मंगळवार, १५ जून, २०२१

देशाच्या राजकीय मंचावरील शो - महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया पश्चीम बंगाल (भाग ३)



' देशाच्या राजकीय मंचावरील शो-- महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया पश्चीम बंगाल ' या शिर्षकाचे दोन लेख १मे २०२१ आणि १४ मे २०२१ ला ब्लाॅगवर पब्लीश केले आहेत. या तिन्ही राज्यातील सरकारांनी केंद्र सरकारशी संघराज्य पद्धतीच्या नावाखाली विदेशी शक्तीच्या साह्याने उभे केलेल्या तंट्यांनी देशातील राजकीय अवकाश व्यापून टाकले आहे. स्वाभाविकतः या तीन राज्यातील घडामोडीवर अधिक चर्चा होत आहे.  त्यापैकी बंगाल राज्य अंशात आणि धगधगता झाला आहे.  बंगाल मध्ये ममता बॅनर्जीचा पक्ष  प्रचंड बहुमत मिळवून पुन्हा सत्तेवर बसला आहे. त्यामूळे सो काॅल्ड पुरोगामी आणि सेक्युलरीस्ट मंडळींच्या लाडक्या वाघीणीने केंद्र सरकारशी सुरू केलेला तंटा लौकर मिटेल असे सध्या दिसत नाही. म्हणून बंगालमधील स्थितीवर दोन स्वतंत्र रित्या लेख लिहून चर्चा केली असली तरी पुढे ही स्वतंत्र रित्या चर्चा करावी लागेल अशीच तिथली स्थिती आहे. 

'ऑक्सीजनच्या स्टाॅक संबंधी ऑडीट करू या' असा इशारा न्यायालयाने देऊन एखादा गारूडी, बाहेर फणा फडकावित असलेल्या सर्पाला आपल्या टोपलीत बंद करून ठेवतो, त्याच पद्धतीने न्यायालयाने दिल्लीतील केजरीवाल नावाच्या सापाला सध्या टोपलीत बंद करून ठेवलं आहे. म्हणून केजरीवाल सध्या तरी स्वस्थ बसले आहेत.

महाराष्ट्रातील  मविआ सरकार सत्तेवर आल्यापासून केंद्र सरकारशी सतत झगडत आले आहे. त्यातील एक घटक पक्ष स्वतःला वाघ समजतो. दुसरा पक्ष स्वतःला जाणता राजा तसेच टग्या समजतो तर तिसर्या पक्षाला म्हणजे काॅग्रेसला मिळालेली सत्ता स्वप्नवत वाटत असल्यामूळे तो पक्ष झोपलेला होता. तो आताच कुठं जागा झालेला दिसतो. पण तो पक्ष सरकार पाडण्याचे कृत्य करणार नाही. कारण त्या पक्षाची ताकद पुर्वीसारखी राहिलेली नाही आणि अशा अवस्थेत झाकली मूठ सव्वा लाखाची हे धोरण काॅग्रेससाठी शहाणपणाचे ठरते. राष्ट्रवादी काॅग्रेसच्या मुखीयाला हे सरकार पडवयास हवे आहे. पण स्वपक्षाचा गृहमंत्र्यावर वसूलीचे आरोप असल्यामूळे सरकार पाडण्यासाठी नैतिक कारण त्यांजपाशी नाही. अशीच अवस्था शिवसेनेची आहे. मविआ सरकार स्थापन करण्यात पुढाकार शरद पवारांनी घेतला. त्याचा त्यांना आनंद ही झाला. त्या आनंदाच्या भरात
" संपुर्ण देशात विरोधी पक्ष एकत्र येण्याची सुरूवात झाली आहे आणि  देशभरातील प्रत्येक राज्यातून आंमत्रणे येऊ लागली आहेत " असे जागोजागी ते सांगू लागले. परंतु  शरद पवारांना लालूच्या तेजस्वी यादवाने बिहार निवडणूकीत मार्गदर्शन देण्यासाठी बोलाविले नाही आणि ममता बॅनर्जीने ही बोलाविले नाही. ते महाराष्ट्रातच अडकून पडले आहेत. तरी ही जितेंद्र आव्हाडांना ममता बॅनर्जीच्या विजयात शरद पवारांचे अदृश्य हात आहेत असे दिसले. आपल्या अंनिस च्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर सोयीने दुर्लक्ष केले असावे. एक तर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांना काही महत्व देणे गरजेचे वाटले नसावे किंवा मिस्टर इंडिया चित्रपटातील हाताला घड्याळ बांधून मनुष्याला अदृश्य होता येते ही बाब विज्ञानाच्या साह्याने  कधीतरी तरी अंमलात येईल असे ही वाटले असावे. ते कसेही का असेना, पण मला मात्र अंनिस च्या कारभारावर ही शरद पवारांचा अदृश्य प्रभाव असावा असे  वाटू लागले आहे.  अदृश्य शक्ती असुनही शरद पवार लाडक्या गृहमंत्र्याला वाचवू शकले नाहीत.  म्हणून ते महाराष्ट्रातील राजकारणाच्या दलदलीत रूतू लागलेले दिसतात. शेवटी त्यांना गुप्तपणें अभदाबादमध्ये देशाच्या गृहमंत्र्यांना भेटावे लागले. शरद पवारांनी अमित शहांची घेतलेली भेट एक राजकीय चाल असावी असे त्यांच्या समर्थकांना वाटले असेल पण मला मात्र शरद पवार अमित शहांकडे तडजोड करण्यासाठीच गेले असावे असेच वाटते. 

महाराष्ट्रातील मविआ सरकार हे निवडणूक निकाला नंतर आघाडी करून जन्माला आलेले एक ॲबनार्मल अपत्य आहे. त्यामूळे त्याची तब्येत तोळामासाची आहे. थोडसं कुठे इन्फेक्शन झाले की आयसीयु मध्ये ठेवावे लागते. या संबंधीत देशातील सेक्युलर राजकीय डाॅक्टर 
' Unknown Viras चे इन्फेक्शन ' असे आपले निदान मांडतात. अशा सरकार कडून जनहिताच्या कारभाराची अपेक्षा ठेवता येत नाही. एव्हांना मतदारांना ही मविआ सरकारची जन्मपत्रिका ठाऊक झाली आहे. तरीही  महाराष्ट्रातील मविआ सरकाराच्या तिन्ही घटक पक्षांनी दिल्लीतील केंद्र सरकारशी भांडण करण्यात आतापर्यंत एकता दाखविली आहे. पण प्रत्यक्ष दिल्लीत गेल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरें यांना पंतप्रधान मोदींची स्वतंत्र रित्या भेट घेण्याचा मोह झाला. काॅग्रेसचे अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या सोबत एकदा भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची पुन्हा स्वतंत्र भेट घेतली. ती का आणि कशी घेतली या संबंधीची माहिती जनतेला मिळण्याची गोष्ट राहिली बाजूला पण घटक पक्षांचे जे दोन नेते सोबत होते त्यांना ही कळले नाही. मागे हायकोर्टाच्या न्यायाधिशांची मुख्यमंत्र्यानी भेट घेतली होती. कदाचित मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांची व न्यायाधिशांची स्वतंत्रपणे भेट घेण्याचा हक्क आघाडी सरकारच्या काॅमन मिनिमियम प्रोगाम मध्ये असावा किंवा संसदीय परंपरांचे ज्ञान मुख्यमंत्र्यांना  नसावे. पाठोपाठ संजय राऊतने पंतप्रधान नरेंद्र मोदी संबंधी गौरवोद्गार काढले आहेत. दुसर्या बाजूला शरद पवारांनी निवडणूक तज्ञ प्रशांत किशोर यांना आपल्या घरी बोलावून चर्चा केल्याचे वृत्त आले. यातील विशेष  म्हणजे उद्धव ठाकरें यांनी २०१९च्या  विधानसभेच्या निवडणूकीत प्रशांत किशोरांचे मार्गदर्शन घेतले होते पण स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही.आढ्यात नाही तर पोहर्यात कोठून येणार हो. या तीन घटनांमूळे  मिडीयाला चर्चेसाठी अनासायाने एक मोठं घाबाड मिळाले आहे. त्यामूळे महाराष्ट्रात उलथा-पालथ होईल वा मध्याविधी  निवडणूका होतील अशी चर्चा सुरू झाली आहे.

अशा प्रकारच्या चर्चा मिडीयात होऊ लागतात तेव्हा सरकार मधील पक्षांकडून किंवा पक्षांच्या नेत्यांकडून मिळालेल्या पैशांचा तो एक खेळ असतो. आर्थिक मंदी कितीही मोठी असो पण मिडीया आणि राजकीय पक्षांच्या धंद्यात मंदी येत नसते. हे एक आजच्या व्यापारी युगाचं एक व्यवच्छेदक लक्षण ठरले आहे. सत्ताधारी पक्षांतील धुसफूस असो वा विरोधी पक्षातील धुसफूस असो पैशामूळे ती उघडकीस येत असली तरी त्यातील सत्यता जाणून घेण्यासाठी पैसे मोजले तरी संपूर्ण सत्य हाती येतेच असे काही नाही. शरद पवारांनी अमीत शहा यांची अमदाबाद येथे भेट घेतली. त्याला किती दिवस होऊन गेले तरी महाराष्ट्रात राजकीय भूकंप काही झाला नाही.  दरम्यान देंवेद्र फडणवीस यांनी शरद पवारांची घेतलेली भेट आणि एकनाथजी खडसेंच्या घरी जाणे, पण त्याच वेळेस एकनाथजी खडसे शरद पवारांना भेटावयास जाणे इत्यादी घटनांमधून राजकीय खिचडी शिजत असल्याचा वास मिडीयांना आला. मिडीयांचे  एक सुत्र नावाचे अपत्य आहे ते कसं आहे ते आपल्या सारख्या सामान्यजनांनी पाहावयास मिळत नाही. ते ही अदृष्य स्वरूपात असेल तर जिंतेद्र आव्हाडांशी आपण मैत्री केली तर आपल्याला पाहावयास मिळेल अशी आशा ठेवू या. एकंदरीत ज्या पक्षांनी मविआ सरकार साठी पुढाकार घेतला तेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेस परस्परांत शह-काटशहाचे राजकारण करीत आहेत एवढे मात्र खरे आहे. दुसरे सत्य हे आहे की या दोन्ही पक्षातील शह-काटशाहचे नाटक कितीही रंगले तरी त्या नाटकाचा अंत कधी होणार हे फक्त मोदी-शहा जोडी  जेव्हा या बाबतीत सक्रीय होईल त्यावर अवलंबून आहे. मग ते कसे काय? असा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू या.

मुलतः मविआ सरकारचा जन्म मोदी-शहांना शह देण्यासाठीच झाला आहे. त्यामूळे भाजपाच्या सोयीची वेळ येत नाही तो पर्यंत महाराष्ट्रातील सरकाराला धोका नाही. कारण त्या सरकारातील घटक पक्षांना तिष्ठत ठेवणं ही  सध्या तरी भाजपाच्या अधिक सोयीचं आहे. दिल्लीतील  शाहीनबाग चे धरणं आणि दिल्लीतील किसान मेळाव्याला विदेशी पैशाचं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मिडीयाचं फार मोठं पाठीबळ होतं. म्हणजे जवळपास International community ने भारत सरकार विरूद्ध कट रचला होता. तोच फसला. कारण पंतप्रधानांनी किसान नेत्यांची व त्यांना पाठींबा देणार्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची राजकीय जाण व कुवत काय आहे हे जोखले होते. कट रचणारे किसान नेते आणि विदेशी शक्तींचे शेतकर्यांप्रती असलेले बेगडी प्रेम एक्सपोज झाले . जोडीला विदेशी शक्तीच्या आहारी जाऊन प्रजासत्ताक दिनी आंदोलकांनी जो गोंधळ घातला तो ही देशद्रोही आणि अतिरिक्यांच्या धाटणीत.  किसान आंदोलनाला रसद पुरविणार्या विदेशी शक्ती तोंडघाशी पडली. नंतरची घटना म्हणजे कोरोनोची दुसरी लाट आणि लस निर्मिती संबंधी भारताला बदनाम करणार्या शक्तींना शक्तीहीन करून टाकले. अमेरिकेचे अध्यक्ष श्री बायडनची भाषा बदलली. पाठोपाठ ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनची भाषा बदलली. हा आहे आपल्या पंतप्रधान मोदींचा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारणातला दबदबा. सुश्री ममता बॅनर्जींने सुरू केलेला ' खेला ' कितीही मोठ्या शक्तीचा असला तरी त्याला वेसण कशी घालायाची याची केंद्र सरकारने  व्यवस्थित रित्या आखणी केली असणार. संविधानातील कलमें तसेच राष्ट्रीय महिला आयोग, मानवाधिकार आयोग, सेंट्रल एजन्सी यांच्या हस्तक्षेपातून आणि न्यायालयातील केसेस द्वारे मर्यादा पडणारच आहेत. एक प्रकारे ममता बॅनर्जींचे जितंके खच्चीकरण करता येईल तितके केंद्र सरकार करेल. या सार्या घटनांतून  मविआ सरकारातील शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काॅग्रेसला काही विशिष्ट संकेत, संदेश, आणि बोध मिळाला असावा. मविआ सरकार आकारात येताना जी स्थिती होती तशी आता राहिली नाही.ममता बॅनर्जींच्या डोक्यावर केंद्र सरकारची टांगती तलवार आहे तशीच तलवार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर ही आहे. तिसरी आघाडी किंवा सार्या विरोधी पंक्षांची आघाडी जन्मास येण्याची शक्यता जवळपास संपली आहे. मोदी सरकारने विदेशी शक्तींना पाणी पाजून डाव त्यांच्यावरच उलटावला. त्यामूळे सेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षांमध्यें केंद्र सरकारशी जवळीक साधण्याची स्पर्धा निर्माण झालेली दिसते.

महाराष्ट्रात मविआ सरकार मधील धुसफूस सुरू राहणे ही बाब  हे केंद्र सरकारच्या पथ्यावर पडली आहे. अर्थात याची चाहूल ठाकरे आणि शरद पवारांना लागली आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देऊन शरद पवार फसले आहेत. तसेच मुख्यमंत्रीपद घेऊन उद्धव ठाकरे शरद पवारांच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांना त्यातून बाहेर पडणे शक्य होत नाही. भाजपा कुठल्याही स्थितीत महाराष्ट्रात राष्ट्रपतीची राजवट लागू करणार नाही. मविआ सरकार पाडून शिवसेनेसोबत किवा राष्ट्रवादी काॅग्रेस सोबत सरकार स्थापन करेल असे तर मूळीच संभवत नाही. पंतप्रधानांची स्वतंत्र भेट घेतली म्हणून उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पुन्हा हिंदुत्वाचा आसरा आपल्या अटी शिवाय देण्याचा मुर्खपणा भाजपा करेल हे ही संभवत नाही. श्री देवेंद्र फडणवीसांना औटघटकेचे मुख्यमंत्रीपद देऊन जी नाचक्की केली आहे त्याचा बदला घेतला जावा अशी अनेक भाजपाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा असेल. म्हणजेच एक प्रकारे मोदी-शहांवर दबाव आहे. त्यामूळे या दोन्ही पक्षांना खेळवत राहण्यापलिकडे भाजपाकडे सध्या पर्याय नाही.

महाराष्ट्रातील  काॅग्रेस पक्षाला फुकटची सत्ता मिळाली आहे. त्यामूळे मविआ सरकार पडले तरी काॅग्रेसला फरक पडत नाही. कारण गमाविण्या सारखी खाती नाहीत. उलट 'आम्हीच कडवे भाजपा विरोधी आहोत असे म्हणत शरद पवार आणि उद्धव ठाकरें यांनी आघाडी धर्म पाळला तर नाहीच, उलट वसूली करीत राजधर्म बुडविला ' असा प्रचार करण्याची संधी काॅग्रेस सोडणार नाही. काॅग्रेसची अशी संभाव्य रणनीती भाजपाच्या धुरीणांना ठाऊक आहे ,पण त्याची फारशी फिकीर भाजपा करणार नाही. राष्ट्रीय पातळीवर काॅग्रेस कधी नव्हती इतकी कमकुवत झालेली आहे. म्हणूनच भाजपा Wait and Watch मोड वर राहील. कुठलेही कष्ट न उपासता म्हणजेच हाती राष्ट्रपती राजवटचे शस्त्र न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा जो कोंडमारा होतो आहे तो दुरून भाजपा पाहात राहील, आणि काॅग्रेसला मविआ सरकारमध्ये नामधारी आहे, तिला तशीच राहू देईल.

मग भाजपा साठी योग्य वेळ कोणती असू शकेल हा प्रश्न शिल्लक राहतो. यावर चर्चा करताना शरद पवारांची स्थिती काय आहे ती विचारात घेणे आवश्यक आहे. शरद पवारांनी निवडणूक तज्ञ प्रशांत किशोरांशी चर्चा केली आहे. त्यासंबंधी जाणकारांची मतें भिन्न आहेत. मविआ सरकारचे शिल्पकार शरद पवार आहेत. म्हणून त्यांच्या हाती सरकारची सुत्रे असतील अशी जी सर्वसाधारण समज होती तिला छेद दिला गेला. हा छेद मुख्यमंत्र्यांनी दिला असा सार्वत्रिक अंदाज आहे. मला तसे वाटत नाही. सुशांतसिंग च्या आत्महत्येच्या प्रकारणामुळे सचीन वाझेला पोलीस खात्यात पुन्हा आणण्याची मुख्यमंत्री ठाकरेंना गरज भासली. तेथून मुख्यमंत्री आणि शरद पवारांत मतभेद सुरू झाले. याचा अर्थ हा आहे की सुशांतसिंगचे प्रकरण सीबीआकडे आपसूक चालून आले. म्हणजेच सारी सुत्रे केंद्र सरकारकडे आली. तेथूनच गृहमंत्री अनिल देशमूख गोत्यात आले. त्यांना राजीनामा द्याला लागला हा शरद पवाराचा मोठा पराभव झाला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकाच वेळी जात्यात येण्याची शक्यता सिबीआय आणि एनआयएच्या तपासातून निर्माण झाली. त्यातूनच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना केंद्र सरकारच्या मेहरबानीची गरज उद्भवली.  हीच महाराष्ट्रातील सद्य राजकीय स्थिती संबंधीची सर्वात महत्वाची मेख आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार ह्या दोघांसमोर ज्या अडचणी उभ्या आहेत त्याचा तौलानिक अभ्यास केला असता उद्धव ठाकरेंना राजीनामा देणं म्हणजे नैतिकतेचा आधार नसलेला राजीनामा म्हणजेच पलायन मानले जाईल. मग निवडणूका आल्याच. म्हणजे मरणाच्या खाईत उडी मारणे ठरेल. शरद पवारांनी प्रशांत किशोरांशी चर्चा केली आहे. त्यातून दोन गोष्टी दिसतात. पहिली म्हणजे हवा तितका पैसा खर्च करून राष्ट्रीय स्तरावर स्वतःची तिसर्या आघाडीचा नेता म्हणून  प्रतिमा उभी करणे शक्य होईल का याची चाचपाचणी करून घेणे ही होय. दुसरी गोष्ट म्हणजे अनिल देशमूख प्रकरण पुढे सरकण्याच्या अगोदर मविआ सरकारचा पाठींबा काढून राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात आणणे जेणे करून अनिल देशमूख यांच्या वरील कारवाईचे चक्र धिम्या गतीने प्रवास करते होईल. त्यातून येणार्या विधानसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काॅग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उभारेल का हे ही जाणून घेणे ही एक प्रशांत किशोरांना शरद पवारांनी बोलाविण्याचे कारण आहे . भाजपासाठी योग्य वेळ ती हीच, ' मविआ सरकारातील घटक पक्षांनेच सरकार पाडावे.'  भाजपाकडे दुसरा पर्याय म्हणजे  ३५६ ची धारदार तलवार हाती घेऊन सर्व हत्या-आत्महत्यांची आणि आर्थिक घोटाळ्याच्यी प्रकरणे हाती घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेसचे खच्चीकरण करणें.  त्यासाठी केंद्र सरकार प्रथम पश्चीम बंगालमध्ये ममता बॅनर्जीना बॅकफूटवर आणेल त्यानंतर महाराष्ट्राच्या स्वारीवर येईल. ते कसे त्यासंबंधी चर्चा स्वतंत्र लेखात करू या. तुर्तास इथे थांबू या.

