शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

काॅंग्रेस फूटीच्या उंबरठ्यावर ? भाग 2


प्रश्न काॅंग्रेस मध्ये फूट पडणार का या पेक्षा काॅग्रेसची मालकी जी गांधी परिवाराकडे आहे ती संपुष्टात येईल का आणि काॅंग्रेस मध्ये सामूहीक नेतृवाचा उदय होईल का हा अधिक महत्वाचा प्रश्न आहे. या बाबत दूमत होणार नाही. पण या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी काॅग्रेसच्या वाटचालीचा इतिहास पाहावा लागेल. भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूच्या निधनानंतर एका गरीब कुंटुबातील काॅंग्रेसचा कार्यकर्ता आपल्या कार्यशैलीने प्रभाव पाडत पंडीत नेहरूंच्या सरकारमध्ये मंत्रीमंडळातील मंत्रीपदावर बसलेले श्री लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधानपदी विराजमान झाले. याचा अर्थ पंडीत नेहरूंनी काॅंग्रेस हा पक्ष आपल्या  वंशाची मालमत्ता व्हावी असा प्रयत्न केला नाही हे प्रांजळपणे मान्य करणे आवश्यक आहे. भारताच्या आतापर्यंतच्या पंतप्रधानांपैकी सर्वात अधिक सनदशीर पंतप्रधान म्हणून लाल बहादूर शास्त्रीजींचा नंबर पहीला लागतो असे माझे प्रांजळ मत आहे. पण दुर्दैवाने पाकिस्तान विरूद्ध १९६५ साली झालेल्या युद्धात ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताने मोठा विजय मिळविला, अशा लाल बहादूर शास्त्रींचा रशियात भारत-पाक मध्ये तह करण्यासाठी गेले असता अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वार्ताने भारतवासीयांना प्रंचड दुःख झाले. सर्वसाधारणतः आकस्मिक निधनाच्या वार्तेवर  लौकर विश्वास बसतच नाही. साम्यवादी रशियात जिथे प्रसारमाध्यांवर सरकारचे नियंत्रण असते, तिथे शास्त्रीजींचा मृत्यू झाला. म्हणून भारतीय जनतेला शंका-कुशंकानी घेरले. त्यासंबंधी अलीकडे एक चित्रपट ही प्रदर्शित झाला. त्याबाबत येथे चर्चा करणे प्रशस्त नाही.

पुढे पंतप्रधानपदी पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी विराजमान झाल्या. त्या कशा पंतप्रधान झाल्या व  काॅंग्रेसमधील इतर जेष्ठ नेत्यांपैकी पंतप्रधानपदी बसू का शकले नाही याबाबत ही चर्चा झाली पण तेव्हा आजच्या सारखे अद्यावत माहिती व तंत्रज्ञानाच्या अभावी पडद्यामागील घटना कधी बाहेर आल्या नाहीत. इंदिरा गांधी रशियाच्या पाठबळाने पंतप्रदानपदी बसल्या याचा ओझरता उल्लेख मी लेखाच्या पहिल्या भागात केले आहे. इंदिरा गांधी यांची कार्यपध्दत रशिया व चीन या देशातील एक पक्षीय साम्यवादी राज्यपद्धीतीची असल्यामूळे काॅंग्रेस मध्ये उभी फूट पडली. अर्थात ती फूट नव्हती. उलट पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पक्षांवर ही आपले नियंत्रण हवे होते. म्हणून त्यांनी राष्ट्रपतीपदाचे काॅंग्रेसचे उमेदवार निलम संजीव रेड्डी यांच्या विरोधी पडद्यामागे अपक्ष उमेदवार वि वि गिरी यांना पाठींबा देऊन विजयी केले. एका अर्थाने खुद्द पंतप्रधानाने आपल्या पक्षात बंड केले व ते यशस्वी झाले. आपल्या पक्षात पंतप्रधानपदाचा स्पर्धक निर्माण होऊ नये यासाठीच त्यांनी कामराज योजना म्हणजे साठ वर्षे वय पुर्ण झालेल्यांनी राजकीय पद भूषविता येणार नाही असा नियम काॅंग्रेस कार्यकारिणीत पास करून घेतला. तेव्हाच काॅंग्रेस मध्ये उभी फूट पडली. मोरारजी देसाई, स का पाटील इत्यादी बुजूर्ग नेत्याच्या गटाला सिन्डीकेट काॅंग्रेस व इंदिरा गांधीच्या गटाला इन्डीकेट काॅंग्रेस हे नाव पडले. मूळ काॅंग्रेसची बैलजोडी हि निशाणी गोठली गेली. दोन्ही गटाना भिन्न निवडणूकीचे चिन्ह देण्यात आले. तेथूनच काॅंग्रेसची मालकी इंदिरा गांधीकडे जाण्याचा मार्ग खुला झाला. १९७१च्या निवडणूक जाहिरनाम्यात रशियाच्या सल्ल्यानूसार समाजवादाच्या आधारावरील अर्थव्यवस्था व गरीबी हटाव अशा घोषणा जाहीर करून इंडीकेट काॅंग्रेस प्रचंड बहुमताने सत्तेवर आरूढ झाले. त्यानंतर थोड्याच अवधीत इंडीकेट काॅंग्रेसला इंदिरा काॅंग्रेस असे नाव प्राप्त झाले. नंतर इंदिरा इज इंडीया असे भौमतीक सुत्राच्या आधारावर रशिया, चीनच्या धर्तीवर  एक व्यक्तीय, व एक पक्षीय राज्यव्यवस्था निर्माण करीत आपल्या लोकशाहीचे बळ कमी होऊ लागले. इंदिरा गांधीनी आपल्या धाकट्या, संजय नावाच्या मुलाला  काॅंग्रेसचे सरचिटणीसपद देऊन काॅंग्रेस पक्षात हळूहळू  घराणेशाही प्रस्थापित केली. पुढे भ्रष्टाचार, महागाई , बेकारी, वाढली. सत्तेचं केंद्रीकरणत होत गेले. काॅग्रेसच्या विरोधात लोकांची नाराजी वाढली. लोकांचा असंतोष वाढला. या असंतोषाचे जनक सर्वोदयी जयप्रकाशजी नारायण ठरले. विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले. त्यातच  खुद्द इंदिरा गांधीनी आपल्या मतदार संघात अवैध मार्गाचा अवलंब करून विजय मिळविला होता असा निकाल एका  खटल्याच्या सुनावणीत अलाहाबादच्या न्यायालयाने दिला. त्यातूनच राजकारणात संधी दिलेल्या आपल्या संजय नावाच्या धाकट्या मुलाच्या सल्ल्याने देशात पंतप्रधान इंदिरा गांधीनी देशात आणिबाणी आणली. सिंडीकेट काॅंग्रेसच्या नेत्यासकट सर्व विरोधी नेत्यांनां तुरूगात डांबले गेले. प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य स्थगित केले. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली. भारतात लोकशाही ऐवजी एकाधिकारशाही आली.  पुढे १९७७ च्या निवडणूकीत सिन्डीकेट काॅंग्रेस, विरोधी पक्षांनी निर्माण केलेल्या जनता पार्टीत विलीन झाली. व इंदिरा काॅंग्रेसला अधिकृत काॅंग्रेस पक्ष असे मानण्यात येऊ लागले.१९७७ च्या निवडणूकीत काॅंग्रेसचा दारूण पराभव झाला. खुद्द इंदिरा गांधी व त्यांचे पुत्र संजय गांधी यांचा आपआपल्या मतदार संघात पराभव झाला. त्यानंतर १९७८ साली इन्डीकेट काॅंग्रेस मध्ये फूट पडली. देवराज अर्स, यंशवतराव चव्हाण, ए के ॲन्टनी, प्रियरंजनदास मुन्शी, के उन्ननीकृष्ण, इत्यादी नेतृत्वाखाली एक नवीन काॅग्रेस  पक्ष उदयास आला. 

पुढे जनता पार्टीचे सरकार अंतर्गत मतभेद होऊन गडगडले. पुढे १९८० सालच्या लोकसभेच्या निवडणूकीत इंदिरा काॅंग्रेसला प्रचंड बहूमत मिळाले. नंतर यंशवतराव चव्हाणच्या नेतृत्वाखाली अनेक नेत्यांनी काॅंग्रेसमध्ये वापसी केली. सिन्डीकेट काॅंग्रेसचे अस्तीत्व अगोदरच नष्ट झालेले होते. हात या चिन्हाची इंदिरा काॅंग्रेसच अधिकृत ठरली. पुढे संजय गांधी विमान अपघातात मृत्यु पावले. नंतर इंदिरा गांधीनी एयर इंडीयात पायलटची नोकरी करणारे पुत्र राजीव गांधीना काॅंग्रेसचे सरचिटणीस नेमले. इंदिरा गांधीची दुर्दैवी हत्या झाली. स्वाभाविकपणे घराण्याचा वारस म्हणून पंतप्रधानपदी व काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी राजीव गांधी विराजमान झाले. इंदिरा गांधीच्या मृत्यूची सहानभूती मिळावी म्हणून राजीव गांधींनी १९८४ साली मध्याविधी निवडणूका घेऊन प्रचंड विजय मिळविला.  त्यानंतर बोफोर्सच घोटाळा झाला म्हणून विश्वानाथप्रताप सिंगने काॅंग्रेस मध्ये बंड करून विरोधी पक्षांच्या साहय्याने विशेषतः चांगला केडर बेस व लोकसंपर्काच्या जोरावर शक्तीशाली झालेल्या भाजपाच्या साहय्याने १९८९ साली काॅंग्रेसचा पराभव केला व स्वतः पंतप्रधानपदी विराजमान झाले. दरम्यान भाजपाने अयोध्येत रामजन्मभुवीवर श्रीराम मंदिर उभे राहावे यासाठी अध्यक्ष लालकृष्ण आडवाणीची रथ यात्रा काढली.  जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण राजीव गांधीची ऐन निवडणूक प्रचाराच्या काळात दुर्दैवी हत्या झाली. मतदानाचे पुढील काही चरण थांबविण्यात आले. पुढील चरणाच्या  निवडणूकीत काॅंग्रेसला सहानुभूती मिळून काॅंग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेवर आला. त्यावेळी काॅंग्रेसचे अध्यक्षपदी तसेच पंतप्रधानपदी वयाच्या जेष्ठतेच्या निकषावरून नरसिंहराव विराजमान झाले . म्हणजे काॅंग्रेस मध्ये सामूहिक नेतृत्व पुन्हा रूजू झाले असा अनुभव आला पण तो तेवढ्यापुरताच टिकला. काॅंग्रेसच्या बहुमताची मक्तेदारी संपली. पुढे जनमत खंडीत येऊ लागले, आणि देशात आघाडी सरकाराचे पर्व सुरू झाले. राजकीय अस्थिरता आली. शेवटी निवडणूकीत भाजपा सर्वाधिक जागा मिळून भाजपा आघाडीचे सरकार आले आणि प्रधमच भारतिय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले.

नंतर बदलत्या काळाचे आव्हान स्विकारावे म्हणून गांधी घराण्याची सून असलेल्या सोनिया गांधीकडे काॅंग्रेसचे अध्यक्षपद आले. पण काॅग्रेसला एक हाती सत्ता त्या आणू शकल्या नाहीत. पण काॅग्रेसच्या आघाडीची सत्ता आणू शकल्या. तेथूनच काॅंग्रेस पुर्णतयः गांधी परिवाराची मालमत्ता झाली. सोनीया गांधीनी स्वर्गीय इंदिरा गांधीची नक्कल केली पण शेवटी त्यांच्याच नेतृत्वाखाली काॅग्रेस रसातळाला पोहचली. याचे कारण सोनीयांच्या काळात काॅग्रेसचे स्वरूप हिंदू विरोधी होऊ लागले. भगवा आंतकवाद नावाचे काल्पनीक अस्त्र उभे करून हिंदु संन्याशांना छळले. हिंदु मंदिराच्या चाव्या अहिंदूच्या हाती ठेवण्यात आल्या. ख्रिस्ती मिशनरी आणि जिहादी मौल्लवी उघड उघड भाजपाविरोधी मतदान करण्याचे फर्मान काढू लागले. राहूल गांधी तर पाक व चीनच्या भुमिकेला साजेसे असे वर्तन करू लागले. भ्रष्टाचाराने कळस गाठला. या सगळ्या घटना  युपीए म्हणजे सोनीयाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारच्या दहा वर्षात घडल्या. भाजपा व विशेष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदु हिताय भूमिका व विधायक कार्यामूळे भाजपाचा जनाधार वाढत गेला. भाजपाची धु'रा आक्रमक व जनहिताच्या कार्याचा सम्राट म्हणून नावारूपास आलेले गुजरातचे मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदीकडे आले. २०१४ साली नरेंद्र  मोदीच्या लाटेत भाजपाचे सरकार आले ते आज ही कायम आहे. तेव्हापासून काॅग्रेस विकंलाग झालीच पण इतर विरोधी पक्षात सुद्धा भाजपाला  झुंज देण्याइतके त्राण राहीले नाही. त्यामूळे मुख्य विरोधी पक्ष असे जेमतेम का असेना काॅग्रेसचे स्थान अस्तित्वात आहे. आज नाही म्हटले तरी देशात जितके घराणेशाहीचे पक्ष आहेत त्या सर्व पक्षांच्या वारसांपेक्षा राष्ट्रीय पातळीवर फक्त गांधी घराण्यांचेच  राहूल व प्रियंका गांधी वड्रा यांचा वावर आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यामूळे काॅग्रेसची मालकी आज ही सोनीया गांधीकडेच आहे आणि पुढेही राहील. इथे एक प्रश्न आपल्या मनात येतो की मतदार  घराणेशाही का पंसत करतात? का एका व्यक्तीची लाट निर्माण होते. शेवटी माणूस हा प्राणी आहे. पशु-पक्षीत जसे अनुकरणियता अस्तीत्वात आहे ती माणसातही असते. बाजारात एखाद्या कपड्याच्या दुकानात सेल लागला की ग्राहकांची झुंड उडते. कारण स्वभाव. आपले शरीर पंचमहाभूतांने बनलेले आहे. तेज म्हणजे प्रकाश. सूर्याची किरणे जिथे अडथळा निर्माण होतो तेथून परावर्तीत होऊन जिथे अडथळा नाही तिथे विसवतात. वायू म्हणजे वारा जिथे पोकळी दिसते तिथे घुसतो. आप म्हणजे जल ते पाणी नदिचे असो वा पावसाचे ते खाली उतरत वाहत जाते. जिथे खड्डा दिसला तिथे साचते. तो खड्डा भरला की पुढे वाहात वाहात मोठ्या खड्यात म्हणजे समुद्राला मिळते. माणसाचे वर्तन व आचरण असेच असते. मानसशास्त्रात याला ग्रुप सायकाॅलजी म्हणतात. इतर देशातही राजकारणात व्यवसायात, धंद्यात घराणेशाही आहेत. तिथले ग्राहक एखाद्या प्राॅडक्ट ब्रँन्डचे चाहते बनतात. कारण स्वभाव. आजच्या घटकेला राजकरणातील घराणेशाहीच्या ब्रँन्डमध्ये काॅग्रेसचा ब्रँन्ड अधिक सरस आहे. भारतातील कुठचाच प्रान्त स्तरावरील पक्ष काॅग्रेसच्या पेक्षा अधिक खासदार निवडून आणू शकणार नाही तो पर्यंत काॅग्रेसच मुख्य विरोधी पक्ष राहील. म्हणजे काॅग्रेसच्या २३ बंडखोरांना वेगळा पक्ष स्थापन करावा लागेल. पण त्याच्यांकडे ही पंतप्रधान मोदींना आव्हान देण्या इतका सशक्त नेता नाही. त्यातही बंडखोरांपैकी कोण्या एकाचे नेतृत्व इतर विरोधी पक्ष स्विकारणार नाहीत. म्हणून काॅग्रेसची आज जी वाटचाल चालू आहे ती तशीच राहणार आहे.

गांधी परीवाराविरूद्ध जे खटले उभे आहेत त्यासंबंधीत काही हालचाल होऊन गांधी परिवाराला कारावास झाला तर कदाचित काॅग्रेस मधील बंडखोर नेत्यांचा निदान काॅग्रेसच्या परिघात विजय मिळाल्या सारखे वातावरण तयार होऊ शकेल. पण त्यातही गोच अशी आहे की नेतृत्व कोणी करावे याबाबत संम्रभ होऊ शकतो. पण इतक्या लौकर गांधी परिवारा विरूध्दात असलेल्या न्यायालयीन खटल्याचा निकाल लागेल अशी शक्यता फार कमी आहे. कारण न्यायालयात प्रचंड केसेस पडलेल्या असतात. त्यातच लाॅकडाऊनचा काळामूळे न्यायालयातील कामाचा भार फारच मोठा झालेला असेल. या शिवार काॅग्रेस गांधी घराण्याच्या ताब्यात राहणे, राजकारणासाठी भाजपाच्या फायद्याचे ठरतच आहे.  दुसरे असे की एकाच वेळी काॅग्रेस, व बाॅलीवूड जगत, नक्षलवाद, ड्रग्ज माफीया, जिहादी इस्लामी, ख्रिस्ती मिशनरी इत्यादींशी सलगी असणार्या भाजपेतर पक्षांना व मिडीयांना एक्सपोज करणे, म्हणजे सर्व पक्षांच्या मूळावर घाव घातल्या सारखे होऊ शकते. त्यातून त्यांना एकत्र येण्याची संधी मिळू शकते. हे पंतप्रधान मोदी जाणतात. म्हणून हळूहळू स्लो पाॅईझनचा डोस भाजपेतर पक्षांना देणे ही भाजपाची म्हणा वा मोदी-शहा या जोडीची रणनीती राहील असे वाटते. 

