मंगळवार, १६ मे, २०२३

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि न्यायालयाचा निकाल

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष - स्वरूप आणि सुनावणी या शिर्षकाचा लेख गेल्या फेब्रुवारीच्या २७ तारखेला पब्लीश केला होता. त्या लेखात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय असू शकेल याचे भाकीत River can go no reverse या ओळीतून केले होते. ते खरे ठरले. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या संबंधित पाच-सहा लेखातून ब्लाॅगवर चर्चा केलेली आहे. त्यामुळे आता काही लिहावे असे वाटत नव्हते. तरी ही मी लेख लिहावयास बसलो आहे. याची काही कारणें आहेत. ती मांडून त्यावर चर्चा करीत या लेखाच्या समाप्ती पर्यंत आपण जाणार आहोत.      

१) केसचा निकाल लागला म्हणून महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष संपेल असे वाटत नाही. राजकारण हे असे क्षेत्र आहे की तिथे सतत संघर्ष होत असतात. थोड्या फार प्रमाणात संघर्षाचं स्वरूप बदलत असते तसेच कधीतरी भिडू ही बदललेले दिसतात. आता आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावरून संघर्ष सुरू झालेला दिसतो आहे. जगभरातील सर्वच देशातील राजकारणात अशा स्वरूपाचा संघर्ष असतो. कारण सत्तेचा हव्यास. सत्ता म्हणजे हुकूमत दाखविण्याची वृत्ती. ती सर्व प्राणीमात्रांत जन्मतः कमी अधिक प्रमाणात असते. मानवी जीवनातील सर्वच क्षेत्रात तिचे दर्शन होते. न्यायालयात ही तिचे अस्तित्व असतेच. एकदा का सत्तेची चव चाखली कि तिची सवय होते. त्यातून ती एक प्रकारे नशा बनते. जगाच्या इतिहासात ज्या काही लढाया, युद्धे- महायुद्ध झाली ती त्याच नशेतून. सर्व प्राणीमात्रांत सर्वाधिक प्रगत अशा मानवाची ही कथा, व्यथा आणि दशा आहे. थोडक्यात सृष्टीत ठायी ठायी असलेल्या जीवो जीवस्य जीवनम् या नियमाला अपवाद नाही हेच सत्य.

२) सर्वच क्षेत्रात संघर्ष असतो हा आपला दैनंदिन जीवनातला अनुभव आहे. उदाहरणार्थ पाण्याच्या नळावर, लोकल ट्रेन मध्ये जागा पटकाविताना, रेशनिंग दुकानातल्या रांगेत,  प्रापर्टीच्या हिस्सा, इत्यादी संघर्षाचं कारण आपला स्वार्थ. काॅरपरेट ऑफीस मध्ये सिईओ, चेअरमन, मॅनेजींग डायरेक्टर पदासाठी स्पर्धा असतेच. वरून स्वरूप स्पर्धांचं पण मूळाशी स्वार्थच तो. सरकारी हेड ऑफीसेस पासून ते ग्रामपंचायत स्तरावरील ऑफीसेस पर्यंत सर्वत्र संघर्ष नावाचा माणसांनीच निर्माण केलेला राक्षस व्यापलेला असतो. 

जिथे सर्व प्रकारच्या संघर्षाचं निवारण होते अशा न्यायव्यवस्थेत संघर्ष नसेल असे छातीठोकपणे कोणी ही सांगू शकत नाही. कोणी छातीठोकपणें सांगितले तरी त्यावर समाज विश्वास ठेवेल का ? उत्तर नाही असेच येते. का तर, खोटं सांगण्याच्या वृत्तीचा सर्वत्र इतका कल्लोळ माजला आहे कि त्यातून सत्याचा आवाज ऐकू तरी कसा येणार हो ! त्यात ही कान कवटारून ऐकावे असे ठरविले तरी आपला निश्चय ढासळणारच. कारण  आपण स्वार्थात रंगलेले असतो. 

३)आतापर्यंत आपण केलेल्या चर्चेचा प्रवास समष्टीतून व्यक्ती पर्यंत आला आहे. व्यक्ती कितीही उच्च पदावर असली तरी ती सर्वांशी जवळीक साधू शकत नाही. कारण Man can be civil to all but can not be social to all. Man can be social to many but can not be familiar with many. Man can be familiar with few but can not be friend to few.

कुठलिही व्यक्ती ईश्वरा इतकी निरागस आणि निरपेक्ष असू शकत नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयात ज्या पक्षाचा पराभव झाला आहे तो पक्ष, त्याचे कार्यकर्ते, समर्थक मिडीया न्यायालयाच्या निकालातील आपल्या सोयीचे जे आहे ते ही थोडसं फेरफार करीत त्याची दवंडी पिटविताना दिसत आहेत. तर ज्याचा विजय झाला तो पक्ष सत्याचा विजय झाला असं सांगताना दिसतो आहे.

४) मी वर जे काही मांडले आहे ते सारं काही आपल्याला पटलं असेलच असे नाही. भारताचे सरन्यायाधीश श्री चंद्रचूड याचे निकालपत्र वाचन मी लाईव्ह पाहात होतो. दुसर्या चॅनेल वर काय दाखवित आहे हे पाहण्यासाठी मी चॅनेल बदललं तर तिथे पाहातो तो चक्क उद्धव ठाकरें म्हणत होते की 
' मी राजीनामा देऊन नितीमत्ता पाळली. न्यायालयाने राज्यपालांवर इतके ताशेरे ओढले आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीं नितीमत्ता पाळून राजीनामा द्यावयास हवा.'

उद्धव ठाकरेंनी शिंदेंना नैतिकतेचा  धडा गिरवायला सांगितला त्यावर माझे लक्षच नव्हते. कारण माझ्या मनात ' सरन्यायधिशांचं निकालपत्राचं वाचन सुरू असताना उद्धव ठाकरें पत्रकार परिषदेत इतक्या लौकर कसे आले ' हा प्रश्न घोळत होता. कारण असे की सामान्यतः वकील मंडळी सुद्धा कुठल्याही केसचा पुर्ण निकाल हाती आला नाही तोपर्यंत न्यायालयाच्या निकालावर भाष्य करीत नाहीत. उद्धव ठाकरेंना फायनल वर्डीक्ट अगोदरच हाती आले होते की काय अशी शंका आली. नशीब माझं, शंका न्यायालयात दाखल केली जात नाही.

तर दुसर्या एका चॅनेलवर ' उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला म्हणून एकनाथ शिंदेचं सरकार वाचले ' अशी हेडींग देऊन बातमी प्रक्षेपित होताना दिसली. मिडीयावाल्यांशी सलगी  शरद पवारांपेक्षा उद्धव ठाकरेंची  अधिक आहे असे प्रथमच जाणवले. उद्धव ठाकरे ही मिडीया वाल्यांचे आवडता नेता झाले आहेत. यात ही  राजकारण आहे. 

मविआ सरकार अस्तित्वात असतांनाच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात शीत युद्ध सुरू झाले
होते. अलिकडे शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचं नाट्य घडवून काॅग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला धक्का दिला. शरद पवारांना प्रथम मविआ वर स्वतःचे अधिराज्य ठेवावयाचे आहे. ते अंशतः पार पाडले आहे. म्हणजे येणार्या निवडणूकात उमेदवार संख्या तसेच मतदार संघावरील हक्क इत्यादीवर स्वतःचे नियंत्रण ठेवता येईल. तसेच आपले पुतणे अजित पवार यांचे पंख छाटावयाचे होते. ते ही अंशतः पार पाडले आहे. 

उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेशीं लढावयाचे आहे तसेच मिडीयांना हाताशी धरून शरद पवारांना ही शह द्यावयाचा आहे. आपले सरकार पाडले या संबंधीतली सहानुभूती मिळवायची आहे. त्यात अधिक भागीदार नकोसे झाले तर प्रथम राष्ट्रवादी काॅग्रेसशी पंगा घेऊन  काॅग्रेसशी हातमिळवणी करणे त्यांना श्रेयस्कर वाटत असावे. 

