या भागात महाराष्ट्र सरकारला न्यायालयाने दिलेली जी लेटेस्ट चपराक दिली आहे त्यावर प्रथम चर्चा करू या. सुश्री ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांनी आपआपल्या राज्यात एक हाती विजय तरी मिळविला आहे. तसेच त्यांना प्रशासकिय कामाचा अनुभव आहे. असे असुनही या दोन्ही नेत्यांची न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसेसच्या माध्यमातून केंद्र सरकारने म्हणजेच गृहमंत्री अमित शहांनी कोंडी करावयास सुरूवात केली आहे. दिल्लीत केजरीवाल सरकार काय चाली खेळतात त्याची इतिंभ्यूत माहिती अमीत शहांना मिळत असते. बंगालमध्ये ते स्वतः जातात. तेथल्या स्थितीचा आढावा घेतात. दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तेजंदरसिग बाग्गांना अटक झाल्यावर बंगालमध्ये असताना अमित शहांनी मोबाईल वरून केजरीवालांना सुगावा लागण्याच्या आत आपली बाजी फत्ते केली. महाराष्ट्रात जे काही घडते त्यावर ही त्यांची बारीक नजर आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रशासकीय अनुभव नाही आणि एक हाती विजय मिळविण्याची शक्ती ही नाही. तरीही केजरीवाल आणि ममता बॅनर्जीहून अधिक तुच्छतेने केंद्र सरकाराच्या समर्थकांना पोलिसांचा खाक्या दाखवित आहेत.
शुक्रवार, १३ मे, २०२२
केंद्र-राज्य संघर्ष (भाग ४) - महाराष्ट्र आणि पश्चीम बंगाल
केंद्र-राज्य संघर्ष (भाग ३) - दिल्ली
बुधवार, २७ एप्रिल, २०२२
शिवसेनेने गमाविलेल्या संधी
राणा दापत्य गुपचूप मुंबईत दाखल झाल्याची बातमी आली. शेवटी मातोश्री समोर शिवसैनिकांचा तो जमाव शनिवारी राणा दापत्याच्या सांताक्रुझ येथील घरासमोर दिसला. तेव्हाच कळून आले की तो जमाव पोलीसांच्या सोबत राणा दापत्यावर दशहत बसण्यासाठी होता हे सिध्द झाले. ही आमची ठोकशाही स्टाईल आहे असे सतत अभिमानाने बोलणार्या संजय राऊतामुळे सत्तारूढ पक्षाची प्रतिमा अगोदरच धुळीस मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांना आवरावयास हवे असे भाजपा तर्फे सतत सांगण्यात येत असते. पण मुख्यमंत्री दुर्लक्ष करतात. या कारणामूळे दुर्दैवाने मुख्यमंत्री खलनायक होऊ लागल्याचे दिसू लागले आहेत. नंतर राणा दापत्याला पोलीसा करवें अटक झाली. म्हणे हा मोठा राजद्रोह ! कोर्टात पुन्हा एक केस दाखल. मविआ सरकारवर न्यायालयाचे प्रत्येक केसवर फटके पडत असतांना राणा दापत्याचे आव्हान शांतपणे हाताळण्याची संधी वाया घालविली. कदाचीत न्यायालय मविआ सरकारच्या कारभाराला कंटाळून एखाद्या क्षणी केद्र सरकारलाच सल्ला देईल की, मविआ सरकारशी चाललेल्या संघर्षावर उपाय शोधा.
राणा दापत्यावरील राजद्रोहाचा आरोप सिद्ध होईल की नाही या संबधीत आता काही सांगणे घाईचे ठरते. पण ही केस सुप्रिम कोर्टात ही जाऊ शकते म्हणजे मविआ सरकारचा वेळ खाणार आहे. यातून मविआ सरकारने एक मोठी संधी गमाविली आहे. ती कोणती यासंबधीतील माहिती खाली देत आहे.