बुधवार, २६ मे, २०२१

धगधगता पश्चिम बंगाल (भाग २ )


पश्चीम बंगाल मधील निवडणूकीचा निकाल आल्यानंतर तृणमुल काॅग्रेसच्या जिल्हा आणि तालूका पातळीवरील कार्यकर्त्यांचा धुडघूस वाढला आहे. जागोजागी भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या होऊ लागल्या आहेत. भाजपाच्या कार्यालयाची मोडतोड होऊ लागली आहे. महिलांचा छळ होत आहे. जणू काही पश्चीम बंगाल मध्ये असुरांचे राज्य आले आहे असे वाटण्याइतपत बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेतेचा ताबा तृणमूल काॅग्रेसच्या गुंडाच्या हाती आला. भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या, मारपीट, त्यांच्या मालमत्तेची फोडतोड दिवसा ढवळ्या होत आहेत. हिंदु समाजातील बांधवांना विशेष करून ज्यांनी भाजपाला मते दिली आहेत अशांना खेचून मारले जात आहे. तृणमूल काॅग्रेसचे जे नेते आणि कार्यकर्ते भाजपात आले आहेत अशांची ही गय केली जात नाही. देशाच्या शत्रू देशांना ही लाजवेल असे कुकर्म करण्यात तृणमूल काॅग्रेसचे कार्यकर्ते गुंतले आहेत. माणूसकीला काळीमा लावण्याइतपत तृणमूल काॅग्रेसचे कार्यकर्ते बेभान झाले आहेत. याचे कारण तृणमूल काॅग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जीनेच अशा हिंसाचाराचे बीज रोवले होते. देशाच्या फाळणीच्या काळात ज्या पद्धतीने हिंदुची हत्या झाल्या. त्याचीच  पुनरावृत्ती पश्चीम बंगाल होत  आहे. हजारो हिंदु  बंगालमधून पलायन करून शेजारच्या राज्यात आश्रय घेऊ लागले आहेत. मग केंद्र सरकार काय करीत आहे? हिंसा फैलावणार्यांना पकडले का जात नाही, ममता बॅनर्जींचे सरकार बरखास्त करून पश्चीम बंगाल मध्ये राजवट का आणली नाही इत्यादी प्रश्न विचारून सोशल मिडीयावर लाखो संख्येने देशभरातील हिंदु बांधव व्यक्त होताना दिसत आहेत.


ज्या काही याचिका कलकत्ता हायकोर्टात दाखल झालेल्या आहेत त्या याचिकेतील, हरेण अधिकार आणि अभिजीत सरकार या दोन भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्याबाबत हरेण अधिकाराच्या पत्नीने दाखल केलेल्या याचिकेची सुप्रिम कोर्टाने तातडीने सुनावणी हाती घेतली आहे. याचे कारण कै हरेण अधिकारीने आपल्या जीवाला  तृणमूल काॅग्रेसच्या कार्यकर्त्याकडून धोका आहे असे फेसबूकवर म्हटले होते. त्याच्या दुसर्याच दिवशी त्याची हत्या झाली. आहे. कै हरेण अधिकारीच्या पत्नीने फेसबूकवरील ती क्लिप ही सुप्रिम कोर्टात सादर केलेली आहे.  सुप्रिम कोर्टाने याबाबत TMC चे सरकार, बंगाल राज्याचे डीजीपी यांना नोटीशा पाठविल्या आहेतच पण सोबत केंद्र सरकार तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला ही नोटीस पाठविली आहे. ममता बॅनर्जींनी तृणमूल काॅग्रेसची स्थापना केल्या पासूनच देशाचे संविधान, कायदे, शिष्टाचार इत्यादीबाबतची फिकीर न करण्याची त्यांना वाईट सवय जडली आहे. कारण आपल्या पक्षांचे श्रेष्ठी त्या स्वतःआहेत. दिल्लीत कोणी पक्ष श्रेष्ठी असणे हे काही अंशी भारता सारख्या विशाल देशात उपकारक ठरते. कारण आपल्या देशाच्या संविधानात जी काही मार्गदर्शक तत्वे आणि कायदा व सुव्यवस्थेच्या संबंधीत ज्या जबाबदारी आणि मर्यादा स्पष्टपणे निर्देशली आहेत, त्याचे भान प्रादेशिक पक्षांना राहात नाही. संघ भाजपाचा द्वेष करणार्या मिडीया हाऊसने ममता बॅनर्जीची प्रतिमा Larger than nation, अशी केल्यामुळे ममता बॅनर्जीमध्यें पराकोटीचा अहंकार आणि फाजील आत्मविश्वास निर्माण झाला आहे. पश्चीम बंगालच्या निवडणूक निकालाचे विश्लेषण सेक्यूलर मिडीयांनी चूकीच्या पद्धतीने मांडले. त्यामूळे पश्चीम बंगाल मध्ये काॅग्रेस आणि डावे पक्ष सपशेल नामशेष झालेले ममतांना दिसतच नाही. भाजपाला आपण एक हाती पराजित केले या गुर्मीत त्या वागत आहेत.  त्यांचे वागणे, त्यांचे हावभाव इत्यादीचे सुक्ष्मपणे निदान केले तर मला रशियात क्रान्ती झाल्यानंतर तेथील एक महिला रात्री- बेरात्री, स्वातंत्र्याच्या नशेत ट्रॅफीकचे नियम मोडत फिरू लागली होती त्या घटनेचे स्मरण झाले. त्या महिलांला ट्रॅफीक पोलीस विनंती केली की ती म्हणत होती, मी स्वतंत्र आहे मी रस्त्याने कशीही चालू शकते. पोलिसांनी बळाचा वापर केला असता ती  त्यांना वीजेच्या गतीने झटका देऊन पुढे सरकत होती. शेवटी तिला माथेफिरू समजण्यात येऊन जबरदस्तीने रूग्णालयात दाखल केले गेले.

अती अहंकार, आणि अती आत्मविश्वास हे दोन प्रमूख दोष ममता बॅनर्जीना कधीतरी अडचणीत आणणार आहेत असे वेळोवेळी वाटत आले आहे. तशी वेळ जवळ येत आहे असे दिसते. कारण अनेक केससमध्ये ममता बॅनर्जी पुर्णपणे घेरल्या जाण्याची शक्यता आहे. एकंदरीत निपक्षपाती कायदेतज्ञांचं मत असे आहे की  बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणूक निकाल झाल्यावर लागलीच भाजपा कार्यकर्त्यांच्या  हत्यासत्र सुरू झाले त्यावेळी ममता बॅनर्जींचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झालेला नव्हता ही सबब तोकडी पडणार आहे. तसेच बंगालच्या डीजीपीचा कारभार चुनाव आयोगकडे होता ही सबब ही संविधानातल्या कलमानुसार टिकू शकणार नाही.  स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारवर अविश्वास ठराव पास झाल्यानंतर कारगील मध्ये पाकिस्तानने घुसखोरी केली. तेव्हा पंतप्रधान अटलबिहारींनी आपण केअर टेकर पंतप्रधान आहोत अशी सबब न सांगता संविधानाने दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवले होते. अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये ममता बॅनर्जी मंत्री होत्या. त्यामूळे वाजपेयींनी घातलेल्या आदर्श पायंडाची ममता बॅनर्जीना विस्मृती व्हावयास नको होती.  या केसेस संबंधीतील गोम अशी आहे की ममता बॅनर्जी केअर टेकर म्हणून मुख्यमंत्री कार्यरत होत्याच की. केअर टेकर पंतप्रधान किंवा एखाद्या राज्याचा केअर टेकर मुख्यमंत्री जबाबदारीपासून पलायन करू शकत नाही.  केंद्र सरकारने याच कारणासांठी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट निवडणूक पुर्वी लावली नाही. ममता बॅनर्जी स्वतःच्या कर्मानेच आपल्या पायावर धोंडा मारून घेतील अशी जाण देशाचे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमीत शहांना होतीच आणि तसेच काहीतरी घडेल असे दिसते.

अशीच एक दुसरी घटना घडली ज्यामूळे ममता बोनर्जीने स्वतःच्या पायाखाली खड्डा खोदून ठेवला. ती घटना म्हणजे अलीकडे कलकत्त्यातील सीबीआच्या कोर्टात जाऊन   ममता बॅनर्जींनी घातलेला धुडगूस. काय झाले? ममताच्या मंत्र्यांना ऐरवी जामीन मिळाला असता. तो मिळाला नाहीच उलट तीन दिवस मंत्र्यांना जेलची हवा खावयास लागली. ममताचा हा तमाशा पाहून  विरोधी पक्षांना आणि त्यांच्या समर्थकांना ममता बॅनर्जी म्हणजे Dashing Woman, आहे असेच वाटले असावे. राजकारणात आक्राळस्तेपणा धोक्याचा असतो.  निवडणूक निकाल लागल्याच्या काही दिवसात नारदा स्टिंग ऑपरेशन च्या विडीओ संबंधी ममता बॅनर्जीच्या सरकारमधील काही मंत्र्याविरोधात असलेल्या आरोपाची चौकशी  सीबीआयने सुरू केली आहे. त्यामूळे ममता बॅनर्जींचा पारा चढला असावा. त्यातूनच कलकत्त्याच्या सिबीआयच्या कोर्टात कार्यकर्त्यांचा मोठा ताफा घेऊन त्या तिथे धरणास बसल्या. हा एक प्रकारचा न्यायालयीन व्यवस्थेचा अपमान आहे. केंद्र सरकार गेली सात वर्षे ममता बॅनर्जीचा उपद्व्याप सहन करीत आहे. तरी केंद्र सरकाराने संयम पाळला. पण अलीकडे तर ममता बॅनर्जींच्या कारस्थानांनी लक्ष्मण रेषा पार केली आहे. त्यामूळे नारदा स्टींग ऑपरेशन ची केस  केंद्र सरकारने हाती घेतली. विरोधक आणि त्यांच्या पायाशी लोटांगण घालणारे संपादक महाशय, भले म्हणतील की तृणमूलने भाजपाचा बंगाल मध्ये पराभव केला म्हणून पंतप्रधान मोदी आणि अमीत शहां पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सीबीआयचा गैरवापर करीत आहे. पण गैरवापर करण्याची संधी ममता बॅनर्जी देतातच का? ही बाब विरोधी पक्ष आणि ममताचे गुणगान करणारे संपादक मंडळी लक्षात घेतच नाही.  ममता बॅनर्जीचा  शिरजोरपणा हा न्यायाचा आणि सत्याचा, ममता बॅनर्जी ग्रेट फायटर ' अशी भाषा करणार्यांना एक तर राजकारणच कळेनासे झाले असावे किंवा ते खाल्या अन्नाला जागत असावेत. विरोधी पक्षांनी किती प्रयत्न केला तरी ममता बॅनर्जी राष्ट्रीय पातळीवरील नेत्या बनू शकतील असे दिसत नाही. याचे कारण विरोधी पक्षांत एकी नाही. तसेच ममता बॅनर्जींना केद्र सरकारशी लढण्यात जो आसूरी आनंद घेण्याची लागलेली सवय, तसेच बंगालमध्ये प्रचंड बहूमत बहूमत मिळाल्यामूळे त्यांना बंगाल मध्ये अडकवून ठेवण्याची संधी केंद्र सरकारची रणनीती यशस्वी होऊ शकेल.

दिल्लीतील शाहीनबाग येथील धरणे, तसेच किसान आंदोलनासाठी पाण्यासारखा पैसा विदेशी महाशक्तींनी ओतला. प्रजासत्ताक दिनी लाजीरवाणें कृत्यें घडली. पुढे काय झाले ? परवाच एका मित्राने मला विचारले  की प्रजासत्ताक दिनी असा गोंधळ माजविणार आहेत याची खबर देशाच्या गुप्तहेर खात्याला समजली नाही का? मी त्याला थंडपणे उत्तर दिले, " सत्याची बाजू कोणाची आहे? भाजपा सरकार पाडण्यासाठी जागतिक महाशक्तींशी टक्कर ज्यांना द्यावयाची आहे असे आपल्या पंतप्रधानांनी स्वतःहाचे जीवन त्यांच्याहून अधिक तपस्वी महानुभावांच्या मार्गदर्शनाखाली देशासाठी वेचले आहे. अशा पंतप्रधानांकडे संयम आणि राजकारणातील डावपेच  केव्हा कोणते आणि कसे करावेत या संबधीचे ज्ञान नाही असे तू कसा समज करून घेतोस ? आपण तह करावयास येत आहे अशी भाषा वापरून अफझलखानला आपल्या अंगणात आणून त्याला यमसदनास पाठविणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन जो स्वयंसेवक बालपणापासून ' हिंदु साम्राज्य दिन ' असा पवित्र उत्सव मानून  दर वर्षी मनोभावे छत्रपती शिवाजी महारांजाच्या चरणी लिन होतो अशांना परकीय शक्तीची भिती वाटत नसते.  शरद पवार सारख्या नेत्याला रात्रीच्या प्रशांत समयी गुजरातला अमित शहाशी गुप्तपणे भेट घ्यावी लागली, तिथे उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी किस पेडकी मूली.  इजरायल आणि हवास मध्ये युद्ध सुरू झाले पण भारताने इजरायल देशाला अधिकृत पाठींबा व्यक्त केला नाही. इजरायलने पाठींबा देणार्या देशांची नावे जाहीर केली. त्यात आपल्या देशाचे नाव नव्हते. आपल्या पंतप्रधानांनी इजरायलला पाठींबा द्यावयास हवा होता अशी चर्चा सोशल मिडीयावर होऊ लागली. पण बाराव्या दिवशी इजरायल आणि हमासने युद्ध थांबविण्याचा निर्णय घेतला आणि युद्ध थांबले. इजरायलनी भारत आमचा खरा मित्र आहे हे  युद्ध थांबल्यावर जाहीर केले. का आणि कसे? याचे उत्तर फक्त नरेद्र मोदी आणि इजरायलच्या पंतप्रधानांनाच ठाऊक. माझा असा अंदाज आहे की इजरायलने आपल्या शस्त्रांची घेतलेली एक ट्रायल असावी. ही एक ट्रायलच होती हे ही आतंराष्ट्रीय समुदायला अप्रत्यक्षपणे कळण्यासाठी इजरायलने युद्ध संपल्यावर भारत आमचा खास दोस्त आहे हे स्पष्टपणे जाहीर केले असावे. चीनची डोकलाम येथे अरेरावी वाढत असताना अचानक आपल्या पंतप्रधानांनी जगातील छोटे राष्ट्र पण सर्वात आक्रमक आणि अद्यावत शस्त्रांनी परिपूर्ण अशा इजरायचा दौरा केला. अमेरिका आणि रशिया सारखे देश आवाक झाले. चीनच्या अरेरावी बद्दल युनोकडे धाव मारली नाही. डोकलाम येथील चीनची अरेरावी एका झटक्यात संपली. आमच्या देशाचे संरक्षण आणि परराष्ट्र धोरण हे कुठल्याही देशाच्या दबावात आखले जात नाही असा स्पष्ट इशारा चीनला आणि अमेरिका तसेच युरोपियन देशातल्या महाशक्तींनाही पोहोचला." 

माझ्या मित्राशी झालेले कालचे संभाषण मी इथे नमूद केल्याने  थोडसं विषयातंर घडले आहे. पण सध्या देशातील राजकारण वेगळ्या वळणावरून जात आहे म्हणून पंतप्रधान मोदीची कार्यशैली कशी आहे याची झलक देण्याची गरज वाटली. येत्या काळात विदेश शक्ती आपल्या देशात येनकेन प्रकारे अस्थिरता निर्माण करणारच आहेत. त्यासंबंधीची एक माहितीवजा लेख पब्लीश करणार आहे पण राजकीय घटना इतक्या तीव्रतेने घडत आहेत, अनेक प्रकरणे जी न्यायालयात आहेत त्यासंबंधी रोज काहीतरी बातमी येत राहते म्हणून त्यावर लेख लिहण्यास प्राधान्य द्यावे लागत आहे. अनेक प्रकरणे न्यायालयात आहेत त्यांचे ही निवाडे येत राहणार आहेत. पुढील आठवड्यातही अनेक घटना घडतील, अनेक शह-काटशाह दुर्दैवाने सुरूच राहणार आहेत. तो पर्यंत २०२४ साल उजाडलेले असेल. तेव्हा भाजपा आणि भाजपाचे कट्टर विरोधक यामधील अंतीम सामन्याच्या अगोदरच मोदी सरकारने समान नागरी कायद्याचे अस्त्र बाहेर काढलेले असेल. तो पर्यंत आपण जागरूक राहून राष्ट्र हिताच्या गोष्टी शेअर करीत राहू या.