शेवटी त्या चॅनेलवरून मी परत जिथे  सरन्यायाधीशांचे निकालपत्राचे लाईव प्रक्षेपण होते तिथे परत आलो आणि ते पुर्ण ऐकले. इथेच मला यावर लेख लिहावा अशी इच्छा झाली.
 
५) आपल्या सारख्या सामान्यजनांना उद्धव ठाकरे यांचा न्यायालयात पराभव झाला एवढी माहिती पुरेशी ठरते. तसे पाहता या केस मधील तीच खरी हेडलाईन आहे. तरीही काही प्रसारमाध्यमांनी खोडसाळपणा केलाच. याचे कारण लिबरल पत्रकारांची ती एक खोड आहे. दुसरे असे की काही प्रसारमाध्यमां समोर एक मोठी अडचण असते ती म्हणजे त्यांना उपकृत करणार्या नेत्यांच्या घरचे वासे ते कसे मोजणार?  ठीक आहे !  त्यांचा टिआरपी वाढतो, जाहिराती अधिक मिळतात,  धंदा वाढतो, उत्पन्न वाढते, काही हातांना रोजगार मिळतो हे ही नसे थोडके ! परंतु हेड लाईन्स बदलून जनता फसत नाही कारण सोशल मिडीयातून खरे वृत्त समजते. 

उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यामांच्या मेहरबानी वरून नैतिकतेचा मुद्दा मांडत संघर्ष नव्या जोमाने सुरू केला असला तरी त्यातून मूळ शिवसेना त्यांच्या हातात येणार नाही. तसेच त्यांच्या नैतिकतेचा लिलाव मुख्यमंत्री होतानाच झाला होता. म्हणूनच तर त्यांच्या पक्षात इतका मोठा भूकंप झाला. काही लोक उद्धव ठाकरेंनी पलायन केले असे ही म्हणाले आहेत. मी तसे मानत नाही. पण त्याच बरोबर उद्धव ठाकरें यांनी नितीमत्ता पाळुन राजीनामा दिला हे ही मला पटले नाही. उद्धव ठाकरेंच्या राजीनामा देण्याची खरी कारणें काय असावीत ती मी खाली मांडतो आहे ---
i) ते जे नैतिकता वर किर्तन करीत आहेत ना, त्यावर  शिंदे गटाचे वकील ज्यांचे नाव जगभर प्रसिद्ध आहे, असे भारताचे भुतपूर्व साॅलिसेटर जनरल श्री हरिष साळवे यांच्या मुखातून  सणसणीत उत्तर अगोदर मिळालेले होते. ते असे आहे,  There is no Law to fill the gap of morality. 
ii) उद्धव ठाकरेंना पक्षातल्या मोठ्या भूकंपाचा मोठा धक्का बसला त्यातून ते सावरले नव्हते. 
 iii) उद्धव ठाकरेंना विधानसभेत पराभवाला तोंड द्यावयाचे नव्हते. कारण त्यांच्या सरकारने बहुमत गमावले होते हे त्यांना ही कळले होते. iv)विधानसभेत वाटेला येणार्या नामुष्की पेक्षा राजीनामा हाच मार्ग उत्तम असे अनिल परब सारख्यांनी त्यांना पटवून दिले असावे. दुसरा पर्याय ही नव्हता.
v) शेवटची कॅबिनेट मिटींग संपल्यानंतर घटक पक्षांचे नेते 
आपआपल्या घरी गेले. उद्धव ठाकरें एकाकी पडले. त्यातून ना तुम्हाला ना मला या त्यांच्या अंगभूत वृत्तीचा मंत्रालयात असतानाच स्फोट झाला असावा. त्यातून त्यांनी राजीनामा दिला असावा. 
vi) घटक पक्षांबरोबर मंत्रालयात जी बैठक झाली होती त्यात खडाजंगी झालेली ही असू शकेल. त्यामुळे  अनासायाने वारस हक्कातून मिळालेले पक्षप्रमुख पद, ऐश्वर्य, प्रतिष्ठा आणि लोकप्रियता इत्यादी  तून वाढलेला त्यांचा अहंकार दुखावला गेला. त्यातून राजीनामा दिला असावा.
vii) प्रशासकीय कामकाजाच्या अज्ञानामूळे पदोपदी इतरांवर अवलंबून राहण्याच्या घटनांतून त्यांना आलेला वैताग यातून ही राजीनामा दिला असावा.

९) उद्धव ठाकरें यांच्यावर राजीनामा द्यावयास कोणीही दबाव आणला नाही, कोणी धमकी दिली नाही.  वरील सहा पैकी एक ही कारण असे नाही की सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपद बहाल करू शकत होते. या शिवाय प्रशासनातले अज्ञान ही सबब कायद्यात चालतच नाही. कायद्याच्या पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेताना फेमस वाक्यें शिकलो आहे. त्यातील एक खाली देत आहे --
' Ignorance can not be an excuse before Law. ' 

वाचक हो, एकनाथ शिंदे गटाचे वकील हरिष साळवे यांचा युक्तीवाद कायदा आणि व्यवहार, संविधान आणि न्यायालय. विधानसभा व राज्यपाल, विधानसभा व न्यायालय निवडणूक आयोग व न्यायालय इत्यादी संस्थामधील बॅलन्स संबंधीचा युक्तीवाद इतका सहज सरल होता की  सरन्यायाधिश सकट पुर्ण घटनापीठ कान टवकारून ऐकत होते. केसच्या सुनावणी दरम्यान  कपिल सिब्बल सारख्यांना सरन्यायाधिशांनी एके ठिकाणी सहज  विचारले, ' क्या आप लोग हरिष साळवेजीसे डरते हो ? '  

वाचक मित्रहो, आपण आता लेखाच्या समाप्ती कडे जात आहोत म्हणून मला वाटते की हरिष साळवे यांनी जो काही युक्तीवाद केला होता त्याची थोडीशी झलक आपल्यासमोर ठेवुन या लेखातील चर्चेला विराम देतो.  
१) एखादा मुख्यमंत्री राजीनामा देतो आणि राज्यपाल तो राजीनामा स्विकारतात, त्यानंतर  राज्यपालांनी ते राज्य मुख्यमंत्री विना ठेवायचे असते का? ज्यांचा राजीनामा स्विकारला त्या मुख्यमंत्र्याची सत्ता जी गेली आहे, त्यावरील इथे जी चर्चा होत आहे ती फक्त ॲकॅडॅमिक ठरते. 
२) आपल्या येथे भारतात बर्याचदा आपण एका व्यक्तीलाच पक्ष मानण्याची चूक करतो. मुख्यमंत्र्या संबंधी त्यांच्या आमदारांत नाराजी असेल तर ते दुसरा नेता का निवडू शकत नाही. Anti defection law can not be Anti decent law.
३) Law can not treat Uddhav Thakare's resignation as illegal. 
४) उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता आणि त्यांना राज्यपालांनी विश्वास दर्शक ठरावास सामोरे जा असे सांगितले असते तर उद्धव ठाकरे जिंकले असते किंवा जिंकले नसते अशा प्रकारच्या चर्चांत आपण भाग घेऊ शकत नाही. अशी चर्चा इथे न्यायालयात अपेक्षित नाही. 
५)  Neither Governor nor this Court has got right to count the heads of the members of assembly. It is the right of the Speaker. And The flour test has to be carried out in the house of assembly. 

एकंदरीत ज्या केसचा फार गवगवा झाला, उलट सुलट फेक न्यूज ही येत राहिल्या, सगळी चॅनेल्स दोन-तीन महिने या केस भोवती घिरट्या घालत होते त्यातून कायद्याच्या विद्यार्थ्यापासून ते अभ्यासकापर्यंत, पत्रकारापासून ते संपादकांपर्यंत, राजकीय पक्षांच्या नेत्यापासून ते कार्यकर्त्यापर्यंत सर्वांना मार्गदर्शन मिळत राहील यात बिलकूल शंका नाही. परंतु त्यातून जनसामान्यांच्या हाती एक हेडलाईन आली. ती म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा पराभव तर लांबलचक न्यायालयीन लढाई ही 
' डोंगर पोखरून उंदीर ' ठरली.
 

