तुते ||
महालक्ष्मी ला ही आदि शक्तीच मानले आहे. मग ती आपल्यापाशी नाही म्हणून दुसर्यांच्या नावाने बोटे मोडण्यात काय हशील ?

महालक्ष्मी नावाच्या शक्तीरूपी देवतेची हेटाळणी हा अपराध आहे. नोकरी नाही म्हणून हताश होऊन कसे चालेल? पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर बना अशी फक्त घोषणा केली नाही. कोरोनोच्या काळातच बेरोजगार युवक, युवती, महिला इत्यादींना आत्मनिर्भर बनविण्याच्या योजनांची आखणी झाली होती. जे बेरोजगार लघुउद्योग सुरू करण्यासाठी पुढे येतील तर त्यांना कर्ज विना तारण आणि विना जामीन मिळावे अशा सुचना बँकांना दिल्या आहेत. लघुउद्योगावर माहीती तसेच प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. दिनांक १२ जानेवारी २०२२ ला स्वावलंबी भारत या संस्थेची स्थापना झाली आहे.

छोटे आणि मध्यम उद्योग उभारण्यासाठी युवक वर्गाने पुढे यावे म्हणून मध्यवर्ती ठिकाणी स्वावलंबी भारत योजनेचे केंद्र उभारले जात आहेत. स्वावलंबी भारत योजना गोरेगाव केंद्रातर्फ २ आक्टो गांधी जयंती दिनी दहिसर (प) नवागाव, समाज कल्याण केंद्रात ' स्वरोजगार और रोजगार मेला ' आयोजित केली होता. मी त्या कार्यशाळेत उपस्थित होतो. केंद्र सरकारच्या अनेक योजनांची माहिती मिळाली. जवळपास ५०० घरोपयोगी वस्तुंची मोठं भांडवल न लावता निर्मिती आपल्या घरी करू शकता. १५ वस्तूंच्या निर्मितीची प्रात्यक्षिके मी पाहिली. स्वावलंबी भारत योजना म्हणजे SBY च्या पोर्टल वा साईट वर अधिक माहिती मिळू शकते.
क्रमशः

शक्ती देवता : भाग ५


प्रथम ढोंगी सर्वधर्मसमभावाचा जो बुरखा आपल्या डोळ्यावर आणि डोक्यावर पडला गेला आहे तो फाडून टाकयला हवा. लव्ह जिहादच्या विळख्यात फक्त हिंदु कुमारींच नव्हे तर जैन बौद्ध, ख्रिश्चन शीख, या धर्मांच्या मुली सुद्धा अडकत आहेत. या सार्या धर्माच्या समाजबांधवानी एकत्र येऊन घरोघरी जनजागरण करणे आवश्यक आहे. मुस्लीम युवकाने प्रेमात पाडायचं, आपली वासना शमवायची, मुल झालं की पत्नीला तलाक द्यावयाचा आणि त्या मुलाचं वा मुलीचे नाव मुस्लीम जनगणेनेत पण बेवारस अशी भर करावी. तसे केले की केंद्र तसेच राज्य सरकार कडून ती आपोआप पोसली जातील पण शिक्षण मात्र मदरेशात. का तर त्यांनी जिहादींच राहावे.

लव्ह जिहाद हा भारताला इस्लामी राष्ट्र बनविण्याच्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे. मोदी सरकारने पिएफआय चे जसे कंबरडे मोडायला सुरूवात केली, तशाच प्रकाराची धडक मोहीम लव जिहाद च्या विरूद्ध सुरू करावी. कारण आपल्या संस्कृतीत कुमारी म्हणजे साक्षात जगज्जननी पार्वतीच होय. अनेक उत्सवामध्ये तिची पूजा केली जाते. अनेक कुळधर्म, कुळा-चारांत कुमारी अत्यावश्यक असते.

परंतु फक्त लव्ह जिहाद वर चर्चा आणि उपाय झाले की ' अत्र नारी वसन्ते तंत्र रमन्ते देवताः ' ही स्थिती लागलीच देशभरात प्रत्ययास येईल असे नाही. कारण आपल्या दिव्याखाली अंधार आहे तो ही दूर करायला हवा.

