परवा रविवारी २० फेब्रवारीला पंजाब मधील मतदान पार पडले. अकाली दल हा एक राजकीय पक्ष आहे आणि त्याची स्थापना सन १४ डिसेंबर १९२० साली झाली आहे. भारतात काॅग्रेसच्या खालोखाल इतका हा जुना पक्ष आहे. त्याचे अकाल तक्तशी ऐताहासिक नाते जोडलेले आहे. अकाल तख्त शीख धर्माशी निगडीत आहे. अलीकडे खलिस्तान चळवळ पुन्हा वळवळ करू लागलेली दिसत आहे. त्याचे परीणाम पुन्हा देशाच्या सर्व व्यवस्थेवर होऊ शकतात. म्हणून मनांत आले की पंजाब मधील निवडणूकात अकाली दलाची कशी कामगिरी राहील यावर नंतर लिहता येईल. पुढे विचार केला की ' शीख आणि हिंदुत्व ' या विषयावर काही लिहता येते का ते पाहू या. शिखांचा इतिहास छोटा नाही आणि हिंदुत्व हा विषय तर अथांग सागरासारखा खोल आणि अवकाशाचा पलिकडचा मग लिखाण करावे की करू नये असा पेंच पडला. शेवटी ठरले, शीख हा धर्म माना की पंथ माना, त्याची पाळेमूळे हिंदु धर्मात आहेत. हे स्पटिका सारखे स्वच्छ आहे. हेच नजरे समोर ठेवून माझ्या कूवती प्रमाणे हा लेख लिहीता झालो. या लेखाच्या विषयाच्या अनुषंगाने मध्ययुगाच्या पाठीमागचा तसेच मध्ययुगीन काळातला आणि अर्वाचीन काळातला आपल्या देशाचा तसेच जगाच्या इतिहासातील काही घटनांचा, बड्या देशांचे इतर देशात अस्थिरता माजविण्याची कृत्यें इत्यादीचा उहापोह टाळता येणार नाही. म्हणून लेखाचा भाग १ मध्ये जनरल इतिहास, आणि भाग २ मध्यें मुख्यत्वे करून शीख पंथातील गुरूंची शिकवण, हिदू तत्वज्ञान आणि दर्शनाशी कसे साधर्म्य साधते हे दाखविण्याचा प्रयत्न राहील.
बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२
शीख आणि हिंदुत्व भाग १
इसवी सन पुर्व सहाव्या शतकात जगभर जवळपास ६२ नवीन धर्म निर्माण झाले. भारतात याच काळात अंहिसा, समता आणि शांती या जीवनमुल्यावर आधारीत जैन आणि बौद्ध धर्म अस्तित्वात आले. इसवी सनाच्या अकराव्या शतकापासून जगभरात धार्मिक उन्मादाच्या घटना सुरू झाल्या. सन १०९५ ते १२९१ पर्यंत मध्यपुर्वेत ख्रिस्ती आणि ईस्लाम धर्मियांमध्ये ७ धर्मयुद्धे झाली. अंधश्रद्धा आणि कट्टरता उत्तेजीत करण्याने माणूस कसा आपला विवेक गमावून बसतो याचे जागतिक स्तरावरील सर्वात मोठे उदाहरण म्हणजे ही धर्मयुद्धे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच दोन धर्मीयांच्या काही बड्या देशांची साम्राज्यवादाची लालसा आज ही कायम आहे. म्हणून विकसनशील आणि अविकसित देशात येनकेन प्रकारे अस्थिरता माजविण्याचे काम बडी नाटो सदस्य राष्ट्रें, मुस्लीम देश व रशिया चीन- पाक करीत असतात. आपल्या देशात बहुतांशी प्रांतात या देशांच्या छोट्या-मोठ्या देशविघातक तसेच संस्कार- संस्कृती भक्षक कृत्यें सुरूच असतात. त्यातलीच एक खलिस्तान चळवळ.