शनिवार, २९ एप्रिल, २०२३

मोदी सरकार × विरोधी पक्ष + विरोधी मिडीया + विदेशी शक्ती ( भाग - २ )

मोदीजींनी आत्मनिर्भर भारत अशी घोषणा केली तेव्हापासून मिडीया मधील पुरोगामी मंडळींना अधून मधून वांतीचा विकार होत असावा असे वाटते. ज्यांना मोदी सरकारच्या कारकिर्दीत भारताची होत असलेली प्रगती पाहावत नाही, अशांपैकी जगावर राज्य केलेल्या इंग्लंडच्या बीबीसीनेच पूढाकर घेतला व आपल्या पंतप्रधानांची खोटी-नाटी डाॅक्युमेन्टरी बनविली. सोबत राहूल गांधी नावाचा पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची मुलाखत जी मोदींवरील टिकाने भरलेली होती ती पब्लिश केली. 

विरोधी पक्षांना एखाद्या परदेशाने  भाजपा सरकार विरूद्ध काही टिप्पणी केली की ते त्याचे स्वागत करून त्याचा राजकीय अजेंडा बनवितात.  राहूल गांधी म्हणाले होते की भारतात मोदींची हुकूमशाही आहे. आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानांच्या (मनमोहन सिंग) निर्णयाचे कागद भर रस्त्यात फाडणारे राहूल गांधी हे रक्ताने हुकूमशाही वृत्तीचेच आहेत.  ही घटना बीबीसीला माहित होती. मग बीबीसी ने त्या घटनेची आठवण करून राहूल गांधींना त्यांची ती कृती हुकूमशाही वृत्तीची नव्हती का असा उलटा प्रश्न विचारला का नाही ? पण त्या पत्रकार परिषदेचा उद्देश   मोदींना हुकूमशहां म्हणण्यासाठीच होता. त्यामुळे भारतात बीबीसीची जी काही पत होती ती घसरली आहे आणि पुढे आणखिन घसरत जाईल.

बीबीसीने राहूल गांधींना भारताचा भावी पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यात राहूल गांधीचा दोष नाही. कारण गांधी- नेहरू घराण्यातील सदस्यांना जनतेने ७० वर्षे पाठींबा दिला होता. पण तत्कालीन  विरोधी पक्षांनी विदेशी शक्तीं च्या साह्याने  रक्तरंजित क्रान्ती घडवून काॅग्रेसची सत्ता उलथून पाडण्याचे दृष्कृत्य केले नाही. कारण आपला समाज क्रान्ती पेक्षा उत्क्रांती वर विश्वास ठेवतो. हे तत्कालीन विरोधी पक्षांच्या नेते मंडळींना ठाऊक होतेच शिवाय ते मनाने व बुद्धीने खरेखुरे लोकशाहीवादी होते. स्वर्गीय पंडीत नेहरू यांच्या धोरणामुळें भारत गरजेपेक्षा अधिक काळ कोलोनाईज्ड (म्हणजे ब्रिटीशांचा गुलाम सारखा) वाढत राहीला. त्याला जनतेने गेल्या दोन लोकसभा निवडणूकीच्या मतदानातून विरोध करून भाजपाचे सरकार सत्तेवर आणले. ही बाब प्रांजळपणे विरोधी पक्षांनी स्विकारावयास हवी. 

भाजपाला पराजित करायचे असेल तर राहूल गांधींना विदेशात जाऊन पंतप्रधान मोदीं वर टिका करण्याची गरज नव्हती. आपल्या देशाच्या घटनेतील कलमांचे पालन करून मतदारांची पसंती मिळवून सत्तेवर येण्याचा मार्ग खुला आहे. तो स्वीकारावा असे वाटते पण तेवढी ताकद, हुषारी, जाण असावी लागते ना ! नसेल तर राजकारणात शिरल्यानंतर राजकीय जाण व प्रगलभता  वाढविण्याचे प्रयत्न तरी राहूल गांधींनी करावयास हवे होते की नाही ? बापजात्यांच्या पुण्याईने सत्ताधारी बनण्याचे दिवस संपले आहेत हे पप्पू महारांजाना कधी कळेल हे फक्त देव जाणो !

जार्ज सोरास ने भाजपाला पराभूत करावयाचा विडा उचलला आहे. त्यामुळे भाजपा, मोदी आणि संघ विरोधात आपण काही ही लिहू शकतो, बोलू शकतो असा समज आपल्या येथील बहुतांश प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनीक्स मिडीयांचा ही झाला आहे. या सार्या नाट्यात प्रथम बीबीसीला घरचाच अहेर मिळाला. लागलीच मोदी सरकारने दिल्ली येथील बीबीसीच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स ची धाड टाकली आणि आमची पुढची पाऊले कशी असतील याची जाणीव करून दिली. 

नेमक्या त्याच वेळी राहूल गांधीवर सूरतच्या कोर्टात जुन्या केस मध्ये मोदींची बदनामी केलेला आरोप सुरत सत्र न्यायालयात सिद्ध झाला आणि  दोन वर्षाची तुरंगवासाची शिक्षेची घंटा राहूल गांधीच्या गळ्यात विनासायास अडकली गेली. 

असा हा आरोपी आपल्या येथे पंतप्रधान पदाचा उमेदवार कसा गणला जाणार हा पहिला आणि सर्वात मोठा अडथळा मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी  बाह्या वर चढवलेल्या कुस्तीगारांपुढे उभा राहिला आहे. आपल्या येथील लोकप्रतिनिधी कायद्यान्वये  मंत्री, आमदार, वा खासदार असो त्याचे संसद किंवा विधानसभाचे सदस्यत्व आपोआप रद्द होते. तसे पाहता ही घटना आपल्या देशान्तर्गत मामला आहे. पण या घटनेमुळे इंग्लंड मध्ये फार कौतुकाची ठरलेली राहूल गांधी च्या मुलाखतीचे बारा वाजलेच पण मोदी सरकारचा पराभव करण्याचा निश्चय केलेल्या आंतरराष्ट्रीय टोळींचा दम घुटला गेला असावा. असे असले तरी भाजपाने या बाबत राहूल गांधींनी क्षमा मागावी इतकीच मागणी केली आहे. 

राहूल गांधींना हायकोर्ट कडून सुटकेचा श्वास दिला गेला तरी राहूल गांधींची वृत्ती हुकूमशाहीची आहे ही बाब जगभर पसरली आहे. त्यातून विनासायास भाजपाला राहूल गांधींच्या बदनामीचा बोनस (म्हणजेच भाजपाला कर्नाटकात होणार्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ) प्राप्त झाला. तसे पाहता राहूल गांधींचे संसद सदस्यत्व राहिले काय आणि रद्द झाले काय भाजपाला काही फरक पडत नाही. उलट केरळ मधून राहूल गांधींचा  पराभव करणे भाजपाला अधिक भावेल. संसद सदस्य म्हणून राहूल गांधींनी संसदेत व आपल्या मतदार संघात काय दिवे लावलेत? वारसहक्काने मिळालेला मतदारसंघ आपल्या कर्माने गमावलाच ना ! तो  संसदेत काॅग्रेसची संख्या ५० पर्यंत खाली आली. २५ -३० जेष्ठ काॅग्रेस नेते काॅग्रेस सोडून गेले. अनेक राज्यात काॅग्रेस ने सत्ता गमाविलीच नव्हे तर तिचे नामोनिशाण मिटले. हा राहूल गांधीच्या पक्षीय कामगिरीचा आलेख. बीबीसी ने भारताचा भावी पंतप्रधान म्हणून त्यांची मुलाखत घेतली खरी, पण त्यातूनच बीबीसीचे अधःपतन होत आहे असाच निष्कर्ष निघतो.

