बिहार राज्याच्या विधानसभा निवडणूकाचा निकाल लागला. अत्यंत चुरशीच्या लढाईत रालोआचा विजय झाला. सन २०१४ पासून देशातील प्रत्येक राज्याची विधानसभा, विधान परिषद, लोकसभेच्या पोट निवडणूका वा राज्यसभेच्या निवडणूकांना इतकं महत्व आले आहे की राजकारण म्हणजे समरांगण झाले आहे की काय अशी शंका येते. याचे कारण सार्या विरोधी पक्षांना प्रत्येक राज्यात मोदीचा पराभव व्हावा अशी इच्छा आहे. पण ही इच्छा म्हणजे तोळामासाची तब्येत असलेल्या माणसाने धडधाकट कुस्ती पहेलवानला चीत करण्याची इच्छा बाळगण्यासारखी आहे. पण त्यांना हे कळतंय कुठे? की कळते पण वळत नाही अशी स्थिती आहे का? आपल्याला ही आता समजेनासे झाले आहे. बिहारमधील निवडणूक निकालासंबंधीचे भाष्य सविस्तर रित्या मागील लेखात दिले असल्यामुळे या लेखात बिहारच्या निकालाचे विश्लेषण मांडण्याची गरज नाही. त्या ऐवजी बिहारच्या निवडणूकाच्या निकालाचे संक्षिप्त वर्णन मांडून हा लेख आटोपता घेणार आहे.
रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०
बिहार निवडणूक निकाल -- अजूनही आहे मोदी लाट
बिहारच्या निवडणूकीत भाजपा सत्तेवर न येण्याची सर्वात भलीमोठी आशा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सामनाचे संपादक बाळगून होते. तसेच त्यांना रिपब्लिक न्यूज चॅनेलचे अर्णव गोस्वामींना सुप्रीम कोर्ट जामीन नामंजूर करेल अशी दुसरी महत्वाची आशा होती. एक तिसरी मिणमिणती आशा होती की कुठेतरी भाजपाची हिंदुत्वाची मतें आपण कापू. पण बिहारी जनतेने शिवसेनेला नोटा पेक्षा ही मोठा वेटो वापरला. शिवसेनेच्या या तिन्ही आशा मंगळवारी १० नोव्हेबंरला फोल ठरल्या. या विषयावर एक स्वतंत्र लेख सोबत प्रसिद्ध केल्यामूळे त्यावर इथे चर्चा नको करू या. प्रथम सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि लेखाच्या विषयाकडे वळतो.
देशावर कोरानाचे संकट आल्यानंतर बिहार राज्याच्या विधानसभाची झालेली निवडणूक ही पहिली होती. म्हणून मतदानाची टक्केवारी किती होणार हा एक यक्ष प्रश्न होता. पण बिहारी जनतेने निर्भयतेने मतदान केले. त्याबद्दल तसेच स्पष्ट जनादेश दिल्याबद्दल अभिनंदन ! दुसरा प्रश्न हा होता की नितीशकुमारची लोकप्रियता घसरली आहे का? ती घसरली आहे पण विरोधी पक्षांनी आशा केली होती, तितकी घसरली नाही. तिसरा प्रश्न मोदी लाट ओसरली आहे का? या प्रश्नाचे बिहार जनतेने चोख उत्तर दिले आहे. चौथा प्रश्न होता तो हा की नितीशकूमार पुन्हा मुख्यमंत्री होतील का? या प्रश्नाचे उत्तर होय असे हे मी नमूद केले होते. त्यावर भाजपाने पत्रकार परिषदेत शिक्कामोर्तब केले आहे.
निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर ज्या पक्षाची, ज्या गठबंधनाची हार होते त्यांनी खोट्या सबबी कितीही सांगितल्या तरी सर्व मतदार आपआपल्या दैनंदिन जीवनगाडी हाकलण्यात गर्क होतात. ते खोट्या सबबी ऐकत नाहीत. निवडणूकीच्या निकालाने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे ती म्हणजे पंतप्रधान मोदीची लोकप्रियता कमी झालेली नाही. तेजस्वी यादवने आपला ठसा निर्माण करण्यात यश मिळविले, पण मी मागील लेखात म्हटल्याप्रमाणे फक्त मुस्लीम व यादव हा फार्मूला घेण्याने निवडणूकीतील यशाला मर्यादा पडतात हे अनुभवास आले. जेडीयूची घसरण होणार आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष होईल असे मी म्हटले होते. त्यातील जेडीयुसंबंधी माझा अंदाज खरा ठरला. सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपाचा मान हूकला असला तरी भाजपाचा स्ट्राईक रेट आरजेडी पेक्षा सरस आहे.
