बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

शिक्षक दिन - व्यापकता आणि महत्व (भाग-१ )

आज गुरूवार ५ सप्टेंबर २०२४ ! देशभरातील शाळांमध्ये तसेच काही स्वयंसेवी संस्थामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो. संत तुकाराम साल्वेस्टर मिशन प्रणित, मालाड (प) व विद्याप्रतिष्ठान पुणे संचलीत  आनंदराव पवार सरस्वती विद्यामंदिर वझिरा, बोरीवली (प) या शाळेची कार्यवाह म्हणून जबाबदारी मी सांभाळतो. दर वर्षी एसटीएस मिशनच्या शाळांचा ' शिक्षक दिन ' संयुक्त रित्या साजरा होत असतो. परंतु या वर्षी एसटीएस मिशन मालाड च्या सहकार्यावाह जोग मॅडम यांनी फोनवरून कळविले की या वर्षी शिक्षक दिनाचा कार्यक्रम स्वतंत्र रित्या आपआपल्या शाळेत साजरा करावा.  त्यांच्याशी फोनवर झालेल्या संवादातून या विषयावर लेख लिहीण्याची प्रेरणा मिळाली. 

शिक्षक दिनाचे महत्व या विषयावर लेख लिहणे म्हणजे शिवधनुष्य पेलविण्या इतके महाकठीण कार्य आहे याची जाणिव मला आहे. पण ' प्रयत्नांती परमेश्वर ' हा समर्थबोध लक्षात ठेवून माझ्या कुवतीनुसार मी लेख लिहावयास घेतला आहे. वाचक हो , शिक्षक दिनाचे महत्व मांडताना वैदिक काळातील गुरू-शिष्य परंपरा व गुरूपौर्णिमेचा उत्सव यावर चर्चा केल्याशिवाय हा लेख परिपूर्ण होणार नाही असे मला वाटते. म्हणून या लेखाच्या पहिल्या भागात  गुरू-शिष्य परंपरावर चर्चा मांडत आहे. 

आपल्या देशात प्राचीन काळी म्हणजे वैदिक काळात गुरकूलं होती. त्यातूनच पुढे महर्षी व्यासांच्या 
महानिर्वाणा नंतर त्यांच्या भक्तांनी आषाढी पौर्णिमेचा दिवस हा गुरू पुजन व त्यांच्या प्रती समर्पणाचा भाव समाजात युगानयुगे राहावा म्हणून एक मंच स्थापन केला. त्या मंचावरून सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत ही भावना जोपासून गुरू पौर्णिमा उत्सव साजरा होऊ लागला. तेव्हापासून त्या मंचाचे नाव व्यासपीठ या नावाने ओळखले जाऊ लागले. व्यासपीठ म्हणजे निवडणूकांचा प्रचारासाठी वापरले जाणारे मंच नव्हेत. या व्यासपीठावरून फक्त सांस्कृतिक कार्यक्रम ते ही आपल्या संस्कृतीला सुसंगत असावेत अशी जाणीव आपण ठेवावयास हवी, तरच त्याचे पावित्र्य अबाधित राहू शकते.

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पुजनीय पांडुरंगशास्त्री उर्फ दादा आठवले यांनी आपल्या संस्कृती पुजन या पुस्तकात महर्षी व्यासांच्या कार्याची महती एका वाक्यात मांडली आहे ती अशी आहे ---
" व्यक्तीचा मोक्ष आणि समाजाचा उद्धार या दोन्ही आदर्शाकडे अभेद दृष्टीने पाहणार्या, अभ्युदय व नि:श्रेयस या दोहोंचा समन्वय साधणार्या अध्यात्म पारायण अशा व्यासाइतका अधिक योग्यतेचा समाजशास्त्रज्ञ कोणी झाला नाही. त्यांचे वैदिक व लौकिक ज्ञान एवढे अमर्याद होते की सर्व लोकांनी कृतज्ञतापूर्वक म्हटले की व्यासोच्छिष्टं जगत सर्वम आणि व्यासवाणी (महाभारत) सारं विश्वस्य."
गुरू पौर्णिमेच्या उत्सवावर ब्लाॅगवर गुरूवार दिनांक २८ जुलै २०१९ ला मी लेख लिहीला आहे. तो ही आपण वाचावा कारण त्यावरूनच या विषयाची व्याप्ती लक्षात येईल. परंतु तो लेख हिंदी भाषेत आहे. म्हणून त्या लेखातील काही भाग संक्षिप्त रित्या मी मांडत आहे. 

विख्यात महाकवी कालिदासांनी म्हटले आहे की, उत्सव प्रियः खलू मनुष्यः| उत्सव साजरे करणे ही माणसाची स्वाभाविक वृत्ती आहे. जगातील सर्वच देशात आपआपल्या संस्कृती व धार्मिक श्रद्धा व परंपरा नुसार उत्सव साजरे होत असतात. अर्थात या उत्सवामध्यें स्वाभाविक रित्या विभिन्नता असते. परंतु गुरू-शिष्य परंपरा सर्वच देशात आढळते. आपल्या देशात जसे वसिष्ठ- श्रीराम, सांदिपनी-श्रीकृष्ण, शुक्राचार्य-जनक, रामानंद-कबीर, रामकृष्ण परमहंस- स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास- शिवाजी इत्यादी गुरू-शिष्य जोड्या आहेत, तशाच जोड्या साॅक्रेटीस-प्लेटो, प्लेटो-ऑरिस्टोटल, मार्कस्- लेनीन, इन्सेन-शाॅ इत्यादी विदेशात आहेत. असे असले तरी गुरू-शिष्यांची परंपरा व गुरू पुजन उत्सावाचा जनक आपला भारत देश आहे. आपण म्हणाल ते कसे काय ? तशी कबूली अनेक पाश्चिमात्य विचारवंतानीच दिली आहे. जर्मन विचारवंत शाॅपेनहावर म्हणाले आहेत की ' उपनिषादासारखे उच्च व उदात्त तत्वज्ञान व मानवी जीवनाचे समग्र दर्शन जगाच्या पाठीवर कुठेच नाही.' 

आपल्या देशात ब्रिटीशांच्या राजवटीतले दोन खलनायकांनी आपल्या प्राचीन संस्कृतीचे कौतूक केले आहे. ज्याने बंगालच्या फाळणीचं बीज रोवले असे लार्ड कर्झन यांनी एका मेजवानीत ' आम्ही ब्रिटीश लोक जंगलात राहात होतो तेव्हा भारतात गुरूकुलं होती अशी कबुली दिली आहे. दुसरे खलनायक आहेत ते मेकाॅले ! मेकाॅले हे त्यावेळी ब्रिटीश पार्लमेंटचे सदस्य होते. त्यांच्या सल्ल्यानुसार ब्रिटीश सरकारने आपल्या संस्कृती व धर्मशास्त्राचे सारे ग्रंथ जाळून आपल्या देशाच्या इतिहासाचा अभ्यासक्रमच बदलून टाकला व आपल्याला वैचारीक (शैक्षणिक) व मानसिक दृष्ट्या इंग्रजी शिक्षणाचे गुलाम बनविले. मॅक्सम्युलर नावाचा जर्मन विचारवंत हा मेकाॅलेचा मित्र होता. त्याच्याच मार्गदर्शना खाली मेकाॅलेनी आपले सारे ज्ञानभाडांर मोडीत काढले. तेच मॅक्सम्युलर नंतर  म्हणाले आहेत की, ' मी माझ्या अनुभवाच्या जोरावर शाॅपेनहावरांनी हिंदू संस्कृती संबंधीत जे गौरवास्पद उद्गार काढले आहेत त्याच्याशी सहमत आहे.' अमेरिकन इतिहास तज्ञ व विचारवंत विल ड्युरांट म्हणतात,        ' मनाची विशुद्धता, परिपक्वता आणि व्यापकता या तीन मुल्यांचा अद्भूत संगम घडवून सहिष्णूताचे पालन कसे करावयाचे हे फक्त हिंदु संस्कृतीकडून शिकता येते. काही काळ भारतात ब्रिटीशांच्या राजवटीत काॅग्रेसच्या अध्यक्षा असलेल्या डाॅ ॲनी बेंझट यांची तर हिंदु संस्कृतीवर अपार निष्ठा होती. त्यांनी म्हटले आहे की  'जगातील सर्व देशांनी हिंदु संस्कृती ही आपली जननी मानली तर जगात सहिष्णूता व बंधुत्वाचे वातावरण निर्माण होऊ शकेल.'

गुरू-शिष्य परंपरेतूनच मानव जातीचा सास्कृतिक आणि लौकीक दृष्ट्या विकास झाला आहे. या विश्वाच्या जन्मापासून भूतलावरील पशू-पक्षी व इतर प्राणीमात्र आजही त्याच अवस्थेत आहेत. याचे कारण त्या विधात्याने मानवाला दिलेली बुद्धी प्राणिमात्रांना प्रदान केली नाही हेच होय. मानव हा सामाजिक प्राणी मानला जातो. तो समाजात राहतो. तर पशू-पक्षांचे जीवन सामुदायिक असते. आपल्याला काय हवं आहे याची जाणीव पशू-पक्ष्यांना ही आहे. पण ते मिळविण्यासाठी त्यांच्याकडे मानवा सारखी बुद्धी नाही. पक्षी आपल्या पिल्लांना आकाशात भरारी मारणे शिकवत नाहीत. तसेच सिंह वाघा सारखे हिस्त्र पशू आपल्या बछड्यांना शिकार कशी करावी हे शिकवत नाही. ते अन्न मिळवतात व खाऊन टाकतात. दुसर्या दिवसासाठी लागणारे अन्न साठवून ठेवण्यासाठी त्यांच्यापाशी रेफ्रीजेटर नाहीत. त्यांच्याकडे बुद्धी असती तर ते मानव जातीला डोईजड झाले असते. याचा अर्थ असा आहे की पशू-पक्ष्यांचे जीवन निसर्गाच्या नियमाच्या आधीन आहे. मानव जातीला आकाशातून प्रवास करण्याची प्रेरणा पक्ष्याकडून मिळाली; पाण्यात पोहण्याची कला माणसाला जलचर प्राण्यापासून प्राप्त झाली. समुद्रात दुरवर प्रवास करण्यासाठी बोटी निर्माण करण्याचे ज्ञान अवगत झाले. आपल्या चार पायावर भरधाव वेगाने धावण्यार्या पशूकडून मानवाने चार चाकांची वाहने निर्माण केली. जमिनीवरून सरपटणार्या प्राण्यामूळे माणसाला डोंगरावरून सरपटत जाणारी रेल्वेगाडीची प्रेरणा मिळाली. वृक्ष-वेली, छोटेमोठ्या किटकांपासून ते महाकाय पंचमहाभूतांच्या उदारतामूळे मानव पुष्कळ काही शिकला आहे. 

या उदारतेचं भान वैदिक काळातल्या ऋषीमुनींना होते. म्हणून ऋषीमुनींनी ऋतुनुसार आहार ठेवावा, जितकं पचेल तितकंच अन्न घ्यावे, महिन्यातून एक दिवस तरी उपवास करावा असे सांगत अनेक धार्मिक उत्सवाची निर्मिती केली. निसर्गातील चराचर सृष्टीत ईश्वर सामावलेला आहे. त्या सृष्टीतली उदारता अनुभवून ऋषीमुनींनी अनेक बोधवाक्यें आपल्या समोर ठेवली आहेत. त्यातील दोन मी इथे मांडतो आहे -   

ईशावास्यम इदं सर्वं यत्किच्च जगत्यां जगत | तेन त्यक्तेन भुज्जीथाः मा गृधः कस्यचित् धनम् || (अर्थ - या जगात जे जे काही आहे त्या सगळ्यात ईश्वराचा वास आहे. तेव्हा ते आपले नसून ईश्वराचे आहे असे समजून त्या सर्वाचा उपभोग घे. (पण कशाचाही लोभ धरू नको.) या बोधवाक्यातला उपदेश संपूर्ण मानव जातीसाठी आहे. संपूर्ण मानव जात हव्यास सोडून काटसरीत जीवन जगली तर हवा, पाणी, उर्जा, इंधन, जमीन इत्यादी महत्वाच्या घटकाची वानवा पडणार नाही आणि विश्वात शांतीचे राज्य येईल. 