धगधगता पश्चिम बंगाल (भाग १ )



महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया पश्चीम बंगाल या शिर्षकाचे दोन लेख आपण मागे वाचले आहेत. त्या लेखांत आपल्या देशातील राजकीय स्थिती संबंधी जी काही चर्चा केली आहे, तीच चर्चा पुढे सुरू करीत आहे. फक्त लेखाचे शिर्षक बदलले आहे. आज पश्चीम बंगाल मधील स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. या विषयाचा आवाका मोठा असल्याकारणाने या लेखाद्वारे होणार्या चर्चाचे दोन भाग करणे क्रमपाप्त झाले आहे. म्हणून या पहिल्या भागात जागतिक स्तरावरील राजकारण, आपला देश आणि जगाचा आपल्या देशाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचा इतिहास, तसेच वर्तमान माहिती- तंत्रज्ञान आणि व्यापारी युगाचा परीणाम इत्यादी विषयासंबंधी चर्चा करू या.

कोरोना संकट हेच मूलतः जागतिक राजकारणाचेच अपत्य असल्याचे सिद्ध होऊ लागले आहे. म्हणून कोरोना विषाणूचा पॅथाॅलाॅजकल अभ्यास, औषधे आणि लस शोधण्याचे प्रयत्न झाल्यावर सध्याच्या व्यापारी युगात जगभरातील काही देशांमध्ये जसे अंतर्गत राजकारण आहे तितकेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सत्तास्पर्धा सुरू झालेली दिसते. पण तसे होत असताना शक्तीशाली देश स्वतःचा फायदा अधिक प्रमाणात घेण्यात यशस्वी होताना दिसतात. याची मुख्य कारणे दोन आहेत. पहिले कारण त्या देशांची वरचढ ठरणारी सामरीक शक्ती, आणि दुसरे कारण त्या देशाची आर्थिक संपन्नता. आर्थिक संपन्नतेतून अत्याधूनिक माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करून इतर देशांत भय भ्रम, फैलावणे त्यांना सोपे जाते. असा उपयोग करताना सत्य स्थिती दडपून ठेवणे व त्या जागी खोटे-नाटे विडीओ पाठविणे अशा क्लुप्त्या लढविल्या जात आहेत. आपल्या देशातील कोरोनाच्या दुसर्या लहरीसंबंधीत दाखविले जाणारे आकडे, मृतांचे चित्रांचे प्रक्षेपण फेक आहेत. पण सध्याच्या या महिती व तंत्रज्ञानाच्या युगात ' ज्याच्या हाती अत्याधूनिक मिडीया त्याची म्हैस ' हा जगाचा न्याय ठरला आहे. त्यामूळे आपल्या देशात सोशल मिडीयावर उलट-सुलट चर्चा होत आहे. त्यातून आपला समाज राजकीय दृष्ट्या दुभंगत आहे आणि ते  देशाच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. आजचे युग हे केवळ जाहिरातबाजीचे राहिले नाही. पुर्वी जाहिरातबाजी फक्त व्यापार जगापुरता मर्यादीत होती. आजचे जग माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. त्याचा परिणाम हळुहळू सत्तास्पर्धेवर होत गेला आणि शेवटी हेच तंत्र आज सत्तास्पर्धातील मग ती देशपातळीवरची असो वा जागतिक पातळीवरील असो एक महा अणुकूचीदार शस्त्र बनले आहे. हेच शस्त्र काही विदेशी शक्तींनी आपल्या देशाविरूद्ध उगारलेले दिसते. हे शस्त्र इतके विषारी आहे की आपल्या देशाच्या राज्यव्यवस्थेलाच हादरे देऊ शकते.

कुठल्याही देशातील निवडणूका मध्ये बड्या राष्ट्रांचा, विदेशी धनाड्य लोकांचा, आणि धार्मीक उन्माद चढलेल्यांचा प्रत्यक्ष हस्तक्षेप होत नाही असे म्हटले जात असले तरी ट्रम्प महाशयांने रशियाच्या साह्याने अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली असे जगभर मानले गेले. तेच शस्त्र अमेरिकेतील डेमाॅक्रॅटीक पक्षाने बायडोन महाशयांना निवडणून आणण्यात वापरले नाही असे छातीठोकपणे म्हणता येत नाही. फरक इतकाच की यावेळी तिथल्या अध्यक्षीय निवडणूकीची पटकथा रशियाच्या ऐवजी चीनने तयार केली असावी. मिस्टर बायोडेनचा पक्ष डेमाॅक्रॅटीक, पण छुप्या मार्गाने सलगी मात्र एक पक्षीय हुकूमशाही असलेल्या चीनशी. सांप्रत काळातील जागतिक राजकारणाचं स्वरूप आपल्या श्रीगुरूचरित्रातील द्वितीय अध्यायात कलीयुगाचे जे वर्णन केले आहे, त्याच्याशी तंतोतंत जुळते आहे. आपला भारत देश हा सध्या तरी विकसनशील देश मानला जातो. त्यामूळे आपल्या देशातील राजकारणावर जगातील सर्वच बड्या देशांकडून नाक खुपसण्याचे प्रकार घडत आले आहेत. आपल्या देशाची दोन आगळी-वेगळी वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य हे की आपली संस्कृती एकेश्वरी नाही. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कालच्या जगात ही  हिंदु समाजाचा एकमेव देश फक्त भारत होता आणि आज ही तोच आहे आणि पुढेही हिंदू समाजासाठी तोच एकमेव राहणार आहे. कारण धर्माच्या नावाखाली साम्राज्य वाढविणे ही दुष्टप्रवृत्ती आपल्यात भिनली नाही. कारण आपल्या रोमारोमात सहिष्णुता भरलेली आहे.  या एकमेव कारणामूळे मध्ययुगीन काळात जगातील दोन एकेश्वरी पंथीयांच्या म्हणजेच मुस्लीमांच्या आणि ख्रिस्तांच्या मनांत या देशाचे लचके तोडण्याची पाशवी इच्छा निर्माण झाली आणि त्यात त्यांना आपल्यातील एकतेच्या अभावामुळे यश मिळाले.

कोणी मानो वा ना मानो पण जर्मनीतील नाझी भस्मासुराच्या उदयामूळे जगभरातील पारतंत्र्यतेच्या जोखडात अडकलेले सारे देश स्वतंत्र झाले ही  एक चांगली गोष्ट घडली. त्या भस्मासुराने ' ब्रिटीश राज्याचा सूर्य कधी मावळत नाही ' अशा पुशारक्या मारणार्या आणि आपल्या महात्मा गांधीजीना अर्धा नग्न फकीर म्हणणार्या तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान चर्चील यांना युद्धकाळात दिवसाढवळ्या बिळात लपून बसण्याची पाळी आणलीच ना !  ताकदवान देशांना भस्मसात करण्यात तो असफल ठरला पण जाता जाता त्याने ताकदवान देशांना धूळ चारली आणि  दुर्बळ देशांना 
'ज्याच्या हाती काठी त्याची म्हैस ' हा मंत्र दिला. आपल्या येथे प्राचीन काळापासून ' नायमात्मा बल हिनेन लभ्यः'  असे वचन म्हटले गेले आहे. (दुर्बलांना ईश्वर दर्शन देत नाही) या आशयाचे एक सुभाषित ही आहे. ते असे आहे,    
            अंश्व नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैवच |
            अजापूत्रं बलि दद्यात् देवो दुर्बल घातकः ||
( ना घोडा, ना हत्ती आणि वाघाला तर नाहीच नाही फक्त
   बकरीच्या छोकर्याचाच बळी दिला जातो)

मध्ययुगीन काळात आपल्याला वरील वचन आणि सुभाषिताचा विसर पडला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लागलीच पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला तेव्हा ही बातमी महात्मा गांधीजींना कळविली तेव्हा त्याचे उत्तर असे आहे,  ' पाकिस्तानला शांतीची भाषा कळत नाही. आता त्याच्यावर लष्करी कारवाई करा '  मुद्दा हा की कलियुगात बळी तो कान पिळी हाच न्याय ठरतो. ठकासी व्हावे महाठक' हा समर्थ रामदास स्वामीचा उपदेश लक्षात ठेवूनच  देशाचे संरक्षण, परराष्ट्र, आणि आतंरीक सुरक्षा संबंधीचे धोरण ठरविणे आवश्यक आहे. याला कोणी आक्रमक राष्ट्रवाद म्हणत असतील तर  त्या विचाराची मंडळी वरून गांधीवादी पण आतून विदेशी पैशाला गुलाम झालेली होय.

आज स्वतंत्र झालेले देश ही परमाणू शस्त्रधारी झाले. म्हणून गेल्या ७५ वर्षात महायुद्ध खेळण्याची बिशाद कुठल्याच देशाला झाली नाही. काळ बदलला. शेवटी आर्थिक स्पर्धेत सर्वात पुढे राहावे आणि महासत्तापदी विराजमान होण्याची एक नवी कल्पना जन्मास आली. आजच्या जगात भारत देश आर्थिक स्पर्धेत महासत्ता होऊ शकतो ही जाणीव मुस्लीम आणि ख्रिस्ती समाज व्यापलेल्या काही देशांना होऊ लागली आहे.  त्यांच्या रक्तात भिनलेली हिंदु द्वेषाची खाज अधून-मधून डोके वर काढते, आणि तेच एकमेव कारण आहे ज्याच्यातून चीनशी अप्रत्यक्षपणे सहकार्य करीत या दोन्ही समाजाच्या लाॅब्या भारतात अस्थिरता निर्माण करीत असतात. त्याचेच प्रत्यंतर आपल्या देशाच्या राजकीय मंचावर  विशेषतः महाराष्ट्र, दिल्ली, आणि पश्चीम बंगाल, इथे जी नाट्ये होत आहेत त्यातून होत आहे.

बंगालमध्ये जे घडतयं त्याचे स्वरूप राजकीय मंचावरील एक नाटक किंवा चाल असे राहिले नाही. ते देशांतर्गत उभे केलेलं एक युद्ध आहे. या नंतर देशात घडल्या जाणार्या किंवा घडविल्या जाणार्या घटना ही एका महायुद्धाची सुरूवात आहे असे मला वाटते. म्हणून केंद्र सरकार विरूद्ध पश्चीम बंगालच्या सरकार मधील सध्या  सुरू झालेली जी लढाई आहे, ही कदाचीत इस्ट इंडीया कंपनीच्या विरूद्ध झालेल्या प्लासीच्या लढाईची नवी आवृत्ती तर नाही ना, असा विचार ही मनाला शिवून गेला. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या देशात भाजप सोडला तर बाकी सारे राजकीय पक्ष हे प्रांतीय स्तरावरचे आहेत. त्यांच्यातलं एक सामाईक वैशिष्ट्यं म्हणजे ते सारे पक्ष घराणेशाहीने बरबरटले आहेत.  म्हणजेच प्रत्येक राज्यात राजेशाही आहे. ह्या राजेमहाराजांचे आपआपल्या राज्यातील प्रत्येक शहरात, जिल्ह्यात आणि तालूक्यात अनेक सुभेदार आहेत. या राजेमहाराजांचा कारभार जसा लहरी व आत्मकेंद्रीत तसाच त्यांच्या सुभेदारांचा. त्यामूळे देशातील  प्रत्येक जिल्हा व तालूका पातळीवर  समाजातील शीलवान, साहित्यिक, विचारवंत, संपादक आणि नोकरशहा सारख्या मडंळीनाही  सर्वत्र आपआपल्या राजांचे वा सुभेदारांचे चरणच या जगतातील अती पवित्र प्रार्थनास्थळ वाटू लागले आहे. त्यामूळे या आधुनिक राजेमहाराजांनी विदेशी शक्तींशी हात मिळवणी केली तरी तरी त्यांच्या भाटांना ते गैर वाटत नाही. याच मानसिकतेमूळे मध्ययुगीन काळापासून एक हजार वर्षाहून अधिक काळ आपला देश पारतंत्र्यात अडकला.

आज पश्चीम बंगाल मध्ये तृणमूल काॅग्रेसच्या जिल्हा-तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांनी जो धुडघूस घातला आहे तो आपल्या देशाच्या मध्ययगीन काळाच्या इतिहासाशी साम्य दाखवतो. मध्ययुगीन कालीन मानसिकतेने कोणाला घेरले आहे,, पश्चीम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची विस्तवाशी खेळण्याची खुमखुमी, त्यांचा उतावेळपणा, व त्यासाठी त्यांना विरोधी पक्ष तथाकथीत सेक्यूलर मिडीया हाऊस आणि डावे व पुरोगामी विचारवंताकडून मिळत असलेले प्रोत्साहन इत्यादी बाबी, तसेच केंद्र सरकार आणि पश्चीम बंगाल सरकार मधील जंग, बंगालच्या स्थितीसंबंधी  हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचीका, आणि त्यांच्या निकालातून काय निष्पन्न हाती लागते या विषयांवरील चर्चा आपण भाग २ मध्ये करू या. 
(सोबत भाग २ जोडला आहे )

शुक्रवार, १४ मे, २०२१

देशाच्या राजकीय मंचावरील शो -- महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया पश्चीम बंगाल (भाग २)

याच शिर्षकांचा लेख अलिकडे पब्लीश केला होता. त्या लेखात विरोधी पक्षांची ज्या राज्यात सत्ता आहे अशा  विशेषतः महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चीम बंगाल मधील भाजपेतर सरकारांनी केंद्र सरकारवर जी टिका केली होती ती अशोभनिय आहे असे मी म्हटले आहे. अशोभनिय असा शब्दप्रयोग केला तो एक प्रकारे मोदी सरकारचे मी समर्थन केले असे अनेकांना वाटले असावे. त्याबद्दल मला आश्चर्य वाटत नाही. कारण त्यात तथ्य आहे. अनेक वृत्तपत्रांचे आणि न्यूज चॅनेलचे संपादक महाशय स्वतःच्या राजकीय विचारसरणींशी, आणि आपल्या लाडक्या राजकीय नेत्यांशी असलेली आपआपली निष्ठा लपवू शकत नाहीत तेव्हा माझ्या सारखा सामान्य ब्लाॅगर अपवाद कसा ठरू शकेल ? 

सध्या आपली मानसिकता अशी आहे की कुठल्याही रोगाच्या साथीत जो पर्यंत मृत्यू आपल्या दारात येत नाही तो पर्यंत आपली राजकीय नेते मंडळी,  मिडीया हाऊस, आणि आपण सारेजण, (त्यांची समर्थक मंडळी) परपस्परांवर टिका करण्यात रमतो. ही एक घातक सवय आपल्याला आपल्या राज्यव्यवस्थेतून जडली आहे. मागील लेखात मोदी सरकारवर विरोधी पक्षांतर्फ  होणार्या टिकेचे निराकरण करण्याचा मी प्रयत्न केला, पण लेखाच्या विस्तार भयामूळे माझा तो प्रयत्न अपूरा राहिला असे मला जाणवत राहिले. म्हणून त्या लेखातील काही बाबी संबंधीचा अधिक खुलासा तसेच माझे जे म्हणणे आहे, त्याची सत्यता पटावी या हेतूने काही आकडेवारी सादर करणे मला गरजेचे वाटले. म्हणून हा भाग २ आपल्या समोर ठेवतो. 

आपल्या लोकशाहीचे स्वरूप संघराज्य पद्धतीचे आहे. याचा ढोबळ अर्थ असा की अनेक कल्याणकारी योजना, तसेच प्रजेच्या हितासंबंधीच्या गोष्टी आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था संबंधीचे सारे अधिकार राज्य सरकारांकडे असतात. आपल्या देशाच्या संविधानाच्या २४६ कलमात केंद्र सरकार व राज्य सरकारांच्या अधिकार आणि जबाबदारीचा तक्ता दिलेला आहे. राज्य सरकाराच्या तक्त्यात  सहाव्या क्रमांकावर स्पष्टपणे पब्लीक हेल्थ, हाॅस्पीटल्स, सॅनिटायझेशन, दवाखाने, आणि औषधोपचार, इत्यादी गोष्टी ठळकपणे नमूद केलेल्या आहेत. म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी ही पुर्णतः राज्य सरकारचीच आहे. विरोधी पक्ष आणि त्यांचे समर्थक मिडीया हाॅऊसेस मुद्दामहून मोदी सरकाराच्या विरोधात हवा निर्माण करीत आहेत. तरीही केंद्र सरकार संविधानाने सोपविलेल्या जबाबदारीचे भान ठेवून सर्वच राज्यांना मदत करीत आहे.कुठल्याही प्रकारचा पक्षपात करीत नाही. प्रत्येक हाॅस्पीटल मध्ये व्हेन्टीलिटर आणि ऑक्सीजनचा प्लान्ट आवश्यक करण्याची अट गेल्या सत्तर वर्षापासून राज्य सरकारांनी का घातली गेली नाही? 'ऑक्सीजन नाही ' अशी नाटकी भाषा करणार्या दिल्लीचे मुख्यमंत्री, जे पुर्वी सनदी अधिकारी होते त्या केजरीवालांना ही गोष्ट ठाऊक नाही काय? ठाऊक आहे पण ऑक्सीजनचा साठा करण्यासारखी सोपी गोष्ट नाही. साठा कशासाठी तर काळा बाजार करण्यासाठीच ना ! म्हणून ऑक्सीजन कुठे आहे असा आरडा-ओरडा केला की सारा दोष केंद्र सरकारवर टाकणे ही गोष्ट आणखिन सोपी होऊन जाते. त्यासाठी आपल्या समर्थक मिडीया हाऊसशी बोलून माझ्या समस्येची हेडलाईन कशी येईल त्यावरचा सौदा ही अगोदरच झालेला असावा. केजरीवालांनी ऑक्सीजनची केलेल्या मागणी संबंधी कोर्टाने फटकारले आणि ऑक्सीजनच्या स्टाॅक संबंधी चे ऑडीट करू असे म्हटल्यानंतर केजरीवालांची बोबडी वळाली. गरजेपेक्षा कितीतरी अधिक मेट्रीक टन ऑक्सीजनची मागणी केल्याचे स्पष्ट होणार हे लक्षात आल्यावर वामपंथीय लाॅबीचे एजंट असलेल्या केजरीवालांनी ऑक्सीजनची मागणीत दोन वेळा कपात केली आणि शेवटी ऑक्सीजन पुरेसा आहे असे निमूटपणे मान्य केले. राजस्थानमध्ये वीज पुरवठा बंद झाल्यामूळे कोराना बाधीत रूग्ण दगावले.  तिथे कुणाची सत्ता आहे ? जनरेटर आणून वीज पुरवठा करणे हे इंडस्ट्रीयल इस्टेट मधील लघुउद्योजक सहजगत्या करतात. मग राजस्थान मधील ज्या हाॅस्पीपलात रूग्णांचा जीव गेला तिथल्या जिल्हाधिर्यांनी राज्य सरकारला कळवून, सरकारने तातडीने जनरेटरची व्यवस्था करावयास होती की नाही? तिथल्या जिल्हाधिकार्याने मुख्यमंत्र्यांशी संपर्क केला की नाही हा भाग वगळला तरी काॅग्रेसचे समर्थक ' हे काम करण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्याची आहे ' त्यात मुख्यमंत्र्याचा काय दोष असेच म्हणाले असतील की नाही ? मुंबई नजिकच्या आमच्या विरारच्या एका खाजगी रूग्णालयात शार्ट सर्कीट होऊन कोरोना बाधीत रूग्ण दगावले. महाराष्ट्रात सत्ता कोणाची आहे ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विरारमधील कोरोना रूग्णाच्या मृत्युबद्दल जबाबदार धरले आहे का? मग  देशभर कोरोनाचा जोर वाढतो आहे, खाजगी रूग्णालयात कोरोना बाधीत रूग्णांना लाखो रूपयाचे बील भरावे लागत आहे या संबंधी मोदी सरकारला धारेवर धरण्यात का येते ? कारण एकच विदेशी शक्तीकडून मिळणार्या पैशाने निम्म्याहून अधिक मिडीया विकली गेलेली आहे.  