पहिल्या फेरीचे मतदान झाल्यानंतर बिहार निवडणूकीचा जनादेश खंडीत निकाल स्वरूपाचा राहील असे मी म्हटले होते. मी लेख लिहीला होता तेव्हा पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभांची सुरूवात झाली होती आणि त्यांच्या भाषणांने सर्व चित्र पालटू शकते असे राजदिप सरदेसाईच्या वक्तव्याला मी दुजोरा दिलेला आहे. बिहारच्या निवडणूकीच्या प्रचार काळात आयपीएलची स्पर्धा सुरू होती. त्यामूळे बिहाराच्या निवडणूक निकालाचे क्रिकेटच्या परिभाषेत वर्णन करावेसे वाटते.
"पंतप्रधान मोदी म्हणजे क्रिकेट खेळात एक हाती विजय मिळवून देणारा महान फलंदाज वा एक हाती विजय मिळवून देणारा महान गोलंदाज आहे, त्यांनी अनेक सामने एकहाती मिळवून दिले आहेत. कागदावर गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत एखादी टिम, ज्याच्यांशी लढाई आहे अशा टीमपेक्षा कमकवूत आहे असे वाटते पण त्या टिम मध्ये एक हाती विजय मिळवून देणारा खेळाडू असेल तर उगीच अंदाज बाधण्यात अर्थ नाही". महागठबंधनाचा मोठा विजय होणार असे ज्या न्यूज चॅनेल्सनी म्हटले होते त्यांना ही माझे हे म्हणणे पटेल. पंतप्रधान मोदी विजयाचे शिल्पकार मानले जात असले तरी बिहारचे मुख्यंमत्रीपद श्री नितीशकुमारांकडे ठेवण्याचा भारतीय जनता पक्षांचा निर्णय झाला आहे. यावरून भाजपाने एकाच स्ट्रोकमध्ये दोन गोष्टी साध्य केल्या आहेत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे बिहार मधील विभिन्न दलीत समाजात ज्यांचे स्थान मसीहा स्वरूप आहे, अशा नितीशकुमारांचा सन्मान केला आणि महाराष्ट्रातल्या आपल्या माजी मित्राला अनुल्लेखाने डिचविले आहे.
बिहारमध्ये मोदी यांची जादू कायम राहीली ही काॅग्रेस व मित्र पक्ष तसेच इतर प्रांतीय पक्ष विशेषतः शिवसेना आणि तृणमूल काॅग्रेससाठी आणि डाव्या पक्षांसाठी अतिशय चिंतेची बाब आहे. वस्तुतः सार्या विरोधी पक्षांच्या चिंता वाढण्यास ते स्वतः जबाबदार आहेत. पंतप्रधान मोदीच्या कारकिर्दित काश्मीरमधील ३७० कलम, जम्मू काश्मीर आणि लडाख असे विभाजन व तो प्रदेश केंद्र शासित ठेवणे, तीन तलाक, सीसीए, श्रीराम मंदिर, शेती इत्यादी विषय जे भाजपाचे खास मानले जातात त्यासंबंधीच्या बिलांचे कायद्यात रूपातंर झाले आहे. तसेच पाकिस्तान व चीन सारख्या देशांना जशास तसे उत्तर देण्यासाठी सामरिक दृष्ट्या सक्षम करण्याची आणि परराष्ट्रनीतीत आवश्यक तसा खंबीरपणा आणण्याची जनतेची इच्छा मोदी सरकारने पूरी केली आहे. खरं म्हणजे या सर्व विषयांवर भारतीय जनतेने मोदी सरकारला दुसर्यांदा केंद्रात सत्तेवर बसविले हे एक प्रकारे सार्वमत झाले आहे.
