अफगणिस्तानातल्या घडामोडीसंबंधी भारतात मतभेद असणे यात वावगं काही नाही. पण केवळ विरोधासाठी विरोध तो ही केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयात अशी भूमिका घेऊन विरोधी पक्ष काय साधत आहेत? भारत सरकारने अफगाणिस्तान संबंधीत बदलत्या जागतिक राजकारणाच्या समिकरणांचा अंदाज घेऊन जून महिन्यातच तालिबानाशी चर्चा केली आहे. ज्याने रशियाला अफगणिस्तान मध्ये शह देण्यासाठी तालिबान उभा केला, पोसला आणि नंतर त्याच अमेरिकाने तालिबानशी तह केला तर भारताने तालिबानशी संपर्क का करू नये, इतकं स्पष्टपणे पण अप्रत्यक्ष रित्या अमेरिकेलाही सांगू शकणारी अशी राजकीय कूटनीतीचा भारताने अवलंब केला. अमेरिकाने पाकिस्तानचा पर्याय न स्विकारता कतार या देशाला मध्यस्य स्विकारून त्याच्यी राजधानी दोहा येथे अमेरिकाने तालीबानशी तह केला. तिथेच श्री एस जयशंकर भारताचे परराष्ट्र मंत्र्यांनी दोन खेपा मारल्या आहेत आणि कतारचे परराष्ट्र मंत्र्यांनी तालिबानला भारताशी चर्चा करावयाची असे सागितले. तेव्हाच तालिबानचे अब्दूल गनी तसेच झलमय खालीलजाद यांच्याशी आपल्या परराष्ट्रमंत्रीची भेट झाल्याचे ऐकिवात आहे. मागच्या लेखात मी म्हटले आहे की लोकशाहीवादी अमेरिका सतत राजेशाही आणि लष्करशाही असलेल्या सौदी अरेबिया आणि लष्करशाहीच असलेल्या पाकिस्तानशी घट्ट मैत्री करीत आली आहे. तर भारत सुद्धा नव्या समिकरणानुसार आपले धोरण आखू शकतो. पण झालं काय १५ ऑगस्टच्या घटनेनंतर बड्या राष्ट्रांनी अफगण संबधी प्रतिक्रीया दिली नव्हती, त्या अगोदरच आपल्या येथील काही मिडीया हाऊस भारतावर काय परीणाम होतील यावर चर्चा करू लागले. आजच्या घटकेला आपल्या सरकारने अफगणिस्तानात असलेल्या भारतियांना सुखरूप परत आणणे याच गोष्टीवर प्राधान्य दिले आहे. आणि हेच वारंवार न्यूज चॅनेलवर आपण पाहिले, ऐकले आहे. आजतक सारख्या चॅनेलांनी अमेरिकाने अफगणिस्तानात काय वाट लावली आहै यावर चर्चा सुरू केली आणि भारताने अमेरिकेचं ऐकून अफगणिस्तानात गुंतवणूक केली असा प्रचार सुरू केला. हा केवळ उतावीळपणा नसून मोदी सरकार विरूद्ध जनमत भडकविण्यासाठी काही मिडीया हाऊसचा वापर करीत डाव्या आणि पुरोगामी नेत्यांनी आखलेला एक कावा आहे. हे क्लेशकारक आहे.
सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१
अस्थिर अफगणिस्तान आणि भारत (भाग २)
अस्थिर अफगणिस्तान आणि भारत. ( भाग १)
शनिवार, २४ जुलै, २०२१
देशाच्या राजकीय मंचावरील शो -- महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया पश्चीम बंगाल (भाग ४ )
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यानंतर खंडणी वसूली हा सरकारचा महाउद्योग आणि हत्यांना आत्महत्या ठरविणे ही पोलीसांची अधिकृत कामें झाली. त्यासंबंधीच्या चौकशी, गुन्हे लपविणे, आणि नंतर ईडी, सीबीआय, एनआयए इत्यादी तपास यंत्रणांना तोंड देण्यासाठी धावाधाव करणे हे सरकारचे मुख्य काम झाले आहे. पुढे न्यायलयातील खेपा आणि संविधानातील केंद्र आणि राज्य सरकाराचे अधिकार, जबाबदारी इत्यादीचा काथ्याकूट करून सोयीची कलमे शोधण्याचे काम वकीलांना देऊन त्यांच्याशी अहोरात्र चर्चा, सोबत घटक पक्षांतील शह काटशहाचा खेळ, आणि केंद्र सरकार आणि भाजपाशी लढण्यासाठी उसने अवसान आणत घटक पक्षांच्या प्रमूख नेत्यांच्या बैठकांमागे बैठका इत्यादी बाबींने भरलेली अशी महाराष्ट्र सरकारची दिनचर्या झाली आहे. त्यामूळे महाराष्ट्रातील मिडीयात सुद्धा रोजच्या बातम्या, चर्चा, मुलाखती सुद्धा त्या संदर्भातीलच दिसत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नेत्यांनी भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. या भेटीगाठीवरून ही राजकारण सुरू झालेले दिसले. मध्यंतरी मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधानांना भेटले तेव्हा भाजपा आणि शिवसेना जवळ येत आहेत अशी मिडीयात चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादीवर नेहमी प्रमाणे अविश्वासाचे भोवरे फिरत असतात. त्यातूनच सुप्रिया सुळेंना भाजपा तर्फे राज्याचं मुख्यमंत्रीपद देऊन राष्ट्रवादी आणि भाजपाचे संयुक्त सरकार येईल अशी चर्चा सुरू झाली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पुन्हा भाजपा आणि राष्ट्रवादी काॅग्रेसची युती होईल असे म्हटले जाऊ लागले. दरम्यान मविआच्या घटक पक्षात कुरबुरीला ऊत आला, तेव्हा काॅग्रेसच्या नाना पाटोळेंनी स्वबळाचा नारा दिला. पुन्हा मविआचे सरकार पडेल अशी चर्चा झाली.