एकंदरीत बेरोजगारी, महागाई, मंदी, इत्यादी समस्या असूनही आपल्या नाकार्तेपणा मूळे विरोधी पक्षांनी राजकारणाची सारी सुत्रे मोदीकडें सोपविली आहेत. बरं त्यातही पंतप्रधान मोदी सुत्रे हालवित असताना राष्ट्रहिताला तिलांजली देऊन स्वार्थ साधत नाही ही जमेची बाजू विरोधी पक्ष लक्षात घेत नाहीत. त्यातही भाजपाचे वैशिष्य हे आहे की तो पक्ष इतर पक्षांपेक्षा सांघिकतेत सर्वात सरस आहे. तिथे सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान होऊ शकतो हे प्रत्यक्षात अनुभवास आल्यामूळे आजच्या नव्या पिढीला भाजपाची ओढ लागली आहे. सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोरोनाशी लढतीतील,  तसेच वादळ, पूर इत्यादी आपत्तीतले योगदानाचा भाजपाला फायदा होत असतो.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उभारलेल्या सेवा प्रकल्पातून केवळ परिश्रम करणारे व त्यागी स्वयंसेवकांच्या शक्तीच्या जोरावर असंख्य गरीब समाजबांधवांना आत्मनिर्भर करून सर्वसमावेशक हिंदू जीवन पद्धतीच्या यज्ञाचे जे अहोरात्र दर्शन घडवित  आहे
त्याचा ही फायदा भाजपाला होत आहे. त्यामूळे काॅग्रेस मध्ये फूट पडो वा ना पडो सध्या तरी भाजपा सर्व पक्षांना भार पडत राहील. सध्या तरी भाजपा नरेंद्र मोदींना पर्याय निर्माण करेल अशी शक्यता नाही. त्यामूळे पंतप्रधानपदी श्री नरेंद्र मोदीच राहणार आहेत. तोवर राहूल गांधी व काॅग्रेस हेच विरोधी पक्षांचे नेतृत्व करीत असताना दिसतील. असे असले तरी घराणेशाहीचे जे पक्ष आहेत त्याकडे नजर फिरविली तर समाजवादी मध्ये अखिलेश व त्याचे काका, राष्ट्रवादी व शिवसेनेतील  काका -पुतण्या, डीएमके, तृणमूल, बहूजन विकास पक्ष, इत्यादी पक्षात कलह निर्माण झालेले दिसतातच. तसाच प्रकार राहूल व प्रियंकात ही असू शकतो. पण त्याची वाच्यता बाहेर पडेल अशी सुतराम शक्यता नाही. म्हणून  इतर विरोधी पक्षांमधील स्पर्पेत आज तरी काॅग्रेस वरचढ आहे व भविष्यातही राहील असे दिसते.

काँग्रेस फूटीच्या उंबरठ्यावर? भाग 1

सध्या भारतातील राजकारण दोन महिलाभोवती फिरत असल्याने काॅग्रेस पक्षात जे काही घडते आहे त्यावर फारशी चर्चे होताना दिसत नाही. परंतु तसे पाहता हा राष्ट्रीय स्तरावरील विषय आहे. म्हणून चर्चा कराविसी वाटते. म्हणून हा लेख प्रपंच.


भारतीय राष्ट्रीय काॅग्रेसमध्ये सध्या काय चाललंय किंवा काॅग्रेस या पक्षाची सद्यस्थिती कशी आहे यावर लिखाण वा चर्चा करावयाची असेल तर प्रथम काय शिर्षक ठेवावे असा प्रश्न पडला. काॅग्रेस दुफळीच्या उंबरठ्यावर असे शिर्षक ठेवले असले तरी तरी उभी फूट काॅग्रेसमध्ये पडेलच असे निश्चीतपणे सांगता येत नाही. सोनिया गांधींनी पक्षाची सुत्रे हाती घेतल्या नंतर काॅग्रेम मध्ये प्रथमच २३ नेत्यांनी नेतृत्वासमोर आव्हान उभे केले. त्या आव्हानात किती दम आहे हे कळावयास वेळ लागेल. म्हणून अमेरिकेला जाण्या अगोदर २३ बंडोबा काॅग्रेसच्या नेत्यांकडे असलेली जबाबदारी काढण्याची एक तात्पूरता छोटीशी कारवाई करून सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेत गेल्या आहेत. श्रीमती सोनिया गांधीं सोबत राहूल गांधी ही गेले आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. पण दोन सर्वोच्च नेते अमेरिकेत का व कसे जातात, राहूल गांधीनी तरी थांबावयास हवे होते अशी चर्चा ऐकू येते पण ती निरर्थक आहे. कारण आजपर्यंत सोनिया गांधींना काय आजार आहे हे देशाला कळलेले नाही. विरोधी पक्षाचे एक मोठे नेते या नात्यांनी नव्हे तर दहा वर्षे युपीए सरकार काळात NAC च्या प्रमूख म्हणून जबाबदारी ज्यांनी सांभाळली त्यांच्या आजाराचे कारण गुपीत ठेवणे ही बाब लोकशाही मुल्याशी सुसंगत नाही. राहूल गांधीना सर्वात कोण चांगले ओळखत असेल त्या सोनिया गांधीच. तेवीस नेत्यांनी काॅग्रेसमध्ये बंडाचा झेंडा हातात घेतला असताना राहूल गांधी आपल्या गैरहजेरीत उगीच नसती आफत निर्माण करतील असे त्यांना वाटत असावे. बंडखोरांवर तात्पुरता जबाबदारीचे पद काढून घेण्याची एक छोटीसी कारवाई करण्याची चाल सोनिया गांधी खेळल्या. पण राहूल गांधींना सोबत घेऊन एक मोठी चाल त्या खेळल्या आहेत. त्यामूळे काॅग्रेसचा कारभार त्यांनी एकप्रकारे लाॅकडाऊन केला आहे. श्रीमती  सोनीया गांधी उपचार घेऊन परत आल्यानंतर, काही दिवस विश्रांतीचा काळ संपला की काॅग्रेसचे कामकाज सुरू होईल. तो पर्यंत आपण जी काही चर्चा करणार आहोत ती केवळ अंदाज बांधण्यापूरता सिमीत राहणार हे ओघाने आलेच.

संसदेचे पावसाळी अधिवेशन फारसे वादळी ठरेल असा अंदाज कोणी मांडला असेल तरी त्यातून विरोधी पक्षांच्या हाती काही लागणार नाही. कारण सरकारला घेरण्यासारखे प्रश्न असले तरी सारे विरोधी पक्ष आपआपल्या पक्षांतर्गत समस्याने त्रस्त आहेत. फक्त पंजाब मधील काॅग्रेस सुस्थितीत आहे. तरी तिधे ही नवज्योतसिंग सिध्दू बंड करताना दिसत आहेत. महारष्ट्रातही अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण  या दोघां नेत्यांचे पटत नाही. देवरा, प्रिया दत्त, संजय निरूपम, इत्यादी बंडाच्या तयारीत आहेत. राजस्थानमध्ये सचीन पायलट व अशोक गेहलोत याच्यांत समेट झालेला असला तरी तिथे पुन्हा बिघाड होणार नाही असे ठामपणे म्हणता येत नाही. दक्षिणेतील तेलंगण,व आन्ध्र मधील काॅग्रेसने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. कर्नाटकात जेडीयुच्या नादी लागून सर्वाधिक जागा मिळविणार्या भाजपावर कुरघोडी केली. ती अंगाशी आली. शेवटी भाजपा तिथे ही काॅग्रेसच्याच मूळावर घाव करणार. कारण जेडीयुची छाती फुगण्याची शक्ती नव्हतीच. महाराष्ट्रात शिवसेनेच्या व पवाराच्या नादी लागून काॅग्रेसने आपला पारंपारीक मतदारांनाच दुखाविले आहे. पश्चीम बंगालमध्ये काॅग्रेस डाव्यांच्या नादी लागली त्यामूळे ममताने स्थान भक्कम केले. ममताचे स्थान डळमळीत होणार होतेच पण विरोधी पक्षाची स्पेस काॅग्रेस गमावून बसली. ती जागा भाजपाला भरून काढण्याची संधी देऊन बसली.

अशा स्थितीत गांधी परिवार च्या विरोधात नॅशनल हॅराॅल्ड व इतर तत्सम  मालमत्ते संबंधीतल्या केसेस बाबत केंद्र सरकार खंबीर पावले उचलण्याची तयारी करू लागले तर काॅग्रेसच्या वाटचालीचे स्वरूप पुर्णतयः १९६९ च्या काळातील काॅग्रेस सारखे झालेले दिसू शकते. म्हणजे गांधी परीवाराची इंडीकेट काॅग्रेस व ज्या २३ नेत्यांनी बंड केले आहे, त्यांची सिंडीकेट काॅग्रेस अशी उभी फूट पडण्याची शक्यता आहे. कारण ज्या २३ काॅग्रेसच्या नेत्यांनी बंड केले आहे त्यात नावाजलेले कपील सिब्बल, अभिषेक मनु संघवी, शशी थरूर सारखे अभ्यासू आणि अनुभवी नेते आहेत. त्यांना  नॅशनल हॅराॅल्डची केस गांधी परिवाराला अडचणीची ठरणार असे वाटत ही असावे. म्हणून अगोदरच काॅग्रेसला फूल टाईम अध्यक्ष मिळत नसल्याचे निमित्त तयार केले असण्याची शक्यता आहे. काॅग्रेस मध्ये अनेक मोठाली पदें घेऊन गांधी परिवाराशी पंगा घेण्याची हिम्मत अनेक काॅग्रेसजनांना कोठून प्राप्त झाली या प्रश्नाचं उत्तरच तेच असावे. दुसरीकडे राहूल गांधीभोवती पिंगा घालणार्या नेत्यांमूळे काॅग्रेसमधील बंडखोर नेत्यांना स्वतःच्या परिवारातील सदस्यांना व नातेवाईकांसाठी काॅग्रेस मध्ये जम बसविण्याची संधी मिळणार नाही अशी खात्री झाली असावी हे ही एक कारण असू शकते. राजकारणात जम बसविण्यासाठी लागणारा पैसा व अनुभव या बंडखोर नेत्यांकडे आहेच, म्हणून त्यांना बंड करण्याची हिम्मत झाली असावी. अर्थात स्वतःच्या अंसतोषाचे जनक स्वतःच असणारे नेते अधून मधून प्रत्येक पक्षात  दिसत असतात. ते  लोकांच्या असंतोषाचे जनक असलेल्या लोकमान्य टिळकांचे वारसदार नाहीत. तसे ते दावा करीत ही नाहीत. कारण ते हास्यास्पद वाटेल हे ते पक्के जाणतात. पण भारतिय राजकारणात आयाराम-गयाराम अशी खासदार- आमदारांची एक स्वतंत्र जमात निर्माण करण्याचे जनकत्व त्याच्याकडे जातेच. आपण फार तर त्यांना शरद पवारांचे वारस म्हणून समजू शकतो. श्री शरद पवारांनी असे प्रयत्न केले पण शेवटी त्यांना वेळोवेळी काॅग्रेसच्याच आश्रयाला जावे लागले हा इतिहास आहे.

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीच्या दुर्दैवी निधनानंतर काॅग्रेसवर गांधी परिवाराचा प्रभाव राहू लागला आणि काॅग्रेसला सुद्धा गांधी परिवारा शिवाय तरणोपाय राहीला नाही हे आपण पाहतो. त्यामूळे अमाप संपत्तीचे मालक असलेले गांधी घराणे सहजा सहजी काॅग्रेसची मालकी सोडणार नाही. इंदिरा गांधीनाही रशियाच्या पाठींब्यामूळेच काॅग्रेसवर वरचष्मा दाखविता आला असे ऐकू येत असे. त्यावेळी माहिती व तंत्रज्ञान शाखेत इतकी प्रगती झाली नव्हती. म्हणून राजकारणात घडलेल्या प्रत्येक घटनांची माहीती गुप्त राहीली गेली. 

आज अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत ट्रप्म यांना रशियाचे सहाय्य मिळाले असे केवळ ऐकूच आले असे नव्हे तर त्यासंबंधीचा तपास ही होऊ लागला असे वृत्त ही सर्वांच्या कानी येऊ शकले. आज अत्याधूनिक शस्त्रांत्राची अमाप साठवण व आपल्या देशातील एनजीओच्या मार्फत पैसा पुरविणारे अशी बडी राष्ट्रे दुसर्या देशातील राजकारण, निवडणूका, परराष्ट्र खाते, उद्योग, व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान, कृषी आयात-निर्यात, इत्यादी क्षेत्रात  व्यापार, आर्थिक गुंतवणूक, व संरक्षण सज्जतेच्या करारांच्या नावाखाली आपला दबाव वाढवित असतात. या शिवाय गुप्त हेर,  दुसर्या देशांच्या नेत्यांना, माध्यमांना आपले दास बनविण्याचे कार्य करतात त्यासाठी स्वतंत्र विभाग ही असतोच. हा एक नवीन प्रकारचा विस्तारवाद होय. तेच आंतरराष्ट्रीय राजकारणचे स्वरूप झाले आहे. जगातील काही देशांना भारतात गांधी घराण्याचीच सत्ता असणे हे फायदेशीर ठरलेले आहे. त्यामूळे अशा देशांची आजही काॅग्रेस, आणि ती ही गांधी घराण्याचीच, हीच पहिली पंसती आहे. म्हणून सोनीया गांधीना राहूल गांधीचे वय पाहाता काॅग्रेसची डागगुजी करण्याची काही घाई दिसत नाही. त्यातही  पंतप्रधान मोदीशी टक्कर देणे राहूल गांधीना अशक्यच आहे. म्हणून संसदेतला सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळते आहे तितके सोनिया गांधीना पुरेसे आहे. म्हणूनच २३ बड्या काॅग्रेस नेत्यांना पक्षातून बडतर्फ केले नाही. सचिन पायलटला सांभाळून घेतले. त्याचे कारण ही तेच असावे. सचिन पायलटला समाजाविणे काॅग्रेसला सोपे पडले आहे. कारण ज्योतिरादित्य सिंधीया नावाचा दोन नंबरचा स्पर्धक काॅग्रेस सोडून गेला आहे. सचिन पायलट व ज्योतीरादित्य सिधींया मध्ये स्पर्धा नव्हती असे कसे मानता येईल, उलट पक्षांतर्गत स्पर्धा ही अधिक कडवी असते. दोन देशांच्या सर्वोच्च नेत्यांची शिखर परिषद ही त्या दोन्ही देशात व्यापार, उद्योग, संरक्षण इत्यादी क्षेत्रात सहकार्य व संबंध वाढविण्यासाठी असली तरी अशा शिखर परिषद घेऊन आपआपल्या देशात आपल्याला स्वपक्षातील स्पर्धक निर्माण होऊ नये हा हेतू साध्य केला जात असावा असेच मला वाटते. प्रत्येक देशाचा प्रमूख हा विरोधी पक्षांतील नेत्यांपेक्षा स्वपक्षातल्या स्पर्धकापासून अती सावध असतो. कारण सत्तेच्या राजकारणाचा मार्गच तसा असतो. चीनच्या राष्ट्रप्रमुखाच्या बाबतीत असाच प्रकार उद्भवत असल्याचे वाचनात आले आहे. 

आज तरी भाजपाला मोदी शिवाय पर्याय नाही. म्हणजे सोनीया गांधीना वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. इतर विरोधी पक्षातून मोदींना टक्कर देण्याइतका सक्षम नेता नाही ही बाब काॅग्रेसच्या पथ्थावरच पडलेली आहे. या शिवाय २३ बंडखोर नेत्यांपैकी एकाद्याचे नेतृत्व विरोधी पक्ष मानतील ही शक्यता नाही. म्हणजे काॅग्रेसमध्ये उभी फूट पडून ही काॅग्रेसचे काही नुकसान होणार नाही आणि भाजपाचे मूळीच होणार नाही. उलट या २३ बंडखोरांनी वेगळा पक्ष काढला तर भाजपाला फायदाच होईल.  त्यामूळे स्वपक्षात राहूल गांधींना स्पर्धक निर्माण न करणे हीच सोनीया गांधीच्या राजकारणाची सध्याच्यी प्राथमिकता झाली आहे. त्यांचे मन ही तेच सांगत आहे. त्यामूळे  खेडोपाडी हाताचा पंजा ही निशाणी पोहचलेल्या सर्वात जूना राजकीय पक्ष जो काॅग्रेस आहे, त्याची मालकी सोनीया गांधी सोडून देण्याची सुतराम शक्यता नाही. आपल्या येथे न्यायलयातील खटल्याचा निकाल लागेपर्यंत एक पिढी स्वर्गवासी झालेली आपण अनुभवत आहोत. त्यामूळे राजकारणातील नेत्यांना कुठल्याही न्यायालयीन खटल्याची फारशी भितीच उरली नाही. फार फार दोन टर्म सत्तेविना रहावे लागेल पण राजकीय नेता म्हणून मिरविण्याचे अनेक फायदे त्यांच्या बँकेत जमा होतच असतात. शिवाय समाजव्यवस्थेतला मान आणि त्यांच्या बेनामी संपत्तीवरील कब्जा संपलेला आहे असे एकही उदाहरण सापडत नाही. म्हणून काॅग्रेसची वाटचाल आज जशी आहे तशी राहणार आहे. त्यात फारसा फरक पडणार नाही.