दुसरे बोधवाक्य असे आहे--
'अयं बन्धुरयन्नेति गणना लघु चेतसाम् 
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ||
(अर्थ -- हा माझा बंधू आहे आणि तो नाही असा हिशोब संकुचित किंवा क्षुद्र बुद्धीचे लोक करतात. परंतु उदार-उच्च चारित्र्याचे लोक संपूर्ण पृथ्वी म्हणजेच वसुधा हेच एक कुटुंब आहे असे मानतात. आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी ही म्हटले आहे 
' हे विश्वची माझे घर | ऐसी मति जयाची स्थिर | किंबहुना चराचर | आपणची जाहला || 
 अनेक शिक्षण संस्थानी ' वसुधैव कुटुम्बकम् हे बोधवचन स्विकारले असले तरी त्यातील प्रमुख आणि महत्वाचे उदाहरण म्हणजे पुणे येथील सिम्बाॅयोसिस ( Symbiosis) या जगद्वविख्यात शिक्षण संस्थेचे होय. भारतिय विद्यार्थींबरोबरच बहुसंख्येने येणार्या परदेशी विद्यार्थ्यांनी आदराने स्विकारले आहे. दक्षिण मुंबईतील एस् एन् डी टी महिला विद्यापिठाच्या गीतात (प्रार्थनात)  ' विश्व है परिवार, भारत घर हमारा है सामावून घेतले आहे. वाचक हो अनेक शिक्षण संस्था तसेच सांस्कृतिक संस्थानी आपल्या संस्कृतील अनेक बोधवचने स्विकारली असली तरी ' विद्या ' या शब्दावर सर्वात अधिक बोधवचने वैदिक संस्कृतीत आढळलेली दिसून येतात. 

वाचक हो शिक्षक दिन हा उत्सव अलिकडचा आहे. एका परीने हा उत्सव गुरू-शिष्य परंपरेची पुढील आवृत्ती आहे. म्हणून या लेखाच्या भाग-१ चा विस्तार वाढला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून या लेखाची समाप्ती करतो. 



 










बुधवार, ५ जून, २०२४

निसर्ग आणि मानवामधील ऋणानुबंध भाग--३

खळखळणारे झरे, अजस्त्र डोंगर, उंच उंच कडेपर्वत पाहिले की आपल्या मनात पावित्र्य साकार होते. त्यातूनच अनेक तत्वचिंतक निर्माण झाले. निसर्गाच्या कुशीत राहूनच महाकाव्ये फूलली. मानवी जीवनाचे प्रयोजन आपणांस ज्ञात झाले. आदिमानवा पासून ते आजच्या अत्याधुनिक माहिती व तंत्रज्ञानाच्या युगापर्यंतच्या आपल्या उन्नतीचे रहस्य या निसर्गाच्या दयेतच जडले आहे. सहनशिलता हा अलंकार तर गती हा जिचा स्थायीभाव आहे अशी नदी आपल्याला दातृत्वाचा संदेश देत वाहात असते. कोणासाठी? आपल्याच भल्यासाठी ना ! बारामाही शेती कुणाच्या बळावर आपण करतो?

हे पाहा पशू ! मनुष्याच्या सेवेला आणि सुखाला हवे तसेच विविध, हवे तितकेच बुद्धीमान ! वाळवंटातील  वाहन म्हणून त्या उंटास महिनोगणती पाण्यावाचून चालण्याची युक्ती परमेश्वरानी दिली आहे. तो घोडा किती चपळ ! त्याच्यावर स्वारी करून माणसाला रणागंणात त्याने सांभाळले. आज ही अनेक ठिकाणी आपल्या पाठीवर घेऊन किंवा टांगा ओढत तो घोडा माणसास एका ठिकाणा वरून दुसर्या ठिकाणी सुखरूप घेऊन जात असतो. त्याच्यात ती शक्ती व तितकीच समज निसर्गानेच त्याला प्रदान केली आहे 
ना ! ती पाहा गाय ! एका बाजूला सूके गवत खाते व दुसर्या बाजूने जीवनप्रद असे दुध देते. ती गाय स्वतः दुध पिते का? नाही. आपल्या संस्कृतीत तिचे नावच गोमाता ठेवले आहे. तिचा महिमा आपल्या सर्वांना ठाऊक आहे.

एक आंबा ! रसाने, स्वादाने, सत्वाने किती भरलेले ते देवफळ. ते इतके सुपिक की खाऊन झाल्यावर त्याचा भाटा रूजविला की वृक्ष होऊन प्रतिवर्षी हजारो आंबे लागावे असा क्रम वर्षानुवर्षे चालला आहे. बरं सगळे आंबे भाट्यासकट खाऊन टाकले तरी झाडाच्या फांद्यांच्यी कलमे करून रूजविली की आंब्याच्या निर्मीतीत खंड पडणार नाही अशी ही आणखिन सोय व व्यवस्था दयाळू निसर्ग देवाने केलेली ! एक बी पेरली की एका पिढीस सहस्त्रावधी फळे देणारी ही फळझाडे ! हे फणस, पपनस, नारळ, द्राक्षे, डाळींबे ! डाळींबे फोडले की त्यातून परमेश्वराचे कसब प्रगट होते. डाळींबीचा रंग च मोहक ! त्यातील दाण्याची किती उत्तम आणि 
आकर्षक मांडणी ! चव काही औरच ! डांळीबं तयार करण्याचा कारखाना विज्ञानाला काढता येईल का ?

गवतासारख्या उगव म्हणताच, उगवणार्या रूचकर बहुगूणी, विविध रसाने भरलेल्या शाकभाज्या फळभाज्या, यांचा तोटाच पडू देणार नाही, अशी मायाळू आपली भूमाता. ज्याचा गाभाच गोड आहे तो साखरेच्या पाकाने ओतप्रोत भरलेला ऊस देखील इतका पिकतो की त्याच्या मळेचे मळे नकोसे झाले तर प्राण्यानांही खाण्यास हरकत ठेवली नाही. ' बोरी भाबळी उगाच जगती '  असे आपण म्हणतो परंतु त्या भाबळीच्या खाली पाण्याचा स्त्रोत असतो. बरं धान्य, फळे शाकभाज्या देऊन भूमाता थांबते का ? आपल्या गर्भातून अनेक धातू, खनिजे, रसायने, आपणांस प्राप्त करून मानवी जीवनाला एक वेगळं परिमाण ही तिनेच दिले आहे. वेगवेगळ्या हवामानानुसार त्या त्या भागात राहणार्या माणसांच्या शरीर रचनेला साजेशी अशी पिके कशी देते हे फक्त तो सृष्टीचा नियंताच जाणो !

नाना प्रकाराचे, नाना आकाराचे किटक पक्षी ही माणसास काहीतरी शिकवण देत असतात. ते ही जणू विद्या व कलेचे उपासक आहेत. भिंतीवर जाळे विणत असतांना अनेक वेळा अपयशी होऊन शेवटी टोकाला पोहचून यश मिळविणार्या कोळ्यापासून इंग्लंडचा पराभूत झालेल्या राजाला प्रेरणा मिळाली आणि आपल्या शत्रूचा त्याने पराभव करून गमाविलेले राज्य परत मिळविले. मुंग्या, मधमाश्या अशा किटकांडून दिर्घोद्योग व परस्पर समन्वय राखत जीवन कसे जगावयाचे याचा पाठ आपण शिकतो. अनेक पशू-पक्षी व किटकांच्या हालचाली, किंकाळ्यातून भूकंपाची पूर्व सूचना देत असतात. पण सर्वांभूती लीन व्हावे अशी संताची शिकवण आपण पाळतो कुठे ?

दुपारचे ऊन मी मी म्हणत असते तेव्हा आपल्याला मायेने सावली देणारे वृक्ष म्हणजे निसर्गातील जणू संत च ! दिवसा प्राणवायू सोडून रात्री कार्बनडाॅय ऑक्साईड शोषून घेणारे वृक्ष म्हणजे ईश्वराने याच्चवत प्राणीमात्रांचे जीवन जगण्यास जन्मास घातलेले परोपकारी महाॠषीच की ! कसलाच अंहकार नाही.
      वृक्ष फार लवती फलभरे |
      लोबंती जलद घेऊन नीरे ||
      थोर गर्व न करी वैभवाचा | 
      हा स्वभाव उपकाराचा || वृक्षवेलींचे नव्हे तर संपूर्ण सृष्टीतील याच्चवत घटकांचे औदार्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच राहिले नाहीत. निसर्ग मानवाची भूक भागवितो, तहान शमवितो, वायूलहरींनी श्रमपरिहार करतो.अन्न वस्त्र आणि निवारा देतो. चौसष्ट विद्या व कला शिकवितो. कवी वडस्वर्थ म्हणतो, " Nature is greatest storehouse of wisdom apart from being source of etarnal happiness." (निसर्ग केवळ ऐहीक सुखाचा एक स्त्रोत नसून शहाणपणाचा एक खजिना आहे) पण----

आपणच ऐहीक सुखाच्या नादी लागून पर्यावरणाचा र्हास करीत आलो आहोत. महात्मा गांधीजींनी म्हटले आहे की " माणसांच्या गरजांची पूर्तता करण्याइतकी क्षमता निसर्गात निश्चीत आहै. पण लालसा पूर्ण करू शकणार नाही." आपण या सृष्टीचा एक छोटासा घटक आहोत. परंतु हे विश्व, ही सृष्टी आपली नव्हे. मानव नव्हता त्याच्या कितीतरी हजारों वर्ष सृष्टी होती व आपण नसणार तेव्हा ही असणारच. आपण विश्वाचे मालक नव्हतो व नाही. असलोच तर थोड्या अंशी विश्वस्त ! ही भावना सतत बाळगून आपले वर्तन ठेवणे म्हणजेच स्वतःपासून पर्यावरणाची जागृती सुरू करणे होय. अन्यथा " मानवाचा मूलभूत विकास झाल्याशिवाय वैज्ञानिक प्रगती मानवाच्या पचनी पडणार नाही "  असे जे भाकीत प्रख्यात विचारवंत बर्टाड रसेल यांनी केले आहे ते खरें ठरू शकते.
--------------------------------------------               
             पर्यावरण प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे. जगातील सारे वृक्ष माझे बांधव आहेत. त्या वृक्षांवर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या निसर्ग सौंदर्यांचा मला अभिमान आहे.
या निसर्गातील गोष्टींचा पाईक होणाच्या पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. माझ्या देशातील वृक्षांचा, नद्यांचा, भूमीतील सर्व घटकाचा मी मान ठेवीन व त्यांचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेईन. माझा देश व त्यातील नैसर्गिक घटक यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्याची वृध्दी व  संरक्षण हे माझे आद्य कर्तव्य आहे.
---------------------------------------------
                  कविता
           निसर्ग आणि मानव 

बाळपणीचा काळ जणू निसर्गाची सकाळ | आप्तस्वकीयांचा प्रेमाने जीवनाला वळण लावण्याचा काळ ||
गृहस्थाश्रमीचा काळ जणू निसर्गाची दूपार | कष्टाने प्रपंच मांडून आनंद लुटावा अपार || वानप्रस्थाश्रमींचा काळ जणू निसर्गाची संध्याकाळ | प्रपंचाचा फेटा सोडून विरक्त जगण्याचा काळ ||
निसर्गात जशी रात्र तसाच जीवनाला अंत | निसर्गाच्या कूशीत पुन्हा विसावण्यात कसली खंत ||
--------------------------------------------
           पर्यावरण घोषवाक्ये

१) प्रदुषणाचा धोका 
    अणूयुध्दापेक्षा मोठा |
२) करा वृक्षावर माया
    मिळेल थंडगार वारा |
३) पाण्याविना नाही प्राण
    पाण्याचे महत्व तू जाण |
४) पाणी अडवा पाणी जिरवा
    जीवन बागेत हिरवळ फूलवा |
५) धरती मातेच ऋण 
     फेडू या करून वृक्षरोपण |
६) निसर्गाचा नाश 
     म्हणजे मानव जातीचा नाश |
 ७) नसेल वृक्ष
     तर जीवन रूक्ष |
 ८) वनीकरणाचा अविष्कार 
      अन् दुष्काळाचा बहिष्कार |
 ९) रक्षावया पर्यावरण
     हाती घ्या वनीकरण |
१०) पर्यावरण का रखे ध्यान
        तभी देश बनेगा महान |
११) हर औद्योगिक प्रतिष्ठान
       प्रदूषण की ओर दे ध्यान |
१२) वृक्षोंकी रक्षा
      मानवी सभ्यताकी रक्षा |
१३) अंगणी लावा एक तूळस
        प्राणवायूचा होईल कळस |
 १४) राखा पर्यवरणाचा समतोल
         जाणा वृक्षरोपणाचे मोल |
१५) हवे शुद्ध अन्न, पाणी व हवा 
      तर माती अडवा पाणी जिरवा |
१६) करू या चराई बंदी , कुर्हाड बंदी
     पर्यावरणासाठी ही शेवटची संधी |
---------------------------------------------



 

 

निसर्ग आणि मानव मधील ऋणानुबंध भाग - २

मनुष्याला सुख देण्यासाठीच कोण्या दयाळू देवाने ही सृष्टी निर्माण केली अशी प्रबळ निष्ठा मानवाच्या मनात उभी राहिली आणि ति ही निसर्गाच्या पाठिंब्यानेच.मानव आणि पशू मध्ये सर्वात महत्वाचा फरक म्हणजे माणसाला बुद्धीचे वरदान लाभले आहे. पशुपक्ष्यानांही मेंदू असतो. आपल्याला काय हवे आहे याची जाणीव पशूपक्ष्यांना असतेच पण ते मिळविण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न करणे हे फक्त माणसाचे वैशिष्ट्य आहे. सिंह वाघ इत्यादी पशू बलवान खरेच ! परंतू उद्या लागणारे अन्न ठेवण्यासाठी फ्रिजचा शोध लावला नाही. सृष्टीच्या निर्मितीपासून पशूपक्ष्यांची स्थिती जशी आहे तशीच आहे. वाघ व सिंह सारख्या पशूनीं आपल्या डावपेचात सुधारणा केलेली नाही. 