आपल्या धार्मिक उत्सवांत कधी समानतेच्या नावाने तर कधी फॅशनच्या नावाखाली काही वाईट गोष्टीं तसेच अनिष्ट प्रथांनी शिरकाव केला आहे. फॅशनला विरोध असण्याचे कारण नाही. पण फॅशन आधुनितकतेचं प्रतिक आहे, असे मानणारा वर्ग जाती-पातीचं जोखड फेकून देत नाही ; राजकीय नेत्यांना देवतूल्य मानतो; नेत्याच्या सांगण्यावरून निवडणूकीत प्रचार करतो ; हमरीतुमरीवर येऊन स्पर्धक पक्षांच्या कार्यकर्त्यांशी मारामारी करतो ; सार्वजनिक मालमत्तेची फोडतोड करतो, तेव्हा माता- भगिनींची ही गय करीत नाहीत. राजकीय पक्षांची अशी कार्यकर्ते मंडळीची जवळपास एक समांतर राजकीय व्यवस्था शहरात वार्डा-वार्डात आणि ग्रामीण भागात वस्ती-वस्तीत ७० वर्षात उभी राहीली आहे. ज्यांना राजकीय आधार प्राप्त झाला आहे, अशी ही कार्यकर्ते मंडळी मद्यपानाच्या नशेत युवती-महिलांची छेड करणे, एकतर्फी प्रेम न स्विकारल्यामुळे तथाकथित प्रेयसीच्या अंगावर ॲसीड फेकणें, बलात्कार, हत्या इत्यादी घटनात अग्रणी राहिली आहे. यावर उपाय सापडत नाही तो पर्यंत ' यंत्र नारी वसन्ते तंत्र रमन्ते देवतः ' असे शंभर टक्के दृश्य मृगजळच ठरणार.

आपल्या देशातील बाॅलीवुड जगतात आपल्या हिंदू संस्कृतीची दाखविली जाणारी बेलगाम निर्भत्सना, हे ही कारण आहे ज्यामुळे युवक-युवती वर्ग दिशाहीन होतो. त्यांना आपली संस्कृती, आपले धर्मशास्त्र टाकाऊ वाटतात. बाॅलीवुड वर नियंत्रण नाही. कारण बाॅलीवुड डी गँगच्या हातात आहे ,आणि आमच्या काही राजकीय पक्षांचे सर्वोच्च नेते त्यांचे मिंधे बनले आहेत. आपल्या येथील बाॅलीवुड जगतावर बुलडोझर फिरवायला हवा असे आता वाटू लागले आहे.

शाळा आणि काॅलेज मधून शिकविला जाणार्या इतिहास विषयाचा अभ्यासक्रम इतक्या खोटारडेपणाने तयार केला आहे की आपली संस्कृती, आपला देश, व धर्म या संबंधी विद्यार्थ्यांमध्यें तिटकारा, न्यूनगंड शिरला आहे. विद्यमान केंद्र सरकार या संदर्भात पावले उचलते आहे. पण लोकमान्य टिळकांच्या निर्वाणा नंतर इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमात जो घाणीचा डोंगर झाला आहे तो उपसायला वेळ लागेल. म्हणून इतिहास विषयाचं शालेय पुस्तकातील खोटारपणा समजावून देण्यासाठी जे कार्यक्रम होतात त्यात जनसामान्यांची उपस्थिती वाढत गेली पाहिजे.

उत्सवातून संस्कृती जिवंत राहते, एकता वाढते, आणि उत्सवातून रोजगार ही उत्पन्न होतो या बद्दल दुमत नाही. पण उत्सवांत हिणकसपणा नसावा. आपल्या उत्सवापैकी दहीहंडी, गणेशोत्सव नवरात्रोत्सव आणि होळी यांना सार्वजनिक स्वरूप आहे. अशा उत्सवास प्रारंभ झाल्यानंतर प्रथम सामाजिक समस्यांबाबत थोडसं समाज प्रबोधन होणे गरजेचं आहे.