सुप्रिम कोर्टने एका याचिकेवरील तातडीची सुनावणी करीत निकाल देते वेळी केंद्र सरकारला उद्देशून म्हटले आहे की " We agree that health infrastracture we inherited over the past 70 years is not adequate." (गेल्या सत्तर वर्षातील  आपल्याला वारसाने मिळालेली आरोग्या संबंधीची मुलभूत व्यवस्था फारच तुटपूंजी आहे हे आम्ही मान्य करतो )  सुप्रिम कोर्टाच्या या मताशी विरोधी पक्ष निश्चीतपणे असहमत असतील. पण सार्या विरोधी पक्षांनी विशेषतः ज्याने सत्तर वर्षे देशावर राज्य केले त्या काॅग्रेस पक्षाने आणि त्यांच्या समर्थक मिडीया हाऊस आणि विचारवंतानी सुप्रिम कोर्टाच्या या कबूलीजबाबाला आव्हान देण्याचे धाडस करावयास हवे होते की नाही?  अनेक नामवंत वकील त्यांच्यापाशी आहेत. अनेक अग्रलेख सम्राट संपादक महाशय आहेत. निम्म्याहून अधिक प्रिन्ट आणि ईलेक्ट्राॅनिक्स मिडीया हातात आहे, मग विरोधी पक्ष तसे धाडस का करीत नाही ? पण त्यासाठी आपली बाजू न्यायाची आणि सत्याची असावी लागते ना ! यांची बाजू पडली असत्याची. त्यामूळे यांचे ज्ञान आणि यांच्या हुषारीचा प्रकाश फक्त अमावास्याच्या काळोखी रात्री काजवासारखा पडतो. सूर्याच्या प्रकाशाशी स्पर्धा करण्याची ताकद सध्याच्या विरोधी पक्षांत राहिली नाही. सुप्रिम कोर्टाने हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर संबंधी केलेल्या या टिपणी संबंधीची साधी बातमी आपल्या काह्यात असणार्या वृत्तपत्रात देण्याचे धाडस ही मंडळी करू शकली नाही. यांच्यापैकी ज्यांनी ही बातमी दिली ती सुद्धा अशा रितीने छापली आहे की सर्वसामान्यांपर्यंत ती पोहचलीच नाही. इंडीया टूडेने ही बातमी दिली पण  शिर्षक बदलले. काय शिर्षक होते? " SC says health care sector close to a breaking point "( देशातील आरोग्य व्यवस्था कोसळण्याच्या स्थितीत) असे शिर्षक देण्यामागे हेतू हाच की सुप्रीम कोर्टाने  केंद्र सरकारला फटकारले आहे असा वाचकांचा समज व्हावा. फक्त शिर्षक वाचून आपले मत तयार करण्यार्याची  संख्या आपल्या देशात करोडोने आहे. कारण मुळातच ज्यांना संघ-भाजपा आणि मोदी संबंधीची कावीळ झाली आहे अशांना मोदी सरकारवर टिका करणार्या वृत्तपत्रात आलेल्या बातमीचे संपुर्ण वृत्त वाचण्याची सवयच नाही. अशी मानसिक जडणघडण झालेले वाचक घाईने ती बातमी सोशल मिडीयावर व्हायरल करून मोकळे होतात. हाच तो मिडीयाने विदेशी (विशेष करून चीनच्या) पैशाच्या साह्याने केलेला हा खेळ आहे. सतत जे कानावर पडते, जे डोळ्यांना दाखविले जाते ते खरे वाटते हा तर मानसशास्त्रीय सिद्धांतच आहे. या संबंधीत अधिक चर्चा करण्याऐवजी विद्यमान केंद्र सरकारने हेल्थ इन्फ्रास्ट्रचर मध्ये जी भरीव कामगिरी केली आहे ती नितीन शुक्लांनी आपल्या यु ट्युब चॅनेलवर विडीओ द्वारें सादर केली आहे. ती आपल्यापुढे खाली देतो आणि सोबत आपली चर्चा पुढे सुरू ठेवणे हेच मला श्रेयस्कर वाटते. 

पंडीत जवाहरलाल नेहरूच्या कारकिर्दीत फक्त १९५६ साली एक एम्स दिल्लीत उभे राहिले. ते ही धनवान, दानशूर आणि समाजासाठी आपण काहीतरी करावे अशी तळमळ असणार्या अमृता कीरने बांधले. तदनंतर एनडीएच्या वाजपेयी सरकारने पाच वर्षाच्या राजवटीत सात एम्स सारखी रूग्णालय सुरू केली. डाॅ मनमोहनसिंगच्या सरकारने दहा वर्षाच्या कारकिर्दीत फक्त एक एम्स उभारले ते ही त्यांच्या मॅडमच्या रायबरेली मतदार संघात. मोदी सरकारने फक्त सहा वर्षात एकूण बारा एम्स दर्जाच्या रूग्णालयाची योजना आखून बहुतांशी पुर्णत्वात नेली आहेत. मोदी सरकारने  भाजपेतर पक्षांचे जिथे सरकार आहेत अशा राज्यांत ही एम्स उभारले आहे. राजकारण करतयं कोण आणि दोष कोणावर केला जातो या संबंधीची आपली खात्री भारत सरकारच्या प्रेस इन्फरमेशन ब्यूरोवरून करता येईल. बरं फक्त एम्स उभारून काय होणार ? डाॅक्टर्स कोठून मिळणार ? असे प्रश्न विचारणार्यांची संख्या आपल्या येथे अमाप आहे. सन २०१४ ला सत्तेवर येताच पंतप्रधान मोदींनी ' विदेशात भारतीय डाॅक्टर्स ' ही संकल्पना मांडली, आणि कार्यान्वीत ही केली. प्रधानमंत्री स्वास्य सुरक्षा योजनाच्या पोर्टल वरून घेतलेली माहिती अशी आहे ---

मोदी सरकारने एकूण १२ हाॅस्पीटल बांधली तिथे ओपीडी विभाग कार्यरत झाला आहे. तिथे  सर्व प्रकारच्या शस्त्रक्रीया केल्या जातात. हाॅस्पीटलच्या इमारती बांधून हाॅस्पीटल्स प्रत्यक्ष ऑपरेट होण्यात जरा ही  दिरंगाई झाली नाही. सरकारी प्रोजेक्ट वर्षानू वर्ष दिरंगाईच्या दरीत पडण्याची आपली ख्याती आहे. पण अशी कुप्रथा मोदी सरकारने मोडून काढली आहे. कारण मोदी सरकारने २०१४ साली सुमारे ३०००० MBBS आणि २४००० GP च्या सिट्स वाढविल्या. त्यामूळे प्रवेश न मिळाल्यामूळे नाईलाजाने  इंजिनियर शाखेकडे जाणार्यांची सोय झाली. नवीन शिक्षण धोरण जेव्हा अमंलात येईल त्या वर्षापासून पुढील दहा ते पंधरा वर्षात रोजगार निर्माण करणार्या युवकांची संख्या वाढणार आहे. जिएसटी मुळे नाराज झालेल्या व्यापारी आणि लघु उद्योजकांशी  रेल्वे प्रवासात (राजधानी एक्सप्रेसने दिल्लीतून परताना) मी चर्चा केली होती. त्या चर्चेअंती त्या मंडळीने खुल्या दिलाने मान्य केले की जिएसटीने आमच्या भावी पिढीचे निश्चीत भले होईल. ' सुट-बूटाचे सरकार ' आणि ' अंबानी-अदानीचे सरकार ' अशी सतत टिका करणारे काॅग्रेस नेते राहूल गांधींना, ममता बॅनर्जीना, शरद पवारांना, उद्धव ठाकरेंना,  तसेच डाव्या विचारवंतांना, वर्तमानपत्रांच्या आणि न्युज चॅनेल्सच्या संपादक महाशहांना, जी मंडळी स्वतःच्या इष्टदेवते इतका  मान देतात अशांनी लक्षात घेतले पाहीजे की भारतात मोदींच्या सात वर्षाच्या काळात  प्रायव्हेट हाॅस्पीटल्स पेक्षा सरकारी हाॅस्पीटल्सची संख्या वाढली आहे. २०१४ साली देशातील प्रायव्हेट हाॅस्पीटल्सची संख्या २१५ होती तर सरकारी हाॅस्पीटल्स ची संख्या १८९ होती. आज प्रायव्हेट हाॅस्पीटल्सची संख्या २६०  तर सरकारी हाॅस्पीटल्सची संख्या २७९ झाली आहे. 

मंदिर बांधण्याऐवजी हाॅस्पीटल्स बांधा अशी टिका करणारे पुरोगामी विचारांच्या पक्षांचे सरकार असताना ना हाॅस्पीटल्स बांधली गेली ना मंदिरे बांधली गेली. उलट काही मंदिराचा कारभार अल्पसंख्याकांकडे सोपविला आहे. केरळ सारखे सत्ताधारी पक्ष ते एलडीएफचे असो वा युडीएफचे असो, हिंदू मंदिरातील पैशाचा उपयोग स्वतःचे राजकरण करण्यासाठी वापरला जातो. भारतीय जनता पार्टीच्या ' मंदिर वही बनायेंगे ' या घोषणेची 
' पर मंदिर बनानेकी तारीख नही बतायेंगे ' असे म्हणत सलग तीस वर्षे विरोधी पक्षांनी संघ परिवार आणि भाजपाची कुचेष्टा केली होती. मोदी सरकारने श्रीराम मंदिराचा मार्ग मोकळा केला आणि हाॅस्पीटल्स ही बांधली. सांप्रतच्या काळात जागोजागी असलेल्या हिंदु-जैनांच्या मंदिरात आणि गुरूद्वारांत कोवीड टेस्टींग सेंटर्स उघडली आहेत. भारतातील सर्वात हलकट राजकारणी म्हणजे काॅग्रेसचे मणीशंकर अय्यर आणि शिवसेनेचे संजय राऊत. कोणी तरी त्यांना जाऊन सांगावे की जरा ख्रिस्ती धर्मगुरू आणि मुस्लीम मौलवी कडे जाऊन चर्च आणि मशिदींचा कोवीड सेंटर्सचा उपयोग करता येईल का याची किमान चोकशी तरी करा. नुसत्या ऊनाडक्या करण्यापेक्षा कोवीड रूग्णांची सेवा करण्याचे भाग्य पदरात पाडून घ्या की ! 

आता PM CARE फंडाचा विनियोग कसा झाला आहे यावर नजर टाकल्यानंतर लक्षात येते की हिशोब वा कारभारात मोदी सरकारची पारदर्शकता उच्च श्रेणीची आहे. 
    ( २८ एप्रिल २०२१ पर्यंत)
खर्च केलेली रक्कम   खर्चाची बाब
    (कोटी )             ( उपकरणे )    
२०००                व्हेन्टिलीटर्स                       
 १००                  व्हॅक्सीन डेव्हलपमेंट
१०००                  मायग्रेन्ट वर्कर्स
२२००                  व्हॅक्सीन ड्राईव
२०१               १६२ पीएसए ऑक्सीजन प्लान्ट
५५१                पीएसए ऑक्सीजन
१लाख             पोर्टेबल ओक्सीजन काॅन्सनट्रेटर्स
 ५००               पीएसए प्लान्ट्स ,आणि  
कोविड-१९ चे बिहारमध्ये दोन हाॅस्पीटल्सची उभारणी.

ऑक्सीजन निर्मितीवर जो हल्लाकल्लोळ माजविला गेला त्यासंबंधीत केंद्र सरकारने केलेली कामगिरी ---
तारीख            ऑक्सीजनचे उत्पादन
१८-४ -२०२१     ७२८७ मेट्रीक टन per day
३० -४ -२०२१    ९२५०  मे टी  per day
                         ऑक्सीजनचे वितरण
१८-४-२०२१      ६८२२ मे टन per day
३०-४-२०२१      ८५९३ मे टन per day
                        रेमडेसेवीरचे उत्पादन
१८-४-२०२१     ३८ लाख वायल per month
३०-४-२०२१      १-०३ लाख वायल per month
                        रेमडेसेवीरचे वितरण
१८-४-२०२१       ६७९०० वायल per day
३०-४-२०२१        २-०९ लाख वायल perday

संघराज्यप्रणाली मधील सर्वात थोरला भाऊ या नात्याने केंद्र सरकारने या कोरोना संकट काळात राज्य सरकारांशी कसा आदर्शवत पत्रव्यवहार केला आहे ते पाहू या. राज्य सरकारांना वेळीच सावध केले असते तर आजच्या इतकी बिकट स्थिती निर्माण झाली नसती असा विरोधी पक्ष आरोप करीत आहेत. तो ही सपशेल चूकीचा आहे. वस्तुतः केंद्र सरकारने राज्य सरकारांना वेळोवेळी सावध केले होते. त्या संबंधीचा पत्रव्यवहारही साईटवर पाहाता येईल. प्रथम ७ जानेवारीला महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, छत्तीसगड, पश्चीम बंगाल या राज्यांना सुचना दिली होती की कोवीड १९ ची दुसरी लाट तीव्रतेची असणार त्यामूळे states urged to take prompt steps and to keep a strict vigil to curb the recent spike in Covid cases. Increase the proportion of RT-PCR tests and subject Rapid Antigen negative people to mandatory Retest by RT-PCR.  Go on doing comprehensive surviellience and  stringent containment zones.  कूठच्याही प्रकरचा हलगर्जीपणा करू नका. लोकांनी मास्क न घालता नियम तोडला तर कारवाई करा. अशा आशयाचे पत्र पाठविले आहे. पुन्हा २५ फेब्रुवारीला आणि २७ फेब्रुवारीला आणि जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या ज्या राज्यात वाढू लागला अशा सर्वांना काय खबरदारी घेतली जावी अशा सुचनाचे पत्र केंद्रीय मुख्य सचीवाकडून प्रत्येक राज्याला वेळोवेळी पाठविलेले आहे. या शिवाय आयुष मंत्रालयातर्फे आपल्या देशातील प्रत्येक राज्यात असलेल्या पारंपारीक वनौषधी उपचार पद्धतीला बळ देण्याच्या आखलेल्या योजना ही कार्यान्वीत झाल्या आहेत. त्या संबंधीची सारी माहिती आयुष मंत्रालयाच्या साईट वरून पाहाता येईल. कोवीड च्या दुसर्या लहरीत किती लोक दगावले आहेत याचा तुलनात्म संख्येचा तक्ता यु ट्युब वर उपलब्ध झालेला आहे. तो पाहाता युरोपियन देश आणि अमेरिकासारख्या प्रगत  देशाच्या कितीतरी पटीने आपली स्थिती बरी आहे. तरी आपल्या देशात आणि देशाबाहेर आपल्या केंद्र सरकारवर जहरी टिका, आणि कुचेष्टा होत आहे हे एक आंतरराष्ट्रीय कारस्थानच आहे हे स्पष्ट दिसते.

सगळं काही ताटात वाढले असूनही आपली काही  राज्यें अन्नाचा घास ही केंद्राने मुखात घालावा अशी अपेक्षा करीत असतील तर ते योग्य ठरेल का? वेळेवर परीक्षेचा अभ्यास केला नाही की एखादा विद्यार्थी सबबी सांगत बसला तर त्याच्या शिक्षकाने त्या सबबी ऐकाव्यात असे शैक्षणिक क्षेत्रात धोरण ठेवता येते का? केजरीवालांना ऑक्सीजन घेण्यासाठी वाहनाची सोय करता आली नाही. एकेकाळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी डिझास्टर मॅनेजमेंटची सुत्रधार म्हणून  ज्यांची नियुक्ती केली होती असे आपले शरद पवार खंडणी वसूलीच्या प्रकरणात अडकून पडले आहेत. त्यामूळे महाराष्ट्राचं सरकार ही अडकून पडले. महाराष्ट्र म्हणजे सह्याद्री पर्वत. तो नेहमी हिमालयाच्या मदतीला धावतो अशी प्रसिद्धी मिरविणारा महाराष्ट्र उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारशी भांडत बसला आहे. ममता बॅनर्जींना तर निवडणूकीच्या प्रचारातच घाम आला होता त्यातच त्या अडकल्या. का तर मतदारांमध्ये प्रचंड ॲन्टीइन्कबन्सी होती. पण मुस्लीम बांधवांनी टॅक्टीकल मतदान केले आणि त्यातच भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठेवला नव्हता म्हणून ममता बॅनर्जींना यश मिळाले. तरीही पंतप्रधानांनी मोठ्या दिलाने ममता बॅनर्जीचे हार्दिक अभिनंदन केले आणि केंद्र सरकार पश्चीम बंगालच्या विकासासाठी सतत मदतगार राहील अशी ग्वाही दिली.

