मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

सर्वोच्च न्यायालयाचा मविआला तडाखा आणि भाजपाच्या हातीं हातोडा

 


राज्य सरकार आणि केंद्र सरकार मधील बखेडा संबंधीतल्या याचिकेवर न्यायालय, बर्याच वेळी  राज्य सरकारला फटकारते असे मी मागील लेखात म्हटले होते. त्याचे प्रत्यंतर महाराष्ट्र राज्य विधानसभेने भाजपाच्या बारा आमदारांचे केलेल्या निलंबन संबंधीतल्या याचिकेचा सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्यावरून आले आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचा हिसका प्रथमच दाखविला असावा.


कोणाही  व्यक्तीला जनप्रतिनिधी कायद्यानुसार  मिळालेले जनप्रतिनिधीत्व, कुठलेही सरकार ५९ दिवसां पेक्षा अधिक काळ रद्दबादल करू शकत नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. याला एक अपवाद आहे तो म्हणजे निवडणूकीतला विजय गैर पद्धतीने प्राप्त केला आहे असे सिद्ध झाले तर न्यायालय त्या उमेदवाराची म्हणजेच नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री अगदी देशाच्या पंतप्रधानवरील व्यक्तीची निवड रद्द करून पुढे निवडणूक लढविण्यास काही वर्षे प्रतिबंधित करू शकते. माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी ची १९७१ सालच्या लोकसभेच्या निवडणूकीत आचार संहितेचा भंग तसेच काही गैरप्रकार सिद्ध झाल्यामूळे अलाहाबाद हायकोर्टने त्यांची निवड रद्द केली होती.  महाराष्ट्र राज्यांनी गेल्या जुलै महिन्यात भाजपाच्या बारा आमदारांचे केलेले निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. हा निकाल लक्षणिय मानला जातो. उठसुठ सत्ताधारी पक्षाला विधानसभा-विधान परिषद, लोकसभा-राज्यसभा इत्यादी वरील पिठासन अधिकारा मार्फत विरोधी पक्षांच्या आमदार - खासदारांचे निलंबन करता येणार नाही. लोकशाही एक अशी राज्यव्यवस्था आहे की तेथील न्यायव्यवस्था बर्याच वेळा मुजोर सत्ताधारी पक्षावर अंकूश ठेवू शकते हे या निकालाने सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने निर्णय देताना पीठासन अधिकार्याचा हक्काचा आम्ही सन्मान करतो पण ५९ दिवसाहून अधिक काळ जनप्रतिनिधीच्या निलंबनाने ज्या मतदार संघातून जनप्रतिनिधी निवडून येतो तेथील जनतेला एक प्रकारे वार्यावर सोडले जाते हे चूकीचे आहे. हे ही न्यायालयाने आपल्या निकाल पत्रात नमूद केले आहे. याचा अर्थ न्यायालयाने सरकारच्या कारभारात हस्तक्षेप न करता हा निकाल दिला आहे.  या ऐताहासिक निर्णयाने आजच्या राजकीय स्थितीवर विशेषतः महाराष्ट्र, पश्चीम बंगाल, दिल्ली आणि पंजाब मधील राज्य सरकारांनी केंद्र सरकाराशी उभा केलेल्या बखेडावर काय परिणाम होतील, यावर आपण चर्चा करू या. चर्चा अर्थातच राजकीय खेळीं संबंधीत असेल.

वरील नमूद केलेल्या राज्यातील सरकारांचे केंद्र सरकारशी खटके उडत आहेत हे आता जगजाहिर झाले आहे.  त्यामूळे न्यायालयाच्या या ऐताहासिक निकालावर जगभर ही चर्चा होणार आहे. बीबीसीचे  मार्क टूली सारखे जेष्ठ पत्रकार आणि राजकीय अभ्यासक निश्चीतच आपल्या येथील विरोधी पक्षांना झोडपणार आहेत. आपल्या देशात ज्या काही विदेशी शक्तींच्या लाॅब्या आहेत त्यांचे मुकादम बुचकळ्यात पडले असावेत. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी गेली सात वर्षे दाही दिशा मोदी सरकारला सळो की पळो करून सोडत असताना ही पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कमी होत नाही. पश्चीम बंगाल मध्ये नाना क्लृप्त्या लढवून ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या. पण त्यांच्या माथ्यावर पोस्ट इलेक्शन झुंडशाही संबंधी स्वतंत्र चौकशी समितीची टांगती तलवार आहे. ममता बॅनर्जीच्या कार्यकर्त्यांनी जो धुडघूस केला त्यासंबंधी केद्रिय मानवाधिकार आणि राज्यपाल ही स्वतंत्रपणे चौकशी करीत आहेत. या प्रकरणात ममता बॅनर्जीवर फौजदारी खटला ही पुढे-मागे दाखल होऊ शकतो इतकं हे प्रकरण गंभीर आहे.

महाराष्ट्रातल्या बारा आमदाराचे निलंबन रद्द केल्याचा निकाल आला. पण  शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊतांनी या निकालावर प्रतिक्रीया देताना म्हटले की  'आम्ही विधानसभेच्या सेक्रेटरींचे काय मत आहे हे जाणून घेऊ.'  मविआ सरकार मधील कोणी एक नेता बहूधा नवाब मलिक मिडीया समोर येतील आणि म्हणतील ' संजय राऊत हे काही महाराष्ट्र सरकारचे प्रवक्ते नाहीत.' नवाब मलिक इतकं बोलून पत्रकार परिषद मधून आपला पाय काढता घेतील. इतकं मविआ सरकार कोडगं बनले आहे.  महाराष्ट्रातल्या मविआ सरकाराचे वर्तन दादागिरीच्या थाटातले आहे. याचे कारण  'आम्ही वाघ आहोत ' असे विद्यमान मुख्यमंत्री सतत म्हणत असतात. तर  'आम्ही टगे आहोत ' आहोत असे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार अधुन-मधून म्हणत असतात.  वाघाचा शब्दशः अर्थ जंगालातील एक हिंस्त्र पशू तर टगे शब्दाचा अर्थ  साधारणपणे  गुंड  हा असावा. मग यांना समजाविणार कोण? 

तिथे पश्चीम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना मोदी, भाजपा आणि संघ विरोधी मिडीयाने वाघिण ही उपाधी दिली आहे. त्यामूळे त्यांचे ही वर्तन दादागिरीच्या थाटातलेच असते. पश्चीम बंगाल मध्यें विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर हिंदु बांधवावर जे अमानुष अत्याचार झाले, त्यावर ममता बॅनर्जींनी ' या हिंसाचाराला निवडणूक आयोग जबाबदार आहे,  कारण माझा शपथविधी झाला नव्हता ' अशी प्रतिक्रीया दिली होती. तीच प्रतिकीया आता त्यांना नडणार आहे. त्यांच्या अंहकाराचा आकार इतका विस्तारला आहे की, राष्ट्रीय पातळीवर  सर्वानुमते आपण विरोधी पक्षाचे प्रमुख बनु आणि मोदी सरकार तसेच न्यायालयाचे ही धाबे दणाणून सोडू अशा थाटात त्या राष्ट्रीय पातळीवर राजकारण करण्यासाठी कलकत्त्याच्या बाहेर पडल्या. परंतु काॅग्रेस सकट सर्वच विरोधी पक्षांनी त्यांना अप्रत्यक्ष रित्या कात्रजचा घाट दाखविला. गमतीचा भाग असा आहे की ज्या मिडीयाने ममता बॅनर्जींना आक्रमक, झुंजार वाघिण या पदव्या दिल्या तीच चॅनल्स काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस, अखिलेश, शिवसेना, डावे पक्ष इत्यादींचे समर्थक आहेत. म्हणजे भाजपा विरोधी मिडीया विरोधी पक्षांशीच डबल गेम खेळतेय. पण त्यात मिडीयाचा दोष नाही.  कारण त्यांचे मुकादमच बुचकळ्यात पडले आहेत हे मी वर नमुद केलेले आहेत. पश्चीम बंगाल मध्ये ममताला उभरती हुई प्रधानमंत्री असे सर्टीफिकेट दिले. बिहारमधील नितीशकुमारला भावी पंतप्रधान म्हणून गौरविले. ते थकले आणि आता भाजपाने दिलेले मुख्यमंत्रीपद घेतले आणि निवृत्त होतील. बिहारमध्यें तेजस्वी यादवला प्रोजेक्ट केले पण शेवटी भाजपाने थेट तेजस्वी यादवाच्या पक्षाच्या आमदांरची संख्या गाठली.  आता अखिलेश यादवाची लाट आहे असे प्रोजेक्शन करीत आहेत. काही भाजपा विरोधी संपादक आणि पत्रकार असे आहेत की  ते स्पष्टपणे भाजपाच उत्तर प्रदेशमध्ये बाजी मारणार असे सांगतात. 

प्रमुख विरोधी पक्षांनी ममता बॅनर्जीना प्रतिसाद नाकारल्यामूळे  ममता बॅनर्जीना आपण वाघीण तर नाहीच पण वाघाची मावशी सुद्धा नाही हे कळले असावे. निदान खर्या वाघाच्या मावशीला म्यांव, म्यांव अशी विनविण्याची भाषा तरी जमते. तो प्रकार ममता बॅनर्जीना कसा जमणार ? आणि जमला तरी समोर दया-माया करणारा वाजपेयी-अडवाणीचा भाजपा नाही. आताचा भाजपा पश्चीम बंगालमध्यें एक तगडा विरोधी पक्ष म्हणून उभारून आला आहे. त्यामूळे ममता बॅनर्जींची अवस्था निदान राष्ट्रीय पातळीवर अडगडीत पडल्या सारखी झालेली दिसेल. ममता बॅनर्जींनी दिल्लीत प्रथम पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यावेळी त्या फारशा दबावाखाली नसाव्यात पण पंतप्रधान मोदींनी  त्यांचा पक्ष पुर्वीच्या एनडीएचा घटक होता ही आठवण करून देत बंगाल मधील हिंदुवर झालेल्या अत्याचारांबद्दल कडक शब्दात नाराजी व्यक्त केली असणारच. अशा भेटीतला तपशील बाहेर येत नसतो. आता सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दिलेल्या निकालामूळे आपल्याला ही असाच फटका न्यायालया तर्फे मिळेल या भितीने ममता बॅनर्जी ग्रासल्या जाणार आहेत.  राजकारणात कोर्टाने फटकारलेल्या पक्षाला नेस्ताबूत करण्याची संधी सत्ताधारी पक्ष सोडत नसतो. विद्यमान केंद्र सरकार सुडाच्या भावनेने नव्हे तर पश्चीम बंगालमधील हिंदु समाजावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी निश्चीतपणे प्रयत्नशील राहील. यात राजकारण तर राहणारच आहे. कारण सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीतल्या प्रचारासाठी भाजपाला ममता बॅनर्जीनी आयतेच धृवीकरण करून दिलेले आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांचा नेता बनण्याची इच्छा झालेली नसावी. पण ते अशा तोरात वागत आहेत  की दिल्लीतील मोदी सरकार फक्त त्यांच्या पाठींब्यावर अवलंबून आहे. वाजपेयी सरकारच्या काळातल्या मिजाशीत राहणार्या चंद्राबाबू नायडूंची मोदी सरकारने औकात काय आहे हे दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर  विधान सभेत जाण्याऐवजी  मागच्या दारातून विधान परिषदेचे सदस्यत्व स्विकारले. ते ही राज्यपालांच्या कोट्यातून. असा हा आगळा वेगळा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री. पाच वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्तेचा उपभोग घेऊन सतत मोदी सरकारवर टिका केली पण विधानसभेतील आपल्या पक्षाचे बळ पंच्चावन्न संख्येच्या पुढे गेलं नाही ते ही भाजपाशी युती करूनही.  याचे कारण शिवसेनेची दानत लोकांनी तेव्हाच जोखली होती. आता तर स्वपक्षातील बडे नेतेच मुख्यमंत्र्यावर टिका करू लागले आहेत. सरकाराचा कारभार मुख्यमंत्री चालवत आहेत असे जाणवतच नाही. एक तर त्यांना संसदिय कार्याचा बिलकूल अनुभव नव्हता आणि अजूनही फारसा अनुभव आल्याचे दिसत नाही. कारण ते कोणाकडून काही शिकण्याचा प्रयत्न करीत नाहीत. करणार तरी कसे हो ? घराणेशाही पक्षातील बहुतांश नेत्यांची स्थिती अशीच असते.  आपण मुख्यमंत्री झालो आहोत हे भान आलेच नसेल तर वर्तनात प्रगलभता तरी कशी दिसेल? दिसते ती फक्त भाजपा बद्दलची द्वेषाची परिसीमा ! प्रगलभता येण्यासाठी अभ्यास करावा लागतो. सतत उठसूठ ठोकशाहीची भाषा करणार्यांना कायद्याच्या चौकटीत अलगदपणे अडकविणे सोपे असते. हे सत्य फक्त सत्तेच्या खेळातच आहे असे नाही. जिथे जिथे स्पर्धा आहे अशा सर्वच क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात या सत्याचा अनुभव येत असतो. कमालीचा संयम दाखवून मोदी सरकारने मविआ सरकारला हवे तसे म्हणजे अलगत अडकविले आहे. या संकटाची सारी जबाबदारी उद्धव ठाकरें आणि भास्कर जाधवांवर टाकून राष्ट्रवादी काॅग्रेस आणि काॅग्रेस पक्ष मोकळे झाले तरी त्यात आश्चर्य वाटणार नाही. शेवटी जी अवस्था ममता बॅनर्जीची झाली आहे तीच अवस्था शिवसेनेची होईल. कारण  सुप्रिम कोर्टाने बारा आमदारांचे निलबंन रद्द करून भाजपाच्या हातात ३५६ कलम वापरण्याची अप्रत्यक्ष रित्या परवानगी दिली आहे. आता पुढे काय होणार ? मविआ सरकारला कोमातच ठेवावे की बरखास्त करावे हे आता सर्वस्वी मोदी-शहांवर अवलंबून आहे. मोदी-शहांचा आजचा भाजपा काय क्लुप्त्या लढवतिल यांचा अंदाज देश- विदेशातील  प्रभावशाली डाव्या आणि उजव्या विचारांच्या स्ट्रॅटेजिंयन्सनां लागत नाही तर आपण काय अंदाज वर्तविणार ?

सुश्री ममता बॅनर्जी सरळ तिसर्या खेपेला निवडणूका जिंकून मुख्यमंत्री झाल्या असल्या तरी आता देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी त्यांना तोंडघाशी पाडल्याने त्या एकाकी पडण्याची शक्यता आहे. काॅग्रेस आणि डाव्या पक्षांनी काही अंशी गेल्या विधानसभेच्या निवडणूकीत ममता बॅनर्जीना रान मोकळे ठेवले होते,  तसे सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीत ते करणार नाहीत. ते दोन्ही पक्ष युती करून मोदी सरकारशी झुंज देतील.  ममता बॅनर्जीची न्यायालयाच्या निर्णयाने हिंदुविरोधी जी प्रतिमा झाली आहे त्याचा फायदा काॅग्रेस घेऊ इच्छीत असेल तर कदाचित काॅग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल आणि त्यासाठी राहूल गांधीनीं जानवे आणि प्रियंका गांधी वाड्रानीं साडी तयार करून ठेवली असणार. एकंदरीत पश्चीम बंगालमध्ये लोकसभेची निवडणूक ही तिरंगी लढत दिसेल. ममता बॅनर्जींचे दुखणे असे आहे की त्या मोठेपणा दाखवून लोकसभेच्या कमी जागा घेऊन काॅग्रेस किंवा डाव्या पक्षाशी युती करेल असे संभवत नाही.

पश्चीम बंगालमध्ये भाजपाने जसे स्थान पटकावले तसे पंजाब मध्ये मिळविण्याचा प्रयत्न करेल असे मी एक-दोन वर्षापुर्वी म्हटले होते.  पंजाब हे सिमावर्ती राज्य असल्याने भाजपाला आपले स्थान नगण्य असल्याचे शल्य टोचत होते. पंजाब मधील बादल घराणेशाहीमुळे अकाली दलाची विश्वासाहर्ता कमी होत जाईल असा कयास भाजपाने बांधला होताच. पंजाबात अकाली दलाच्या नेत्यांचे  सधन शेतकरी- दलालांशी हितसंबंध गुंतले असल्यामुळे कृषी बिलांना विरोध करीत तो पक्ष स्वतःहून एनडीए मधून बाहेर पडला. एका परिने सुंठीवाचून खोकला गेला असे भाजपाच्या धोरण कर्त्यांना वाटले असावे. दरम्यान शेतकरी आंदोलनात काॅग्रेसने पडद्या मागून नवज्योतसिंग सिध्दुच्या भरवशांवर खलिस्तानचे वर्चस्व निर्माण केले. त्यातून गेल्या वर्षी लाल किल्ल्यावर आंदोलक शेतकर्यांनी केलेल्या तमाशामुळे विना सायास  भाजपा सारख्या राष्ट्रवादी पक्षाच्या हातात धारदार तलवार मिळाली आहे. शिवाय अलिकडे पंजाबात पंतप्रधान मोदींच्या दौर्यात घडलेल्या घटनेमूळे काॅग्रेसची स्थिती कमकुवत होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यातच काॅग्रेसने पंजाब मध्ये कॅप्टन अरमिंदरसिंगांना मुख्यमंत्री पदावरून हटवून स्वतःसाठी खड्डा खणला. ज्या नवज्योतसिंग सिद्धूवर काॅग्रेस भरोसा ठेवते आहे असे दिसत असले तरी सध्या काॅग्रेस आणि नवज्योतसिंग सिद्धू मध्ये बिनसले आहे. दोघांत शह-प्रतिशहाचा खेळ सुरू झाल्याचे ऐकू येत आहे. पंजाब मध्यें अकाली दलातील नेते अकाली वार्धक्याच्या भितीने त्रस्त होऊन भाजपात सामिल होतील असा अंदाज मी मागील लेखात दिलेला आहे. तो खरा ठरताना दिसतोय. तेथिल काॅग्रेसजनात ही श्रेष्ठीं बद्दल असंतोष दिसत आहे. असे काॅग्रेसजन भाजपाशी आणि कॅप्टन अरमिंदरसिंगाशी हात मिळवित आहेत. भाजपा तिथे ही जम बसवू शकेल. पंजाबात भाजपा आणि कॅप्टन  Say No to Drugs and No to Khalistan अशी घोषणा करीत प्रचारात आघाडी घेईल. भाजपा अकाली दलावर फारशी टिका करणार नाही. आप या पक्षावर मोठी टिका करून त्याचे महत्व फारसे वाढू न देणे ही भाजपा व कॅप्टनची रणनिती राहील असे वाटते.