एक समाज म्हणून प्रत्येक वस्तीत युवकांचं दक्षता पथक तयार होणे आवश्यक आहे. रक्षाबंधन, भाऊबीज या सणांच्या पाठीमागील पावित्र्य समजावून देण्याचा उपक्रम माध्यमिक स्तरावर अभ्यासक्रमात ठेवण्याची वेळ आली आहे . सोशल मिडीया वर या संबंधीत अनेक पोस्टद्वारे जागृती निर्माण होत आहे. ती जागृती अधिक प्रमाणात झाली पाहिजे. स्वयंसेवी संस्थांनी लव्ह जिहादीला बळी पडलेल्या मुलींचं rehabilitation करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यातून जबरदस्तीने धर्मांतर झालेल्या मुलींना स्वधर्मात परत आणता येऊ शकेल. एकदा अशा शुद्धीकरणाचा प्रयोग सफल झाला की जनजागृती होईल. मग इतर प्रलोभनातून ज्यांच धर्मांतर झालं आहे अशा समाज बांधव व  भगिनींच्या शद्धीकरणास गती मिळेल.

वैदिक काळापासून आपल्या येथे शक्तीपुजा होत आहे. पण त्याचे महत्व पटवून देण्याची व्यवस्था होती ती मुस्लीम आणि ब्रिटीश राजवटीत कोसळली आहे. ती नव्याने उभी करावी लागेल. सर्वच कार्ये सरकारने करावीत ही भावना छाटून काढावी लागेल. आम्ही मर्द आहोत, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, गुरू गोविंद सिंग राणी लक्ष्मीबाई सारख्या अनेक पराक्रमी आणि तेजस्वी योद्धाचे पाईक आहोत ही भावना आपल्या युवकांत वाढण्यासाठी अनेक ज्ञाती संस्था, सहकारी संस्थांनी प्रयत्न करायला हवे. त्यातून जी शक्ती निर्माण होईल तिचे रूप अजेया असेल. त्यावर चर्चा भाग ६ मध्ये करू या.

शक्ती देवता : भाग ४


भाग २ व ३ मध्ये आपण शक्ती देवीचं ' माता ' स्वरूप पाहिले तसेच ती सर्वात वंदनिय कसे यावर चर्चा केली. स्त्री कुठली ही असो तिचा सन्मान झाला पाहिजे असा आग्रह आपले धर्मशास्त्र करते. आपल्या देशातल्या स्त्रियांना कितपत आदर मिळतो, त्यांच्या सुरक्षतेबाबत किती जागरुकता आहे. यावर चर्चा होणे अपरिहार्य आहे. कारण हा विषय समाजशास्त्राचा असला तरी सरकारच्या धोरणांवर स्त्रियांना कितपत आदर, सन्मान मिळतो, तसेच स्त्रियांना किती सुरक्षितता मिळते हे अवलंबून असते. त्यामुळे या भागात राजकारणावर ही बोलावे लागेल.


माझ्या ब्लाॅगवर जितके राजकीय लेख आहेत, तितकेच 'आपले अध्यात्म ' आपली संस्कृती, समाजमन, बोधवाक्यें, बोधश्लोक आदि वर लेख आहेत. काही वाचकांना राजकीय लेख पसंत येत नसतात. त्यात गैर काही नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र दृष्टी, स्वतंत्र मन, स्वतंत्र बुद्धी असते. व्यक्ती तितक्या प्रकती हा सृष्टीचा नियमच आहे. असे मानून पुढे जात राहणे हेच श्रेयस्कर आहे. पण आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरीही राजकारणाची प्रचंड घृणा येणं आणि त्यातून क्षणाचा ही विलंब न लावता ज्या प्रतिक्रीया प्रिन्ट, इलेक्ट्रॉनीक्स आणि सोशल मिडीया वर येतात, त्यावर सारासार विचार करता तशा प्रतिक्रीया लोकशाहीत भुषणावह ठरत नसतात. कारण राज्यव्यवस्थेतील दोष वा धोरणं समाजव्यवस्थेला हादरे देणारे ठरू शकतात. म्हणून ' राजा कालस्य कारणम् ' असे आपल्या शास्त्रात आवर्जून म्हटले आहे.