राहूल गांधी माफी मागत नाहीत. या कारणाने राहूल गांधींना जेल मध्ये का म्हणून भाजपा पाठविल ? नॅशनल हॅराॅल्ड केस संबंधीत गती आणण्याचे काम मोदी सरकारच्या हातात आहे.  दुसरे कारण असे आहे की राहूल गांधीमूळे भाजपासाठी निवडणूकीच्या प्रचारात आघाडी मिळत जाते. त्यांच्या भाषणातून जिथे शक्यता नाही तेथून भाजपाचे उमेदवार निवडून येणार असतील तर भाजपाला नॅशनल हॅराॅल्ड केस द्वारा राहूल गांधीना लोकसभा निवडणूकांच्या अगोदर जेल पाठविणे सोपे असले तरी भाजपा तसे करणार नाही. कारण राहुल गांधीच्या रूपाने अनासायाने  भाजपाला प्राप्त झालेला प्रचारक निवडणूक प्रचारात असणे हेच पसंद करीत राहणार." कायदेशीर बाबींतून विरोधकांना कसे अडकवून ठेवावयाचे आणि कधी शेवटचा ठोका हाणायचा यात भाजपा माहिर आहे. हे सी चिदमंबरम यांच्या केस मधुन सिद्ध झालेले आपण पाहतो आहोत. एके काळी काॅग्रेसेचा हुकमी एक्का मानला जाणारा चिंदमंबरम कायमचा अडगळीत पडला आहे. 
 
गेल्या दोन-चार वर्षात विरोधी पक्षांनी भाजपा विरोधात एक नवे अस्त्र वापरावयास सुरूवात केली आहे. यासाठी ही विदेशी शक्तीकडून मदत मिळत असावी. प्रत्येक प्रकरणात न्यायालयात धाव घ्यावयाची आणि भाजपाची सत्ता असलेली राज्यें तसेच केंद्र सरकार विरूद्ध  कोर्टात केस टाकावयाची आणि सरकारी कामकाजात दिरंगाई आणावयाची, जेणेकरून देशाची प्रगती रोखली जाईल असे डावपेच विरोधी पक्ष सतत करीत राहणार असे भाष्य बीबीसीचे मातब्बर पत्रकार टुही यांनी सन २०१५ लाच केलेले आहे. पण प्राॅब्लेब असा आहे की सुप्रिम कोर्टाला ही आपल्या निर्णयात फारसा हस्तक्षेप करू देणार नाही असे हे मोदी सरकार आहे. हे विदेशी शक्तींना ठाऊक कुठे आहे ?.

अलिकडे न्यायालयाने सरकार नपुसंपक आहे का अशी गलिच्छ टिका केली. तसे पाहता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी रस्त्यावर येऊन मोदी सरकार विरोधात बंड केले होते तेव्हापासूनच विरोधी पक्षांना न्यायालियाचेही पाठबळ मिळतेय का अशी चर्चा जनमानसात सुरू झालीच आहे. तेव्हा ही मी न्यायालय राजकीय आखाडा बनतेयं या शिर्षकाचा लेख सन २०१८ साली लिहीला आहे. भारत सरकारच्या साॅलिसेटर श्री तुषार मेहता यांनी सुप्रिम कोर्टाला " हे केंद्र सरकार नपुसंपक नाही " असे ठणकावून उत्तर दिले आहे. केंद्रीय कायदा मंत्री  किरण रज्जू यांनी ही परखडपणे  'आपण बरे आणि आपले काम बरे' असा सल्लावजा इशारा न्यायालयाला दिला. 

मोदी सरकारचे मंत्री ज्यांना विकास पुरूष मानले जातात, असे श्री नितिन गडकरींनी सुद्धा मागे न्यायालयाची सरकारच्या कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रवृत्ती वर प्रखर टिका केली होती. सरकारच्या इनफ्रास्ट्रक्चर वा एखादा विज्ञान प्रकल्प उभा करण्याच्या योजनेवर  टिका करण्यापेक्षा न्यायालयाने सारासार विचार करून काही उपाय अथवा पर्याय सुचवावा किंवा त्या प्रकल्पातील व्यावसायिक तज्ञांशी प्रथम सल्ला मागावा आणि नंतरच प्रतिक्रीया द्यावी असे मला वाटते.

निवाडा, निव्वळ मतप्रदर्शन आणि शेरेबाजी ह्यात अंतर असते. म्हणून जनमानसावर आपण मारलेल्या  शेरांचा परिणाम होत असतो हे न्यायाधिशांनी अधिक ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. कारण राजकारणात कार्यरत असणार्या नेत्यांपेक्षा न्यायाधिशांच्या प्रति लोकांच्या मनात अधिक आदर असतो. 

लिबरल लाॅबीच्या बड्या वकीलांनी सुप्रिम कोर्टला जेव्हा मध्यरात्री आतंकवाद्यांच्या फाशीबाबत पुनर्विचारासाठी न्यायनिवाडा देण्याचे सांगितले, त्या त्या वेळी सुप्रिम कोर्टाने प्रत्येक केस सुनावणीला घेतली आणि निकाल ही दिला. त्यावेळी अशी काय मनःस्थिती सुप्रिम कोर्टांच्या न्यायाधिशांची होती, या संबंधी जनसामान्यांना काही ही माहिती न मिळणे हा कुठला न्याय ? न्यायाधिशांनी आपण हून लोकांचे प्रतिनिधी आहोत हे आपल्या कृतीने दाखविणे आवश्यक आहे. ती जबाबदारी आहे अशी जाणीव न्यायाधिशांच्या मनात असल्यावर न्यायपालिका आपल्या लोकशाहीच्या गळ्यातील तिसरा अलंकार अधिक शोभून दिसेल. 

सरकारला नपुसंपक म्हणून हिणविता आणि समलिंगीच्या विवाहास मान्यता देण्याची तयारी (भले ती कच्च्या स्वरूपात असली तरी) करणार्या न्यायधिशांना आपण काय आणि कसे संबोधणार हो ?  आपण ही माणसें आहात, नागरिक आहात, आणि महत्वाचे म्हणजे न्यायाधिश आहात.  मराठा इतिहासातील रामशास्त्री प्रभुणेंचे वारस आहात याचे भान ठेवावयास हवे. अन्यथा जनतेत न्यायालयिन व्यवस्थेवरील आदर कमी होत जाईल असे मला वाटते.  

सामान्य माणसांच्या किती केसेस प्रलंबित आहेत? वर्षातून किती वेळ न्यायाधिश सुट्टी (vacation) वर असतात, हेही आजच्या काळात सामान्यजनांत चर्चीले जाणारे विषय होत आहेत. सरकार व इतर तत्सम घटनात्मक संस्था प्रमाणे न्यायव्यवस्था ही जनतेच्या सेवेसाठी आहे. ती ना मिलोआर्डशिप पुरती आहे, ना केवळ श्रीमंतांच्या व दशहतवाद्याच्या केसेस प्राधान्याने सुनावणी साठी !  असे चित्र जनतेच्या मनात बिंबवण्यासाठी काही धोरणात्मक बदल करण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालय व Bar Council ने करायला हवा असे मनापासून वाटते. न्यायालयाकडून आडमुठेपणाचे दर्शन झाले तर जनसामान्यांत नैराश्य पसरण्याचा धोका अधिक असतो. सरकार नावाच्या व्यवस्थेबद्दल जनतेत नाराजी झाली त्या त्या वेळी सरकारचा जनतेने पराभव केला आहे. कारण संविधानाने तशी व्यवस्था केली आहे. सत्तेवर असलेल्या सरकार प्रती न्यायालयाने आदर बाळगावयास हवा. शेवटी कायदे संसद तयार करते ना ! ते ही संविधानातील तपशिलातूनच 
की ! हाच सर्वात मोठा न्याय ! सरकार कुठल्याही पक्षाचे का असेना  न्याराधिशांची जीभ घसरत असेल तर त्यांनी सरळ राजकारणांतच उतरावे. आणि पुन्हा त्यांना वकिली करता येणार नाही असा कायदा येणे आवश्यक वाटते. 

काँग्रेसच्या राज्यात इडी, सीबीआय आयटी व एनआयए या सरकारी एजन्सीजचे पंख छाटून ठेवले होते. तेव्हा सुप्रिम कोर्टात आता जशा भ्रष्टाचाराच्या केसेस पोहचत आहेत तसला प्रकार संख्येने फारच मामूली होता. कारण 'आओ, खाओ पिओ ' हाच सर्व व्यवस्थांचा धर्म झालेला होता. आता मोदी सरकारच्या धोरणामूळे भ्रष्टाचाराच्या केसेस वाढत आहेत. त्यातून कामाचा बोजा वाढला असेल तर अर्थसंकल्पेत अधिक स्टाॅफ साठी आर्थिक तरदूत मागता येऊ शकते ना ! 