इसवी सन ७२५ काळापासून उन्माद आणि धर्मांधता मुळे सारासार विचार करण्याची शक्ती गमावून बसलेल्या मुस्लीम धर्मियांनी भारतावर एका पाठोपाठ आक्रमणें सुरू केली. हिंदुवर अत्याचार करून लुटमार केली तसेच अनेक हिंदुचे जबरदस्तीने धर्मांतर केले गेले. आणि धर्मांतर करण्यास नकार दिला अशाच्या अमानुषपणे हत्या करण्यात आल्या. ही इस्लामी आक्रमणे संस्कृती भक्षक असल्यामूळे आपल्या भारत देशाला आज ही अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्या काळात देशाच्या कानाकोपर्यात अनेक संतमहंत उदयास आले आणि त्यांनी आपल्या परीने संस्कृती रक्षणाचे कार्य केले. तसेच अनेक राजे-महाराजांनी, योद्ध्यांनी आक्रमणा विरूद्ध कडवा प्रतिकार केला. याच काळात म्हणजे २० आक्टोबर १४६९ ला व्यवसायाने वैश्य असलेल्या माता त्रिप्ती आणि मेहता कालू या हिंदू दापत्यांच्या पोटी आताच्या पाकिस्तानातील लाहोर नजीक तलंबडी जिल्ह्यात एक अपत्य जन्मले. तेच श्री गुरू नानक ; ज्यांनी आपल्या वयाच्या २८, व्या वर्षी म्हणजे सन १४९९ समता, बंधुभाव आणि शांतता या तत्वाच्या आधारावर शीख धर्म स्थापन केला. पुढे शांततामय शिखांना हातात तलवार घेऊन आपल्याच समाजबांधवांचे इस्लामी आक्रमकांपासून रक्षण करण्याची वेळ आली. पण शीख योद्धांचे वैशिष्ट हे आहे की त्यांनी शत्रुंशी ज्या लढाया केल्या त्या हिंदु म्हणूनच या संबंधीची पुष्टी दहावे गुरू गोविंदसिंहाच्या चरीत्रातून मिळते. म्हणून स्वामी विवेकानंदानी एके ठिकाणी म्हटले आहे की
' हिंदुनी गुरू गोविंदसिंह सारखे हिंदु व्हावे .'
आपल्या देशात मध्ययुगीन काळात एका बाजूला साधुसंत भजनं, किर्तनाच्या माध्यमातून शांती, बंधुभाव, समता, अहिंसा, भूतदया इत्यादी जीवनमूल्यांची गरज समजावून अंधश्रद्धा, भेदभाव, आळस मद, मत्सर, क्रोध इत्यादी शत्रूंची हाकलपट्टी करण्यासाठीचे अहोरात्र आवाहन करत असत. तर दुसर्या बाजूला हातात तळपणार्या तलवार घेऊन इस्लामी आक्रमक आपल्या समाजात दशहतीचे साम्राज्य वाढवित होते. हा नियतीचा खेळ म्हणावा की आपण भ्याड होतो? आपआपसातील भेद, फितूरी ही कारणें होतीच. पण तेवढेच कारण होते का आपली नाच्चकी होण्यामागे? मला वाटतं याहून अधिक काही कारणे असावीत.