घराणेशाही हा आपल्या राज्यव्यवस्थेतला दोष आहेच की ! घराणेशाही पक्षात Collective wisdom ला वाव नसतो. हा दोष मांडणे हे लोकशाही प्रेमी नागरिकांचं कर्तव्य असते. दुसरे असे की अध्यात्मिक अधिष्ठान असलेले राजकीय नेते कुठल्याही पक्षातले असले तरी ते सर्वांना प्रिय असतात. ही बाब आपल्या देशाच्या लोकशाहीचं भूषण आहे.

काही वेळा समाजव्यवस्थेतील दोष वा काही घटना राज्यव्यवस्थेला हादरे देऊ शकतात. काही वेळा विदेशी शक्तींचा प्रभाव व दबावाला बळी पडून देशात फितुरी माजते. त्यातून राज्यव्यवस्थेला आव्हान देणार्या घटना घडतात. आपल्या बहुतांश धर्मग्रंथात राजकारणाला राजनीती व राजधर्म असे संबोधिले आहे. एखाद्या देशाची संस्कृती, परंपरा, धर्मशास्त्र, त्यातील मानवी जीवनासंबंधीची दर्शने, समाज व्यवस्था,राज्य व्यवस्था, न्यायव्यवस्था, साहित्य संगीत, कला, आहार -विहार, त्या भूमीत जन्मलेल्या विभूती, महामानव इत्यादी संबंधीचा इतिहास आणि वर्तमान यांना वगळले तर राष्ट्र आणि राष्ट्रीयता या संज्ञांना अर्थ उरत नाही. म्हणून शो मोस्ट गो ऑन ! असो, चला वळू या लेखमालिकेच्या मूळ विषयावर.

आपल्या देशातील जिहादींच्या सुळसुळाटावर केंद्र सरकारने मोठा हातोडा हाणला. एका दिवसात पिएफआय चा खात्मा करून टाकला. परंतु दुसरी एक मोठी समस्या आपल्या समोर आव्हान देऊन उभी टाकली आहे. ती म्हणजे ' लव्ह जिहाद ' !

मुस्लीम युवक सभ्य माणूस म्हणून काॅलेज, हाॅस्पीटल, ऑफीसेस, शाळा, चित्रपटगृह, माॅल अशा परिसरात वावरतात आणि हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात पाडतात. ही जिहाद मुले लक्ष्य केलेल्या मुलीला ड्रग्ज ही देत असावीत असा माझा अंदाज आहे. कित्येकदा ते हिंदू असल्याचे भासवतात. प्रेमाचे फक्त नाटकच करण्याचा आदेश त्यांना असतो. तो न पाळला तर अल्लाकडे रवानगी असे फर्मान त्यांच्या बाँसचे असावेच. ते बाॅस लव्ह जिहाद च्या कामासाठी युवकांना भरपूर पैसे देतात. मग मुलीला पटविल्यानंतर निकाह करतात. हिंदू मुलींचं माहेरचं नातं ही तुटलेलं असते. माहेरची मंडळी आपली अब्रु जाईल या भितीने पोलीस कचेरीत तक्रार नोंदवत नाही. असा हा गुप्त प्रकार सरकारी यंत्रणा पर्यंत पोहचण्या अगोदरच ती मुलगी बाळाला जन्म देते आणि हे मियाँऔलाद पत्नीला तलाक देतात किंवा छळ करून हत्या करतात.

अलिकडे २६ सप्टेंबर ला चेंबूर येथे विभक्त पती इक्बाल मोहम्मद शेख याने आपली पत्नी रुपाली चंदनशिवेची हत्या केली. कारण काय तर ती बुरखा घालावयास विरोध करीत होती. इराण सारख्या देशात मुस्लीम स्त्रिया बुरखाच्या विरोधात निदर्शने करीत आहेत. तर सौदी अरेबियात आधुनकतेची लाट उसळली आहे. इथे भारतात मुस्लीम मुलींचा हिजाबाचा हट्ट जन्मसिद्ध हक्क आहे असे म्हणण्यापर्यंत मजल जाते. यात राजकीय पक्षांचे नेते ही सामील असतात. मोर्चे निघतात, ठिय्या आंदोलने ते ही भर रस्त्यात होतात. महाविद्यालय, शाळा, विद्यापीठांना वेठीस धरतात. काही पत्रकार, संपादक मंडळींना हा मोदी सरकार विरूद्ध जनतेचा उठाव वाटतो. तसेच अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहे असे जगभर पसरविण्याचं काम करतात.

