सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

गीतरामायण ऐकताना - भाग ३



गीत रामायण हे आधुनिक साहित्य सृष्टीतील नक्षत्राचे लेणे आहे. गीत रामायणाची ख्याती अशी आहे की केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर प्रांतात ही आपआपल्या भाषात अनुवादाच्या रूपाने गावोगावी प्रयोग होत असतात.निवडक ' गीत रामायणाचे ' नोटेशन च्या पुस्तकाचे लेखक अशोक सहस्त्रबुद्धे म्हणतात,  " नोटेशन्स बनविणे हे सर्वसाधारणतः कठीण -किचकट व कंटाळवणे आहे. आणि त्यात गीतरामायणाचे नोटेशन्स बनविणे म्हणजे साक्षात शिवधनुष्य उचलण्यासारखे ! पण सदाबहार गीतरामायणाची जादूच न्यारी ! २०  ऑक्टोबरला काम सुरू केले आणि व न कंटाळता केवळ २ महिन्यात २० डिसेंबरला हस्तलिखीत संपविले. या दोन महिन्यात मी राममय झालो, अनेक दिव्य अनुभव आले. यावरून गदिमा व बाबुजींना ५० वर्षापुर्वी किती दैवी-दिव्य अनुभव आले असतील याची कल्पना यावी." अशोकजी सहस्त्रबुद्धे यांनी ग दि मा व बाबूजींच्या कलेची केलेली प्रशंसा समोर ठेवली, याचे कारण माझ्या हातून ' लहान तोंडी मोठा घास ' घेण्याचा प्रमाद होऊ नये. हे आपणास उमगले असावे.  

शब्दसम्राट कै ग दि मा आणि स्वरसम्राट बाबूजी म्हणजे कै सुधीर फडके या दोन मराठीचीये नगरीतील आधुनिक ऋषींनी आपल्या प्रखर तपश्चर्येने गीतरामायण रूपी मंगलमय गंगा मराठी भाषेतून प्रवाहीत केली. गीत रामायणाचे कार्यक्रम पुन्हा पुन्हा प्रत्यक्ष ज्यांनी पाहीले आहेत अशी बुजूर्ग मंडळी शरीराने आज थकली आहे, तरीही आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात अधून मधून यु ट्युब वरून गीत रामायणाचे लाईव्ह कार्यक्रम पाहात असतात. मराठी युवक-युवतींना सुद्धा गीत रामायणाने भारावून टाकले आहे. प्रत्येक पिढीला गीत रामायणाने आपल्या कवेत घेतले आहे. ग दि मा च्या भाषेत सांगावयांचे तर --
" छंद जाणतेपणीचा तिर्थे काव्याची धुंडिली | कोण्या एका भाग्य वेळी पुजा रामाची मांडिली || देव वाणीतले ओज शितळले माझ्या ओळी | वाल्मिकींच्या भास्कराचे चांदणे झाली मराठी || " 

श्रीरामजन्मभूमीच्या मालकी संबंधित न्यायालयीन खटल्याची सुनावणी होऊन अयोध्येत  श्रीरामाचे मंदिरच होते असा देशातील सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर रितसर रामज्नमभूमी न्यासाची स्थापना झाली. श्रीरामजन्मभूमी मंदिराचे बांधकाम सुरू झाले आणि ते बहुतांशी पुर्णात्वात जात आहे. 

रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापनाची तारीख जाहीर झाल्यानंतर देशातल्या कानाकोपर्यातील चावडी, चौक चहाच्या टपरी, ग्रामदेवतेच्या मंदिर, शहारातील वाचनालय, मंदिरे अशा सार्वजनिक ठीकाणी लोक रामजन्मभूमी मुक्ती साठी झालेल्या लढाया, त्यातून देशबांधवाचे झालेले बलिदान, न्यायालयीन लढाई इत्यादी विषयावर होत असलेल्या चर्चा पाहिल्या. रामजन्मभूमी मुक्तीचा संपुर्ण इतिहास मिडीयातून पाहीला. फक्त ' रामजन्मभूमीचाच आग्रह का या संबंधीत जनसामान्यांच्या मनात उद्भवलेल्या शंका-कुशंका, प्रिन्ट इलेक्ट्राॅनिक्स व सोशल मिडीयातून  धर्मशास्त्र व अध्यात्म, इतिहास व पुरातत्व, न्यायव्यवस्था, राजव्यवस्था आणि संशोधकीय व्यवस्था इत्यादी क्षेत्रातील अभ्यासकांच्या चर्चेतून बहुतांशी दूर झाल्या आहेत. 

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनाचा मुहूर्त जसा जवळ येत गेला तसा संपूर्ण देश राममय होत गेला. देशभरातील  सार्वजनिक ठिकाणी भजने, किर्तने, शोभा यात्रा, गीत रामायण, रामचरीत मानस, हनुमान चालिसा असे सांस्कृतिक कार्यक्रम होत गेले. शाळा-काॅलेजात राम सप्ताह साजरे होत गेले. कथाकथन, निबंध स्पर्धा, चित्रकला, वकृत्व, रांगोळ्या इत्यादी स्पर्धा कार्यक्रम झाले. देशभरातील रस्ते, घरें, दूकानें, इमारती, सायकली, रिक्षा, स्कूटर, मोटार- सायकली, टांगे, मोटारी, टेम्पों, इत्यादी वाहनांवर  श्रीरामाच्या प्रतिमा असलेल्या भगव्या रंगाच्या भव्य  कटऑट्स, श्रीरामाच्या प्रतिमा असलेले भगव्या रंगाचे ध्वज फडकत असलेले आपण पाहिले. गावें, तालुका व जिल्हे, नगर- उपनगरें मोठी शहरें सर्वत्र रामजन्मभूमी अक्षत निमंत्रणे व श्रीरामजन्मभूमी मंदिराचे प्रतिमाचे वितरण होताना दिसले. संपुर्ण देश राममय झाल्यामुळे एक सामान्य भाविक म्हणून मी अशा कार्यक्रमात सामील झालो. निर्मळ तीर्थक्षेत्री झालेला गीतरामायण कार्यक्रम हा त्यापैकीच एक आहे. 

रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ ला संध्याकाळी ७ वाजता आमच्या गावीं नालासोपारा (प) येथील श्रीक्षेत्र निर्मळ येथील शंकराचार्य समाधी मंदिराचे पटांगण गीत रामायणाच्या कार्यक्रमला आलेल्या रसिक श्रोत्यांनी तुडूंब भरले होते. सामवेद म्हणजे साम गायन. ऋग्वेदातल्या ज्या ऋचा गावयाच्या आहेत त्याचा संग्रह म्हणजे सामवेद ! ऋग्वेदात तीन स्वरांनी उगम झालेल्या संगीताचा प्रवास सामवेदात सप्त स्वराकडे पोहचतो असे मानले जाते.

मी गीतरामायणाचा आनंद प्रथमच घेत होतो असे नाही. पण या खेपेस माझे मन अधिक राममय झालेलं मला जाणवले. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा समारोहाची घोषणा झाल्यानंतरच्या वातावरणाचा हा परिणाम असावा. बरोबर संध्याकाळचे ७ वाजले. स्वर सामवेद संस्थेतर्फे संगीत प्रेमी भाविकांचे स्वागत झाले. माईक निवेदकाकडे आला. जमलेल्या श्रोत्यांची आतुरता शिगेला पोहचली.  पटांगणात आल्यापासून भाविकांची  आपसात होणारी थोडीशी कुजबूज संपली. पटांगणात पीनड्राॅप शांतता पसरली. लागलीच -- 
' श्रीऽऽऽ राऽऽऽम, श्रीऽऽऽ राऽऽऽम , 
श्री ऽऽऽ राऽऽऽम, स्वयें श्री राम प्रभू ऐकती ' कानीं ऐकू आले. गीत रामायण सुरू झाले. विणा व मृदंग अशा साहित्यांनी त्या सुंदर मुलांनी आपल्या कोमल व मधुर कंठानी ते काव्य गाण्यास आरंभ केला, तेव्हा प्रभू रामचंद्रांची व यज्ञमंडपातील सर्व सभाजनांची चित्तवृत्ती तल्लीन होऊन ती सभा चित्रासारखी चित्त झाली होती. 

तशीच निर्मळ या तिर्थक्षेत्रीच्या पटागंणात जमलेल्या भाविकांची सभा चित्रासारखी चित्त झाली. ती दोन छोटी बालके प्रत्यक्ष श्रीरामचंद्राची कुश, लव ही दोन मुलें. त्या कोवळ्या बालकांना ठाऊक नाही, की ते आपल्या पिताश्री समोरच त्यांचे चरीत्र गीत गात आहोत. प्रत्यक्ष देव-देवतांना डोईजड झालेल्या महान पराक्रमी राक्षस रावणाचा पराभव करून त्रैलोक्याचे अधिपती झालेल्या राजाधिराज प्रभू रामचंद्राना गीत गाणारी मूले आपली आहेत हे ठाऊक नाही. ही एखाद्या चित्रपटातील केवळ कल्पना नाही. त्रेता युगात भारतवर्षात प्रत्यक्षात घडलेली ही घटना आहे. 

माझे मन मलाच विचारू लागले,  'आपल्या बाळांच्या वाटेला जन्मतः राजमहाल ऐवजी आश्रम आला हे  प्रभू रामचंद्राना नंतर कळले असेल का? त्यावेळी त्यांना काय वाटले असेल? स्वतःहाचे बालपण राजमहालात गेले याचे त्यांना त्यावेळी स्मरण झाले असावे का, आणि स्मरण झाले असेल तर एक पिता म्हणून प्रभू रामचंद्राची त्याक्षणीं मनःस्थिती कशी झाली असेल, इत्यादी प्रश्न माझ्या मनात उद्भभवले.

अवतारी पुरूषांच्या चरित्राचा ज्यांनी सखोल अभ्यास केला आहे अशा महनीय व्यक्तींच्या प्रवचनातून, लेखांतून आणि पुस्तकातून माझ्या मनात उद्भलेल्या वरील प्रश्नांचे उत्तर मला गवसले ते असे आहे, 'अवतारी पुरूष स्थितप्रज्ञ असतात.' ते खरे ही आहे. स्थितप्रज्ञ या शब्दाची खरी ओळख ही झाली नाही असा मी एक सामान्यजनांपैकी एक, मग अनूभुती कोठून येणार? पण ---- 

अशा विभुतींनां ही नियतीशी पदोपदी टक्कर द्यावी लागली आहे, हे आपण सारे जाणतो. तरीही आपल्याला त्यांची चरित्रगाथा पुन्हा पुन्हा वाचावी, ऐकावी असे वाटते. या संबंधीतले कार्यक्रम मग ते चित्रपट असो वा नाटक, सिरीयल्स असो वा लोककला असो, किर्तन असो की प्रवचन असो, भजन असो वा संगीतमय निरूपण इत्यादींनी आपले मन, आपले कान तृप्त होतात. त्याच क्षणीं साहित्यकार, संगीतकार - गायक, कलाकार, दिग्दर्शक, निर्माता, किर्तनकार, प्रवचनकार,  इतिहास तज्ञ, आणि आयोजक इत्यादींची सुद्धा स्तुती आपल्या मुखातून आपोआप येत असते. त्यापैकी अग्रणी स्थानावर असलेली निर्मिती गीतरामायण होय.  