न्यायव्यवस्थेत न्यायाधिश बनण्याची प्रक्रिया म्हणजे बाॅलीवुड मधील नेपोटीझम सारखीच असते, असे निवृत्त न्यायाधिशांनी न्यूज चॅनेलवरून मांडले असल्याचे मी ऐकले आहे. न्यायाधिश या देशाचे नागरिक आहेत त्यांना ही इथले कायदे लागू होणे अनिवार्य असते. न्यायाधिश मंडळी स्वर्गातून येत नसतात. वकिली चालत नाही म्हणून न्यायाधिश व्हावयास वाटणे हे स्वाभाविक आहे. कारण प्रत्येक प्रोफेशनमध्ये फार मोठी स्पर्धा असते. हे कलियुगातले दूषण आहे. त्यावर मानवाकडे काही इलाज नाही. काहींचे बाबा, काका, मामा, भुतपुर्व न्यायाधिश होते, अंशांची मुले, भाचे, पुतणे, जावई न्यायाधिश बनत असतात. असे मी म्हणत नाही तर निवृत्त न्यायाधिश न्यूज चॅनेल वरील चर्चेत मांडतात. न्यायाधिशांच्या अशा प्रकारे नेमणुका होत असतील तर  गुणवत्तेच्या कसोटीवर न्यायाधिश होण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांवर घोर अन्याय होतोच ना ! याचा अर्थ न्यायालयात  ही अन्यायाचे आणि अंधाराचे राज्य असते की काय? मोदी सरकार या पद्धतीत बदल करणार असल्याचे कळले आहे. त्याला न्यायव्यवस्थेने सहमती द्यावी अर्थातच घटनेतील कलमान्वयेच.  येथे मी एक कायद्याचा विद्यार्थी आणि पदवीधर असुनही लहान तोंडी मोठा घास घेतला असे मला वाटते. कारण माझ्यावर तसे संस्कार घडले आहेत. 

मागील कुठल्या तरी एका लेखात 
केंद्र सरकार आणि सुप्रिम कोर्ट यांच्या
मधील संबंध बिघडत आहेत असे वर्तमानपत्रात येत होते. त्या वेळी मी वाचकांना वचन दिले होते की योग्य वेळी व योग्य जागी मी माझे विचार मांडेन. ती वेळ व जागा साधून मी माझे वचन पाळले आहे. वचन पाळणे ही एक प्रामाणिकता व नितीमत्ता चं लक्षण आहे.

आजच्या घडीला भारत देशाच्या अंतर्गत राजकारणात  हस्तक्षेप करण्याचा विदेशी शक्तीचे जे डाव आहेत त्यातल्या पहिल्या डावात राहूल गांधींना लोकसभेची निवडणूक लढविण्यातच मोठा अडथळा निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. विदेशी शक्तीच्या व आपल्या येथील त्यांच्या चमच्यां च्या थोबाडीत सणसणीत चपराक हाणली गेली आहे. 

पुढच्या डावात राहूल गांधी यांच्या  परदेश दौर्याचा पुर्ण रिपोर्ट RAW ने  केंद्र सरकारकडे सादर केलेला असेल. त्या रिपोर्ट मधील एकेक अस्त्र केंद्र सरकार वापरण्याची शक्यता आहे.  विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा तपास सुरू झालेला आहे. तसेच चीनला आशिया आणि आग्नेय आशियात एकाकी पाडण्याचे डावपेच सुरू झाले आहेत. यावरून केंद्र सरकार विरोधी पक्षांशी दोन हात करण्यासाठी सज्ज होत आहे असे दिसते.

मोदी सरकार × विरोधी पक्ष + विरोधी मिडीया + विदेशी शक्ती ( भाग - १ )

मध्यंतरी अमेरिका, कॅनडा आणि काही युरोपियन देश आणि तेथील मिडीया मोदी सरकार विरोधात काही ना काही शेरे मारत राहिल्याचे आपण ऐकले. त्यात नेहमीचेच आरोप जसे की मानवाधिकाराची गळचेपी,  अल्पसंख्यांकाचा छळ, लोकशाहीची हत्या इत्यादीचा समावेश होता. सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूका पर्यंत आणखिन आरोपांची भर पडत जाणार आहे. अमेरिका आणि काही युरोपियन देशांनी मोदी सरकारवर केलेल्या आरोपांना आपले युवराज राहूल गांधीं यांच्या युके मधील पत्रकार परिषदेतील वक्तव्याचा हातभार लागला.

राहूल गांधींनी स्वयंस्पुर्तीने त्या पत्रकार परिषदेत उत्तरे दिली होती की  युके मधील संपादकांनी राहूल गांधीकडून तसे वदवून घेतले यावर चर्चा करण्याची गरज नाही. कारण युके तील राहूल गांधींची पत्रकार परिषद ही परस्पर सहमतीने घडवून आणलेली असावी. राहूल गांधींना  राजकीय जाण कमी आहे, आणि असा भारताचा पंतप्रधान असावा असे अमेरिका व काही युरोपियन देशांना सध्याच्या विशेषतः कोरोना नंतरच्या जागतिक स्तरावरील बड्या देशांच्या डळमळत्या अर्थव्यवस्था मुळे हवासा झाला आहे. त्यासंबंधीचं विश्लेषण या लेखाच्या तसेच या लेखाच्या भाग-२ मध्ये ही केलेलं आढळेल. 

पोस्ट कोरोना नंतर जागतिक राजकीय पटलावर भारताचे आणि नरेंद्र मोदींचे वाढत जाणारे वर्चस्व अमेरिका आणि काही नाटो देशांना टोचत आहे हे मुख्य कारण आहे. आणि या कारणांशी जोडलेलं दुसरे कारण म्हणजे गेली ७५ वर्षे अमेरिकेचा दत्तक पुत्र पाकिस्तानने अमेरिकेची आर्थिक लूट केली आणि शेवटी शिरजोर होऊन  कंगाल ही झाला. त्यामूळे अमेरिका आणि पर्यायाने युरोप मधील काही देशांच्या धाकात राहणारा देश भारतीय उपखंडात  राहिला नाही. म्हणून भारतात होयबा पंतप्रधान म्हणून दिसणारा राहूल गांधीच्या परदेशवारी वाढत आहेत. भारतातले मोदी सरकार पुढील वर्षी सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीत पराभूत करण्याचे 
डावपेच अमेरिका, कॅनडा, इंग्लड मधील  मिडीयां आखत आहेत. धनाड्य उद्योगपतींच्या बळावर  भारतातील लिबरल इलेक्ट्राॅनिक्स व प्रिन्ट मिडीयांना वश करून सर्वत्र नेगेटिव्ह नॅरेशनच्या आधारे मोदी सरकारचा पराभव होऊ शकतो. त्यासाठी लागणारे साम दाम दंड या तीन शस्त्रांचा तुटवडा पडणार नाही अशी हमी भारतातल्या लिबरल मंडळीना दिली असावी. 

अलिकडे अमेरिकेने श्रीलंकेला वश करण्यासाठी मध्यरात्री आपल्या अधिकार्याला श्रीलंकेत पाठवून गुप्तपणे चर्चा केल्याची एका युट्युब चॅनेलवरून खात्रीपुर्वक सांगितले गेले आहे. ते मी प्रत्यक्ष ऐकले आहे. मला वाटतं अमेरिकेने श्रीलंकेकडे  मोठ्या युद्ध नौकेसाठी जागा मागितली असावी. पण अमेरिकेच्या हाती काही लागले नसावे. अस्थिर राजकीय स्थिती आणि खालावत जाणार्या अर्थव्यवस्थाने श्रीलंकेतील प्रजा भितीने त्रस्त झाली होती. याच वेळी भारत मोठ्या भावासारखा श्रीलंकेच्या पाठीमागे उभा राहिला. 