स्वातंत्र्यपुर्व काळापासून मुस्लीम समाजाचे अती लाड झाले आणि त्यांची कार्टी शेफारली. धर्माच्या नावाने पाकिस्तान घेतला आणि वर ५५ कोटी रूपयांची मदत घेतली. हिंदुच्या मालमत्ता घेतल्या, हत्या केल्या, बायका-मुलींच्या अब्रु लूटली. ह्याला काय म्हणावं ?
यावर भाग ५ मध्ये चर्चा करू या.

क्रमशः

शक्ती देवता : भाग ३

 


स्त्री कुठलिही असो, ती वंदनीय असते अशी आपली धारणा आहे. तरीही त्यात मातेचे स्थान सर्वात वरचे असते. यावर मागील लेखात चर्चा झाली आहे. आपल्या येथे गावा-गावात, आणि शहरात प्रत्येक  वार्डात अनेक देवींचे मंदिरे आहेत. त्यातील प्रत्येक देवीच्या नावाचा जयघोष करताना  'माता ' हे विशेषण चिकटलेले असते.

प्रत्येक देवी संबंधी स्थानिक भक्तगणांकडून आख्यायिका ऐकावयास मिळत असतात. हे सारं काही थोतांड आहे अशी टिका करणारे अनेक पत्रकार, संपादक मंडळी आहे. तरी ही देव-देवतांचे उत्सव होत असतात, आणि अशा उत्सवाचे लाईव चित्रण हीच मंडळी चॅनेल्स वरून दाखवित असतात. का तर टिआरपी वाढतो. टिआरपी वाढतो, म्हणून जाहिराती अधिक मिळतात. म्हणजे उत्पन्न ही वाढते. हे उत्पन रोख पैशात असते. म्हणजेच ते लाईव्ह चित्रण देण्याचं कार्य म्हणजे महालक्ष्मी माता, जी शक्ती देवता चं एक रूप आहे तिची उपासना होय. पण तशी कबुली तथाकथित डावे विचारवंत देत नाहीत.

या डाव्या विचारवंतानां ज्योतिषशास्त्राची ॲलर्जी आहे. परंतु सूर्यग्रहण वा चंद्रगहणासंबंधी माहिती देण्यासाठी अनेक ज्योतिषींना आदल्या दिवसापासून चॅनेल्सवर आणलेले असतात. ग्रहाचं भ्रमण, गुरूत्वाकर्षण ही शक्तीची रूपें. पण शाळेत ज्योतिषशास्त्र एक विषय म्हणून यांना नको असतो. अनादी काळापासून भारतात ज्ञानभंडार होते ते संस्कृत भाषेत. त्या संस्कृत भाषेला इंग्रजांनी शाळेतुन हद्दपार केले. स्वातंत्र्यानंतर संस्कृत हा विषय फक्त पाठातंरापुरता ठेवला. पुढे संस्कृत भाषेला प्रोत्साहन दिले गेले नाही. जर्मनी सारख्या पाश्चात्य देशात संस्कृत भाषा शिकविली जाते आणि त्यातील ज्ञानभंडाराचं जर्मनी भाषेत अनुवाद केला जातो.

पैसा हे विनिमयाचे साधन नव्हते तेव्हा पशुधन, गोमाता धन, कृषी धन, अन्नधन, सोनं , हिरे, रत्ने लाकूड, दगडधोंडे, कोळसा, इंधन इत्यादी सारी महालक्ष्मीची रूपे होत. तेव्हा एका वस्तु च्या बदल्यात दुसरी वस्तु दिली जात असे तो काळ बाॅर्टर एक्सेंन्जचा होता. पण व्यवहार तर सुरू होते. व्यवहारी, किंवा व्यापार युगात महालक्ष्मीचे महत्व भूतकाळात ही होते, आज ही आहे. म्हणून तिला  माता म्हटले जाते.