                                       क्रमशः- 
               जय श्रीराम !


मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

गीतरामायण ऐकताना - भाग २



महाभारतावर 'भारतीय युद्ध' आणि रामायणावर 'रामचरित्र' अशा दोन पुस्तकांचे लेखक कै चिंतामण वैद्य आपल्या श्रीरामचरित्र पुस्तकाच्या उपोद्धात म्हणतात,  'आर्यांच्या बुद्धिमत्तेच्या खाणीतून निघालेले रामायण हे एक अमूल्य रत्न आहे.' या पुस्तकात त्यांनी पदोपदी आर्य, आर्यवर्त असे शब्द वापरले आहेत. यातून चिंतामणजी आर्यन इन्व्हर्जन सिद्धान्त बिलकूल मानत नाहीत हे स्पष्ट दिसते. ते पुढे म्हणतात की 'काव्याची अंगे दोन, एक कवी व दुसरे काव्यात वर्णिलेला नायक. या दोन्ही अंगानी रामायणाची बरोबरी करणारा जगात दुसरा ग्रंथच नाही. रामचंद्र सारखा अलौकिक सामर्थ्याचा व उदात्त नीतिमत्तेचा पुरूष जगाच्या इतिहासात झाला नाही व वाल्मिकी सारखा प्रतिभा संपन्न व उच्च कल्पनाचा कवी आजपर्यंत जगात झाला नाही." 

श्रीरामाचे उदात्त व मनोहर चरीत्र म्हणजे संसारात मनुष्याने नीतीने कसे वागावे हे दाखविणारा एक निष्कलंक आरसा आहे. श्रीरामाचे नाव घेतल्यावर आपल्यासमोर सद्गुणांची मूर्ती उभी राहते. वाल्मीकी ऋषींनी एकदा नारद मुनींना विचारले "सर्वात उत्तम राजा साप्रंत कोण आहे?", तेव्हा नारदाने श्रीरामचंद्राचे नाव सांगितले. त्यावेळी नारदाने रामचंद्राचे जे वर्णन केले आहे ते असे आहे --

" इश्वाकु कुलातील रामचंद्राने आपणा स्वतःहास जिंकले असून आपल्या पराक्रमाने शुत्रूसही जिंकले आहे. तो नीतिमान, बुद्धिमान, धर्मज्ञ, व सत्यप्रिय आहे; त्याचे मन फार मोठे आहे. तो सज्जनांना उदार हस्ते आश्रय देणारा असून सर्वांवर त्याची समदृष्टी आहे. तो समुद्रासारखा गंभीर आहे; हिमालयासारखा धैर्याने निष्कंप आहे; अग्नी सारखा क्रोधाने तीव्र आहे; पृथ्वीसारखा क्षमाशील आहे; कुबेरासारखा उदार आहे व धर्मासारखा सत्यवादी आहे. "

यावत् स्थास्यन्ती गिरयः सरितश्च माहितले | तावद्रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यते ||
( अर्थ--  या भूतलावर पर्वत नद्या यांचे अस्तित्व आहे तो पर्यंत ही 
श्री रामायण कथा जनमानसात प्रचलीत राहील.) साक्षात ब्रह्मदेवाने आद्यकवी महर्षी वाल्मिकींना दिलेला हा अभिप्राय आहे. इतकेच नव्हे तर ब्रह्मदेवाने एक दिव्य वरदान दिले होते की, ' महान तपस्वी वाल्मिकीने रचलेल्या या महाकाव्यातील एक ही गोष्ट खोटी ठरणार नाही.'

वरील विवेचन हे संक्षिप्त आहे. तरीही त्यातून भारताचा इतिहास किती प्राचीन आहे हे आपल्या लक्षात येते. तसेच जगातील सर्वात आदर्श राजव्यवस्था म्हणजे रामराज्य आहे हे सिद्ध झाले आहे. विशेष हे की हे सत्य तत्कालीन आणि सांप्रत काळात राजकीय आणि इतिहासाच्या अभ्यासांनी स्विकारले आहे. या वरून आर्य दक्षिण रशियातून भारतात आले होते आणि भारत हा कधी देश नव्हताच असा इतिहास जो जर्मन विचारवंत मॅक्सम्युलर आणि ब्रिटीश राजवटीतील लार्ड मेकाॅले या जोडीने लिहीलेला आहे तो खोटा हे ही सिद्ध होते. आपण स्वातंत्र्या नंतर मॅक्सम्युलर व मेकाॅले यांनी लिहीलेला इतिहास शिकत गेलो. दुर्दैवाने आपण आज ही तोच प्रमाणभूत मानत आहोत. हे ही एक कारण होते, ज्यामूळे श्रीरामजन्मभूमी संबंधीत खटल्याच्या निकाल प्रदिर्घ काळ लोबंकळत राहिला.               

मेकाॅले आणि मॅक्सम्युलर या जोडीचा खोटारडेपणा  श्री अभिजित जोग यांनी आपल्या 'अ सत्यमेव जयते ...? ' (भारताच्या इतिहासातील दिशाभूल) या पुस्तकात सविस्तर पणे उघडा केला आहे. या पुस्तकात त्यांनी मोहोंजोदारो व हरप्पा येथे इ स १९२५ ला करण्यात आलेल्या उत्खनातून प्राचीन सिंधु संस्कृती, ऋग्वेदातील आर्य शब्दाची व्याख्या व व्याप्ती ची उघड झालेली सत्यता मांडली आहे. या शिवाय उत्खनातून  आर्यांच्या आक्रमणाच्या खूणा आढळल्या नसल्याकारणाने  'आर्य पश्चीमेकडून भारतात आले ' हा सिद्धांत धातांत खोटा आहे यावर परदेशातील विद्वानांनी शिक्कामोर्तब केले आहे. असे असूनही मॅक्सम्युलर आणि मेकाॅले यांनी आपला सिद्धांत खोटा नाही अशीच भूमिका घेतली होती. या भूमिकेला चिकटून राहण्या साठी त्यांना किती कोलांटी माराव्या लागल्या याचे सविस्तर पण सत्याला धरून वर्णन अभिजीत जोग यांनी केले आहे. अभिजित जोगांच्या या पुस्तकावर डाॅ विनय सहस्त्रबुद्धे,  स्वामी गोविन्ददेव गिरी, डाॅ वसंत शिंदे इत्यादी मान्यवरांनी आपल्या अभिप्रायात हे पुस्तक नसून एक ग्रंथ आहे, एक ऐताहासिक दस्तऐवज आहे असेच म्हटले आहे. शाळा- काॅलेज मधील इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाची फेररचना करतेवेळी या ग्रंथाचा फार उपयोग होईल असे मला वाटते. 

हे सारं येथे नमूद करण्याची गरज वाटली. याचे कारण या भारतभूमीत जन्मलेल्या काही बांधवांनी श्रीराम जन्मलेच नाहीत असा पावित्रा घेतला होता. त्यामुळे श्रीरामजन्मभूमी अयोध्या मुक्तीसाठी देश पारतंत्र्यात असताना आणि स्वातंत्र्या नंतर ही  अनेकांना बलिदान द्यावे लागले व कारावास भोगावा लागला. शेवटी न्यायालयात दावा टाकावा लागला हे शल्य करोडो रामभक्तांना सोसावे लागले. म्हणुनच विविध चॅनेल्सच्या सर्वेमधून देशात रामलाट तयार झाली आहे असे मांडत आहेत. त्यावर मला काही प्रतिक्रीया द्यावयाची नाही. अयोध्येत श्रीरामजन्मभूमीवर मंदिर उभे राहिले आहे ही आपली इच्छा पूर्ण झाली आहे. ती प्रभुरामचंद्राची कृपा आहे असे मानू या. तमाम भारतीयांनी ' अयोध्या नगरी ही जगाच्या पाठीवरील सुसंकृत मानवी जीवनाची सर्वात पहिली पुरी आहे, हे ध्यानात ठेवून आपले आचरण ठेवावे. हाच न्यायदेवतेचा आपणां सर्वासाठी  संदेश आहे असे मला वाटते.  
                                         क्रमशः
                जय श्रीराम !

मंगळवार, १६ जानेवारी, २०२४

गीतरामायण ऐकताना - भाग १




लेखमालिकेचे शिर्षक वाचून आपला गैरसमज होईल म्हणून प्रथम आपल्या समोर नम्रतेने एक निवेदन करतो की, मी एक सामान्य भाविक आहे. तसेच मी एक सामान्य काव्य व संगीत प्रेमी आहे. त्यामूळे या लेखमालिकेतून महर्षी वाल्मीकी रामायणवर एखाद्या गाढा अभ्यासकांच्या शैलीतले प्रवचन, विश्लेषण आणि गीतरामायणावर  एखाद्या ख्यातनाम साहित्यकार, कवी संगीतकार, गायक व कलाकारां च्या मुखातून येणारें लयबध्द, मंत्रमुग्ध रसग्रहण दिसणार नाही. तसेच रामलीलाचा अनुभव प्रत्ययास येणार नाही. श्रीरामजन्मभूमी अयोध्या मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची  घोषणा झाल्यावर देशभर झालेल्या राममय वातावरणा मुळे मला श्रीरामायण संबंधीत काहीतरी लिहावे अशी इच्छा झाली. अशीच इच्छा आमचे परम मित्र परागजी कुळर्णीनें ही जानेवारी महिन्याच्या पहिल्या सप्ताहास मांडली होती. आपण सुजाण वाचक आहात. इच्छा आणि प्रेरणा यातला फरक आपण जाणत आहात. म्हणून अधिक काय सांगावे ? 

रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ ला नाळासोपारा (प ) आमच्या गावी पंचक्रोशीतल्या निर्मळ तीर्थक्षेत्री शंकराचार्य समाधी मंदिराच्या पटागंणात स्वर सामवेद या संस्थेतर्फे 
गीतरामायणाचा कार्यक्रम झाला होता. मला कार्यक्रम फार आवडला. त्याची पाच कारणें आहेत. 
१)पहिले कारण असे की प्रत्येक माणसाला आपली माय, मायबोली आणि मातृभूमी प्रिय असतात. 
२)महर्षी वाल्मीकी रामायण जितके प्रिय व अभिमानाचे वाटते तितकेच गीतरामायण ही आपल्या सर्वांना    अभिमानस्पद व प्रिय आहे. 
३) कारण ते शब्दसम्राट ग. दि. माडगुळकरांनी रचलेले आणि स्वरसम्राट बाबूजी उर्फ सुधीर फडकेंनी स्वरबद्ध केलेले आहे.  
४) गीतरामायणात समुह गीतांचा ही समावेश आहे. समुहात राहणे हा मानवाचा स्वभाव आहे. त्यातून  पोवाडे, आरती, आवर्तने, प्रार्थना इत्यादी समुहात म्हणणे ही आपली नैसर्गिक गरज झाली. म्हणजेच गीत-संगीत आपला श्वास आहे. कारण हे विश्वच नादब्रह्म आहे. 
४) वाल्मीकी ऋषी हे आदि कवी होत आणि रामायण या भूतलावरील संस्कृत मधील म्हणजेच या जगातले पहिले महाकाव्य आहे.  
५) आपल्या साठी सर्वात महत्वाचे म्हणजे आजच्या चंगळमय दुनियात महाराष्ट्रातल्या गावा-गावात युवक-युवती आपल्या गोड आवाजात गीतरामायणाचे प्रयोग करीत आहेत. ही बाब आपल्याला अमूल्य असे समाधान देत आहेत.