अनेक पशूपक्षी अतिशय सुंदर दिसतात. त्या सौदंर्यासाठी ते स्वतः कोणताही जाणीवपूर्वक प्रयत्न करीत नाहीत. चपळ खारीचे धावणे, थबकणे, वळून पाहणे, गोंडेदार शेपूट उभारणे इत्यादी सारं मोहक असते. हरिणाचे डोळे, सशाचे पांढरे शुभ्र, मऊ मखमली अंग, मोराचा विविध गडद रंगानी नटलेला पिसारा, वाघाचे पट्टेदार धिप्पाड शरीर, हत्तीचे पांढरे शुभ्र दात, लांब सोंड आणि डौलदार चाल या सर्व गोष्टी सुंदर असतात. पण कोणाला ? मनुष्याला. पशुपक्ष्यांच्या दृष्टीने त्यांचे ते फक्त अवयव आहेत. पशूपक्ष्यांना परमेश्वरांने ना दिली विकासाची दृष्टी, ना सौंदर्याची अभिरूची ! परंतु त्यांना तसेच ठेवण्यामागे विधात्याच्या योजना मधील प्रयोजन काय असावे ? याचा मानवाने अभ्यास करून आपली उन्नती निसर्गातील समतोल राखून सृष्टीला अधिक सुंदर बनविणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. ते पार पाडणे यालाच पर्यावरणाचा समतोल असे म्हणतात. पर्यावरण म्हणजे जमीन, पाणी, हवा, तसेच सर्व प्राणीमात्रांचा-सजीवांचा एकमेकांशी असलेला नैसर्गिक संबंध जपणे होय. 

मनुष्याच्या सुखसोयी साठी त्या दयाळू देवाने या सृष्टीची रचना किती ममताळूपणे केली आहे पाहा ! हा सूर्य, हा समुद्र, किती प्रचंड महाभूतें ! पण मनुष्याच्या सेवेस त्यांना देखील देवाने सज्ज ठेवले आहे. दुपारी तहान तहान करीत खेळून दमून मूले येतात आणि आई सकाळीच माठात ठेवलेले गार पाणी आपल्या बाळांना देते. तितक्याच मायेने हा सूर्य उन्हाळ्यात नद्या सुकून जाण्याआधिच समुद्रात असताना तोंडी धरवेना असे खारट पाणी आकाशाच्या विस्तीर्ण सरोवरात गोड आणि गार करून वर्षा ऋतूत आपणांस पोहचवितो. बरं समुद्राचे पाणी गोड करण्याच्या धाधंलीत सारा समूद्र गोड होऊन मनुष्यास मीठ मिळणे बंद करीत नाही. नाहीतर सारा संसार अळणी व्हावयाचा ! ज्याच्या तेजाने सारी जीवसृष्टी अस्तीत्वात आली, तो सूर्य किती नम्र आहे ! सकाळी तुम्ही उठा अगर उठू नका  तुमच्या आमच्या दाराशी, खिडक्यापाशी नम्र पणे उभा असतो. बरं तो ही वेळवर ! किती वक्तशीरपणा ! तुम्ही त्याला नमस्कार करो वा ना करो ! सर्वांना सारखाच प्रकाश देणार, सर्वांना सारख्याच वाटा दाखविणार ! अशा चैतन्यमय सूर्याला उगवतेवेळी आपण नमस्कार करणार नसू, तर चक्रीवादळात पावसाने थैमान घातलेल्या वेळी ईश्वराची याचना करण्याचा आपणांस काय तो अधिकार ! 

हा पाहा समूद्र ! आहे अथांग ! परंतू आपल्या मर्यादा ओलांडीत नाही. मर्यादा पाळणे हा गूण सागरकडून शिकावा ! व्यापकतेचा गर्व जसा त्याला नाही, तसाच आकाशाला ही नाही. आपण ज्या काही बर्या-वाईट कृती करतो त्या सगळ्या ते आपल्या उदरात सामावून घेते. आपले आजच्या नित्याचे मित्र रेडीओ, टिव्ही, संगणक, इन्टरनेट मोबाईल यांचा जन्मदाताच मूळी ते आकाश आहे. आकाशाची विशालता मोहक की चंद्राचे चांदणे मोहक, की लुकलुकणार्या तारकांचे सौंदर्य 
मोहक ? ते आकाश क्षणभर आपल्या  मनाची चलबिचल करते पण नंतर मान वर करून त्या आकाशाकडे पाहिले की क्षणभरात आपले मन असे काही स्थिर करते की त्यातून आपली बुद्धी आणि दृष्टी व्यापक होत जातात. मग आपोआप मन शांत होते. 

तो चंद्र पाहा ! श्रीमंताच्या महालावर प्रकाश देतो तसेच गरीबांच्या चंद्रमोळी झोपड्यांनाही चंदेरी मुलामा ठेवतो. गरीब श्रीमंत असा भेदभाव आहे का त्याच्याकडे ? चंद्राच्या उमळत्या कला पाहा, की प्रचंड ग्रहगोलांची परिभ्रमणे पाहा ; साधा रिमझीम पडणारा पाऊस असो;  की उकळता धातूरस फेकणारा ज्लालामुखीचा स्पोट असो; गवतावर फूल उगवणे असो की समुद्राची भरती ओहटी असो ही सर्वत्र प्रंचड कल्पनाशक्ती असलेल्या ईश्वराने तयार केलेली सुव्यवस्था आहे. सारे ग्रह एकाच आकाराचे नाहीत पण आपआपल्या कक्षातच नियम पाळून भ्रमण करत असतात. अनियमीत जीवन म्हणजे स्वतंत्रता नव्हे. स्वतःच्या मनाला अशी बंधने स्वतःच निर्माण करावीत व ती कसोशीने पाळायची हाच शाश्वत निसर्ग नियम आहे. त्यातच पर्यावरणातील समतोल राखण्याची शक्ती असते. 
                                       क्रमशः--

निसर्ग आणि मानवामधील ऋणानुबंध भाग - १

आज ५ जून जागतिक पर्यावरण दिन. शाळांना उन्हाळ्याची सुटी आहे. असे असले तरी शाळा सुरू झाल्यानंतर आमच्या शाळेत (स्वर्गीय आनंदराव पवार सरस्वती विद्यालय, वझिरा नाका, बोरीवली (प) मुंबई ) दरवर्षी पर्यावरण दिन साजरा होत असतो. त्या निमित्ताने या खेपेस पर्यावरण विषयांवर विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तर पद्धतीतून पारायण करण्याचे ठरविले आहे. ही प्रेरणा मला कोठून आली आणि पारायण हा शब्द या ठिकाणी वापरावा अशी बुद्धी कशी झाली हे ईश्वरालाच ठाऊक. पण त्यातूनच मला काही वर्षापुर्वीची एक गोष्ट आठवली. ती इथे प्रथम मांडतो.

माझ्या एका मित्राचे रेसाॅर्ट आहे. काही वर्षापुर्वी मे महिन्यातच एके दिवशी त्याचा फोन आला. त्याने फोनवरून त्याच्या रेसाॅर्टमध्ये पर्यावरण दिन साजरा करावयाचे ठरविले असल्याकारणाने चार-पाच दिवसात पर्यावरणावर एखादा लेख पाठविण्याची विनंती केली. मी पाचव्या दिवशीच माझा प्रदिर्घ लेख मित्राकडे पोहचता केला होता. ही गोष्ट आठवली तेव्हाच माझ्या लक्षात आले की मी मित्राला पाठविलेल्या  लेखाची झेराॅक्स काॅपी फाईलमध्ये आहे. पुष्कळदा आपण लिहीलेला लेख आठवला तरी तो तसाच पुन्हा लिहता येत नाही हे मी अनुभवत असतो. तो लेख पब्लीश झालेला नसल्यामूळे जागतिक पर्यावरण दिनोत्सवाच्या निमित्ताने ब्लाॅगवर पब्लीश करण्याची संधी मी साधून घेत आहे. संधी अशासाठी म्हणतो की विचार करून लेख लिहीण्यासाठी वेळ अपुरा पडणार हे जाणवले.  म्हणून पुर्वी लिहलेल्या लेखाची झेराॅक्स काॅपी समोर ठेवून सॅमसंग नोट्सवर उतारून घेत आहे. लेख मोठा असल्याकारणाने सॅमसन नोट्सवर उतारून घेण्यात, एडीट करण्यासाठी व पब्लीश करण्यासाठी  ही वेळ लागणार याची जाणीव ठेवून त्याचे तीन भाग करून पब्लीश केला एवढाच काय तो बदल केला आहे.

पर्यावरणाचे महत्व, पर्यावरणाची हानी व उपाय  या विषयाच्या जागृतीच्या दृष्टीने द्यावी लागणारी आकडेवारी,  स्वार्थ- सत्ता - संपत्ती बाबतचा  मानव्याचा हव्यास आणि त्यातून ऐषारामी जीवनाची लागलेली गोडी अशा सवयीमूळे अनेक प्रकारच्या गरजा वाढल्या व त्यासाठी अनेक यंत्राची सतत वाढत जाणारी निर्मितीत होत असलेली वाढ, वाढता साम्राज्यवाद, शस्त्रांत्रे निर्मितीची देशोदेशी सुरू असलेली स्पर्धा, वाढते औद्योगिकरण, टोलेजंग इमारती, वृक्षतोडी,  बेफिकीरपणे व बिनधास्त नैसर्गिक संपत्तीची सुरू असलेली उधळण इत्यादी संबंधीची माहिती व त्यातून वाढत चाललेले, वायू-जल-ध्वनीचे प्रदुषण इत्यादी गोष्टींचा उल्लेख या लेखात नसल्यामूळे हा लेख आपल्या पसंतीस पडेल असा नाही म्हणजेच Avarage आहे हे मी प्रांजळपणे कबूल करतो. 

या विषयावरील लेख, पुस्तके वाचली आहेत. या विषयावर स्वयंसेवी संस्थातर्फे आयोजित केले जाणार्या अभियानात मी अधून-मधून भाग घेतो. या विषयाचा मी तज्ञ वा अभ्यासक नाही. तरीही अलिकडे  गेल्या जानेवारी महिन्यात सेक्रेटरीयल कामासाठी आमच्या शाळेत उपस्थित असताना एका वर्गात माध्यमिक विद्यार्थ्यांचा पर्यावरणाचा तास सुरू असताना मला छोटसं भाषण देण्यासाठी एका शिक्षकाने आमंत्रीत केले. मी छोटसं भाषण केलं. एवढाच काय तो माझा पर्यावरण विषयाशी असलेला संबंध. याबाबत मला खंत आहे. म्हणून थोडाफार जाणीवपुर्वक प्रयत्न सुरू करावा अशी इच्छा झाली. म्हणून मागे लिहलेला पण पब्लीश न केलेला लेख तीन भागात विभागून आपल्यासमोर ठेवतो आहे.