आपली लढत कोरोनाशी आहे पण महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चीम बंगाल या राज्याच्या सरकारांच्या प्रमुखांनी केंद्र सरकारशी लढत देण्यात वेळ तर दवडलाच पण इतर राज्यातील विरोधी पक्षांनाही चिथावणी दिली. या तिन्ही राज्यांचे मुख्यमंत्री, काॅग्रस पक्षांचे नेते राहूल गांधी, डाव्या पक्षांच्या नेतेमंडळींनी मिडीयातील लोकांना हाताशी धरून मोदी सरकार विरूद्ध एक षडयंत्र रचले की काय अशी शंका यावी इतका बेजबाबदारीपणाचा व्यवहार अनुभवास येत आहे. पाच राज्यातील निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावयास हवा होता. स्वतः पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेतला असता तरी ते उचीत ठरले असते हे मी मान्य करतो. पण विरोधकांनी तो निर्णय मानलाच असता असे ठामपणे म्हणता येण्यासारखा विरोधी पक्षांचा व्यवहार नावा पुरता ही राहिला नाही. सर्जीकल स्ट्राईकचा पुरावा मागणारी उलट्या काळजाच्या नेत्यांची विरोधी पक्षात गर्दी झाली आहे. मला तर असे वाटते कि पंतप्रधान मोदीनी विरोधी पक्षांसोबत बैठक घेतली असती तर या विरोधी पक्षांनी निवडणूका ठरल्या प्रमाणे घेण्याचा आग्रह धरला असता आणि निवडणूक प्रचारात  ' नरेंद्र मोदी निवडणूकीला सामोरे जाण्यास बिथरले होते अशी खोटी  बातमी  बेंबीच्या देठापासून ओरडत सार्या विरोधी पक्षांचे नेते देशभर फिरले असते. इतकं विळ्या-भोपळ्याचे वैर, साम्यवाद्यांनी भाजपा आणि इतर विरोधी पक्षात निर्माण केलं आहे. या डाव्या पक्षांचे अस्तित्वच संपत आले आहे. त्यांच्या नादाला लागून काॅग्रेसची अवस्था तशीच होत आली आहे. म्हणून सार्या विरोधी पक्षांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. पण तसे करण्यासाठी एक राष्ट्रीय वृत्ती असावी लागते. पण ही सारी मंडळी पडली प्रादेशिक स्तरावरील. त्यामूळे फक्त आपल्या राज्याचा विचार करण्यापलिकडे यांची झेपच पुढे जात नाही. म्हणून राष्ट्रीय पातळीवर निश्चीत असे स्थान भूषविलेल्या काॅग्रेस पक्षांचे पुनःर्जीवित होण्याची नितांत गरज आहे असे मला वाटते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ नेते आणि हिंदुत्वाचे गाढे अभ्यासक, ज्यांचे विचार ऐकायला मिडीयातील अनेक पत्रकार व संपादक ही उत्सुक असत असे स्वर्गीय मा गो वैद्यांनी  एका न्युज चॅनेलवर मुलाखत देते वेळी म्हटले आहे की, ' काॅग्रेस पक्ष टिकला पाहिजे पण त्यासाठी तो गांधी घराण्यातून मुक्त व्हावयास हवा.' विद्यमान काॅग्रेसच्या शिर्षस्थ नेत्यांपासून ते गावपातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे की संघाला काॅग्रेसची कधी ॲलर्जी नव्हती आणि आज ही नाही. काॅग्रेसला आज तुल्यबळ नेत्याची गरज आहे. त्याचीच वानवा काॅग्रेसला सतावीत आहे. त्यामूळे विरोधी पक्षांची जी भुमिका आहे तिच्यावर vested intrest चा म्हणजेच चीनचा प्रभाव पडलेला दिसतो आहे. अलीकडे ८मे च्या साप्ताहिक विवेक मध्ये देशातील अग्रणी स्थानावरील परराष्ट्र धोरणाचे विश्लेषक श्री देवेंद्र देवळणकरांनी जागतिक स्थरावर चीनचा प्रभाव कसा वाढला आहे आणि चीन त्याचा उपयोग करून भारताला बदनाम करण्याचे कारस्थान कसे पुढे रेटत आहे या संबंधी  एक अप्रतिम लेख लिहीला आहे. तो लेख साप्ताहिक विवेकच्या साईटवरून सर्व वाचकांनी जरूर वाचावा. त्याच्यांच लेखाचं माझ्या कुवती नुसार सार खाली देऊन मी या लेखाची समाप्ती करतो

विरोधी पक्षांनी विधायक भूमिका घेऊनच केंद्र सरकारवर टिका करणे आवश्यक असते. नरेंद्र मोदींनी देशाची सुत्रे हाती घेतल्यापासून त्यांच्या वाटेला चोहों बाजूनीं फक्त तिरस्कार, आणि हेटाळणी येत राहिली आहे. कोरोनो सारख्या महामारीने अवघ्या जगाला विळख्यात ओढले असताना , आणि कोरोनाच्या पहिल्या लहरीतून आपला देश सुखरूप रित्या बाहेर पडल्यानंतर आपल्या देशाची लस , हायड्राॅक्सीवलोरोक्वीन औषध, पीपीई किट्स मास्कची  निर्यात वाढली. आपल्या देशाची शान वाढली. हे पाहून चीनच्या पोटात दुखू लागले. त्यातून त्याने WHO ला स्वतःच्या खिशात ठेवून आपल्या देशाच्या लसीच्या निर्यातीत अडथळे निर्माण करू लागला आहे. हर प्रकारे भारताची बदनामी करण्याचे चीनचे हे कारस्थान आहे. याचे भान ठेवून सर्व राज्य सरकारांनी, विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या पाठीशी एक दिलाने उभे राहावे. इतकी माफक आशा ठेवणे गैर ठरू नये असे मला वाटते. आपल्या देशाचे भूतपुर्व पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारींचे बोल आहेत " आखिर चीन तो सिर्फ चीन है | हमारा भारत प्राचीन है | "  प्राचीन याचा अर्थ त्रिकाल प्रगल्भ, सुसंस्कृत आणि सशक्त असा आपला देश आहे.  हे आपण सर्वांनी आपल्या आचारणाने सिद्ध करू या हेच अक्षय तृतीयाच्या शुभ पर्वावरील आपले कर्तव्य आहे.

                             वन्दे मातरम् ! 

शनिवार, १ मे, २०२१

देशाच्या राजकीय मंचावरील शो -- महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया पश्चीम बंगाल (भाग १)

प्रथम सर्व वाचकांस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

देशात कोरोना बाधीत रूग्णांची संख्या वाढती आहे आणि सोबत अशा रूग्णांच्या मृत्यूचीही संख्या वाढती आहे. ऑक्सीजन, सिलेंडर्स, औषधे,  रुग्णालयातील बेड्सची कमतरता ही भासत आहे. देशातील राजकीय पक्षात विशेषतः पश्चीम बंगाल, महाराष्ट्र आणि दिल्ली, येथील सत्ताधारी पक्ष आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपात राजकीय लढाई तीव्रतेने वाढलेली आहे. आरोप -प्रत्यारोप होत आहेत. तसेच देशातील काही विरोधी पक्ष आणि त्यांचे समर्थक मिडीया कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर केंद्र सरकारला विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोंदींना दोषी ठरवत आहेत. राजकारणाचा एक रंगमंच असतो. तिथे ही काम करणार्या कलाकारांचे ब्रिद वाक्य आहे ते म्हणजे Show must go on. म्हणून त्या शोची पटकथा, कलाकरांचे कसब, शोचे एकूण स्वरूप यावर व्यक्त व्हावेसे वाटले म्हणून हा लेख प्रपंच.

आपल्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे हे सत्य आहे. इतर देशात कोरोना झोपी गेला आहे असे नाही. प्रगत देशात ही कोरोनाच्या बळींची संख्या वाढते आहे. इतर देशात जिथे लोकशाही आहे तिथे विरोधी पक्ष आपआपल्या पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून सहकार्य करीत आहेत असे निदान प्रसार माध्यमातून तरी ऐकू येते. तिथे ही राजकीय रंगमंच आहेत. जे काही प्रयोग होत असतील ते पडद्याच्या मागे होत असावेत. दुर्दैवाने आपल्या देशात त्या शोचे थेट प्रक्षेपण होत असते. याला मिडीया जबाबदार आहे की राजकीय मंडळी हे शोधण्याचा प्रयत्न न करता जे दिसते, जे होत आहे ते पाहात जाणे आणि व्यक्त होणे इतकाच हक्क पुढील निवडणूका येई पर्यंत आपल्याला असतो.

कुठलाही विषय घ्या त्यावर चाललेल्या राजकारणावर कुठल्याही नेत्याने संक्षिप्त उत्तर दिले तरी ते शेवटी राजकारणच असते.  सचिन वाझे हे प्रकरण क्षुल्लक आहे आणि लोकल आहे.' असे उत्तर  श्री  शरद पवारांनी दिले तेव्हा ते उत्तर त्यांच्यासाठी सोपे होते, सोयीचे होते. पण पुढे काय झाले आणि जे काही होत आहे ते आपण पाहातो आणि ऐकत आहोत. जर सुशांत सिंग, दिया सालीयाॅन, दोन साधू, मनसुखभाई हिरेन इत्यादींच्या हत्तेची प्रकारणे आणि सचिन वाझे प्रकरण झालेच नसते, तर आज  महाराष्ट्रात निदान कोरोनाने मांडलेल्या मृत्यूच्या तांडवात, जे टोकाचे राजकारण चालले आहे तसे दिसले नसते. या सर्व प्रकरणात खंडणी वसूली हेच राज्यकारभाराचं सुत्र राहिल्याचे उघड झाले. त्यामूळे भाजपा मविआ सरकारवर टिका करीत आहे. पण त्याची परतफेड म्हणून केंद्र सरकार महाराष्ट्राला कोरोनाशी लढण्यात सहाय्य करीत नाही, केंद्र सरकार महाराष्ट्राची वैरी आहे अशी टिका करणे हे अशोभनिय आहे.

मध्यप्रदेशमध्ये काॅग्रेस विरोधी पक्ष आहे. म्हणून काॅग्रेस  तेथील सत्ताधारी भाजपावर खापर फोडत आहे. महाराष्ट्रात भाजपा विरोधी पक्ष आहे. म्हणून भाजपा मविआ सरकारवर टिका करत आहे. ही राजकारणातील विरोधी पक्षांची स्वाभाविक प्रवृत्ती आहे.  पश्चीम बंगालमध्ये निवडणूकीची धामाधूम आहे. मागील लोकसभेतील निवडणूकीत भाजपाने तिथे १८ जागा पटकावून एक प्रकारे विरोधी पक्षाचे स्थान पटकावले आहे. म्हणून भाजपा  तेथील सत्ताधारी तृणमूल काॅग्रेसवर निवडणूक प्रचारातून  टिका करत आहे, ती ही एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. पण बंगालमधील निवडणूकीतल्या भाजपाच्या प्रचारामूळे महाराष्ट्रतल्या मविआ घटक पक्ष, आणि देशभरातील विरोधी पक्षांचे पित्त का खवळले ? पश्चीम बंगाल मध्ये विधानसभाच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदींनी भाग घेतला. पण त्यातून संविधानातल्या कुठल्याही कलमाचा भंग झालेला नाही. तरीही विरोधक पंतप्रधान मोदीवर वाजवीपेक्षा अधिक टिका करीत आहेत. ते पंतप्रधान आहेत, त्यांनी राज्य विधानसभेच्या निवडणूकीत का इतका भाग घ्यावा असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे हे मान्य पण विरोधी पक्षांच्या नेते मंडळीनी आणि त्यांचे राज्य आहे तिथल्या मुख्यमंत्र्यानी आतापर्यंत पंतप्रधानांचा किती आदर केला आहे यावर ही चर्चा होणे गरजेचे आहे. सुश्री ममता बॅनर्जींची कार्यशैली हुकूमशाहा सारखी आहे. पण पुरोगामी पत्रकार मंडळी बंगाल मधील प्रचाराचा धुराळा पाहून ममतांना Great Fighter असा किताब देत आहेत. मला एक गोष्ट कळत नाही ती ही की ममता बॅनर्जी दहा वर्षे सत्तेत आहेत, स्वतः मुख्यमंत्री आहेत, मग त्या राज्यशास्त्राच्या कुठल्या तत्त्वाच्या आधारे ग्रेट फाईटर ठरतात? त्या सर्व मंडळींना ममता बॅनर्जीचा विजय हीच एक शेवटची आशा उरली आहे. वस्तूतः ममता बॅनर्जींना सत्ता राखण्यासाठी खटपटी कराव्या लागत आहेत. तिथे भाजपाच ग्रेट फाईटर आहे. त्यानेच  ममता बॅनर्जीपुढे कडवे आव्हान उभे केले आहे. तिथल्या प्रचारात भाजपाचा चेहरा मोदीजी आहेत, आणि मोदींचा प्रचारातला सहभाग म्हणजे भाजपाचा विजय असे समीकरण झाले असल्यामूळे सारे विरोधी पक्ष, त्यांचे मिडीयातील समर्थक मंडळी  कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावाचा आडोसा घेत पंतप्रधान मोदींवर टिका करीत आहेत. मूलतः जनतेच्या आरोग्यासंबंधी उपाययोजना राबविण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. केंद्र सरकार राज्यांना आर्थिक मदत देते आणि वेळोवेळी  मार्गदर्शन करते. म्हणून दिल्ली हायकोर्टाने केजरीवाल यांना स्पष्टपणे सुनावले आहे की, तुम्हाला जनहिताचे निर्णय घेऊन राज्यकारभार करता येत नसेल तर तसे आम्ही केंद्र सरकारला कळवितो. यातून दोन गोष्टी लक्षात येतात. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे केंद्र सरकार सक्षम आहे असे न्यायालयाला पटले असावे, आणि केजरीवाल सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहे हे चाणाक्ष न्यायालयाच्या लक्षात आले.  केजरीवालने केद्राकडून मिळालेला निधी जनतेला मोफतचे पाणी, वीज,  एसटी प्रवासा साठी वापरले. त्यामूळे केद्र सरकारने ऑक्सीजन प्लान्ट साठी दिलेले पैसे त्यांच्या हातात शिल्लकच राहिले नाहीत. ज्या राज्यात भाजपेतर पक्षांची सत्ता आहे अशापैकी काही राज्य सरकारांचा व्यवहार केजरीवाला सारखाच आहे. संविधानातील ३६० कलमाचा आधार घेऊन केंद्र सरकार अशा राज्यात आर्थिक तसेच सार्वजनिक आरोग्य सुरक्षतेची आणिबाणी घोषित करू शकते. ३५६ कलम लावून केंद्र सरकार असे राज्य सरकार बरखास्त करू शकते. मोदी सत्तवर येऊन सात वर्षे झाली पण त्यांनी संयम पाळला आणि लोकशाहीची बूज राखली यावर मोदींवर टिका करणार्या विरोधी पक्ष आणि त्यांच्या समर्थक मिडीया आणि विचारवंतानी विचार करून प्रथम आपल्या दुष्ट हेतूंचे  विसर्जन करावे.

पंतप्रधान मोदी बंगालच्या निवडणूकीच्या प्रचारात गुंतले म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असा आरोप संपादक महाशयांपासून ते सोशल मिडीयावरील विरोधी पक्षांचे फुटकळ कार्यकर्ते करीत आहेत. पण ही मंडळी निवडणूका घोषीत झाल्या तेव्हा झोपा काढीत होती का? जर ममता बॅनर्जींनी आपली सत्ता लोक कल्याणासाठी राबविली असती आणि त्यांना प्रचारसभा न घेता पुन्हा सत्तेवर येण्याची ठाम खात्री असती तर त्यांनीच निवडणूक प्रचार ऑनलाईनने करू या अशी आत्मविश्वासाने  मुख्य निवडणूक आयोगा कडे सुचना करावयास हवी होती की नाही? ' माझा बंगाल '  'मी बंगालची बेटी ' अशा शेखी मिरवित भाजपाला बाहेरचा पक्ष असे म्हणणार्या ममता बॅनर्जीना बंगाली लोकांना कोरोनाच्या दुसर्या लहरीत सुरक्षित ठेवण्याची तळमळ सर्वात प्रथम वाटावयास हवी होती की नाही? हाच प्रश्न  केरळ आणि तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांना ही लागू पडतो.  तिथे भाजपा नगण्यच आहे. तिथले सत्ताधारी आणि विरोधी पक्ष संघ-भाजपा आणि मोदीचे समान शत्रूच आहेत. मग तेथील पक्षांनी ऑनलाईन प्रचाराची मागणी करणे योग्य होते की 
नाही ? आसाम मध्ये भाजपा विरूद्ध डावे- काॅग्रेस अशी लढत आहे.  काॅग्रेसने आसामात ऑनलाईन प्रचाराचा आग्रह धरला नाही. कारण आसामात काॅग्रेसला सत्तेवर येण्याची आशा आहे. आसामात भाजपा सत्तेवर आहे म्हणून  भाजपाने ऑनलाईन प्रचाराची मागणी केली असती तर  भाजपाला आसामात विजयाची खात्री नाही म्हणून भाजपाने केवळ काॅग्रेसला जमीनीवरील प्रचारापासून वंचित ठेवावयाचे आहे असा आरोप विरोधी पक्षांनी केला असता.' जावे ज्यांच्या वंशा तेव्हाच त्यांना कळे ' हा सिद्धांत राजकारणावर  सर्वात अधिक प्रभाव  टाकू शकतो. या सिद्धांताचा वापर ' बहूजन सुखाय बहुजन हिताया '  या ब्रीद वाक्याने प्रत्येक राजकीय पक्षांने प्रतिस्पर्धी पक्षाच्या जागेवर आहोत असे समजून भूमिका घेतली तर देशातील  राजकारणाला सहमतीची जी नितांत गरज आहे ती लाभली असती. तसे पाहता सहमती हेच मानवी जीवनाचे खरे मुल्य आहे. पण ते अंगिकारले जात नाही. आपल्या राज्यातील जनतेला प्रचार सभांमूळे आपण कोरोनाच्या मुखात ढकलतो आहे  याची जाणीव कुठल्याही भाजपेतर पक्षांच्या  मुख्यमंत्र्यांनाही वाटली नाही. म्हणून पंतप्रधानावर टिकेचा इतका कडक रोख का ठेवावा हा साधा आणि सरळ प्रश्न ज्या मतदारांनी मोदींना पुन्हा पंतप्रधानपदावर बसविले त्यांना पडला आहे. त्यांच्या भावनांची कदर कोणी करावी ? विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या पण त्यांच्यावर  टिका न करणार्या पत्रकार आणि संपादक मंडळीची संख्या मोठी आहे. त्यांच्यासंबंधी मी काही बोलू इच्छीत नाही. भाजपाच्या विजयात त्यांचा ही वाटा आहे असेच मी गेली सहा वर्ष समजतोय. 