दुसर्या दिवशी सोमवार २२ जानेवारी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दिवस. रात्री गीतरामायणावर लेख लिहावा असे वाटले. पण मनाची घालमेल थांबत नव्हती. याचे कारण असे की मूळात रामायण या ग्रंथाचे नायक रामचंद्राचे उदात्त चरित्र, त्यात ते काव्य मनोहर स्वरूपात आणले ते आदिकवी महर्षी वाल्मिकीनीं व गात आहेत कुशाग्र बुद्धीचे, मधुर कंठ असलेले, रामचंद्राचे प्रत्यक्ष सौंदर्याचे पुतळे असेलेले लव-कुश. हे चित्र डोळ्यासमोर समोर येत होते. अजरामर असलेल्या वाल्मीकी रामायणाचे मराठीत रूपातंर झालेले गीतरामायण ही अजरामर झाले आहे. गीतरामायण ऐकताना मी फार भावूक होतो. संत ज्ञानेश्वर महाराज, तुकारम महाराज, चोखाबा, इत्यादींचे चरीत्र वाचतांना ही मी भावूक होतो. 

काही वर्षापुर्वी  (वर्ष आठवत नाही) जेष्ठ समाजसेवक नानाजी देशमूख काही कामानिमित्त बोरीवली- दहिसरला आले होते. त्यांच्या या दौर्यात दहिसरच्या समाज कल्याण मंदिरात त्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. त्यावेळी त्यांनी 'आम्ही वनवासी रामाची भक्ती करतो' असे वाक्य उच्चारून वनवासी रामावर सुदंर व श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श करणारे व्याख्यान ऐकीवले होते त्यांची आठवण ही मला या आठ दिवसात झाली होती. पण प्रश्न समोर उभा होता, तो म्हणजे जागतिक दर्जाचे या महाकाव्यावर लेखमालिका हाती घेण्याचे धाडस होत नव्हते. शेवटी रामभरोसे ही लेखमालिका सुरू केली. पुढचे पुढे बघू या. 

माझ्या ब्लाॅगवरील सन २०१७ पासून लेखांचे एडिटींग व पब्लीश करण्याचं काम माझा मुलगाच करीत असतो.  त्याने दोन वेळा गीतरामायणाचे सुत्र संचालन केलेले आहे. हा एक प्लस पाॅईंट माझ्यासाठी आहे आणि सोबत तुम्ही वाचक मला सांभाळून घ्याल अशी आशा ही आहे. 

या लेखमालिकेच्या विषयाला, नाही म्हटले तरी श्रीरामजन्मभूमी मंदिर अयोध्या संबधीत झालेला संघर्ष व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडील निकालाची पार्श्वभूमी आहे. त्याबद्दल थोडीफार माहिती प्रथम मांडावी असे मला वाटले. कारण असे की ' श्रीरामजन्मभूमी मंदिर अयोध्या ' या राष्ट्रीय विषयावर मी काही लेख ब्लाॅगवर लिहले आहेत. त्यामुळे या लेखमालिकेची सुरूवात करायला माझा आत्मविश्वास वाढला आहे. अर्थात त्यातून श्रीरामायण महाकाव्य,  श्रीराम,  श्रीरामजन्मभूमी अयोध्या समस्या  या संबधीत थोडाफार माहित झालेला इतिहास, या विषयाचे महत्व, इत्यादी गोष्टी अर्थातच काही पुस्तकांचा संदर्भ घेऊन आपल्यासमोर मांडतो आहे. त्यामुळे पहिल्या तीन भागांचा विस्तार ही वाढलेला असेल तसेच तीन-चार छोट्या परिच्छेदांत राजकारणाला स्पर्श झालेला आहे. त्याबद्दल मी आपल्या कडे क्षमायाचना करतो.

श्रीमद्वाल्मिकी- रामायण हा आपल्या देशाच्या वाड्:मयातील एक सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे. रामायणाचा प्रसार आपल्या देशाच्या प्रत्येक प्रान्तीय भाषेत रूपांतर होऊन प्रसार झाला आहे. भारताबाहेर श्रीलंका, नेपाळ, ब्रह्मदेश, इंडोनिशिया, कंबोडीया, लाओस, थायलंड, फिलीपाईन्स, चीन, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, मंगोलिया इत्यादी आशियायी देशांमध्ये झाला आहे. या शिवाय मूळ रामायणाचे रूपांतर केवळ विविध भाषा, साहित्य लेखन या माध्यमांपुरता मर्यादित न राहता याचे प्रगटीकरण अनेक प्रकारच्या कला माध्यमातून ही झालेले आहे. उदाहरणार्थ ख्वेर नृत्य, रंगभूमी, केरळ व लक्षद्विप मधील मुस्लिमांची माप्पीला गीते, तसेच कर्नाटकातील यक्षगान, नृत्यें यात ही रामायणातील प्रसंगावर आधारीत चित्रातून ही प्रगटीकरण झाले आहे.

कांबोडीयाला कांबोज किंवा कंबूज असे ही म्हणतात. याची स्थापना स्वायंभुव मनुने केली असे समजले जाते. या देशाची राजधानी नाॅम्पेन आहे. या ठिकाणी संस्कृत भाषेत सहस्त्रावधी शिलालेख सापडले आहेत. येथील भाषेवर संस्कृत आणि पाली भाषेचा प्रभाव आहे. येथील विराट सभागृहाच्या भितींवर इ स १२०० मध्ये सम्राट द्वितीय सूर्यवर्मन यांच्या कारकिर्दीत रामायण तसेच महाभारत मधील दृष्यें अंकित केली आहेत. येथील साहित्यात रामायण हे रामकिर्ती या नावाने प्रतिष्ठीत झाले आहे. 

सायबेरिया हा आशियाच्या अति उत्तरेला असलेला देश. त्याला प्राचीन भारतीय साहित्यात शिबीर देश म्हणून गणला जात असे. हा देश संपुर्णतया हिमाच्छादित आहे. त्या ठिकाणी मंगोलियाच्या क्षेत्रात तसेच रशियामधून वाहणार्या व्होल्गा नदीच्या किनार्यावर प्रभू रामचंद्राचे चरित्र ऐकवले जात असे त्याचे नाव रामन-खागान असे आहे, म्हणजेच राजा रामाची कथा. या कथेचा सारांश असा आहे की ' जनतेच्या नेत्याने क्षूल्लक अशा आनंदात मग्न होऊ नये, विषयलंपट होऊ नये. लोभात पडल्यानेच प्राचीन काळी राक्षस राजा रावण लंकेत मारला गेला.'  हजारो वर्षापासून मंगोलियन व सैबेरियन-रशियन लोकांमध्ये राम कथा वाचली जाते तसेच सांगितली ही जाते. हे एक प्रकारचे पारायण होय. खगोल शास्त्राचे अभ्यासक प्रफूल मेंडकी यांनी 'रामायणाचा खगोल शास्त्रीय शोध' या पुस्तकात रामायणाची कथा सहा हजार वर्षे जुनी असू शकते असे म्हटले आहे.    
                                      क्रमशः-
                 जय श्रीराम !

मंगळवार, २ जानेवारी, २०२४

लिबरल मंडळीचा प्रचार आणि विरोधी पक्षांचा व्यवहार (भाग-३)




सन २०१४ ला केंद्रात मोदी सरकार विराजमान झाल्यानंतर लिबरल पत्रकार-संपादक मंडळींचा मतदारांवर प्रभाव हळुहळू कमी होऊ लागला आहे. परंतु तो प्रभाव संपला आहे असे म्हणता येत नाही. याचे पहिले कारण लिबरल राजकीय अभ्यासक ही जगभर पसरलेली एक मोठी शक्ती आहे. तसेच तिच्या प्रसार आणि प्रचाराचं (बुद्धी भ्रम करण्याचं)  नेटवर्क प्रचंड आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे जगभरच्या सर्व श्रीमंत मंडळीचं प्रचंड आर्थिक पाठबळ तिच्या पाठिशी आहे. दुसरे कारण हे आहे की आपल्या देशात द्विपक्षीय लोकशाही नाही. भाषावार प्रान्त रचना आहे. या प्रान्त रचनेचा उपयोग लिबरल अभ्यासकांची लॉबी देशात फितुरी वाढण्यासाठी करते. तिसरे कारण आपल्या देशात बाराशे वर्ष इस्लाम आणि ख्रिचनांचे राज्य होते. त्या काळात आपल्या देशातील हिंदुचे जबरदस्तीने धर्मांतर केले आहे. याची आठवण त्या दोन्ही समाजातील काही लोकांना अजुनही आहे. केवळ आठवणच नाही तर त्या इतिहासाची पुनरावृत्ती भारतात होऊ शकते या भावनेने ते पछाडलेले असु शकतात. तिच मंडळी या लिबरल लॉबीत ही आहे. म्हणून लिबरल लॉबीचा प्रभाव आज ही शिल्लक आहे.  

कुठल्यातरी एका लेखात  मी म्हटले आहे की माय, मायबोली आणि मायभूमी सर्वांना प्रिय असते. साहित्याचे सर्व प्रकार आपण मायबोलीतून वाचत असतो आणि ऐकत असतो. त्यातूनच मानवी जीवनाचे खरे प्रयोजन काय आहे हे आपण आपल्या कुवतेनुसार समजत असतो. भाषावार प्रान्त रचनेचा हेतू चांगला होता आणि आहे. परंतु आपल्या येथील राजकारणी लोकांना प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून बघण्याची सवय आहे. प्रान्तीय अस्मितेला खत-पाणी घालण्याचे काम सर्वाधिक पक्ष इंडी नावाच्या आघाडीत आहेत. या पक्षांच्या आतापर्यंतच्या प्रान्तीय आणि राष्ट्रीय पातळीवरील राजवटीला जनता कंटाळलेली आहे. याची साक्ष सन १९९१ ते १९९८ तसेच सन २००४ ते २०१४ यूपीए सरकारची  कामगिरी देते. सन २०१४ पासून 'सबका साथ सबका विकास' या टॅग लाईनचा विजय का होतो आहे याची कारणें दोन प्रकारची आहेत. एक सकारात्मक आहे. ते म्हणजे भाजपाचे ब्रिद वाक्य ' राष्ट्रहित सर्वोच्च ' असे आहे. त्याची प्रचिती जनतेला वाजपेयी सरकारच्या काळात आली आणि मोदी सरकारच्या काळात पदोपदी येत आहे. दुसरे कारण युपीए सारखे सरकार नकोच अशी मतदारांची भावना आहे. भाजपा सरकाराच्या कामगिरीचा आढावा इथे मांडणे गरजेचे नाही. त्या पलिकडे जाऊन  लक्षात येते की भारतीय मतदार परराष्ट्र आणि संरक्षण खात्यासंबंधीचे धोरण, दशहतवादाचा नायनाट करण्यासाठी आक्रमक धोरण आणि बहुसंख्याक समूहाच्या भावनेची कदर भाजपा सरकार घेत असल्यामुळे  जनतेचा विश्वास वाढू लागला.  