शनिवार, १७ जुलै, २०२१
वक्ता प्रशिक्षण (चतुर्थ सत्र )
भाई और बहनो नमस्कार !
वक्ता प्रशिक्षण (तृतीय सत्र)
भाई और बहनो नमस्कार !
१)वक्ता प्रशिक्षणके तृतीय सत्रमे आप सभीका हार्दिक स्वागत है | इस सत्रमें हम वकृत्व- कला पर चर्चा करेंगे | द्वितीय सत्रोमें हमने वकृत्वके लिए रखा हुआ विषयकी जानकारी कैसी लेनी है, उससे अपनी जिज्ञासाकी तृप्ती कैसी होती है इन सभी बातोंपर चर्चा कियी है | किसी विषयकी जानकारी याँ ज्ञान, श्रोताके सामने कैसा रखा जाये उसीको वकृत्व कला कहा जाता है | मैने कई साल पहले " It is nice to be important or it is important to be nice इस वाक्यपर चर्चा मे हिस्सा लिया था | चर्चासे कुछ निष्कर्ष हातमे आनेवाला नही था | इसका कारन महत्वपूर्ण बातें अच्छी लगती है और अच्छी बातें महत्वपूर्ण होती है | लेकीन चर्चासे हम यह सिख लिया की किसीभी विषयमे दो राय होती है | मराठीत म्हटले जाते की, " प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात | "
वक्ता प्रशिक्षण (द्वितीय सत्र)
भाई और बहनों नमस्कार !
वक्ता प्रशिक्षण (प्रथम सत्र)
मे महीना गेला. जून ही गेला. जुलैचा पहिला पंधरवडा संपला. लाॅकडाऊन शिथिल करण्यासंबंधीचा निर्णय जूलै अखेरीस होईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. पण राजकीय मंडळीचे राजकारण अहोरात्र चालू आहे. वस्तुतः राजकारण या शब्दा ऐवजी राजनीती असा शब्दप्रयोग लोकशाहीत अभिप्रेत असतो. पण तो कायमचा हद्दपार झाला आहे. राजकारण अहोरात्र सुरू असते असे म्हणण्यापेक्षा रात्रीच अधिक चालते आणि चर्चा दिवसा चालू असतात, असे म्हटले तरी ते पटण्यासारखे आहे. राजकारणावरील चर्चा आणि विश्लेषणाचे कार्यक्रम प्रिन्ट आणि इलेक्ट्राॅनिक्स मिडीयात ही अहोरात्र सुरू असतात. म्हणून माझ्या एका मित्राने वैतागाने सुचविले की काही तरी बदल म्हणून राजकारण सोडून दुसर्या क्षेत्रासंबंधी लेख लिहावा. मी म्हटलं तुच विषय सुचव की. त्याने वक्ता प्रशिक्षण या विषयावर हिंदी भाषेत एक लेख पब्लीश करण्याची विनंती केली. हिंदी भाषेत लेख लिहण्यात मला अडचण नाही हे माझ्या मित्राला ठाऊक आहे. परंतु विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमात जसे प्रॅक्टीकलचा तास असतो तसेच वक्ता प्रशिक्षण हा एक उपक्रम असतो. तो कार्यशाळेत पार पाडला जातो. म्हणून मी लागलीच होकार दिला नाही. परंतु वक्ता प्रशिक्षण या विषयावर पुस्तके उपलब्ध आहेत . मग लेख लिहण्याचे टाळणे मला प्रशस्त वाटले नाही. म्हणून कसे का होईना प्रयत्न करू या असे ठरविले आणि मित्राला होकार दिला. त्यातून आकारास आलेले वक्त प्रशिक्षण आपल्यासमोर मांडतोय. आपण या उपक्रमाचे स्वागत कराल अशी आशा बाळगतो . धन्यवाद !
आपण व आपले उत्सव--मातृदिन (भाग १)
आपण व आपले उत्सव-- मातृदिन देवीयों और सज्जनो नमस्कार ! हमारी मातृभूमी को देव-देवताओंकी भूमी माना जाता है | इसका कारन हमारे यहाँ सृष्टी हर ...
-
मंडळी, मागील लेखात आपण असुरक्षिततेच्या भावनेपोटी, मनुष्य समूहात राहू लागला आणि नंतर समाज व्यवस्था उभी राहीली, हे पाहिलं. त्याच लेखात स...
-
आज जेष्ठ शु१३ शके १९४२ शिवराज शक ३४७ गुरूवार दिनांक ४जून २०२०. आजच्या दिवशी म्हणजे जेष्ठ शु१३ शके १५९६ अर्थात ६ जून १६७४ रोजी शिवाजी महार...
-
आपण व आपले उत्सव--- रक्षाबंथन (भाग १) नमस्कार मंडळीं, वयोमानानुसार तब्येतीच्या कुरबुरी सुरू होणे हे स्वाभावि...