कोरोनो नंतर अमेरिका व काही युरोपियन देशांना वर्ल्ड ऑर्डर बदलण्याच्या भितीने जे ग्रासले आहे, त्यातून त्यांना मार्ग काही दिसेनासा झाला आहे. काही तज्ञांचं म्हणणं आहे की आता पश्चिमी देशांचं वर्चस्व कमी होऊन जगाचे शक्तीकेंद्र पौर्वात्य देशांकडे जाईल.

पौर्वात्य देशात चीन आणि भारत या महासत्ता होण्याच्या मार्गावर आहेत. चीन जागतिक मॅन्युफॅक्चरींग हब झाली असल्यामुळे भारताच्या मानाने चीन अधिक प्रगतीपथावर आहे. हे सत्य आहे. आपला भारत, चीन बरोबरीच्या शर्यतीत कमी पडला याचे खापर स्व अटलबिहारी व मोदी सरकार वर फोडता येत नाही. कारण चीनने सन १९५० ला  स्वातंत्र्य मिळाल्यावर लागलीच विकासाचे बीज रोवले. त्यावेळी भाजपाचा जन्म ही झाला नव्हता. चीन मध्ये एक पक्षीय हुकूमशाही आहे आणि आपल्या येथील  विरोधी पक्षांना चीनच्या प्रगतीचे भारी कौतूक वाटत आहे. अशांनी बिनशर्त भारतात जो एकमेव शक्तींवान पक्ष उरला आहे असा भाजपा आणि प्रशासकीय  निर्णय तत्परतेने घेणारे मोदी सरकार यांना सहकार्य करावे म्हणजे  मोर्चे, धरणं असे प्रगतीतले अडथळे दूर होऊन आपला देश चीनच्या तोडीचा बनू शकेल.

इथे आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचे नेते मोदींच्या नावाने रोज शिमगा करतात. तरी त्यांना स्वातंत्र्य कमी पडत आहे. त्यांना मोदीच्या नावाने नंगा नाच करावयाचा आहे का, तसे एकदा स्पष्ट करावे म्हणजे सरकारला काय जो निर्णय घ्यावयाचा असेल तो ते घेऊ शकेल आणि देश चीनला पिछाडीला टाकू शकेल. चीन मध्ये प्रसारमाध्यम फक्त सरकारच्या मालकीचं आहे. आपल्या येथे प्रसारमाध्यमांचा जो सुळसुळाट झाला आहे त्याचा ही एक दिवसात शुकशुकाट होईल. 

आपल्याला स्वातंत्र्य मिळताना देशाची फाळणी, वर ५५ कोटी रूपयांची पाकला मदत ; त्या बदल्यात स्वतंत्र भारताला काय मिळाले?  पाक मधील हिंदुची कत्तल मालमत्तेची तोडफोड आणि हाकलपट्टी. भारतात आले ते निर्वासित म्हणून. येथील मुस्लीमांना सगळ्या सोयी- सवलती, अल्पसंख्यांकाचा दर्जा, हज यात्रेसाठी दरवर्षी करोडो रूपये खर्च, जणू काही ही मंडळी भारत देशाची जावई मंडळी. मुस्लीम लीग चे प्रमूख बॅ जीनाने डायरेक्ट ॲक्शनचे भरलेले विष इकडे राहिलेल्या मुस्लीम बांधवात शिरले नव्हते असे मानताना तत्कालीन काॅग्रेस नेत्यांनी थोडाफार तरी मेंदुचा वापर करावयास हवा होता की नाही ?

हिंदूंची प्रचंड प्रमाणात कत्तल केली तरी आमच्या मेंदुतील अंहिसेची आणि अमन ची गाठ थोडी सुद्धा सैल झाली नाही. एकदा की धर्मांतर झाले की राष्ट्रांतर होतेच. या शाश्वत सिद्धांताला तसेच व्यवहारी जगतातील सत्य काँग्रेसच्या नेत्यांनी पायतळी तुडविले तेही सत्तर वर्षे ! त्याच काॅग्रेसच्या पापाचे घडे सन २०१४ पासून भरले जात आहेत.

पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारने तर भारतातील सर्व संसाधनांवर  पहिला हक्क मुसलमानांचा घोषित केला. गांधी घराण्याच्या मेहरबानी वर पंतप्रधानपद मिळाल्यानंतर आणखिन वेगळे काय त्यांच्या हातून होणार 
होते. त्यांच्या कारकिर्दीत देशात भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. त्याच काळात रिझर्व बँकेचे गवर्नर राजन महाराज होते. या दोघांना  नोबेल्स पारितोषिक मिळाले तरी मला आश्चर्य वाटणार नाही.                

पंतप्रधान राजीव गांधी ज्यांना मिस्टर क्लिन मानले गेले. त्यांच्याच काळात आर्थिक दिवाळखोरी झाली. म्हणून देशाचे  सोने गहाण ठेवण्याची पाळी आली. आर्थिक उदारीकरणातून सुरवातीस जो काही थोडाफार देशाचा विकास झाला त्याचे श्रेय  पंतप्रधान नरसिंहराव कडेच जाते. पण ते गांधी घराण्यातले नव्हते ना ! मग त्या घराण्याचे चमचे प्रसारमाध्यमें त्यांची स्तुती कशी  करणार ? त्यांच्या मृत्यु नंतर त्यांचे अंतीम संस्कार नवी दिल्लीत केले नाही. पण काळ गांधी घराण्यावर सूड घेण्याच्या तयारीत असावा. सध्या या घराण्याची दिल्लीतील ल्युटीन्स भागातील राहती घरें खाली करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

' काॅग्रेस ' आपल्या कुटुंबाची मालमत्ता, समजून सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांनी चीन कम्युनिस्ट पार्टीशी छुपा करार केला आहे. यावर काॅग्रेस चे समर्थक विचारवंत, प्रिन्ट मिडीया, आणि इलेक्ट्रॉनीक्स मिडीयांची तोंडं बंद आहेत की धाक देऊन बंद केली आहेत हे आपल्याला कळणार नाही. कारण चीनचा आदेश म्हणजे  महाआदेश. या करारा मुळे अमेरिका आणि काही युरोपियन देशांनी संधी साधून ते मोदी सरकारवर टिका करू लागले आहेत. याचा अर्थ पाश्चिमात्य देश आणि अमेरिका चीनचे मित्र झाले आहेत असे नाही. कारण चीनशी मैत्री करणे ही त्यांची नामुुुष्की ठरते ना ! पण अधून-मधून पाश्चीमात्य देश आपआपल्या सोयीनुसार चीन संबंधीत मौन पाळण्याचे धोरण अवलंबीत राहतील. शेवटी जागतिक राजकारणाचा शस्त्रात्रे बनविणार्या कंपन्या, ऑईल कंपन्या, ॲटोमोबाईल कंपन्याच्या लाॅब्या द्वारें होत असते. असे असले तरी  वेळ येईल तेव्हा भविष्यात पाश्चीमात्य देशांची मोठी नामुष्की मोदी सरकार करेल असे मला वाटते. 

अमेरिकेची आर्थिक स्थिती  खालावत आहे तर युरोप ज्वालामुखीवर उभा आहे, असे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्वामी विवेकानंदांनी भाकित केलं होतं. ते ही खरे ठरत असल्याची भिती अमेरिका आणि काही युरोपियन देशांना भेडसावत आहे.  पौर्वात्य देशांतील चीन हा देश पश्चिमी देशांच्या कह्यात येणार नाही कारण तिथे एक पक्षीय हुकूमशाही आहे. राहूल गांधी भारताचे पंतप्रधान व्हावेत असे चीन व अमेरिका-युरोप, कॅनडा यानां वाटते. त्या सर्वांचे ध्येय एकच आहे ते म्हणजे भारताची आर्थिक लूट करून येथील संस्कृती नष्ट करणे हे होय. 