पर्यावरण या विषयाची व्याप्ती विश्वाचे गूढ उलकण्यापर्यंत पोहचते. माहिती व तंत्रज्ञानाच्या क्रान्तीने जग जवळ आले आहे या बाबत दुमत नाही. पण भौतिक विज्ञानाच्या दृष्टीने हे जग दिवसें दिवस प्रसरण पावत आहे. त्यामूळे पर्यावरण या विषयाची व्याप्ती वाढतच राहणार आहे. 

विख्यात भौतिक वैज्ञानिक आईनस्टाईन यांनी म्हटले आहे की, 
' या विश्वात सर्वात अनाकालनीय गोष्ट कुठली असेल तर हे विश्वच होय.' पुढे एके ठिकाणी ते म्हणतात, Imagination is more important than knowldge. (ज्ञाना पेक्षा कल्पनाशक्ती अधिक महत्वाची असते)  मानवाला कल्पनाशक्ती व स्मरणशक्तीचे वरदान निसर्गाकडून झाले आहे. मानवाच्या ज्ञानाच्या शाखांत होणारी वाढ ही त्याला प्राप्त झालेल्या कल्पनाशक्ती तून होत असते.

मानव व प्राण्यांमध्ये असलेला महत्वाचा फरक म्हणजे माणसाला बुद्धी प्राप्त झाली आहे. फूल उमलण्याची क्रिया ही सहज असते. तसेच कल्पनाशक्ती व स्मरणशक्ती या निसर्गदत्त जाणिवा आहेत आणि त्या माणसांमध्ये परिपूर्ण आहेत. मूलतः आपली ज्ञानेंद्रियेच नव्हे तर आपलं सारं शिरीर पंचमहाभूतांचे बनलेले असते. या विश्वातील याच्चयावत वस्तूजात या पंचमहाभूतांतील कोणत्या तरी एक वा अधिक गुणाचेंच बनलेले असते. 

या विश्वाच्या उत्पत्ती सबंधित अनेक जणांनी संशोधन केले ते ही निसर्गाच्या सानिध्यात राहूनच.  मानवाने जी काही प्रगती केली त्या यशामागील खरे गमक मानव व निसर्ग मधील असलेला स्नेह म्हणा वा ऋणानुबंध हेच आहे. या संबंधित एक कथा सादर करतो.

एकदा चैतन्यरूपी ईश्वराला आपण अनेक व्हावे असे वाटले. त्यातूनच  एक शक्ती निर्माण केली. नंतर त्या शक्तीदेवीतून मिळालेल्या प्रेरणा तून महाकाय पंचमहाभूतें निर्माण केली. त्यांच्या चेहर्यावर आलेला आनंद व तेज पाहून शक्ती देवतेने विचारले, 'आज आपण फार खुषीत दिसत आहात, कारण सांगा की !  ईश्वराने उत्तर दिले. ' मी आज महाकाय अशी पंचमहाभूतें निर्माण केली आहेत.'  नंतर पंचमहाभूतांची वैशिष्टे व त्यांच्यी कार्ये व परस्पर समन्वय कसा असेल हे ही सांगितले आणि ईश्वर झोपी गेला.पण-

एका तासात त्याला जाग आली. तेव्हा शक्ती देवीने प्रश्न केला, ' आता कुठले काम काढले आहे ? ' त्यावर ईश्वर म्हणाला, केवळ पंचमहाभूतें निर्माण करून मला शांती मिळत नाही. माझे काम अपुरे आहे असे म्हणत घराबाहेर पडला. नंतर -- विविध वृक्ष, वेली ची निर्मिती करून आणि त्यावर विविध रंगी- बेरंगी फूले उमविली. त्या वृक्षांवर विविध आकार, व रंगाची अमृतमय फळे निर्माण केली. व्वा ! आता तर  सृष्टी चांगली सजवली आहे. असे स्वतःशीच बोलत  ईश्वर घरी परतला. शक्तीदेवतेने विचारले ' आज कुठली कामें केली ' असा प्रश्न विचारला. त्यावर ईश्वराने सृष्टी कशी सजवली आहे याचे उत्तर देऊन झोपी गेला.  आज ईश्वराला गाढ झोप लागली आहे असे शक्तीदेवीला वाटले खरे, पण लिगलीच ईश्वराला जाग आली. शक्ती देवीला अंतर्ज्ञानातून कळले की ईश्वराने हातात घेतलेल्याल्या कामात त्रुटी राहिल्या असाव्यात म्हणून त्या त्रुटीचे स्वरूप विचारले. त्यावर ईश्वर म्हणाला ' सृष्टी सजली आहे पण सृष्टीत हालचाल दिसत नाही.' ती निर्माण करण्यासाठी मी बाहेर जात आहे असे म्हणत ईश्वर बाहेर पडला. 
  
नंतर ईश्वराने विवाध आकाराचे, रंगाचे, जलाशयात राहणारे प्राणी, पाणी आणि जमिनीवर चालणारे प्राणी निर्माण केले. फक्त जमिनीवर राहणारे व चालणारे असे दोन पायाचे व चार पायाचे, विविध आकाराचे, रंगाचे,  विविध चाल असणारे, प्राणी निर्माण केले.  नंतर विविध आकाराचे जमिनीवरून  सरफटत चालणारे प्राणी निर्माण केले. नंतर रंगी-बेरंगी विविध आकाराचे,  विविध प्रकारचे आवाज, कुंजन करीत आकाशात स्वैरपणे विहार करणारे, आकर्षक व मोहक असे पक्षी निर्माण केले. आज ईश्वराने प्रचंड मेहनत घेतली. ईश्वराचा एक दिवस म्हणजे एक युग असते. ईश्वर आनंदाने घरी परतला. शक्ती देवीला आजच्या कामाचा तपशिल देताना ईश्वराचा आनंद ओसांडून वाहात होता. नंतर ईश्वर झोपी गेला. पण--- 

या खेपेस अर्ध्या तासातच जाग आली म्हणून शक्ती देवीने विचारले, 'आज झोपमोड लौकर कशी झाली ? यावर उत्तर देतांना ईश्वराच्या चेहर्यावर तणाव दिसत होता. तरी ही त्याने उत्तर दिले,  " देवी मी अतिशय सुंदर अशी सृष्टी निर्माण केली आहे हे खरेच; या सृष्टीत हालचाल करणारे  अनंत पशू पक्षी निर्माण करून सृष्टीत movment आणली. पण मला आता या सृष्टीची देखभाल करणारा, improvment करणारा प्राणी निर्माण करावयाचा आहे. हे काम महा कठीण आहे. जी सृजन होते ती सृष्टी. पण ती लागलीच सृजन होत नसते. तिला टप्याटप्यात अधिक सुंदर करणारा, तिचे सरंक्षण करणारा, व ज्याला सौंदर्याभिरूची असेल, असा बुद्धीवान प्राणी निर्माण करावा लागेल. तो प्राणी केवळ बुद्धीवान होऊन भागणार नाही. तो सृष्टी संबंधी सेन्सिटीव्ह असावयास हवा. सृष्टीची भक्ती करणारा असावा तसेच तो माझा शोध घेण्याचा (म्हणजे सतत माझे नामस्मरण करणारा) प्रयत्न करणारा असा जन्मास घालावयाचा आहे, असे  म्हणत ईश्वर घराच्या बाहेर पडला. प्रचंड मेहनत केल्यानंतर ईश्वराने सर्वात शक्तीमान, सर्वात बुद्धीमान, गुणी, असा प्राणी जन्मास घातला त्याचे नाव आहे मानव. 
  
वाघ, सिंह, हत्ती इत्यादी ताकदवान प्राणी असोत, वा आकाशात उडणारे पक्षी असोत, वा जलाशयात राहणारे जलचर प्राणी वा जमिनीवरून चालणारे व  सरपटणारे प्राणी असोत, वा जमिनीवरील सर्वात चपळ असे प्राणी असोत, माणूस आपली कार घेऊन चित्यापेक्षा अधिक वेगाने धावू शकतो. माणूस रेल्वे गाडीतून जमिनीवरून सरपटत प्रवास तो ही अधिक वेगाने करतो. माणूस जलाशयातून बोटीने प्रवास करतो. जलाशयात वा समुद्रात खोलवर असणार्या प्राण्यासोबत आपल्या पाणबूडीतून प्रवास करतो. आकाशात भरारी घेणार्या पक्षांप्रमाणे माणूस विमानातून प्रवास करतो. ताकदवान पशूपेक्षा यंत्राच्या साह्याने माणूस मोठाल्या इमारती बांधू शकतो, मोठाले वजनदार ब्रिज बांधू शकतो. सारांश मनुष्य ही ईश्वराची सर्वोत्तम निर्मिती आहे. माणसावर निसर्गाची कृपा आहे. 

वैदिक काळा पासून आपल्या संस्कृतीत ईशावास्यम इदं सर्वम् (चराचर सृष्टीत ईश्वर असतो) असे म्हटले जात आहे. वृक्षवेली आम्हां सोयरे असे तुकाराम महाराज म्हणाले आहेत. पर्यावरणासंबंधी आपल्या संतमहंतानी आपआपल्या साहित्यातून निसर्गाची निगा म्हणजेच चराचर सृष्टीला अधिकाधिक सृजन बनविण्याचे कार्य ईश्वराने मानवाकडे सोपविले आहे असा उपदेश केला आहे. निसर्ग सुद्धा ईश्वराचेच रूप. म्हणूनच आपण निसर्गाला ही देव समजून त्याची पूजा करतो. अवकाशातील ग्रह-तारे नक्षत्रांची ही आपण पुजा करतो. आप,तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी या पंचमहाभूतांची ही आपण पुजा करतो. आपल्या संस्कृतीत ऋतुमानानुसार उत्सवांची व सणांची मांडणी केली आहे. त्या पाठीमागचा हेतू हाच की त्यायोगे निसर्गातील प्रत्येक घटकात समन्वय व्हावा, सतत समतोल राहावा आणि कुठल्याही नैसर्गिक संपत्तीला ओरबडून काढण्याचे व्यसन न लागावे इतकीच किमान अपेक्षा ईश्वराला त्याच्या सर्वात लाडका अशा अपत्याकडून आहे. 
                                      क्रमशः--










शुक्रवार, १७ मे, २०२४

लोकसभा निवडणूका- २०२४ इंडी आघाडीच्या प्रचाराच स्वरूप मुस्लीमांच तुष्टीकरण व हिंदू हिताकडे दुर्लक्ष (भाग- ५ व ६)

स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षांच्या काही नेत्यांनी राजकारण हा समाजसेवेचा मार्ग न मानता आपला स्वतःचा धंदा मानला. वाडवडिलांचा धंदा, व्यवसाय हे एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे, पुढे तिसर्या पिढीकडे चालत आलेले असतात. ही मानवाची स्वाभाविक प्रवृत्ती. त्यात अनेक प्रकार आहेत. मानवी जीवनाचा इतिहास पाहता सम व्यवसायी लोक समूहात राहणे पसंत करू लागले. या व्यवस्थेचं नाव वर्ण व्यवस्था. वर्णव्यवस्था म्हणजे जातीव्यवस्था नव्हे. या संबंधीत अधिक माहिती चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः या शिर्षकाचा माझ्या ब्लाॅग वरील लेखात आहे, ती आपण वाचू शकता.

मुद्दा हा आहे की वडील डॉक्टर असले की मुलगा डॉक्टर बनणे, वडील दुकान चालवत असतील तर पुढची पिढी दुकान चालविणे अशी जी स्वाभाविक वृत्ती असते तीला समाज मान्यता देत असतो. राजकारण हा धंदा किंवा व्यवसाय नव्हे. 

राजकारणातील घराणेशाहीला समाज मान्यता देतो पण आमदारकी, खासदारकी पूरता सिमीत असणे आवश्यक आहे. पक्षच एखाद्या परिवाराच्या मालकीचा होणे हे फार घातक ठरू शकते. राहूल गांधीचा पिंड राजकारणाचा नसावा. यावर मी एका लेखात सविस्तरपणे लिहले आहे. केवळ बापजाद्यांनी राजकारण केले म्हणून चौथ्या पिढीतील मुलांना राजकारणात पाठविणे अन्यायाचे ठरते. कारण त्यांच्या कडे राजकारण क्षेत्रात काम करण्यासाठी असलेली गती व मती पूर्णतः लोप झालेली असते. हा निसर्गाचा नियम आहे. 