काॅग्रेसमध्ये उभी फूट पडली तर गांधी परिवाराचे काय होईल हा प्रश्न ही तितकाच महत्वाचा आहे. त्यावर ही चर्चा होणे गरजेचे आहे. त्यासाठी कृपया भाग २ पाहा.

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

दोन महिलांभोवती फिरणारं राजकारण


सध्या मुंबापुरीत दोन महिलांभावती राजकीय वादळ घोंघावत आहे. मला जाण आल्यापासून वेधशाळेने आतापर्यंत जितक्या चक्रीवादळाच्या तडाख्याचे अंदाज वर्तविले आहेत त्यातून बहूतांश वेळा वादळ उत्तरेकडे सरकत मुंबई निदान चक्रीवादळापासून बचावली आहे. सध्या दोन महिलाभोवती फिरत असलेले या राजकीय वादळाचं स्वरूप चक्रीवादळात होऊन घोंघावत ते समुद्राच्या उत्तरेकडे सरकत जाईल कि या वादळाचं स्वरूप चक्रीवादळात होऊन मुंबईतील विधानसभेवर तडाखा देईल का असा प्रश्न आपल्या सर्वाना सतावत असणार. म्हणून हा लेख प्रपंच.

रिया चक्रवर्ती आणि कंगाना राणावत या दोन महिलाभोवती फिरत असलेले राजकीय क्षेत्रातील वादळ आपण प्रथमच अनुभवत आहोत. त्रेता युगात जनककन्या व प्रभू रामचंद्राची पत्नी सितेचं हरण झाल्यावर भारतीय राजकारणात रामायण घडले. द्वापार युगात कौरवाच्या दरबारात द्रौपदीचं वस्त्र हरण झाल्यानंतर महाभारत घडले. पण सध्या मुंबईत ज्या दोन महिलाभोवती फिरत असलेल्या या राजकीय वादळातील महिला सिता व द्रौपदी नाहीत हे जितकं सत्य आहे तितकेच या वादळात कोणी श्रीराम नाही, व श्रीकृष्ण नाही, हे ही सत्य आहे. कलियुगात जगभरात जी काही शासनव्यवस्था किंवा जी काही राजनीती आहे त्यातील नीती गायब झालेली आहे, जे काही  राहीलं आहे ते फक्त राज आहे. त्यालाच सत्तेची खुर्ची किंवा राजकारण असे म्हटलं जात आहे. रिया व कंगना या चित्रपट सृष्टीतील आहेत. तस पाहता चित्रपट सृष्टीतील सृष्टी गायब झाली आहे, सुशांतसिंग राजपूत याचा संशयास्पद मृत्यु नंतर त्यासंबंधीच्या चर्चेतून एक पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झालेली आपण पाहात आहोत. त्या पोस्टचा आशय असा आहे की मिडीयाने हा विषय उगीच वाढविला आहे. ' कोण तो सुशांतसिंग, एक ड्रग्ज च्या आहारी गेलेला, श्रीमंत बापाचा सुशांतसिंग नावाचा तो युवक, काय त्याच्या मृत्युशी सामान्यजनांनाचा संबंध? कोरोना सारखी महामारी आटोक्यात आणायचे सोडून, मिडीया का या घटनेला अवाजवी महत्व देत आहे? ' वरवर पाहता ती पोस्ट आपल्याला वास्तवतेकडे घेऊन जाते पण असे दिसत असले, तरी ड्रग्ज पुरविणारी एक लाॅबी आपल्या समाजात आहे, जी समाजाला गेली कित्येक वर्ष पोखरत आहे याकडे कानडोळा करता येत नाही. त्यातही बाॅलीवूडमध्ये चाललेली दादागिरी ही परकीय शक्तीमूळे होत असेल तर हा एक प्रकारचा आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान आहे असे जर केंद्र सरकार मानत असेल तर त्यात केंद्र सरकारला दोष कसा देता येईल? श्रीरामजन्मभूमी संबंधीत आपल्या शासन व्यवस्थेत घडलेल्या राजकारणासंबंधी एक पोस्ट गेली काही वर्ष सोशल मिडीयावर व्हायरल होत असे हे आपल्या स्मरणात असेल. ' राममंदिराची काय इतकी मोठी गरज आहे; देशातील राजकीय नेते उपचारासाठी विदेशात जातात; त्यांना विदेशातील उपचाराचा खर्च परवडतो; म्हणून श्रीरामजन्मभूमीवर सामान्यजनांसाठी  विदेशातील रूग्णालया प्रमाणे एक अद्यावत रूग्णालय बांधवयास हवे.'  अशा आशयाची पोस्ट आपण पाहीली व आपल्याला पटली. वस्तुस्थिती अशी आहे की सुशांतसिंग राजपूताच्या मृत्युनंतर होणार्या चर्चेसंबंधी व्हायरल झालेली ती पोस्ट व श्रीराममंदिरासंबंधी व्हायरल झालेली पोस्ट यामध्ये ही राजकारणच होते. आपल्या देशातील समाजव्यवस्थेत ज्यांना काही रस नाही, ज्यांना फक्त देशातील सामान्यजनांचा खोटा कैवार घेऊन राज्यव्यवस्था व समाजव्यवस्था उलथून पाडावयाची आहे अशा तीन लाॅबी ज्या कार्यरत आहेत त्या लाॅब्या चतुराईने अशा पोस्ट सोशल मिडीयावर टाकत असतात. आपल्या देशात प्रामुख्याने, डावे व नक्षलवादी, जिहादी मुस्लीम आणि ख्रिस्ती मिशनरी या लाॅब्या कार्यरत आहेत. त्यांच्यात उपशाखा, व गट आहेत. त्यांना भारतीय जनतेसंबंधी इतका पुळका असता तर ईशान्य भारतात अशा लाॅब्यांचे सरकार अनेक वर्षे होते तिथे त्यांनी काय मोठी विकासाची कामें केली? तेथील जनता का भाजपाच्या पारड्यात मते देऊ लागली? वरील तिन्ही लाॅब्यांचे गुरू म्हणा वा पालक, हे विदेशी आहेत आणि त्यांच्यामार्फत मिळणार्या पैशावर या लाॅब्या चालविणार्या आपल्या येथील  नेतेमंडळी व विचारवंताना उच्चभ्रू जीवन जगावयास मिळत असते. या लाॅब्यातील मंडळी २०१४ च्या लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर सैरभैर झाली आहे;  त्यांच्या आश्रयास भाजपेतर सारे राजकीय पक्ष गेले आहेत; त्याचेच प्रत्यंतर महाराष्ट्रात आपल्याला आले आहे;  त्याचं गोंडस नाव आहे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार.

सुशांतसिंगच्या मृत्युचे प्रकरण बंद पेटीत ठेवण्याचे कार्य महाराष्ट विकास आघाडीचे सरकार इतक्या तत्परतेने का करीत आहे या संबंधीची शंका केंद्र सरकारला आली असावी आणि त्या शंकेच्या निरसनासाठी म्हणा वा त्यातून महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला नेस्ताबूत करण्यासाठी चालत आलेली आयती संधी हवे तर म्हणा,  केंद्र सरकार अशी संधी साधत असेल आणि त्याला कोणी राजकारण म्हटले तरी त्याबाबत आक्षेप नसावा हे मान्य. कारण जगभरातील प्रत्येक देशात सत्तेचे राजकारण असेच आहे. राजकीय डावपेचात जो पक्ष सरस ठरेल तो विजेता. जो जिता वह सिकंदर ! त्यामूळे पराजित झालेल्या पक्षांच्या समर्थकांना मग ते कार्यकर्ते असो वा पत्रकार संपादक मंडळी असो त्यांच्या मुखातून ' The people get the government what they deserve ' असे वाक्य येत असते. आपल्या देशात सत्तर वर्षे भाजपाचे समर्थक असे म्हणत होते तर गेली सहा वर्षे भाजपेतर पक्षांचे समर्थक हेच वाक्य मांडत आहेत. वक्त - वक्त की बात है और क्या?

प्रथम आपण रिया चक्रवती भोवती फिरणारं राजकारणावर चर्चा करू या. ही रिया चक्रवती कोण असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला दिसला. सुशांतसिंग निदान प्रथीतयश सिनेकलाकार होता. पण त्याचा मृत्यु हा आत्महत्याचा प्रकार नव्हता, उलट त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं गेलं वा त्याची हत्या केली आहे असे सुशातसिंग राजपूताच्या कुंटुबिंयास वाटले. म्हणून त्यांनी बिहार राज्यात FIR नोंदविली. बिहार मधील पोलीस यंत्रणा महाराष्ट्रात तपास करावयास आली. असा तपास होणे हा महाराष्ट्राचा व पर्यायाने मुंबईतील पोलीसाचा अपमान ज्यांना वाटला त्यांनी आपले मराठी अस्मितेचे राजकीय कार्ड वापरले. मराठी अस्मितेचं कार्ड स्वयंप्रेरणेतून मराठी समाजाने वापरले असते तर त्यात राजकारण नाही असे मानले गेले असते. पण महाराष्ट्रातील मविआ सरकारने, व त्यातही मविआ सरकारमधील प्रमूख घटक पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्याच मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रानेच मराठी अस्मितेचं कार्ड वापरल्यामूळे मविआ सरकार सुशातसिंग राजपूताच्या मृत्यूचे प्रकरण बंद पेटीत ठेवण्याचा प्रयत्न केला अशी भावना मराठी माणसालाही वाटली. हे स्वाभाविक आहे. शेवटी तो एक मतदार या नात्याने ही त्या प्रकरणाकडे पाहात असतो हे मान्य करावयास हवे.

कंगना राणावत ही एक सिनेनटी आहे व ती सुशातसिंगचा मृत्यू आत्महत्या नसून  हत्या आहे असेच सुरूवातीपासून म्हणते आहे. त्यामूळे कंगना राणावत कोण असा प्रश्न उभा राहीलेला दिसला नाही. पण या कंगना राणावतने मुंबई संबंधी POK असा उल्लेख केल्यामूळे ती अधिक चर्चेत आली. त्यामूळे ती मराठीद्वेषी आहे असा प्रचार करावयाची संधी शिवसेनेला मिळाली व त्याचा उपयोग शिवसेना करीत असेल तर वावगे काही नाही, कारण तो ही राजकारणातला एक डावपेच आहे. पण त्यातून सुशांतसिंग राजपूताच्या मृत्युचे कारण शोधणार्या ज्या तीन एजन्सी आहेत त्यांच्या तपास कार्यावर काही विपरीत परीणाम होणार नाही. फार तर मविआ सरकारला कंगानाच्या ऑफीसवर बूलडोझर फिरविल्याने सूड घेण्याचे समाधान मिळालं असेल, फार तर कंगानाच्या अरेरावीतून मराठी माणसाकडून सरकारला थोडीफार शाबासकी मिळाली ही असेल. पण मविआ सरकारने कंगाना राणावतच्या ऑफीसवर न्यायालयाचा निर्णय येण्या अगोदर बूलडोझर फिरविल्यामूळे राज्य सरकारला न्यायालयाकडून चपराक मिळणार हे ही निश्चीत. भरीस भर म्हणून मुंबईतील अनेक बेकायदेशीर बांधकामे मुंबई महानगरपालिका पाडण्याची तत्परता दाखविणार का असा प्रश्न भाजपाचे नेते विचारू शकतात. त्यातून भाजपाला मराठी द्वेष्टा अशी शेलके लावण्याची संधी मविआ सरकारला प्राप्त होत होईल असे दिसत नाही. कारण कंगना राणावतने तिच्या ऑफीसची जागा आहे ती इमारतच शरद पवारांची आहे असा खुलासा केला आहे.  या शिवाय महत्वाची राजकीय घटना म्हणजे मुंबई महानगर पालिकेने कंगनाच्या ऑफीसवर केलेल्या कारवाईची नोंद राज्यपाल महोदयांनी घेतल्याचे वृत्त आले आहे. त्यामूळे केंद्र सरकारला राज्य सरकारवर कारवाई करण्याची संधी प्राप्त असावी असे वाटते. परंतु या संबधी कंगानाने जी याचिका दाखल केली आहे, त्यावर  न्यायालयाचा काय निर्णय येईल यावर अवलंबून आहे. 

हा लेख लिहीताना काही शिवसैनिकांनी निवृत नौदल  अधिकारी श्री मदन शर्मा यांना मारहाण केल्याचे वृत्त आले आहे. शिवसेनेच्या प्रमूखाने युती धर्माची ऐशी तैशी केली. मागील दारातून विधानसभेत प्रवेश केला व मुख्यमंत्रीपद मिळविले. पण ते कशासाठी? निवृत्त नौदल अधिकार्याला मारहाण करण्यासाठी का? कायदा हातात घेण्यासाठी का? राज्य चालविणे म्हणजे शिवसेना चालविणे  नव्हे ? फौजदारी तत्सम गुन्हे वाढत गेले आणि बंद पेटीत ठेवायाचा प्रयत्न वर्तमान महाराष्ट्र सरकार करीत राहिले तर  तिन्ही घटक पक्षांना भविष्यात महाग पडू शकते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जाॅन एफ केनडींचे एक वाक्य आठवले" Political sovereinty  is but a mockery without the means of meeting poverty, illiteracy and disease." कोरोनाशी सुरू असलेल्या लढतीच्या काळात महाराष्ट्राचे मविआ सरकार  एकापाठोपाठ करीत असलेल्या चूका पाहता, Self -dertermination is but a slogan if the future holds no hope असेच म्हणावेसे वाटते. शेवटी बुडत्याचा पाय खोलात म्हणतात ना तशीच गत मविआ सरकारची होऊ पाहात आहे. मविआ सरकार विरूद्ध  केंद्र सरकार अशी राजकीय लढाई जी सुरू झाली आहे त्यातील पहिला सेट बेभान झालेले शिवसैनिक, सामनाचे संजय राऊत व हतबल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी केंद्र सरकारच्या पारड्यात स्वतःहून टाकला आहे. आता या लढाई संबंधीचे धावते समालोचन टिव्ही चॅनेल व वृत्तपत्रातून येत राहिले तर त्याचा दोष मिडीयाला देता येणार नाही. या लढाईतून मराठी माणसाचं काय हित जपलं जाईल हे फक्त मविआ सरकार व त्या सरकारचे समर्थन करणारे संपादक मंडळी व त्यांच्या कार्यकर्त्यानांच काय ते ठाऊक.

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

मृत्यु सुशांत पण महाराष्ट्र सरकार का अशांत ?

दिनांक २० मे रोजी ब्लाॅगवर महाराष्ट्रातील राजकारण या विषयासंबंधी लेख पब्लीश केला आहे. त्यात मी  म्हटले आहे की " जीव सामान्य नागरिकाचा का असेना तो अमूल्य असतो. त्यात भेदभाव करणे म्हणजे लोकशाही मुल्यांची प्रतारणा करणे होय. आपल्या देशाच्या संविधानाने चोरालाही मारण्याचा हक्क कोणाही व्यक्ती वा समाज समूहाला दिलेला नाही. तरीही पालघरला दोन साधूंची हत्या होते तीही कोरोनाच्या महामारीमूळे जमाव बंदी असताना. नंतर दिशा सॅलियनचा अनैसर्गिक मृत्यु , पाठोपाठ आपल्या येथील बाॅलीवूड नावाने ओळखल्या जाणार्या फिल्म-जगतात ज्याने स्वतःच्या मेहनतीने नाव कमाविले, त्या सुशांतसिंग राजपूताचा झालेला अनैसर्गिक मृत्यु.  इत्यादी घटनेतून महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याची निष्क्रियता वा चलाखी स्पष्ट झाली आहे. चलाखी शब्द वापरला याचे कारण आपल्या राज्याचे गृहमंत्री श्री अनिल देशमुखाने, सुशांत राजपूताच्या मृत्युसंबंधीचा तपास सुरू करण्याअगोदरच ' सुशांतने आत्महत्या केली ' असे वक्तव्य केले. तर त्यांचे बाॅस शरद पवारांनी " एका कलाकाराचे प्राणाचे मूल्य काय ते मोठे असे म्हणत, २० शेतकर्यांच्या आत्महत्येसंबंधी मिडीया का लक्ष घालत नाही असा उलटा प्रश्न उभा केला आहे. या शिवाय शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून संजय राऊत या विषयावर एकतर्फी अग्रलेख लिहितात आणि एका पाठोपाठ एकतर्फी व्टिट ही करीत असतात. अलीकडच्या काळात शरद पवार व संजय राऊत सतत काही तरी वाद उत्पन्न करीत असताना दिसत आहेत. या ठिकाणी ज्ञानपीठ विजेते वि स खांडेकर यांच्या एका पुस्तकातील प्रस्तावनेत म्हटलेले बोल आठवले आहेत. ते असे आहे. " तत्त्वबोधासाठी जगात फारच थोडे लोक वाद करतात. अहंकाराच्या समाधानासाठी, विद्वत्तेच्या प्रदर्शनासाठी, पूर्वग्रहाचे प्रिय असणारे पोकळ डोलारे सांभाळण्यासाठीच या जगात वाद उत्पन केले जातात आणि हिरीहिरीने लढविले जातात ! मनुष्य मुख्यतः आत्मपूजक आहे. सत्यपूजक नाही."  वि स खांडेकरांचे निधन १९७६ ला झाले. त्यामूळे आणिबाणीच्या कालखंडाविषयीची त्यांची मतें समजू शकली नाहीत. पण ते शरीराने १९७६ पर्यंत ताठ असते तर त्यांनी ' सत्तेचा व संपत्तीचा माज ' या गोष्टीमूळे  ही वाद उत्पन्न केले जातात हे वाक्य जोडले असते. सुशांतसिंग राजपूताच्या मृत्यु संबंधीत संशयाची सुई महाराष्ट्रातील सरकारमधील मंत्र्यावर व सत्ताधारी पक्षाकडे जी वळालेली दिसत आहे, त्यासंबंधीचा दोष मिडीया तसेच सर्वसामान्यांना देण्यात काही अर्थ नाही. कारण या केसमध्ये शिवसेना, व राष्ट्रवादी पक्षाला इतकं गुंतवावे का लागत आहे, ही केस बंद करण्याची घाई ही मंडळी का करीत आहेत, यातच सारं काही दडलंय आहे. अर्थात संपूर्ण चौकशी होऊन न्यायालयात सुशांतचा मृत्यू हा आत्महत्येचा प्रकार नसून ती हत्या आहे हे सिद्ध होईपर्यंत आपण वाट पाहात बसणे यातच शहाणपण आहे. जगभरातील अनेक कवी व अध्यात्मिक गुरूंनी मृत्यु म्हणजे चिरकाल विश्रांती असे वर्णन केले आहे. त्या अर्थाने मृत्यू सुशांत पण महाराष्ट्र सरकार, सुशांतसिंग राजपूताच्या मृत्युने का अशांत झाले असा प्रश्न आपल्या सर्वांना सतावत आहे. म्हणून हा लेख प्रपंच.

