दिल्ली राज्य हे भारताची छोटी प्रतिकृती आहे. म्हणून मी आपच्या विजयाचं महत्व नाकारीत नाही. कारण सध्या सर्वात शक्तिमान झालेल्या भाजपा ची म्हणजे पुर्वीच्या भारतीय जनसंघाच्या विजयाची पहिली पताका दिल्लीतील महापालिकेच्या निवडणूकीतच फडकली होती असे आठवते. म्हणून आप पार्टी भाजपाला राष्ट्रीय पातळीवर पर्याय ठरेल अशी सुतराम शक्यता नाही. तसेच आम आदमी पार्टी काॅग्रेसची जागा घेऊ लागली आहे असा निष्कर्ष काढणे उतावीळपणाचं ठरेल. याची कारणे खालील प्रमाणे आहेत.
बुधवार, २१ डिसेंबर, २०२२
दिल्ली पालिका निवडणूक निकाल -- धावते विश्लेषण
हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल -- धावते विश्लेषण
मागील लेखात निवडणूकांच्या निकालाच्या अनुषंगाने येणार्या विषयांचा म्हणजे लोकप्रतिनिधींचे व्यक्तिमत्व, देहबोली, कार्यपद्धत, सामाजिक बांधिलकी व त्यांच्याकडे येणार्या विकास निधीचा ते विनियोग कसा करतात, त्यासाठी आवश्यक असलेली कार्यकर्त्यांची सक्षम फौज इत्यादी बाबीवर चर्चा केली आहे. अशा बाबीं सकारात्मक असल्या की उमेदवार लोकसभेची, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावरील निवडणूक बहुतांशी हमखास जिंकतात. अशा वेळी त्यांना त्यांच्या पक्षाच्या शिर्षस्थ नेत्याच्या करिष्म्याची जरूरी नसते हे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
नेमके तेच हिमाचल प्रदेश मधील निकालातून स्पष्ट झाले आहे. ते कसे हे संक्षिप्त रित्या खालील तक्त्यावरून स्पष्ट दिसते.सन २००७
भाजपा काॅग्रेस
४१ जागा २३ जागा
भाजपा काॅग्रेस
सन २०२२
४४ वरून २५ २१ वरून ४०
वरील तक्त्यावरून हे लक्षात येते की हिमाचल प्रदेश मध्ये मोदींचा करिष्मा या वर्षाच्या निवडणूकीत चालला नाही असे विरोधी पक्ष मांडत आहेत ते प्रथमदर्शनी पटते. कारण त्यांचे लक्ष्य मोदी हटाव हेच आहे. असे असले तरी भाजपाचं हिमाचल प्रदेश मध्ये सारं काही अलबेल होतं अशी स्थिती नव्हती ही वस्तुस्थिती मला मान्य आहे. जर मोदींची जादू चालली नाही असे मानले तर सन २०१७ ला राहूल गांधीचा करीष्मा चालला नव्हता हे ही सत्य मान्य करावे लागते.
हिमाचल प्रदेशचे भौगोलिक स्थान तेथील लोकांचा व्यवहार, स्वभाव या संबंधीचा जो थोडाफार काही अभ्यास केला आहे त्यावरून तिथे प्रांतीय अस्मिता ऐवजी राष्ट्रीय अस्मितेचा बोलबाला अधिक आहे. म्हणून तेथील जनतेचा ओढा भाजपा आणि काँग्रेस पक्षाकडे असतो. बहुतांशी हिंदी भाषिक राज्यात अशीच स्थिती आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश मध्ये इंदिराजी नंतर आणि विशेषतः राजीव गांधीच्या हत्यानंतर या दोन्ही राज्यात स्थानिक स्तरावरील नेत्यांनी काॅग्रेसचे लचके तोडण्यास सुरूवात केली आणि काॅग्रेस नामशेष झाली. हिंदी भाषिक राज्यात जनसंघाला पाय रोवायला संधी मिळत गेली. त्यामूळे हिमाचल प्रदेश मध्ये ही भाजपा काॅग्रेसचा प्रतिस्पर्धी झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य, भाजपाची विचारसरणी आणि संघटन कौशल्य ही भाजपाची शक्तीस्थळे आहेत
राजकीय विश्लेषकांची वृत्ती संबंधी मी मागील लेखात भाष्य केले आहे. त्यामुळे विरोधी पक्ष आणि समर्थक मिडीयांनी हिमाचल प्रदेशाच्या निवडणूक निकालावरुन भाजपाचा लोकसभेच्या निवडणूकीत पराभव होईल अशी हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यातून त्यांच्या हाती काही लागणार नाही. असा अनुभव सन २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुक निकालातून आला आहे. पुढील वर्षी ज्या राज्यात निवडणूका येऊ घातल्या आहेत अशी राजस्थान, मध्यप्रदेश, आणि छत्तीसगड ही राज्यें ही हिमाचल प्रदेश प्रमाणे प्रान्तीय अस्मितेच्या लागण पासून १०० कोस दूर आहेत. म्हणून राजस्थान, आणि छत्तीसगड मध्ये भाजपा परत सत्तेवर येऊ शकेल.
सोमवार, १९ डिसेंबर, २०२२
निवडणूकांचे निकाल - राजकारण, विकास व उमेदवारांची विश्वासार्हता .
गेल्या आक्टोबर महिन्यात ' शक्ती देवता ' या विषयावर ९ भागाची लेख मालिका पब्लिश केली. नोव्हेंबर महिना दिल्ली पालिकेच्या, हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या धामाधुमीचा होता. तेथील निवडणूका संपल्या आणि निकाल ही लागले तरी ही मी त्यावर लेख लिहीले नाहीत. याचे आपल्याला आश्चर्य वाटले असेल. म्हणून प्रथम त्या संबंधीचा खुलासा करतो.
गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२
शक्ती देवता : भाग ९
शक्ती देवता : भाग ८
शक्ती देवता : भाग ७
शक्ती देवता : भाग ६
आपण व आपले उत्सव--मातृदिन (भाग १)
आपण व आपले उत्सव-- मातृदिन देवीयों और सज्जनो नमस्कार ! हमारी मातृभूमी को देव-देवताओंकी भूमी माना जाता है | इसका कारन हमारे यहाँ सृष्टी हर ...
-
मंडळी, मागील लेखात आपण असुरक्षिततेच्या भावनेपोटी, मनुष्य समूहात राहू लागला आणि नंतर समाज व्यवस्था उभी राहीली, हे पाहिलं. त्याच लेखात स...
-
आज जेष्ठ शु१३ शके १९४२ शिवराज शक ३४७ गुरूवार दिनांक ४जून २०२०. आजच्या दिवशी म्हणजे जेष्ठ शु१३ शके १५९६ अर्थात ६ जून १६७४ रोजी शिवाजी महार...
-
आपण व आपले उत्सव--- रक्षाबंथन (भाग १) नमस्कार मंडळीं, वयोमानानुसार तब्येतीच्या कुरबुरी सुरू होणे हे स्वाभावि...