सन २०१४ पासून केंद्र सरकारने  पद्मश्री, पद्मभूषण इत्यादी पुरस्कार दिलेली यादी पाहिली तर त्यात ना कुठेही पक्षपातीपणा दिसला ना वशीलाबाजी दिसली. केवळ गुणवत्तेच्या कसोटीवरून हे पुरस्कार दिले आहेत. हे कारण दिसायला छोटसं वाटत असले तरी जशी एक छोटी पणतीची ज्योत संपुर्ण खोली दाही दिशातून उजळ करून टाकते, त्याच प्रकारे देशाच्या कानाकोपर्यात दुर्लक्षीत गेलेल्या देशबांधवांना  'आपल्यात असलेल्या गुणवत्तेचं चीज होत आहे, सरकार आपले आहे ' अशा तेजस्वी भावनेने देश उजळ होत आहे. पुरस्कारपात्र व्यक्तींना आणि त्यांच्या प्रान्तातील समाजबांधव व भगिनींच्या हृदयातील या पवित्र भावनेचं मुर्तीमंत दर्शन पुरस्कार सोहळ्यातून टिव्हीच्या माध्यमातून आपण सन २०१४ पासून दर वर्षी पाहात आहोत. मोदी सरकारचे हे कार्य देशात एकात्मता वाढविण्याचे कार्य करते. म्हणून मोदी सरकारला जनतेचा पाठींबा मिळतो आहे.  त्यातून लिबरल लॉबीची स्थिती छोटे छोटे भूकंपाचे  हादरे बसल्यानंतर जसे घराच्या भितींना तडे जातात तशी होत आहे. ही लिबरल लॉबी आपले बंधु आणि भगिनीं आहेत. मला मनापासून वाटते की या लॉबीने आपला पराभव होत आहे याचे शल्य मनातून काढून टाकावे. आपली वाट चुकली आहे, आपण कुठेतरी भरकटत आहोत याची जाणीव होऊन सांस्कृतिक राष्ट्रवादाचा स्विकार त्यांनी केला तर देशात खरीखुरी द्विपक्षीय लोकशाही आकारास येऊ शकते. पण--

बहुतांश प्रान्तीय पक्षांच्या राजवटीचा कारभार भ्रष्टाचाराने ओलाचिंब झालेला आपण पाहातो. भ्रष्टाचार करण्यात प्रान्तीय पक्षांचे मुख्यमंत्री आणि इतर प्रमुख खात्याचे मंत्री महोदयांच्या परिवारातील सदस्य आणि नातलग अग्रणी स्थानावर दिसतात. तरीही प्रान्तीय पक्षांना त्या प्रान्ताच्या विधानसभेच्या निवडणूकात विजय मिळतो. याचे कारण प्रान्तीय पक्षांनी एक नवीन शक्कल अंमलात आणली आहे. ती म्हणजे केंद्र सरकार आम्हाला हक्काचा निधी देत नाही असा सतत आरोप करण्याची. केंद्र सरकार आपल्यावर अन्याय करते अशी टेप सतत ऐकावयास आली की मतदारांची चलबिचल होत असते. आपले मन, बुद्धी आणि दृष्टी हे इंद्रियें प्रवाही आहेत. म्हणून प्रान्तीय पक्षांना मतें मिळतात. दुसरे कारण असे आहे की तिसर्या आणि चौथ्या पातळीवरील प्रान्तीय पक्षांच्या नेतेमंडळीचा आणि नातलगाचाही भ्रष्टाचारात हिस्सा असतोच की. यालाच डीजिटल भाषेत नेटवर्क म्हणतात. कुमार केतकर आणि इतर लिबरल पत्रकार आणि संपादकीय मंडळींची मन, बुद्धी आणि दृष्टी जागतिक डाव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या आधीन झालेली आहे.                                                          जगातील विशेषतः बड्या देशांत उजव्या विचारसरणीचा प्रभाव असला तरी भारताचा विकास तिथल्या काही वर्गाच्या नाकात झुबंतो आहे. त्यामुळे ही मंडळी त्यांच्या देशातील मिडीया भारतातील राजकीय व सामाजिक स्थितीसंबंधी फेक बातम्या देत आहेत  त्याबद्दल तेथील सत्ताधारी पक्ष कोणताही असो तो नरो वा कुंजरो ची भूमिका घेत असतो. दुसर्या महायुद्धात नाझी पक्षात एखादे असत्य कसे सत्य आहे हे दाखविण्याची यंत्रणा हिटलरचे खास विश्वासु गोबेल्स यांच्याकडे होते. तशीच यंत्रणा अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साधनांचा वापर करून अधिक वेगाची, अधिक व्याप्तीची जगातील बडी राष्ट्रे व तेथील काही मिडीया वर्ग वापरत आहेत. दुर्देवाने आपल्या येथील विरोधी पक्षांचे नेतेमंडळी आणि त्यांची समर्थक मिडीया आणि राजकीय अभ्यासक मंडळी ही सर्व बड्या राष्ट्रांच्या आधीन गेली आहे. त्या काळात गोबेल्सची शीं थूं करणार्या मंडळीचे वंजश आज गोबेल्स पेक्षाही मानवजातीला अधिक धोकादायक ठरत आहेत.

आपल्या देशातील लिबरल मंडळीचे असेच उद्योग सुरू असतात. त्याच्यांशी भाजपा ठकास महाठक अशी टक्कर देत आहे. म्हणूनच विरोधी पक्ष प्रथम अटलबिहारी वाजपेयींचे कौतुक करीत असत आणि लालकृष्ण अडवाणींना खलनायक बनवित असत. मोदींचा उदय झाल्यावर अडवाणींची स्तुती करू लागले आहेत आणि मोदींना खलनायक मानत आहेत. अधून मधून ही लिबरल मंडळी नितीन गडकरी नाराज असल्याच्या फेक विडीओ पसरवितात. पण नितीनजी गडकरी संसदेत लिबरल मंडळींची आपल्या खास शैलीत हजेरी घेतात. 

भाजपा सर्वच राज्यात आपली ताकद वाढवित आहे. दक्षिणेकडील राज्यात वाढीचा वेग संथ आहे हे मान्य आहे. पण त्यातून भाजपा राष्ट्रीय पक्ष नाही अशी टिका करण्यात काही अर्थ नाही. कुमार केतकरांना समाधान मिळत असेल तर ते त्यांनी घ्यावे. त्यांचे मन ही त्यांची मालमत्ता आहे. पण  इंदिरा गांधीनी जनता पार्टीचे सरकार असताना कर्नाटकातील  चिटमंगुळर मधून पोट निवडणूक लढविली पण उत्तर भारतातील राज्यातुन पोटनिवडणूक का लढविली नाही ? त्यावेळी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष नव्हता असे जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याने किंवा जनता पार्टीच्या समर्थक पत्रकाराने म्हटले नव्हते. नंतर जनता पार्टीचे सरकार डाव्या लॉबीनेच पाडले.                                                                देशाचे दुसरे पंतप्रधान लाला बहादूर शास्त्रींजींचे अकस्मात निधन झाल्यानंतर इंदिराजी स्वतः पंतप्रधान झाल्या ते ही भारतीय काँग्रेस पक्षात अस्तित्वात असलेली रशिया पुरस्कृत तरूण तुर्क नावाच्या लॉबी मुळे. दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींचे रशियात अकस्मातपणे निधन झाले, त्यासंबंधी संशयाचे बोट डाव्या लॉबीकडे आज ही जात आहे. काळ बदलत गेला. आर्थिक उदारीकरण आणि जागतिककरणामुळे राजकारणात ' यह पैसा बोलता है ' हे युग आले. नेहरू-गांधी घराण्याकडे काँग्रेसची तिजोरी होती. त्यामुळे त्या घराण्याची दादागिरी वाढू लागली. त्यामूळे प्रत्येक राज्यातील काॅग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतंत्र पक्ष स्थापन केले. काँग्रेस विकलांग होत गेली. ही वस्तुस्थिती आहे. हे एसी मध्यें बसलेल्या लिबरल राजकीय अभ्यासकांना कसे कळणार हो ? काॅग्रेस पक्षाचा ज्यांना फार लळा लागला आहे, तीच पत्रकार-संपादक मंडळी इतर विरोधी पक्षांना विशेषतः प्रान्तीय पक्षांना काॅग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे अशी इच्छा प्रगट करतात. त्या प्रान्तीय नेत्यांच्या  भ्रष्टाचाराच्या विरोधात ही राजकीय अभ्यासक मंडळी एक शब्द ही बोलत नाहीत. त्यामुळे त्या नेत्यांची प्रान्तीय  अस्मिता एक प्रकारे कवच कुंडली बनली आहेत. ही फार दुर्दैवी गोष्ट आहे.
     " पंजाब, सिंध, गुजरात, मराठा 
              द्राविड, उत्कल, बंग 
     विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा 
              उच्छल जलधितरंग 
      तव शुभ नाम जागे, 
             तव शुभ आशिस मागे
                  गाहे तव जयगाथा " देशाच्या राष्ट्रगीतातील या ओव्या गात असतांना देशभक्तीची ज्योत आपल्या शरीराच्या प्रत्येक नसानसातून तेवत असते. लिबरल मंडळी, प्रान्तीय पक्ष आणि विरोधी पक्ष केवळ सत्तेच्या आणि पैशाच्या लालसेने धोकादायक राजकारण खेळत ती भक्तीज्योत आपली लेखणी, वाचा व फुंकरेच्या साह्याने मालविण्याचे प्रयत्न करीत असतात. पण त्यांना यश मिळणार नाही.                                                                                      कोरोना नंतर World Order बदलत असल्याचे दिसू लागले आहे. आपल्या देशातला मतदार राजा जागा होत आहे. हळूहळू का होईना Nation First ही भावना मूळ धरत आहे. काळाच्या ओघात लिबरल लाॅबी अस्तगत होईल. विरोधी पक्षांना ही बहुसंख्याकांचा अनादार करीत राजकारण परवडणारे नाही याची जाणीव थोड्या प्रमाणात का होईना होत आहे. दुसरे असे आहे की मोदी सरकारने काही निर्णय असे घेतले आहेत की ते राष्ट्रहिताचे आहेतच शिवाय देशातील कुठल्याही वर्गाचा अनादर न करता ते घेतले आहेत. पुढे भविष्यात विरोधी पक्ष सत्तेवर आले तरी त्यांना ते रद्द करता येणार नाहीत. हे ही विरोधी पक्षांना ठाऊक आहे. पण राजकारण हे असे क्षेत्र आहे की  एखाद्या विषया संबंधीत अमूक एक भूमिका घेतली की ती भूमिकाच आपल्याला एखाद्या अजगारासारखे वेष्टून धरते. त्यातून मग आपली सूटका होत नसते. भाजपाच्या विरोधी पक्षांची स्थिती अशीच झाली आहे.                                                      सध्या अयोध्येतील रामजन्मभूमीवर रामललाच्या प्रतिष्ठान सोहळ्याबाबत देशातील जनतेत उत्साह आहे. रामजन्मभूमी संबंधीतल्या खटल्यात न्यायालयाचा निर्णय मान्य केल्यानंतर विरोधी पक्षांनी मोदी सरकारशी स्वतःहून पुढाकार घेऊन सहकार्य केले असते तर त्यांचे भाजपाच्या समर्थकांनी सुद्धा अभिनंदन केले असते. देशातील राजकारणाला एक नवी दिशा देण्याचे श्रेय विरोधी पक्ष गमावून बसले आहेत. निदान विरोधी पक्षांनी रामभक्तांच्या उत्साहवर विरजण टाकण्यासारखे भाष्य वा कृती करू नये अशी अपेक्षा करून ही लेखमालिका इथे संपवितो. आपल्या सर्वांना इंग्रजी कॅलेन्डरच्या नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
            || वन्दे मातरम ||

गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

लिबरल मंडळीचा प्रचार आणि विरोधी पक्षांचा व्यवहार (भाग -२)


आता आपण लेट्स-अप युट्युब चॅनेलवर ४ डिसेंबर रोजी राजकीय अभ्यासक हेंमत देसाई यांच्या मुलाखती वर चर्चा करणार आहोत. हेमंत देसाई हे मराठी माध्यमातील चॅनेल्सवर राजकीय अभ्यासक म्हणून अवतरत असतात. त्यांचे राजकीय घडामोडी वरील विश्लेषण लिबरल मंडळी सारखेच असते. अलिकडील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालासंबंधी हेमंत दैसाई यांनी केलेलं विश्लेषण थोडक्यात आपल्या समोर ठेवतो.

१) सुरवातीसच हेंमत देसाई यांनी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड च्या निवडणूकात काँग्रेसचा झालेल्या पराभवचे वर्णन अत्यंत त्वेषाने ' दारूण पराभव 'असे केले. विरोधी पक्षांनी ओबीसींच्या जनगणनेची केलेल्या मागणीची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  खिल्ली उडविली. ' मी किसान, गरीब आणि महिला यांचे कल्याण पाहतो. हाच माझा धर्म आहे. मी जात-पात बघत नाही.' हे पंतप्रधान मोदींचे जाहीर भाषणातले उद्गार हेमंत देसाईने स्वतः म्हणून दाखविले.
२) भारत जोडो कुठे आहे ? त्या यात्रेतून झालेला संपर्क टिकून राहावा यासाठी काही प्रयत्नच झाले नाहीत.
३) काँग्रेसला मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड येथे घवघवीत यश कधीच मिळाले नाही.
४) भाजपाकडे ४० लाख समर्पित कार्यकर्ते आहेत. गुजरात पेक्षा ही मध्यप्रदेशमध्ये भाजपाची ताकद अधिक आहे. संघाचे आणि वनवासी कल्याण आश्रमचे कार्य गुजरात पेक्षा कितीतरी वर्षे अगोदर पासून मध्यप्रदेशात सुरू आहे.
५) अयोध्येत फुकट वारी करून देण्याची, सर्वत्र हनुमानाची मंदिरे, कौसल्यामातेची मंदिर बाधण्याच्या कमलनाथाच्या घोषणा हवेत विरल्या.
६) भाजपा संकल्प यात्रा काढणार
७) राजस्थान मध्ये सती जोहर मध्ये गेली पण सतीचे मंदिरे बांधली आहेत.
८) राजस्थान मध्ये एका हिंदुची निर्घूण हत्या. गेहलोतचे सरकार निष्क्रीय. भाजपाने फायदा घेतला.
९) राजस्थान मध्ये भाजपाने निष्क्रीय आमदारांना घरी बसविले.
१०) मोदींची इमेज व मोदींची गॅरेन्टी
११) गेहलोत यांच्या ओबीसी, आर्थिक दृष्ट्या गरीब, महिलांचा उत्कर्ष अशा रेवडी योजनांचा फज्जा उडाला
१२) महाराष्ट्रात तर मविआ सरकारची credibilty संपली आहे. 
१३) भाजपा पराभवाने खच्चीत होत नाही.
१४) आता तर काँग्रेसला इंडी आघाडीत अधिक जागा मागण्याची संधी हूकली आहे.
१५) राजकारण एकांगी होत आहे. ही धोक्याची सूचना आहे. लोकशाही संविधान धोक्यात आले आहे.
१६) गेहलोत आणि सचिन पायलट मधील वैर कमी करण्याची ताकद काॅग्रेस पक्षांच्या श्रेष्ठींकडे राहिली नाही. 

संपुर्ण मुलाखतीतुन तीन राज्यातील काँग्रेसचा दारूण पराभव हा जणू काही हेमंत देसाई यांचा स्वतःचा पराभव झाला की काय हे पदोपदी जाणवले आहे. मोदी, भाजपा व संघाची ज्यांना कावीळ झाली आहे अशापैकी हेमंत देसाई एक राजकीय अभ्यासक आहेत. विरोधी पक्षांची ओबीसीच्या जनजणनेच्या मागणीवर नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत खिल्ली उडविली आणि ती पाहिली तेव्हा हेमंत देसाई गर्भगळीत झालेले असावेत असा माझा अंदाज आहे. लिबरल मंडळींचं एकच ध्येय असते ते म्हणजे हिंदू समाजाला वेगवेगळ्या जाती-पंथात विभक्त करणे. ही त्यांची राजकीय चाल तलवारीच्या एका फटक्याने ते ही जाहीर सभेत मोदींनी कापून टाकली. त्याच्या वेदना सर्वच लिबरल राजकीय अभ्यासकांना सहन कराव्या लागत असतील. भाजपाच्या संकल्पित संकल्प यात्रेने सर्व विरोधी पक्षांना संपुर्णपणे उखडून फेकून दिले जाणार असे चित्र हेमंत देसाईच्या यांच्या प्रतिक्रीयेतून स्पष्ट दिसले. नैराश्याने ग्रासलेले असुनही हेमंत देसाई यांनी शेवटी आपली लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल असा शेरा मारलाच. म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तशातली ही गत. अशी गत फक्त हेमंत देसाईं, गिरीश कुबेर आणि कुमार केतकर यांचीच झाली आहे असे नाही. हिन्दी, इंग्रजी तसेच इतर प्रांतीय भाषेतील न्यूज चॅनेल्स आणि वृत्तपत्रातील लिबरल पत्रकार-संपादक मंडळीची हीच गत आहे. म्हणून त्या मंडळींनी चार राज्यातील निवडणूक निकालाचे जे विश्लषण केले आहे ते सादर न करता या भागाची समाप्ती करतो.

बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

लिबरल मंडळींचा प्रचार आणि विरोधी पक्षांचा व्यवहार (भाग १ )



या लेखाच्या शिर्षकाचे नाव थोडसं चमत्कारी वाटते पण तसे काही नाही. व्यवहार या शब्दाचा अर्थ सामान्यतः व्यापार व त्यातून होत असलेली पैशाची उलाढाल असा आहे. तसे पाहता सरकार साठी निवडणूका या खर्चीक असतात. राजकीय पक्षांना ही प्रचार करण्यासाठी पैसा लागतो. उद्योगपती अधिकृतपणे राजकीय पक्षांना आर्थिक मदत करीत असतात. त्या बदल्यात ते सरकार कडून आपल्या उद्योगासाठी सोयी व सवलती घेतात. हा व्यवहार स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासून सुरू आहे. तसेच जगभरातील लोकशाही देशात ही असा व्यवहार होत असतो. मतदारांना आपल्याकडे यावे या हेतूने पैशाचे प्रलोभन सर्वच राजकीय पक्ष करीत असतात. हे एक आपल्याला न पचलेलं सत्य. जगभरातील सर्व लोकशाही देशात हे कटु सत्य वावरत असते फक्त त्याची वावरण्याच्यी पद्धत भिन्न असू शकते. थोडक्यात पैशाची उलाढाल राजकरणात ही असतेच की. राजकारणातला व्यवहार म्हणजे काय या संबंधीतली चर्चा कधी न संपणारी आहे. कारण आज केलेली चर्चा पुढल्या दहा वर्षात बदलेली असू शकते. कारण काळानुसार तसा बदल अपरिहार्य असतो. 

आजच्या घडीला राजकारणतला व्यवहार म्हणजे " राजकीय पक्षांचे वर्तन. म्हणजेच नेते आणि कार्यकर्त्यांच्या चालण्या बोलण्यातले तारतम्य; सोबत पक्षाच्या विचारसरणीनुसार आमदार खासदार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी राबवलेली कार्यपद्धत ; लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्याचे आधुनिक पद्धतीने प्रशिक्षण करून राष्ट्रीय पातळीपर्यंत इतर पक्षांहून अधिक समर्पित व सांघिक भावनेचं उत्कट दर्शन मतदारांना व्हावे यासाठी घेतलेले कष्ट; काळानुसार अचूक पद्धतीने स्पर्धक पक्षांवर कुरघोडी ठरू शकतील अशा राजकीय चालीची रचना करणे. मग त्या रचना कृतीत उतरविण्यासाठी थेट राष्ट्रीय अध्यक्षापासून ते बुथ पातळी वरील कार्यकर्त्यांचे प्रयत्न, प्रचार करताना मतदारांची नाडी ओळखून हवा तयार करणे, पक्षात एकच शिर्षस्थ नेता व त्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी निर्माण केलेली सक्षम यंत्रणा, आणि पक्ष सत्ताधारी असेल तर पक्षाच्या निवडणूक जाहिरनाम्यानुसार दिलेली वचनं बहुतांशी पाळली आहेत आणि बाकी राहिलेल्या वचनांची गॅरेन्टी इत्यादी गोष्टींची मतदारांना होत असलेली खात्री,  सत्ताधारी पक्षाने कल्याणकारी योजना पुर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे केलेला आटोकाट प्रयत्न, त्यातून मतदारांनी दिलेली दाद, निवडणूका जिंकल्याच्या नशा पासून दूर राहण्याची नेते आणि कार्यकर्त्यांनी जपलेली संकृती,    देशाची सुरक्षतता, विकास, कायदा व सुव्यवस्था इत्यादी बाबतीत कटीबध्दता, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा स्वाभिमान गहाण न ठेवता  भारतियांची 'जगभर शांतता नांदावी' या भावनेची कदर करीत रचलेले परराष्ट्रीय धोरण इत्यादींचा समावेश म्हणजे राजकीय पक्षाचा व्यवहार." 