नुकताच सुप्रिम कोर्टाने सुशांतसिंगच्या मृत्युसंबंधीचा तपास सिबीआयकडे सुपूर्त करण्यास हरकत घेतली नाही. असा निकाल देऊन  महाराष्ट्र सरकारने सुशांतसिंगचा मृत्यू अपघाती  म्हणून जी नोंद केली त्यासंबंधी कोर्टाने फटकारले आहे. मुळातच सुशांतसिंगच्या मृत्युनंतर महाराष्ट्र सरकार जे  फक्त अशांत होते त्यात आणखिन भर झाली असून महाराष्ट्र सरकार सैरभैर होण्याची शक्यता वाढली आहे.

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यु संदर्भात शरद पवारांनी जे वक्तव्य केले त्या संबंधी आश्चर्य वाटण्याची गरज नाही. कारण ते हाडामासाचे राजकीय नेते आहेत. ज्या २० शेतकर्यांच्या आत्महत्याकडे मिडीयाने दुर्लक्ष केले आहे असा प्रश्न आज शरद पवार उपस्थित करीत आहेत, त्या प्रश्नांवर राजकीय व्यवस्थेनेच उत्तर द्यवयाचे असते आणि हे शरद पवारांना ठाऊक नाही असे जनता कशी गृहीत धरणार?  महाराष्ट्रातले सध्याचे मविआ सरकारचा जन्मदाता शरद पवार आहेत. मविआ सरकारने शेतकर्यांची आत्महत्या रोखण्यासाठी छोटीशी जरी उपाययोजना केली असती तरी मिडीयाने शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केलेच असते.

सध्या सुशांतसिंगच्या आत्महत्येसंबंधी जी चर्चा होत आहे, त्या पाठीमागील दुसरे कारण म्हणजे मुंबई पोलीसांनी आजपावेतो  सुशांतच्या अनैसर्गिक मृत्युसंबंधी  FIR दाखल केलेली नाही. मग पोलीस दल  तपास तरी कसला करीत आहेत, हा प्रश्न सामान्यजनांना पडला आहे. सिबीयाला विरोध करावयाचा, व बिहारमधून तपास करण्यासाठी आलेल्या पोलीसांचे क्वारनटाईन करण्यातच मुंबई पोलीसांचा वेळ बरबाद झाला. सुशांतसिंगचा मृत्यू खरोखरीच आत्महत्याने झाला असेल तर राज्य सरकारने या केसबाबतचा तपास सीबियाकडे वर्ग करायला हवा होता. त्यामूळे अगोदरच कोरोनाच्या महामारीशी टक्कर देऊन थकल्या-भागलेल्या मुंबई पोलिसांवर या नसत्या उठाठेवेतून अधिकचा ताण पडला नसता. केवळ  फिल्मी दुनियातील मित्रांसोबत मुख्यमंत्र्याचे पुत्र, जे राज्याचे पर्यावरण मंत्री आहेत, ते आदित्य ठाकरें एका पार्टीला उपस्थित राहिल्यामूळे ते आरोपी ठरत नाहीत. इतकं साधं ज्ञान महाराष्ट्र सरकारमधील भल्या, भल्या मंत्र्यांना व पोलीस अधिकार्यांना नसेल हे संभवत नाही. कदाचित आज आदित्य ठाकरे जात्यात आहेत, पण आपण सूपात आहोत या जाणीवाने ही बडी मंडळी बिथरली असावी. जर का आदित्य ठाकरे निर्दोष असतील तर ही केस सिबायलाच काय, बिहार राज्याच्या पोलीसाकडे वर्ग केली तरी ते निर्दोषच सुटतील असा आत्मविश्वास  मुख्यमंत्र्याने व्यक्त करून सिबीयकडे हा तपास सोपविला असता तर मुख्यमंत्र्यांची शान वाढली असती व अनायसे भाजपाला कोंडीत पकडण्याची एक मोठी संधी प्राप्त झाली असती. पण तसे नसावे. सीबीआय तर्फे चौकशी करण्यास केलेला विरोध हे ही एक कारण आहे, ज्यामूळे सुशांतसिंगच्या मृत्यू सबंधीत संशयाची सुई राज्य सरकार मधील नेत्यांवर जात आहे. जेव्हा राज्य सरकार सीबीआय चौकशीस विरोध करते तेव्हा केंद्रातील सत्ताधारी पक्ष आपले राजकीय डावपेच खेळते असे म्हणत राहावयाचे व सुशांतच्या मृत्यूबाबतच्या चौकशी फार्स उरकायला वेळ मिळेल, आणि  या प्रकरणातून आपली सुटका व्हावी हाच उद्देश राज्य सरकारचा होता, असे आज जवळपास सिद्ध झाले आहे. अर्थात जिथे आपल्या पक्षाचे सरकार नसते तेथील राज्य सरकारच्या कारभारातला गोंधळ, हलगर्जीपण वा पक्षपाती व्यवहाराचा फायदा केंद्र सरकार घेण्याचे सोडत नसते, हे ही तितकेच खरें आहे. शेवटी क्षेत्र कुठलेही असो, राजकारणापासून ते मुक्त नसते हे मोठे सत्य.

राजकारणात काम करणार्या मंडळीची दुनिया, चंदेरी दुनिया आणि मिडीया नावाच्या दुनिया मध्ये सत्ता, लोकप्रियता, पैसा, इत्यादी गोष्टींची कमालीची स्पर्धा असते. या तिन्ही क्षेत्रात मैत्री, सत्प्रवृत्ती, नैतिकता, इत्यादी जीवनमुल्यें बहुतांश वेळा आभासी व दिखाव्या स्वरूपाची असतात. कोणाला पटो वा न पटो बाॅलीवूडमध्ये  कोणाची चलती चालावी, तिथे कुणाला बरबाद करावयाचे, इत्यादी बाबी त्या सिनेउद्योगात जो पैसा गुंतवितो तोच ठरवितो. हा पैसा बेनामी असतो व त्याचे सुत्रधार माफीया असतात. त्यांचे निवासस्थानं देशात तसेच देशाच्या बाहेरचे असू शकतात. त्यामूळे प्रशासनाला या क्षेत्रात भरीव बदल करण्यात अनेक अडचणी असू शकतात. पण काश्मीरचे ३७० कलम रद्दबादल करणारे मोदी सरकार काही तरी मार्ग काढून या सिनेउद्योगाला माफीयांच्या तावडीतून सोडतील अशी आशा धरू या. 

काल परवा  टाईम्स नाऊ चॅनेलवर अनुपम खेर यांची मुलाखत सुरू होती. ॲन्करने अनुपम खेर यांना प्रश्न विचारला की, आप हिरो बननेके काबील थे, तो भी आपको, हिरोका रोल क्यों नही मिला, इसकी वजह क्या हैं? यावर उत्तर देताना अनुपम खेर यांनी उत्तर दिले ते असे आहे, ' मैंने साईड ॲक्टरकी भुमिका को स्विकार करके यश, शौनत हासील की है | मुझे हिरोका रोल न मिलनेका दुःख भी नही है | निर्माता, दिग्दर्शकोंने दिया हुआ मौका और दर्शकोंने दिया हुआ प्यार यह मै संपत्ती मानता हूँ | " याचा अर्थ असा आहे की आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रात Level of ambition and Level of Satisfaction यामधील सुवर्णमध्य गाठण्याची कला अवगत करणे आवश्यक असते. हा एक आजच्या युगाचा मंत्र आहे असे समजून पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी या गोष्टीने भारावलेल्या युवकांनी तो मंत्र सतत जपायला हवा असे वाटते. ॲन्करने पुढे सुशांतसिंगच्या मृत्युसंबंधी विचारले तेव्हा अनुपम खेर यांनी ' कुछ तो गडबड है ' असे सूचक विधान केले. सिनेजगतातील इतर कोणाची ही अधिकृत प्रतिक्रीया आली नाही. याचा अर्थ आपल्या येथील सिने-जगत पडद्यावर, किंवा अवार्ड फन्क्शन मधून दिसते तसे नाही याची खात्री पटते.

कुछ तो गडबड है असे अनुपम खेर यांनी म्हटले आहे तीच भावना सुशांतसिगच्या फॅन्सना आणि कुटुंबियांना वाटत आहे. रिया चक्रवर्ती नावाची मुलगी सुशांतच्या जीवनात कशी येते व नंतर तिला त्याच्या पैशाचा, व संपत्तीचा मोह कसा सुरू होतो, त्यातून तिने सुशांतच्या जुन्या नोकराना काढून टाकण्यापासून ते तांत्रीकाची मदत घेणे , सुशांतला विशिष्ट औषधाचा डोस देण्याची सुरूवात कशी केली इत्यादी संबंधीची जी माहिती बाहेर येते त्यावरून सुशांतसिंगचा मृत्यु हा आत्महत्येचा प्रकार नसावा असेच वाटते. गळफास लावून सुशांतसिंगने आत्महत्या केली असेल तर तशा प्रकारचे पुरावे दिसत नाही. ना तिथे पंख्याला जाडजूड दोर बांधलेला दिसला ना टेबल वा खूर्ची सापडली. सुशांतसिगच्या मानेमागील भागात खोलगट भाग दिसणे, गळफासामुळे जीभ बाहेर येते तसे झाल्याचे न दिसणे,  त्याच्या शवाची ॲब्मील्युन्स बदलणे, सुशांतसिंगचे शव नजिकच्या लिलावती हाॅस्पीटल ऐवजी कूपर हाॅस्पीटल जिथे ठाकरे घराण्याचा प्रभाव आहे तिथे पोस्टमार्टम होणे,  रिया चक्रवतीने महेश भटशी, सलमानखानच्या वकीलाशी केलेला संपर्क, सुशांतसिंगच्या डेथ सर्टिफीकेटमध्ये मृत्युची वेळ नसणे, सुशांतचा बँक बॅलन्स कमी होत जाणे अशा अनेक गोष्टी बाहेर येत आहेत, ज्यावरून सुशांतसिंगला पद्धतशीरपणे मारण्यात आले आहे, असा अंदाज बांधता येतो. सुशांतसिंगचा मृत्यू हे एक मोठे कथानक बनत आहे ज्यावरून पुढे मागे चित्रपट निघू शकेल. त्यात आदित्य ठाकरे व त्याचा मित्र दिपेश सावंत, रियाचा भाऊ, सॅम्युयल मिरांडा, दिशा सॅलीयाॅन इत्यादींच्या भूमिका वठवणारे  कलाकार शोधावे लागतील. जस जसा तपास पुढे जात राहील तशी नावें वाढण्याची शक्यता आहे. कारण सुशांतला रियाने सुरू केलेला औषधाचा डोस हा नोव्हेंबर २०१९ पासूनचा आहे असे ऐकीवात आहे. कदाचित हे प्रकरण आदित्य ठाकरेंना ठाऊक असू शकते, आणि कधीतरी हाताबाहेर जाऊ शकते हे ही आदित्य ठाकरेंना समजले असेल. त्यामूळेच या प्रकरणातून आदित्य ठाकरेंना वाचविण्यासाठी शरद पवारांशी संगनमत करून मविआ सरकार आकारास आणले गेले असावे. तेव्हाच आदित्याला मंत्रीपदाचे कवच देण्याचे निश्चीत केलेले असावे. बाकी बाळासाहेबांना शिवसेनेचा मुख्यमंत्री देण्याचे आश्वासन दिले होते हे कारण निव्वळ स्टंटच  होता.

आपल्या येथे जशा राजकारणात लाॅब्या आहेत तशाच, डावी विचारसरणी,  जिहादी, पाक पुरस्कृत  दशहतवाद, नक्षलवाद, इत्यादींचा  सिने-जगतावर  प्रभाव आहे. त्याची कारणें स्वातंत्र्यपुर्व काळापासून पुढे चालत आलेली आहेत. म्हणूनच बाॅलिवूडमधील चित्रपटात नेहमी नायकाचा शेजारी अल्पसंख्याक दिखविला जातो आणि तो नायकाच्या सगेसोयर्या पेक्षा उदार व मदतगार दाखविला जातो. विदेशी पैसा, हवालाद्वारे येणारा पैसा, काळा पैशाने आपला सिनेउद्योग त्रस्त आहे. कदाचित सुशांतसिंगच्या अकाली, अनैसर्गिक मृत्युच्या तपासातून बाॅलिवूड मधील काळी बाजू ऊजेडात येऊ शकेल. असे असले तरी आपल्या समाजाला सिनेनट व नट्या, क्रिकेटर्स तसेच राजकीय नेत्यांना सेलिब्रटी मानण्याची जी ओढ आहे तिच्यामूळे अनेक क्षेत्रात बदल करण्याचे सामर्थ्य असलेल्या समाजाची गती मंदावते, हे ही नाकारता येत नाही. त्यामूळे पैसा, प्रतिष्ठा, आणि प्रभुत्व यांच्या अमर्याद मोहाने माणुसकी विसरलेला समाजाचा वरच्या थराचे ( इलाईट ग्रुपचे) राज्य सर्वत्र सुरू राहते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये हेच घडत आलेले आहे. त्यातूनच सुशांतसिंगला एक तर संपविला असेल वा आत्महत्या करण्यासाठी उद्युक्त केले गेले असावे. त्या संबंधीचे सत्य न्यायालयाच्या निकालातून आपल्याला कळेल.  सिने-जगतातील मंडळी व राजकारणातील मंडळीचा परस्पर जो संबंध आहे, तो नवा नाही. पण त्यातून विलासराव देशमुखाचे मुख्यमंत्रीपद गेले होते, हा अलीकडचा इतिहास नजरे समोर येतो तेव्हा  शरद पवार यांच्या नातवाने (अजितदादा पवार यांचा मुलगा पार्थ ) सुरू केलेला संघर्ष व बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा सिनेसृष्टीतला हाय प्रोफाईल पराक्रमातून महाराष्ट्र सरकार जे अशांत आहे ते कायम स्वरूपाच्या स्मशान शातंतेत जाईल अशी शक्यता वाढली आहे. 