राजकारणात घराणेशाहीचा उदय प्रथम काँग्रेस पक्षात झाला. स्वाभाविकतः काँग्रेस पक्षांची जी पिल्लावळ आहे अशा प्रान्तीय पक्षांत ही, ती शिरली यात नवल ते कसले ? राजकारणातील आपली घराणेशाही जिवंत ठेवावयाची असेल तर हिंदू समाजातील जाती-जमातीमध्ये भांडणे लावण्याची क्लुप्ती लढविणे क्रमप्राप्त ठरते. हा वारसा काँग्रेसला अर्थातच ब्रिटीश राजवटीकडून देणगी रूपात मिळालेला. तसेच प्रजेची हिंदू व अहिंदू अशी ओळख व विभागणी, ही आपल्या देशावर दिर्घकाळ राज्य करण्यासाठी ब्रिटीशांनी अवलंबलेली नीती. जिचे नाव ' फोडा आणि झोडा ' असे आहे.

तीच नीती स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाने स्विकारली. मग ज्या हिंदू बांधवाचे जबरदस्तीने धर्मांतर झाले अशा मुस्लिम व ख्रिस्ती बांधवांना अल्पसंख्यांकाचा दर्जा देणे, सोयी व सवलती देणे, जगभरातील मुस्लीम व ख्रिस्ती देशातील स्वयंसेवी संस्थातून मुस्लीम व ख्रिस्ती संस्थांना मिळणार्या अपाम पैशाचा आकडा व त्या पैशाचा विनियोग कसा होतो यावर सोयिस्कर रित्या दुर्लक्ष करणे, त्या पैशातून अधिकाधिक हिंदू समाज बांधवांचे विविध प्रलोभने दाखवून धर्मातंर झाले, तरी त्यावर ही दुर्लक्ष करणे, इत्यादी क्लुप्त्या स्वातंत्र्यानंतर काॅग्रेसने ब्रिटीशांपेक्षा अधिक सराईतपणे वापरल्या. काॅग्रेसमधून बाहेर पडून ज्यांनी स्वतःचे पक्ष स्थापन केले अशा प्रांतीय पक्षांनी काॅग्रेसपेक्षा अधिक निर्लज्जपणे अल्पसंख्यांकाचे लाड करीत आहेत. 

इतकेच नव्हे हिंदूच्या मंदिरातील पैसा सरकार नैसर्गिक आपत्ती काळात उपयोग करते. त्यात ख्रिश्चन व मुस्लिम बांधवांना मदत देत असते. दोन भावांना सर्व बाजूने लाड करावयाचे व हिंदू भावाला सावत्र मुलासारखे वागविणे हे भारत मातेला तरी आवडेल का, याचा विचार सर्व राजकीय पक्षांनी करायला हवा. यातील विशेष बाब अशी आहे की साम्यवादी पक्ष देव धर्म मानत नाहीत तरी सुद्धा ख्रिस्ती व मुस्लीम समाजाचे लाड करतात पण हिंदू संस्कृतीचा द्वेष करीत असतात. ज्या राज्यात साम्यवादी पक्षांची सत्ता होती व आज आहे अशा केरळ राज्यात तसेच पुर्वीचा साम्यवाद्यांचा बालकिल्ला असलेल्या पश्चीम बंगालमध्ये तृणमूल काॅग्रेस हिंदू संघटनांवर, अध्यात्मिक गुरू व संस्था आणि संघ परिवाराचा पराकोटीचा छळ करीत आहेत. मोदी सरकार कुठल्याही अल्पसंख्याकांवर अन्याय करीत नाही आणि करणार ही नाही. पण हिंदू हिताकडे दुर्लक्ष व अन्याय करणारे पक्ष, विदेशी संस्था, नक्षलवादी, व दशहतवादी इत्यादी मंडळींवर कडक कारवाई मोदी सरकार करेल असे दिसते.

काँग्रेस असो वा प्रान्तीय पक्ष असोत भाजपाने अल्पसंख्याकांच्या लांगूनचालनावर आक्षेप घेतला की भाजपा सांप्रदायिक पक्ष आहे असे एकमूखाने टिका करीत राहिले. पण अती तिथे माती या न्यायानुसार हिंदू समाज जागरूक होत गेला आणि सन २०१४ ला केंद्रात भाजपाचे सरकार आले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाले. स्वातंत्र्यानंतर राजकारणात धार्मिक, व जातीय धृवीकरण कोण करीत आले आहे हे गेल्या दोन लोकसभेच्या निवडणूकां च्या प्रचारातून व निवडणूकांच्या निकाला द्वारें स्पष्ट झाले आहे.

मुलतः सर्वधर्मसमभाव व समाजवाद या दोन्ही कल्पना विदेशी बनावटीच्या आहेत. भारतात प्राचीन काळापासून गुण्यागोंविदाने राहणे ही एक स्वाभाविक वृत्ती मानली जात होती. पारशी, ज्यू, तसेच युरोपातून व्यापार करणारे फ्रेंच, इंग्लीश, पोर्तुगिज, डच इत्यादींना व्यापारासाठी आपल्या समाजाने कधी विरोध केला नाही. उलट स्वागतच केले. यापैकी युरोपियन व मध्ययुगातील इस्लामी आक्रमकांनी आपल्या समाजाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. तसाच गैरफायदा स्वातंत्र्यानंतर सत्ताधारी काँग्रेस पक्षाने नवीन रूपात घेणे सुरू ठेवले आणि आज ही तीच वृत्ती काँग्रेस नेत्यांची अनुभवयास येत आहे. कारण काँग्रेसची सुत्रे नेहरू-गांधी घराण्याकडेच राहिली. शेवटी आधूनिक शरीर विज्ञान, तंत्रज्ञान व डीएनए थेअरी याहून अधिक वेगळे काही सांगत नाही आणि उपाय देत नाही. त्यामूळेच काॅग्रेस लयास गेली आहे.

दुर्दैवाने इंडी आघाडी घटक पक्षांची अल्पसंख्याकांना प्रलोभने दाखवित मतें मागण्याची जी खोड आहे ती काही केल्या जात नाही. त्यातून जे धृवीकरण होत आहे त्याला भाजपा जबाबदार आहे असा आरोप करणार्या लिबरल मिडीया हाऊसेस मूळे विरोधी पक्षांचा माज कमी होण्याऐवजी वाढतो आहे. त्यातूनच देशातील लोकसभा पासून ते ग्रामपंचायत स्तरावरील प्रत्येक निवडणूकीतल्या प्रचाराची पातळी घसरविण्याची सुरूवात विरोधी पक्षांचे नेतेच करताना दिसत आहेत. देशाच्या दुर्दैवाने त्यात अग्रणी स्थानावर राहूल गांधी आहेत, ज्यांचे गुरू सॅम पित्रोदा आहेत. आजच्या काँग्रेसच्या या नेत्याचे व त्यांच्या गुरूचे वागणे, बोलणे पाहता, ' सुनो गुरू ' या काव्यसंग्रहात श्री रमेश श्रीवास्तवांनी महात्मा गांधीजींना उद्देशून मांडलेल्या पंक्ती आठवल्या आहेत. त्या येथे मांडून या भागाची समाप्ती करतो.

" मेरा दावा है बापू

तू आज अगर जिंदा होता,

तो गोडसेकी गोलीसे मरता न मरता

आत्महत्या जरूर कर लेता

आत्महत्या जरूर कर लेता || "

                                     क्रमशः-

---------------------------------------------

   लोकसभा निवडणूका २०२४

 इंडी आघाडीच्या प्रचाराचं स्वरूप        मुस्लिम समाजाचं तुष्टीकरण व      हिंदू हिता कडे दुर्लक्ष (भाग-५ व ६)

            (भाग-५ व भाग-६)

आपल्या लेखात डॉ. शरदजी हेबाळकर, ट्राॅटस्की नावाच्या रशियन साम्यवादी नेत्याने जे काही म्हटले होते ते आपल्या समोर मांडतात. " Only in a socialist society can the average humanity rise to the level of Plato and Marxs."

(" केवळ समाजवादी रचनेतून प्लेटो आणि मार्क्स यांनी सांगितलेल्या आर्थिक पातळीवर सर्वसामान्य मानव पोहचेल ") यावर थोर समाजवादी विचारवंत लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी जे म्हटले, ते विचारप्रवृत्त करणारे आहे. असे सांगत डॉ. शरदजी हेबाळकर पुढे लिहतात, जयप्रकाश नारायण यांनी घोषित केले,

" However some years back, it became clear to me that socialism as we understand it today can not take mankind to the subline goal of freedom, equality, brotherhood and peace." 

( " काही वर्षापुर्वी माझ्या हे स्पष्टपणे लक्षात आले की, आम्ही समजतो तो समाजवाद मानवी जीवनात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, आणि शांती यांची प्रतिष्ठापना करू शकत नाही.")

डॉ. शरदजी म्हणतात, " ही काही समाजवाद आणि साम्यवाद याचींच केवळ शोकांतिका नाही. वैचारिक परिवर्तनाच्या दृष्टीकोनातून या घटनाचा वेध घेतला पाहिजे, असे म्हणत त्यांनी हा विचार अधिक स्पष्ट होण्यासाठी प्रख्यात विचारवंत एम एन राॅय, यांनी केलेला विचार मांडला आहे तो असा आहे.

'' Until the intellectual, cultural, spiritual autmospere of the country was changed, it was not possible to bring about a political and economical reconstruction of the country." (" जोपर्यंत वैचारिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक वातावरणात परिवर्तन होत नाही, तो पर्यंत देशाची आर्थिक व राजकीय पूनर्रचना करणे शक्य नाही ")

" आर्थिक काय किंवा राजकीय काय, पुनर्रचनेचा पाया हा वैचारिक, सांस्कृतिक व अध्यात्मिकच राहणार. वैचारिक क्रान्तीच्या परिभाषेत सांगायचे तर स्वामी विवेकानंद कट्टर समाजसुधारक होते, पण " गर्वसे कहो, हम हिंदू है " हाच परिवर्तनाचा, समाज सुधारणेचा व राष्ट्रोन्नतीचा पाया आहे, याच्याशी त्यांनी तडजोड केली नाही. रूढ अर्थाने संन्याशाला धर्म नसतो, नाव नसते. स्वामी विवेकानंद हे संन्यासी होते."

पुढे डॉ.शरदजी, योगी अरविंदानी त्यांच्या सुप्रसिद्ध उत्तरपाडा भाषणात धर्म, राष्ट्र व राष्ट्रीयता यांची जी निःसंदिग्ध कल्पना मांडली होती ती आपल्या समोर ठेवतो.

" सनातन धर्मच आमच्याकरिता राष्ट्रयिता आहे. हिंदू राष्ट्र सनातन धर्माला घेऊनच निर्माण झाले आहे. त्याला घेऊनच चालले आहे आणि घेऊनच वाढत आहे. जेव्हा सनातन धर्माची हानी होते , तेव्हा या राष्ट्राचीही अवनती होते. सनातन धर्म हीच राष्ट्रीयता आहे."

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याहून वेगळे काही मांडले नाही. संघ परिवारातील ज्या संस्था आहेत, त्यातलाच एक सदस्य भाजपा आहे. लालू प्रसाद यादव, उदयनिधी स्टॅलीन, राहूल गांधी व त्यांचे गुरू सॅम पित्रोदा, शरद पवार इत्यादीं नेते मंडळी ज्या पद्धतीने हिंदुत्व, सनातन धर्म, पंतप्रधानावर, संघावर व भाजपावर टिका करीत आहेत त्यातून त्यांच्या पक्षांचेच नुकसान होणार आहे हे निश्चीत.