सुश्री ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये दोन वेळा सत्ता काबीज केली. पण लोककल्याणकारी योजनेद्वारा  केंद्र सरकारने दिलेल्या निधीचा वापर स्वतःची सत्ता अबाधित राखण्यासाठी केला . तरीही  केंद्राने निधी देताना सापत्न वागणूक दिली असा टाहो फोडण्याचे नाटक प्रचार सभेत ममताने लोकांसमोर केलेच ना !  म्हणजे प्रचार सभांचा दुरूपयोग केलाच की !  महाराष्ट्रातले सध्याचे मविआ सरकार तर शपथविधी घेतल्यापासूनच केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत आहे असा रडीचा डाव मांडत आहेत. आता तर केंद्र सरकार महाराष्ट्राचे वैरी आहे असे ही म्हणू लागले आहे. महाराष्ट्र सरकारकडे सुद्धा केंद्राने पाठविलेला निधी नुसताच पडून आहे. महाराष्ट्र सरकारकडे न वापरला गेला असा केंद्राचा निधी किती पडून त्याची विभागशः आकडेवारी देवेंद्र फडणवीस वेळोवेळी पत्रकार परिषदेत मांडत असतात. पश्चीम बंगाल मध्ये ग्राम पंचायत स्तरापर्यंत तृणमूल काॅग्रेसच्या नेत्यांनी विकास निधीचा पैसा आपल्या नातलगाच्या भल्यासाठी वापरला आहे अशी माहिती पत्रकार मंडळींनी मतदारांशी संवाद साधतांना आपल्याला न्यूज चॅनेलवरून लाईव्ह ऐकावयास मिळाली आहे. महाराष्ट्र सरकाराचा व्यवहार बंगाल सरकार हून वेगळा नाही.  किंबहूना त्याच साठी मविआ सरकारचा जन्म झाला आहे. महाराष्ट्रातल्या चार  प्रमुख पक्षांच्या (म्हणजे भाजपा, शिवसेना, काॅग्रेस आणि राष्ट्रवादी ) आमदारांची संख्या आहे ती कमाल पातळीवर पोहचलेली आहे. या सत्यावर २०१४ आणि २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीचा निकालाने शिक्कामोर्तब झाले आहे. जर हीच स्थिती पुढे राहणार असेल तर सध्याच्या मविआ सरकारच्या तिन्ही पक्षांतर्गत मुख्यमंत्रीपद मिळविण्याची गुप्त स्पर्धा राहणारच. जर स्वतःच्या पक्षाची संख्या वाढवायची असेल तर आमदार विकत घेणे हाच पर्याय राहतो. हा पर्याय महागडा असतो. म्हणजे अधिक पैसा खर्च होणार. त्यासाठी प्रचंड निधी लागणार. तो आणावयाचा कोठून? तर सध्या जी सत्ता हाती आहे त्यातूनच. म्हणून खंडणी वसूली सुरू झालेली दिसली. आता यातून कुठला पक्ष आडवा होणार हे फक्त चौकशी एजन्सी कडूनच कळेल.

पश्चीम बंगाल मध्ये पोलीस यंत्रणा संपुर्णतः तृणमूल काॅग्रेसच्या स्थानिक नेत्यांची कठपुतली ठरली आहे. महाराष्ट्रातही तसेच घडते आहे. सचिन वाझे प्रकरण तर जगभर गाजले आहे. या बाबतीत तृणमूल काॅग्रैस थोडीशी तरी बरी असे वाटते. तृणमूल काॅग्रेसच्या नेत्यांची दडपशाही परकीय आक्रमकांहून अधिक जाणवत असल्याचे तेथील जनता हळू आवाजात म्हणत आहे. महाराष्ट्रात तशी भिती जनतेत दिसत नाही. म्हणजे महाराष्ट्र सरकार या बाबतीत ममता बॅनर्जीपेक्षा चांगले आहे असे नाही. अर्णव गोस्वामी आणि कंगना राणावतला दिलेली वागणूक मोगल शाहीच्या दृष्कृत्यांशी बरोबरी करेल इतकी दुष्टतेची होती. याचा अर्थ महाराष्ट्रातील जनतेमध्यें  दशहत पसरविण्याची ताकद या सरकारकडे आहे अशी समजण्याची गरज नाही. कारण विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष भाजपा आहे. शिवाय महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेता तडफदार आहे, अभ्यासू आहे  आणि विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री आहे आणि माजी गृहमंत्री ही आहेत. काॅग्रेसमधून बाहेर पडून ज्यांनी प्रादेशिक पक्ष काढले त्या सर्व पक्षांचा कारभार हुकूमशाही धर्तीचा असतो. या पक्षांनी काॅग्रेसवर घराणेशाही आणि पक्षातंर्गत लोकशाही नाही अशी टिका करण्याचा हक्क जन्मतःच गमाविलेला आहे. महाराष्ट्रातील मविआ सरकारचे घटक पक्षांचे नेते आपल्या कार्यकर्त्यांवर जरब बसवू शकतात पण भाजपा पुढे यांची दादागिरी चालणार नाही. कारण भाजपा आता राजकारणात शठं प्रती शाठ्यम् या न्यायाने वागतो आहे.

या शिवाय दिल्लीतील शाहीनबाग, किसान आंदोलन तसेच पश्चीम बंगाल आणि देशभर धार्मिक धृवीकरण झाल्याची जी संघ-भाजपासंबंधी आवई उठविली गेली, ते ही एक कारस्थान आहे, जे  विरोधी पक्षांनी विदेशी शक्तीच्या संगनमताने केले आहे. शाहीनबागचे धरणें फक्त मिडीयात गाजले. देशातील समस्त जनतेनी या कारस्थातानात बहुतांश मिडीया ही सामील झालेली पाहिले. त्यामूळे मोदी सरकारने आणि जनतेने शांत राहणे पसंत केले. त्यामूळे विरोधी पक्षांना स्वतःच्या शक्तीचा जो फार मोठा भ्रम झाला होता, तो ही फुटला. किसान आंदोलन हे ही एक पुर्वनियोजित कारस्थानच होते. प्रजासत्ताक दिनी किसान आंदोलनाचे खरे सुत्रधार खलिस्थानवादी  इस्लामी जिहादी आणि दुनियाभरचे डावे विचारवंत सोबत धनाढ्य ख्रिस्ती लोक होते हे स्पष्ट झाले. कुठे गेले ते किसान नेते ? आपली सारी शक्ती, मती आणि किर्ती गमावून बसले. पंतप्रधान मोदींनी ही सारी प्रकरणे हाताळताना जो संयम दाखविला तो फक्त एखाद्या स्थितप्रज्ञालाच शोभून दिसणारा आहे. यात काहींना अतिशोयक्ती वाटू शकते. मग त्यांच्यासाठी एकच उपाय तो म्हणजे त्यांनी राजकारण हे ही रणागंण आहे असे समजून पंतप्रधान मोदींना खुशाल भारतीय राजकारणातला बापमाणूस असे समजावे.

आता काही मिडीयावाले धार्मिक धृवीकरणावर सतत बोलत आहेत. पश्चीम बंगालच्या निवडणूकाची घोषणा झाल्यापासून तिथे धृवीकरण झाले आहे अशी हाकाटी पुरोगामी मिडीयाने सुरू केली. म्हणून या विषयाकडे वळू या. आपल्या देशाचा स्वातंत्र्य पुर्व काळाच्या इतिहासाचा डोळसपणे अभ्यास केला तर लक्षात येते की देशातील धार्मिक धृविकरणाचा पाया मुस्लीम राजवटीतच खोदलेला होता आणि त्यावर व्यवस्थित सिमेंट आणि शिंपण घालण्याचे अहोरात्र काम करून  ब्रिटीश राजवटीने तो पाया भक्कम केला आणि त्यातून मुस्लीम लिगला जन्माला घातले. पुढे एक कट्टर इस्लामी देश म्हणून पाकिस्तानाची निर्मिती केली.  तरीही ब्रिटीशांची राजवट म्हणजे आपल्या देशासाठी इष्ट आपत्ती होती असे मानणार्या पाच पिढ्या ब्रिटीशांच्या शिक्षण धोरणामूळे स्वंतत्र भारतात निर्माण झाल्या. युरोपात जे समाज प्रबोधन  घडले, जी औद्योगिक क्रान्ती झाली त्याचा फायदा भारताला झाला हे मी मान्य करतो. समाज प्रबोधन करण्याची गरज इस्लामी आक्रमकांमूळे वाढली. आजही पश्चीम आशिया, मध्य आशिया तील इस्लाम समाजात काळानुसार वैज्ञानिक दृष्टीकोन स्विकारलेला नाही हे सत्य आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन स्विकारलेले प्रगत देशात असलेली साम्राज्यवादाची नशा  ही सुद्धा माणूसकिला काळिमा लावणारी बाबच नव्हे काय?  आपल्या भारत देशात हिंदु समाज बहुसंख्याक आहे पण हिंदु दैवातांची चित्रपट, सिरियल्स मधून येता जाता चेष्टा करीत जाणे आणि हज यात्रेला करोडो रूपयांची आर्थिक मदत केंद्र सरकार आणि राज्य सरकाराकडून दिली जाते, आणि नैसर्गिक आपत्तीतून फक्त हिंदु मंदिरातील जमा होणारा निधी वापरणे हा भेदभाव म्हणजेच प्रबोधन हे चुकीचे नव्हे काय?  सर्वधर्मसमभाव म्हणजे अल्पसंख्याकांच्या हिताला प्राधान्य देणे, त्यांच्यासाठी शिक्षण, आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी खास सवलती देणे हीच बाब निदान भारतात फक्त पुरोगामी बाब ठरविली जाते त्यातूनच  समाजातील ऐक्याला पदोपदी तडा जात असतो या संबंधी राज्यकर्त्यांनी डोळेझाक करणे ही पुरोगामी बाब नव्हे.

एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगभर राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात ' पुरोगामी ' नावाची एका अजब शाखाचा उदय झाला. तीच आपल्या देशाला स्वातंत्र्यानंतर शाप ठरली आहे. कारण आपल्या संस्कृतीत जन्मतः असलेल्या सहिष्णूताची कत्तल इस्लाम आणि इंग्रज राजवटींनी केली आणि दुसर्या महायुद्धानंतर जगभर  सर्वधर्मसमभाव नावाचे गोंडस अपत्य जन्मले, ते ब्रिटीशांनी स्वतंत्र भारतातील राजकर्त्यांच्या मांडीवर बसविले. शेवटी तेच आपल्या राजकर्त्यांच्या आणि तथाकथीत पुरोगामी विचारवंत आणि संपादक मंडळींच्या मानेवरील भूत झाले आहे.  अलिकडे मी यु ट्यूब वरील लल्लन टाॅप (वरूनच असेल) चॅनेलवर बंगालच्या निवडणूकी संदर्भात काॅग्रेसच्या इतिहासाचा पुर्ण अभ्यास आहे अशा पाठक आडनाव असलेल्या महनीय व्यक्तीची  मुलाखत ऐकली आहे. त्यांनी जे म्हटले आहे, ते आपल्यासमोर संक्षिप्त रित्या मांडत आहे. ते म्हणतात,' पंडीत जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधीच्या काळात काॅग्रेसमध्ये राष्ट्रीय स्तरापासून ते थैट ग्रामपंचायत स्तरावर सनातनी हिंदु धर्मीय नेते होते. देशाच्या व काॅग्रेसच्या या दोन महनीय नेत्यांना अशा सनातनी धर्मीय नेत्यांची राजकारणात कधीच अडगळ वाटली नाही. उलट काॅग्रेसच्या कार्यकरणीत अशा मंडळींच्या मतांची आणि विचारांची योग्य ती दखल घेतली जात असे. सध्याच्या काॅग्रेसची निवडणूका जिंकण्याची आशा तर सोडाच पण काॅग्रेस अस्तीत्वात राहील की नाही हा मोठा प्रश्न आहे. कारण विद्यमान काॅग्रेस अल्पसंख्यांक समाजातील कम्युनियल नेत्यांच्या आहारी गेली आहे.' देशाचा सर्वात जुन्या राजकीय पक्षाबाबतची अशी स्थिती आहे तर इतर पक्षांबाबत आणखिन वेगळी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. आपल्या देशातील डावे पक्ष चीनमधील डाव्या पक्षांचे उजवा हात बनले आहेत. त्यांच्याबद्दल अधिक बोलण्यासारखे काही राहिले नाही. काॅग्रेसमधून जी नेतेमंडळी बाहेर पडली आणि स्वतंत्र पक्ष निर्माण केले, तेव्हाच  त्यांनी स्वतःच्या मनात गद्दारीला जन्म दिला. अशा मंडळींना कुठला धर्म नी कुठला देश ! बस आपल्या वारसांना एकवीस पिढ्या पुरेल इतकी संपत्ती करून ठेवावी हेच या मंडळीचे राजकारणातले ध्येय.  

एके काळी दिल्लीतील ल्युटीन मंडळीतील एक मोठे प्रस्थ मानले गेलेले विचारवंत म्हणजे डाॅ संजय बारू. यांचे अलिकडे India's Power Elite हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मी हे पुस्तक वाचले नाही. पण डाॅ बारूंची तीन न्युज चॅनेल्स वर झालेल्या मुलाखती पाहिल्या आहेत. त्यांत त्यांनी पंतप्रधान मोदींनी राजकारणातला इलाईट वर्ग नामशेष कसा केला, नोकरशहांची मानसिकता कशी बदलली, काही धाडसी निर्णय घेऊन जनतेची पसंती कशी मिळविली आणि सोबत अशा धाडसी निर्णयांतून जागतिक पातळीवर भारताचे एक स्वतंत्र स्थान कसे मिळविले आहे इत्यादी गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला. त्यांनी त्या मुलाखतीत विरोधी पक्षांना नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पराभव करणे जवळपास अशक्य झाले आहे अशी कबूली दिली 
आहे. 

पश्चीम बंगालभधील निवडणूक आणि प्रचारासंबंधी चर्चेत धार्मिक धृविकरणाचा असा वारंवार उल्लेख करून भाजपाच्या विरोधात मिडीयाने मुस्लीम मतदारांना एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या एक गठ्ठा मतें ममताच्या पारड्यात टाकण्याचे आवाहन केले आहे. पाच राज्यातील निवडणुकीचा निकाल कसा ही लागो पण पश्चीम बंगालच्या निवडणूक प्रचारातून एकंदरीत नवा भारतीय युवक कसा विचार करतोय, काय वाचतोय, त्याला काय हवं आहे हे मोदींनी आणि भाजपाने चांगले जाणले आहे. म्हणूनच डाव्यांचा बालकिल्ला असलेल्या पश्चीम बंगालमध्ये ' जय श्रीराम ' असा घोषा लावत भाजपाचा झेंडा घेतलेल्या असंख्य युवकांना  मोदींच्या प्रचार सभेत जात असलेले आपण पाहिलं आहे. जय श्रीराम हा घोषा बंगालमध्ये अचानक घुमू लागला असे नाही. शामल दत्ता म्हणून माजी आयबीचे डायरेक्टरांनी आपल्या मित्राला(नाव माझ्या स्मरणात नाही) एके ठिकाणी म्हटले आहे, ' You have no idea how quickely and comprehensively BJP has started capturing West Bangal. West Bangal will take BJP to such height, no other state has taken.' ३४ वर्ष डाव्याची सत्ता आणि १० वर्ष ममताची सत्ता बंगालमधील लोकांनी अनुभवली आहे. भाजपेतर पक्षांचे जिथे जिथे सरकार आहेत तिथे हळूहळू भाजपा हा एक चांगला पर्याय मानणार्याची संख्या वाढती आहे. प्रत्येक वेळी  एवीएम मशीनचा दुरूपयोग, अर्थ व्यवस्था मोडकळीस आणली, चौकीदार चोर है, संघ-भाजपा महात्मा गांधीजीची हत्या करणारी मंडळी अशा प्रकारचे नाझीचे गोबेल्स तंत्र वापरून  विरोधी पक्षांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना काही राज्यातील निवडणूकांत यश प्राप्त होईल पण लोकसभेच्या निवडणूकीत सर्वकष यश मिळेल असे सध्या तरी दिसत नाही. यावर उपाय एकच तो म्हणजे विरोधी पक्षांनी आदर्श विरोधी पक्ष म्हणून कसे काम करता येईल यावर विचार करायला हवा. त्या विचारात हिंदु मानस ला प्राधान्य देणे क्रमप्राप्त झाले आहे. कारण लालू प्रसाद यांनी अडवाणींच्या रथयात्रेला केलेला अटकाव, मूलायमसिंग यादवांनी कारसेवकांवर केलेला गोळीबार, महाराष्ट्रातल्या काॅग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारच्या कारकिर्दित जिहादींनी पोलीसांवर केलेला गोळीबाल, ममता बॅनर्जींनी नवरात्रोत्सवाच्या वेळी दुर्गामातेच्या विसर्जनास केलेली आडकाठी इत्यादी घटनांतून एकच सार निघतेय ते म्हणजे १९४७ पासून काॅग्रेस आणि इतर भाजपेतर पक्षांनी हिंदु- मानस काय असते याची कदर केली नाही. 

हिंदुधर्मशास्त्र सांगते की मूर्ती किंवा चित्र यावर लवकर एकाग्र होता येते. सिंदूर लावलेले अष्टविनायक मनाला समाधान देतात. ही एक प्रकारची मानसिकता आहे. देव हा मूर्तीत मावणार नाही आणि चित्राच्या चौकटीत बसणार नाही. हे आपल्या सर्वांना कळते. पण या प्रतिमांवर भावनिक केंद्रीकरण करण्यात समाधान असते. अद्वैतचा सिद्धांत मानणार्या आद्य शंकराचार्यांनी अनेक भक्तीस्तोत्रे लिहिली. पांडुरंग, कालभैरव या प्रभूरूपाचे स्तवन व पूजन केले. पण ते स्वतःच म्हणतात, " जो निर्लेप त्याला आपण गंध लावतो. जो स्वयंसंतुष्ट त्याला नैवेद्य दाखवितो. जो अमूर्त त्याला मूर्तीमंत करतो. यात आपले समाधान आहे."  याचे  कारण असे असावे की माणूस हा स्वतः सगुण आणि अवयवसंपन्न असल्यामूळे त्याने देवाचे वर्णन व चित्रण करताना आपलेच रूप शतगुणित केले. प्रतिकांची सफलता आणि मानवी भावनांची सगुणता यांच्या सहज अशा समागमातून आपली देवघरे व मंदिरे उभी राहिली. हे भावगम्य सत्य एकदा उमगले की मुद्दाम हुज्जत घालण्यात अर्थ उरत नाही. मशिदीत मूर्ती नसेल, मंदिरात ती असेल. चर्चमध्ये केवळ क्राॅस दिसेल. या सर्वांकडे पाठ फिरवून, डोळे मिटून, प्रतिमा टाळून ध्यान करणे ज्यांना शक्य होईल त्यांना ही ते स्वातंत्र्य असेल. इतकेच नव्हे तर देवाचे अस्तित्व न मानणार्यांना ही या भारतभूमीत सन्मानाने जगता येईल. पण त्यासाठी इथली संस्कृती जिवंत राहिली पाहीजे, हिंदुच्या प्रतिकांची चित्रपट वा तत्सम माध्यामातून होणारी कुचेष्टा थांबवावी लागेल. देशातील सर्व नागरिक कायद्यासमोर समान आहेत ही भावना दृढ करीत अल्पसंख्यकांच्या मानसिकतेत बदल करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करावे लागेल. हेच ते हिंदु मानस होय.