तसे पाहता राणा दापत्यांला हनुमान चालीसाच्या पठणासाठी येऊ द्यावयास हवे होते. पोलीस बंदोबस्त अगदी नावापूरता ठेवला असता आणि हनुमान चालिसाचा पाठ झाला असता तर सरकार पक्षाचे काही नुकसान होणार नव्हतेच. नंतर त्या दापत्याला चहा-नाश्ता देऊन हसत हसत आभार मानले असते तर तो उद्धव ठाकरेंचा मोठा विजय ठरला असता. आपले हिंदुत्वाचे नाणे खणखणीत आहे हे दाखविता आले असते आणि महाराष्ट्रातील राजकारणाच्या प्रगल्भतेचे देशालाच नव्हे तर जगाला दर्शन झाले असते.
प्रथम कोरोना संकट, नंतर अफगणिस्तान प्रकरण आता युक्रेन प्रकरणातून जग आर्थिक मंदीच्या विळख्यात जाण्याच्या मार्गावर आहे. त्यातून त्याला आर्थिक गुंतवणूकसाठी भारत सरस वाटतो आहे. या आर्थिक जगतात सर्वनाश होण्याचे भय जगातील सर्वच देशांना आहे
म्हणून तिसरे महायुद्ध होणार नाही. ते परवडणारे नाही. जी काही थोडीफार युद्ध होतात ती आपआपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बड्या शक्ती करीत आहेत. मोदी सरकारचे रशिया-युक्रेन मधील युद्धात जे धोरण अवलंबिले ते लाजवाब ठरले. आज सारं जग आशेने भारतातकडे पाहात आहे. बड्या राष्ट्राचे नेते भारतात येत आहेत. पण नेमकी याच वेळी भारताची आर्थिक राजधानी अशांत दिसली.
गुंतवणूकीसाठी विदेशातून भारत भेटी साठी येणार्यामध्ये काॅर्पोरेटचे सिइओ, परराष्ट्र खात्याचे मंत्री, राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान तसेच त्या त्या देशाचे उद्योग, अर्थ आणि व्यापार खात्याचे सेक्रटरी इत्यादींचा समावेश असतो. गेले दोन महिने विदेशी नेत्यांच्या भारत भेटी सुरू आहेत. विदेशी शिष्टमंडळातील नेते मुंबईतल्या राजकीय घडामोडी वाचत असतात. आपल्या देशाच्या शिष्टमंडळांशी चर्चा करीत असणारच. शेवटी ते गुंतवणूक जिथे शांतता आणि स्थैर्य अशा राज्यातच करणार. फार तर काॅर्पोरेट ऑफीस फक्त मुंबईत ठेवतील. गेली आठ वर्षे सतत शिवसेना आणि मनसें केंद्र सरकार ' महाराष्ट्र द्वेषी आहे ' असा आरोप करीत राहीले त्याचा उलटा परिणाम महाराष्ट्राला भोगावा लागतो आहे. डाॅ अनिल काकोडकर सारख्या वैज्ञानिकाने जैतापूरला अणू ऊर्जा प्रकल्पाला संमती दिली असताना ही उद्धव ठाकरेंनी विरोध केला. मेट्रोच्या कारशेड मध्ये आडकाठी घातली. भाजपा समवेत सरकारमध्ये असूनही विकासाच्या प्रोजेक्ट मध्ये खो घातला. मविआ सरकारला मला सांगावेसे वाटते की केरळ, तेलंगण, ओरिसा, आणि तामीळनाडू इत्यादी राज्यात विरोधी पक्षांची सरकार आहेत पण केंद्र सरकारशी उघड संघर्ष करीत नाहीत, याचे कारण काय आहे हे तेथील प्रशासनाकडून घ्यावे. आपले सरकार प्रशासनाचा ही केंद्र सरकार विरूद्ध लढण्यासाठी उपयोग करीत आहे. आमची मुंबई आणि आम्ही मुबंईकर असे अभिमानाने घोषणा देतो पण आर्थिक जगतातील एक मोठी संधी गमावून बसलो आहोत. असे म्हटले जाते की एखादी आपत्ती मग ती कुठल्याही क्षेत्रातली असो ती सोबत आपल्यासाठी यशाची संधी घेऊन येत असते. इंग्रजी भाषेत म्हटले जाते की " An opportunity is a course of action which is immediately possible ."