दिल्लीतील केजरीवाल सरकारला कोरोनाच्या साथीत ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून भाजपाशी निष्कारण तंटा निर्माण केल्यावर कोर्टाने ऑक्सीजन च्या स्टाॅकचे ऑडीट करण्याची धमकी दिली होती. याची केजरीवालांना आठवण असणारच. भाजपा कायदेशीर लढाईत वाकबगार आहे हे तेव्हाच सिद्ध झाले आहे. केजरीवाल ऑक्सीजनचा काळा बाजार करीत होते ही बाब निवडणूकीच्या काळात जनतेसमोर आणण्याचे तंत्र भाजपाने विकसित करून ही ठेवलेले असणार. त्यामूळे  सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीत आप पक्षाच्या हाती काही लागणार नाही. उत्तर प्रदेशातील विधानसभेचा निवडणूक प्रचार शिगेला पोहचू लागला आहे. तेथील विभिन्न ओपिनियन पोल भाजपा सत्तेवर येणार हेच दाखवित आहेत.  साधारणतः सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीत उत्तर भारत, मध्य भारत, पश्चीम भारत आणि  ईशान्य भारत भाजपाच्या पाठिशी उभा राहणार आहे.

दक्षिणेतील पक्षांच्या जोरावर तर मोदी सरकारने तीन तलाक आणि घटनेतील ३७० कलम हटविले आहे. त्यामूळे तेथील पक्ष आपलं स्वतंत्र अस्तित्व राखून ठेवतील. दुसरे कारण असे आहे की तेथील मुख्यमंत्र्यांना मोदीशी टक्कर देऊन पंतप्रधान बनण्याची इच्छा असली तरी ताकद नाही हे वास्तव ते जाणून आहेत. उगीच आपण कशाला देवेगौडा बनावे अशी त्यांची मानसिकता असणार. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इतकं साधं राजकारण समजत नाही असे म्हणता येत नाही. पण भाजपा संबंधी आत्यंतिक द्वेषाने ते सैरभैर झाले असावेत. म्हणून तर कोर्टाचा असा तडाखा तो ही कानाखाली खावा लागला. वाईट वाटते कारण ते स्वर्गीय बाळासाहेबांचे सुपुत्र ! पण आपण काय करू शकतो?  विनाशकाले विपरीत बुद्धी !

आपण म्हणाल सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीतला अंदाज या क्षणाला वर्तवून तो खरा ठरेल हे कशावरून सांगता आहात ? याचे महत्वाचे कारण म्हणजे शेखर गुप्ता सारखे डावे विचारवंत ही प्रांजळपणे म्हणतात की पंतप्रधान मोदीच्या लोकप्रियतेत घट होतच नाही. इतकेच काय तर बेकारी, महागाई  हे विषय निवडणूकाचे मुद्दे होत नाहीत. त्यातही पंतप्रधान मोदींजीनी अशा काही योजना गरीबांसाठी राबविल्या आहेत त्या पुर्वी कधीच अंमलात आणल्या गेल्या नव्हत्या. शेखर गुप्तांनी प्रिन्ट नावाच्या चॅनलवर तर  Modi -Shah are leftist in Rightists  या शिर्षकाचा एक विडीओ पब्लीश केलेला मी ऐकला आहे. गेल्या सात वर्षात मोदी सरकाने ज्या कल्याणकारी योजना अंमलात आणल्या त्या संबंधीची माहिती शेखर गुप्तांनी त्या विडोओत दिली आहे. आताच्या  मोदी- शहांच्या भाजपाचे संघटन कार्य किती व्यावसायीकतेने होते या संबंधितल्या एका विडीओ वर त्यांनी बुथ पातळी पासून ते थेट केंद्रीय स्तरावर पर्यंत कसे नेटवर्क तयार केले आहे  याचे पुर्ण वर्णन शेखर गुप्तांनी दिले आहे.  भाजपा हा एकच असा राजकीय पक्ष आहे ज्याने आजच्या तंत्रज्ञान युगाचा उचीत उपयोग करीत आहे असे ही शेखर गुप्तांनी म्हटले आहे.  दुसरी कडे आजतकचे  प्रभू चावलांने उत्तर प्रदेशच्या निवडणूकीचा ओपियन पोल संबंधी म्हटले आहे की मतदार फक्त मोदी आणि योगी या जोडीला पाहूनच मतदान करणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. म्हणून निवडणूकीच्या निकाला संदर्भात चर्चा करण्यात ही काही अर्थ राहिला नाही अशी विवशतेने टिपण्णी प्रभू चावलांनी केलेली मी ऐकली आणि पाहिली आहे.

या लेखात सन २०२४ च्या निवडणूकी नंतर लोकसभेचे काय चित्र असू शकेल हे आता या घटकेला देण्याचे कारण काय असा आपल्याला प्रश्न पडला असेल.  कारण असे आहे की देशातील राजकारणाच्या केंद्र स्थानी भाजपाच झालेला आहे. दुसरे असे की विरोधी पक्षातील जे काही नेते आहेत त्यांचा प्रभाव राष्ट्रीय पातळीवर पडत नाही. नितीश कुमार पंतप्रधान होण्याच्या मार्गावर जात असतांना थकून गेले आणि शेवटी भाजपाने दिलेले बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवून ते निवृत्ती घेतील.  शरद पवार यांच्या पुढाकाराने साकरलेले मविआ सरकाराला सुप्रीम कोर्टाने नुकताच एक तडाखा दिला आहे.  त्यामूळे मोदी सरकार कधीही कलम ३५६ लावून महाराष्ट्रातले सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावतील. जो पर्यंत सत्तेवर आहेत तो पर्यंत महाराष्ट्रातील मविआ पक्षात एकी राहील. नंतर ती एकी नष्ट होईलच पण सोबत मविआतील नेते ही भाजपात जाऊ लागतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरें यांची कारस्थाने उजेडात आणण्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणली जाईल. जसजशी कारस्थाने उजेडात आणली जातील तसतशी महाराष्ट्रातील काॅग्रेस नरो वा कुंजरो अशी भुमिका घेत आपल्या पक्षाचे महाराष्ट्रातील स्थान शाबूत करण्याचा प्रयत्न करेल.

काॅग्रेसची ताकद उत्तर प्रदेशाच्या निवडणूक निकाला नंतर संपेल असे नाही. पण पराभव तर निश्चीतच आहे. त्यामूळे महाराष्ट्रातील काॅग्रेसचे काही नेते भाजपाचा आश्रय घेतील. आणि भाजपा त्यांना आश्रय देईल. कारण राष्ट्रवादी काॅग्रेसचे बळ वाढविण्याचा नसता उद्योग भाजपा करणार नाही.  असे असले तरी  गांधी घराणे हार मानणार नाही. कारण भाजपाशी लढू शकेल असा काॅग्रेस एकच पक्ष आहे असे भासविण्यात काॅग्रेसला इतर विरोधी पक्षांपेक्षा अधिक यश मिळत असते. या शिवाय राहुल गांधी आणि प्रिय॔का गांधी-वाड्रा तरूण आहेत. म्हणून जितकं राजकारणात तरता येईल तितकं तरत राहावे हीच त्यांची भुमिका राहील. उत्तर प्रदेश मध्ये काॅग्रेस स्वतंत्र रित्या निवडणूक लढवित आहे. यातून काॅग्रेस केंद्रातील सत्तेसाठी उतावळी झाली नाही, आणि अजून दहा वर्षे थांबायला तयार आहे असे दिसते.  सोबत काॅग्रेस इतर पक्षांना दाखवू इच्छीत आहे की भाजपा प्रत्येक प्रान्तात आपली शक्ती वाढवित असल्याने तुमचे पक्ष तरी कुठे  टिकणार आहेत ? आमचा पक्ष राष्ट्रीय आहे, तुम्हांला काॅग्रेसचीच गरज लागेल. यात तथ्य आहे. काॅग्रेसची हीच भाषा साम्यवादी चीन सुद्धा आपल्या कडील चीनच्या शिष्यांना सांगत असेल. म्हणूनच पश्चीम बंगालमध्ये डावे पक्ष काॅग्रेसशी युती करीत असते. अलिकडे तर कन्हैय्याने मला काॅग्रेसची गरज आहे असे काॅग्रेस मध्ये प्रवेश करताना म्हटले आहे. तो एक प्रयोग आहे, जो चीनशी काॅग्रेस पक्षाने केलेल्या करारानुसार असू शकतो.

एकंदरीत सर्वोच्च न्यायालयाच्या महाराष्ट्रातील आमदारांच्या निलंबन सबंधितल्या याचिकेवरील निर्णयाने देशातील राजकारणावर दुरगामी परिणाम होतील. राजकारणातील मोदी द्वेष कमी होताना दिसेल अशी आशा बाळगतो.  आम्ही राजकारणात भाजपाला धोबी-पछाड करू हा विरोधकांचा समज जवळपास संपला आहे. मोदी सरकार राजकारणात पटाईत आहेच पण कायदेशीर लढाईत ही तरबेज आहे. असा अनुभव आपल्या येथील विरोधी पक्षांना येतोच शिवाय शेजारील शत्रू देशांना ही येतो.

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

देशांतर्गत राजकारण घातक वळणावर ? (भाग - २)



लेखाच्या या भागात देशातील तीन राज्यांनी म्हणजे महाराष्ट्र, पश्चीम बंगाल आणि दिल्ली राज्याने  संघराज्य  रचनाचा आडोसा घेऊन केंद्र सरकारशी निर्माण केलेल्या बखेडाचे देशपातळीवरचे स्वरूप काय आहे यावर चर्चा करणार आहोत. या बखेडासंबंधी हायकोर्ट स्तरावर आणि सुप्रीम कोर्टातून जे काही प्राथमिक शेरे आले आहेत ते तिन्ही राज्यांना खडसावणीच्या प्रकारात मोडतात. त्यामूळे ही तिन्ही राज्यें बॅकफूटवर गेली आहेत. त्या संबंधीत या लेखात चर्चा नको करू या. सदरहू बखेडाची देशपातळीचे स्वरूप आणि कारणे यावर एकत्रीत चर्चा करू या. चर्चा अर्थात ढोबळच राहील.

१) मोदी, भाजपा आणि संघाबद्दलचा द्वेष. सध्या मोदींचे सरकार असल्यामूळे हे प्रमुख कारण आहे. जसे केंद्रात सरकार बदलले की बखेडाचं कारण आणि स्वरूप बदलते, अगदी त्याच पक्षाचे पण पंतप्रधान पदावरील व्यक्ती बदलली तहीही बखेडाचे स्वरूप बदलू शकते.

२) सत्ता स्पर्धा. सत्तेशिवाय शहाणपण नाही असे राज्यशास्त्रात म्हटलेले नाही पण राजकारणात ते मानले गेले आहे आणि आचारणात आणून बोलून ही दाखविले जाते.  राज्यशास्त्रात सत्ता हे नागरिकांच्या मूलूभूत हक्क आणि गरजा, सुरक्षा अंतर्गत आणि बाह्य,  कायदा व सुव्यवस्था, महसूल, महसूलचा विनियोग, आरोग्य, शिक्षण, उद्योग जवळपास जीवनाची निगडीत सारे विषय तसे प्रशासन विकास इत्यादी कार्ये पार पाडण्याचे माध्यम आहे. पण सत्तेतुनही सत्ता मिळु शकते ही राजकीय पक्षांनी रूजविलेली पद्धत आहे.

३) विचारधारा - विचारधाराच्या कसोटीला उतरणारे तीनच पक्ष भारतात आहेत. भाजपा, काॅग्रेस आणि साम्यवाद. विद्यमान केंद्र सरकार विरोधातला बखेडाचं स्वरूप काॅग्रेस आणि साम्यवाद आणि मित्र पक्ष एका बाजूला विरूद्ध  भाजपा ज्याला हिंदुत्ववादी पक्ष म्हटले जाते. विचारधारा किंवा विचारसरणी वरून उडणारे खटके हे राजकीय पक्षात होत असतात. ते केंद्र सरकार विरूद्ध राज्य सरकार अशा खटक्यांचे स्वरूप भासले तरी त्याला संविधानाचा बिलकूल आधार नाही. म्हणून बहुतांश वेळी न्यायालय राज्य सरकारांना फटकारते.  

४) या प्रकारातील कारणें छोटी-मोठी अनेक असतात. त्यात प्रासंगिक, प्रान्तीय अस्मिता, मानापमान, विभागिय असमोतल, इत्यादी या प्रकारात मोडतात.

५) राजकीय पक्षांत रूजलेली घराणेशाही हे एक कारण ज्यामूळे पक्षांतर्गत दुही माजते.

६) सर्वात महत्त्वाचं महत्वाचं जे आपल्या सारख्या जनसामान्यांनी फक्त ऐकलं आहे पण दिसत नाही. ते म्हणजे सत्तेत केलेल्या भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशाचा हिस्सा. प्रिन्ट आणि ईलेट्राॅनिक्स मिडीयाला हे कारण दृष्टीस पडते.  मिडीया आपल्या समोर ही माहिती पुरविते पण त्यांच्या सुत्राचा हवाला देऊन. गंमत अशी आहे की मिडीयाचं हे सुत्र नावाचं अपत्य अदृश्य असते. या बखेडाचं अस्तित्व पक्षांतर्गत असते, प्रशासनांतर्गत,  कधी ते देशाच्या सिमाही ओलांडत असते. आता आपण विद्यमान केंद्र -राज्य  बखेडाचं प्रान्तशः स्वरूप पाहू या.
    
सन २०१४ पासून केंद्रात मोदी सरकार अस्तित्वात आले आहे. पुढे इशान्य कडील काही राज्यात तसेच पश्चीम बंगालतही भाजपाने बस्तान बांधले. त्यामूळे तेथील वाम पंथीय मंडळी बेकार झाली आहे. सत्तेच्या राजकारणात त्यांचा आवाज बंद झाला आहे. पण नक्षलवाद, लिबरल विचार तसेच जशी सोय होईल तशी ख्रिस्ती, खलिस्थानी, चीन, जिहादी, पाकिस्तान इत्यादी लाॅब्यांचा उपयोग करण्यात ही डावे मंडळी माहीर आहेत. फक्त माहीर राहिले असते तर फारसं आक्षेपार्ह नसते पण त्यांची ती खोडच झाली ही देशाला सर्वात धोकादायक आहे.

दक्षिणेत भाजपा फक्त कर्नाटक मध्ये जम बसवू शकली आहे. पण दक्षिणेत इतर जे काही पक्ष सत्तेवर आहेत ते काही भाजपाचे मित्र नाहीत. तरीही २०१४ पासून दक्षिणेकडील राज्य सरकारांनी केंद्रातील मोदी सरकारशी कुठल्याही प्रकारचा मोठा तंटा उभा केलेला आढळत नाही. वाजपेयीच्या सरकारात आंध्र प्रदेशातील तेलगू दसमाच्या चंद्राबाबू नायडूंनी कुठलाही बखेडा उभा केला नाही. पण आपला फायदा धुर्तपणे घेत राहिले. पण देशात राजकीय अस्थितरता येईल आणि देवगौडाप्रमाणे आपल्याला पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी मिळेल अशी आशा बाळगित मोदी सरकारशी बखेडा उभा केला. त्यात तेच नामशेष झाले. अगदी केरळ आणि तामिळनाडूत कट्टर भाजपा विरोधी पक्षांचे सरकार आहे. पण ते ही केंद्र सरकारशी उघड असा प्रशासकीय बखेडा उभा करताना दिसत नाहीत. त्यातीही तामिळनाडूत प्रांतीय अस्मितेचे पक्ष असल्यामूळे, केंद्रातील सरकार मग  भाजपाचे असो वा काॅग्रेसचे आपआपल्या परीने मैत्री करून मोकळे होतात.

केरळ मध्ये कट्टर भाजपा विरोधक अशा डाव्यांचे सरकार आहे. तसे पाहता कम्युनिस्टांचे लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले केरळ हे पहिले राज्य आहे. वर्तमान मुख्यमंत्री पिनराई विजयन याची ही सलग दुसरी टर्म आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिथे जिथे विधायक कार्य उभे राहीले अशा सर्व ठिकाणी भाजपाचा बेस वाढतो असा सार्वत्रिक अनुभव आहे. केरळ मध्यें संघाचे कार्य चांगले उभे राहीले आहे. पण त्रिपुरा आणि आसाम सारख्या ईशान्येकडील राज्याप्रमाणे केरळ मधील भाजपा फायदा घेण्यात कमी पडला. या संबंधीची कारणे काय आहेत हे साप्ताहीक विवेकाच्या दिवाळी अंकात श्री प्रसाद देशपांडे यांनी आपल्या लेखात  केरळ राजकीय हिंदुत्वाचे ' प्रलंबित प्रतिक्षालय ' या शिर्षकाच्या लेखात सविस्तरपणे  मांडली आहेत. प्रसादजींचा हा लेख वरून पाहता केरळमधील गेल्या वर्षाच्या निवडणूक निकालांच्या विश्लेषणाचा वाटतो आणि तसा तो आहे. पण त्या लेखातील  केरळमधील सांस्कृतिक जीवना संबंधीचे वर्णन वाचून मुर्तीमंत केरळ आपल्या दृष्टीसमोर येते. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, संघटनशास्त्र, व्यवस्थापन शास्त्र इत्यादी क्षेत्रात काम करणार्यांनी, तसेच विद्यार्थ्यांनी हा लेख वाचावाच तसेच आपल्या सामान्यज्ञानात भर होते म्हणून सर्वांनीच वाचावा.  प्रसादजींनी हातचे काही न राखता कम्युनिस्ट पक्षाचा विजयासंबंधी माहिती देताना कौतूक ही केले आहे. अशी खिलाडू वृत्ती साम्यवादी तसेच काॅग्रेस सह इतर मित्र पक्ष कधी दाखवू लागतील? 