सुशांतसिंग एक हुषार व आपल्या भावी जीवनाची रितसर नियोजन आखणारा कलावंत होता हे त्याच्या डायरीतील नोंदीतून समजते. त्याने शिक्षण क्षेत्रात काही विद्यार्थ्यांना मदत देऊन प्रोत्साहन दिले आहे.  त्यामूळे तो डीप्रेसनमध्ये जाण्याची शक्यता नव्हतीच हे पटते. त्यासाठी मानसशास्त्राचा अभ्यास असणे गरजेचे नाही. तो गुणी होता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आमुलाग्र बदल करण्याच्या प्रयत्नात होता हे सुशांतच्या डायरीतून स्पष्ट झाले आहे. त्याने डायरीत मांडलेल्या कल्पना ऐकल्या की तो एक दूरदृष्टीचा कलाकार होता हे मान्य करावे लागते. " कलेची निर्मिती कोठल्याही विषयाच्या संपूर्ण ज्ञानातून किंवा निव्वळ बौद्धिक जाणीवेतून  होत नाही. कलेचा उगम बुद्धीत नसून तो भावना व कल्पना यांच्या अपूर्व संगमात आहे. विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनने एके ठिकाणी म्हटले आहे की, Imagination is more important than knowledge.  ज्ञाना पेक्षा भावना व कल्पनाशक्ती महत्वाची असते. भावना कुठल्याही अनुभूतीच्या आत सळसळणार्या मानवी जीवनाचे दर्शन देत असते. म्हणूनच  Portrait in a Mirror या इंग्रजी  चित्रपटाचा नायक म्हणतो,
' धार्मिक मनुष्य जी मनःशांती संपादन करू शकतो, तो काही अष्टपैलू पंडीत असतो म्हणून नव्हे; तर त्याच्या अंगी उत्कट श्रद्धा असते म्हणून ! कलावंताचे तसेच असते. तो सर्वज्ञ असला पाहिजे असे मुळीच नाही. पण आपल्या कलादृष्टीद्वारे होणार्या जीवनदर्शनावर त्याची निष्ठा असली पाहिजे. ' अशी शुद्ध बावनकाशी निष्ठा असलेला सुशांतसिगच्या रूपात एक उमदा कलाकार आपण गमाविला आहे. त्यामूळे त्याच्या मृत्युबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत असल्याचे दिसत आहे. शेवटी जन्म आणि मृत्यु या दोन गोष्टींचा अधिकार ईश्वराने आपल्याकडे दिलेला नाही. पण त्यात सत्तेच्या, पैशाच्या, स्पर्धेच्या, अहंकाराच्या बळावर हस्तक्षेप करून कुटील कारस्थानाने  एखाद्याची जीवनयात्रा संपवितात ते नराधमच असतात. त्यांचे ते शौर्य नसून कौर्य आहे. त्यांना त्यांच्या पापाची किंमत मोजावी लागेलच अशी आशा व्यक्त करतो. आज सुप्रीम कोर्टाने सुशांतच्या मृत्यु संबंधीत सीबीआयला चौकशी करण्यासंबंधी याचीकेचा निकाल जाहीर केला व तो सुशांतसिगचे कुटुंबिय व फॅन्सच्या बाजूने दिला आहे. या केस मधील हा पहीला पाडाव होता तो जिंकला आहे. नंतर गुंतागुंताने भरलेली ही केस उभी राहील. आपल्याला फार वाट पाहावी लागेल हे ओघाने आलेच. सुशांतसिंगच्या कुटूंबियांना न्याय मिळो आणि सुशांतसिंगच्या आत्म्यास शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून या लेखाची समाप्ती करतो.
                             
                             हरि ओम ! 

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

राजकारणातले असामान्य असे लोकमान्य


आज शनिवार १ ऑगस्ट २०२० भारतीय असंतोषाचे जनक, स्वातंत्र्यसूर्य लोकमान्य टिळक यांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने लोकमान्य टिळकांचे अष्टपैलू गुण, प्रचंड विद्वत्ता, जाज्वल्य राष्ट्रभक्ती, समाजाबद्दलची त्यांची असीम आत्मियता,  राजकारण- शिक्षण- समाजकारण - प्रबोधन आणि धर्मजागरण इत्यादी क्षेत्रातील त्यांचे अतूल्य कार्य व ते करीत असताना स्थितप्रज्ञ वृत्तीने भोगलेला कारावास व हालअपेष्टा इत्यादी संबंधीच्या स्मृती जागविण्याचा उपक्रम अनेक स्वयंसेवी संघटना व संस्था तसेच वृत्तपत्रे, नियतकालीकांनी सुरू केला आहे. त्याबद्दल या सर्व मंडळीचे कौतूक करावे तितके कमी आहे. आज आपला देश कोरोना रूपी नागाच्या विळखात अडकल्यामूळे आपली अर्थव्यवस्था जी कोलमडली आहे, अशा वेळी, लोकमान्य टिळकांचा स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, हा चतुःसुत्रीचा मंत्र आणि त्यांनी दिलेला
पुनश्च हरी ओम असा स्पुर्तीदायक नारा निश्चीतच देशाला आत्मनिर्भराच्या दिशेने वाटचाल करण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो. या उपक्रमात मी ही सामील व्हावं असा आग्रह माझे परम मित्र श्री प्रमोदजी  बापट यांनी केला. मी तात्काळ होकार दिला खरा पण लागलीच जाणवू लागले की,  लोकमान्य टिळकांच्या चरीत्रातील एखादा प्रसंग लिहणे म्हणजे टिटवीने आपल्या चोचीने महासागराचे जल मापन करण्यासारखे आहे. पण त्यातून एका युगपुरूषाच्या स्मारकाच्या चरणी लीन झाल्याचे समाधान मिळणार आहे म्हणून हा लेख प्रपंच.

आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक नेत्याचे , क्रान्तीकारकाचे योगदान बहुमूल्य आहे. म्हणूनच आपण सर्व स्वातंत्र्यसेनानींची जंयती वा पुण्यतिथी साजरी करतो. आचार्य अत्रे हे एक उत्तुंग व अष्टपैलू व्यक्तीमत्व. त्यांनी आपल्या एका पुस्तकात विद्यार्थी दशेतील आठवणी सांगताना लिहले आहे की  "आम्हां मित्रामध्यें एक असा बोली करार ठरला होता की आमच्यापैकी ज्याला कोणाला लोकमान्य टिळकांचे दर्शन झाले तर त्याने सर्वांना चहा द्यावा. आचार्य अत्रेंना लोकमान्य टिळकांचे दर्शन झाले तेव्हा त्यांनी मित्रांना चहा दिला होता. अत्रेंनी पुढे लिहले होते, '' मला तर एक दिवस लोकमान्य टिळकांचे दर्शन इतक्या जवळून झाले होते की मी त्यांच्या करकरीत उपरणाला हाताने स्पर्श केला तेव्हा मला स्वर्ग दोन बोटे उरला होता." लोकमान्य टिळकांच्यात असलेल्या तेजाचे आचार्य अत्रेंना विद्यार्थी दशेपासून अप्रूप वाटत असे. ते आपल्या त्याच पुस्तकात लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेचे वर्णन करताना म्हणतात, " लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेला लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेले लोकांचे चेहरे जणू आपला आधार हरवल्यासारखे सुतकी दिसत होते." पुढे ते स्पष्टपणे मांडतात की," त्यावेळी सडसडीत बांध्याचे मोहनदास करमचंद गांधी राष्ट्रीय सभेचा नेता म्हणून भाषणाला उभे राहीले, तेव्हा लोकमान्य टिळकांच्या इतकं ओजस्वी व तेजस्वी नेतृत्व राष्ट्रीय सभेला पुढे मिळेल अशी आशा मावळली." अत्र्यांनी लोकमान्य टिळकांच्या मृत्युचे वर्णन ' स्वातंत्र्यसूर्याचा अस्त ' अशा शब्दात केले आहे. आपल्या देशाच्या अर्वाचीन इतिहासात सूर्याची उपमा प्रथमच मिळालेली अशी राजकरणात कार्यरत असलेली पहिली विभूती लोकमान्य टिळक होय. या बाबत दूमत होऊ नये. भारतीय जनता लोकमान्य टिळकांना दैवत मानत असत. याचे कारण ते जनतेला आपले दैवत मानत असत. आचार्य अत्र्यांनी लोकमान्य टिळकांचे वर्णन भारताचे स्वातंत्र्यसूर्य असे केले ते उचीतच होते. वस्तूतः सूर्य कधी मावळत नसतो. आपली पृथ्वी स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरत असते म्हणून दिवस व रात्र चे चक्र सुरू असते. सूर्यनारायण अनादि काळापासून तेजाने तळपळत आहे. तो जीवसृष्टीला आपल्या प्रकाशातून जन्म देतो पण त्या सूर्याला त्याबद्दल उपकाराची भावना शिवत नाही. तो आपल्या प्रकाश देण्याच्या कर्मात इतका समरस होतो की तो प्रकाश देतो हे ही विसरून गेलेला आहे. आपला स्वतःचा मूलगा प्लेग मध्ये दगावला असताना, सारं दुःख विसरून प्लेगच्या साथीने पछाडलेल्या समाजबांधवांच्या सेवेसाठी लोकमान्य टिळक दिवसरात्र अविरतपणे झटत राहीले हे कसले द्योतक मानावे? असे सेवाव्रत राजकारणात दिसते तरी का? महाराष्ट्रात कोरोनाचे आक्रमण तीव्र होत असताना आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरें  घरातून बाहेर ही पडत नाहीत पण सल्ला देण्याचे तेवढे काम नेटाने करीत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत पक्षांतर्गत लढाईचा तमाशा मांडत आहेत. रशियातील श्री निकीता ख्रुश्चेव्ह पक्के खूनशी राजकारणी पण त्यांनी एके ठिकाणी  म्हटले आहे, ' Politicians are the same all over. They promise to build a bridge even where there is no river. '

लोकमान्य टिळक राजकारणात होते पण  ते राजकारणी नव्हते असे सतत वाटते. स्वराज्य हे त्यांचे ध्येय होते. ते आपल्या ध्येयात इतके समरस झाले की ते ध्येयच स्वराज्य लढ्यातील त्यांचे गुरू ठरले असावेत. त्यांनी आपल्या जीवनात जे उद्योग केले ते राजकीय पटलावर केले असे वाटत असले तरी मुख्यतः स्वातंत्र्यलढ्यातले योद्धा म्हणूनच त्यांनी आपले सारे आयुष्य वेचले. स्वामी विवेकानंदांना योद्धा संन्यासी असे गौरविले जाते तसेच लोकमान्य टिळक म्हणजे प्रपंच थाटून ही परामर्थ करणारे संन्यासी योद्धाच की. या ठिकाणी सुप्रसिद्ध समाजसेविका भारती ठाकूर यांनी आपल्या नर्मदा परिक्रमा या पुस्तकात भारतीय संस्कृतीसंबंधी यथोचित वर्णन केल्याची आठवण होते. त्या लिहीतात, " भारतीय संस्कृती जीवन परायण आहे. समग्र जीवनाचा बिनशर्त आणि संपूर्ण स्विकार हे भारतीय संस्कृतीचं मूलतत्व आहे. त्यात पलायानवाद नाही. घरदार सोडून, जबाबदारी सोडून अरण्यात जा, गिरीकंदरात जा आणि मग त्या जीवनात सार्थकता आहे असा त्याचा अर्थ नाही. अध्यात्म म्हणजे तरी काय? जाणलेलं सत्य जगणं म्हणजे अध्यात्म. जगण्याचं कर्म हीच आत्मसाधना. रोजचं जीवन हेच साधनेचं क्षेत्र आणि तेच खरे साधनेचे क्षण. प्रपंचात राहून परमार्थ करणं हीच  खरी तपस्या." लोकमान्य टिळकांचा प्रपंच देशभर व्यापला होता. प्रपंचात राजकारणाला स्थान नसते. फक्त कर्म हेच जीवन  असते. देशकार्यासाठी वाट्याला आलेल्या कारावासातही त्यांची कर्मभक्ती जरापण खंडीत झाली नाही. त्यांच्यातील असामान्य स्थितप्रज्ञ वृत्तीतून ते गीतारहस्य सारखा महान ग्रंथ लिहू शकले असावेत असे वाटते. महात्मा गांधीजींनी गीतारहस्य या ग्रंथावर अभिप्राय देताना म्हटले की " गीतेवरील टिळकांची टिका हीच त्यांचे शाश्वत स्मारक होय. स्वराज्याची लढाई फत्ते झाल्यानंतरही तें टिकूनच राहील. तेव्हा देखील टिळकांचे निष्कलंक चारित्र्य आणि गीतेवरील त्यांची महान टिका यामूळे त्यांची स्मृती चिरप्रेरक राहील. त्यांच्या हयातींत किंवा आता सुद्धा टिळकापेक्षा अधिक व्यापक किंवा सखोल शास्त्रज्ञान कोणाचेंही सापडणे शक्य नाही. गीता आणि वेद यांतून निर्माण होणार्या प्रश्नांचे टिळकांनी केले त्यापेक्षा जास्त व्यवस्थित संशोधन कोणींही केले नाही. अगाध विद्वत्ता, अमर्याद स्वार्थत्याग व आजन्म देशसेवा यामूळे जनता जनार्दनाच्या हृदयात टिळकांनी अद्वितीय स्थान मिळविले आहे."

लोकमान्य टिळकांच्या चरीत्रात असे अनेक दाखले मिळू शकतात की त्यावरून त्यांच्या जीवनाचे ध्येय फक्त राष्ट्रसेवा होते. म्हणूनच ते सच्चे राष्ट्रवादी ठरले. लेखाच्या विस्तारभयाने सारेच दाखले इथे देता येत नाहीत. पण त्यांच्या विद्यार्थी दशेपासून ते मृत्युपर्यंतचा सारा प्रवास राष्ट्रभक्तीरूपी ज्योतीच्या प्रकाशाने झळाळलेला होता. त्यांच्यी बालवयात दिसून आलेली कुशाग्र बुद्धी आणि करारीपणा, स्थंभीत करणारा होता.  विद्यार्थी दशेतच बाळ गंगाधर टिळक आपल्या वर्गशिक्षकाला ठणकावून उत्तर देतो '' मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही व मी मार खाणार नाही. '' असे खणखणीत उत्तर देणारा विद्यार्थी ब्रिटीश राजवटीला हादरून सोडणार हे नियतीनेच ठरविले होते. बाळ मॅट्रीकला असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले. एवढा मोठा आघात पण बाळ गांगरला नाही. शांतपणे त्याने आपला अभ्यास चालू ठेवला. मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाला. " माझी शिकण्याची इच्छा होती पण ती तशीच राहीली. पण तुला खुप शिकलेला पाहून मी ती भागविणार आहे. " आपल्या  पिताश्रीचे हे बोल बाळच्या अंतःरकरणात सतत प्रेरणा देत होते. म्हणून आपल्या नातेवाईकांचा "नोकरी कर, घर व संसार सांभाळ " असा उपदेश पाळत नव्हता. तो स्पष्टपणे उत्तर देत होता, " मी स्काॅलरशिप मिळविन, व उच्च शिक्षण घेईनच घेईन. एके काळी आपल्या देशात सोन्याचा धूर निघत होता. दुधातुपाच्या नद्या वाहात होत्या. तिथे आज अठरा विश्वे दारिद्य्र आले आहे. आणि साहेबांच्या इंग्लंडात जिथे लोखंड आणि दगडी कोळसा या पलीकडे काहीही पिकत नाही, तिथे आज भरभराट व समृद्धी आहे. ज्यांनी ही स्थिती केली त्यांची मी चाकरी करू म्हणता? आपल्या आईचे रक्त पिणार्या दुष्ट नराधमांची मी नोकरी करू म्हणता? छेः ! ते कदापि शक्य नाही. मला त्यांना हाकलून द्यावयाचे आहे. आपल्या भारतमातेला मला स्वतंत्र करावयाचे आहे. तिच्या सेवेत मला आयुष्य वेचावयाचे आहे. चाकरी करीन ती फक्त भारतमातेची करीन, विद्यादेवीची करीन. पोटासाठी शत्रूची चाकरी करीन अशी कधी कल्पनाही मनात आणू नका. " बाळचे असे उद्गार ऐकून त्याला उपदेश करायला आलेले नातेवाईक हळूच काढता पाय घेत. पण जाताना आपआपसांत बोलत होते, 'पोर छांदिष्ट आहे, कोणाचे ऐकणार नाही.' ते खरे हो, पण या अचाट कल्पना ! कोठे आपण आणि कोठे इंग्रज ! केवढे त्यांचे साम्राज्य ! काय अचाट त्यांचे सामर्थ्य ! पण हे  मात्र खरे, एवढ्या वयात केवढी ही उंच झेप या बाळची ! बोलण्यात किती कणखरपणा ! जशी काही सिंहगर्जनाच !

मॅट्रीकची परीक्षा नुकताच उत्तीर्ण झालेला हा बाळ राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळा काढणार, स्वराज्यसाठी समाजाची एकता स्थापना करण्यासाठी धर्म जागृती करणार, स्वदेशीची चळवळ उभारणार, युवकांना प्रेरणा देणार, ब्रिटीश सत्तेशी झुंजणार, शेतकरी, कष्टकारी, मजूर, गोरगरीबांना मार्गदर्शन करणार ही सर्व कार्ये नियतीने टिळकांकडून करून घ्यावयाचे ठरविलेले होते. म्हणूनच नियतीने  साहित्य क्षेत्रात व नीतीशास्त्रात जागतिक पातळीवरचे अत्युच्च स्थान  लोकमान्य टिळकांना पटकाविण्यापासून वंचित केले असावे अशी अंतःकरणातील भावना गीतारहस्य ग्रंथावरील अभिप्राय देताना महर्षी  योगी अरविंद यांनी व्यक्त केलेली आहे. त्यावरूनच असे वाटते की  लोकमान्य टिळक राजकारणात होते पण राजकारणी नव्हते. ते आसक्ती आणि विरक्ती मधील परमावधी गाठणारे युगपुरूष होते.

रॅन्डसाहेबांच्या खूनानंतर चहूकडे नाकेबंदी झाली. पटाईत गुप्त पोलीस बोलाविण्यात आले. कसून शोध सुरू झाला पण मारेकरी सापडले नाहीत. तेव्हा सरकारने लोकांचा छळ वाढविला. धरपकड, धमक्या, निरनिराळ्या प्रकारें दडपशाही करायला सुरूवात केली. तेव्हा टिळकांनी केसरीत "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का" असा अग्रलेख लिहून भारतीय जनतेची बाजू अगदी सरळ आणि स्पष्टपणे मांडली. पाठोपाठ " राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे " असा दुसरा लेख लिहिला. आपल्याला कारावास भोगावा लागला तरी त्यांना पर्वा नव्हती. त्यांना भारतीय जनतेवरील अत्याचार पाहवत नव्हता. लेखणी हे शस्त्र वापरणारा अर्वाचीनच नव्हे तर भारताच्या प्राचीन इतिहासातही लोकमान्य टिळकासारखा योद्धा नसावा असे वाटते.