ही मुंबई तर सर्वांना संधी देणारी आहे. कारण आपली मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. ती अंशात झाली की इथले उद्योग दुसर्या राज्यात जातात. असे का झाले यावर विचार करता मागचा इतिहास धुंडाळावा लागतो. लाल बावटावाल्यांची मुंबई अशांत ठेवण्याची नीती का यशस्वी झाली? गिरणी कामगार का देशोधडीला गेला. कोण होते ते कामगार? मुंबईत फक्त लाल बावट्याच्याच युनियन्स होत्या का? मराठी कामगारांच्या अस्सल मराठी नेत्यांच्या युनियन्स होत्याच की ! गिरणी कामगार तर सारेच मराठी होते की ! मराठी माणसाला घर घेणे मुंबईत अशक्य का झाले ? का मराठी माणसे विरार, नालासोपारा, ठाणे कल्याण मध्ये स्थालंतर झाला तेव्हा तर BJP was no where in power. मुंबई आणि देशावर ज्यांची सत्ता होती त्याच्यांशीच शिवसेना आता सत्तेतील भागिदार झाली आहे ना !
महाराष्ट्रातील तत्कालीन सरकार कडे दुरदृष्टी होती हे मी नाकारत नाही. पंरतु जमीनचे भाव बांधकाम व्यवसायामूळे वाढत जाऊ लागले. बांधकाम व्यवसायात भरपूर पैसा मिळतो हे चाणाक्ष सरकार मधील अतिचाणाक्ष नेत्यांना कळले होते. अशी नेते मंडळी करामती करून बिल्डर्स झालेले दिसतात. याच धंद्यात ज्याचे अनेक वेळा नाव ऐकतो तो डाॅन इथलाच. लाल बावट्यांना हाकलून लावण्यासाठी निर्माण झालेली शिवसेना ही त्यात सामील झाली. मराठी माणूस आणि गिरणी कामगार मुंबईच्या बाहेर फेकला गेला. मुंबईचा आधुनिक रित्या विकास होणे गरजेचं होतं पण अनेक उद्योग धंदे महाराष्ट्राच्या बाहेर गेले ते कायमचे. अजूनही वेळ गेलेली नाही. कारण सर्व कंपन्यांची हेडक्वार्टस् मुबंईत आहेत पण राजकारणातील सुडाची भावना कधी संपणार? आपल्या दारात जागतिक नेते गुंतवणूकी साठी येतात पण आपल्या सरकारचे लक्ष जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही कामानिमित्त महाराष्ट्रात येतात तेव्हा आपले मुख्यमंत्री पंतप्रधानाच्या भेटीला जात नाहीत. महाराष्ट्र राज्य ही पवार आणि ठाकरे घराण्याची जहागिरी आहे काय ?
सुडाचे राजकारण असेच चालू राहीले तर ज्या बिहार आणि उत्तरप्रदेश राज्यांना आपण बिमारू राज्यें म्हणून हिणवीत आहोत, ती आमच्या महाराष्ट्रापेक्षा पुढे गेलेली दिसतील. उत्तर प्रदेशमध्ये फिल्म इन्डस्ट्री ची उभारणी होत आहे. आपण बाॅलीवूड जगताशी सोबती झालो. पण आपली मूलं बाॅलीवूड च्या फिल्म्स पाहून ड्रग्ज, मद्यपान, इझी मनी इत्यादी खतरनाक सर्पाच्या विळख्यात अडकत चालली आहेत. बाॅलिवुड मंडळी ' मुबंईने आम्हांला मोठं केलं ' असे गोड गोड बोलतात पण कोरोना साथीत बाॅलिवूडने मदत केली आहे का, कोंकणातील पूरग्रस्तांना मदत केली आहे का? बाॅलीवुड जगताच्या डाॅनने देशात, मुबंईत बाॅम्बस्पोट घडविले तेव्हा बाॅम्बस्पोटात आपली माणसं अंपग झाली, काही कुटुंब आपला कर्ता गमाविल्यामुळे उध्वस्त झाली. बाॅलीवूड मधील निर्माते, दिग्ददर्शक कलाकार मंडळीनी बाॅम्ब स्पोटात जी कुटंबे रस्त्यावर आली, त्यासाठी काही मदत केली आहे का? आपल्याच सरकारमधील मंत्री ज्यांचे संबंध डाॅनशी आहेत, ते जेलमध्ये आहेत तरी राजीनामा देत नाहीत आणि आपण त्यांना बडतर्फ केलं नाही. डाॅनचा माणूस म्हणून आपण गप्प बसावे ? कुठे गेली आपली हिम्मत? हिम्मत चं सोडा, ती तर सत्ताधारी पक्षाकडे असतेच पण ती वापरण्यासाठी जी लागते ती आपली मती का मंद व्हावी? बडतर्फ करा नवाब मलिकांना. वाट कसली पाहता आहात ? मविआ सत्तेवर येऊन अडीच वर्षे झाली. कोरोना मूळे प्रगती खुंटली हे मान्य आहे पण कोरोना ची सबब किती वर्षे वापरणार?