अलिकडे पिनराई विजयनजी संबंधी कुठेतरी Rightist in Left असे वाचल्याचे आठवते. पिनराई विजयनजीं आर्थिक उदारीकरण आणि गुंतवणूकीवर भर देऊन विकासाची कामें करीत आहेत. अपेक्षीत यश मिळाल्यामूळे केरळचे हे मुख्यमंत्री  गांजलेल्या पण तरीही केडर पार्टी अशी ओळख असलेल्या भारतातील डाव्या पक्षात '  मी करीन तो कायदा आणि तोच फायदा ' अशी स्वतःची प्रतिमा करण्यात यशस्वी झाले आहेत.  नेता ऊदयास आला आहे. मग ते  केंद्र सरकारशी अकारण कुचेष्टा का करेल, आणि जी काही परकीय गुंतवणूक आणण्यासाठी केंद्र सरकारशी सहाय्यता लागेल ती घ्यावी, अशी त्यांची मानसिकता झाली असावी.  कदाचीत डाव्या पक्षांची स्थिती पुर्णपणे ढासळत असताना, ते ही  तामिळनाडूतील घराणेशाही सारखा स्वतःचा पक्ष तयार करण्याच्या स्थितीत असावेत असा माझा अंदाज आहे. कारण घराणेशाही हा संसर्गजन्य रोग आहे.  शेवटी ते कट्टर डाव्या पक्षाचे त्यामूळे निर्णायक घटकेच्या वेळी केरळला  केंद्र सरकारच्या विरोधातील बखेडात दाखल करतील ही.  कारण भारतातल्या डाव्या पक्षांचे माय-बाप विदेशी आहेत.  दक्षिण भारतातील पादूंचारीत तर भाजपाचे सरकार आहे. त्यामूळे तंटाचा प्रश्न नाही. 

आन्ध्र आणि तेलगंणात काॅग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या जगनमोहन रेड्डी आणि वायएसआरचे चंद्रशेखर राव यांची सत्ता आहे. या दोघांची राजकीय विचारसरणी भाजपा विरोधी असली तरी सध्यातरी ते आपापल्या राज्यात जम बसविण्याच्या तयारीत असल्यामूळे केंद्र आणि राज्य सरकार मधील संविधानिक नात्याची मर्यादा सांभाळून आहेत. ओरिसा मधील बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक इतकी वर्षे कारभार चालवित आहेत, पण त्यांनी ही केंद्र सरकारशी भांडण केल्याचे ऐकीवात आले नाही. ओरीसाचे भौगोलिक स्थान हे दक्षिण भारत, उत्तर भारत, आणि पुर्व भारताच्या संगमाचे स्वरूप ठरल्याने ' आपण बरे आपले काम बरें ' हाच त्यांच्या राजकारणाचा बेस बनला आहे.  ३७० कलम, तिन तलाक इत्यादी बिलें राज्यसभेत भाजपाचे बहुमत नसातांना पास का झाली या प्रश्नाचे दडलेले उत्तर या तिन प्रमुख राज्याकडून प्राप्त झाले आहे.

गाय हा प्राणी असला तरी आपल्या देशाच्या प्रत्येक प्रांतात तिला गोमाता मानले जाते. तरी उत्तर भारताला काऊ बेल्ट मानले जाते. अर्थात ही संज्ञा ब्रिटीश राज्यकर्त्यांने जाणून-बूजून वापरात आणली. त्या मेकाॅले शिक्षण पद्धतीच्या मानसीक गुलामीतून आपण पुर्णतः बाहेर पडलो नाही. एक हजार वर्षाहून अधिक काळ देश गुलामीत आणि नंतर नेहरू-गांधी घराण्याच्या सत्तेत राहिलो. काॅग्रेसला आहोटी लागल्यानंतर काॅग्रेस फुटू लागली आणि भारतभर वेगवेगळ्या घराणेशाहीचे पक्ष निर्माण झाले आहेत. घराणेशाही संबंधीत एक नैसर्गिक सत्य असे आहे की तिसर्या पिढीनंतर त्या घराण्यात उपजत होणारी संतती तितकी विद्यावान आणि  कर्तृत्ववान राहात नाही. हे सत्य प्रत्येक क्षेत्राला लागू पडते. सन १९८९ च्या लोकसभा  निवडणूकीत राजीव गांधीच्या सरकाराचा पराभव झाला आणि काॅग्रेस नावाच्या पक्षाची राजकारणातील सद्दी संपली.  तसे पाहता काॅग्रेसचे स्वरूप स्वातंत्र्यानंतर सुलतानशाहीच्या सुभेदार पद्धतीचे मिळते-जुळते होते. म्हणूनच महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यानंतर काॅग्रेस विसर्जीत करावी असा सल्ला दिला होता. पण सुभेदार आणि वरील पातळीवरील अंमलदारांनी तो सल्ला धुडकावून लावला.

नेहरू-गांधी परिवाराच्या जवळपास प्रत्येक सदस्यांनी  निवडणूका उत्तर प्रदेशातून लढविल्या होत्या. त्यानंतर सोनिया आणि राहूल गांधीनींही उत्तर प्रदेशातून निवडणूका लढविल्या. म्हणूनच उत्तर प्रदेशात अनेक घराण्यांच्या, जाती प्रमुखांच्या पक्षांची भाऊगर्दी  झालेली दिसते. हा ही संसर्गाचा परीणाम.  ही सारी मंडळी काॅग्रेस नावाच्या गब्बर घराणेशाहीच्या पक्षातील संस्कारातून वाढलेली, पण २०१७ सालच्या निवडणूकीत भाजपाने सर्वांचे कंबरडे मोडले. आता त्याच उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. पण भाजपाच तिथे सत्ताधारी असल्यामूळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये तंटा उभा राहिलेला नाही. राजस्थान मध्यें काॅग्रेसचे सरकार आहे पण तिथे काॅग्रेसमध्येच दुफळी असल्यामूळे तेथील मुख्यमंत्री अशोक गेहलोतांची शक्ती सचीन पायलटांना नामोहरम करण्यात खर्च होत आहे. छत्तीसगड मध्यें ही काॅग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश वाछेल हे जेष्ठ नेते टीएस सिंहदेव यांनी निर्माण केलेले आव्हान परतावून लावण्यात गर्क आहेत. या दोन्ही राज्यातील सत्ताद्वारें काॅग्रेस केंद्र सरकाराशी बखेडा उभा करू शकत नाही. कारण आहे ती सत्ताही  मध्यप्रदेश प्रमाणे गमाविण्याचा धोका आहे.

पंजाब मध्ये काॅग्रेसची मजबूत सत्ता आहे. त्यात ही ते राज्य पाक सिमेवर आहे.  तिथे दिल्लीतील किसांनाच्या आंदोलनाच्या नावाखाली पाक, चीन आणि  कॅनडा सारख्या विदेशी शक्तीच्या साह्याने काॅग्रेसने खलिस्तान चळवळ पुनरूज्वीत करण्याचा घाट घातला आहे आणि काॅग्रेसने आपल्या कॅप्टनलाच गमाविले. खलिस्तान चळवळ पुनरूज्जीवीत करण्याची जबाबदारी नवज्योत सिद्धूकडे आहे आणि मुख्यमंत्री चन्नी फक्त प्यादे आहेत असे ऐकीवात आहे. पंजाब मध्ये जे घडले ते काॅग्रेस श्रेष्ठींच्या आदेशाने घडले आहे असे चौकशीत निष्पन्न झाले तर काॅग्रेस राष्ट्रीय स्तरावरून संपेल.

झारखंड मध्यें भाजपा आणि शिबू सोरेनची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ( झारखंड मुक्ती मोर्चा) आलटून-पालटून सत्तेवर येतात. तिथे काॅग्रेसचे अस्तित्व संपले आहे. बिहारमध्ये काॅग्रेस संपली आहे आणि भाजपा जवळपास सर्वात शक्तीमान पक्ष बनला आहे.  

छत्तीसगडमध्ये काॅग्रेसचे सरकार आहे. पण तिथे मुख्यमंत्री भूपेश वाघेल आणि जेष्ठ नेते टीएस सिंहदेव याच्यातला तंटा संपत नाही. राजस्थान मध्ये तर काॅग्रेस मध्ये इतकी दुफळी आहे की  तेथून  केंद्र सरकारशी आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर  राज्यातील सत्ता भाजपाकडे जाईल. 

उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आणि हरियाण इथे सध्या तरी भाजपाचे सरकार आहे म्हणजे केंद्र सरकारशी तंटा नाही. 

ईशान्य भारतात अरूणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम,  मणिपूर इथे भाजपाची सत्ता आहे. बाकी नागालॅन्ड, मिझोरम, मेघालय या राज्यात स्थानिक पक्षांची सत्ता आहे. मोदी सरकारने संपुर्ण ईशान्य भारतातील राज्यांचा विकास टाॅप प्रायारोटीवर घेतला आहे. ईशान्य कडील राज्ये चीनच्या सिमालगत असल्यामूळे तेथील सीमावर सामरीक शक्ती वाढविण्यासाठी ज्या काही मूलभूत सेवांचे जाळे केंद्र सरकार करीत आहे त्यातून या राज्यांत ही उद्योग आणि व्यापार क्षेत्र वाढते आहे. त्यामूळे ही राज्ये केंद्र सरकारशी भांडत नाहीत. 

एकंदरीत केंद्र सरकारच्या विरोधात मोठा उभा बखेडा करण्याचे बळ  विरोधी पक्षांकडे नाही. मग पश्चीम बंगाल, महाराष्ट्र, आणि दिल्ली  या राज्यातील सत्तेवरील मंडळीनी केंद्र सरकारशी बखेडा का उभा केला?  उत्तर एकच आहे आणि ते स्पष्टपणे दिसत आहे. या राज्यातील सरकारं ही गांधी, ठाकरे-पवार आणि ममता बॅनर्जी घराण्यांची आहेत. आपआपल्या राज्यातील जनतेच्या हितापेक्षा राजकारणात आपआपल्या वारसांना कसे बसवायाचे या एकाच चिंतेने ही मंडळी त्रस्त आहे. म्हणून पुरोगामी - उदारमतवादी या गोंडस नावाखाली  राजकीय अभ्यासक, विचारवंत, संपादक नावाची जमात आपल्या हाताशी धरून  ताकदीचा केवळ देखावा ही मंडळी निर्माण करीत आहेत. धोका आहे तो या मंडळींनी विदेशी शक्तीच्या साह्याने पंजाब सारख्या घटना करण्याचा. पण आता मोदी सरकार सजग असेल.  

अलिकडे काॅग्रेस कमकुवत झाल्यामूळे ममता बॅनर्जीं भारत यात्रेला निघाल्या. शरद पवार आणि उद्धव ठाकरे ही महाराष्ट्राचा उबंरठा ओलांडण्याच्या तयारीला लागलेले दिसतात. परंतु घराणेशाही राजकीय पक्षांचा बाप असलेल्या काॅग्रेस पक्षांच्या सर्वसर्वा सोनिया गांधीनी ममता बॅनर्जींना काही किंमत दिली नाही. काॅग्रेसचे युवराज राहूल गांधीनी सेनेच्या संजय राऊतकडे दुर्लक्ष केलेला विडीओ आपण पाहीला आहे.  उठसुठ कानाखाली आवाज काढण्याची भाषा करणारे संजय राऊत त्या विडीओत गरीब, भयभीत झालेली शेळी दिसली आहे.  शरद पवारावर महाराष्ट्रातल्या काॅग्रसजनांनी फारसा विश्वास दाखविलेला नाही. तसेच शरद पवारांनी ममता बॅनर्जींना किंमत दिली नाही. मग ममता बॅनर्जी शरद पवारांना का म्हणून मदत 
करेल ? त्यातही शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेसमधील  एकी तरी कुठे बळकट आहे? सध्यातरी विरोधी पक्ष टेन्टेटीव्ह मुड मध्ये आहेत . पाच राज्याच्या निवडणूकीत भाजपाला थोडाफार धक्का मिळाला तरी २०१९ प्रमाणे लोकसभेच्या निवडणूकीत नरेंद्र मोदी पुढे विरोधी पक्षांचा टिकाव लागेल असे दिसत नाही.

देशांतर्गत राजकारण घातक वळणावर ? (भाग - १)


मागे  ' देशाच्या राजकीय मंचावरील शो- महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया पश्चीम बंगाल ' या लेखमालिकेत,  केंद्र सरकारशी उभा बखेडा करणार्या तीन राज्य सरकारात पंजाब राज्य सरकारची लौकरच भर पडेल असे मी वर्तविले होते. तसेच  किसान आंदोलन - कोण जिंकल कोण हरलं या लेखात देशाचा राजकीय मंच समरांगण होईल असे भाकीत केले होते. दुर्दैवाने हे दोन्ही अंदाज खरे ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंजाबच्या दौर्यावर आपल्या सुरक्षतेच्या ताफ्यासकट हायवे वरील एका ब्रीजवर तब्बल एक तासभर असुरक्षेतेच्या भावनेत अडकावे लागले आणि शेवटी दिल्लीला परत जावे लागले. देशभर बातमी वार्यासारखी पसरली. शेतकर्यांच्या अकस्मात निदर्शनातून ट्रॅफिक जाम झाली होती आणि ज्या ब्रीजवर ट्रॅफिक जाम झाली होती तेथून पाकिस्तानची सीमा फारशी दूर नसल्याचे कळताच देशभरातील सामान्यजनांनी हा मोदीजींची हत्या करण्याचा प्रयत्न होता असे म्हणत सोशल मिडीयावर संताप व्यक्त केला.  पंजाबचे मधील काॅग्रेस सरकार, काॅग्रेस श्रेष्ठी, खलिस्तान वादी, टिकैत सारख्या शेतकरी नेत्यांवर टिका झाली. आरोप-प्रत्यारोप झाले. चौकशीतून सत्य काय ते बाहेर येईल. पण कशाही प्रकारें या घटनेसंबंधी वाद प्रतिवाद झाला, तरी पंजाब  सरकारकडून पंतप्रधानाच्या  सुरक्षतेच्या बाबत हलगर्जीपणा झाला हे कोणी नाकारू शकत नाही.

पंजाब मध्ये घडलेल्या या घटनेने देश हादरून गेला. ही घटना आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेत राहात आहे. या घटनेचे पडसाद कसे आणि किती काळ उमटत राहतील हे  राजकीय पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची वक्त्व्यें आणि परस्परांमधील व्यवहार, तसेच प्रिन्ट, इलेक्ट्राॅनिक्स आणि सोशल मिडीयाचा रोल कसा राहील यावर अवलंबून राहील. सर्वात महत्वाचं म्हणजे देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मानसिकतेवर अधिक अवलंबून आहे. या संदर्भात इथे भूतपुर्व पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयींचा राजकारण संबंधीतला दृष्टीकोन आणि व्यवहार कसा होता याबाबतचा प्रसंग आपल्या समोर ठेवतो. 

प्रसंग आहे सन १९९०-९१ चा. सन १९८९च्या लोकसभेच्या निवडणूकीत काॅग्रेसचे पंतप्रधान राजीव गांधीच्या सरकारचा पराभव झाला. केंद्रात विश्वनाथ प्रतापसिंगचे विरोधी पक्षांच्या आघाडीतून तयार झालेले सरकार होते. ते सरकार पडले. नंतर श्री चंद्रशेखर यांचे काॅग्रेसच्या पाठींब्यातून सरकाल आले. काॅग्रेसने आपल्या सोयीनूसार चंद्रशेखरच्या सरकारचा पाठींबा काढून घेतल्या. लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या. प्रचार सुरू झाला. ऐन प्रचाराच्या धामधुमीत माजी पंतप्रधान- विरोधी पक्षाचे नेते राजीव गांधी यांची तामिळनाडूत एका प्रचारसभेत हत्या झाली. देश हादरला. निवडणूक प्रचार स्थगित झाला. काही दिवसानंतर निवडणूक प्रचार सुरू झाला. भाजपा तर्फे बोरीवलीत भाजी मार्केटच्या गल्लीत रामलिला मैदानावर माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयीची जाहीर सभा होती. सभास्थानी वाजपेयींचे आगमन होत असल्याचे माईक वरून घोषित झाले. कार्यकर्ते उठून उभे राहीले आणि देशका नेता कैसा हो, अटलबिहारी अटलबिहारी अशा जोरदार घोषणा सुरू झाल्या आणि वाजपेयीजी मंचावर विराजमान होईपर्यंत चालू होत्या. नंतर वाजपेयींनी भाषणाची सुरूवातच गंभीर आवाजात केली,  ' देवी और सज्जनों , सवाल देशका नेता कैसा हो यह नही है, सवाल देश कैसा हो, यह है | सवाल चुनाव प्रचारका नही, सवाल राजनिती कैसी हो, सवाल समाज कैसा हो यह है |  सभेत निरव शांतता पसरली. देशाच्या माजी पंतप्रधान राजीव गांधींना एक यथोचित श्रद्धांजली अर्पण झाली. ती ही निवडणूकीच्या प्रचार सभेत. भले पंजाब मध्ये अनिष्ट घटना घडली नसेल पण जे काही घडले त्या संबंधीत राजकीय पक्षांनी आणि मिडीया हाऊसेसांनी कसा व्यवहार ठेवावा, याहून अधिक आदर्श आणि मोलाचं सल्ला राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कुठला आसावा? 

वरील सल्ला फक्त मोदी विरोधकांसाठी नाही तर तो मोदीच्या समर्थकासाठी ही आहे. संकट पंतप्रधानपदावरील व्यक्तीवर असले तरी ते देशावरचे संकट असते. परकीय आक्रमण होवो किंवा नैसर्गिक आपत्ती आणि करोना सारख्या महामारीचे होवो ते आपल्या सर्वांवर आहे. संकट समयी सारे भेद विसरून महाभारतात युधिष्ठीरांनी सांगितलेला 
 वयं पंचाधिकम शतम् | हाच आपला धर्म होय !