हिंदू समाजात एकात्मता नव्हतीच असे नाही. जी होती ती धार्मिक व सांस्कृतिक धारणांवर होती. तिला राजनैतिक दृष्टी नव्हती. त्यामूळे परकिय आक्रमणाच्या वेळी एक होऊन त्याचा प्रतिकार करावा, ही जाणीव निर्माण झाली नाही. अनेक वर्षे आपल्या देशावर (म्हणजे इ स ७२५ च्या अगोदर) आक्रमण न झाल्यामूळे (जी काही झाली होती ती सिमेवरून परतून लावली होती) प्रतिक्रीया स्वरूप हिंदु समाजाचा धार्मिक वा सांस्कृतिक अभिमान जागृत होऊ शकला नाही. राजनीतीबद्दल उदासीनता सर्वसामान्यात इतकी होती की तिकडे युद्ध चालले असले तरी इकडे शेतकरी शेतात नांगर चालवित असेल, सुतार, सोनार आपआपल्या कारागिरीत व्यस्त होत असेल अशी स्थिती देशभर होती. याचा अर्थ त्यांना राजनैतिक घडामोडीचे सोयर-सुतक नव्हते. युद्ध सैनिक- सैनिकामध्ये चाले. संपूर्ण समाज गोवला जात नसे. शत्रूचे सैनिक जनतेवर अत्याचार करीत, पण त्याचा प्रतिकार करण्याचे काम राजाचे ही भावना होती. सैनिका मध्ये ही देश वा राज्याबद्दल निष्ठा नव्हती. होती ती आपल्या स्वामीबद्दलची. जो आपली उपजीविका चालवितो त्याच्याशी प्रामाणिक राहण्याची, आणि खाल्ल्या मिठाला जागणे. या पलिकडचा विचार मनाला शिवला नव्हता. आपल्या राजाला परकीय शक्ती पदच्युत करीत असताना प्रधानाला वा सेनापतीला त्या परकिय आक्रमकांची मदत करण्यात संकोच वाटला नाही. हेच कारण होते ज्यामूळे एक हजार वर्षाहून अधिक काळ आपला देश गुलामीत गेला.
इसवी सन पुर्व सहाव्या शतकात जन्माला आलेल्या अंहिसा आणि शांती तत्वाचे जैन व बौद्ध धर्म तसेच मध्ययुगात जन्मलेल्या शीख धर्माचे संस्थांपक हिंदूच होते. म्हणूनच आपल्या देशाच्या संविधानात हिंदु कोड या धर्मांना ही लागू आहे. वस्तूतः हे हिंदू धर्मातील पंथच आहेत. जैन, बौद्ध, आणि शिख पंथातील बांधवांच्या चालिरीती, हिंदू समाजा सारख्याच आहेत. दिपावली, दसरा सारखे सण जैन, बौद्ध आणि शीख बांधव सुद्धा साजरा करतात. जन्मापासून ते अंतेष्टी संस्कार पर्यंतच्या पद्धती सुद्धा हिंदू धर्माप्रमाणे आहेत. हिंदु धर्म हा अति प्राचीन काळातला. त्याचा कोणी एक संस्थापक नाही. त्यामूळे त्याला सनातन असे ही संबोधिले गेले आहे.
हिंदु धर्मशास्त्र चार वेदावर आधारलेले आहे पण ते कोणी लिहले हे ठाऊक नाही. म्हणून त्याला अपौरूषिय मानले गेले आहे. तो वैदिक काळ समजला जातो. वेद सृष्टीच्या नियमांनी खचाखच भरलेले. म्हणून त्या धर्माला शाश्वत धर्म असे ही एक नाव आहे. ईश्वर एक आहे, तो कसा आहे, त्याला कसे ओळखावयाचे या संबंधी एकच उत्तर मिळते ते ही सृष्टीतून. ' जशी दृष्टी तशी सृष्टी ! ' त्या काळात अनेक महामानवाला सृष्टी द्वारे जशी प्रेरणा मिळाली, तसे त्याने ईश्वराचे रूप मांडले. कोणी सूर्य तर कोणी अग्नी, कोणी सागर तर कोणी आकाश कोणी शीव तर कोणी विष्णू , कोणी सरस्वती, कोणी लक्ष्मी तर कोणी अंबामाताला देव-देवता मानले. पण सर्वत्र ' सर्व देवं नमस्कारम केशवं प्रतिगच्छती ' हे सत्य स्विकारलेले दिसत होते, आजही दिसते. तरीही शैव, वैश्णव आणि ब्रह्म उपासक असे भेद झाले. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश मिळून अत्री आणि अनुसयेचा पुत्र असा दत्तात्रेय अवतरला. अत्री म्हणजे जे तीन नव्हे ते आणि अनसुया म्हणजे समाजात देव-देवतां बाबत जी असुया माजली आहे ती संपून अनसुयेचे राज्य यावे या करिता अवतरले ते दत्तात्रेय. त्यामूळे पुर्वीचे ते भेद आपोआप हवेत विरले. दत्तदेवाचे दुसरे नाव आहे दत्तगुरू. पुढे दत्तभक्तांचा दत्त संप्रदाय अशी ओळख झाली आहे. आपआपल्या गुरूंची प्रतिमा आपल्या वेशभूषाची शोभा वाढते असेच मानले जाते. पंथ हे विशाल शाश्वत अशा हिंदु धर्मरूपी वृक्षाच्या फांद्या समजल्या जातात ही वस्तूस्थिती आहे. काहीं महामानवांना अशी प्रेरणा मिळाली की ईश्वर अस्तित्वात नाही. काहीं महामानवांना ' मुर्ती पुजेची गरज नाही, आपले कर्म हेच ईश्वर ' अशी प्रेरणा मिळाली. हीच ती प्रेरणा गुरू नानकांची. अशा महामानवांचा ही उपदेश त्यांच्या आसपाच्या भूभागातल्या भारत वर्षातील जनतेला बोधप्रत आणि हितकारक वाटला आणि स्विकारला हेच भारताचे आगळे वेगळे वैशिष्ट. असा उपदेश स्विकारण्यात हिंदुच अधिक होत. मध्ययुगीन काळात जबरदस्तीने ज्यांना मुस्लीम आणि ख्रिश्चन करण्यात आले त्यांच्यापैकी कोणी शीख- शिकवण स्विकारली असे ऐकण्यात आणि वाचनात ही आलेले नाही. मुर्तीपूजा हे हिंदु धर्माचे व्यवच्छेदक लक्षण मानता येत नाही. कारण नास्तिक ही हिंदू धर्मात हिंदू म्हणून राहू शकत होता आणि आज ही राहू शकतो. त्या बद्दल हिंदुच्या मनांत ना राग आहे आणि ना तक्रार आहे. भक्त शिरोमणी संत नामदेव निर्गुण भक्तीस पात्र ठरले तेव्हा त्यांनी मुर्तीपुजा सोडून दिली.
शीख पंथाचा प्रसार गुरू नानकांच्या जन्मभूमीच्या परिसरात म्हणजेच पाकिस्तान आणि भारताच्या उत्तर-पश्चीम भागात विशेषतः पंजाबात अधिक झालेला दिसतो. गुरू नानकांनी मुर्तीपुजा मानली नाही. म्हणून तो धर्म हिंदुतील पंथ नाही, असे सतत विदेशी शक्तींने मिडीया द्वारें पसरविले आणि आज ही पसरवित आहेत. आपले दुर्दैव हे आहे की आपल्याच देशातले विचारवंत शीख हा धर्म हिंदू आणि मुसलमानाच्या समन्वयाने निर्माण झाला आहे असे म्हणतात आणि त्यांचेच हे वाक्य इतिहास विषयाच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थी वाचत मोठे झाले. एक हजार वर्षे आपण गुलामगिरीत काढले ते अशा बिनडोकांच्या विचारवंतामूळेच. प्रसिद्ध पत्रकार-संपादक- लेखक महाशय खुशवंतसिंगने १९७७ साली पब्लीश झालेल्या आपल्या History of the Sikh Vol 1 यामध्ये लिहले आहे, की पंजाबचा इतिहास म्हणजे पंजाब राष्ट्रवादाचा इतिहास आहे. नंतर The Sikh या पुस्तकात ते म्हणतात शीख मताचा उदय हिंदु धर्मातून झाला असला तरी हे मत इस्लामच्या जवळचे आहे. याच्या बरोबर उलट मत त्याच खुशवंतसिंगनी १९८४ साली Free Press Journal मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्याच लेखात लिहले आहे की शीख धर्मातील ९०, टक्के विचार हे वेदान्त विचार आहेत. उशीरा का होईना आपल्या एका विचारवंताला त्यांची चूक कळली.