छत्रपती शिवाजी महाराज हे टिळकांचे प्रेरणास्थान होते. त्यामूळे त्यांनी ब्रिटीश सरकार विरूद्धच्या ज्या राजकीय चाली खेळल्या त्यात  निर्भयता दिसत होती. राजकीय किंवा राजकारणातील व्यक्ती बहूतांश आपल्या प्रतिमेला जपतात. म्हणजे एका परिने भित्रे असतात. टिळकांनी, १८९७ च्या सुमारास  केसरीच्या एका अंकात " शिवाजी उद्गार " या नावाची एक कविता प्रसिद्ध केली होती. 
"स्वर्गातून शिवाजी महाराज भारतातील स्थिती पाहात आहेत. आपण पेरलेले गुण त्यांना कुठेच दिसत नाहीत. सगळीकडे दुर्गुणच दुर्गुण दिसतात. हे पाहून त्यांना फार दुःख होते. इंग्रजांना ही ते सांगतात की, मी सुरत लुटली तेव्हा तुम्हाला धक्का लावला नव्हता याची जरा आठवण ठेवा." असा त्या कवितेतील आशय होता. त्याच अंकात शिवाजी उत्सवातील, टिळकांच्या भाषणातले एक वाक्य लिहले होते की, " म्लेच्छांना येथे राज्य करण्याचा ताम्रपट कोणी दिलेला नाही." सरकारने टिळकावर राजद्रोहाचा आरोप ठेवला. टिळकांच्या काही मित्रांनी माफी मागण्याची कल्पना मांडली. टिळकांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले," राज्ये फुकट मिळत नसतात. त्या करीता बलिदान करावे लागते." टिळकांच्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीतून साकार झालेले अग्रलेख लोकांच्या हृदयाला साद घालीत असत. देशाच्या सर्व प्रातांत टिळकांच्या भाषणांचा कार्याचा प्रभाव पडत गेला. कुशाग्र बुद्धीचे टिळक जनतेशी संवाद वा भाषण करताना अंतःकरणातून बोलत असावेत. त्यांची ओघवती हृदयस्पर्शी भाषेतील मातृभूमीची भक्ती व ब्रिटीश सरकारवर कडाडून प्रहार करण्याच्या पद्धतीतून अनेक युवकांनी टिळकांनी स्वराज्यरूपी मांडलेल्या अग्नीकूंडात उडी मारली आणि सशस्त्र क्रान्तीचा मार्ग स्विकारून यश ही मिळविले. स्वराज्य, स्वदेशी, विदेशी मालावर बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुःसुत्रीचे देशभर जाळे विणले गेले. बंगालच्या फाळणीविरूद्ध त्यांनी केलेली जागृती इतकी ताकदवान ठरली की सरकारला बंगालची फाळणी रदबादल करावी लागली. टिळक बोले देश डोले अशी स्थिती देशभर झाली होती. जनतेच्या सुखदुःखात ही ते सहभागी होत असत. कामगार असो, मजूर असो, शेतकरी असो की छोटा व्यापारी जिथे जिथे सरकारने अन्याय केला असेल तर ते केवळ अग्रलेख लिहून थांबत नसत तर ते प्रत्यक्ष दुःख निवारण्यासाठी लोकात जात असत. म्हणून त्यांना तेल्याबोळाचे टिळक अशी उपाधी मिळाली. म्हणूनच साम्यवाद्यांनाही टिळक आपलेसे वाटत होते.

लोकमान्य टिळक धर्मभिमानी होते. पण हिंदू समाजातील दोष नाहीसे व्हावेत या मतावर ही ते ठाम होते. अन्यथा त्यांची आगरकरांशी इतकी घनिष्ठ मैत्री जडलीच नसती. राजकीय सत्ता पदरात पाडून घेतल्याशिवाय सामाजिक सुधारणा होतील पण त्या स्थायी स्वरूपाच्या ठरतील का या बद्दल ते सांशक असावेत. दुसरे कारण असे होते की ब्रिटीश सरकार आपली सत्ता मजबूत करण्यासाठी फोडा आणि झोडा हे तंत्र वापरणार हे टिळकांच्या लक्षात आले होते. स्वराज्य प्राप्ती हेच ध्येय जनतेपुढे ठेवले तर सारा भारतीय समाज लौकर एकजिनसी होऊ शकतो असा दुर्दम्य आशावाद त्यांच्याकडे होता. ते खर्या अर्थाने लोकमान्य असल्याने जनतेची नाडी तेच सर्वात चांगल्या रितीने ओळखत होते. इंग्रज सरकारला हे माहीत होते म्हणूनच त्यांना कारावास इतर काॅग्रेसच्या पुढार्यांपेक्षा अधिक काळ भोगावा लागला. त्यांना काही सवलती इंग्रज सरकारने दिल्या पण तो पर्यंत त्यांची तब्येत ढासळली होती. म्हणून गोर्या लोकांबद्दल चांगले मत मांडणार्यांनी एक सत्य लक्षात घ्यावयास हवे होते की पहील्या महायुद्धानंतर इंगलंडच्या अर्थव्यवस्थेला झटके बसले होतेच. त्यातच लोकमान्य टिळकांचा फार मोठा प्रभाव क्रान्तीकारकांवर होता. सारे गोरे अधिकारी लढवय्ये व धाडसी होतेच असे नाही. क्रान्तीकारी आपला गेम करू शकतात या भितीने इंग्रज अधिकारी त्रस्त झालेले होतेच.

इतिहासाचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की, १९०५-०७ च्या काळात टिळकांनी कलकत्यात केलेल्या भाषणात काॅग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष दादाभाई नवरोजींना ही इंग्रजासंबंधी भ्रमनिरास झाला होता असे म्हटले होते. इतकेच नव्हे तर दादाभाई सारख्या नेमस्त नेत्यांने  ' आपण परस्पर गळे कापणार नाहीत पण हे परकीय आपले गळे कापणार आहेत. आपला सत्यनाश होणार अशी निराशजनक भाषा त्यांच्या मुखातून येऊ लागली ' हे ही टिळकांनी आपल्या भाषणात विशद केलं. याच सभेत टिळकांनी एक सत्य घटना ऐकवली. महाभारतात पांडवानी कृष्णाला एक तडजोड घडवून आणण्यासाठी पाठविले. पण पांडव व कौरव दोघेही तडजोड अयशस्वी झाली तर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपआपली शक्ती संघटीत करीत होते.' यालाच राजकारण म्हणतात. तुमची मागणी सरकारने फेटाळली तर तुम्ही संघर्ष करण्यासाठी तयारीत आहात काय? तशी तुमची तयारी असेल तर तुमची मागणी नाकारली जाणार नाही. पण संघर्षाची तयारी ठेवली नाही तर मात्र तुमची मागणी नाकारली जाईल यात काहीच शंका नाही- कदाचित कायमचीच. आपल्याकडे काही शस्त्रे नाहीत. पण असण्याची गरज ही नाही. आपल्याकडे अस्त्र आहे. चांगले राजकीय अस्त्र. ते म्हणजे बहिष्कार. लोकमान्य टिळकांची दूरदृष्टी व राष्ट्रभक्ती असामान्य होती. त्यांच्या त्या भाषणाने समाज प्रभावित झाला होता. म्हणून राष्ट्रीय सभेतील जहाल गटाचा म्हणजे लोकमान्य टिळकांचा मार्ग देशासाठी अधिक भला ठरला असता, असे अनेक इतिहासकारांनी व राजकीय अभ्यासकांनी आपले मत नोंदविले आहे.

लोकमान्यांच्या काळात हिंदूना जातीय मानण्यात आले नव्हते. त्यामूळे त्यांनी शिवजयंती उत्सव व गणोशोत्सव राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरे करण्यास प्रारंभ झाला. त्यांनी लखनौ करार करण्यात चूक केली असे काही लोक मानतात. पण त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट सांगितले होते की, " यापेक्षा काहीही अधिक दिले जाणार नाही. तो करार मुस्लीमांनी नाही पाळला तर त्यावर कारवाई करायला हवी." अशी जाणीव टिळकांनी त्यांना दिली होती. पण दुर्दैवाने लोकमान्य टिळकांची इहयात्रा संपली,  तशी स्वातंत्र्यलढ्याची ज्योत ही क्षीण झाली. पुढचा सारा इतिहास आपण सारे जाणतो. जगभरात निर्माण होत असलेल्या विविध राज्यप्रणाली व विचारधाराची लागण आपल्या देशाला झाल्याने विविध राजकीय पक्ष अस्तित्वात आले. प्रांतीय बोर्डावरील निवडणूका व अंतर्गत स्पर्धेमूळे ब्रिटीश सरकारला फोडा व झोडा ही नीती अवलंबविणे अधिक सोपे झाले असे दिसते.

गांधींजीच्या ठायी महात्मा होण्यासारखी वैशिष्टे होती. पण त्यांच्याकडून भगवद् गीतेचा चुकीचा अर्थ लावला गेला असावा. त्यातून  शत्रुमित्रसमभावाच्या नावाखाली मुस्लीमांचे तुष्टीकरण अथवा संतुष्टीकरण सुरू झाले. मग मजल देशविभाजनापर्यंत गेले. मुस्लीमाची तुष्टीकरण करण्याची परंपरा स्वातंत्र्यानंतर ही सुरूच राहिली. इथे हे नमूद करावेसे वाटते की प्रत्यक्ष महात्मा गांधीजींनी (संदर्भ दिल्ली डायरी २६-९-१९४७ ) म्हटले आहे की, जर पाकिस्तानला स्वतःची चूक समजून सुधारणा करावयाची नसेल तर युद्धाशिवाय दुसरा मार्ग नाही.

मुस्लीम राष्ट्रनिष्ठ नेत्यांस महत्व दिल्यास व अराष्ट्रीय प्रवृत्तीच्या नेत्यांस नगण्य केले गेल्यास मुस्लीम समाज हिंदु संस्कृतीत सामावला जाईल . ज्या संस्कृतीने शक, हुण, कुशान या आक्रमकांनाही सामावून घेतले त्या संस्कृतीस आपल्याच समाजातील बाटलेल्या अथवा बाटवलेल्या हिंदुच्या वंशजांस सामावून घेणे बिलकूल अशक्य नाही. केवळ हिंदु संस्कृतीचे कैवारी सत्तेवर आल्यास होऊ शकते असे डाॅ वि वा देशपांडेनी आपल्या राष्ट्रधर्म जागवावा या पुस्तकात शेवटी निष्कर्षाच्या प्रकरणात आशावाद व्यक्त केला आहे.  केंद्रात आता राष्ट्रवादी विचाराचे भाजपाचे सरकार आहे म्हणून डाॅ वि वा देशपांडेचा आशावाद खरा ठरू शकेल अशी अपेक्षा ठेवू या. 

शनिवार, २५ जुलै, २०२०

श्रीराम मंदिर भूमीपूजन व त्यावरील राजकारण



भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना अयोध्येतील  श्रीराम मंदिर ट्रस्टने जिथे श्रीरामाचे मंदिर बांधण्यात येणार आहे तिथे भूमीपुजन करण्यासाठी आमंत्रण दिले आणि ते पंतप्रधानांनी स्विकारले आहे. त्यावरून राजकारण सुरू झालेले दिसत आहे. अर्थात असे राजकारण होणे ही नवलाईची गोष्ट नाही. श्रीरामजन्मभूमीच्या खटल्याचा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐताहासीक निकालाने, भगवान श्रीराम व रामायण हे सारं काल्पनिक आहे, असा काही इतिहास घडला नाही, श्रीरामाच्या सेनेने बांधलेल्या रामसेतूचे दिसणारे दगड हे  समुद्रात नैसर्गिक रित्या निर्माण झालेले दगड आहेत, इत्यादी खोचक टिपण्या करणार्या भाजपेतर पक्षांचा व तथाकथीत पुरोगामी विचारवंताचा सपशेल पराभव झाला आहे. तरी या मंडळीची खोड मोडलेली नाही असे दिसते. सुंभ जळाले तरी पिळ जात नाही असे म्हटले जाते ते काही खोटे नाही.

रामजन्भूमीच्या मुक्तीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जनजागरण केले. संघाच्या अनेक नेते, व असंख्य स्वयंसेवकांच्या सोबत भाजपा, विश्वहिंदु परिषदचे  नेते व कार्यकर्त्यांनी आयुष्य वेचले. लाठीमार खाल्ला, कारावास भोगला, गोळीबाराला सामोरे जाऊन आपले रक्त सांडले आहे. त्यामूळे अयोध्येत बांधले जाणार्या श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी संघपरिवारातील नेत्यांना रितसर स्थापन करण्यात आलेल्या श्रीराम मंदिर ट्रस्टतर्फे आमंत्रण मिळणे व त्यांची उपस्थिती असणे, हे स्वाभाविक मानावयास हवे. सुप्रिम कोर्टाने  दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. म्हणून अयोध्येत श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी कायदेशीर रित्या ट्रस्ट निर्माण करण्यात आला. त्या ट्रस्टने जो भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, तो ही आपल्या देशाच्या प्राचीन संस्कृतीला अनुसरून आहे. आपल्या देशाच्या संविधानात आपआपल्या संस्कृती, व धर्म शास्त्राच्या आधारे आचरण करणे अवैध मानले नाही. त्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेले आमंत्रण व त्या आमंत्रणाचा मान राखून पंतप्रधांन उपस्थित राहणार आहेत. इतका साधा सरळ व स्पष्ट हा मामला आहे.

पंतप्रधान अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनास जाणार असे कळताच विरोधी पक्षातील काही मंडळी कोरोनाचे संकट पुढे करीत विरोध करणार, काही मंडळी संविधान मधील सर्वधर्मसमभावाचे कलम  पुढे करीत विरोध करणार, काही विरोधक पंतप्रधान मोदी अंधश्रद्धाला खतपाणी घालीत आहेत असे म्हणत विरोध करणार हे अपेक्षित होते. जी मंडळी गदारोळ माजविण्याचा प्रयत्न करीत आहे, ती सध्या राजकारणात अडगळीत पडलेली आहे. मागच्याच लेखात मी म्हटले आहे, विद्यमान राजकीय स्थितीवर फारसे लिहण्यासारखे काही राहीले नाही. विरोधक पंतप्रधान मोदीवर टिका करीत राहणार  व पंतप्रधान मोदी शांतप्रमाणे एखादा हत्ती कुत्रे भूकंत असतेवेळी आपली पुढे वाटचाल चालू ठेवतो तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांच्या टिकेवर दुर्लक्ष करीत आपल्या कार्यपथावरून वाटचाल करीत आहेत.

प्रथम राष्ट्रवादी काॅग्रेसचे अखिल भारतीय स्तरावरील एकमेव नेते, श्री शरदचंद्र पवार यांनी काय म्हटले आहे ते पाहू या. ' मोदींनी अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनासाठी जाऊ नये. काही लोकांना मंदिर बांधल्यानंतर कोरोनाचे संकट निघून जाईल असे वाटते.' पवारांच्या या वक्तव्यावर भाजपाच्या नेत्यांनी प्रत्युत्तर देण्याची गरज नव्हती. कारण त्यांचा शिष्य श्री संजय राऊत यांनी हिंदुचे देव घाबरले आणि दरवाजा बंद करून बसले आहेत असे कोरोनाच्या आपत्ती संदर्भात विधान केले होते. वस्तुस्थिती अशी आहे की कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला व त्यावर उपाय फक्त सोशल डिस्टन्सीग असल्यामूळे आपण  मंदिरे बंद ठेवली आहेत. देव तुमच्या आमच्या सारख्यांना घाबरत नाही. कारण उत्पत्ती स्थिती व लय याच्या पलीकडे जाऊन दशांगुळे उरतो तो देव किती सामर्थ्यवान असेल याची आपण कल्पना करू शकत नाही. हिंदूची देवासंबंबधी कल्पना व हिंदूच्या मंदिरातील देवांनी कुठल्या रूपाने कोरोनाच्या आपत्तीत मदत केली व अजूनही सुरूच ठेवली आहे, त्यावर मी सविस्तर माहिती ' कोरोनाशी आपली लढत व पुराणातील देव दानव ' या शिर्षकाचा गुरूवार २ एप्रिल २०२० एक लेख पब्लीश केला आहे त्यात दिले आहे. वाचकांना माझी विनंती आहे की आपण हा लेख वाचावा. संजय राऊत यांनी सामना च्या कार्यकारी संपादकपदाचा कारभार सोडून ते कोरोना आपत्तीत प्रशासनाला मदत करण्यास उतरले असते तसेच  शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेऊन पुर्णपणे समाजसेवेला वाहून घेतले असते तर या दोघांना ही हिंदु समाजाने देव मानले असते.  देव म्हणजे जो मदत देतो तो देव ; देव म्हणजे तेज म्हणजे प्रकाश ; म्हणजेच ज्याच्या कार्याचा प्रकाश पडतो तो ; इतकी साधी व सोपी आपली देवाची व्याख्या आहे. भाव तोची देव अशी ज्या समाजाची भावना आहे ती कोणी कितीही प्रयत्न केला तरी उपटून काढू शकत नाही. त्यामूळेच अनेक आक्रमणे होऊन ही या देशातील संस्कृती तग धरून राहीली आहे आणि राहणार व वृध्दीगंत होत जाईल.