पंजाब मधील अनपेक्षित तितकीच भयावय घटनेने पाच राज्यांतील निवडणूकांचा प्रचार, मतदान सुरळीत पडेल का, तिथल्या गल्ली-गल्लीत मिडीयातील पत्रकार कॅमेरामन, जात-पात, धर्म-पंथ, शेतकरी- कष्टकरी , दुकानदार, युवक-महिला इत्यादी  घटकांच्या घोळख्या घोळख्याने मुलाखती घेतांना काही दुर्घटना, घातपात जाळपोळ होणार नाही ना असे असंख्य प्रश्न तेथील मतदारांच्या मनात तसेच इतर राज्यातील लोकाच्या मनात उभे असणारच की ! चॅनल्सवर होत असलेल्या मोकाट चर्चासत्रांच्या ट्रॅफिकतून आरोप-प्रत्यारोप, शिव्या-शाप हे ही एक प्रकारचे मानसिक आघात-अपघातच नव्हे काय?  देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक घटनेवर मग ती घटना मामूली असली तरी त्यात राजकारण घूसवून  केंद्र सरकाराला अडचणीत कसे आणावे हाच बहुतांश विरोधी पक्षांचा एजंडा राहिला आहे. मग केंद्र सरकार कडून प्रत्युत्तर दिले जाते हे ही खरें आहे. पण सोशल मिडीयावर पंतप्रधानांवर खालच्या पातळीवरून टिका होते यावर आळा कसा बसेल, यावर मिडीयात कधी चर्चा होत नाही त्याचे काय?

देश कैसा हों, समाज कैसा हों, राजनिती कैसी हों  अटलजींचे हे बोल आजही कानात गुंजत असतात.  यावर गंभीर विचार होऊन समाजाला मार्गदर्शन कोण देणार? बरं मार्गदर्शन देण्यासाठी कोणी पुढे आले तर त्यांना तुम्ही कोण आम्हांला शिकविणारे असे उत्तर येणं हे ही नित्याचं झालं आहे.  जगभरातील राजकारणाचा दर्जा खालावला आहे .  शेवटी नव्या तंत्रज्ञान युगाचे म्हणा वा आर्थिक उदारिकरणाचे म्हणा हे सारे खेळ असावेत आर्य चाणक्यांनी म्हटले आहे  हर एक नई सुविधा असुविधाको जन्म देती है | हेच खरें. 

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या पंजाब  दौर्यातील घटनेची रितसर चौकशी सुरू झाली आहे. त्यासंबंधी अधिक भाष्यं करणे योग्य नाही. पण देशातील काही राज्य सरकारांनी केंद्र सरकारशी उभा केलेल्या ' उभ्या बखेडांचे ' लोण पंजाब सारख्या सिमावर्ती राज्यात पोहचू लागले ही बाब देशाच्या सार्वभौमत्वला आव्हान तयार झाले आहे. या बखेडाची व्याप्ती (ज्याला आपण रूंदी म्हणतो) तीन-चार राज्यापुरता सिमीत आहे. हे खरे पण दोन सिमावर्ती राज्यात. त्यातील एक पश्चीम बंगाल, दुसरा पंजाब. कालच पंजाबाच्या मुख्यमंत्र्याच्या नातेवाईकाच्या घरावर ईडीने छापा टाकला त्यावर मुख्यमंत्री चरणजीतसिंगनी त्यावर प्रतिक्रीया दिली त्यात ईडीच्या छाप्यातून मिळालेली करोडो रूपयांची बंडले हाती लागली याचा उल्लेख केला नाही. अशीच धाड पश्चीम बंगालच्या मुख्यमंत्र्याच्या नातेवाईकाच्या घरावर पडली होती असे म्हणत आमच्यावर दबाब आणत आहेत असे चन्नीने म्हटले. महाराष्ट्रातील ईडीच्या धाडीवर काही उल्लेख केला नाही .फक्त पश्चीम बंगालचा उल्लेख केला यावरून चन्नीना या दोन्ही राज्याच्या सिमा दोन इस्लामी देशांना जोडलेली आहे त्यामूळेच आमच्यावर दबाव वाढविला आहे असे अप्रत्यक्ष सुचविले आहे असे दिसते. चार राज्यांनी उभा केलेला उभ्या बखेडाची खोली वाढती आहे. हे भिमा-कोरेगाव, सीसीए कायद्या विरोधी झालेला धुमाकूळ, शाहीनबाग धरणं, आंदोलक शेतकर्यांनी प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर फडकाविलेला खलिस्थान वाद्यांचा झेंडा आणि आता पंजाबात घडलेल्या घटनेवरून सिद्ध होते. ही बखेडाची खोली विशेषतः मोदी आणि मोदी सरकारच्या  द्वेषांनी भरलेली आहे.

या सर्व घटनांच्या मुळाशी जाऊन अभ्यास केला की आपल्याला मूळ कारण हाती मिळते.  सन २०१४ सालच्या ही अगोदर नरेंद्र मोदीनी गुजरातमधून काॅग्रेस नामशेष करण्याचे काम हाती घेतल्याचं शल्य जे सोनिया गांधीना टोचत होते ते त्यांनी जाहिर सभेत  मौतका सौदागर  अशा टिप्पणीतून व्यक्त केलं. त्या दिवसा पासून सार्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात नरेंद्र मोदी संबंधी पराकोटीचा द्वेष निर्माण झाला आहे. त्याचं रूपातंर विषात झाले आहे. त्यासाठी काही मिडीया हाऊसेस, विदेशी शक्ती, बाॅलिवूड शक्ती, अन्डरवर्ल्ड, सो काॅल्ड लिबरल विचारवंताचा हातभार लागला. सन २०१७ पासून ब्लाॅगवरील बहुतांश राजकीय विषयावरील लेखात मांडत आलो आहे. दिले आहे. १५ जूलै २०१७ रोजी म्हणजे मोदीजी पंतप्रधान झालेल्या फक्त तीन वर्षच पुर्ण झालेली असताना भाजपा आणि विरोधी पक्षातील धुमचक्री का वाढली जाते, या संबंधीचा उहापोह  ' युद्ध मोदी समर्थक आणि विरोधकात ' या लेखात विस्ताराने मांडलेलं आहे. त्या लेखाचा सारांश म्हणा वा विरोधी पक्षाचां मोदीं विषयींचा प्रचंड द्वेषाचं कारण थोडक्यात खाली मांडतो आणि या लेखाच्या भाग १ ची समाप्ती करतो.

सन २०१४ च्या लोकसभेतील भाजपाचा प्रचंड विजय विरोधी पक्षांच्या नेते - कार्यकर्ते  त्यांचे समर्थक मिडीया, विचारवंत आणि काही कलाकार साहित्यिक मंडळींना  पचला नाही. बहुतांश पत्रकार, संपादक मंडळींनी तो विजय मोदींच्या जाहिरातबाजीचा मानला. ही मंडळी मोदींची लाट ओसरणार आणि २०१९ ला परिवर्तन होणारच अशा थाटात वावरत राहीली. वस्तुतः विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री जेव्हा झोपा काढत होते तेव्हा प्रतिकूल परिस्थितीत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदी गुजरातच्या विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी अहोरात्र मेहनत करीत होते. पारंपारीक निवडणूका जिंकण्याच्या क्लृप्त्या कालबाह्य ठरण्याचे युग सुरू झाले होते. तरीही विरोधी पक्षांचे मुत्सुद्धी नेते मोदींना भगवा दशहतवादी ठरविण्यातच गुंतले आणि भ्रष्ट्राचारातून आपल्या थैली भरत होते. कुठे गेले सी चिदबंरम्, कुठे गेले सुशील कुमार शिंदे, मणिशंकर अय्यर ? सोनिया गांधी आणि राहूल गांधी काॅग्रेसचे सर्वेसर्वा होते म्हणून नावाने तरी टिकले आहेत. आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जुनी झालेलं शेंडी-जानवं हिंदुत्वावर टिका करीत आहेत. महाराष्ट्रातील नवमतदार इतके खुळे नाहीत.  शरद पवार गेल्या शताब्दीच्या सत्तरच्या दशकातील संघावर अर्धी चड्डी वरून टिका करतात जणू काही शरद पवार जन्मतः फुल पॅन्ट आणि हाफ बुशशर्ट अशा वेषात भूतलावर आले आहेत की काय?  

महाराष्ट्र टाईम्सने २०१४ च्या निवडणूक प्रचारा दरम्यान 'मोदी  एक जाहिरातबाजीचा चेहरा 'असा प्रताब आसबेंनी लिहलेला लेख पब्लीश केला होता. तेव्हा मी उत्तरादाखल एक लेख (त्याची काॅपी अजूनही मी ठेवली आहे) मटा च्या मेलवर पाठविला. पण त्यांनी पब्लीश केला नाही. प्रताब आसबे प्रकाश बाळ सारखे देशभरातील लिबरल आणि पुरोगामी संपादक मंडळी तसेच असहिष्णूतेची बोंब उठवून देश सोडून जाणार असे म्हणणारी कलाकार मंडळी,, साहित्यिक सन २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालानंतर पुर्णपणे गप्प झाली आहे.  तात्पर्य हे आहे की जो पर्यंत विरोधी पक्ष  मोदी, संघ , आणि भाजपाचा द्वेष करीत राहतील तो पर्यंत त्यांना विजयाची वाट दिसणार नाही. मोदी समर्थकांना अंधभक्त म्हणता म्हणता यांना विजयाची वाट दिसणे बंद झाले आहे. 

(या लेखाच्या दुसर्या भागात केंद्र सरकार विरूद्ध महाराष्ट्र, पश्चीम बंगाल  दिल्ली, आणि पंजाब  सरकारने जो बखेडा उभा केला त्याचे स्वरूप आणि इतर राज्यातून त्याला पाठींबा कितपर्यंत मिळतो यावर आपण चर्चा करू .)

सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

किसान आंदोलनातील राजकारण -- कोण जिकंल कोण हरलं?



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणाच्या ध्यानी-मनी नसताना कृषी बिल्स मागे घेतल्याचे जाहीर केले. आता ते बिल्स अधिकृत रित्या रद्द ही झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी कृषी बिल्स मागे घेतल्याच्या निर्णय जाहीर केल्यानंतर किसान आंदोलनाच्या नेत्यांना आणि विरोधी पक्षांना तसेच त्यांचे समर्थक, मिडीया हाऊसेस, स्थंभ लेखक, पुरोगामी, उदारमतवादी विचारवंत इत्यादींनी पंतप्रधानांचे ना अभिनंदन केले ना त्यांची भेट घेतली. सामान्यतः ज्या मागणीसाठी आंदोलन होते ती मागणी पुर्ण झाल्यानंतर आंदोलकांचे नेते सरकार दरबारी जाऊन सरकारचे अभिनंदन करीत असतात हा एक शिष्टाचार आहे. शिष्टाचार हा काही कायदा नाही. हा एक काॅमन सेन्सचा विषय आहे तसेच लोकशाही राज्यप्रणालीचे मुलभूत तत्व आहे. आंदोलन सुरू झाल्यापासून प्रथम बिल्स मागे घ्या नंतरच चर्चा असा हट्ट आंदोलनाचे नेते का करीत राहीले? एक वर्ष हे आंदोलन सुरू राहीले. इतका पराकोटीचा संयम किसान आंदोलनात भाग घेणार्या शेतकर्यांना कोठून आला ? इत्यादी प्रश्न आपल्या सारख्या सामान्यजनांना नक्कीच पडले असणार ? म्हणून या संबंधी ष्रथम चर्चा करू या.

आपल्या देशातील लोकशाही बहूपक्षीय आहे. पण देशातले  राजकारण दोन धृवीय आहे. देशातील बहुतांश पक्ष एक तर प्रांतीय स्तरावरील आहेत किंवा सत्तेसाठी काॅग्रेसमधून बाहेर पडून स्थापन झालेले. वाम पंथीय पक्ष केरळ पुरताच आहेत.  या सर्व पक्षांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय विचारसरणीची घृणा आहे.  म्हणूनच  एका बाजूला काॅग्रेसची विचारसरणी आणि दुसर्या बाजूला संघ-जनसंघाची (म्हणजे भाजपाची) विचारसरणी असे  देशाच्या राजकीय व्यवस्थेचे स्वरूप आहे.  दुष्ट हेतूने महात्मा गांधीजींच्या हत्त्येचे खापर संघावर फोडून सतत संघाच्या राष्ट्रीय विचारसरणी विषयी भारतिय जनतेमध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम काॅग्रेसने आणि डाव्यांनी केले. पण कालौघात  त्याग आणि सेवा या दोन जीवनमुल्यांवर आधारीत ' देशहीत सर्वोच्च ' मानत अविरत परिश्रमाने  संघ जे देशकार्य करीत आहे ते पाहून भाजपाचा  जनाधार वाढत गेला. सन २०१४ साली केंद्रात भाजपाचे स्पष्ट बहूमताचे सरकार आले. तेव्हापासून तमाम विरोधी पक्षांचे मानसिक संतुलन बिघडत गेले. अनेक वर्षे संघ द्वेष करण्यातून विरोधी पक्षांची राजकीय वाटचाल दुषित होत गेली. त्यामूळे साधा शिष्टाचार पाळण्याचे भान ना शेतकरी नेत्यांना राहिले, ना विरोधी पक्षांना राहीले. आज काय हाती आलें आहे? काहीच नाही. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकविल्यामूळे कायमचा देशद्रोहाचा शिक्का बसला. आता तर या मंडळींना, शेतकरी आंदोलनाचे  मास्टर माईन्ड जे विदेशात आहेत त्यांना उत्तर काय द्यावयाचे या विचाराच्या धास्तीने पछाडले असावे.

कुठल्याही आंदोलनाला लोकांचा उत्स्पूर्त पाठींबा असणे आवश्यक असते. तसेच आंदोलन किती काळ सुरू ठेवावे  याचा अंदाज आंदोलनाच्या नेतृत्वाला येणं आवश्यक आहे. मध्ययुगात सर्वत्र राजेशाही होती त्याकाळात प्रत्यक्ष लढाई थांबवून दोन्ही पक्षांत तह झाल्याचे कैक उदाहरणे जगभरच्या इतिहासात आहेत.  कुठल्याही न्यायासाठी सरकार विरूद्ध आंदोलन करण्यात मध्यम वर्गीयांचा प्रचंड सहभाग असावा लागतो.  हे १९७७ च्या, १९८९ च्या लोकसभेच्या निवडणूकी वेळी आणि श्रीराम जन्मभूमी आंदोलनातून सिद्ध झाले आहे. शेतकर्यांच्या आंदोलनात सर्वसामान्य शेतकर्यांचा सहभाग नव्हताच. त्यामंळे हे आंदोलन भले दिर्घ काळ चालले असले तरी ते देशव्यापी नव्हते. दुसरे असे की हे आंदोलन स्वयंप्ररीत नव्हते. कारण जर हे आंदोलन स्वयंप्ररीत शेतकर्यांचे असते, तर ते वर्षभर टिकले नसते. खर्या अर्थाने गांजलेले शेतकरी या आंदोलनात असते तर त्यांना आपल्या बायका-पोरांची उपासमार होत असल्याच्या काळजीने ते अधिक त्रस्त झाले असते. विशेष करून उच्च प्रतिचा नाश्ता, फळे, दोन वेळ शाही थाटाचे जेवण, चहापान, कोल्ड ड्रीन्स आणि कदाचित मद्यपानाची पार्टी ( माझा अंदाज ), चांगल्या अलिशान गाद्या-तकींया पाहून काबाडकष्ट करून ही एक वेळ उपासमार सहन करणार्या शेतकर्यांनी चौथ्या दिवशीच ' इथे आमचा विठोबा नाही 'असे म्हणत, डोळ्यातून अश्रू ढाळीत आंदोलनातून घरचा रस्ता पकडला असता.

दिल्लीतील या किसान आंदोलनात पंजाब , हरियाण आणि पश्चिमी उत्तर प्रदेशातील मुळातच समृद्धीत जीवन जगणारे खानदानी घराण्यातील लोकांचाच फक्त सहभाग होता. असे ऐकीवात आहे की या आंदोलनातील बरेचसे लोक, हे देशाच्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानातल्या पंजाब भागातून आलेल्या निर्वासित बांधवांना उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात जमिनी देऊन स्थाईक केलेले आहेत. हळूहळू त्यांनी सरकारी जमिनीवर बेकायदेशिर रित्या कब्जा करून समृद्ध स्थितीत आले आहेत. ज्यांची पोटं भरली आहेत अशा शेतकर्यांच्या आंदोलनाला ना लक्ष्य होते, ना दिशा होती.  दिर्घ काळ चालविलेले आंदोलन टिकत नाही. काय झाले शाहीनबाग येथील ठिय्या आंदोलनाचे? एक ताजे उदाहरण डोळ्यासमोर होते. ते ही स्मरणात न राहण्या इतका किसान नेत्यांना स्मृतीभ्रंश व्हावा की हा बावळटपणा आहे का ? तसे नसेल तर एक तर अंहकार हे कारण असेल  किंवा मानवी तर्काच्या पलिकडचे कारण? देव जाणो !