मी वर नमुद केलेली राजकीय पक्षांच्या व्यवहाराची व्याख्या म्हणा वा व्याप्ती संबंधीत दुमत असू शकते . या ठिकाणी भ्रष्टाचारा पासून दूर राहण्याच्या वृत्तीचा मी उल्लेख केला नाही. याचे कारण असे की आपण इथे राज्यव्यवस्था कशी असावी या विषयावर चर्चा करीत नाही. दुसरे असे की निवडून आलेले खासदार, आमदार, नगरसेवक, स्थानिक संस्थांचे लोकप्रतिनिधी आपआपल्या सभागृहात शपथ घेत असतात. आता त्या शपथेची किती इमान राखतात हा एक स्वतंत्र विषय आहे. तरीही राजकीय पक्षांच्या प्रमुखाने या बाबत दक्ष राहावे आहे अशी अपेक्षा असते. त्यातल्या त्यात ज्या पक्षातील नेते व लोकप्रतिनिधींचे कार्य स्वच्छ आहे त्या पक्षाला निवडणूकात अधिक यश मिळते. जसे कर्म तसे फल हा निसर्ग नियम आपले काम चोख करीत असतो. 

कदाचित राजकीय पक्षाचा व्यवहाराची जी मी व्याख्या केली ती भाजपाच्या व्यवहाराची आहे असे आपल्याला वाटत असावी. त्याबद्दल माझा आक्षेप नाही. पण ती वस्तुस्थिती आहे. सतत भाजपा जिंकत असेल तर त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न प्रथम लिबरल मंडळींनी करावयास हवा आहे. कारण विरोधी पक्ष लिबरल मंडळींच्या तत्वज्ञानालाच सर्वेसर्वा  राजकीय व्यवस्थेचं आदर्श माॅडेल मानत आहेत. 

मी पत्रकार नाही आणि राजकीय अभ्यासक ही नाही. मी राज्यशास्त्राचा पदवीधर ही नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल की मला या लेखाची सुरूवात करण्याची प्रेरणा अलिकडील पाच राज्यांच्या निवडणूकांच्या निकालाचे लिबरल मंडळींनी केलेलं विश्लेषण ऐकल्यानंतर मिळाली. तसे पाहता  सन १९८९ पासून म्हणजेच भाजपाची वाढ होऊ लागल्या पासून  या लिबरल मंडळींनी हिंदुत्व, राष्ट्रवाद, महात्मा गांधीची हत्या करणारी ही मंडळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा एजंडा, इत्यादी मुद्यांवर भाजपाला घेरत असताना मी यांना पाहिले आहे, ऐकले आहे आणि यांचे लेख, विश्लेषण वाचत आलो आहे. भाजपाच्या ताकदीत वर चढत गेलेला ग्राफ ही वाचला आहे आणि अनुभवला ही आहे. त्यातून राजकीय चाल रचण्यात भाजपा वरचढ झालेला दिसतो तर लिबरल मंडळी विसाव्या शतकापासून मांडत आलेले तत्वज्ञान आणि त्यावर आधारीत कृतीचा आग्रह करीत आहेत. या लिबरल मंडळींच्या विचारसरणीचा तसे पाहता विरोधी पक्षांना म्हणजे इंडी नावाच्या आघाडीतल्या पक्षांसाठी लोकसभेच्या निवडणूकांत फायदा होत नाही असे २०१४ पासून दिसत आहे.

मागील लेखाचा शेवट करतांना मी म्हटले होते की,  "आता माझ्याकडे अधिक काही लिहावे असे राहीले नव्हते म्हणून मी थांबलो." तरी ही राजकीय लेख लिहावयास बसलो आहे. म्हणतात ना, सुंभ जळले तरी पीळ काही जात नाही हे सत्य मला ही लागू आहे. हे मी नाकारीत नाही. पण मला आपल्या देशात खरोखरी द्विपक्षीय राजवट असावी असे वाटते. पण भाजपा व संघाचा द्वेष विरोधी पक्ष जितका करीत आहेत, त्याहून अधिक जहरी द्वेष ही लिबरल मंडळी इलेक्ट्रानिक्स, प्रिन्ट आणि सोशल मिडीयावर ओकत आहे. दोन राजकीय शक्ती आमने सामने असल्या तरी सहमतीचा बिंदु शोधता येतो. पण या लिबरल मंडळींची भुमिका सतत टोकाची राहिली आहे. म्हणून या संबंधीत सविस्तरपणें व्यक्त व्हावे असे वाटले. या लेखात लिबरल मंडळींनी पाच राज्यातल्या निवडणुकांच्या निकालाचे जे विश्लेषण केले आहे त्यांच्या पैकी दोन अभ्यासकांच्या प्रतिक्रीया केंद्र स्थानी ठेवून या लेखाची मांडणी करीत आहे. म्हणून या लेखाची  व्याप्ती दोन ते तीन भागा पर्यंत वाढेल हे प्रांजळपणे कबूल करतो. कृपया ही मालिका आपल्या देशातील राजकीय पक्षांच्या व्यवहाराशी निगडीत आहे. कुठल्याही दोन वा तीन राजकीय विचारप्रणालीचा तौलानिक अभ्यास केला आहे आणि त्यावर चर्चा करीत आहे असे मुळीच नाही. तितकी माझी कुवत नाही हे आपणास ठाऊक आहे.

प्रथम लोकसत्ताचे संपादक गिरीष कुबेर हे बीबीसी न्युज चॅनेलवर झालेल्या त्यांच्या मुलाखतीत ते काय म्हणाले आहेत ते पाहू या. 
१) काँग्रेसला एका राज्यातील विजयानंतर सुस्ती येते. तर भाजपा व्यावसायिक राजकारण खेळते.
२) काँग्रेसचे राहूल गांधी फूलटाईम काम करीत नाही. तर भाजपा मधील दोन नंबरचे नेते अमित शहा छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मध्ये ठाण मांडून काम करीत असतात.
३) काँग्रेस राज्यस्तरावरील नेत्यांना  विश्वासात घेत नसते. तर भाजपा स्थानिक नेत्यांना गतिमानता देते.
भाजपाने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मधील शिवराज चौहान, राजमाता वसुंधरा राजे, आणि रमणसिंग यांना तिकीट देण्यासाठी थोडा उशीर केला पण नंतर त्यांचा योग्य तो सन्मान ही केला. भाजपा आपल्या राजकारणात सतत लवचिकता ठेवते. काँग्रेसला राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोन नेत्यांमध्ये समेट घडवुन आणणे जमले नाही. 
४) भाजपा शेवटच्या क्षणापर्यंत लढत असते. भाजपाला ॲन्टी इनकम्बन्सी नसते. कारण कल्याणकारी योजना कार्यन्वीत झाल्याशिवाय आमदार खासदारांना आराम वा विश्रांती मिळत नसते. या शिवाय भाजपा कडे सशक्त केंद्रीय सत्ता आहे. विरोधी पक्षांच्या रेवडी योजनांचा बोजवारा वाजतो. उदाहरण तेलंगणातील केसीआरांच्या योजना हवेतच विरल्या. भाजपा योग्य ठिकाणी भावनिक राजकारण ही खेळते.
५) भारताच्या उत्तर भागात खासदारांची संख्या अधिक असते तर दक्षिण भागात संख्या कमी असते.
६) भाजपा आपल्या रेवडी योजनाला धर्माची जोड देत असते. भाजपाकडे हिंदुत्व, राष्ट्रवादी चेहरा आहे.
७) मध्यप्रदेश मध्ये काँग्रेस जिंकणार असे वाटले होते. पण कमलनाथने संपुर्ण प्रचार हेलीकॅप्टर वापरून केला. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादवांना काडीची ही किंमत कमलनाथनी दिली नाही. 

गिरीष कुबेर यांचे विश्लेषण मी  थोडक्यात मांडले आहे. वरवर त्यांनी भाजपाच्या संघटन शक्तीचं कौतुक केलं आहे. ते तसे त्यांनी केले यासाठी की विरोधी पक्षांपैकी एखादा पक्ष विशेषतः काॅग्रेस ने संघटन शक्ती वाढवावी अशी इच्छा ते व्यक्त करत असावेत. एरवी राजकीय विचारसरणी संबंधीत काही काळानुसार बदल करावा असा सल्ला कोणताही लिबरल राजकीय अभ्यासक इडीतील घटक पक्षांना देत नाही. कारण ती सारी मंडळी आपल्या वैचारीक कुंपणातून बाहेर पडण्याची शक्ती गमावून बसले आहेत. म्हणूनच गिरीश कुबेर यांनी भाजपा प्रचारात हिंदुत्व, मोदीचा चेहरा, रेवडी योजनाला धर्माची जोड देणे, इत्यादी बाबी ठळकपणे ठेवल्या आहेत. गिरीशजीने भाजपाकडे राष्ट्रवादाचा चेहरा आहे असे म्हटले आहे पण भाजपाला अपेक्षित असलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादावर जरा ही भाष्य केले नाही. इथेच भाजपा आणि समस्त विरोधी पक्ष, व त्यांची समर्थक लिबरल मंडळीमध्ये भली मोठी तेढ आहे. दक्षिण भारतात लोकसभेच्या जागा कमी आहेत असे म्हणत गिरीश कुबेर, यांनी अप्रत्यक्ष रित्या कुमार केतकर यांच्या 'भाजपा राष्ट्रीय पक्ष नाही ' या भाष्याला समर्थन दिले आहे असे दिसते. 

कुमार केतकर हे आजपावेतो नेहरू-गांधी घराण्याची पुजा करीत आले आहेत. या घराण्यातील प्रत्येक व्यक्ती देशाच्या उच्च स्थानी विराजमान होण्यासाठी जन्मले आहेत अशी त्यांची धारणा आहे. राजापेक्षा भाट अधिक राजनिष्ठ अशी कुमार केतकरांची प्रकृती आहे. इंडी नावाच्या आघाडीतील घटक पक्षांना राहूल गांधीचे नेतृत्व मान्य होणार नाही. तसेच काँग्रेसचा उत्तरेकडील तीन राज्यांच्या पराभवा मूळे इडी आघाडीत काँग्रेसला वर्चस्व मिळण्याची संधी हुकली आहे. म्हणून केतकरांच्या भाष्यावर अधिक चर्चा न करता लेखाचा भाग १ ची समाप्ती इथे करतो.

बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

देशाच्या राजकीय पटांगणावरील सेमीफायनल सामन्याचा निकाल

 


गेल्या ऑगस्ट २३ तारखेनंतर आज मी प्रथमच ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या समोर संवाद करण्यासाठी आलो. तो लेख अराजकीय होता. मात्र २० जुलैचा लेख राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये उभी फूट पडली त्या संबंधित होता. त्या नंतर देशाच्या आणि जगाच्या राजकीय पटंगणावर अनेक घटना घडल्या आणि घडत ही आहेत. तरी ही मी लेख लिहले नाहीत. याचा अर्थ मी अन्य क्षेत्रात व्यग्र होतो असे नाही. आपल्या देशातील राजकारणाचं स्वरूप सन २०१४ पासून 'जैसे थे' असेच राहिले आहे. म्हणून विरोधी पक्षांवर टिका करण्यातही फारसा अर्थ राहीला नाही अशी माझी समजुत झाली आहे. ती चार राज्याच्या विधानसभा निवडणूकीच्या निकालातून खरी ठरली आहे. विरोधी पक्ष सततच्या चुकांची दुरूस्ती करू इच्छीत नाहीत हे पुन्हा स्पष्ट झाले. जुलै पासून मला जी सवड मिळत होती तिचा उपयोग मी जागतिक राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी करू लागलो आहे.                                        चार राज्यांच्या निवडणूकाच्या प्रचाराची धामाधूम मी पाहिली नाही. मोदी सरकार उलथून पाडण्याची किंवा भाजपाला पर्ययाने मोदींना पुन्हा सत्तेवर येऊ द्यावयाचे नाही असा चंग जगातील सर्वात श्रीमंत असे जाॅर्ज सोरास महाशय व शक्तीवान पण दृष्कृत्यें करणार्या लिबरल लाॅबीनी बांधला आहे. त्यामुळे चार राज्यातील विधानसभा निवडणूका २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकाची सेमी फायनल मॅच असे मानले गेले. त्या चार राज्यातील निवडणूकापैकी तीन राज्यात भाजपाने प्रचंड विजय मिळविला. त्यामुळे लिबरल लाॅबीची फजिती झाली. त्या फजिती संबंधित चर्चा करावी असे मला वाटले म्हणून हा लेख प्रपंच. 

काळ कसा बदलतो ते पहा. सन १९९८ ला दैनिक लोकसत्तेत माझा  'सर्वधर्म समभाव व राजकीय पक्षांचा व्यवहार ' या शिर्षकाचा लेख संपादकीय म्हणून प्रकाशित झाला होता. त्या काळात केंद्रात राजकीय अस्थिरता होती. म्हणून देशाच्या आर्थिक स्थिरते साठी राजकीय पक्षात मतैक्य व्हावे या शिर्षकाचा मी लिहलेला एक छोटा लेख दै लोकसत्तेत पब्लीश झाला होता. नंतर लोकप्रभात या साप्ताहीकात 'अल्पसंख्यांक कोणाला म्हणावे ' या शिर्षकाचा माझा लेख प्रकाशित झाला.  सन १९९१-९२ साली  'आयुर्विमा क्षेत्रात  स्वदेशीचं महत्व ' हा १५०० शब्दाचा लिहलेला माझा लेख अर्थ वृत्तान्त पुरवणीत छापून आला होता. अर्थात हे सर्व लेख माझे परम मित्र, आर्थिक गुंतवणूक सल्लागार व अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे श्री विनायक कुळकर्णी यांच्या सहाय्याने छापून आले होते.   दै लोकसत्तेचे संपादक बदलले गेले आणि माझ्या लेखांना स्थान मिळेनासे झाले. सन १९७५ ला देशात आणिबाणी लावून वैचारीक स्वातंत्र्य छाटले गेले होते त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सरकारच्या विरोधात लढा उभारला गेला त्यात अग्रणी स्थानावर राहीलेले दै लोकसत्ता आज लिबरल अभ्यासकांचे हातचे बाहूले झाले आहे. माझे वृत्तपत्रात लेख छापून येण्याचा मार्ग बंद झाला तरी मी लेखन चालू ठेवले होते. त्यात राजकीय, सामाजिक तसेच अध्यात्मिक विषयावर ही लेख आहेत. त्यातील तत्कालीन राजकीय घटनावरील लेख ऑउट ऑफ डेट झाले आहेत असे नाही. कारण त्या घटनांना ऐताहासिक महत्व कायम असते. म्हणून सामाजिक विषयाच्या लेखांसोबत ते लेख ही मी जपून ठेवले आहेत. योग्य त्या वेळी ते ब्लाॅगवर प्रकाशित करीत राहणार आहे.                                                          आजच्या Digital युगात आपल्या सर्वसामान्यांना ही व्यक्त होण्यासाठी (ज्याला सोशल मिडीया मानतो अशी) blog, whatsapp,Twiter  इत्यादी माध्यमें अस्तित्वात आल्यामुळे जगभरातील कुठल्या ही देशातील कुठल्याही घटनां किंवा राजनैतिक विषयांवर नेगेटिव नॅरेटिव मांडून तेथील सरकार उलथुन पाडण्याची प्रचंड शक्ती असलेल्या लिबरल लाॅबीचा भारतीय खेळपट्टीवर पराभव होत आहे. जेव्हा सोशल मिडीया शक्तीशाली नव्हती अशा काळात अटल बिहारी वाजपेयींचे सरकार लिबरल लाॅबीने दोन वेळा पाडले होते. तिसर्यांदा निवडणूका झाल्यानंतर वाजपेयी सरकार विजयी झाले आणि पाच वर्षाचा काळ ते सरकार टिकले. पण २००४ च्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी लिबरल लाॅबीने मिडीया द्वारे नेगेटिव्ह नॅरेटीव मांडून वाजपेयी सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश आले. पण नरेंद्र मोदी यांचे सरकार दोन टर्म पुर्ण केलेलं युपीए नावाचं काॅग्रेस प्रणित आघाडी सरकारचा गलथान, मुस्लीम धर्जिणा,  प्रचंड भ्रष्टाचाराने माखलेला असा कारभार आणि खोटा-नाटा भगव्या दशहतवादाचे भूत उभे करण्याचे महापाप केल्यामुळे  जनतेच्या मनात प्रचंड असंतोषातून उदयास आलेलं आहे. याचं स्मरण जनतेला आज ही आहे. ही बाब लिबरल लाॅबीच्या ध्यानांत येत नाही. बरं दोन-तीन राज्यात काॅग्रेस सत्तेवर आली तरी त्या राज्यातील जनता लोकसभेच्या निवडणूकीत मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना व विकासाचे प्रकल्प पूर्ण करण्याची धमक पाहून भाजपाला मतें देते. या शिवाय मोदी सरकारच्या कार्याची स्तुती करणारी सोशल मिडीयावरील यु ट्युब चॅनेल्स, ब्लाॅग्ज सोबत मेन मिडीयातील चॅनेल्स आणि वृत्तपत्रांची संख्या वाढत आहे.                                                                    कोरोना नंतर आर्थिक मंदीच्या तडाख्याची झळ लागू नये म्हणून ज्यांचा व्यवसाय शस्त्रास्त्रे विकण्याचा आहे अशी बडी राष्ट्रे जगात काही तरी कुरापती काढून  युद्ध खेळतील वा खेळवतील असा अंदाज मी रशिया आणि युक्रेन मधील युद्ध सुरू होण्याच्या अगोदर एका लेखात मांडला होता. तसेच सांप्रत काळात महायुद्धापेक्षा आर्थिक महासत्तेची प्रचंड लालसा व त्यातूनच विकसनशील व अविकेसित देशात आपली हुकमत व आपल्या विचारसरणीचा प्रसार वाढावा म्हणून तेथील सरकार उलथुन पाडण्याचा उद्योग बडी राष्ट्रे करू लागली आहेत हे सत्य मी सतत मांडत आलो आहे. सन २०२४ च्या निवडणूकीत मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये असा चंगच काही बड्या राष्ट्रांनी बांधला आहे हे ही आपण जाणत आहात.                                                नेमक्या अशा वेळी रशिया आणि युक्रेन मध्ये सुरू असलेल्या युद्धात मोदी सरकार रशियाच्या समर्थनासाठी पुढे आले. त्यानंतर इजरायल आणि हमास मध्ये युद्ध  सुरू झाले. तेव्हा भारताने इजरायलला समर्थन दिले. रशिया- युक्रेन युद्धात अमेरिका व नाटो देशांना आपण दुखाविले. इजरायलचे समर्थन करून आपण मुस्लीम देशांना दुखविल्यामुळे आपल्या देशातील लिबरल लाॅबीचे चमचेगिरी करणारे पत्रकार व संपादक मंडळीं मोदी सरकारवर टिका करू लागले. आपला देश जगात एकाकी पडला आहे अशी अफवा पसरविण्यासाठी गल्ली-बोळातील डाव्या विचारसरणीच्या टपोरी मुलांनी सुद्धा आपल्या ज्ञानाची (वस्तुतः अज्ञानाची) तलवार पाजळयला सुरूवात केली. नेमक्या याच वेळी चार विधानसभा निवडणूकाचा प्रचार सुरू झाल्यामुळे, राहूल गांधीच्या भारत जोडो यात्रेमुळे संघ व भाजपाचे नफरतीचे राजकारण आता उघडे पडणार आणि चार ही राज्यात भाजपाचा दारूण पराभव होणार अशी आशा काॅग्रेस व तिचे समर्थक मिडीयातील मंडळींना लागली. आपल्या देशातील लिबरल लाॅबी चालवित असलेल्या पत्रकार व संपादक मंडळीकडून होणार्या टिकेवर सडेतोड आणि सत्य ती उत्तरे देण्याची अद्यावत यंत्रणा भाजपाने ही उभी केली आहे. तसेच काही यु ट्युबवरील इंग्लीश  हिन्दी आणि मराठी चॅनेल्स तटस्थेने माहिती देत आहेत. या सर्वांचा उपयोग मी गेल्या एप्रिल पासून करू लागलो आहे. त्यामुळे  मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येईल या संबंधित मी निंश्चीत आहे.                                                                    इजरायल आणि हमास मधील युद्ध तात्पुरता का असेना पण थांबलेले दिसते. तसे पाहता ते दोन देशातील युद्ध बिलकूल नाही. हमास या दशहतवादी संघटनेने इजरायलवर हल्ला केल्यानंतर स्वरक्षणासाठी इजरायलने केलेला तो प्रतिकार आहे.  इजरायलने हमासाचा खात्मा केला तरी तिसरे महायुद्ध होईल असे संभवत नाही. याचे कारण कुरापत काढणारा इराण स्वतः इजरायल समोर आलेला नाही. आपली हत्यारें कितपत उच्च दर्जाची आहेत या संबंधीची चाचणी इराणला करावयाची होती असे मला वाटते. दुसरे कारण असे आहे की अरबियन देश उघडरित्या हमासच्या पाठीमागे असली तरी त्यातील काही देश खाजगीत अमेरिका आणि काही देश चीनला हे युद्ध थांबवावे अशी विनंती करीत आहेत. अमेरिका आणि चीन या देशांची ' सांगता येत नाही आणि सहन होत नाही ' अशी अवस्था झाली असावी असा माझा अंदाज आहे. तथापी या युद्धा संबंधीत लष्कर व जागतिक राजकारणातील, अनेक देशाच्या परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक हे युद्ध थांबेल असे ठामपणे मांडत नाहीत.                                                                                    इस्लामी दशहतवादी संघटनांना अमाप पैशाचा वाटप करून जगभर अशांतता निर्माण करण्याची खाज  लिबरल मंडळीला जडली आहे. ही खाज फक्त काही इस्लामी देशांनाच जडली आहे असे नाही. अमेरिका, चीन, रशिया व कॅनडा इत्यादी देशाच्या नेत्यांना आणि तेथील पत्रकार मंडळीला ही जडली आहे. इस्लामी दशहतवादी संघटनांचा दशहत हा धंदा झाला आहे. त्या संघटनांचे नेते आणि त्यांची मुलें पॅलेस्टाईन मध्ये राहात नाहीत. ती मंडळी ऐषारामाचे जीवन जगत आहेत. पाकिस्तान व कतार सारखे देश हे दलालीचे काम करीत आहेत. या दोन्ही देशातील राजकीय नेते ही करोडपती आहेत. पैशाची लालच आणि धार्मिक गुरूच्या शिकवणीतून इस्लामी दशहतवादी रक्तपिपासू झाले आहेत. त्यांच्यावर युनोचा धाक काल ही नव्हता व आज ही नाही. स्वतः इराण आर्थिक बंधनात अडकला आहे त्यामुळे तो आणखिन बंधने वाढवून घेईल असे वाटत नाही. कारण तेथील नेत्यांना ऐषारामी जीवन जगण्याची नशा आहे. ते स्वतः व आपल्या कुंटुबियांना रस्त्यावर कधीच आणणार नाहीत. 