रविवार, १८ एप्रिल, २०२१

आचारः परमो धर्म आचारः परमं तपः|


प्रथम आपणांस नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या !  गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ' संवाद प्रतिपदेची ' हा लेख लिहून मी ब्लाॅगवरील लिखाणाला सुरूवात केली. आपल्याशी संवाद साधता साधता चार वर्षे पुर्ण झाली. या चार वर्षात आपण सकारात्मक प्रतिसाद दिला, योग्य त्या सुचना ही दिल्या, त्यातून मला अधिकधिक प्रेरणा मिळत गेली. त्यासाठी मी आपले सर्वांचे मनःपुर्वक आभार मानतो. आपणांस तसेच आपल्या परिवारातील सदस्यांना आणि आप्तजनांना या वर्षात सुख आणि चांगले आरोग्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. 

गेल्या वर्षीचा गुडी पाडवा आपण लाॅकडाऊन मध्ये साजरा केला. कोरोनाच्या महामारीतून आपण बाहेर पडतो आहोत अशी चिन्हें दिसत असताना पुन्हा लाॅकडाऊन करावा लागणार असे महाराष्ट्र सरकारने अलिकडे सुतोवाच केले होते. म्हणून येऊ घातलेल्या लाॅकडाऊनचे स्वरूप कसे असेल, किती दिवसाचा असेल याबाबत सर्वत्र चर्चा आणि सोबत कोरोनाची भिती अशा वातावरणातच यंदाचा ही गुढी पाडवा घरातच साजरा झाला. 

महाराष्ट्र सरकारने २ मे पर्यंत लाॅकडाऊनची घोषणा केली आणि लाॅकडाऊनचे स्वरूप ही स्पष्ट झाले.  लाॅकडाऊन संबंधी 'राजा कालस्य कारणम् ' असे समजून सत्ताधार्यांना दोष देणे हे सोपे काम असते. मग ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या दृष्टीने असो वा केंद्र सरकारवर टिका करणार्या विरोधी पक्षांच्या दृष्टीने. त्यावर अधिक चर्चा केल्याने काही साध्य होणार नाही. म्हणून तो विषय बाजूला ठेवणे हेच शहाणपणाचे आहे. लोकशाहीतला राजा कोण ? उत्तर आहे प्रजा. म्हणजे आपण सारे जण. सार्वजनिक ठिकाणी जी पथ्थें आपण पाळायला हवी होती ती पाळली नाहीत. राजकारणी मंडळीने ही शंभर टक्के पथ्थे पाळली आहेत असे कुठे दिसले आहे ? म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भव वाढला यात राव आणि रंक सारेच जबाबदार आहेत असेच धरू या. जगभरातील इतर देशांतही याहून वेगळे चित्र नाही. या कोरोना संकटात राजकिय मंडळीच्या आचरणा विषयी काही म्हणावे तर एक वाक्यप्रकार आठवतो तो म्हणजे 
' घरोघर मातीच्या चुली. '

सृष्टीला सृजन करण्याची जबाबदारी विधात्याने मानवावर सोपविली आहे. कारण त्याने फक्त मानवालाच बुद्धी दिली आहे. बुद्धीमूळे सारासार विचार करता येतो. त्याचेच नाव विवेक आहे. स्कंद पुराणात गुरूःर्एको विवेकः असे म्हटले आहे. माणसाचा पहिला गुरू स्वतःचा विवेक असतो.  याचा अर्थ असा नव्हे की गुरू-शिष्य परपंरेला छेद दिला गेला. प्रत्येक क्षेत्रात आपल्यासाठी जो गुरू असतो तो आपल्यासाठी साक्षात ब्रह्मा, विष्णु, महेश असतो. गुरू जे काही आपल्याला मार्गदर्शन देतो ते आत्मसात करण्यासाठी आपली गुरूवर भक्ती असली पाहीजे. जेव्हा अंतःकरणात गुरू बद्दल भक्ती तयार होते किंवा विश्वास वाटतो त्या क्रियेलाच विवेक म्हटले जाते. मनुस्मृतीत एके ठिकाणी म्हटले आहे,
        आचारः परमो धर्म आचारः परमं तपः |
        आचारः परमं ज्ञानम् आचारात् किं न साध्यते ||

आपले स्वतःचे आचरण हा महान धर्म आहे. दुसर्या एके ठिकाणी आचरः प्रथम धर्मः इत्येतद विदुषां वचः असे मी वाचले आहे. म्हणजेच आचारण हा अखिल मानव जातीचा पहिला धर्म आहे. आचरण एक तप आहे. आचरणातून ज्ञान प्राप्त होते याचा अर्थ आचरण हेच खरे ज्ञान आहे. संत महंतानीं लौकीक दृष्ट्या शैक्षणिक पदवी घेतली नव्हती तरी त्यांनी अजरामर असे साहित्य निर्मीती केली. त्यांचे साहित्य शाळा-महाविद्यालयीन आणि पीएचडीच्या अभ्यासक्रमात असते. आचरणाने आपण साध्य करू शकणार नाही अशी एक ही गोष्ट जगात नसते. म्हणून आचरण हा महान धर्म ठरतो. धर्म हा प्रथम आणि शेवटी ही धर्मच असतो. आपण आपले आचरण वेडेवाकडे ठेवले की तो अधर्म ठरतो. म्हणून सदाचरण हे मानवी जीवनमूल्य जन्मास आले. कोरोनाची साथ फैलावली ती चीन मधून असे म्हटले जाते. ते खरे असो वा नसो शेवटी चीन मध्ये ही माणसेच राहतात ना. तेथील राजकर्त्यांना आपले आर्थिक साम्राज्य वाढविण्याची दुर्बुद्धी झाली असावी हा एक तर्क काढला गेला आहे. याचे कारण चीनच्या सत्ताधार्यांबद्दल बहुतांश देशांना अविश्वास वाटतो. अविश्वास हा सदाचारणाच्या अभावात जन्मतो. म्हणून आपले आचरण दुसर्यांना विश्वासनिय वाटायला हवे. तसे न घडले की तो अधर्म ठरतो.

आपल्या धर्मशास्त्रात आचरणाला पहिला धर्म म्हटले आहे. कारण आपली धर्माची व्याख्याच व्यापक आहे. माताधर्म पिताधर्म, पतीधर्म, पत्नीधर्म, पुत्रधर्म, बंधुधर्म, कूळधर्म, ग्रामधर्म,  पंथधर्म, उपासना धर्म  शेजारधर्म, ग्रामधर्म, समाजधर्म,  राजधर्म, राष्ट्रधर्म, विज्ञानधर्म, वैश्वीकधर्म असे वाढत आपआपल्या कर्मापर्यंत पोहचते. मग निष्काम कर्मा पर्यंत जाऊ लागते. तेव्हा आपली मती कुंटते. तसे पाहता हाच मानव धर्म असे वाटते. पण तेवढ्यावर आपला आचार धर्म थांबत नाही. याच्चवत सर्व प्राणीमात्रात सुद्धा मी आहे. चल-अचल वस्तूत मी आहे असे भगवान श्रीकृष्णाने अर्जनुला गीतेत सांगितले आहे. याचा अर्थ आपले आचरण सृष्टीधर्मानुसार आहे की नाही इथपर्यंत ती व्याखा वाढते. याचा अर्थ हा विषय फार व्यापक आहे. म्हणून या विषयावर पुढे टप्प्या-टप्प्याने स्वतंत्र रित्या चर्चा करू या. कोरोना  महामारीच्या संदर्भात गेल्या वर्षी 'आपण एकशे पाच ' अशा शिर्षकाचा तसेच आणखिन चार लेख ब्लाॅगवर पब्लीश केले आहेत. त्यामूळे या लेखाचा विस्तार वाढवित नाही. तसे पाहता लेख लिहणे यात सुद्धा एक प्रकारचा आचार धर्म आहे. वक्त्याने आपले भाषण श्रोत्यांना कंटाळा येईल इतपर्यंत वाढवू नये तसेच लेखाच्या विस्ताराला ही सीमा असणे गरजेचे आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंनी एके ठिकाणी म्हटले आहे की ' एखाद्या लेखकाने आपली पत्नी आजारी असेल तेव्हा तिच्याकडे दुर्लक्ष करून लेखनात मग्न होणे हा त्यावेळी स्वच्छंद ठरू शकतो.'  सारांशाने ' अती तिथे माती ' हाच सर्व क्षेत्रातला आचार धर्माचा मंत्र आहे असे वाटते. आपल्या आहार-विहारापासून प्रत्येक क्षेत्रातले आचरण शुद्ध आणि संयमीत असावे असे आपल्या साधु-संतानी म्हटले आहे. 

आपल्या देशातील सारी संत-मंडळी, गुरूदेव नानक आणि बुद्ध-महावीरांसारखे देवादिक मंडळी, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, महात्मा गांधीजी, आचार्य विनोबा भावे, पंडीत दिनदयाळ उपाध्याय, स्वाध्याय प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोलवलकर गुरूजी, प्राध्यापक प्र ग सहस्त्रबुद्धे, साने गुरूजी, प्राचार्य शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, आफळेबुवासारखे किर्तनकार, प्रा सु ग शेवडे सारखे प्रवचनकार, श्री श्रीरवि शंकर, शंकर अभ्यंकर सारखे अध्यात्मिक गुरू अशी एक लांबलचक यादी होईल. त्यांची नावें आणि छोटासा परिचय करावयाचा म्हटले तरी एक मोठा ग्रंथ होईल. ' तेथे कर माझे जुळती ' अशा ईश्वरनिष्ठाची मांदियाळींची ही आपली भूमी. आपला देश  'आचरण ' या विषयाची शिकवण सार्या जगाला देश देऊ शकतो. पण आपले दुर्दैव म्हणा  की आपल्या कर्मदारिद्र्यपणा मुळे विख्यात लेखक ह ना आपटेंना पडलेला ' पण लक्षात कोण घेतो ' हा प्रश्न आपण आजच्या कोरोना संकटात ही अनुत्तरीत ठेवला आहे.

ईशावास्यम् इंद सर्वम् | असे आपण मानतो. म्हणजे चराचर सृष्टीत ईश्वर सामावलेला आहे. मनुष्य हा निसर्गाचाच एक भाग. जसा मनुष्य उत्क्रांत होत गेला तसा या सृष्टीतल्या प्रत्येक जीवाला उत्क्रान्त होण्याची प्रेरणा मिळत असावीच.  आपण अनंत औषधोपचार शोधले पण प्रत्येक जीवजंतूत ही प्रतिकार शक्ती निसर्गानियमाने वाढत असावी. अनेक जीवजंतू नवीन रूपे घेत असावीत. त्यामूळे त्यावरील लस शोधण्यात आणि तयार करण्यात अवधी लागतो. उत्पत्ती, स्थिती, लय या तीन अवस्था आहेत हे सर्वांना मान्य झालेले शाश्वत सत्य आहे. माल्थस नावाच्या अर्थशास्त्रीने  रोगराई, दुष्काळ, अतिवृष्टी, भूकंप, महापूर इत्यादीतून होणारी जिवीत हानी हे निसर्गाच्या खेळी आहेत असे आपल्या Theroy of Population या ग्रंथात मांडले आहे. आज कोरोना तर पुढे भविष्यात नवीन जीवजंतु येणार, जीवजंतु ही नवनवीन रूपे धारण करणार हे गृहीत धरूनच आपले आचरण ठेवणे गरजेचे ठरते. चौर्यांशी योनीतून मनुष्य देह प्राप्त होत असतो असे म्हटले जाते. त्यावर विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्न महत्वाचा नाही. पण इतर प्राण्यांपेक्षा आपण वरचढ आहोत हे तर खरे आहे. 'नरेची केला नर किती हीन'  की 'नराचा नारायण ' व्हावयाचे असे दोन पर्याय ईश्वराने म्हणा वा सृष्टीने आपल्या समोर ठेवले आहेत. पर्याय आपण निवडावयाचा आहे. पण ईश्वर नसला तर काय करायचे ? तो आहे असे मानावयास पुरेसा पुरावा नाही. पण आशेची एक बाब आहे. अनेक महापुरूषांना गूढरम्य अनुभव आले. नामजपामूळे मनाला शांती मिळते असा अनुभव आपणास आलेला असतोच. योगासने, दीर्घ श्वसन यामूळे लागणारी झोप  व प्राप्त होणारे आरोग्य अनेक जन्मी लाभले तरी हवेसे वाटेलच. आजारात सुख नाही आणि अज्ञानात आनंद नसतो. व्यसन आणि मोह तर विघातक. त्या वाटेने जाऊ नये. असे म्हटले जाते की माणूस हा केवळ दोन पायावर खांबा सारखा उभा आहे. तर इतर प्राणी चार पायांवर उभे असतात. पृथ्वीतलावर आढळणारी गुरूत्वकर्षाणाची ओढ माणसाच्या सरळ शरीरस्थितीमुळे त्याच्या वाटेला अधिक येते. तिचा प्रभाव कमी पडावा या साठी माणसाने अधून मधून बसावे किंवा सरळ आडवे व्हावे. शवासन ही एक सहजस्थिती आहे. या आसनात गुरूत्वाकर्षणाची शक्ती मुक्त होते. माणूस खाली ओढला जात नाही. हृदयावर कामाचा ताण कमी पडतो. रक्ताभिसरणासाठी त्याला अधिक बळ वापरावे लागत नाही. त्याला थकवा किंवा ग्लानी येण्याची शक्यता कमी असते म्हणून योगाचार्य म्हणतात की शवासन मृत्यूला मागे लोटते. जे योगासने करतात, दीर्घश्वसन करतात अशांना  कोरानो सारख्या संकटापासून भय कमी असते. आपल्या आहारात चरबी युक्त पदार्थ नसावेत. सर्वात महत्वाचे पथ्य म्हणजे प्रमाणाबाहेर विचार करू नये. महत्वाकाक्षेंचे मजले कमी करावेत. इत्यादी खबरदारी आपण बहुतांश डाॅक्टर मंडळी, योगाचार्य, आयुर्वेदिक वैद्यांकडून ऐकत आलो आहोत. ' शरीरमाद्य खलु धर्मसाधनम ' असे म्हटले आहे ते सदैव लक्षात ठेवून आपला आहार - विहार, बाबत सजगता बाळगावी. 

कसे वागायचे, काय खावे, काय खाऊ नये हे ठरविण्याचे स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. आकाशात स्वच्छंदपणे विहार करणारे पक्षी, रानावनात काही बंधने नसताना फिरणारे पशू पाहून आपल्याला वाटत असते की पशू-पक्ष्यांच्या जीवनात खरे स्वातंत्र्य आहे पण ते तितकेसे खरें नाही. आपल्याला काय हवे आहे याची जाणीव पशूपक्ष्यांना ही असते. पण जाणीवप्रमाणे प्रयत्न करून मिळविणे हे फक्त मानवालाच जमते. पशुपक्ष्यांचे जीवन सामुदायिक असते तर मानवाचे जीवन सामाजिक असते. जसे आपल्या शरीरात हृदयापासून प्रत्येक अवयवात रक्ताचे अभिसरण चालू असते तसे व्यक्ती आणि समाज, समाज आणि राष्ट्र यामध्ये वैचारीक अभिसरण होत राहणे गरजेचे असते. तोच  स्वतंत्रताचा खरा अर्थ आहे. ब्रह्मांडात अनेक ग्रह आहेत. त्यांचे आकारमान आणि गुरूत्वाकर्षण, गती, कक्षा सारं काही भिन्न आहे. पण ते ही आपल्या कक्षा सोडून फिरत नाहीत. बंधनातच स्वातंत्र्य शोभून दिसते. Ever viligance is the price we are paying for liberty असे कोण्या इंग्रजी समाजशास्त्रज्ञाने म्हटले आहे. ते सतत ध्यानात ठेवणे गरज असते. आपल्या शरीराच्या रचनेत ही बंधनाचे धागे असतातच. म्हणूनच पथ्ये पाळणे गरजेचे असते. समाज असो वा देश असो फक्त स्वातंत्र्यावर जगत नसतात. प्रत्येक समाजाला आणि देशाला अनेक अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाच्या संकटांना सामारे जावे लागते. शेवटी समाज जगला, देश जगला तर आपल्या स्वातंत्र्याला अर्थ आहे. म्हणूनच नागरिकतत्व जपून वापरणे आवश्यक आहे. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते  आपल्या पुर्वाश्रमींच्या हाल अपेष्टा व त्यांच्या त्यागातूनच मिळाले आहे. खरें म्हणजे देशातील थोर पुरूषांनी लोकशाही प्रणाली स्विकारल्यामूळे आपले मत माडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे. त्यामूळेच तर आपला परस्पर संवाद होतो आहे. म्हणून सारे स्वातंत्र्यवीर मग ते अहिंसा मार्गावरील असोत वा सशस्त्र क्रान्ती मार्गावरील, तसेच देशाच्या घटना समितीवरील सर्व तज्ञ मंडळी  इत्यादींचे आपल्यावर अनंत ऋण आहेत. मी जे काही इथे मांडले आहे ते अनेक महापुरूषांनी आपल्याला त्यांच्या जीवनगाथेतूनच सांगितले आहे. ही  जाणीव ठेवून कोरोनाशी या निकराच्या लढाईच्या समयीं  'समाज आणि देश प्रथम' असे ध्यानात ठेवून सरकारने घालून दिलेले नियम पाळून आपले आचरण शुद्ध ठेवण्याच्या संकल्प सोडू या. यातच आपल्या सर्वांचे हित आहे. 