जसं जसे आंदोलन पुढे चालू राहिले, तेव्हा काही तटस्थ मिडीया हाऊसेस द्वारें हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरीत झालेले होते, हे सामान्यजनांच्या लक्षात आले. ऐषबाजी करणार्या शेतकर्यांच्या आंदोलनाच्या आडून खलिस्तान चळवळ पुन्हा उभी करणे, उत्तर -पुर्वेला ममता बॅनर्जीच्या इस्लामी टोळींना प्रोत्साहन करणे, ठिकठीकाणी नक्षलवाद्यांना प्रोॲक्टीव करणे, पोस्टर बाॅईज कन्हैया, मेवाणी, हार्दिक पांड्या इत्यादींना  भाजपा शासित राज्यांत ठिकठिकाणी जातीय अस्मितेच्या झेंड्याखाली राडा करणे, संपुर्ण देशात मुस्लीम मतदारांना चिथावणी देण्यासाठी सांप्रादायिक दंगे करणे, इमाम तसेच ख्रिस्ती पाद्रीकडून राष्ट्रवादी पक्षांना मते देऊ नका असे आवाहन करायला लावणे, दक्षिण भारतात संघ राज्यप्रणालीचा उपयोग केंद्र सरकारशी तंटा निर्माण करण्याचा सपाटा लावावा असं एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाची सुरूवात म्हणजे दिल्लीतील किसान आंदोलन होय. जगाच्या इतिहासात इतकं भव्य-दिव्य ऐषबाजेचं आंदोलन कधी झाले असेल असे मला वाटत नाही.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग्य वेळी कृषी बिले मागे घेतल्यामूळे आता विरोधी पक्ष निराश झाले आहेत.  पंतप्रधान मोदींना वाकायला लावले, क्षमा मागायला लावले असे म्हणत ही मंडळी आनंद व्यक्त करीत असले तरी कृषी बिलें रद्दच केली असल्यामूळे त्या मंडळीचा आनंद ही कुत्रीम स्वरूपाचा वाटला. एखाद्या सेनादलाने  शत्रु पक्षाचा पराभव करण्यासाठी आपली सारी शस्त्रे चांगली पाजळून ठेवावीत आणि ऐन वेळेवर ती निकामी व्हावी किंवा शत्रूने पाठीमागून वार केल्यानंतर जी अवस्था होते तशाच प्रकारची अवस्था किसान नेत्यांची आणि बहुतांश तमाम मोदी -विरोधी मंडळीची झाली आहे. पराभव लपविण्याचे कितीही प्रयत्न केले तरी तरी या मंडळीच्या देहबोलीतून तो दिसला आहे.

उलटपक्षी ' किसानोंके हितके लिए कृषी बिल्स लाये थे लेकीन देशके हित के लिए वापस लिये '  असे देशातील जनतेला उद्देशून म्हणताना पंतप्रधान मोदीं नेहमी प्रमाणे आत्मविश्वासाने भरलेले दिसले. त्यांनी जनतेला उद्देशून ती वाक्यें उच्चारली तेव्हाच विरोधी पक्ष, प्रादेशिक पक्ष, डावे विचारवंत, काही सिनेस्टार, ड्रग्ज माफिया, काही साहित्यिक, धर्मांध धर्मगुरू इत्यादी मंडळीच्या सणसणीत थोबाडात हाणली आहे असे वाटले. विशेष म्हणजे थोबाडीत हाणल्याचा आवाज काॅनडा, पाकिस्तान, चीन, रशिया  युके, युएसए इत्यादी देशातल्या मिडीया हाऊसच्या कानावर आदळला असावा. वाॅशिग्टंन, रशिया, न्युयार्क, कॅनडा, चीन  पाकिस्तान इत्यादी देशाच्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदीनी कृषी बिलात माघार घेतल्याची वार्ता झळकली. पण या बातमीवर चर्चा करतेवेळी शेतकर्यांनी नरेंद्र मोदींना नमविले असाच त्यांचा सूर दिसला आहे. कारण पंतप्रधान मोदी कुठल्याच देशासमोर झुकले नाहीत. कृषी बिल मागे घेताना आपल्या शेतकरी बांधवाना कृषी बिलातून होणारा फायदा मांडण्यात कमी पडलो असे म्हणत पंतप्रधान मोदींनी शेतकर्यांची क्षमा मागितली. पाश्चिमात्य आणि पोर्वात्यातील आपल्या शत्रु देशांच्या  मिडीयाला क्षमा मागण्यात ही धैर्य लागते हे माहित नसावे. पण सतत महात्मा गांधीजींचे नाव घेणार्या देशी प्रसारमाध्यमांना हे का कळू नये ?

विदेशातील मिडियाने ज्या प्रकारें ' मोदींची माघार ' असे वर्णन केले, तसाच प्रकार आपल्या येथील विदेशी मिडीयाचे चेले असणार्या संपादकांनी वर्णन केलं आहे. मुळात या घटनेचं आणखिन वेगळं वर्णन आपल्या येथील काही मिडीया कसे करणार हो? कारण बहुतांश चॅनेल्सचे पोशिंदाच मुळी विदेशी मिडीया आहेत. असे ऐकीवात आहे की आपल्या येथे घडलेल्या राजकीय घटनेवरील भाष्यें आपल्या काही वृत्तपत्राचे संपादक महाशय विदेशी वर्तमानपत्रातील अग्रलेखाचं भाषातंर करून लिहीत असतात. वामपंथी शेखर गुप्ता त्यांच्या यु ट्युबच्या चॅनेलवर म्हणाले की पंतप्रधान मोदींनी शिख हे वेगळे आहेत हे लक्षात घेतले नाही. ' भारत एक फेडरल स्टेट आहे ' किंवा भारत हे राष्ट्र स्वातंत्र्यानंतरच अस्तित्वात आले आहे  हे घासून घासून जुने झालेले नाणें  वाजववून शेखर गुप्तांनी आपली खाज पुरी करून घेतली. देशातील डावे पक्ष नेस्ताबूत होत आहे परंतु यांची खाज संपली नाही. शेखर गुप्ता किसान आंदोलनात देशातल्या किती राज्यातील शेतकर्यांनी सहभाग घेतला होता   याची ना आकडेवारी मांडं शकले ना तशी काही क्षणचित्रे दाखवू शकले. कृषी बिलात काय खोट होती हे तरी मांडायला हवे होते की नाही ? बहुतांश मिडीयांची प्रतिक्रीया व मनःस्थिती याहून भिन्न नाही. मला वाटतं पंतप्रधान मोदींनी अकस्मात कृषी बिलें रद्द केल्यामूळे विरोधकांना विजेचा झटका लागला असावा.

स्थंभलेखक सुनिल चावके यांनी मटा मध्ये '  कृषी बिल्स मागे घेतले पण हे तात्पुरते ' असे प्रश्नचिन्ह मांडत लेख लिहीला आहे. त्यात त्यांनी दिल्लीतील या शेतकर्यांच्या आंदोलनाची तुलना युपीएची सत्ता असतांना दिल्लीत अण्णा हजारेंच्या भ्रष्ट्राचारांच्या आंदोलनाशी केली आहे. अहो चावकेजी, युपीए सरकाराच्या दहा वर्षाच्या काळात आर्थिक घोटाळे किती झाले होते हे आपल्याला ठाऊक आहे की नाही ? कुठे अण्णा हजारे, आणि कुठे  ऐष-आरामात रोज मेजवानीच्या धुंदीत असलेले टिकैत सारखे नेते? किसान आंदोलनामुळे आता केंद्रातून मोदी सरकार पायउतार होणार असे स्वप्न सुनिल चावकेंना पडले असावे. पुढे चावके आपल्या लेखात मांडतात की, त्यांना काही भाजपा नेत्यांनी सांगितले की कृषी बिल्स पुन्हा येणार आहेत. भाजपा नेत्यांच्या मुखी स्वतःला जे वाटते ते लेखात मांडून पंतप्रधान मोदींविषयी लोकांचा रोष वाढत ठेवण्याचा केविलपणा प्रयत्न सुनील चावके यांनी केला हे स्पष्टपणे दिसले. आखिर सुनिल चावकेकी भी कुछ मजबूरी हो सकती है |

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचे सरकार असताना २०१९ च्या ऐन निवडणुकीच्या अगोदर डाव्या पक्षांनी भर उन्हात देशभरातील शेतमजूरांना घेऊन (अर्थात कार्यकर्त्यांना) लाल बावट्याच्या झेंडाखाली अनवाणी विधानसभेवर मोर्चा आणला. काय फायदा झाला त्या मोर्चाचे ?  महाराष्ट्रातील शेतकरी, व्यापारी, छोटे-छोटे उद्योग करणारे आणि चाकरमनीतील आपआपल्या कार्यालयात कम्युनिस्टांच्या यूनियनचे थोडे फार नेते सोडून तमाम मराठी सामान्यजनांनी आणि चाकरमानी वर्गाने भाजपालाच मतें दिली. तो युतीचा प्रचंड विजय होता. हे सुनिल चावकेंना ठाऊक आहे. दिल्लीतील या किसान मेळाव्याचा फायदा घेऊ इच्छीत असलेल्या पक्षांच्या नेत्यांकडून मिळणार्या थैलीच्या मोहाला सुनिलजीच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक संपादक व  वार्ताहार बळी पडले असावेत. म्हणतात ना, ' अर्थस्य पुरूषो दासः | हेच खरे. या मंडळींना मी सांगू इच्छीतो की इथे मराठीचिये नगरीत मविआ सरकारचा जो कारभार चालला आहे यावर लक्ष केंद्रीत करून मविआच्या नेत्यांना जरा चार खडे शब्द सुनवावेत जेणे करून महाराष्ट्राची होणारी हानी थांबेल.

एक वर्ष आंदोलन चालवून हातात काही मिळाले नाही,  या आंदोलनात शेतकर्यांचे मृत्यु झाले. त्यासाठी त्यांच्या परिवाराला सरकारने पैसे द्यावेत अशी मागणी काही विरोधी पक्ष करीत आहेत. पण ही मागणी रास्त नव्हे. कारण दिल्लीत ठिय्या करून बसलेले शेतकरी हे नैसर्गिक आपत्तीमूळे प्रचंड नुकसान सोसले आहे,  त्यांना जगणं कठीण झालं आहे आहे अशा स्थितीतले नाहीत. या आंदोलनले वैशिष्ट म्हणजे इथे कुठलेच नेते उपोषणाला बसले नव्हते. सुनिल चावके यांना महात्मा गांधी किंवा अण्णा हजारेंच्या उपोषणाची विस्मृती झाली असावी.  आंदोलकांच्या नेत्यांनी आपल्या सोबत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांची रोज तब्येतीसंबंधीची विचारपूस करणे गरजेचे असते. आंदोलनाचं आयोजनाच्या वेळीच अशी खबरदारी का घेतली नाही?  कृषी बिल्स पास झाली म्हणून विरोध आणि आता किसान बिलें रद्द झाली म्हणूनही विरोधच. ' म्हणजे चीत भी मेरी,  पट भी मेरी ! '  कृषी बिलाच्या विरोधातील आंदोलनात शेतकरी मृत्युमुखीं पडले असतील तर सर्व पुरावे गोळा करण्याचे काम किसान नेत्यांनी शिघ्रतेने करावे आणि  मोदी सरकार विरूद्ध न्यायालयात याचिका दाखल करावी. इतका साधा आणि सोपा उपायाचा वापर करण्यासाठी किसान नेत्यांकडे पैसा निश्चीतच असणार. 

चौकीदार चोर है असा कंठ फोडून  निवडणूकीत प्रचार केल्याने हाती काय आले ?  मोदी सरकारने राफेल विमान खरेदीत खरोखरीच भ्रष्टाचार केला असता तर मोदी सरकारच्या विरूद्ध कोर्टात सर्व पुराव्यानिशी विरोधी पक्षांना न्यायालयात दाद मागता आली असती. पण तशी कृती केली नाही. असत्याला प्रकाश नसतो. सत्याला प्रकाश असतो आणि स्पष्ट वाणी ही असते. हे राफेल विमान खरेदी प्रकरणातून अलिकडे सिद्ध झाले तसेच पंतप्रधान मोदींनी कृषी बिले रद्द केल्याच्या घोषणेत प्रचिती आली.  किसान आंदोलकांचे नेते न्यायालयात जाण्याची हिम्मत करणार नाहीत. तशी हिम्मत करून कोर्टात गेले तरी कोर्ट
ती याचिका फेटाळण्याची शक्यता अधिक आहे. 

आता पुढे काय ? शेतकर्यांच्या नावाने मोदी सरकार अस्थिर करण्याचे निदान प्राथमिक प्रयत्न विफल झाले आहेत. सत्ताधारी भाजपाने काही गमाविले नाही. विरोधी पक्षांनी ही तसे फारसे काही गमाविले नाही. कारण विरोधी पक्षांकडे केंद्र सरकराशी दोन हात करण्याची शक्तीच राहिली नाही. ज्या राज्यात ते सत्तेवर आहेत तिथले शेतकरी आपत्तीने ग्रासलेले आहेत. त्यांच्या अडचणी तेथील सत्ताधारी सोडवू शकले नाहीत. मग कुठल्या मुखाने ते आपल्या राज्यातील शेतकर्यांना दिल्लीतल्या मोर्चात सामील होण्याचे आवाहन करणार? सुनिल चावके तसेच शेखर गुप्ता सारख्या पत्रकारांने यासंबंधीत  विरोधी पक्षांच्या नेत्यांची अडचण खुबीने गुप्त ठेवली. कारण बहुतांश मिडीया हाऊससेचे  पोशिंदेच विदेशी शक्ती आहेत.

पंतप्रधान मोदींनी आणलेली तीन कृषी बिलें फक्त दलाली करणार्या मोठ्या शेतकर्यांनांच जाचक होते. हे २१ फेब्रुवारी २०२१, च्या ' शेतकर्याच्या आंदोलनात भ्याड हिंसाचार ' या शिर्षकाच्या मी लेखात  मांडले आहे. आता कृषी बिले रद्द झाली आहेत.  देशभरातील शेतकर्यांना आपला माल थेट बाजारात विकण्याची जी संधी मिळणार होती ती थांबली. या राजकारणात हरले फक्त  देशभरातील गरीब शेतकरी.  पण मोदी सरकार भविष्यात गरीब शेतकर्यांसाठी उपाय योजना करणार हे निश्चीत आहे. पण प्रथम दलाल कम बड्या शेतकर्यांना हाताशी धरून विदेशी शक्ती आणि मिडीयांनी मोदी सरकरला घेरण्याचा जो एक आंतरराष्ट्रीय कट रचला आहे ' त्यासंबंधीत पुरावे गोळा करण्याचे काम मोदी सरकार हाती घेईल. नंतर लाल किल्ल्यावर  प्रजासत्ताक दिनी धुडगुस कोणी केला त्यांचा शोध घेईल. आता तर देशातील राजकारण हे रणागंण होण्याची चिन्हे दिसत आहेत. हे दुर्दैव आहे. फितूरीचा वारसा आपल्या देशातील राजे-महारांजा कडून आलेला आहे ना ! पण मोदी है तो सब मुमकीन है |  बस हमें इस आपातकालीन स्थितीमें  केंद्र सरकार को समर्थन देते रहना है | 

सारांशाने  कृषी बिलांत काही ही खोट नव्हती. खलिस्तान चळवळ नव्याने सुरू करण्याचे जे प्रयत्न विदेशातून झाले आहेत त्यावर आपल्या विरोधी पक्षांनी आपआपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. पण पंतप्रधान मोदींनी बीएसएफ चे क्षेत्र पंजाब, बंगाल सारख्या सिमावर्ती राज्यात वाढविले आहे. एक आंतरीक यादवी म्हणा वा बंडखोरी जी विदेशी शक्तीच्या जोरावर तीव्रतेने वाढती आहे ती पुर्णपणे नष्ट करण्यासाठी कृषी बिल्स पुर्णपणे रद्द केली आहेत.म्हणूनच पंतप्रधान म्हणाले आहेत, " किसानोंके भलाईके लिए कृषी बिल्स लाये मगर देशके हितके लिए वापस लिए है | " याहून अधिक शब्दात वर्षभर चाललेल्या किसान आंदोलनातील राजकारणाचे विश्लेषण पुढे सरकतच नाही. त्यामूळे हे किसान आंदोलन पुढे चालू राहीले तर किसान आंदोलनाच्या नेत्यांची आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची बौद्धीक पातळीची दिवाळखोरी ठरेल.

या नकली किसान आंदोलनात पंजाब मध्ये काॅग्रेसने आपला कॅप्टन गमाविला; असा कॅप्टन ज्याला सेनादलातल्या देशभक्तीचा, शिस्तीचा, आणि शौर्याचा वारसा आहे. काॅग्रेसचे श्रेष्ठी कॅप्टनला भेट देत नव्हते, म्हणून कॅप्टन थेट गृहमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटी घेऊ लागला. शेवटी आपल्या मुख्यंमंत्री पदाची तिलांजली देऊन देशाच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय विचारसरणीच्या भाजपा सोबत मैत्री केली. आप पार्टीच्या हातात जे काही थोडेफार होते ते ही निसटले कारण केजरीवाल यांना जडलेला हलकट वृत्तीचा रोग ॲडवान्स स्टेजवर जात आहे. अकाली दलातील काही नेत्यांना अकाली वार्धक्य येणाची शक्यता आहे. तसे होण्या अगोदर त्यातील काही नेते आणि शेतकरी संघटनेचे काही नेते भाजपात जातील . काॅग्रेसचे बहुतांश नेते कॅप्टन अमरींदरसिंग यांच्या कडे जातील. भाजपा पुन्हा एकदा ' Nation First ' हा मुद्दा पंजाबतच नव्हे तर इतर राज्यातील निवडणूक प्रचारात मांडू शकणार आहे. त्याची कारणे आहेत तीन. पहिलं कारण हे की  प्रजासत्ताक दिनी किसान आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकाविलेला झेंडा. तेव्हाच हे किसान आंदोलन खलिस्तानवादींच्या हातात गेले आहे अशी खात्री जनसामान्यांची झाली.  दुसरे कारण केंद्र सरकारकडे महत्वाच्या फाईल्स कॅप्टन अमरींदरसिंग  यांनी सुपूर्त केल्या आहेत. तिसरे कारण हे आहे की महाराष्ट्रातील मविआ सरकारने केंद्र सरकारशी सतत भांडण करण्याच्या नादात ड्रग्ज माफिया विरूद्ध कडक कारवाईची संधी केंद्र सरकारला दिली आहे.  कॄषी बिल्स मागे घेऊन मोदी सरकार मागे हटले, पंतप्रधान मोदींची नाचक्की झाली असे कोणी मानत असतील तर तसे मानण्याचा आणि मांडण्याचा तो त्यांचा हक्क आहे. पण मला वाटतं की पंतप्रधान मोदीं एक नाहीतर दहा पावले मागे हटले आहेत पण हजाराहून अधिक पावले पुढे जाण्यासाठीच. हे पंजाब मधील तसेच इतर राज्यातील निवडणूकीच्या निकालातून दिसू शकेल. 

रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

त्रिपुरात अफवा पण महाराष्ट्रात धुडघूस कसा ? (भाग-१)


भाजपा शासित त्रिपुरा राज्यात मुस्लीम धर्मियांची प्रार्थनास्थळे उध्वस्त केली, तेथील मुस्लीम बांधवांना मारहाण केली, त्यांची दुकाने जाळली अशा फेक न्यूज पसरल्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. अमरावती, नागपूर, नांदेड , धुळे इत्यादी ठिकाणी रजा ॲकेडमेने आखलेल्या बंद, मोर्चा, धरणं अशा कार्यक्रमात मुस्लीम बांधवांनी  हिंदु बांधवांच्या दुकानांची, वाहनांची, मोडतोड करून हिंदु बांधवाना मारहाण केली. त्यामूळे भाजपाने अशा ठिकाणी दुसर्या दिवशी निषेध व्यक्त करण्यासाठी बंद आणि मोर्चे आखले. विरोधी पक्षांचा तो हक्क असतो.  म्हणून असा निषेध हा ही एक प्रकारे Every action has reaction या सृष्टीच्या नियमानुसार आहे. या घटनेने महाराष्ट्र हादरला असे न्यूज चॅनेल म्हणत आहेत. महाराष्ट्र हादरला पण महाराष्ट्र सरकार कोडगे बनले असल्याकारणाने ते हादरले नसावे. त्यातच या घटनेचे मास्टर माईन्ड मविआ सरकारचे नेते मंडळी आहे अशा काही न्यूज चॅनेलवरून जनतेला कळले आहे. तसेच या घटने नंतर  ' शांतता राखा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका ' असे जनतेला आवाहन केले तेव्हा कुठे जनसामान्यांना कळले असावे, की श्री दिलीप वळसे पाटील हे महाराष्ट्राचे नवीन गृहमंत्री आहेत.


दिलीप वळसे पाटील यांचा केलेला उल्लेख थोडासा उपहासत्मक आहे पण तितका पुरेसा आहे. कारण राजकारणातले ते एक सौजन्यशील आणि आपले काम आणि आपण बरे अशा गटात मोडणारे दिसतात.  मविआ सरकारने केंद्र सरकारशी जी बंडखोरी निर्माण केली आहे त्या संबधित राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या इतर नेत्यांप्रमांणे उगीच फुटकळ आणि फटकळ वक्तव्ये करीत नाहीत. मविआ सरकार स्थापन झाले तेव्हा ते गृहमंत्री होणार अशी चर्चा सुरू होती. पण माशी कुठे शिंकली कोण जाणे पण त्यांचे नाव मागे पडले आणि आपल्या बोडक्यावर अनिल देशमूख गृहमंत्री म्हणून बसले. नंतर ऐकू आले की दिलीप वळसे पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामूळे गृहखाते नाकारले. पण महाराष्ट्राच्या गृहखात्याचीच प्रकृती वसूली कांड, मंत्र्याकडून महिलांचा विनयभंग, भ्रष्टाचार, कलाकारांच्या हत्त्या, साधूंच्या हत्त्या इत्यादी दुष्कृत्यांनी ढासळली असताना त्यांनी ते खाते का स्विकारले असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिला असावा. पण त्यावर अधिक चर्चा करण्याची गरज नाही. कारण स्वभावाने ते मवाळ असल्याने आपल्या बाॅसची आज्ञा पाळली आहे.

वस्तुस्थिती अशी आहे की श्री उद्वव ठाकरे आणि शरद पवार यांच्या हातात सर्व खात्यांचा कारभार आहे.  त्यांच्या पाठीशी दोन शत्रु देशांच्या लाॅब्यां भक्कमपणे उभ्या आहेत असे म्हटले जाते.  त्यातील एका देशात भारताला हवा असलेला आणि भारतात आंतकवाद, लव जिहादी , ड्रग्ज चे जाळे निर्माण करून काळा पैसा पांढरा करणारा, धार्मिक दंगली आणि बाॅम्ब स्पोट घडविणारा अन्डरवर्ल्डचा डाॅन राहातो. तो देश म्हणञे पाकिस्तान. तर दुसरा देश जिथे लोकशाहीचा अंश नाही पण भारतात मात्र आजादीचे खोटे नारे मिरविणारी  उनाडटप्पू युवकांची टोळी निर्माण करणारा, सतत हिटलरच्या गोबेल्स तंत्राला आज सत्तर वर्षाहून अधिक काळ लोटला तरी जो शिव्यांची लाखोली वाहतो आहे आणि तेच तंत्र अद्यायावत स्वरूपात आपल्या येथील मिडीयाला लाच देऊन  वापरीत आहे, तसेच आपल्या देशाच्या काही भागात ज्याने प्रत्यक्ष रक्तरंजीत क्रान्ती घडविणार्या नक्षलवाद्यांचे जाळे निर्माण केले आहे तो देश म्हणजे चीन. अशा या दोन देशांचा लाब्यांचा प्रभाव २०१४ पासून आपल्या येथील बहुतांश विरोधी पक्षांवर सतत पडत आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शिवसेनेवर अधिक पडल्याचे दिसते. हा एक असा मुद्दा आहे , ज्यावर चर्चा केली की त्रिपुरा येथेच का फेक न्यूजचे तंत्र अवलंबिले गेले आणि त्यातून फक्त महाराष्ट्रात दंगली का घडल्या आणि त्यासाठी रजा ॲकेडेमीचा वापर का झाला इत्यादी प्रश्नांचे उत्तर शोधण्यात मदत होईल असे वाटते. म्हणून प्रथम त्यावर चर्चा करू या.

आपल्या देशाच्या ईशान्य सिमेवरील राज्यें स्वातंत्र्या नंतरही बराच काळ दुर्लक्षित राहिली. त्यामूळे ती राज्यें एक प्रकारे ख्रिस्ती मिशनरी, डाव्या विचारसरणीचे पक्ष आणि बांगला देशातील जिहादी विचारसरणीच्या संस्था आणि संघटनांना जणू काही आंदण देल्यासारखी होती. त्यातून तेथील जनतेचे भले काही झाले नाही. त्यांच्या वाटेला सतरा विघ्ने दारीद्र्य आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विधायक कार्यामूळे तेथील जनतेला आपल्या संस्कृतीची जी विस्मृती झाली होती ती नष्ट झाली आणि आपल्यावर माया करणारी मंडळी आपल्या देशात आहे याचा अनुभव आला. सन २०१४ नंतर केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर ईशान्य कडील राज्यांच्या विकास साठी भरीव आर्थिक मदतीची तरतूद केली आणि  या राज्यांचा विकास होऊ लागला. संघाची माया आणि केंद्रातील भाजपा सरकारचा आधार या दोन गोष्टीमूळे या भागातील बहुतांश राज्यातील मिशनरी, डावे, आणि जिहादी लोकांच्या हातातून प्रत्येक क्षेत्रातील सत्ता गेली. मी मुद्दामहून प्रत्येक क्षेत्राची सत्ता असा शब्द प्रयोग केला. याचे कारण तिथे मालक काॅग्रेस, डावे पक्ष, त्यांच्या टोळ्या, त्यांचे गट आणि मिशनरी इत्यादी मंडळी आणि जनता वेठबिगारी अशी स्थिती होती. पण या मालक मंडळीची सत्ता गेली आणि नशा उतरली.  त्यामूळे ही मंडळी सैरभैर झाली आहे. जसे की पाण्यातून मासे बाहेर काढले की कसे तडफडतात तशी अवस्था या तिन्ही गटांची झाली. पण मृत झाली नाहीत. कारण यांना जिवंत राहण्यासाठी मदत शत्रू देशांनी केली आहे. त्रिपुरा हे ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य. तिथे भाजपाचे सरकार आहे. म्हणून सोशल मिडीयावर फेक न्युज प्रसारीत करण्याचे तंत्र चीनला चांगले अवगत आहे. त्याने त्रिपूरात आपले थोडे फार शिष्य शिल्लक आहेत त्यांच्या कडून अफवा पसरविण्याचे  काम पार पाडले असावे.

आता दंगली कुठे घडवयाच्या हा प्रश्न त्या तिन्ही गटांना पडला असावा. पण तो ही प्रश्न सुटला. कारण या तिन्ही गटांचे प्रतिनिधीत्व करणारे तीन पक्षांचे मविआ सरकार आयते मिळाले आहेच.  महाराष्ट्रातील या सरकारने स्थापनेपासूनच केंद्र सरकारशी संघर्ष कसा करावा याच्या तालमी केल्या आहेत. म्हणून महाराष्ट्राची निवड झाली असावी. आणखिन एक कारण असे आहे की, महाराष्ट्रातला प्रयोग देशभर करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांचा आहे. पण तो सफल होणार नाही. कारण हे सरकार प्रचंडपणे गोत्यात आले आहे. त्यावर चर्चा लेखाच्या सामारोपात होईल.

नंतर दंगल घडविण्याचे काम कोणाकडे द्यावयाचे हा प्रश्न उभा राहिला असावा. दशहतवादी दंगल घडविण्यात माहिर आहेत. पण कॅमेरा फूटेज तंत्र फार अद्यावत झाले आहे. त्यामूळे दंगल घडविण्याचे काम दशहतवाद्यांकडे सोपविले तर गुन्हाचा शोध, तपास केंद्रीय एजन्सीकडे जाईल. अलिकडेच मविआ सरकार स्वतःच्या चूकांवर पांघरूण घालण्यासाठी केंद्र सरकारवर प्रतिहल्ला करीत राहीले, त्यामूळे प्रतिहल्याचा तपास केंद्रीय एजन्सीकडे जात राहीला आणि सरकार चिखलात रूतत गेले हा अनुभव गाठीशी असल्यामूळे दशहतवाद्यांचा वापर करण्याचा बेत रहीत झाला असावा.

मग मोर्चा, बंद आणि फोडतोडीच्या कृत्यात तीन वेळा यशस्वी झालेल्या अशा शिक्षण आणि सेवा याचे व्रत घेतलेल्या रजा ॲकेडमीला दंगल करण्याची जबाबदारी दिली.  रजा ॲकेडमीने मोर्चा आणि बंद, यशस्वी करण्यासाठी  १५ वर्षाखालील विद्यार्थ्यांना सामावून घेतले आणि  दगडफेक, हिंसक कृत्ये, आणि सपंत्तीच्या नासाडीचे काम त्यांच्या हस्ते फस्त केले. कारण हे की  कॅमेरा फूटेज मधून या विद्यार्थ्यानी तोडफोड केली हे दिसले आणि गुन्हा सिद्ध झाला तरी जेलची हवा खाण्याची शिक्षा न होता Child Rehabilation गृहात त्यांची रवानगी होईल.

एकंदरीत त्रिपुरात अफवा, आणि मोर्चा, बंद, दंगल, हिंदु समाजावर हल्ले  महाराष्ट्रात करावयाची ही योजना पुर्वनियोजित होती. या निष्कर्षाप्रत आपण आलो आहोत. या निष्कर्षात किती तथ्य आहे हे आपण या लेखाच्या भाग २ मध्ये पाहू या.
(या लेखाचा भाग २ सोबत खाली जोडला आहे )

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

महाराष्ट्रातले राजकारण -- बदलते पण भरकटणारे



महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षाचे नेते श्री देंवेद्र फडणवीसांनी दिवाळी नंतर बाॅम्ब फोडणार आहे असे म्हटले होते. त्याप्रमाणे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकने कुर्ला येथे अन्डरवर्ल्ड डाॅन दाउद इब्राहीमच्या  मालकीची जमीन आघाडी सरकारच्या काळात कवडी मोलात खरेदी केली आहे, हे पुराव्यासकट दाखविले. यात भ्रष्टाचार  झालाच शिवाय सरकारचा महसूल ही गेला आणि महत्वाचं म्हणजे most wanted अशा गुन्हेगार दाऊद इब्राहीमशी संबंध उघड झाले. त्यासंबंधीत नवाब मलिकने त्यांचे जमीन खरेदी प्रकरण हे कायदेशीर आहे असे उत्तर दिले. पण दाऊद इब्राहीमशी संबंध हा कायद्याचा भंग झालाय त्याचे काय? मी हैड्रोजन बाॅम्ब फोडणार आहे आणि त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसाचे अन्डरवर्ल्डशी संबंध आहेत हे दाखविणार आहे अशी घोषणा ही त्यांनी केली. दुसर्या दिवशी नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन काही फोटो दाखवित फडणवीस वर आरोप केले. तो पोरखेळ झाला. त्यावर भाजपाच्या ॲडव्होकेट शेलारांनी प्रत्येक आरोपाचे फोटो सकट संयमाने खंडन करून मुख्यमंत्री ठाकरेंनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा अशी विनंती केली.

भाजपाच्या दोन आणि  नवाब मलिकांच्या दोन अशा एकूण चार पत्रकार परिषदा झाल्या. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या. तटस्थेने पाहता या चार पत्रकार परिषदेतील नवाब मलिकांच्या दोन्ही पत्रकार परिषदेत दम दिसला नाही. काही तरी हरवल्यासारखे त्यांची चर्या दिसत होती.  फडणवीसांची पत्रकार परिषद नेहमीच सकारात्मक, परखड, आणि मुद्यांना धरून असते.  काही निःपक्ष पत्रकारांचे मत असे आहे की देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेचे वैशिष्ट असे आहे की ते आरोप करतेवेळीच पुरावे सादर करीत असतात. ते आमदार झाल्यापासून आजतागायत त्यांच्या पत्रकार परिषद आणि अधिवेशनातील भाषणें आकडेवारी आणि पुराव्या सकट असतात.  त्याच्यांत ठायी ठायी आत्मविश्वास असतो.  पत्रकार परिषदेत नवाब मलिकांने खरेदी केलेल्या जमिनीचे पुरावे त्यांनी दाखविलेच शिवाय हे पुरावे Competant Authority कडे सुपूर्द करणार आहेत अशी पुष्टी ही त्यांनी जोडली. 

नवाब मलिकांनी  फडणविसांच्या विरोधातले पुरावे म्हणून फोटो दाखविले. पण ते पुरावे उचीत संस्थेकडे सादर करणार आहे अशी पत्रकांराना हमी दिली नाही. नवाब मलिकांना एक दिवसाचा अवधी असताना, नवाब मलिक पुर्णपणे तयारी करून, देंवेंद्र फडणविसांवर बदनामीची केस  दाखल करून पत्रकार परिषद घेण्यासाठी उपस्थित असते तर प्रथमदर्शनी ते प्रामाणिक तसेच न्यायाची बाजू मांडत आहेत असे सिद्ध झाले असते. पण तसे झाले नाही.  याचा अर्थ नवाब मलिक बॅकफूटवर गेले आहेत असे दिसले. या प्रकरणात जो पत्रकार परिषद-रूपी खेळ झाला त्या खेळातील  Man of the match भाजपाचे ॲडव्होकेट शेलार ठरले. त्यांनी पत्रकार परिषदेत नवाब मलिकांच्या प्रत्येक आरोपाला सडेतोड उत्तरे दिले. त्यांचा अभ्यास आणि आत्मविश्वास वाखण्यासारखा होता. शिवाय भाजपाच्या राजकीय विचारसरणीचा तसेच कार्यकर्ते आणि नेत्यांचे आचरण या गोष्टींचा आवश्यक तिथे उल्लेख करून त्यांच्यातील राजकीय जाण किती प्रगल्भ आहे याचे प्रात्यक्षिक दाखविले. शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा अशी सुचना ऐवजी विनंती केली. यावरून राजकीय शिष्टाचार कसा पाळावा याचा पाठ संजय राऊत, जितेंद्र आव्हाड इत्यादी राजकीय नेत्यांनी गिरवावा हे अप्रत्यक्ष रित्या त्यांनी सुचित केले आहे.

मागील लेखात अनिल देशमुखांच्या पाठोपाठ नवाब मलिकांची अटक होऊ शकते असे मी म्हटले आहे. आर्यन खानच्या क्रुझ पार्टीतील ड्रग प्रकरणातील अटक हा एनसीबीचे झोनल डायरेक्टर समिर वानखेडेनी खंडणी वसूली साठी केलेला एक बनाव आहे असे दाखविण्याच्या प्रयत्न नवाब मलिकांनी सुरू केला.  त्यांचाच कित्ता काही प्रिन्ट आणि इलेक्ट्राॅनिक्स मिडीया गिरवित आहेत. नवाब मलिक यांच्याकडे खरोखरीच एनसीबी वसूली करीत असल्याचे पुरावे असतील तर  एव्हाना त्यांनी कोर्टात योग्य त्या कलमाखाली फिर्याद दाखल करणे आवश्यक होते. पण तसे काही केले नाही. नवाब जी, केवळ स्वतःने केलेले विडीओ क्लिप दाखवून लोक तुमचे मत खरे मानतील असा जमाना संपला आहे. आर्यनखानची अटक ही नवाब मलिकांच्या खात्याशी संबधित नाही, तरीही नवाब मलिकांनी आर्यन खानला मदत करण्यासाठी इतका पुढाकार का घेतला? जर पुढाकार स्वच्छ ध्येयासाठी असता तर मग आर्यनखानला  चांगल्यातला चांगला वकील मिळविण्यासाठी नवाब मलिकने काही प्रयत्न का केले नाहीत?  रोज पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडेवर आरोप करीत राहिले. पण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि मविआ सरकारचे अध्वर्यु शरद पवार यांनी या प्रकरणावर भाष्य तर सोडा पण एक चकार शब्द वा वाक्य ही उच्चारले नाही.  तिसरा घटक पक्ष काॅग्रेस तलावाच्या काठी झोपेचं सोंग घेतलेल्या बगळ्यासारखा बसलेला आहे. त्यामूळे नवाब मलिकांच्या मुलाला समीर वानखेडेंनी सहा महिने ड्रग्ज सेवनाच्या गुन्ह्यामूळे जेल मध्ये डांबले होते, त्याचा बदला नवाब मलिक घेत आहेत असा अनेकांचा समज  झाला.  पण तसा समज निर्माण व्हावा अशी राजकीय खेळी मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवारांनी रचली असावी का?, की आर्यनखानला अटक करण्यामागचे खरे सुत्रधारच नवाब मलिक आहेत का?, असे प्रश्न जे  लोकांच्या मनात उभे राहीले आहेत ते झाले नसते.  नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंना गोवण्याच्या ज्या खटपटी सुरू केल्या आहेत त्यातून फायदा झालाच तर तो, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना हवाच होता हे मी मागील लेखात याच कारणासाठी मांडले आहे. देवेंद्र फडणविसांच्या पत्रकार परिषदेत झालेल्या गौप्यस्पोटामूळे नवाब मलिकांचा डायरेक्ट दाऊद इब्राहीमशी संबंध होता व आज ही आहे हे जगजाहीर झाले आहे. जगजाहीर झाले असे मी का म्हणतोय याचे कारण ते फडणविंसा विरूद्ध बदनामीची केस  फाईल करण्याची तयारी दाखवित नाही. आपल्या विरूद्ध किंवा आपण ज्यांच्या विरोधी आरोप करतो आणि आपण स्वच्छ असू तर कोर्टाच्या पायरीवर पहिले पाऊल आपलेच पडायला हवे की नाही ? आपल्याला सत्याची चाड आहे याचे निकष म्हणा वा कसोटी या पेक्षा अन्य कुठल्याही मार्गाने तपासली जात नाही. मला वाटतं नवाब मलिकांचा अन्डरवर्ल्डशी  घनिष्ठ संबंध असल्यामूळेच नवाब मलिकांना या प्रकरणासाठी ढाल म्हणून वापरण्यात आले असावे आणि त्याच ढालीला पुढे बळीचा बकरा बनविण्याची योजना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची असावी.