शिवसेना खलनायक ठरतेय का ?

राज ठाकरे यांचा नवा अवतार - भाग २
मविआ सरकार बद्दल होणार्या ॲन्टी इन्कंबन्सीचा फटका शिवसेनेला तात्काळ पडून नेत्यासकट कार्यकर्ते ही मनसेकडे जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे भाजपा कडे परतीचे दोर कापले गेले आहेत. शिवसेनेने राष्ट्रवादी काॅग्रेस आणि काॅग्रेसशी घरोबा केला तेव्हा मनसे म्हणजे संपलेला पक्ष अशा शेखीत उद्धव ठाकरे वावरत होते. राज ठाकरेंच्या केवळ दोन सभांतून शिवसेनेची पुर्ण स्पेस घेऊ शकतो असे मनसेचे चित्र उभे झाले आहे. शरद पवारांना ही राज ठाकरेंनी केलेल्या टिकेवर उत्तर देण्यासाठी दोन वेळा पत्रकार परिषद घ्यावी लागली. मविआ सरकारचे दोन सर्वोच्च नेते हतबल झाल्यामूळे अजानसाठी लाॅऊड स्पिकरच्या उपयोगासाठी पोलीस खात्याच्या परवानगीची अट घालून तात्पुरता उपाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेला दिसतो. पण असे वेळोवेळी उपाय करीत बसणे मुख्यमंत्र्यांना अशक्य आहे. कारण मविआ मधील काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेस आपल्या मुस्लीम व्होट बँक गमाविण्याच्या कुरापती सहन करणार नाहीत. त्यातही शिवसेनेने सुद्धा अल्पसंख्याकांना गोंजारण्याचे काम सुरू केले आहे. पण त्यात शिवसेनेला यश फारसे मिळणार नसले तरी काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसला शिवसेना हिंदुत्वाकडे झूकत आहे असे कारण सांगून सरकार मधून बाहेर पडण्याची संधी मिळेल. दोन्ही काॅग्रेस पक्ष अशा संधीची वाट पाहात आहेत. दुसरे असे की मुस्लीम जगतात पाकिस्तान तसेच भारतातील मुस्लीमांना जसे दुय्यम स्थान मिळते तसेच आपल्या येथील सेक्यूलर पक्षांच्या कळपात शिवसेनेला उपरे समजलेच जाणार.
राज ठाकरे यांचा नवा अवतार - भाग १
मंगळवार, १२ एप्रिल, २०२२
श्री शरद पवारांच्या घराकडे आलेला मोर्चा आणि त्यावरील चर्चा
आपण व आपले उत्सव--मातृदिन (भाग १)
आपण व आपले उत्सव-- मातृदिन देवीयों और सज्जनो नमस्कार ! हमारी मातृभूमी को देव-देवताओंकी भूमी माना जाता है | इसका कारन हमारे यहाँ सृष्टी हर ...
-
मंडळी, मागील लेखात आपण असुरक्षिततेच्या भावनेपोटी, मनुष्य समूहात राहू लागला आणि नंतर समाज व्यवस्था उभी राहीली, हे पाहिलं. त्याच लेखात स...
-
आज जेष्ठ शु१३ शके १९४२ शिवराज शक ३४७ गुरूवार दिनांक ४जून २०२०. आजच्या दिवशी म्हणजे जेष्ठ शु१३ शके १५९६ अर्थात ६ जून १६७४ रोजी शिवाजी महार...
-
आपण व आपले उत्सव--- रक्षाबंथन (भाग १) नमस्कार मंडळीं, वयोमानानुसार तब्येतीच्या कुरबुरी सुरू होणे हे स्वाभावि...