जगभरातील लिबरल पत्रकार मंडळींना माध्यमांद्वारें राजकीय घटनांवर मग त्या घटना कुठल्याही देशातील असो, त्यासंबंधी केवळ नेगेटिव्ह नॅरेटिव्ह मांडण्यासाठी लाखो - करोडो रूपये मिळत असतात. त्यांतूनच ते ऐषारामी जीवन जगत आहेत. ऐषारामात जगण्याची इच्छा झाली की मग आपल्या मालकांनी जसे लिहावयास सांगितले तसे लिहीले किंवा म्हटले की काम फत्ते. मग सर्वत्र प्रकाशझोतात राहण्याचा आटापाटा सुरू होतो. त्यानंतर ऐषारामाची सवय जडते. सवयीच्या पुढली पायरी म्हणजे नशा. आपल्या देशातील लिबरल मंडळी ही याच गोत्रातील आहेत. जगभरातील शोषण नष्ट करावयाचे आहे अशी भाषा करणारी हीच ती मंडळी. पण मुलतः ती जगातील सर्वात नराधम जमात.

ऑगस्ट महिन्यात इजरायल व हमास मधील सुरू झालेल्या लढाई बाबतचे दैनिक वृतान्त आणि त्यासंबंधीत जगभरातील विशेषतः अमेरिका, रशिया, चीन, भारत , युरोपियन देश आणि अरेबियन देशातील राजकीय नेते, राजकीय अभ्यासक, लष्करी तज्ञ आणि मिडीया काय म्हणत आहेत हे मी ऐकतो आहे. त्यातून  जे काही मला उमजले ते सत्य मी वरती मांडले आहे. लेखाचं शिर्षक आपल्या देशातील चार राज्याच्या निवडणूकां संबंधित आहे, पण तरी ही इजरायल व हमास मधील युद्धाचा विषय मी इथे मांडला. याचे कारण असे आहे की आपल्या देशातील  विरोधी पक्ष आणि त्यांची समर्थक मिडीया सन २०१४ पासून स्वतःला लिबरल म्हणवत भाजपा, मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर खोटे-नाटे आरोप करीत जनतेला भडकाविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपा, पंतप्रधान मोदी, व संघाच्या पाठिशी बहुतांश मतदार  ठामपणे उभा आहे. चार पैकी तीन राज्यात भाजपाला यश मिळाले आहे याचे मला बिलकूल आश्चर्य वाटले नाही. कारण जगात जी अशांतता आहे त्याला कारणीभूत असलेली वर नमुद केली आहे त्या नराधम जमातीचे साहाय्य आपल्या देशातील विरोधी पक्ष उघडपणे घेत आहेत. त्याबद्दल ही जनतेत असंतोष आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या  सांप्रत जगात आपल्या देशातील बहुतांश मतदार देशाचे संरक्षण आणि परराष्ट्र धोरण कसे आहे या मुद्यावर ही मतदान करू लागला आहे. यावर विरोधी पक्षांचे लक्ष जात नाही. पंतप्रधान मोदींनी इजरायलच्या प्रतिकाराचे समर्थन केले. कारण दशहतवाद्यांची झळ जगात भारता इतकी दुसर्या कुठल्या ही देशाला पोहचली नाही. पण चार राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात आपल्या येथील विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींवर टिका करावयास सुरूवात केली. पंतप्रधान मोदींनी पॅलेस्टाईनच्या हक्काचे ही समर्थन केले आहे. मुळात पॅलेस्टाईन अस्तित्वात नव्हतेच पण इजरायल अस्तित्वात होते. जगातल्या पाशवी वृत्तीच्या राक्षसांनी इजरायल व भारतीय जनतेला सर्वात अधिक त्रास दिलेला आहे. यावर विरोधी पक्षांची नेते मंडळी सतत मौन पाळतात. पण हिटलर वर टिका करतात कारण त्यांना चर्चील आणि स्टॅलीन यांची शांततेचे दूत म्हणून जगाच्या इतिहास कोरून ठेवायाचे होते. तसे त्यांनी केले. पण काळ बदलला आणि या लिबरल मंडळीच्या घराचे वासे ही फिरू लागले आहेत.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी कतार ला सरळ केले आणि चीन, अमेरिका, तुर्की देशांची फिकीर बाळगली नाही. पाकिस्तानला त्यांनीच तयार केलेल्या विषाचे डोस पाजायला सुरूवात केले असल्याचे ऐकीवात आहे. ते खरे आहे की नाही यावर विचार करण्याची गरज नाही. कारण जिथे चीन सारख्या देशाला चूपचाप बसविले आहे तिथे पाकिस्तान ' किस पेड की मूलीं !' तरीही विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या जिभेवर मुस्लीम समाजाच्या मताच्या चवीची हाव काही केल्या सुटत नाही. मुलतः जगभरातील  लिबरल मंडळी लिबरल नाहीच. ती एक extrimist टोळी आहे. काँग्रेस पक्ष त्या extremist टोळीच्या चरणी लोंटागण घालीत आहे. सन २०१४ पासून सुरू झालेला हा सिलसिला आजही कायम आहे. मोदी सरकारचा सर्व क्षेत्रातातला कारभार जनहिताचा व राष्ट्र हिताचा आहे हे बहुतांश मतदारांना वाटत आहे. हे सत्य मी ब्लॉगवर सतत मांडत आलो आहे. 

भाजपाने सन २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषीत केले, तेव्हा  केंद्रात युपीएचे सरकार होते. निवडणूक संपल्यानंतर मी दै मुबंई सकाळ मध्ये पाठविलेला ' लोकसभा निवडणूक २०१४  शोध व बोध ' हा संपादकीय लेख प्रकाशित झाला होता. त्या बद्दल दै मुंबई सकाळच्या संपादकांचे जीमेल वरून आभार ही मानले. त्या निवडणूकीच्या प्रचाराच्या धुलवडीत महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रताप आसबेंचा ' मोदी नावाचा जाहिरतीचा चेहरा ' असा लेख आला होता. त्यावर प्रत्युत्तर म्हणून मी मटाकडे लेख पाठविला होता पण छापून आला नाही. तो ही वेगळ्या शिर्षकाने योग्य वेळी प्रकाशित करीन. सन २०१४ च्या निवडणूकीत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंगचा चेहरा कमकुवत ठरला. त्यात ही ते नामधारी पंतप्रधान होते. प्रत्यक्ष सरकार काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी सरकार चालवत होत्या. त्यावेळी कधी नव्हता इतका प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. त्याचे स्मरण जनतेला आज ही आहे. मोदींनी पंतप्रधान या नात्याने देशातील बहुतांश राज्यात विकासाचे प्रकल्प सुरू केले आहेत. त्यातील बहुतांश प्रकल्प जलद गतीने पुर्ण करून दाखविले आहेत. म्हणून ' मोदी म्हणजे गॅरेन्टी ' ही टॅग लाईन तीन राज्यातल्या लोकांना चांगलीच भावली असे दिसते. 

ज्यावेळी देशातील इतर राज्यातील मुख्यमंत्री झोपा काढत होते तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदींनी वायब्रन्ट गुजरात असा नारा देत, अहो रात्र मेहनत करून गुजरातला उद्योगाची हब बनविले. गुजरात राज्याला देशातील सर्वात विकसीत राज्य म्हणून असा दर्जा मिळवून दिला. विकासाचे गुजरात मॉडेलवर सतत टिका करणे, त्यांना मौतका सौदागर, एक चायवाला, चौकीदार चोर आहे, पाकवर केलेला सर्जिकल स्ट्राईक खोटा आहे, रॅफेल घोटाळा आणि अलिकडे पनौती अशी लेबलं राहून पंतप्रधान मोदीं हुकूमशहा आहेत असा अपप्रचार करण्यात विरोधी पक्ष आणि त्यांचा समर्थक मिडीया गुंतला आहे. केवळ गुंतला असता तर चालले असते पण त्यातच विरोधी पक्ष रमत आहेत. विरोधी पक्षांनी राजकारणाचं रूपांतर चिखलात केले आहे. त्या चिखलात विरोधी पक्षांचे नेते मंडळी अधिकाधिक रूतून जात आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे  कार्यकर्ते, आणि समर्थक पत्रकार व संपादक मंडळी सुद्धा रूतत आहे. मी या खेपेस निवडणूक प्रचाराच्या ना सभा पाहिल्या, ना इलेट्रॉनिक्स मिडीया तर्फे रस्त्यावर, चौकात, व मतदारांच्या वस्तीत जाऊन घेत असलेल्या मुलाखती पाहील्या. निवडणूक प्रचार काळात आणि निवडणूकीनंतर सुद्धा मी ना ओपिनियन पोल पाहिले, ना राजकीय अभ्यासकांची चर्चा पाहिली. कारण निवडणूका हा लोकशाहीच्या गळ्यातील दागिना राहीला नाही. त्याला प्रत्येक प्रान्तात निर्माण झालेले घराणेशाही पक्ष, डावे पक्ष,  राजकारणात घराणेशाहीला जन्म देणारा काँग्रेस पक्ष आणि देशातील अनादी काळापासून चालत आलेल्या सनातन संस्कृतीची हेटाळणी करणारे विरोधी पक्षांचे नेते मंडळी व लिबरल नावाची भुतें जबाबदार आहेत.                                                          चार राज्यातील निवडणूका च्या निकालाने सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकात भाजपाला व मोदी सरकारला विजय मिळणार आहे हे अधोरिखीत झाले आहे. प्रश्न भाजपाला किती सहजपणे आणि किती मोठ्या प्रमाणात विजय मिळेल हाच उरला आहे. यापेक्षा इथे अधिक काही लिहीण्याचे उरले नाही. म्हणून मी इथे थांबतो. 

आपण व आपले उत्सव--मातृदिन (भाग १)

आपण व आपले उत्सव-- मातृदिन   देवीयों और सज्जनो नमस्कार ! हमारी मातृभूमी को देव-देवताओंकी भूमी माना जाता है | इसका कारन हमारे यहाँ सृष्टी हर ...