याच लेखात डॉ. शरदजींनी माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय प्रमोद महाजनांना आलेला अनुभव मांडला आहे. आणिबाणीच्या काळात भूमीगत असताना प्रमोद महाजन प्रख्यात विचारवंत कै नरहर कुरूंदकर यांना भेटावयास गेले होते. चर्चेच्या ओघात कुरूंदकर त्यांना म्हणाले, " संघावर बंदी घालून श्रीमती इंदिरा गांधी यांनी चूक केली." प्रमोद महाजन यांनी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहिले. कुरूंदकर पुढे म्हणाले, " त्यांच्या (इंदिराजींच्या) हे लक्षात आले नाही की संघावर बंदी घालणे, म्हणजे हवेवर बंदी घालण्यासारखे आहे. समुद्राच्या लाटांवर बंदी घालण्यासारखे आहे. "

डॉ. शरदजींनी प्रमोद महाजनांना आलेला अनुभव वाचल्यानंतर मला कुठेतरी माझ्या वाचनात आलेली काही माहिती आठवली. ती मी आपल्यापुढे ठेवतो आहे. ' आपल्या आयुष्याच्या अखेरीस विख्यात अष्टपैलू विचारवंत आचार्य अत्रेंजींना भारतीय जंनसंघांची (म्हणजे आताच्या भाजपाची ) राजकीय भूमिका देशाच्या हिताची वाटल्यामुळे ते जनसंघाच्या व्यासपिठावर प्रमूख अतिथी म्हणून उपस्थित होते. ' 

इतकेच नव्हे तर देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू जे पक्के समाजवादी व सर्वधर्मसमभाव विचारसरणीचे असुनही आयुष्याच्या अखेरीस सन १९६१ मदुराई येथील काँग्रेस अधिवेशनात त्यांनी हिंदु संस्कृती संबंधीत गौरवौद्गार काढत स्वतःची चूक मान्य केलेली आहे.

डॉ. शरदजी आपल्या लेखात लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी ३ नोव्हेंबर १९७७ ला पाटण्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गात स्वयंसेवकां समोर जे भाषण दिले ते असे आहे --

" तुम्ही सर्वजण शीलसंपन्न आणि सदगुणसंपन्न असून निष्ठापुर्वक कार्य करण्यासाठी प्रतिज्ञाबध्द झाला आहात, याची मला जाणीव आहे. आपल्या देशाला तुम्ही नवा आकार द्यावा आणि नवभारताचे शिल्पकार बनावे अशी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. आपल्या प्राचीन सासंकृतिक वारसाचे सामर्थ्य तुमच्या पाठिशी आहे. आजच्या घडीला आपल्या देशात जे परिवर्तन घडत आहे त्याच्या आघाडीला तुम्हीच आहात. तुमच्या संघटनेशी तुलना करता येईल अशी अन्य कोणतेही संघटना नाही. हे मला ठाऊक आहे. "

वाचक मित्र हो, आपल्या देशात देश व राष्ट्र म्हणजे काय तसेच हिंदू, हिंदूत्व, सनातन संस्कृती यावर एक वाक्य लिहू न शकणारी,एक वाक्य बोलू न शकणारी घराणेशाही पक्षांचे अनेक वारस आज देशभरातील प्रत्येक राज्यातील राजकारणात प्रमूख म्हणून दिमाखाने वावरत आहेत. ही मंडळी वर नमूद केलेल्या थोर पुरूषांचे नातू नात शोभतील अशी आहेत. इतकेच नाही तर वर नमूद केलेल्या थोर साम्यवादी व समाजवादी महानुभवाचा वारसा घेऊनच इंदिराजी, शरद पवार, लालू प्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, स्टॅलिन इत्यादींनी राजकारण केले. आज त्याच बापजाद्यांची राजकारणातली सद्दी का संपत आली आहे, याची कारणें शोधण्याचा प्रयत्न राहूल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, सुप्रिया सुळे, उदयनिधी स्टॅलीन इत्यादींनी केला असता तर बदलत्या काळाची पावले त्यांना थोडीफार तरी समजली असती. उठसूठ मोदी, भाजपा आणि संघावर टिका करून निवडणूका जिंकण्याचा काळ संपला आहे हे लक्षात ठेवावे.

लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी सन १९७७ ला पाटण्यातल्या शिबिरात ज्या युवक संघ स्वयंसेवकांचे कौतूक केले त्यातील काही स्वयंसेवक आज भाजपात उच्चपदावर तसेच केंद्र सरकार व भाजप शासीत राज्यात मंत्रीपदावर कार्यरत आहेत. म्हणूनच भारताची सर्वच क्षेत्रात जगातील महाशक्ती कडे लाटचाल होत आहे.

--------------------------------------------


लोकसभा निवडणूका- २०२४ इंडी आघाडीच्या प्रचाराचं स्वरूप मुस्लीम समाजाचे तुष्टीकरण व हिंदू हिताकडे दुर्लक्ष (भाग-३ व ४ )

 

श्री अच्यूत मेनन यांनी आद्य शकंराचार्यानी चारी दिशांना स्थापन केलेल्या चार पिठाची स्थापना म्हणजे एक प्रकारे Indian Nationalism is reality यावर शिक्कामोर्तोब केले आहे. असे असूनही तथाकथित साम्यवादी व समाजवादी मंडळींनी अच्युत मेनन यांनी मांडलेला इंडीयन नॅशनलइझम स्विकारला का नाही ? याची कारणें सर्वश्रूत आहेत. विद्यमान समाजवादी व साम्यवादी मंडळींची मानसिकताच अशी झालेली आहे की, जो पर्यंत विदेशात बसलेल्या आपल्या बाॅस मंडळींनी इंडीयन नॅशलिझमची व्याख्या केली नाही, तो पर्यंत आपण ती मुळीच स्विकारायची नाही एवढेच काय ते त्यांना कळते. यालाच वैचारीक गुलामी म्हणतात. देश स्वतंत्र झाला पण ही मंडळी मानसिक दृष्ट्या पारतंत्र्यातच आहे.

भारतिय संस्कृतीस संमिश्र संस्कृती मानणार्या या महाभागांना संस्कृती (कल्चर) आणि सभ्यता अथवा नागर सुधारणा (सिविलायझेशन) या मधील फरक समजला आहे पण तसे मान्य करावयाचे नाही असा आदेश यांच्या विदेशी बाॅसचा असावा का? की विदेशी शक्ती कडून मिळणार्या पैशाचा याना असलेला हव्यास कारणीभूत ठरत आहे का? सोन्याच्या लंकेचाही हव्यास न ठेवणार्या श्रीरामाचा आदर्श ठेवण्यावर येथील संस्कृती व समाजाचा जीवंतपणा अवलंबून आहे. भारतावर आक्रमण करणार्या बाबर-अकबर आणि व्यापाराच्या नावाने आलेल्या इंग्रज, पोर्तूगीज, डच इत्यादी युरोपियन साम्राज्यवादींच्या तसेच लिबरल नावाचे पाघंरूण घेऊन आपल्याला आर्थिक गुलामीत टाकू इच्छिणार्या माओ, मार्क्स, लेनीन यांच्या वंशजावर वा शिष्यांवर आपली संस्कृती अवलंबून नाही.

सभ्यता किंवा नागर सुधारणा काही प्रमाणात संमिश्र आहे पण ती साधनमात्र आहे. इलेक्ट्रीक बल्ब आपण वापरतो पण घरातल्या देवघरात निरंजनच वापरतो की ! कारण निरंजनाच्या शीतल प्रकाशात देवाच्या मुर्तीचे दर्शन घेताना एक वेगळं वातावरण तयार झालेले असते. शेवटी देवघरातली निरांजन हे नैतिक मुल्यांवर आधारीत असलेल्या आपल्या सांस्कृतिक प्रतिकापैकी एक प्रतिक आहे. दिवा म्हणजे ज्योत तेल आणि वात यांचा समन्वय. म्हणजेच ज्ञानयोग, भक्तीयोग, आणि कर्मयोग यांच्या मधील समन्वयाचे स्वरूप आहे. नैतिक मूल्यें ढासळली की ऐहीक प्रगती ढासळते.

आपल्या देशाचा भौतिक विकास आपल्या नैतीक जीवनमुल्यां च्या आधाराने होऊ शकतो याची प्रचिती केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर आपल्यालाच नव्हे तर जगातील बहुतांश देशांना आली आहे. त्यातील काही देशांना पोटदुखी सुरू झाली आहे. म्हणूनच काही विदेशी शक्ती भारतात मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये यासाठी कार्यरत झाल्या आहेत. परंतु पंतप्रधान मोदींच्या सभांना सर्व राज्यातील देशबांधवांचा जो प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे त्यातून मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येईल असे दिसत आहे.

डॉ. शरदजी पुढे म्हणतात " वैचारिक गोंधळ कसे होते, याचे उदाहरण द्यायचे तर ' इंडियन नॅशनॅलिझम ' या शब्दाचेच घेता येईल. इंडियन नॅशनॅलिझम या शब्दाचे व्याकरणशुद्ध सरळ भाषांतर हिंदू राष्ट्रवाद असे होते. इंडिया हा शब्द इंडस, सिंधू, हिंदू या शब्दांचे नाते दर्शवीतो. 'भारत' या विशेषनामाशी नाही.' हिंदु,' हा शब्द संकुचिततेचे प्रतीक, व ' भारत ' हा शब्द सर्वधर्मसमभावाचे प्रतीक अशी कल्पना रूढ झाली. आज ही ती काही प्रमाणात आहे."

अशाच प्रकारचे भाष्य व्यवहारीक उदाहरण देऊन अमृतपथ याच ग्रंथात पृष्ठ क्रमांक २७ वर ' संघकार्याचा समाजव्यापी परिणाम ' या शिर्षकाचं संघाचे जेष्ठ नेते रंगा हरीजींशी झालेल्या चर्चेच्या शब्दांकनात वाचावयास मिळते. रंगा हरीजींशी झालेल्या चर्चेचे शब्दांकन अमृतपथ या ग्रंथाचे संपादक पद्मश्री रमेश पंतगे यांनी केले आहे. रंगा हरीजी यांनी काय म्हटले हे आपण आता पाहू या.

" दिल्लीत वकिलांचे एकत्रीकरण झाले होते. एका वकिलांने मला प्रश्न विचारला," हिंदू या शब्दाबाबत आपण एवढे आग्रही का आहात ?" यावर रंगा हरीजी म्हणाले, " रामायणात सीता शब्दाऐवजी मैथिली व जानकी या शब्दाचा ही वापर झालेला आढळतो. तिन्ही शब्द तसे समानार्थी आहेत. पण आपण मैथिली नगरात सीता दर्शनासाठी गेलो तर आपल्याला आढळेल की मैथिली हे तेथील लोकांच्या दृष्टीने सामान्यनाम आहे. मैथिली नगरातील याच्चयावत स्त्रियांना' मैथिली ' असे संबोधिले जाते. आपण मैथिलीचे दर्शन हवे असे न म्हणता जानकीचे दर्शन हवे असे म्हटले तर लोक आपल्याला जनक राजाच्या राजवाड्यात घेऊन जातील. आपण जनक राजाच्या राजवाड्यात गेलो तर आढळते कि जनकाच्या चार ही कन्यांना ' जानकी ' या सामान्यनामाने संबोधिले जाते. त्यातील सीतेला पाहावयाचे असेल तर सीता याच नावाचा आधार घ्यावा लागतो. कारण तेच खरे विशेषनाम आहे. सीता ही Focussed Identiy आहे. त्याच प्रमाणे आपण केवळ भारतीय व भारत असे म्हटले तर आपली विशेष ओळख होत नाही. "

रंगा हरीजी पुढे म्हणतात, " भारत ही Geograhical Identity आहे. येथील विभिन्न समाजातील लोकांना सामावून घेऊन भारतिय ही संज्ञा बनलेली आहे, ज्यात हिंदू , मुस्लिम , ख्रिश्चन इत्यादी सर्वांचा समावेश होतो ; पण भारतीय संस्कृती ही मुस्लिम संस्कृती आहे का? ख्रिश्चन संस्कृती आहे का? नाही ; तर भारतीय संस्कृती म्हणजेच हिंदू संस्कृती होय. म्हणून हिंदू हा शब्द Focussed Identity आहे, आणि त्याची स्विकारार्हता वाढत जात आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाला पश्चातबुद्धी झाली आणि त्याने आम्ही हिंदुत्वाच्या विरोधी नाही असा ठराव केला.