डाव्या विचारवंतानी आणि विरोधी पक्षाच्या नेतेमंडळीनी लक्षात घ्यावे की जे मुर्तीपूजा मानत नाही ते सुद्धा शेवटी मुर्ती पुजा करयाला लागले आहेत. डावे पक्ष जवळपास कार्ल मार्क्सची पुजाच करीत आहेत. लेनिनचा पुतळा ईशान्य भारतात उभा आहे ना ? बौद्ध बांधव सुद्धा भगवान बुद्धांच्या प्रतिमेची पुजा करीत आहेत की नाही? द्वैत -अद्वैत अशी मतें असणे हे हिंदु धर्माचे व्यवच्छेदक लक्षण आहे. म्हणून अद्वैताचे भाष्यकार आद्य शंकराचार्यांनी पंचदैवतांची कल्पना मांडून पुजा कल्पनेचा प्रसार केला.
मुर्ती पुजा हा तसा भारतियांचा स्थायीभाव आहे. भारत देवभूमी आहे. इथे ' ज्याची वंदावी पावले ' ' तेथे कर माझे जुळती ' अशा लाखो व्यक्ती जन्मल्या आणि भविष्यात जन्म घेत राहणार आहेत. गुरू नानकांचे भक्तगण गुरूग्रंथसाहिबाच्या दरबारात भजन, स्तुती स्तोत्र गात आहेत ना ! शीखांची गुरूग्रंथसाहिबाची पुजा ही आपल्या देशात महर्षी व्यासांच्या शिष्यांनी सुरू केलील्या गुरू-शिष्य परंपरेतीलच आहे. शिखांना ही प्रेरणा मिळाली ती हिंदु' धर्मातूनच. कारण ते हिंदुच आहेत. तसे पाहता ' जगातले लोक जंगलात राहात होते, तेव्हा भारतात गुरूकुल पंरपरा होती, असे भारतात व्हाॅईसराॅय म्हणून आलेल्या लार्ड कर्झन यांनीच म्हटलेलं आहे. म्हणून मला वाटते गुरू-शिष्य परंपरा ही हिंदुकडून जगाला मिळालेली देणगी आहे.
' गुरूः ब्रह्मा गुरूः विष्णू गुरूः देवो महेश्वरा |
गुरू: साक्षात परब्रह्म तस्मैश्री गुरवे नमः | 'अशी प्रार्थना वैदिक काळापासून आपल्या इथे प्रचलीत आहे. ही परंपंरा जगभर पसरली. त्यामूळेच प्लेटो अभिमानाने म्हणत माझा गुरू साॅक्रेटीस आहेत, ऑरिस्टाॅटल छाती फुगवून म्हणत असत की माझे गुरू प्लेटो, तसेच मिल जेम्सला त्यांचे गुरू जेरेमीचा अभिमान वाटत होता.
शीखांच्या दाहीं गुरूंचे सारे कार्य आणि त्यांची वचनें वाचल्यावरून सहज लक्षात येते की शीख हा हिंदु धर्माचा पंथ आहे. या लेखातील मूळ विषयाला पुष्टी मिळू शकेल असा गुरूग्रंथसाहीब आहे. म्हणून त्यातील काही निवडक गुरूंची निवडक कार्य आणि वचने भाग २ मध्ये मांडली आहेत. शिखांचा संपूर्ण इतिहास जाज्वल्य देशभक्तीने ओतप्रोत भरलेला आहे म्हणून तो प्रत्येक भारतियांने वाचावा अशी वाचकांना नम्र विनंती करून मी इथे थांबतो.
(लेखाचा भाग २ सोबत खाली जोडला आहे)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)
गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...
-
मंडळी, मागील लेखात आपण असुरक्षिततेच्या भावनेपोटी, मनुष्य समूहात राहू लागला आणि नंतर समाज व्यवस्था उभी राहीली, हे पाहिलं. त्याच लेखात स...
-
आज जेष्ठ शु१३ शके १९४२ शिवराज शक ३४७ गुरूवार दिनांक ४जून २०२०. आजच्या दिवशी म्हणजे जेष्ठ शु१३ शके १५९६ अर्थात ६ जून १६७४ रोजी शिवाजी महार...
-
अलीकडे Whats App वर एक पोस्ट आली. ती अशी आहे, "Desires dictates our priorities, priorities shape our choices, and choices determi...
A good one
उत्तर द्याहटवाधन्यवाद दिपकजी !
उत्तर द्याहटवा