भारतात लोकशाही आहे. भारतातील पुढील  निवडणुकांत प्रचंड पैसा ओतून मोदी सरकारला पराभूत करावयाचा डाव अमेरिका आणि काही युरोपियन देशांनी तेथील धनवान मंडळीच्या आधाराने आखला आहे. म्हणूनच तर भारत विरोधी शेरे मारून नंतर राहूल गांधीची मुलाखत घेतली गेली. म्हणजे आम्ही जी मोदी सरकार वर टिका केली ती किती खरी आहे हे अमेरिका आणि बीबीसीला दाखवायचं होते. भारतात ज्याला ६ टक्के सुद्धा पंतप्रधान पदासाठी पसंती मिळत नाही अशा राहूल गांधीना अमेरिका आणि काही पाश्चिमात्य देश भारताचे पंतप्रधान बनवू इच्छितात. त्यातही नवल ते कसले ? त्यांचे  पणजोबा पंडीत जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले तेव्हा अच्युतराव पटवर्धन आणि जयप्रकाश नारायण सारख्या काॅग्रेस नेत्यांनी  ब्रिटीश पुरस्कृत पंतप्रधान अशी टिका केल्याचे माझ्या वाचण्यात आले आहे. यावरून असे म्हणता येते की पाश्चिमात्य देशांना भारतात जाज्वल्य राष्ट्रवादी पक्षाचे मोदी सरकारने  डीकाॅलिनाईझेशनचे धोरण अंमलात आले आहे ते नकोसे झाले असावे. 

मोदी सरकारला फार पुर्वीच RAW तर्फे अशा प्रकारचा डाव आखल्याचे कळले असावे. दुसर्या देशाच्या कारभारात हस्तक्षेप, कधी दोन देशात युद्ध पेटविण्याचे खेळी करणार्या, साम्राज्यवादी आणि विस्तारवादींच्या या नशाबाजीला सडेतोड उत्तर द्यावयाचे मोदी सरकारने ठरविले होतेच असे पुढे घडलेल्या घटनांतून अंदाज मी बांधला आहे. त्या घटना काय आहेत त्या आपल्या समोर ठेवतो ---

गेल्या आठवड्यात भारताने जागतिक बौद्ध परिषद घेऊन भगवान बुद्धाच्या मार्गावरच शाश्वत शांतीचा अनुभव येतो आणि त्यातूनच जगाचा विकास होत जाईल असा संदेश घेऊनच जगभरातून आलेले बौद्धीस्ट  विद्वान मंडळी आपआपल्या देशात परतली. आपल्या येथील स्वतःला पुरोगामी म्हणून मिरविणार्या पक्षांना, भगवान गौतम बुद्धाचा अवतार आपल्या येथे झाला तरी  जागतिक बौद्ध परिषद घ्यावी असे यांच्या मनात कधी आले नाही. कारण दरवर्षी होणार्या हज यात्रा आणि इप्तार पार्टी  आयोजित करण्याची आठवण यांच्या खोपडीत पक्की बसली आहे. हा खेळ व्होट बँक चा !

काॅमनवेल्थ गेम्स सारखे इवेन्ट करण्याची संधी सो काॅल्ड सेक्युलर पक्ष संधी शोधून, लागलीच तसे इव्हेन्ट पार पाडतील. जागतिक बौद्ध परिषदा सारख्या इव्हेन्ट मधून पैसा मिळत नाही हे त्यांना पक्के ठाऊक असते. मूलतः ही मंडळी  सेक्युलर ही नाहीत आणि पुरोगामी ही नाहीत. ती मंडळी तशी असती तर अशा लोकांना जगातल्या १७० देशांचा जागतिक बौद्ध परिषदेतीला सहभाग पाहून जळफळाट झाला नसता. जागतिक बौद्ध परिषदेचे आयोजन आणि तिचे यशस्वी रित्या समापन झाल्यामुळे त्यांना अतीव दुःख झाले असावे. सरकार तर्फे एखादं कार्य संपन्न झाले की या मंडळींचे चेहरे असे होतात की  मोदी सरकारने जणू काही यांच्या मुखात गवत कोंबून चाबकाचे फटके हाणले असावेत. यात मोदी सरकारचा काय दोष ? म्हणून मी त्यावर अधिक भाष्य करू इच्छीत नाही. पण काही वृत्तपत्रें आणि मिडीया हाऊस यांना भाजपा आणि संघाची कावीळ झाली आहे., अशांचा खोडसाळपणा उघड करणे आवश्यक असते. त्यापैकी आज मी इथे दै लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेरांचा वृत्तपत्रीय भाषेतच समाचार घेत आहे.

या परिषदेचे वृत्त देताना दैनिक लोकसत्तेचे गिरीष कुबेर यांनी खोडसाळपणा केलाच.  दैनिक लोकसत्ताने जागतिक बौद्ध परिषदेचे वृत्त देताना भारताने धार्मिक उद्देशापेक्षा राजकारण केले असा आरोप होत आहे असे लिहले आहे. पण असा आरोप कोणी केला याबाबत गिरीश कुबेर खुलासा करीत नाहीत. गिरीश कुबेर म्हणजे थापाबाजी करणारे आणि मूळ वृत्त ट्वीस्ट करून वृत्त प्रसारीत करावयाचे, आणि मामला अंगावर शेकला जाण्याची वेळ आली की माफी मागून मोकळे व्हावयाचे असे  वृत्तपत्र जगतातले केजरीवाल आहेत. या शिवाय जागतिक बौद्ध परिषदेत चीनचा सहभाग नव्हता ही  बातमी कुबेर यांनी अशा रितीने पेरली आहे की जणू काही भारताने घेतलेली जागतिक बौद्ध परिषदेत चीनचा सहभाग नसल्यामुळे ती अयशस्वी राहीली आहे. चीनी नेत्यांचे शूज  ज्यांना पाॅलीश करावयाचे आहेत त्यावर मी काय प्रतिक्रीया देणार? माझा मुद्दा हा की अनेक वेळा खर्या घटनांच्या वृत्तात खोडसाळपणा करून आपले थोबाड रंगवून घेतलेल्या गिरीश कुबेरांची खोड कशी जात नाही हेच मला समजेनासे झाले आहे.  'अहो  कुबेरजी, चीन देश धर्मच मानत नाही. म्हणून त्याचा सहभाग जगभरातील बुद्धीस्ट विद्वानांनी गृहीत धरला नव्हताच. इतकी सामान्य गोष्ट गिरीशजी आपल्या लक्षात कशी आली 
नाही ? '

जगभरातले त्यातच विशेषतः  आग्नेय आशियातील तसेच अतिपुर्वेकडील सर्वच देशांतील बौद्धिस्ट विद्वानांचा सहभाग झालेला पाहून चीन देश खिंडीत पडल्याचे दुःख कुबेरजींना आणि लिबरल विचारवंताना झाले  असेल पण त्यावर राजकीय दुकानात औषध उपलब्ध नसते. आणखिन एक कारण आहे ज्यामुळे आपल्या येथील लिबरल विचारवंत बुचकळ्यात पडले आहेत. ते कारण हे आहे की जागतिक बौद्ध परिषदेत दलाई लामांचा ' एक महान गुरू '  म्हणून सत्कार झाला. ही गोष्ट एक प्रकारे चीनला तिबेट प्रश्नावर १७० देशांच्या बुद्धीस्ट विद्वानांसमोर उघडे पाडले. यालाच म्हणतात राजकारणातील Diplomacy cum Challenge. एक प्रकारे तिबेट स्वतंत्र देश आहे असा एक ठरावच जागतिक बौद्ध परिषदेत मंजूर केल्यासारखा आहे. काय उखडणार आहे चीन भारताचे ? केंद्रात राष्ट्रीय विचारांचे सरकार आहे. त्यामूळे गिरीश कुबेर सारख्या लिबरल पत्रकारांना त्या परिषदेत राजकारण दिसले. कुबेरजीना काय वाटते, काय दिसते याचा मोदी सरकारच्या परराष्ट्र निती, तसेच  आर्थिक, व संरक्षण नितीवर  काय मोठा फरक पडणार ? कोण ते कुबेर ? शेवटी जशी दृष्टी तशी सृष्टी. जशी मती तशी गती. किंवा अर्थस्य पुरूष दासः | एकदा माणूस पैशाचा गुलाम झाला की बुद्धीचं अधःपतन होत असते.
              