                                      क्रमशः-

                                               (सोबत भाग-४ खाली जोडला आहे )

 -------------------------------------------  लोकसभा निवडणूका-२०२४        इंडी आघाडीच्या प्रचाराचं स्वरूप  मुस्लीम समाजाचं तुष्टीकरण आणि    हिंदू हिताकडे दुर्लक्ष (भाग-४)


आम्ही हिंदुत्वाच्या विरोधी नाही असा ठराव काँग्रेसने केला खरा, पण सोबत आमचे हिंदूत्व भाजपा पेक्षा वेगळे आहे असे म्हणत आम्ही ' भाजपा सारखे अल्पसंख्यांकाच्या विरोधी नाही ' अशी पिढीजात भूमिका घेऊन पुन्हा ही मंडळी आपल्या मूळ मार्गावरच गेली आहे. जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही हेच खरें ! उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन संस्कृती संबंधीत केलेल्या वक्तव्याचा निषेध इंडी आघाडीतील पक्षांच्या एका ही नेत्याने केला नाही. यावरून ही मंडळीं विदेशी शक्तीच्या किती आधीन झाली आहे हे कळते. धर्मांध मुस्लिमांच्या वा ख्रिस्ती मिशनर्यांच्या हिंदू विरोधी भुमिकांचे खंडन न करता आपला जूना लांगूनचालनाचा कार्यक्रम काँग्रेसप्रणित इंडी आघाडीतील सर्वच पक्ष राबवीत आहेत. बहुतांश भाजपेतर पक्षांची हिंदू हिताकडे दुर्लक्ष करण्याची सवय हाच निवडणूकातला मुख्य मुद्दा होऊ लागलेला दिसत आहे.

माझ्या माहिती प्रमाणे आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्यापैकी एखादा धार्मिक समूह ५ टक्या पेक्षा कमी असेल त्यालाच अल्पसंख्यांक मानले जाते. भारतातल्या मुस्लीम समाजाची एकूण संख्या पाहता तो समाज सेकंड मेजाॅरिटी ठरतो. इतकेच नव्हे तर आपल्या देशातील मुस्लीम व ख्रिस्ती राजवटीच्या अगोदर जे कोणी राहात आहेत ते एका परिने सर्व हिदूंच आहेत. कारण मुस्लीम व ख्रिस्ती आक्रमकांनी ज्या हिंदूचे जबरदस्तीने धर्मांतर केले, अशा सर्वांच्या अनेक पिढ्यां येथेच जन्मल्या आहेत आणि येथेच वाढल्या, आणि या पुढेही जन्मतील, आणि वाढत जाणार आहेत. त्यांची फक्त उपासना पद्धत बदलली हे सत्य आहे. त्याबद्दल कोणा ही हिंदूचा आक्षेप नाही. पण वख्त बोर्ड सारखी संस्था काय करतेय

दिसली सरकारी जमीन             रात्री-अपरात्री केली काबीज |      लावला फलक वख्त बोर्डचा     करतेय बिन भांडवलीचा धंदा ||

दुसर्या टोकाला ख्रिस्ती मिशनर्यांचा सेवेच्या नावाखाली गरीब आदिवासी हिंदूना फसवून त्यांचे धर्मांतर करण्याचा धंदा आज ही चालू आहे. असले प्रकार पाहून हिंदू समाज नाराज होणे हे ही स्वाभाविक आहे. हिंदु हिताकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण काँग्रेसला महाग पडेल असे काँग्रेसचे जेष्ठ नेते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगिळांनी सन १९९७-९८ दरम्यान जाहीर रित्या सांगितले होते. त्यांचे ते वक्तव्य दैनिक म. टा. वृत्तपत्रात वाचल्याचे मला आठवते. याचे कारण बॅ विठ्ठलराव गाडगिळांच्या त्या वक्तव्यावर ' सर्वधर्म समभाव व राजकीय पक्षांचा व्यवहार ' या शिर्षकांचा माझा लेख दुसर्या आठवड्यात दैनिक लोकसत्ताने छापला होता. काँग्रेसच्या श्रेष्ठींना विशेषतः राजीव गांधीच्या कारकिर्दी पासून अभ्यासक व विचारवंत काँग्रेसी नेत्यांची ॲलर्जी सुरू झाली. पुढे ती सोनीया - राहूल गांधीच्या काळात भौमितिक गतीने वाढत गेली. त्यामूळेच काँग्रेस कमकूवत होत गेली.

आपल्या देशात जबरदस्तीने ज्यांचे धर्मांतर झाले आहे अशा मुस्लीम समाजातील वर्गाची आणि ख्रिस्ती समाजातील वर्गाची टक्केवारी जवळपास ९५ टक्के असावी. अशांना अल्पसंखाकांचा दर्जा देऊ नये असे मला वाटते. अशांना उगीच हिंदू समाजाची भिती दाखविण्याचे प्रकार केवळ आपली मतपेटी तयार करणे हा विरोधी पक्षांचा धंदा होऊन बसला आहे. आपल्या देशात आश्रयाला आलेली पारशी व ज्यू मंडळी सुखासमाधाने राहात आहे ना ! शक हूण असे आक्रमक लोक ही आपल्या भारतीय संस्कृतीत समरस झाले आहेत ना ! मग मुस्लीमांचे सरकार तर्फे खास लाड हवेत कशाला? देशविभाजन झाल्यावर जर धर्माच्या आधारावर एका भागास पाकिस्तान मांनण्यात आले तर दुसर्या भागास हिंदुस्थान का मानण्यात आले नाही, लोकसंख्येची अदलाबदल सर्वत्र का केली नाही असे प्रश्न असंख्य नवमतदार आज विचारत असतात. याकडे ना इंडी आघाडीतील पक्ष लक्ष देत आहेत ना लिबरल पत्रकार व संपादक मंडळी लक्ष देत आहेत. ही मंडळी आजही हटवादीपणाने मुस्लीम समाजाचे लांगूनचालन करीत असतात.

श्री रंगा हरीजींनी, आपल्या देशात      ' भारत व भारतीय ' हे शब्द सर्वधर्मसमभावी या अर्थाने मानण्याची जी वृत्ती जपली आहे, त्यावरील प्रतिक्रीया म्हणून ' जग आपल्याला हिंदू म्हणून ओळखते, हे सत्य मुलाखतीत मांडले आहे. ते त्यांच्यात शब्दात खाली मांडून या भागाच्या शेवट करतो आहे.

" भारतात असे वातावरण असले तरी जगात कूठेही असे वातावरण नाही. जागतिक स्तरावर 'भारत' 'भारतीयत्व' या संकल्पना स्पष्ट होत नाहीत. तिथे सर्वत्र ' हिंदू ' शब्दानेच आपली खरी ओळख (identity ) होते. त्यामूळे हिंदू कल्चर, हिंदू पिपल्स, हिंदू फिलाॅसाॅफी, हिंदू इथाॅस या शब्दानींच भारताची खरी ओळख विदेशातील लोकांना समजते. "

जगभर भारतियांची हिंदू अशी ओळख आहे, तशाच प्रकारची भारतातल्या मुस्लीम बांधवाची मुस्लीम जगतात ' इंडीयन मुस्लीम ' अशी ओळख आहे हे ही माझ्या वाचनात आले आहे. एकदा जागतिक मुस्लीम ब्रदरहूड ची एका मुस्लीम देशात परिषद होती. त्या परिषदेत उपस्थित होण्यासाठी इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये मंत्री असलेले काँग्रेसचे नेते फकरूद्दीन अली अहमद (जे पुढे आपल्या देशाचे राष्ट्रपती झाले) तिथे आमंत्रणा शिवाय त्या परिषदेत उपस्थित होण्यासाठी गेले होते. त्यांना तिथे भारतिय मुस्लीम असे संबोधून प्रवेश दिला नव्हता. अशी बातमी वर्तमानपत्रातून वाचल्याचे मला आज ही आठवते आहे.

मी वरील घटना नमूद केली याचे कारण आपल्या येथील अल्पसंख्यांक मग ते मुस्लीम असो वा ख्रिस्ती यांचा दर्जा त्या धर्मीय जगतात हवा तसा सन्मानकारक नसेल तर त्या समाजाने ही भारतभूमी आमची जन्मभूमी आहे हे लक्षात घेऊन आपल्याकडे मतपेटी म्हणून बघणार्या पक्षांच्या प्रलोभनाला भूलून जाऊ नये. हाच खरा राजकीय व्यवस्थेतील धृवीकरणावरला एकमेव उपाय आहे, असे मला वाटते. इथे मी हा उपाय कुठल्याही राजकीय पक्षाचा तोटा व्हावा म्हणून मांडलेला नाही तसेच देशातला सारा मुस्लीम समाज व सारा ख्रिस्ती समाज राजकीय प्रलोभनास बळी पडतो असे ही मी मानत नाही. आपल्या देशात काही ठिकाणी बहुसंख्याक हिंदू समाज आणि धर्मातंरीत झालेले मुस्लीम व ख्रिस्ती बांधव गुण्यागोविंदाने राहात आहेत, सुखदुःखात परस्पर मदत ही करीत असतात. हे मी अनुभवत आहे. पण त्या अनुभवात आता घट होत आहे. याचे कारण ढोंगी लिबरल पत्रकार व संपादक मंडळींचा हिंदू संघटनांवर गोबेल्स तंत्रानुसार जहरी टिका करण्याच्या हटवादीपणा हे आहे.                         क्रमशः --

(विशेष सुचना - या लेख मालिकेचे भाग ५ व ६ स्वतंत्र पणे खाली आहे.)

लोकसभा निवडणूका-२०२४ इंडी आघाडीच्या प्रचाराचं स्वरूप मुस्लीम समाजाचं तुष्टीकरण व हिंदू हिताकडे दुर्लक्ष ! (भाग-१ व २ )

मागील लेखमालिकेत आपल्या  देशातील राजकारणाचे मूळ आपण शोधण्याचा प्रयत्न केला होता.  निवडणूकांच्या प्रचाराची धामाधूम सुरू होती. म्हणून मी त्या मालिकेचे शिर्षक ' इस बार चारसौ पार ' बनाम मोदी सरकार हटाव ' असे ठेवले. यातील पहिला नारा भाजपाचा तर दुसरा नारा विरोधी पक्षांचा म्हणजे इंडी आघाडीचा होता. या शिर्षकातून अर्वाचीन भारताच्या राजकारणाचे मूळ शोधण्याची प्रेरणा मला मिळाली होती. याचे कारण आपल्या येथील राजकारणाचा केंद्रबिंदू स्वातंत्र्यापुर्वी  ' देशाच्या इतिहासात केलेली दिशाभूल ' हाच  होता व आजही तोच आहे. हे अलिकडे काॅग्रेसचे नेते राहूल गांधी यांचे गुरू सॅम पित्रोदाच्या वक्तव्यातून सिद्ध झाले आहे. 

निवडणूकाचा प्रचार शिगेला पोहचत असताना आपला भारत देश कधी अस्तीत्वात नव्हता असे म्हणत भारतीय लोकांचे  रूप, वर्ण, रंग, व भाषा यावर सॅम पित्रोदाने शेलक्या मारल्या आहेत. एक प्रकारे आपल्या देशात विविधतेतून असलेल्या एकतेवर सॅम पित्रोदाने हल्ला केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेतून कठोर शब्दातून सॅम पित्रोदांचा समाचार घेतला हे बरे झाले. शेवटी पित्रोदानी आपल्या पदाचा राजीनामा दिला, तो काॅग्रेस अध्यक्ष खडगे यांनी स्विकारला. यात काय मोठे तीर काॅग्रेसने मारले? सॅम पित्रोदा हे राजीव गांधी चे मित्र. ते गांधी फॅमिली सोबत सतत असणारच. 

मूळ प्रश्न असा आहे की राहूल गांधीना राजकारणाचे धडे गिरवायला भारतातील कोणी मार्गदर्शक दिसलाच नाही काय? हा प्रश्न लिबरल पत्रकार मंडळी आपल्या लाडक्या राहूलबाबू यांना लिबरल पत्रकार व संपादक महाशय विचारण्याचे धाडस करणार आहेत का? उत्तर ' नाही ' असेच असणार. म्हणूनच राहूल गांधीच्या ब्रिटीश नागरिकत्वा संबंधी जे ऐकू येते ते खरे असावे असे आता वाटू लागले आहे. 

केंद्रातील मोदी सरकार उलथुन पाडावे किंवा २०२४ च्या निवडणूकांत पराभूत करावे असा कट आंतरराष्ट्रीय स्तरावर रचला आहे . हा कट जागतिक लिबरल मंडळीने(अधिकतर साम्यवादी) रचला आहे.  त्यांना काही धर्मांध मुस्लीम लाॅबी आणि धर्मांध ख्रिस्ती लाॅबीचे सहाय्य असावे असे मला वाटते. म्हणूनच आपल्या शिष्याची डाळ काही शिजत नाही असे दिसल्यामूळे सॅम पित्रोदांनी जाणून बुजून भारत, भारताचा इतिहास आणि भारतियांचे रूप, रंग, भाषा इत्यादी सार्या गोष्टी आर्यन इन्वेशन थेअरीच्या साह्याने पुन्हा चर्चेत आणले आहे. पण त्यातून इंडी आघाडीला फायदा होणार नाही.