महासरस्वती शब्द, वाचा, वाणी, गायन, गीत, साहित्य वाद्य, संगीत, भजनं, आरती इत्यादी द्वारें दर्शन देत असते. जे मिडीया हाॅऊसेस् देव-देवतांच्या कल्पना थोतांड आहे असे बोलून दाखवतात. ती त्यांची 'वाणी ' महासरस्वतीचं एक रूप च आहे. इतकं काॅमन सेन्स या मंडळी कडे राहीलं नाही. जेव्हा लेखन, प्रिन्ट, इलेक्ट्रॉनीक्स मिडीया अस्तित्वात नव्हती तेव्हा या सृष्टीतल्या गुढेंची उकल करून ती एका पिढीतून दुसर्या पिढीला ज्ञात केली जात होती. ती कुठल्या माध्यमातून या संबंधीचा इतिहास फक्त भारतवर्षात होता आणि आहे. त्यावेळी आपल्या तपश्चर्याच्या बळावर ऋषीमुनींनी सृष्टीतली रहस्यांचा शोध लावला, आणि ते सारं ज्ञान आपली वाणी, श्रुती, स्मृती, उपनिषदे, ब्राह्मण्यके आरण्याकें मार्फतच पुढच्या पिढीला मिळत आले आहे.

ब्रह्मांडात अनेक रहस्यें भरलेली आहेत. ती रहस्यें शोधून काढणे म्हणजे विज्ञान आहे. विख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांनी म्हटले आहे की ' या जगात सर्वात मोठं गुढ हे विश्वच आहे.' उर्जा, इंधन, प्रकाश, हवा, ध्वनी, जल, वनस्पती, इत्यादी मानवी जीवनांचे आधारभूत घटक या विश्वात मानवाचा जन्म होण्या अगोदर पासून अस्तित्वात आहेत. आपण ज्यांना शोध म्हणतो, ते या विश्वात विश्वाच्या निर्मिती पासूनच अस्तित्वात आहेत. वैज्ञानिकांनी त्या गोष्टी निर्माण केलेल्या नाहीत.

मला वाटतं Creation निर्मिती म्हणजे शक्ती देवी आणि विज्ञान म्हणजे Discovery. आपले प्रवचनकार " ज्ञान हे पुर्ण असते तर विज्ञान अपूर्ण असते. " असे म्हणतात त्यात तथ्य आहे. ते सारं काही थोतांड नव्हे. Modern science has just discovered what has been in existence in this Universe.

वैज्ञानिकांनी शोध घेण्यासाठी साधने निर्माण केली. पण त्या साधनांची निर्मिती साठी जो कच्चा माल लागला तो सृष्टीतुनच मिळाला आहे. पण तरीही ते कौशल्य वैज्ञानिकांचेच. त्यांचे प्रयत्न ही तपश्चर्या. म्हणून ती सुद्धा एक निर्मिती आहे. म्हणजेच शक्ती देवी. परंतु जेव्हा विज्ञान अस्तित्वात नव्हते त्या काळात विश्वातील रहस्यांचा शोध भारतीय ऋषीमुनींनी केला होता, हे सत्य सिद्ध ही होत आहे. साने गुरुजींनी , ' आपली संस्कृती ' या पुस्तकात कबूल केले आहे. अमेरिकन इतिहासकार बिल ड्युरांड यांनी हे सत्य स्विकारले. अनेक पाश्चीमात्य विचारवंतानी मान्य केले आहे.

कालचे ऋषी-मुनी आजच्या काळाचे वैज्ञानिक आणि आजचे वैज्ञानिक भूतलावरील ऋषी-मुनी. ही मंडळी या वसुंधराचे सुपुत्र होत. वसुंधरेला ही आपण माताच मानतो. हा विचार आजच्या मानवाने मानला तर या जगात संघर्ष राहणार नाही असे मला वाटते.