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

वाझे प्रकरण गंभीर वळणावर ?

सार्या देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चीम बंगाल, आसाम, पाॅन्डेचरी, तामीळनाडू आणि केरळमधील निवडणूकांच्या प्रचार सभांचा धुराळा उडतो आहे, तोवर ओपिनियन पोल ही येऊ लागले आहेत. सर्व न्युज चॅनेल्स, वर्तमानपत्रें, साप्ताहिके, यु ट्युब चॅनेल्स वरून या राज्यांमधील निवडणूकांच्या प्रचाराचा रागरंग, मतदारसंघ निहाय चर्चा इत्यादी कार्यक्रमांची रेलचेल वाढली आहे. या पाच राज्यातील निवडणूकासंबंधीत आपण ही क्रमशः काही लिहावे असे वाटले. पण आपल्या महाराष्ट्रावर आख्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या वाझे प्रकरणातून अशा काही गोष्टी बाहेर येत आहेत की त्यावर आपल्याशी पुन्हा एकदा संवाद साधावा अशी इच्छा झाली म्हणून हा लेख प्रपंच.


निवडणूका नसतानाच्या काळात ही आपला महाराष्ट्र सचीन वाझे प्रकरणामूळे नॅशनल न्यूज चॅनेल्सवरील चर्चेत अग्रणी दिसतो. एखाद्या चांगल्या कामगिरी संबंधी आपला महाराष्ट्र  नॅशनल न्यूज चॅनेल्सवर चर्चेच्या अग्रणी राहिला असता तर आपल्या छातीत ऊर भरून आला असता. पण जे काही घडले आहे आणि घडते आहे त्यातून सर्वात पुरोगामी आणि विकसित राज्य म्हणून जो टेंभा आपण मिरवित होतो तो धुळीस मिळाला आहे.  मुंबई हायकोर्टने उपमुख्यमंत्री अनिल देशमूख यांनी खंडणी वसूल करण्याचा आदेश पोलीस स्टाफना दिला होता त्या आरोपा संबंधी जी याचिका होती त्यावर  ' सीबाय तर्फे चौकशी करावी ' असा निर्णय दिल्याची बातमी आली. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. जर  परमवीर सिंगनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते तेव्हाच देशमुखांनी राजीनामा दिला असता तर इज्जत राखली गेली असती. 

एकंदरीत या प्रकरणात फक्त वाझे, परमवीर सिंग आणि अनिल देशमुखाचींच इज्जत गेली असे नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काॅग्रेसचे शरद पवार यांची सुद्धा गेली आहे. तसे पाहता  विधानसभेत अलिकडील अर्थसंकल्पच्या अधिवेशनात हा विषय चर्चीला जात होता त्यावेळी बकवास करणारे सर्वश्री संजय राऊत, अनिल परब, जिंतेद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, सचीन सावंत, नाना पाटोले, मलीक सारख्या नेतेमंडळीचींही  इज्जत वेशीवर टांगली गेली आहे. आता म्हणे, अनिल देशमूख दिल्लीत गेले आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांनी जी काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे,  ती स्वंतत्र रित्याच त्यांना चालवावी लागेल. महाराष्ट्र सरकारने त्यांचा राजीनामा स्विकारला आहे. म्हणजे वाझे प्रकरणात अनिल देशमूख हा तिसरा बळीचा बकरा ठरला आहे.

लोकशाहीमध्ये कुठल्याही गोष्टीचे ' एक घाव दोन तुकडे ' असा प्रकार नसतो. प्रथम चौकशी, त्यानंतर प्रथम दर्शनी गुन्हा वाटल्यास केस नोंदविणे मग न्यायालयात जाणे नंतर परिस्थितीजन्य पुरावे दाखल करणे, त्यावर खटला चालविणे, साक्षी घेणे, वेळ पडल्यास संबंधित आरोपींच्या नार्को टेस्ट्स घेणे आणि शेवटी न्यायालयाचा निकाल हाती येईपर्यंत आपल्या सारख्या जनसामान्यांचा संयम संपतो आणि ते प्रकरण आपल्या मेंदुतील विस्मरण नावाच्या स्टोअर्समध्ये जमा होते. शेवटी नाईलाजास्तव ' जसे कर्म तसे फळ ' किंवा  'आले देवादिकांच्या मनी ' अशी आपण समज करून घेतो. सचिन वाझे प्रकरणावरील या चर्चेत देवाधिदेवांचा उल्लेख आल्यामूळे  कोरोनाच्या पहिल्या महामारीत सामना वृत्तपत्राचे संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊतानी  ' देवांनी दारें बंद करून घेतली आहेत ' असे विधान केल्याचे आठवले. या ठिकाणी मी संजय राऊतांना सांगू इच्छीतो की ' गेल्या सोमवारपासून महाराष्ट्र सरकारने छोटा लाॅकडाऊन घोषीत केला आणि मंदिरातील देव पुन्हा दारें बंद करून बसली आहेत आणि अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रीय देताना आपण म्हटले, की  ' परमेश्वरा इतकी निरपेक्षपणे चौकशी करणारी यंत्रणा नसते.'   'संजयजी, हा जागा झालेला परमेश्वर कोण आहे हे जरा खुल्या मनाने रोखठोक मधून आम्हांस सांगितला तर बरें होईल.  कारण तुम्ही मानलेल्या दोन ईश्वरापैकी एकाने मौन धरले आहे. दुसरा ईश्वर पोटदुखीने त्रस्त आहे. दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन खोटे-नाटे खुलासे देताना राऊतांच्या या महादेवाची तारांबळ उडालेली दिसली.' त्यामूळे संजय राऊतांनी कुठल्या निरपेक्ष परमेश्वराचा उल्लेख केला आहे हेच आता कळेनासे झाले आहे. शेवटी कुठला का असेना पण संजय राऊतांना परमेश्वर आठवला हे ही नसे थोडके !  मागील लेखात मी म्हटले होते की, ज्या तत्परतेने मोदी-शहा जोडीने एनआयए कडे हे प्रकरण सोपविले त्यावरूनच ठाकरे सरकाराच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज येतो. पण वाझे प्रकरणातून जे काही बाहेर येत आहे हे पाहता जो काही मी अंदाज बांधला होता तो फारच थिटा पडणार आहे, असे दिसू लागले आहे.

एनआयएच्या तपासातून दोन cctv vdr, दोन cpc, दोन hard disk, प्रिन्टर, दोन number प्लेट्स, बनावट पासपोर्ट, नकली आधार कार्ड, एटीम कार्ड,  ज्यात बार आणि रेस्टाॅरन्ट मालकाची नावे व हिशोब असलेली एक डायरी अशा बर्याच काही गोष्टी हाती लागल्या आहेत. सचिन वाझेच्या चार मार्च या दिवसाच्या सार्या हालचाली, म्हणजे सीएसएमटी स्टेशन ते कळव्यापर्यंतचा रेल्वेने प्रवास, नंतर मनसुख हिरेनचे पार्थीव मिळाले तिथे उपस्थिती नंतर पुन्हा बारकडे जाणे सारं काही एनआयएने टिपण काढून ठेवली आहेत. ठाण्याच्या हाॅस्पीटलमध्ये जिथे मनसुख हिरेनच्या देहाचे पोस्टमार्टम झाले त्याच दिवशी त्याच वेळी तिथे वाझेची उपस्थित होती असे विडीओतून आपण पाहिले. मनसूख हिरेनचा मृत्यु हा राजकारणातला बळी मानला जातो तेव्हा त्यासाठी सरकार विरूद्ध भांडणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्य जरूर आहे. पण मुंबईतील नाईट लाईफ मध्ये सर्वसामान्य जनांतला या मनसूख हिरेनचे सचीन वाझे सारख्याशी इतके सख्य कसे जमले हा ही एक आपल्यासारख्या जनसामान्यांना प्रश्न पडतो. याचा अर्थ आपल्या समाजव्यवस्थेतच बिघाड झाला आहे हे तर मान्य करावे लागते.  वाझे सोबत असलेली एक स्त्री, ती कोण होती, हे शोधणे एक दिव्य काम होते. पण एनआयएने तिचा ही शोध लावला. ती कोणीतरी मिरा रोडला राहणारी  मीना जाॅर्ज आहे. तिची ही चौकशी सुरू होत आहे. त्यातून वाझे सोबत असलेले बँकेचे खाते, २५ लाखाची रक्कम, इत्यादी महत्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. वाझे वापरत असलेल्या उंची गाड्या, त्यांची राहणी, उंची हाॅटेलमधील वास्तव्य,  सर्वच काही अलीशान, जणू एखाद्या चित्रपटातला अन्डरवर्डचा डाॅन भासावा असे अनेक विडीओ मधून वाझेंना आपण पाहीले आणि ऐकले आहे. पण समाजात नाईट लाईफच्या जीवनशैलीशी महिला वर्गाला आकर्षण कसे वाटले हा ही आजच्या बाजारी समाजव्यवस्थेतला मोठा दोष दिसतोय, त्याचे काय ? असे म्हटले जाते की प्रत्येक पेयात पाणी असते. दुधात, फळांच्या रसात, माणसाच्या रक्तात सुद्धा पाणी असते. पण ते पाणी म्हणून ओळखले जात नाही. आपली द्रवरूपता अन्य रूपात प्रगट करणारे व आपले सत्व समर्पित करून परत्त्वात विलीन होणारे पाणी हे सृष्टीतले समरसतेचे एक सर्वोत्तम उदाहरण आहे. समाजातील आपल्या सारखी सर्वसामान्य माणसे देशासाठी हेच करतात. पडेल ते काम पत्करणारी व वाट्याला येईल ती भूमिका पार पाडणारी सामान्य माणसे जगातून चालती झाली तर मागे काय उरेल? प्रत्येक जण लोकनेता, प्रशासकीय अधिकारी किंवा तथाकथित 'श्रीमंत ' झाला तर कामें पार पडतील का? सुतार, लोहार, चांभार, दुकानदार, बस कन्डक्टर, हमाल, भाजीवाला, चायवाला, पानपट्टीवाले ही माणसे जगातून चालती झाली तर समाजजीवन शून्यवत होईल. माणसाच्या या सामान्यत्वाला लोकशाहीत नागरिकत्वाचे परिमाण लाभते. नागरिकत्वाची निर्मलता, सुदृढता हेच लोकराज्याचे खरे बळ आहे. जेव्हा सामान्य माणसाला ही जगण्यासाठी लबाडी करावी लागते, तेव्हा लोकशाहीची प्रतिष्ठा धोक्यात येते. एनआयएच्या तपासातून जे काळेबोरें बाहेर येत आहे ते पाहता फक्त राजकीय व्यवस्थाचीच लक्तरे बाहेर येत आहेत असे नाही तर संपूर्ण मराठी भाषिक समाजाची जगभर शीं थू झाली आहे. आम्ही शाहू, फूले, आंबेडकरांचा वृथा अभिमान तरी कशासाठी बाळगावयाचा? आपण स्वतःच आपली फसवणूक करीत आहोत.

सचिन वाझेंनी जितकी वर्षे पोलीस दलात काम केलं आहे. त्यातील बहुतांश काळासाठी ते बडतर्फ होते. असे ऐकीवात आले आहे की त्या काळात सचीन वाझेंनी माहिती व तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले. केवळ शिक्षणच घेऊन ते थांबले असे नाही तर त्या क्षेत्रात इतकं प्राविण्य मिळविले आहे की अट्टल सायबर गुन्हेगारां पेक्षा ते महाअट्टल गुन्हेगार ठरावेत. काल तर सचिन वाझेनीं म्हणें एक लेटर बाॅम्ब टाकला आहे आणि त्यात शिवसेनेचे मंत्री अनिल परब, अजित पवार आणि  शरद पवार यांच्या ही नावाचा समावेश आहे. एखादा डोंगर पोखरला की त्यातून चित्र-विचित्र प्राणी बाहेर पडतात तसेच काहीतरी अजब आणि आपल्या तर्काच्या पलिकडचे जग कसे आहे याचे पुसटसे दर्शन होत आहे.  दिवसा काबाडकष्ट करून शांतपणे घरी परतायचे आणि रात्री झोपी जाणे हा आपल्या सारख्या सामान्यजनांचा दिनक्रम. पण ही मुंबई मायानगरी आहे. इथे रात्रीच ज्यांचा दिवस सुरू होतो असे लोक ही राहातात आणि आपले करोडो रूपयाचे व्यवहार करतात. हे व्यवहार करीत असताना एकाची ऐशबाजी तर दुसर्याचे शोषण, छळ किंवा थेट मृत्यू. मग तो लपविण्यासाठी बर्याच खटपटी आणि त्यातून आपल्या सारख्यानांही उपद्व्याप. सर्वत्र पोलिसांची टेहाळणी. नाईट लाईफचे समर्थक आणि रातोंके राजेलोक राजरोसपणे आपल्यावर सत्ता गाजवित असतात. यांना माणसें म्हणावे की पशू ? एखाद्या माणसाची अवहेलना करताना आपण त्याला 
'पशू' असे म्हणून मोकळे होतो. पशू मुके असतात. त्यांना सत्य समजते पण उच्चारता येत नाही. माणूस समजून उमजून सहज खोटे बोलतो. माणसे तंटेबखेडे करतात. चोर्या करतात. लूट करतात. मारामारी करतात. दंगली व जाळपोळ करतात. कोर्टाची पायरी झिजेपर्यंत तिचा चढउतार करतात. पशू अशा प्रकारची आगळीक करीत नाहीत. भूक नसताना ते खात बसत नाहीत. ते भक्ष्य मिळवितात आणि लागलीच खातात. उद्याच्या दिवशी खाण्यासाठी तजवीज व्हावी म्हणून फ्रिजमध्ये ठेवतात किंवा बेकायदा साठा करतात असे काही ऐकीवात आले नाही. पशू उगाच कोणाची छेड काढीत नाहीत. द्वेष-मत्सर हा भाव त्यांच्या जीवनात आढळत नाही. पशू-पक्षांना मानसोपचाराची गरज नसते. त्याच्यांत पक्ष, गट, संघटना नसतात. असतात ते थवे आणि कळप. स्वार्थ साधावा म्हणून ते संस्था काढीत किंवा चालवित नाहीत. हे सर्व पशू-पक्षी जीवन पाहिल्यावर माणसाने जीवन सुधारावे असे वाटते की नाही? सत्ता, मत्ता, मानापमान ही नाटके सोडून पशूंची पार्दशकता पत्करून आपल्याला किमानपक्षी सुखाने जगता येऊ शकते की नाही ? श्रीगोपाळकृष्ण, श्रीपशुपतिनाथ आणि श्रीदत्तगुरू सारख्यां पशुधनाचा आदर करणार्या देवाधिदेवांची, संत-महंतांची परंपरा असलेल्या आपल्या समाजाने पशू-पक्ष्यांकडून काही शिकावयास हवे की नाही? इत्यादी प्रश्न आपल्यासारख्या जनसामान्यांच्या मनात उभे राहिले आहेत. 

वाझे प्रकरण इतकं गंभीर वळणावर आलेलं आहे की  ते केवळ महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नसून आपल्या देशाच्या सुरक्षतेला आव्हान उभे करणार्या पाकिस्तान देशाने रचलेल्या कटाशी संबंध आहे असे राॅचे निवृत्त अधिकारी एन. के. सूद , माजी पोलीस महासंचालक अरविंद इमानदार, माजी केंद्रीय गृह सचीव आर. वी. एस. मणी यांच्या सारख्या अनुभवी अधिकार्यांच्या मुलाखतीतून स्पष्ट झाले आहे. वाझे प्रकरणाला आपल्या बाॅलीवूड मधील कलाकारांचा, राजकीय नेत्यांचा मुंबईत १९९३ साली बाॅम्बस्पोट घडवून आणणार्या मोस्ट वान्टेड खतरनाक दाऊद ईब्राहीमशी थेट असलेल्या संबंधाची मोठी पार्श्वभूमी आहे असे ही म्हटले जात आहे.  एनआयएच्या तपासातून जे काही बाहेर येत आहे त्यावरून मविआ नावाचे सरकार अस्तित्वात आणण्याची योजना२०१९ च्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारातच आखली होती की काय असा संशय बळावतो आहे. मविआ सरकारने फक्त केंद्र सरकारच्या विरूध्दात बोलणे, सारा दोष केंद्र सरकारचाच असा पवित्रा घेऊन महाराष्ट्रात इतक्या हत्या घडत असुनही  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर नाही असा देखावा विद्यमान राज्य सरकार करीत आहे. ही तर हद्दच झाली हो !  आता तर महाराष्ट्र सरकार गृहमंत्री अनिल देशमुखाच्या पाठीशी बळ उभे करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच की ! आताच्या ताज्या बातमीनुसार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमूख यांच्या याचिका फेटाळल्या आहेत. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने मविआ सरकारच्या अध्वैर्युंच्या थोबाडीत सणसणीत हाणली आहे.  जे ' महा राष्ट्र ' म्हणून ओळखले जावे यासाठी  ज्या १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले, ज्यांनी तहान-भूक विसरून संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन छेडले, केंद्र सरकार मधील अर्थमंत्रीपदाचा ज्यांनी राजीनामा दिला, ज्यांनी ' हे मराठी भाषिकाचे राज्य ' असे उद्गार काढीत समस्त मराठी लोकांच्या अभिमानरूपी सागराच्या लाटेतून आलेला, १मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण कलश आपल्या हातात घेऊन आले, अशा आपल्या पुर्वाश्रमींच्या स्वप्नातील हाच तो आधुनिक,  पुरोगामी, आणि विकसित महाराष्ट्र का ? येत्या १मे ला आपल्या राज्याचा ६२ वा वर्धापन दिन आपण साजरा करणार आहोत  पण कुठल्या हाताने साजरा करणार ? निरपधार्यांच्या रक्ताने माखलेल्या हाताने की लोकांकडून खंडणी स्विकारलेल्या हातानी ? कुठल्या मुखाने आपण जय महाराष्ट्र म्हणणार आहोत ? हे  फक्त तो सर्वसाक्षी परमेश्वरच जाणो ! 

आपण व आपले उत्सव--मातृदिन (भाग १)

आपण व आपले उत्सव-- मातृदिन   देवीयों और सज्जनो नमस्कार ! हमारी मातृभूमी को देव-देवताओंकी भूमी माना जाता है | इसका कारन हमारे यहाँ सृष्टी हर ...