आता पुढे काय होणार ? यावर चर्चा करण्यापेक्षा आपण वाट पाहात बसणे हे अधिक श्रेयस्कर आहे.  कारण राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचारांच्या केसेसच्या फाईल्स धूळ खात सरकारी दरबारात पडून राहातात हा आपला सार्वत्रिक अनुभव आहे. राजकीय फायदा-तोट्याचे म्हणाल तर मविआ सरकारला नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा लागेल असे दिसते. मविआ सरकारमधील मंत्र्याचे अन्डरवर्ल्ड जगताशी संबंध  आहेत हे जनतेच्या मनात बिंबविण्यात भाजपाला यश मिळाले आहे. याचा परिणाम मविआ सरकारवर आताच काय होईल असे दिसत नाही. कारण नवाब मलिक संबंधीत यासंबंधीत विचार केला तर शिवसेनेला फारसा फरक पडणार नाही. कारण हा आरोप-प्रत्यारोपाचा खेळ बंद व्हावयास हवा असे संजय राऊतने लागलीच पत्रकार परिषद घेऊन उपाय सुचविला. का सुचविला असावा?  अनिल देशमुखावर पाळी आली तशी पाळी आपल्या अनिल परब वर येऊ नये म्हणून केंद्र सरकारशी आपण प्रत्यक्ष का लढावे असा ही  शिवसेनेचा हेतू असावा. हेतू काहीही असो  शिवसेनेला हे प्रकरण अंगावर शेकवून घ्यावयाचे नाही हे स्पष्ट दिसते.  दुसरे असे की जो पर्यंत आपण मुख्यमंत्री पदावर आहोत तो पर्यंत सीबीआय, ईडी, एनसीबी, एनआयए इत्यादी एजन्सी कडून आपला पाठलाग होणार नाही अशा निश्चिंतीत राहावयास मिळावे हा मुख्यमंत्र्याचा हेतू असावा. त्यासाठी सरकार तर  टिकवयाला हवे आणि सरकार टिकावयाचे असेल तर घटक पक्षांची मर्जी सांभाळावी लागते. म्हणून डबल ढोलकीचा उपयोग संजय राऊत आणि उद्धव ठाकरे अधून- मधून करीत असतात. मविआ सरकार सत्तेवर आल्यापासून हाच खेळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील  राजकारण बदलते पण भरटकणारे का झाले आहे याचे कारण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची कमालीची हाव सुटली. एखाद्या गोष्टीची हाव पुरी करण्यासाठी  येथून तेथून पळत सुटावे लागते. त्यातून आपली वाट चुकते. एकदा का वाट सुटली की आपली मानसिक स्थिती भरकटल्या सारखी होते ती पुन्हा ताळ्यावर यावयास बराच कालावधी जावा लागतो. म्हणून मविआ सरकारला धोका नाही.

काॅग्रेसच्या नाना पाटोळेंनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा असा सूर लावला आहे. पण तो थोडासा दबक्या आवाजात. या सार्या प्रकरणात काॅग्रेस तमाशा बघत आहे. ते ही स्वाभाविक आहे. कारण मविआ सरकारला कायमचं अनलाॅक करण्याची चावी काॅग्रेसकडे आहे, आणि त्या चावीचा योग्य वेळी उपयोग दिल्लीतील काॅग्रेस श्रेष्ठी करतील. तोटा झाला तो शरद पवारांच्या पक्षाचा. दाऊद इब्राहीम शी शरद पवारांचा संबंध आहे हे फार पुर्वी भाजपाचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडेनी जगभर जाहीर केले. तेव्हापासून राष्ट्रवादी काॅग्रेसची महाराष्ट्रात ताकद वाढविण्याच्या शक्तीचा क्षय झाला आहे. आता पुन्हा तेच भूत शरद पवारांच्या मनगुटीवर बसले आहे. भाजापाच्या आशिश शेलारांनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा अशी विनंती मुख्यंमत्र्यांना करून शिवसेनेच्या बाबतीत केंद्र सरकार नरम राहील अशी अप्रत्यक्ष हमी दिली असावी.  सध्या राष्ट्रवादी पक्षाला टार्गेट केले असताना शिवसेनेला थोडी उसंत द्यावी, ज्यातून तिच्या एखाद्या नेत्याला भाजपाच्या अंगावर जाण्याची खुमखूमी यावी मग त्या नेत्याला घेरावे असेही चाल भाजपाची असू शकते. बाकी शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेसने त्यांच्या पाठिशी असलेल्या बाहूबली शक्तीचा कितीही बाऊ केला तरी मोदी-शहा-नड्डाचा भाजपा अशा प्रकारच्या राजकारणाची तमा बाळगत नाही.  मविआ सरकार आपणहून पाडावयाचे नाही. ते पाडण्यासाठी  काॅग्रेस साठी मैदान खुले ठेवील अशी भाजपाचे धोरण दिसते. 

महाराष्ट्रातील काॅग्रेस पक्षाने याच वेळी सरकारचा पाठींबा काढून घेतला तरी चालण्यासारखे आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांमूळे मविआ सरकारची प्रतिमा खंडणी वसूली, महिलांना पिडा देणारे, पोलीस यंत्रणेचा गैरवापर करणारे, भ्रष्टाचाराच्या चिखलाने माखलेले अशी झाली आहे.  ही सबब काॅग्रेसला प्रचारात वापरता येणार आहे. मविआ सरकारचा पाठींबा काढून घेण्यासाठी सद्य स्थितीपेक्षा अधिक योग्य वेळ पुढील काळात येईल असे काॅग्रेसला वाटत असावे. सरकार मध्ये राहून वाद निर्माण झालेल्या प्रकरणात मौन पाळावे आणि वेळ येईल तेव्हा ठाकरे सरकारवर टिका करण्याचा ऑप्शन काॅग्रेस स्विकारेल असे वाटते.

राहात राहिला प्रश्न समीर वानखेडेंच्या वडीलांनी नवाब मलिकांच्या विरोधात दाखल केलेल्या बदनामीची फिर्यादी संबंधीचा. कोर्टाने समीर वानखेडेच्या वडीलांना आणि नवाब मलिकांना या केसेस संबंधीचे आपआपले पुरावे सादर करण्याची नोटीस पाठविली आहे. हा लेख लिहतेवेळी आलेली बातमी अशी आहे की समीर वानखेच्या वडीलांनी २८ दस्तऐवज न्यायालयात दाखल केले आहेत. त्यावर नवाब मलिकांच्या वकिलांनी त्यात फेरफार केले आहेत असे असा आक्षेप घेतला आहे. मुळात आर्यन खानच्या केस संबंधी च्या खटल्याच्या निकालावर या प्रकारणाचा काही परिणाम होत नाही. आरोप नवाब मलिकांनी केले आहेत. त्यामूळे समीरच्या वडीलांनी दाखल केलेले दस्तऐवज खरे आहेत की खोटे त्यासाठी  पुरावे नवाब मलिकांनाच द्यावे लागणार आहेत. या शिवाय समीर वानखेडे संबंधी एनसीबीने अधिकृत रित्या डिपार्टमेंटल चौकशी हाती घेतली आहे. तसेच समीर साटम यांना क्रुझ पार्टी आणि ड्रग्जचा शोध तपासावरील कार्यातून मुक्त केले आहे.  समजा जात आणि धर्म या संबंधीतल्या खरे-खोटेपणात  समीर वानखेडे अडकले तर एनसीबी वर दोष येणार नाही. कारण समीर वानखेडेंना थेट एनसीबीच्या कार्यालयात नोकरी मिळाली नसावीच. दुसरे असे की समीर वानखेडे प्रशासिकय सेवेत सामिल झाले त्यावेळी केंद्रात भाजपाचे सरकार नव्हते. त्यावेळी जे सरकार होते, जे प्रशासकीय अधिकारी होते त्यांनीच समीर वानखेडें यांचा जन्म, जात, धर्म, शिक्षण आणि पदवी इत्यादी दाखले तपासले असणार. म्हणून या प्रकरणात भाजपावर  आरोप केले तरी ते सिद्ध करणे कठीण आहे. यावरून असे स्पष्ट दिसते की नवाब मलिकांनी स्वतःहून नसत्या अडचणी निर्माण केल्या आहेत.

मूळ केस ड्रगचा साठा आणि त्याचा सर्रास सेवन ही आहे. नंतर त्या संदर्भातील उठलेले  वसूलीकांडाचे वादळ ही आणखिन महत्वाची केस आहे. परंतु फडणवीस विरूद्ध नवाब मलिक ही केस भरकटलेल्या राजकारणाचा प्रकार ठरला याचे कारण म्हणजे नवाब मलिकांनी नाही तिथे नाक खुपसले. मुळची केस ड्रग्ज संबंधीत. म्हणजे थेट नॅशनल सेक्युरीटी, ड्रग्ज प्रोहीबेशन ॲक्ट, भ्रष्टाचार, देशांतर्गत सुरक्षा  इत्यादी विषयाशी निगडीत असल्यामूळे या केस संबंधीचा तपास समीर वानखेडे सारख्या झोनल डायरेक्टर ऐवजी Higher ups म्हणजे केंद्रीय स्तरावरील अधिकार्याकडे देण्याचा निर्णय एनसीबीने घेतला. समीर वानखेडेना या केसच्या तपास कार्याच्या मुख्य भूमिकेतून मुक्त केले आहे. पण एनसीबीच्या तपास कार्यात ते सहाय्यक म्हणून काम करणार आहेतच. ही सबब सर्वांच्या गळी उतरेल अशी आहे. या बाबत मविआ सरकारला कोर्टात भांडण मांडून ही काही उपयोग होणार नाही. दुसरे असे आहे की  हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाला सुप्रिम कोर्टात आव्हान देता येते. त्यामूळे ही केस अत्यंत तातडीच्या गटात मोडत नाही. म्हणून या केसचा अंतिम निर्णय येण्यासाठी विलंब लागणार आहे हे धरून चालावे.

एकंदरीत महाराष्ट्रातील आजचे क्षणा-क्षणाला बदलत जाणारे आणि भरकटणारे राजकारण  असेच चालू राहील असे मला वाटते. त्याला दोषी कोण याचे उत्तर मराठी जनता पुढील निवडणूकीत देईल. तुर्तास मविआ सरकारला साठ ते सत्तर टक्के तर भाजपाला तीस ते पत्तीस टक्के जबाबदार मानता येते. म्हणून  मागील लेखात भूतपूर्व रिझर्व बँकेचे गव्हर्नर रंगनाथन जे डाॅ मनमोहनसिंगाच्या सरकारचे FAC चे चेअरमन असतेवेळीचे भाषण केले होते त्या भाषणाचा शेवटचा भाग आपल्या पुढे मांडला नव्हता, तो खाली देत आहे. पण त्या अगोदर तत्कालीन सीबीआचे डायरेक्टर आपल्या welcome address मध्ये काय म्हणाले आहेत ते प्रथम देतो. (टाईम्स ऑफ इंडीया या वृत्तपत्रातील सदरहू कार्यक्रमाच्या बातमीचे कात्रण माझ्याकडे आहे)

Earlier in his welcome address CBI director Vijay Shankar said that " over the years the agency as evolved as the premier investigating agency with high credibility, exemplary professionalism, and quiet efficiancy through commitment, sincerity, hard work and integrity displayed by it's officers and men ". भाषणाचा हाच धागा पकडून सी रंगनाथन आपल्या भाषणाचा शेवट करताना काय म्हणाले आहेत हे खाली देत आहे ---

C Ranganathan, asked the CBI " to ask itself some questions like how come there are so few people caught for corruption when there are so many people to be corrupt ? How come it takes so long time to complete prosecution in spite of so many specialised agencies are there for enforcement and deliver of the justice? How come conviction rate is so poor? "

वाचक हो, सी रंगनाथन यांचे भाषण डाॅ मनमोहनसिंग यांच्या सरकार काळातील आहे. ते भाषण युपीए सरकारला अधिक लागू होते कारण तेव्हा आर्थिक घोटाळ्याची लाट होती. तसेच आजच्या मोदी सरकारला ही लागू पडते. कारण हाती घेतलेल्या भ्रष्टाचाराच्या केसेस चा निकाल कधी लागेल हे ठामपणे सांगता येत नाही. भ्रष्टाचार हा विकासाच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा असतो. प्रशासनात म्हणजेच सरकार दरबारात लाच देणारा आणि लाच घेणारा दोघे ही जबाबदार असतात. हे दोघे ही देशाचे नागरिक आहेत.  शेवटी " Progress of the nation is far less depend upon the form of it's institution rather than character of it's own men." हाच राज्यव्यवस्थेचा आणि पर्ययाने राज्याच्या, देशाच्या प्रगती संबंधीत सृष्टीत असलेला शाश्वत सिद्धांत आहे. तो आपल्या येथे कधी अमंलात येईल या  प्रश्नाचे उत्तर कोण देणार ? लोकशाहीत कोणी राजे-महाराज नसतात. म्हणून राजा कालस्य कारणम् या ऐवजी आपण प्रजा कालस्य कारणम् असे मानू या.

शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०२१

अनिल देशमुखांची इडीने केलेली अटक आणि भ्रष्टाचारा विरोधी सुरू झालेली लढत



आर्यनखानच्या जामीना भोवती फिरणार्या राजकारणावर १ नोव्हंबरला लेख पब्लीश केला, त्या लेखाच्या शेवटच्या पॅरात मी म्हटले आहे की,
शरद पवार आपल्या जीवनाच्या सर्वात मोठ्या बॅड पॅचमधून जात आहेत. ते खरे ठरले आहे. दुसर्या दिवशी , सवयी प्रमाणे रात्री उशीरा मी यु ट्युब वरून निरनिराळ्या न्यूज चॅनलवर फेरफटका मारू लागलो. तेव्हा रात्रीचे अकरा वाजले  होते. पाहता पाहता नजर खिळली ती रिपब्लीक टि व्ही चॅनेलवर ! तातडीचे लाईव चर्चा सत्र सुरू होते. त्यात संपादक अर्नब गोस्वामी आपल्यावर कसा ठाकरे सरकारने अन्याय केला  या संबंधीचा आक्रोश ऐकवित होते. रिपब्लिक टिव्ही च्या वार्ताहराने रात्री उशिरा  महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमूखांची इडीच्या ऑफीसमध्ये दुपारी १२ वाजल्या पासून चौकशी सुरू असल्याची बातमी दिली होती, त्यावर ते चर्चा सत्र सुरू होते. ते चर्चा सत्र संपल्यानंतर त्याच चॅनेलवरून मध्यरात्री एक वाजता अनिल देशमुखांना ईडीने अटक केल्याची बातमी आली. ज्या चॅनेलच्या संपादकांना ठाकरे सरकारने थर्ड रेट ट्रिटमेंट दिली त्याच चॅनेलनी ही बातमी सर्वात प्रथम दिली. हा निव्वळ योगायोग नव्हे. ठाकरे सरकाराचा पापाचा घडा भरला असे म्हणावेसे वाटले कारण अर्णव गोस्वामी आणि कंगना रानावट यांना जो त्रास दिला ते सुसंकृत सरकारचे लक्षण नव्हते.  सध्या राजकारणी लोकांच्या पैशाने मिंधे होऊन गेलेले इतर चॅनेलचे संपादक फाईव्ह स्टार हाॅटेलात दारूच्या नशेत जेवण आटोपून आपआपल्या घरी घोरत होते, तेव्हा अर्णव सारखे संपादक राजाच्या दरबारात खरोखरीच प्रजा हिताचे कामें होत आहेत की प्रजेच्या पैशाची लूट चालली आहे हे पाहण्यासाठी  दिवस-रात्र प्रचंड मेहनत करीत राहात आहेत. मेहनत पण कशी? राजकीय नेत्यांनी तयार केलेल्या प्रलोभनांना आपल्या पायाखाली चिरडून. लोकशाहीवर प्रंचड निष्ठा ठेवून, आपल्याला कदाचित प्राण पण गमवावे लागेल या भितीची तमा न बाळगता जी मेहनत असते त्यालाच कडी मेहनत म्हटले जाते. अर्नब गोस्वामी प्रचंड मेहनत करतात.  सत्याची कास धरून जनतेचं भले कशात आहे यासाठीच पत्रकारीता करणार्या काही मोजक्या पत्रकार आणि संपादकांच्या यादीत अर्नव गोस्वामी अग्रणी स्थानावर आहेत. अर्थात त्यांच्या चॅनेलवरील चर्चा सत्राचा लाईव्ह कार्यक्रमातल्या Noise मुळे मी टिव्ही पेक्षा On mobile with hear aids ने ऐकत पाहतो. असे असले तरी त्यांच्या पत्रकारीतेच्या जागोजाग भरलेली कर्तव्याची जाण आणि तळमळ या दोन्ही गोष्टी  साहस दाखवून टिव्ही वरून व्यक्त होते यासाठी त्यांना हॅट्स ऑफ ! 