अत्याधूनिक तंत्रज्ञानाची कास धरणार्या देशांना कोरोनावर मात करता आलेली नाही. म्हणून  करूणामय भगवान येशू झोपला आहे असे आपण म्हणू शकतो का?  अल्लाकी मर्जी होगी तो सबकुछ ठीक होता है असे मानून जगभरातील मुस्लीम दिवसातून तीन वेळा बांग देत आहेत ना ! तरी ही त्या मुस्लीम देशांनाही कोरोनावर मात करणे शक्य झाले नाही. बांगच्या ध्वनीने प्रदुषण होते हे सत्य असुनही ' ज्यांची जशी श्रद्धा त्यांची तशी जीवनाची दिशा ' असेच हिंदू समाज मानत आला आहे. पण विरोधी पक्षांचे वर्तन असेच राहीले तर जागा झालेला हिंदू समाज ' तस्मात उत्तीष्ठं कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः | ' असा भगवान श्रीकृष्णाने जो सल्ला दिला आहे त्यानुसार आपल्या क्षात्रतेजाची नव्याने ओळख करून देऊ शकतो. याची झलक सलग दोन लोकसभा निवडणूकीतल्या निकालाने दाखविली आहे.

सध्या काॅग्रेसचे ताकदवान गांधी-नेहरू घराणे अडचणीत आहे. गांधी घराण्यात वलय निर्माण करणारा नेता राहीला नाही. त्यामूळे काॅग्रेस मधून नेते मंडळी बाहेर पडत आहेत. अशा स्थितीत आपल्या पक्षाच्या नावात काॅग्रेस आहे म्हणून काॅग्रेसची मंडळी आपल्या पक्षात येतील अशी आशा पवार बाळगून आहेत असे दिसते. म्हणून  पंतप्रधान मोदींच्या राममंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या नियोजित उपस्थितीवर सर्वात प्रथम आक्षेप शरद पवारांनी घेतला आहे. स्वतःचा पक्ष राष्ट्रीय स्तरावर प्रमूख विरोधी पक्ष होईल अशी आशा शरद पवार बाळगत असतील तर तशी आशा करणे हा त्यांना देशाच्या संविधानाने दिलेला हक्क आहे. त्यावर मतप्रदर्शन करणें इष्ट नाही. परंतु शरद पवारांनी आपले वक्तव्य करताना कोरोनाचे कारण जोडले ही त्यांची नसत्या जागी उठाठेव करण्याची जूनी खोड आहे. याच त्यांच्या खोडीमूळे ते पंतप्रधान पदी पोहचले नाहीत. अशी टिका झाली की शरद पवारांचे उत्तर ठरलेले असते. " छे छे मी कधीच  पंतप्रधानपदाची इच्छा धरत नाही. कारण माझा पक्ष लहान आहे. दहा खासदारांच्या संख्येवर मी कसा पंतप्रधान होणार ? " शरद पवार आणखिन एक वाक्य सतत उच्चारीत असतात ते म्हणजे ' मी वैचारिक तडजोड करीत नाही. ' यावर आपण काय उत्तर देणार ? महाराष्ट्रात शिवसेनेसारखा  हिंदुत्ववादी पक्षाबरोबर त्यांचा पक्ष सध्या सत्तेत आहे पण ते आपण विसरून जावे. १९७८ साली महाराष्ट्रात काॅग्रेसची सत्ता होती त्यावेळी शरद पवार मंत्री होते पण तत्कालीन स्वपक्षीय  मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून ज्या पक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते अशा जनता पक्षाशी आघाडी करून शरद पवार यांनी पुलोद नावाचे सरकार स्थापन केले. आणि  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी बसले होते. जे प्रथमच मुख्यमंत्री झाले होते ते ही स्वपक्षात बंडखोरी करून झाले होते, अशा शरद पवारांनी मध्यप्रदेश, कर्नाटकात जे घडले व आता राजस्थानात जे काही चाललं आहे त्यासंबंधी भाजपावर आरोप करणे शोभते का?  महाराष्ट्रातील पत्रकार असा प्रश्न शरद पवारांना विचारीत नाहीत. सारे पत्रकार शरद पवार आज काय म्हणत आहेत ह्याकडेच लक्ष देत आहेत. कारण  मिडीयातील मंडळीशी व त्या मंडळीच्या विचारसरणीशी शरद पवारांचे नाते घट्ट आहे. ' समान शिले व्यसनेषू सख्यम् 'असे म्हणतात ना तसला हा प्रकार आहे.  मिडीयात निदान महाराष्ट्रात तरी शरद पवार हे एक मोठे प्रस्थ आहे. मविआ सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरला जाऊन कोरोना महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी विठोबाला साकडे घातले ते ही देवाला चमत्कार करण्याची प्रार्थना करून. त्यासंबंधी पत्रकारांनी शरद पवारांना प्रतिक्रीया देण्याचा आग्रह केला आहे का?  बरं शरद पवारांनी त्यावर विरोधी स्वर काढले आहेत का? तसे ही नाही . कारण महाराष्ट्रातील सरकार कोडमोडेल व सत्ता नावाची देवता कोपेल ही त्यांना वाटणारी भिती. ते देव मानत नसले तरी ते सत्ता नावाच्या देवतेचे खास भक्त आहेत. बरं शरद पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व शिवसैनिकांनी कोरोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी प्रशासनाला मदत तरी केली आहे का ? तसे ही काही ऐकीवात नाही. मध्यंतरी मविआ चे महाराष्ट्रात सरकार स्थापन केले त्यावेळी शरद पवार म्हणाले होते की ' देशभरातून त्यांना भाजपा विरोधी आघाडी कशी करावी यावर मार्गदर्शनासाठी बोलावणे येत आहेत.' पण शरद पवारांना कोणी बोलाविले होते याबाबतचा शोध पत्रकारांनी घेतला नाही. कदाचित शोध घेऊन त्यांच्या हाती काही लागले नसावे. कारण शरद पवार देशाच्या इतर राज्यात गेले होते अशी बातमी एका ही प्रांतातून ऐकीवात आली नाही. शरद पवारांची विश्वासअहर्ता इतकी कमी झाली आहे की ते महाराष्ट्रात भाजपा सोबत सरकार स्थापन करतील असे ही आता ऐकू येते. मला तर आता शरद पवार कोण, हाच प्रश्न पडू लागला आहे.

शरद पवार यांच्या पाठोपाठ काॅग्रेसच्या नेत्यांना ही हुरूप आला असावा. म्हणून काॅग्रेसचे राज्यसभेचे खासदार श्री हुसेन दलवाईने  पंडीत जवाहरलाल नेहरू पंतप्रधान पदी असताना सोमनाथ मंदिराच्या  कार्यक्रमास उपस्थित राहीले नव्हते या घटनेची आठवण करून मोकळे झाले. याचा अर्थ शरद पवार पेक्षा पंडीत नेहरूचे घराणे हेच खर्या अर्थाने सर्वधर्म समभाव पाळतात असेच हूसेन दलवाईने अप्रत्यक्ष रित्या सांगितले आहे. याचा अर्थ आम्ही अजून पुरते संपलेलो नाही, आज ही आमचा पक्ष संसदेतील मुख्य विरोधी पक्ष आहे, राहणार आणि सर्वधर्मसमभावाच्या पक्षांचे नेतृत्व काॅग्रेसच करू शकते याची पवारांना जाणीव करून देण्याचे काम हुसेन दलवाईने केले असावे. पाठोपाठ इतर भाजपा विरोधी पक्षांना ही पंतप्रधान मोदी यांची श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनास होणारी उपस्थिती खटकली व त्यांनी मोदीवर टिकास्त्र सोडून शरद पवारांनी मांडलेल्या नकली सर्वधर्मसमभावाच्या आणि कोरोना ग्रस्त रूग्णासंबंधी असलेली कोरडी सहानुभूतीच्या प्रदर्शनात आपआपले काॅऊन्टर उभे केले. गंमत अशी आहे की ही सारी मंडळी अगदी साम्यवादी सुद्धा नेहरूयिन आहेत. पंडीत नेहरू सोमनाथ मंदिराच्या कार्यक्रमास गेले नव्हते. म्हणून हिंदू समाजाच्या कुठल्याही धार्मिक समारंभास पंतप्रधानांनी हजेरी लावणे म्हणजे देशातील सर्वधर्मसमभावाचे  तत्व धोक्यात आले अशी ओरड करण्याची सवय भाजपेतर पक्षांना जडली आहे. पण हीच मंडळी डोक्यावर टोपी घालून दर्ग्यात चादर चढवायला गेले किंवा इफ्तार पार्ट्या झाडायला गेले की सर्वधर्मसमभाव जणू सुवर्णासारखे तळपते. अशी मानसिकता देशाच्या स्वातंत्र्याच्या अगोदरच्या काळापासूनच आपल्या येथे अस्तित्वात आली आहे. एका निवृत्त लष्कर अधिकार्याच्या पुस्तकातील विचाराची एक पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. त्यात त्या लेखकाने म्हटले आहे की, " कंलीगच्या युद्धानंतर सम्राट अशोकाला झालेल्या पश्चातापातून भारतात रूजलेली उदारमतवादाची कीड पुढे पृथ्वाराज चौहान पर्यंत जात यवनांच्या विविध राजवटीतून मार्ग काढत इंग्रजांच्या राजवटीत ती कीड पुष्ट होत स्वातंत्र्यनंतरच्या सत्ताधार्यात व इतर डावे व प्रादेशिक पक्षात रूजली ती कीड २०१४ पर्यंत टिकली. पण मोदींनी पाकिस्तानावर दोनदा सर्जिकल स्ट्राईक करून ती उपटून काढली.  त्यामूळे आपल्या देशातील तथाकथीत उदारमतवादी, व सेक्यूलरवाल्यांची राजकीय दुकाने व मिडीया उध्वस्त होणाच्या मार्गावर आहेत. म्हणून ती मंडळी त्वेषाने पंतप्रधान मोदीवर टिका करतात." त्या पोस्टचा शेवट लेखकाच्या शब्दात आहे असा आहे --
I wish and hope that this Modi succeeds in transforming our mindset for other Modis to follow the suit, because one Modi will not be sufficient enough to clear the rot accumalated through centuries.

' ईश्वर अल्ला ' तेरे नाम म्हणून खूप गजर झाला पण हिंदू- मुस्लीम एकता होऊ शकली नाही आणि देशाचे विभाजन झाले. कारण अल्लाच्या नावावर धार्मिक साम्राज्य स्थापन करणार्या मुस्लीम बांधवांना, इंग्रजी साम्राज्याच्या गुलामीतून सुटू पाहणार्या देशभक्तांच्या पंगतीत बसविण्याचा उद्योग केला गेला. ' देशभक्ती आणि देवभक्ती यात अंतर असू शकते याचा विसर पडला म्हणून देवभक्तीचा उपयोग देशभक्ती करीता होत असेल तरच त्या देवभक्तीस प्रोत्साहन देणे योग्य ठरते.'  हेच शुद्ध सर्वधर्मसमभावाचे आदर्श सुत्र आहे. पंडीत नेहरूंनी आपल्या आयुष्याच्या अखेरीस मदुराई येथील सन १९६१ साली झालेल्या काॅग्रेस अधिवेशनात हे सूत्र स्विकारले व आपली चूक मान्य केलेली आहे. पण त्यांचे चेले असे काही नेहरूंनी म्हटले आहे असे मान्य करणार नाहीत. कारण त्यांच्या विचारसरणीचा डोलाराच उद्ध्वस्त होईल. ते काहीही असो पण पंतप्रधान मोदींची श्रीरामावरील भक्ती, देशभक्तीस पुरक ठरतच आहे व भविष्यात ही ठरत राहील एवढे मात्र निश्चीत.

सर्व हिंदू आपल्या श्रद्धास्थानास संघटीतपणे मानू लागले की समूह मानसशास्त्राच्या सिद्धांतानुसार अल्पसंख्याक अथवा अहिंदू आपोआपच त्या राष्ट्रीय प्रवाहात मिसळून जातील. त्याकरीता विश्व हिंदू परिषदेने हिंदूची श्रद्धास्थाने जी परकीय राजवटीत जमीनदोस्त झाली ती उभे करण्याचे काम करावे व शासनाने केवळ त्यातील अडथळे दूर करावेत असे भाजपाचे धोरण आहे. अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण करण्याचे आश्वासन  भाजपाने आपल्या निवडणूक जाहिरनाम्यात  दिलेले आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनास उपस्थित राहणार आहेत. लोकशाहीमध्ये बहूसंख्याकांच्या भावनेचा वा श्रद्धेचा आदर करू नये असे थोडेच असते. या शिवाय श्रीराम हे राष्ट्राचे मानबिंदू आहेत. त्यामूळे स्वाभाविक अयोध्येत असंख्य भाविक श्रीरामाच्या दर्शनासाठी येऊ लागतील त्यातून अयोध्येतील भूमीपूत्रांसाठी विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध होतील. One man's expenditure is other man's income या सिद्धांता नुसार, अयोध्या भारतातच आहे म्हणून देशाचा पैसा ही देशातच राहणार.  मंदिरात भाविकाडून जमा होणार्या दक्षिणाचा उपयोग समाजासाठी व राष्ट्रीय आपत्तीत वापरण्यात मदत होणारच आहे. श्रीरामजन्म भुमी मुक्तीचा खटला जगभर गाजला आहे. त्यामूळे अयोध्येत भव्य-दिव्य मंदिर उभे राहीले की विदेशी पर्यटकांची पहिली पसंती अयोध्या असू शकेल. त्यातून विदेशी चलनाचा साठा वाढणार आहे. श्री शरद पवारांची  फळापासून दारू बनविण्याच्या कल्पनेपेक्षा अयोध्येत उभ्या राहणार्या श्रीरामाचे भव्य-दिव्य मंदिराची कल्पना सहस्त्र नव्हे करोडो पटीने चांगली आहे. त्या शूभकार्याच्या भूमीपूजनास पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत ही बाब शरद पवार आणि इतर विरोधी  पक्षांच्या नेत्यांना खटकत असेल तर खुशाल खटकू द्या. राहता राहीला प्रश्न कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती. ज्यांना भिती वाटते त्यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जे काही थोडेफार प्रयत्न केले आहेत त्यापेक्षा सहस्त्रपटीने पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीनीं केले आहेत आणि करीत ही आहेत.

                             जय श्रीराम !

बुधवार, १५ जुलै, २०२०

राजस्थानातील काॅग्रेसची सत्ता व्हेन्टिलेटरवर ?



२२ मार्चला मध्यप्रदेश मधील सत्तापालट संबंधीच्या लेखात मी म्हटले होते की , राजस्थान व महाराष्ट्रातील सरकार फारसे स्थिर दिसत नाही आणि तिथे ही सत्तातंर वर्ष अखेरीस होऊ शकते. रविवारी राजस्थानमध्यें तीस आमदारांच्या साथीने राजेश पायलटने बंड केल्याची बातमी आली आणि तेथे राजकीय रंगमंचावरील सत्तांतर नाटकाच्या पहिल्या अंकाची घंटा झाली. काॅग्रेसने आपल्या सोयीनुसार वेळ न दडविता भाजपा काॅग्रेसच्या आमदारांना पैशाचे अमिष दाखवित आहे असा आरोप करावयास सुरूवात केली. सामान्यतः जिथे सत्ता आहे तिथे आमदार मंडळी आकर्षित होत असतात. राजस्थान आणि महाराष्ट्रातील सरकार मजबूत व स्पष्ट बहूमतात आहे. त्यामूळे भाजपाचे आमदार सत्तेवर असलेल्या काॅग्रेस वा महाविकास आघाडीकडे जाण्यास अधिक उत्सुक असायला हवेत पण तसे होत नाही. याचा अर्थ भाजपा संघटीत रित्या अधिक मजबूत आहे असे दिसते. पुर्वी स्वर्गीय इंदिरा गांधी पंतप्रधान असताना विरोधकांचे राज्यातील सरकार घाऊक पक्षांतराच्या जोरावर पडत असत.  त्यावेळी काॅग्रेसचे देशभरातील नेते, कार्यकर्ते, व डाव्या विचारररणीचे व पुरोगामी साहित्यिक, विचारवंत व मिडीया इंदिरा गांधीच्या डावपेचांचे काय कौतूक करीत असत. जणू काही इंदिरा गांधी स्वर्गातून इंडीयाची सम्राज्ञी म्हणून अवतरली आहे, असा थाट होता त्यांच्या बोलण्यात. पण आज त्याच इंदिरा समर्थकांना स्वपक्षातच बंडखोरी होत असल्याचे पहावे लागत आहे.  वस्तुस्थिती ही आहे की सर्वच क्षेत्रात पेरावे तसे उगवते, किंवा करावे तसे भरावे, Every action has a reaction इत्यादी Laws of Nature लागू होताना आपण पाहतोच. मग राजकीय क्षेत्र त्यात कसे अपवाद ठरणार ?