बिहारमधील निवडणूकीत मोदींच्या नावावर मतें मिळाली आहेत ती राष्ट्रीय प्रश्नांची मोदी सरकार ज्या पद्धतीने उकल करते त्यावरील संमतीची ती मते आहेत. म्हणून केवळ भारतातील राजकारण व्यक्ती भोवती फिरते असे म्हणून जनतेचा अवमान करणे टाळण्याची गरज आहे. मोदींचा करिष्मा आहेच पण सोबत मतदार राष्ट्रीय सुरक्षा नीती व देशाची परराष्ट्र नीती हे विषय ही राज्याच्या विधानसभेच्या निवडणूकीत मुद्दे मानू लागले आहेत. ही बाब निवडणूकीच्या निकाला संबधीत सर्वे करण्यार्या कंपन्यांनी तसेच विरोधी पक्षांनी ही लक्षात घेणे गरजेचे आहे असे मला वाटते. म्हणून तमाम विरोधकांनी आणि त्यांच्या समर्थक संपादक, व विचारवंतानी भाजपा व संघा बद्दलची जी सूड वा द्वेष भावना आहे ती काढून टाकावी आणि भाजपा व संघ मांडत असलेला सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या सिद्धांतावर स्वतःहून अभ्यास करून समान नागरिक कायद्या बाबत चर्चा करावी. बदलत्या जगाबरोबर चालत जाणे हे आवश्यक आहे. पण ' आपण सारे एक देश ' म्हणून चालत जाणे हे त्याहून अधिक आवश्यक आहे. राजकीय पक्षात सहमती व सौदार्य निर्माण झाले की आपोआप
' एक देश एक भावना' या न्यायाने अनेक तंटे मिटतील. त्यामूळे अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, उत्पादन, शेती, शिक्षण, आरोग्य, रोजगार, इत्यादी विषयाबाबत सहमतीने धोरण आखली जाण्याची पद्धत रूढ होईल. तसे झाले तर भारत एक सर्वात प्रगल्भ लोकशाही तसेच महासत्ता होऊ शकते. बिहार मधील निवडणूकीच्या निकालाचा अर्थ व बोध छोटा दिसत असला तरी फार गहन आहे. त्या संबंधीत सविस्तर चर्चा या लेखा सोबत महाराष्ट्र सरकरच्या कारभारासंबधीत लेख पब्लीश केले आहेत त्यात केली आहे. शेवटी महाराष्ट्र सरकार आज केंद्र सरकारशी संघर्ष करण्यात अग्रेसर असल्याने त्या सरकारचा व्यवहार व कारभार हा एक प्रकारे भाजपेतर पक्षांच्या मानसिकेतेचं प्रातिनिधक स्वरूपच आहे. म्हणून ते लेख भले विस्ताराने मोठे आहेत तरी आपण वाचावे अशी विनंती करून आपली रजा घेतो.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)
गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...
-
मंडळी, मागील लेखात आपण असुरक्षिततेच्या भावनेपोटी, मनुष्य समूहात राहू लागला आणि नंतर समाज व्यवस्था उभी राहीली, हे पाहिलं. त्याच लेखात स...
-
आज जेष्ठ शु१३ शके १९४२ शिवराज शक ३४७ गुरूवार दिनांक ४जून २०२०. आजच्या दिवशी म्हणजे जेष्ठ शु१३ शके १५९६ अर्थात ६ जून १६७४ रोजी शिवाजी महार...
-
अलीकडे Whats App वर एक पोस्ट आली. ती अशी आहे, "Desires dictates our priorities, priorities shape our choices, and choices determi...

नमस्कार ।
उत्तर द्याहटवानमस्कार म्हात्रेजी,
उत्तर द्याहटवाबिहार निकालावरील भाष्य स्पष्ट आणी सटीक आहे.निवडणुक खरोखर अटितटीची झाली, निकालाच्या दिवशीही सी साॕ परिस्थिती होती, संध्याकाळी nda 120 च्या खाली आल्यानंतर,४/५ सीट्स् चा प्रतिकुल निकाल तेजस्वीला संधी देऊ शकला असता,शेवटी पहाटे 2 नंतर मोजणी संपल्यावर nda च्या विजयावर शिक्का मोर्तब झाले. त्यामुळे तेजस्वी या नवीन तरुण नेत्याचा उदय हा भाजपला इशारा आहे. त्याच बरोबर या भाजपच्या विजयातील, चिराग व ओवैसी यांचही योगदान महत्वाच आहे.
धन्यवाद.