जगातील धर्मांध मुस्लीम लाॅबी व धर्मांध ख्रिस्ती लाॅबी तसेच देव-धर्म न मानणारे साम्यवादी विचारवंत मंडळी आपल्या सनातन संस्कृतीचा आणि वैभवशाली प्रचीन इतिहासाचा पराकोटीचा द्वेश करीत असतात. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात भारताची होत असलेली प्रगती पाहून अस्थिर झालेल्या वरील तीन लाॅब्यांच्या बाॅस मंडळीचा थयथयाट व द्वेष सॅम पित्रोंदाच्या मुखातून बाहेर पडला आहे. उठसूठ मोदी सरकारवर टिका करताना आम्ही वाघ, आम्ही जाणता राजा, मोदी फक्त एक चायवाला, चौकीदार चोर हैं,  सनातन संस्कृती म्हणजे डेंग्यू, भारत तेरे टुकडे करेंगे, अशा प्रतिज्ञा करणार्या इंडी आघाडीतील एक ही  मायेचा लाल सॅम पित्रोदांचा साधा निषेध नोदण्यासाठी पुढे आला नाही? लिबरल मंडळीची लाडकी ती बंगालची वाघिण ममता बॅनर्जींनी सुद्धा सॅम पित्रोदाचा निषेध केला नाही ? हे काय देश सांभाळणार ? हे काय देशाला आत्मनिर्भर करणार? हे काय देशाचा विकास करणार? हे काय युनोमध्ये स्वाभिमाने व धाडसाने भारताची भूमिका मांडणार?   

सॅम पित्रोदांनी नंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला व तो काॅग्रेस अध्यक्ष खडगेनी स्विकारल्याचे जाहीर केले. हे सारे नाटक असावे किंवा ओपिनियन पोलचे आकडे पाहून पुन्हा एकदा हिंदु समाजाची जाती-जमातीत विभागणी करण्याच्या स्ट्रॅटेजीचा भाग असावा. हा अंदाज मी मांडला आहे. याचे कारण राहूल गांधींनी अगोदरच ठरल्याप्रमाणे, अल्पसंख्याक विशेषतः मुस्लीम बांधवाना मालमत्ता तसेच धार्मीक सवलती चा वर्षाव जाहीर सभेतून केलेला होता. सोबत जाती-जमातींना गोंजरण्याचे काम इंडी आघाडीतले पक्ष करीतच आहेत.

काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात आपल्या सवयी आणि सोयीनूसार अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लीम समाजाला अनेक सवलतीं देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसला साम्यवादी मंडळींनी इतकी भूरळ घातलेली दिसते की गेल्या दोन लोकसभा निवडणूकात काँग्रेसचा दारूण पराभव का झाला आहे यावर विचारमंथन करण्याची काँग्रेस श्रेष्ठींना तसदी घ्यावीसी वाटत नाही. आज त्याच साम्यवादी मंडळींनी केरळमध्ये राहूल गांधीच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे. याचा अर्थ असा आहे की इंडी आघाडीतील घटक पक्ष संधीसाधू आहेत. महाराष्ट्रात मविआ मध्ये उबाठा शिवसेनाने मवीआ घटक पक्षांशी चर्चा न करता आपले उमेदवार घोषीत केले आहेत. 

कुठल्या तरी एका चॅनेल्सवर विद्यमान इंडी आघाडी आणि सन १९७७ च्या लोकसभेच्या निवडणूकात विरोधी पक्षांनी केलेल्या आघाडी वर  तौलानिक चर्चा ऐकली. या बाबतीत जे चॅनेल्स वरून सांगितले गेले नाही ते आपल्या समोर मांडतो आहे.   

सन १९७७ ला तत्कालीन विरोधी पक्षांपैकी संघटना काॅग्रेस, भारतीय जनसंघ, लोकदल आणि समाजवादी पक्ष या पक्षांनी आपआपले पक्ष विसर्जीत करून जनता पक्ष स्थापन केला होता. जनता पक्षाला मार्गदर्शक म्हणून थोर समाजवादी नेते जयप्रकाश नारायण होते. म्हणून जनता पक्ष विजयी झाला होता. सध्याच्या इंडी आघाडीकडे नेतृत्व नाही, मार्गदर्शक नाही. काही ठिकाणी घटक पक्ष स्वतंत्र रित्या लढत आहेत. तर काही विरोधी पक्ष इंडी आघाडीत सामील झालेले नाहीत. मूळ फरक हा आहे की जनता पक्षाचे मार्गदर्शक देशी होते तर इंडी आघाडीचे मार्गदर्शक विदेशी. 

(लेख मालिकेचा भाग -२ सोबत आहे)                         

                                        क्रमशः-

-------------------------------------------- 


लोकसभा निवडणूका - २०२४          इंडी आघाडीच्या प्रचाराचं स्वरूप अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण आणि हिंदू हिताकडे दुर्लक्ष (भाग-२)


सन २०१४ पासून भाजपाच्या प्रगतीचा चढत्या आलेखाचे विश्लेषण केले तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक राज्यात मतदार जागृत होत आहेत. बहुतांश न्यूज चॅनेल्सचे ओपिनियन पोल हेच दाखवित आहेत. बंगाल, पंजाब, तामीळनाडू, केरळ, आणि तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोंना मतदारांचा दिसणार्या प्रचंड प्रतिसादातून तेथील मतदार विरोधी पक्षांना सांगत आहेत, की 'आम्हांला आता एकजिनसी समाज म्हणून राहावयाचे आहे आणि विकास साधावयाचा आहे. तुमची फोडा आणि झोडा ही निती यापुढे चालणार नाही.'

देशात सर्वत्र साम्यवादी व समाजवादी पक्षांचे नामोनिशाण मिटण्याच्या मार्गावर आहे, तरी त्यांचा पीळ काही जात नाही. आता तर त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. याचे आश्चर्य ही वाटत नाही. कारण स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधीजींना ही काँग्रेस बाबत भ्रमनिरास होऊ लागला होता आणि त्यातूनच त्यांनी काँग्रेस विसर्जीत करण्याचा सल्ला दिला होता. 

तसाच काहिसा भ्रमनिरास भूतपुर्व साम्यवादी आणि समाजवादी नेत्यांना ही आपआपल्या पक्षांबाबत स्वातंत्र्यानंतर झाला होता. त्यां नेत्यांनी आपले हातचे काही ही न राखता स्पष्टपणे झालेला भ्रमनिरास मांडलेला आहे. त्यातील काही नेत्यांचे म्हणणे साप्ताहीक विवेक (हिंदूस्थान प्रकाशन संस्था) च्या अमृतपथ या ग्रंथात डॉ. शरद हेबाळकरांनी लिहलेल्या ' संघ व सामाजिक परिवर्तन ' या शिर्षकाच्या लेखात मी वाचले आहे. ते आपल्या समोर ठेवतो आहे. प्रथम सी अच्यूत मेनन काय म्हणाले आहेत ते मी आपल्या समोर ठेवतो.

सी. अच्युत मेनन हे भारतीय साम्यवादी पक्षाचे नेते होते. काही वर्षे ते केरळचे मुख्यमंत्री होते. धर्म, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्र या संबंधी सन १९८४ च्या एका लेखात त्यांनी म्हटले आहे,

" It appears that one factor which helped this cultural unity was the Hindu faith. I do not say the Hindu religon. The reason for it is that Hindu religon is not a religion in it's ordinary meaning. Another reason is that i include Buddhist, and Jain faiths also within the bounds of Hindu faith." ("असे दिसते की, सांस्कृतिक एकता टिकविण्यात हिंदू जीवनश्रद्धा या घटकाची मदत झाली आहे. मी हिंदू धर्म या अर्थाने असे म्हणत नाही. कारण सर्वसामान्य रिलिजन या अर्थाने ' हिंदू धर्म ' हा रिलिजन नाही. दुसरे कारण असे की बौद्ध आणि जैन पंथाचा समावेश मी हिंदू जीवन-श्रद्धांच्या अंतर्गत करतो ")

या लेखात अच्युतजींनी आद्य शंकराचार्याच्या चार दिशांना चार पीठांची स्थापना करून केलेल्या दिग्विजय यात्रेचा गौरव केला आहे. त्यांच्या या कार्याला अच्युतजींनी भारताच्या ऐक्याचे प्रतिक म्हटले आहे. इतकेच नव्हे तर शेवटी ते लिहीतात, ' Indian Nationlism is a reality ' (भारतीय राष्ट्रीयत्व ही वास्तविकता आहे ')

भारत या नावाचा देश कधी अस्तित्वात नव्हता असे म्हणणार्या साम्यवादी व समाजवादी पक्षांच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना सी अच्यूत मेनन यांनी हा घरचा अहेर कधीच दिलेला आहे. तरी विद्यमान काँग्रेस, साम्यवादी व समाजवादी नेते मंडळी विदेशी लिबरल लाॅबीचा नाद सोडत नाहीत. मागे आपल्या देशातील एका ख्रिस्ती धर्मगुरूने नव्या वर्षाचे स्वागत करताना राष्ट्रवादी सरकाराचा पराभव करा असे जनतेला आवाहन केले होते. त्यावर ' ख्रिस्ती धर्मगुरू की विरोधी पक्षांचा दलाल? ' शिर्षकाचा लेख मी पब्लीश केला आहे. 

मोदी सरकार पराभूत करण्यासाठी जागतिक लिबरल मंडळीने एक आंतरराष्ट्रीय कट रचला आहे.  त्या जागतिक लिबरल मंडळी सोबत एक जिहादी लाॅबी आणि एक ख्रिस्ती लाॅबी ही असावी असे मला वाटते. त्या ख्रिस्ती लाॅबीतले सॅम पित्रोदा एक प्यादी असावेत. 

जगातील दोन एकेश्वरी (मुस्लीम व ख्रिस्ती) धर्माची शिकवण, व प्रसार करण्याची पद्धती या संबंधीत एक स्वतंत्र लेख लिहण्याचे मी ठरविले आहे. त्यात आपल्या संविधानातले कलम २५ चा अर्थ काय आहे, याबाबत न्यायालयासमोर ख्रिस्ती संस्थेने दाखल केलेल्या याचिकांवर धर्मांतर, धर्म प्रचार व धर्माचे आचरण याची स्पष्ट माहिती विषद करून न्यायालयाने याचिकांकर्त्यावर ताशोरे मारत जो निकाल दिला आहे, त्याची ही माहिती त्या लेखात असेल. ही सारी माहिती प्राध्यापक जी सी असनानी (एम. एस. सी., पी एच डी) (राष्ट्रसंघ निवृत्त) यांनी लिहलेल्या 'अपील टु हिन्दु साधूज ' या शिर्षकाची छोट्या पुस्तिकाची मराठीतली आवृत्ती ' हिंदू जनतेला आवाहन ' या पुस्तिकात सविस्तर आहे.

प्राध्यापक असनानींनी अत्यंत आनंदाने त्यांच्या पुस्तिकेच्या भाषांतराचे व प्रकाशनाचे सर्व अधिकार विनामूल्य प्रकाशक श्री वसंत वि आपटे (सरोज प्रकाशन) यांना दिले. भाषांतरकार आहेत श्री स.सी.आपटे व श्री ना.रा. खंडकर. ही पुस्तिका सर्वांनी आवर्जून वाचण्यासारखी आहे. माझ्या लेखाला मर्यादा असणार म्हणून हिंदू संघटनेच्या तमाम कार्यकर्त्यांनी ही पुस्तिका खरेदी करून वाचून हिंदू समाज बांधवांत जागृती निर्माण करण्याची अंत्यत जरूरीचे आहे. कारण साम्यवादी मंडळी असो वा धर्मांध ख्रिस्ती व धर्मांध मुस्लीम असो यांचे ध्येय, धर्म, व कर्म हिंदू संस्कृतीचा बिमोड करण्याचा आहे.   

                                     क्रमशः -

---------------------------------------------

आपण व आपले उत्सव--मातृदिन (भाग १)

आपण व आपले उत्सव-- मातृदिन   देवीयों और सज्जनो नमस्कार ! हमारी मातृभूमी को देव-देवताओंकी भूमी माना जाता है | इसका कारन हमारे यहाँ सृष्टी हर ...