सर्वसामन्य मतदार सध्या राजकारणातील घडामोडीवर फारसे लक्ष देत नाहीत. कारण कोरोना नावाच्या नागाने जो विळखा घातला आहे त्यातून आपण कधी सूटणार या चितेंत ते आहेत. म्हणून मी सध्या राजकीय लेख लिहण्याचे टाळत आलो आहे. पण राजकीय घडामोडीचा सर्वच क्षेत्रावर परीणाम होत असतो तसाच परीणाम कोरोनाशी सुरू असलेल्या आपल्या लढतीवर होणार हे दिसते म्हणून आज हा लेख लिहीत बसलो. शेवटी राजकीय इच्छाशक्तीतूनच कोरोना सारख्या संकटाला परतून लावायचे आहे. ही राज्यशास्त्रातील साधी व सर्वमान्य बाब आहे. राजकीय इच्छाशक्तीसाठी राजकीय व्यवस्था म्हणजे सरकार स्थिर व निर्णय घेण्यात सक्षम असणे गरजेचे असते. राजस्थानांत राजकीय अस्थिरता ही काही आता निर्माण झालेली नाही. काॅग्रेसने विधानसभेच्या निवडणूका जिंकल्या त्या दिवसापासून राजस्थानातील काॅग्रेस मध्ये दुफळी दिसत आलेली आहे. म्हणून त्याचा परीणाम राजस्थानातील अर्थव्यवस्था, राजकीय निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासनातील कामकाजाचा वेग मंदावलेला आहेच. तसेच कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात तसेच परराज्यातील मजूर वर्गाच्या स्थलांतराच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यात अशोक गेहलोत सरकारला आलेले अपयश आपण ऐकले व पाहीलेही. आपल्या महाराष्ट्रातील सरकाराची गाडी सुद्धा अडखळत चालेलेली दिसत आहे. सत्तेच्या गूळाला चिकटून मविआ अस्तित्वात राहीली तरी  त्यातून भरीव असे जनहिताची कामे होतील असे वाटत नाही. शेवटी राजकारणात काम करणार्या मंडळीची दुनिया, चंदेरी दुनिया सारखीच असते. दोन्ही क्षेत्रात अधिराज्याची, प्रसिद्धीची व पैशाची हाव असते. या दोन्ही क्षेत्रात होणार्या घटनांची तहान व भूक असणारे क्षेत्र म्हणजे मिडीया. राजस्थानातील काॅग्रेस मध्ये निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर चर्चेचे कार्यक्रम राबविण्याची आयती मिळालेली संधी प्रिन्ट , व इलेक्ट्राॅनिक्स मिडीया कां म्हणून सोडेल? आता तर  सोशल मिडीया सुद्धा प्रिन्ट व इलेक्ट्राॅनिक्स मिडीयाचा कित्ता गिरवित आहे. एखादी सनसनाटी बातमी  विशेष करून राजकीय क्षेत्रातील मिळाली की  प्रिन्ट व इलेक्ट्राॅनिक्स मिडीयातील मंडळीचे वर्तन आणि सोशल मिडीयातील मंडळींचे वर्तन यात फारसा फरक राहीलेला दिसत नाही. कारण ती सारी मंडळी एक तर काॅग्रेस समर्थक असतात वा  भाजपाचे समर्थक असतात. प्रिन्ट व इलेक्ट्राॅनिक्स मिडीयातील मंडळीचा तो व्यवसाय आहे तर सोशल मिडीयावरील मंडळींना अशा चर्चेतून काही फायदा होणारा नसतो. पण तरीही सोशल मिडीया वरील मंडळी Show must go on अशा अहिर्भावात राजकीय रंगमंचावरील नाटकातील विदुषकांची जी भुमिका त्यांना मिळाली आहे तेवढी ते विना रिअर्सल, आणि विना मोबदल्यात पुर्ण निष्ठेने निभावित असते. हा आता नित्याचा अनुभव झाला आहे.

कर्नाटकात काॅग्रेसचा पराभव झाला होता व जेडीयुचा ही पराभव झाला होता. तिथे  काॅग्रेसने जेडीयुला मुख्यमंत्रीपद देऊन सरकार स्थापन केले होते तेव्हा ते लोकशाही राज्यव्यवस्थेच्या धर्माला अनुसरून होते का?  महाराष्ट्रात युतीचा विजय झाला होता. पण महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली व तीन पक्षाचे सरकार सत्तेवर आले. यात शिवसेनेने कुठे युती व लोकशाही धर्माची बूज राखली होती ?   काॅग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेसला मी दोष देत नाही. कारण त्यांनी  विरोधी पक्ष म्हणूनच निवडणूक लढविली होती. महाराष्ट्रात सरकार स्थापन होण्यातच उशीर झाला. नंतर सत्ता वाटपात वेळ गेला. आता तर प्रशासनात ही विरोधाभास दिसू लागला आहे.  तिन्ही पक्षाची तोंडे तीन दिशांकडे आहेत. त्यामूळे कोरोना रूग्णाची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. त्यातून  कोरोनाग्रस्त रूग्णांचे व त्यांच्या कुटुंबियांचे  हाल होत आहेत. त्याला जबाबदार कोण हेच ठरविता येत नाही अशी स्थिती आहे. मुख्यमंत्र्यापेक्षा विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस अधिक कार्यरत दिसतात. ते प्रत्येक रूग्णालयात जाऊन प्रशासनातील अडचणी समजून घेत आहेत. सत्तेतील तिन्ही पक्षांचे नेते मंडळीमध्ये एकटे आरोग्य मंत्री श्री टोपे काम करताना दिसत आहेत. बाकी सारे जण लाॅकडाऊन झाल्यासारखेच आहेत.  या तिन्ही पक्षांच्या युवक संघटना जवळपास मोडीत निघाल्या आहेत. प्रशासनाला मदत करणार्यात फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक दिसत आहेत. कुठे आहेत ते शिवसैनिक ? म्हणे आम्ही सत्तर टक्के समाजकरण करतो. कुठलं समाजकरण ? ते स्वर्गीय बाळासाहेबांच्या सोबत गेलं आहे. त्यांचा पुत्र शंभर नंबरी राजकीय नेता बनला आहे. सध्या घरात बसून राज्याचा कारभार हाकलत आहे. कुठे गेली ती काॅग्रेस व समाजवादी पक्षांची सेवा दल नावाची संस्था ?  कुठे गेल्या डाव्याच्या विद्यार्थी संघटना ? आम्ही गरीबांना रोजगार व रोटी साठी आजादी मागतो अशा गप्पा मारणारे जेएनयुतील पोपट कुठे लपले आहेत?  सार्या विरोधी पक्षांच्या विद्यार्थी संघटना, युवक आघाड्या  फक्त भाजपा, संघ , मोदी आणि अमित शहावर  सोशल मिडीयातून सडकून टिका करण्यात गुतंल्या आहेत. दया व सेवा यावरचा मक्ता मिरविणार्या विदेशी पैशावर चालणार्या NGO कुठे लपल्या आहेत ? भारतात धर्मांतरासाठी, दशहतवाद  व हिंसा पसरविण्यातच तो पैसा वापरयाची सक्ती आहे का?  पालघर येथे दोन सन्याशांची हत्या होते.  त्यावर साधी सहानभूती दाखविण्यात धर्मगुरू कम साहित्य परीषदेचे अध्यक्ष फादर डिब्रिटोंनी दिरंगाई का केली ? की ते सुद्धा त्यांच्या राजकीय आश्रयदाताच्या परवानगीची वाट पाहात बसले होते की काय? एरवी वसईत दडपशाहीची घटना झाली की वसईत विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य करण्यात येत आहे असे टिव्ही वरून प्रतिक्रीया देण्यात राजकीय नेत्यापेक्षा फादर डिब्रीटोंनी अधिक तत्परता वेळोवेळी दाखविलेली आपण पाहिली आहे. जे महाराष्ट्रात चाललं आहे तसाच कारभार राजस्थानात गेहलोत सरकारचा आहे. मग ते सरकार पदच्यूत होत असेल तर त्यात सर्वसामान्यांचे अहित आहे असे कसे मानावे ?  केवळ सत्तेसाठी एकत्र बसण्यापेक्षा वेगळा संसार करणे हे उचीत आहे. भाजपाने एकला चलो रे ची भूमिका अनेक वर्षे विनातक्रार निभाविली आहे. राजकीय अस्पृशतेचा सामना करण्यात भाजपा नेत्यांना वा कार्यकर्त्याना आनंद मिळत होता का ? आज भाजपाला सुगीचे दिवस आले आहेत त्यामागे अनेक नेते व कार्यकर्त्यांचे अविरत कष्ट आहेत. कष्ट न उपसता राजकारणात यश मिळण्याचे दिवस संपले आहेत हे काॅग्रेसच्या श्रेष्ठींना अजूनही कळत कसे नाही. मिळालेली सत्ता मध्यप्रदेशात काॅग्रेसने गमाविली. आता राजस्थानात सत्ता टिकविण्यासाठी काॅग्रेस धावपळ करीत आहे. काॅग्रेसमध्ये सध्या जे घडते आहे त्यासंबंधी भल्या भल्या अभ्यासकांना अनुमान काढणे जिकरीचे झाले आहे. म्हणून बहूतांश मिडीयातील संपादक मंडळी जी संघ व भाजपा विरोधी म्हणून ओळखली जाते त्यांना ही नाईलाजाने काॅग्रेस व मित्र पक्षांवर टिका करणे भाग पडत असल्याचे दिसते. मग त्या बरखा दत्त असो वा शेखर गुप्ता.

काॅग्रेस पक्षात काय चाललं आहे , राज्य स्तरावरील नेत्यांमध्ये इतकी दुफळी का माजली आहे, यावर विचारमंथन होणे गरजेचं आहे असे काॅग्रेस मधील जेष्ठ नेते म्हणू लागले आहेत. मिडीयात काॅग्रेसची बाजू नेटाने मांडणार्या संजय झा यांची हाकलपट्टी झाली आहे. तेच संजय झा उघडपणे राजेश पायलटचे समर्थन करीत आहेत. जेष्ठ नेते कपील सिब्बलने तर व्टिटरवर Will we wake up only after the hourses bolted out from our stables ?  अशी कडवी प्रतिक्रीया दिली आहे. कपील सिब्बल, पी चिदंबरम, दिग्विजयसिंग इत्यादी नेत्यांना पक्षात वा सरकारात आता अधिक अशी काही महत्वकांक्षा राहिली नाही. वयपरत्वे व काॅग्रेसमध्ये सत्तेची खुर्ची, मान, पदं भुषविली असल्याने तसेच भ्रष्टाचाराच्या केसेस मध्ये अडकले जाण्याची संभावना असल्यामूळे काॅग्रेसच्या झेंड्याखाली राहणे ही त्यांची गरज आहे. पण राजेश पायलट, ज्योतीरार्दित्य सिंधीया, मिलींद देवरा सारख्या युवकांना राजकीय महत्वकांक्षा आहे. अशा मंडळींना जर काॅग्रेसमध्ये अडगळीत ठेवले जात असेल तर ती मंडळी काॅग्रेसमध्ये किती काळ राहील याचा विचार काॅग्रेसने करावयास हवा होता. पण तसे होताना दिसत नाही. नजिकच्या भविष्यात केंद्रात काॅग्रेस सत्तेवर परत येण्याची अंधूकशी आशा ही दिसत नाही. पण अशी काही राज्ये आहेत जिथे आज ही काॅग्रेस व भाजपा आलटून पालटून सत्तेवर येण्याची शक्यता आहे, अशा राज्याचा मुख्यमंत्री होण्याची संधी युवकांना मिळायला हवी असे कोणी ही मान्य करील. मग सत्ताधारी पक्ष कुठलाही असेना का ! राजस्थानात व मध्यप्रदेशात काॅग्रेसने धाडसी निर्णय घ्यावयास हवे होते. स्वर्गीय इंदिराजीकडे  पंतप्रधानपद व काॅग्रेसचे अध्यक्ष पद अशा दोन्ही जबाबदार्या होत्या. त्यांच्या राजकिय डावपेचा संबंधी मतभेद जरूर होतील पण तटस्थपणे हे मान्य करावे लागते की त्यांनी काॅग्रेस पक्षात चैतन्य ठेवण्यासाठी पक्षात तरूण तुर्क नावाची एक युवक कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली होती. अमेरिका - रशिया याच्यांत  शीतयुद्ध होते त्या काळात आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण रशियाकडे झुकले होते तरी जेएनयुमध्ये डाव्या पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचा धुडगूस स्वर्गीय इंदिराजीनी खंबीरतेने मोडून टाकला होता. सोनिया गांधीच्या कारकीर्दीत काॅग्रेसचे स्वरूप पूर्णतः एका कुटुंबाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखे झाले.   त्यातच सोनिया गांधी व राहूल गांधीच्या वारंवार गुप्तपणे होणार्या परदेशवारीवर काॅग्रेसचे नेतेच संशयाने पाहू लागले आहेत. कारण मिडीयाला सामोरे त्यांनाच जावे लागते. सोनीया गांधी व राहूल गांधीवर नॅशनल हेराॅल्ड व राजीव गांधी फाउन्डेशन मधील पैशाच्या अफरातफरीची प्रकरणे बाहेर येऊ लागली आहेत. त्या फंडाचा संबंध चीनी राजकर्त्याच्या मदतीने भारतात काॅग्रेसचे सरकार आणण्यासाठी जोडला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. तसा करार चिनी कम्यूनिस्ट पार्टी व काॅग्रेस मध्ये झाला आहे. अशा प्रकारे सत्तेसाठी भारतातील सर्वात जुना व एकेकाळी सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेला काॅग्रेस पडद्याआड चीनची मदत घेण्याचे करार करीत असेल तर काॅग्रेस पक्षाने आपल्या नावापुढील इंडीयन हे नाव तरी का ठेवावे ?  सत्तेत परत येण्यासाठी काॅग्रेसने स्विकारलेला मार्ग देशाच्या दृष्टीने किती धोक्याचा आहे व त्यातून गांधी घराणेच नेस्ताबूत होईल की काय अशी भिती वाटणार्या काॅग्रेसच्या नेत्यांची व कार्यकर्त्याची संख्या वाढत आहे, आणि विशेष करून हा वर्ग युवकांचा आहे. असे युवक नेते काॅग्रेसला सोडचिठ्ठी देऊ लागले तर काॅग्रेसचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता आहे. लागोपाठ दोन लोकसभेच्या निवडणूकीत ना सोनिया गांधीचा चेहरा कामाला आला, ना राहूल गांधीचा. प्रियंका गांधीला राजकारणात संधी का दिली जात नाही अशी हळहळ व्यक्त करणार्या काॅग्रेस नेत्यांची बर्यापैकी संख्या आहे. अशांचा एक वेगळा गट काॅग्रेस अंतर्गत निर्माण झालेला आहे हे स्पष्टपणे प्रियंका गांधीना वाराणसीतून लोकसभेची उमेदवारी नाकारली तेव्हा दिसले आहे. सत्तेसाठी कुटुंबातील कलह  विकोपाला गेल्याचा इतिहास दिल्लीला नवा नाही.

सारांशने म्हणावेसे वाटते की जो पर्यंत काॅग्रेस गांधी घराण्याच्या मुठीतून मुक्त होणार नाही तो पर्यंत काॅग्रेसला सुगीचे दिवस येतील असे वाटत नाही. आणि जो पर्यंत काॅग्रेस आघाडीचे सरकार स्थापन करू शकेल इतके संख्याबळ कमावू शकत नाही, तो पर्यंत काॅग्रेसचे मित्र पक्ष काॅग्रेस पासून दुर राहण्याचं शहाणपण दाखवित राहणार हे ओघाने आलेच.  मोदी व शहा या जोडीमूळे आणि संघाचा जनमानसावर वाढत जाणार्या प्रभावामूळे भाजपा अधिक शक्तीशाली होत जाईल असे दिसते. या शिवाय सोनिया गांधीनी काॅग्रेसची सुत्रे हातात घेतल्यापासून हिंदु धर्मगुरूंचा अपमान व हिंदूच्या देवस्थानांची संपत्ती लाटण्यासाठी अहिंदूना ट्रस्टीपदावर बसविण्याचे प्रकार काॅग्रेस व डाव्या पक्षाकडून अधिक प्रमाणात झाले आहेत. त्यामूळे  काॅग्रेस बाबत हिंदु समाजात प्रचंड नाराजी आहे. तर दुसर्या बाजूला  मुस्लीम व ख्रिस्ती धर्मगुरूंचा, पुरोगामी व डावे असे लेबल लावून वावरणारे संपादक व साहित्यिक मंडळींचा तसेच  विदेशी शक्तीचा काॅग्रेसच्या निर्णय प्रक्रीयेत हस्तक्षेप वाढतो आहे. त्यामूळे भाजपाला आक्रमक प्रचार करण्याची संधी मिळत आहे. भाजपा तशा संधीचा पुरेपुर उपयोग करून घेत राहणार. एकंदरीत काॅग्रेसने आजपर्यंत डाव्या विचारांच्या पक्षांच्या व ख्रिस्ती मिशनर्यांच्या मदतीने भाजपासाठी जे खड्डे खोदले त्यात काॅग्रेसच अडकली जात आहे. यापेक्षा अधिक काही भाष्य निदान विद्यमान राजकीय स्थितीवर करण्यासारखे राहीलेच नाही. त्यामूळे इथेच थांबलेलं बरे. 

आपण व आपले उत्सव--मातृदिन (भाग १)

आपण व आपले उत्सव-- मातृदिन   देवीयों और सज्जनो नमस्कार ! हमारी मातृभूमी को देव-देवताओंकी भूमी माना जाता है | इसका कारन हमारे यहाँ सृष्टी हर ...