आपल्या येथेच नव्हे तर जगभर उत्सव प्रथा सुरू होत आलेली आहेत. या उत्सवाचं आयोजना पासून ते समारोपा पर्यंत महालक्ष्मी कामी येते. महालक्ष्मीची शक्ती अपार आहे हे आपण या कलियुगात पदोपदी अनुभवत आहोत. मराठीत तर दाम करी काम असा चित्रपट होता. इथे मला भगवान विष्णु आणि नारदमुनी मधला संवाद आठवला. तो मी कथेच्या (अर्थातच विनोदी शैलीत) रूपात मांडून या भागाची समाप्ती करतो.

एकदा नारदमुनींचा पृथ्वी वरील वास्तव्य आणि भ्रमंतीचा कालावधी वाढला होता. भगवान विष्णूला चिंता वाटली. ते पृथ्वीवर असलेल्या नारदाला आपल्या मोबाईलवरून संपर्क करतात आणि विचारतात, 
"अरे नारदा तु आहेस कुठे? काय चाललंय तिथे, सर्वकाही ठिक आहे ना? तु या खेपेस पृथ्वीवर अधिक काळ आहेस म्हणून विचारतो आहे." नारदमुनी हे या भूतलावरील सर्वात पहिले वाहिले पत्रकार, संपादक आणि मिडीया मालक मानले जातात. ते उत्तर देतात, " भगवान, चिंता नसावी. तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येतो आहे."

नारदमुनी देवलोकात परतले आणि थेट 'नारायण - नारायण ' करीत वैकुंठात प्रवेश करतात. नंतर भगवान विष्णुकडे जातात. भगवान विष्णू म्हणाले, "नारदा छान ! तु आलास बरे झालं. तु नव्हतास म्हणून मला करमत नव्हते. प्रथम मला आनंदाची बातमी सांग पाहू." नारदमुनी म्हणाले," श्री हरी, काय सांगू तुम्हाला, तुमची किर्ती किती वाढली आहे. भुतलावर प्रत्येक कोपर्यात माणसें तुमचीच पुजा करीत आहेत. प्रत्येक मिनिटाला तुमच्या भक्त गणांची संख्या इतकी वाढत आहे की मला मोजता आली नाही. धन्य प्रभो ! "

भगवान विष्णु म्हणाले , अरे नारदा, तु फार काळ पृथ्वीवर थांबला. म्हणून मी इथून दिव्य दृष्टीचे बटण ऑन केले. त्यातून मी काय पाहिले आणि ऐकले ते सांगतो. " भक्तगण माझी पुजा करीत होते ते खरं आहे. भक्तांची संख्या वाढत जात आहे हे ही पाहिले . पण विनंती करीत होते की आमच्या घरात लक्ष्मी मातेचा सतत वास राहो. याचा अर्थ काय? त्यांची खरी भक्ती लक्ष्मीमाता वर आहे. नारदा हे कलियुग आहे. हे तु कसे काय विसरलास ? नारदमुनीने आपल्या कपाळावर हात मारत 'अरे रामा ! ' उद्गार काढले आणि नारायण नारायण असा घोष करीत वैकुंठातून पाय काढते झाले.

महासरस्वती आणि महालक्ष्मी या संबंधीत चर्चा झाली असली तरी या नंतरच्या भागातही विशेषतः शक्ती देवीच्या विश्वरूपावर चर्चा करते वेळी पुन्हा होणार आहे. म्हणून व्यासमुनींनी रचलेल्या मातृस्तुती मधील एक श्लोक मांडून हा भाग पुरा करतो.
नास्ती गंगासमं तिर्थ
नास्ती विष्णुसम: प्रभु |
नास्ती शंभुसमः पूज्यं
नास्ती मातृसम गुरुः | |

क्रमशः

आपण व आपले उत्सव--मातृदिन (भाग १)

आपण व आपले उत्सव-- मातृदिन   देवीयों और सज्जनो नमस्कार ! हमारी मातृभूमी को देव-देवताओंकी भूमी माना जाता है | इसका कारन हमारे यहाँ सृष्टी हर ...