मागील लेख मालीकेत मी म्हटले आहे, की मोदी सरकार महाराष्ट, पश्चीम बंगाल, आणि दिल्ली या तिन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना योग्य तो धडा योग्य त्या वेळी देईल. कबड्डी खेळात जो संघ, प्रतिपक्षाच्या खेळाडूच्या चढाईच्या वेळी, त्याला आपल्या लाॅबीच्या शेवटी आपले पाय लागण्याइतपत आतमध्ये येऊ देतो आणि जेव्हा त्या खेळाडूला दम लागला की पकड करतो तो संघ विजयी होत असतो. राजकारणात प्रतिपक्षाच्या चाली तसेच त्यांचे अवगूण आवर्जून ओळखावे लागतात. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी कपट करून सत्ता बळकाविली. पण काय मिळविले? पदरात आपआपल्या  टीम मधील खेळाडूंच्या पाठीमागे केंद्रीय एजन्सीचा ससेमिरा लागला आहे.

विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधी केंद्रीय तपास एजन्सीचा ससेमिरा लावणे हे केद्र सरकारचे हत्यार आहे. ही वास्तविकता स्वातंत्र्यानंतर लागलीच दिसून आली आहे. त्यासंबंधी आता टिका होत आहे याबद्दल नवल वाटावयास नको. तरी ही  सीबीआय, ईडी, आणि एनसीबी, एनआयए इत्यादी एजन्सीज नेहमीच खोट्या केसेस तयार करीत नसतात. हे तर सत्य आहे. तसेच हे ही सत्य आहे की राजकीय नेत्यांला भ्रष्टाचार बद्दल कायमची अद्दल घडली आहे अशी उदाहरणे फारच कमी आहेत. याचा अर्थ केंद्रातले सरकार कुठल्या ही पक्षाचे असले तरी ते केंद्रीय एजन्सीचा हत्यार म्हणून वापर करते, पण शेवटी राजकीय पक्षांत या विषयापुरता समेट होत असतो. मोदी सरकार ने गेल्या सात वर्षात  संविधानतले कलम ३५६ चा वापर करून विरोधी पक्षांचे कुठलेही राज्य सरकार बरखास्त केले नाही या वरून स्पष्ट होत आहे की राज्यातील सरकारांना संघीय राज्यव्यवस्थेतल्या हक्कांवर आणि हितावर मोदी सरकारने गदा हाणली नाही. संविधानानुसार केंद्रीय एजन्सींना जे काही तपास हक्क प्राप्त होतात ते बहुतांश राष्ट्रीय सुरक्षा, देशाचे सार्वभौमत्व, कायदा आणि सुव्यवस्था इत्यादी विषयाशी निगडीत असतात. पण या कलमांचे भान महाराष्ट्र, पश्चीम बंगाल, दिल्ली या राज्यांनी ठेवले नाही.

सन १९८९-९० पासून देशात केंद्र स्थानी आघाडीचे सरकार स्थानापन्न होत असलेले आपण पाहिले.  तेव्हापासून सन २०१४ पर्यंत १९९९ -२००४ या काळातील अटल बिहारी वाजपेयीचे सरकार वगळता केंद्रात काॅग्रेस-आघाडीची सत्ता राहीली. या काळात भाजपाचे बालकिल्ले समजले जाणार्या राज्यात भाजपाची सत्ता होती. त्यावेळी त्या त्या राज्यातील भाजपा सरकारने केंद्र सरकारशी कुठल्याही प्रकारचा तंटा उभा केल्याचे एक ही उदाहरण नाही. २०१४ पासून ते आज तागायत मोदी सरकारच्या विरोधात पश्चीम बंगाल, महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, तामीळनाडू, पंजाब इत्यादी राज्यातील विरोधी पक्षांचे सत्ताधारी केंद्र सरकारशी किती उद्दाम आणि उद्धट व्यवहार करीत आहेत यावर तटस्थ एजन्सीं किंवा समितीकडे तपास करावयास दिला तर विरोधी पक्षांचा व्यवहार  स्पष्टपणे अहवालाद्वारे कागदावर सिद्ध झालेला दिसून येईल. अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे.  परंतु ज्या राज्यात भाजपाची शक्ती वर्षानुवर्षे वाढलीच नाही अशा राज्यात भाजपाचे सरकार येऊ लागले या वरून तरी सिद्ध होत आहे की विरोधी पक्षांचा केंद्र सरकारशी असलेला व्यवहार विरोधी पक्षानांच नडतो आहे. दुसरे असे आहे की विरोधी पक्षांची तळी उचलून धरणारे मिडीया हाऊस, लिबरल विचारवंत, साहित्यिक, कलाकार यांचा भाजपा, संघ आणि मोदी बाबतचा द्वेष भाजपाची शक्ती वाढविण्यात मदत करीत आहे. त्यामूळे दुर्दैवाने राष्ट्रीय स्तरावरील राजकारणाचे स्वरूप घाणेरडे होत चालले आहे. 

संविधानातील ३५६ कलमाचा आधार घेऊन विरोधी पक्षांची सरकार बरखास्त करण्याइतपत विरोधी पक्षांचा व्यवहार होऊनही विद्यमान केंद्र सरकारने ते पाऊल उचलले नाही. इतकेच नव्हे तर खुद्द राजधानीत शाहीन बाग येथील धरणं, सर्वसामान्य दिल्लीकरांच्या जाण्या-येण्यात अडथळा निर्माण करीत असताना ही मोदी सरकारने कमालीचा संयम पाळला. मुस्लीम  पर्सनल ॲक्ट ला हात लावयाची हिम्मत स्वातंत्र्यानंतर एकाही सरकारला  झाली नाही. पण मोदी सरकारने ट्रिपल तलाक रद्दबादल करून मुस्लीम स्त्रियांना न्याय दिला. हे कार्य खरे तर पुरोगामी तत्वातले आहे पण आपल्या येथील तथाकथित पुरोगामी पक्षांना रूचले नाही.  जम्मू आणि काश्मीर राज्यासाठी असलेले ३७० कलम हे देशाच्या प्रगतीला मारक ठरले होते. कोट्यावधी रूपये केवळ दशहतवादी आणि अलगावादी विचारांच्या लोकांना स्थानिक पक्ष सहकार्य देत राहिल्यामूळे पाण्यात जात होते. ते कलम मोदी सरकारने रद्दबादल केले. हे एक महत्वाचे राष्ट्रीय हिताचे कार्य मोदी सरकारने केले याबाबत विरोधी पक्ष कौतूक करीत नाहीत. मग देशातील राजकारण पोलाराईज्ड होत असेल,आणि त्यातून  तमाम विरोधी पक्षांची प्रतिमा राष्ट्रविरोधी होत असेल तर भाजपा आणि संघाला दोष देण्यात काय अर्थ आहे ?

दिल्लीतील किसान मेळाव्या संबंधी मी म्हटले होते की राजकारणात  wait and watch ही माघार नसते. ही चाल असते. सर्व विरोधी पक्षांचे  समर्थन असणार्या किसान आंदोलनाचा जवळपास फज्जा उडाला आहे. प्रजासत्ताक दिनी किसान आंदोलक काहीतरी गडबड करणार असा सुगावा इंटिलीजन्स टीमला लागला असावाच पण कुठल्याही प्रकारे लाठीचार्ज किंवा गोळीबार करून आंदोलन नेस्ताबूत करावयाचे नाही असा ठाम निर्णय मोदी सरकारने घेतलेला होता असे वाटते. या निर्णयाचा किसान आंदोलनच्या पुढार्यानी  ' मोदी सरकार बिथरले आहेत ' असा अर्थ धरला. वस्तुतः किसान आंदोलनाच्या पुढार्यांना एक प्रकारे प्रोवोक केले असावे असे मला वाटते. सरकाचा हेतू काही ही असो पण किसान आंदोलनाचे  पुढारी शेवटी घटीया दर्जाचे ठरले.  इथे सुद्धा कबड्डी खेळातील सावधपणा आणि माघार घेण्याची निती अवलंबविली. जे आंदोलन अराष्ट्रीय वृत्तीच्या हातात आहे अशी मंडळी नको त्या वेळी नको तिथे पराक्रम दाखविण्याची चूक करणार होतेच. प्रजासत्ताक दिनी किसान आंदोलनात राष्ट्रीय ध्वजाचा घोर अपमान झाला. सर्व विरोधी पक्षांची बदनामी झाली. त्यात काॅग्रेसची बदनामी अधिक झाली. कारण पंजाब मधल्या काॅग्रेसच्या म्हणजेच गांधी परिवाराचा वरदहस्त असलेल्या नवज्योत सिध्दुच्या गटाच्या बनावट किसानांचा आंदोलनात पुढाकार  होता. त्यातून पंजाब काॅग्रेसच्या कॅप्टनचा राजीनामा घेतला गेला. आज पंजाब  मधील सत्ता काॅग्रेस जवळपास गमावून बसल्यासारखीच आहे. महाराष्ट्रातले मविआ सरकार तर स्थापनेपासूनच  बेशरम झाले आहे.  सचिन वाझे, परमवीर सिंह, अनिल देशमुख इत्यादींची बदनामी झाली आहेच. अजित पवार अनिल परब, नवाब मलिक यांच्यावरही इडीची टांगती तलवार आहे. पश्चीम बंगालमधील निवडणूक निकालानंतर भाजपा कार्यकर्ते आणि हिंदू बहूल मतदार संघात जो हिंसाचार घडवून आणला, त्यासंबंधीत सुप्रिम कोर्टाने चौकशीचा दंडा मुख्यमंत्री ममता बॅनर्जीवर उगारलेला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री यांच्यावर ही कोरोनाच्या साथीत प्राणवायू सिलेंडर्सचा केलेल्या घोटाळ्याची चौकशी रूपी टांगती तलवार आहे. बाकी मायावती, ममता बॅनर्जी, मुलायम सिंग तसेच अखिलेश यादव इत्यादींनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या केसेस वेळ येत जाईल त्याप्रमाणे ओपन केल्या जातील असे दिसते. 

एकंदरीत देशाच्या राजकीय मैदानावर भाजपाच्या मोदी-शहा यांच्या तुफान गोलंदजीने विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची दाणादाण उडू लागली आहे असे दिसते. या ठिकाणी मला ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लड मधील १९७४ की ७५, साली ऑस्ट्रेलियात झालेल्या ॲशेस मालिकेत इंगलड संघाची जी  वाताहात झाली होती त्याची आठवण झाली. इंग्लड संघाची इतकी वाताहात झाली होती की कर्णधार माईक डेनिसने त्या मालिकेत स्वतः कर्णधार पदावरून पायउतार होऊन स्वतःलाच चौथ्या कसोटीसाठी टिममधून बाहेर काढले होते. चौथ्या कसोटीत ॲलन मॅग्याविलीयन, ख्रिस्तोफार मार्टीन जॅकब तसेच भारतीय पण ऑस्ट्रेलियात स्थाईक झालेले वी एम चक्रपाणी हे काॅमेन्टेटर्स आणि लिन्डल्से हॅसेट ॲस एक्सपर्ट काॅमेन्टेटर, रेडीओ ऑस्ट्रेलिया वरून इन्डीयन स्टॅन्डर्ड टाईम सकाळ सात वाजता  इंग्लड संघाच्या वाताहाताचीचे वर्णन करीत होते. त्या रनिंग काॅमेंट्रीचे बोल आजही आठवतात. ते बोल असे आहेत, "This is Radio Australia, giving you ball by ball discription of 4th test match between Australia and England.  I am Kristhifore Martin Jacob,  and it is 7  am IST  we welcome the listeners from India, South east Asia, with the news that England is in dark trouble for 4th time successivly, in the current series, here at Sydney cricket ground.. Dennis Lillee and Jeff Thomson are on fire. England have lost five wickets for just 27 runs after having put into bat by Australia's Captain Ian Chappell England batsmen are not able to judge the hostile pace and  short  balls from Dennis Lillee and Jeff Thomson. This is perhaps England's weakest team ever played down under." 

आज, भारतातील विरोधी पक्ष कधी ही नव्हते इतके हतबल झाले आहेत. इंग्लंड च्या कर्णधाराने जसे पद सोडले तसे राहूल गांधीनी २०१९ च्या पराभवानंतर  काॅग्रेस पक्षाचा अध्यक्षपद सोडले. मोदी-शहा जोडीचे राजकिय डावपेच विरोधी पक्षांना कळेनासे झाले आहेत. क्रिकेटच्या भाषेत असे म्हणता येईल " Modi and Amit Shah are on fire after having come back to power again here at Delhi in 2019. They have abrogated article 370, 35A in the state of Jammu and Kashmir and declared the state under union territory seperating Ladhak from it and creating as a seperate union territory too. The so called Dharna at Shahin baug, Delhi proved baseless and Kisan Andalone' at Delhi proved a sheer Nonsense. "

सध्या दिवाळीच्या सणांच्या आनंदात आपण सारे असलो तरी मोदी सरकार खरोखरीच आपल्या देशातील सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराची मूळें उपटून काढेल का, की आता पर्यंत होऊन गेलेल्या सरकार सारखेच ' बोलाचा भात आणि बोलाची करी ' ठरेल  असा प्रश्न आपल्या मनात उभा राहिला आहे. पंतप्रधान मोदींना जनतेने  दुसर्यांदा केंद्रातील सत्ता हातात दिली, त्याचे कारण  पाकिस्तानवर दोनदा एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले हे होते. पण फक्त तेवढेच एक कारण होते असे मानता येत नाही.  पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार निपटून काढण्याचे आश्वासन २०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात दिले होते ते ही एक महत्वाचे कारण आहे. " मै कुछ खाऊंगा नही और न किसीको खाने दूंगा "  हे त्यांचे गाजलेले वचन आहे.  हे केवळ आश्वासन ठरणार नाही तर प्रत्यक्षात भ्रष्टाचाराचं निर्मलून होईल अशी मतदारांना आशा लागली आहे. २०२४ पर्यंत या दृष्टीने ठोस पावले उचलली गेली नाही तर मतदारांचा भ्रमनिरास होईल. या भ्रमनिरासाचे स्वरूप ही मोठे असेल. त्याचे उलटे परीणाम जे देशाला भोगावे लागतील त्याची कल्पना करता येणार नाही असे असतील. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनी ' गरीबी हटाव ' ही घोषणा दिली. प्रचंड बहूमत प्राप्त होऊन इंदिरा गांधींना सत्ता मिळाली. त्या सत्तेचा गेरवापर झाला. भ्रष्टाचार वाढला. शेवटी स्वतःच्या मतदार संघातील प्रचारातला गैर प्रकार केल्याबद्दल त्याची निवड अवैध ठरली. त्यातून पुढे आणिबाणी आली. त्यानंतर १९७७, साली त्यांचा पराभव झाला आणि काॅग्रेसचा ही पराभव झाला. मुद्दा हा की कुठल्याही क्षेत्रात आपल्याला मिळालेले यश जर ते  मोठे असेल तर ते पचविणे कठीण होऊन बसते. पुढे मोठी हार ही पत्करावी लागते. त्यातून मिळणार्या यातना मृत्यूहून अधिक वेदनामय असतात. गीतेत  अर्जूनाने शस्त्र खाली टाकले त्यावेळी  भंगवंताने म्हटले आहे, ' संभावितस्य  अकिर्ती मरणात अतिरिच्यते | ' (प्रसिद्धीच्या सर्वोच्च टोकावर असताना अपकिर्ती होईल असे कृत्य घडले तर त्यातून होणार्या यातना या प्रत्यक्ष मरणाहून अधिक वेदनादायक असतात.) पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचाराविरूद्ध उचलेले शस्त्र हे शीव धनुष्यासारखे आहे. त्यांच्या समोर हे फार मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलताना स्वपक्षाचे नेते घायाळ झाले तरी त्यांनी माघार घेऊ नये असे सर्वसामान्यांना वाटत आहे.  बघु या पंतप्रधान मोदी या पुढील तीन वर्षात भ्रष्टाचार निर्मूलनचे आव्हान कसे पेलतात. 

आपल्या देशापुढील सर्वात मोठी समस्या म्हणजे सरकार दरबारातील भ्रष्टाचार हे होय. या संबंधी रिझर्व बँकेचे माजी गवर्नर श्री रंगनाथन जे डाॅ मनमोहनसिंग सरकार मध्ये इकाॅनामिन ॲडव्हाझरी काॅन्सिलचे चेअरमन होते, त्यावेळी ते काय म्हणाले आहेत ते टाईम्स ऑफ इंडीया या वर्तमानात पहिल्या पानावर आले होते. विशेष म्हणजे श्री रंगनाथन हे सीबीआयने सीबीआयचे फाऊंडर डी के कोहली यांच्या सातव्या स्मृती निमित्त आयोजित केलेल्या संमारोहात  प्रमुख वक्ते होते. ते भाषण आपल्यासमोर ठेवून या लेखाची समाप्ती करतो. कारण या विषयावरील चर्चा आजपर्यंत अशीच संपत आलेली आहे. 

" The corruption has become so entrenched in the system that people have totally acquiesced in it. The issue of tainted ministers continues to haunt the country without satisfactory solution. While we denounce corruption in principle, we dont attach any social sanctions against people perceived to be corrupt. We no longer get agiatated against bribes we have to pay because we have already provided for them in our calculations. We are no longer surprised at high cost of public work or the poor quality of public services because we have internalised corruption in our collective psyche."

आपण व आपले उत्सव--मातृदिन (भाग १)

आपण व आपले उत्सव-- मातृदिन   देवीयों और सज्जनो नमस्कार ! हमारी मातृभूमी को देव-देवताओंकी भूमी माना जाता है | इसका कारन हमारे यहाँ सृष्टी हर ...