(लेखमालिकेचा दुसरा भाग सोबत जोडला आहे )

मंगळवार, १८ एप्रिल, २०२३

राष्ट्रीय स्तरावरील राजकारण भाग-३


 

पंतप्रधान पदाचे पाचवे उमेदवार नितिशकुमार यांना तेजस्वी यादव सोबत रहावे की माघारी फिरून मोदी सोबत जावे या द्वंदात अडकले आहेत. त्यातच निवडणूक तज्ञ पी के बिहारमध्ये पदयात्रा काढीत आहेत. ते निश्चितच नितिशकुमार यांच्या पक्षाची जागा घेऊ शकतात. तेजस्वी यादवांवर ईडीचा हातोडा हाणला जाणार आहे असे कळताच  नितिशकुमार पुन्हा भाजपाशी युती करावी अशा मनःस्थितीत असावेत. पण मोदीजी त्यांना लटकवून  ठेवतिल. संपुर्ण शरणागती पत्करली तर  'आम्ही देतोय तितक्या जागा घेऊन चुपचाप कामाला लागा ' असे भाजपाचे बजरंगबली अमित शहा त्यांना ठणकावून तसे ते स्विकारायला लावतील. पंतप्रधान पदाच्या या पाचव्या उमेदवाराची राजकीय कारकिर्द संपेल अशी शक्यता आहे. 

पंतप्रधान पदाचे सहावे उमेदवार शरद पवार आहेत. त्यांनी उद्योगपती अदानी यांच्यावर होणारी टिका रास्त नसल्याची जाहिर करून सन २०२४ च्या निवडणुका येण्यापूर्वी एक वर्ष अगोदरच भाजपाचे काम सोपे करून टाकले आहे. यावरून त्यांची  पंतप्रधान पदाची इच्छा संपली आहे असे वाटते. स्वतःचे मविआ सरकार  नावाचे गोंडस बाळाचा मोदी-शहा जोडीने एनकाॅन्टर केल्यामुळे शरद पवारांना आपल्या कन्याचं भवितव्य शहा-मोदीच्या छायेतच सुरक्षित राहील असा अंदाज आला असावा. म्हणून शरद पवारांनी अदानी संबंधितचं ते विधान केले असावे. कदाचीत अदानी किंवा मोटाभाय अमित शहाने नाटकाच्या प्रयोगाची  शेवटची घंटी पवारांना फोन वरून ऐकवली असावी. कारण काही ही असो पण राहूल गांधीच्या काॅग्रेस पक्षासकट इतर विरोधी पक्षांचं ही पवारांच्या त्या विधानाने नुकसान होण्याची शक्यता आहे. 

भाजपा केंद्रीय सत्तेतून पायउतार होण्याचे एक ही चिन्ह दिसत नसल्यामुळे  काल परवा पर्यंत द्विधा मनःस्थितीत असलेले एनडीए तील घटक पक्ष आता भाजपाच्या वळचणीला लागतील तेही भाजपाच्या अटी स्विकारून. शिवसेनेने दिलेल्या दगा पाहता भाजपा पक्षांतर कायद्यात काही सुधारणा आताच करण्याच्या मनःस्थितीत असावी ज्यात निवडणूक पुर्व युती-आघाडीला पक्षांतर कायद्याच्या  कक्षेत आणून काही अशी कडक कलमे असतील, की चिंगु-मिंगू पक्षांची राजकारणातील दादागिरी संपेल. 

प्रान्तीय पक्ष जे त्यांच्या प्रान्तात सत्तेवर आहेत त्यांची एक खोड आहे ती म्हणजे त्यांच्या स्वतःच्या कारभारातून तेथील जनतेत नाराजी दिसली की, त्याचे खापर ते मोदी सरकारवर फोडत असतात. प्रान्तीय अस्मिता ही प्रान्तीय सरकार मधील नेत्यांसाठी एक ढाल आहे तर  त्यांनी केलेले अपराध, भ्रष्टाचार तसेच कारभारात केलेली बेपर्वाई व शिथिलता लपविण्यासाठी एक सुरक्षा कवच ठरले आहे. सीबीआय इडी, व एनआयए सारख्या एजन्सीज् चा वापर विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केंद्र सरकार जाणूण-बुजून करते असा आरोप विरोधी पक्ष करीत आहेत. काल- परवा विरोधी पक्षांनी या संदर्भात केंद्र सरकार विरोधात केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने सपशेल  फेटाळून लावली आहे. त्यामूळे आता प्रान्तीय पक्षांचं प्रान्तीय अस्मिता  नावाचं शस्त्र बोथट ठरेल असे दिसते. ते शस्त्र सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकात पुर्णतः निष्प्रभ होईल .  

या वर्षी जिथे विधानसभेच्या निवडणुका आहेत तिथल्या प्रचारात भाजपा तर्फे 'डबल इंजीन' हे नेहेमीचं शस्त्र वापरलं जाणार आहेच. भाजपाच्या स्टार नेत्यांच्या तोफखान्या समोर विरोधी पक्षांचा फारसा टिकाव लागणार नाही. भाजपा चा विजय का होतो यावर विरोधी पक्ष चिंतन करीत नाहीत तो पर्यंत भाजपाला पराभूत करता येणार नाही. सर्वात महत्वाचं कारण असे आहे की विरोधी पक्षांची शिर्षस्थ नेते मंडळी निवडणुक प्रचारात एक जुगार खेळत आली आहेत. ते म्हणजे नरेंद्र मोदींना मीच खरा स्पर्धक आहे हे मतदारांना पटविण्यासाठी अथक प्रयत्न करीत असतात. त्यामूळे  विरोधी पक्षांची आघाडी झाली तरी परस्परांत विश्वासाचा अभाव राहणार आहे.
असे असले तरी प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनीक्स मिडीयांतील विरोधी पक्षांची समर्थक  संपादक मंडळीं, पत्रकार, समर्थक लिबरल विचारवंत आणि कार्यकर्ते, ही बाब मुळीच स्वीकारणार नाहीत. कारण राजा पेक्षा राजाचे भाटच हुषारीच्या तोरात वावरत असतात. 

विद्यमान राजकीय स्थितीत  भाजपा इतर सर्व पक्षापेंक्षा सरस ठरतो आहे. विरोधी पक्षांना विदेशी मदत मिळाल्याची  घोषणा जगातील अब्जोपती जाॅर्ज सोरस  यांनी केली आहे. पाश्चिमात्य देशांनाही भारत विरोधी कारस्थानं झाल्यास आवडणार आहेत. खलिस्थान नावाचं भूत पंजाब राज्याच्या आकाशावर घिरट्या घालत आहेत. आपल्या देशातील फितुराम लोकांमूळेच जिहादी आणि लिबरल लाॅब्यांची शक्ती वाढली आहे. विदेशी चॅनल्स, विदेशी वर्तमान पत्रॆं, पैसा,आणि बल इतकं हाताशी आल्यामुळे विरोधी पक्षांना पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणूकांचे वेध नव्हे तर त्यांच्या मेंदूत धुमाकूळ नावाचे वादळ घुसले आहे. 

ते वादळ मोदी सरकार मुंबई वरून गुजरात मार्गे पुढे पाकिस्तानवरच पाडण्याची शक्यता आहे. भारताचं काही ही नुकसान  होणार नाही. म्हणजे भाजपचं ही नुकसान झालेलं नसणार. भाजपाला हर प्रकारे अडचणीत आणण्याचे प्रयत्न अमेरिकन व चीन सरकार करतील. पण भाजपा प्रत्येक अडचणीवर मात करेल. हे युद्ध आहे. वैचारिक पातळीवर होईल. आर्थिक पातळीवर लढले जाईल., सर्व पातळीवरून भाजपाच बाजी जिंकेल. कारण भारतीय मतदार सावध व जागृत झाला आहे. विदेशी शक्तींची  कारस्थानें व त्यांना सहकार्य करणारे देशबंधुना ठेचले जाईल. या लेखात पंतप्रधान पदाचे सहा उमेदवार संबंधी माहिती आणि त्यांच्या आणि त्यांच्या पक्षांच्या जिंकण्याच्या शक्यता वर्तवून मी तीन लेख लिहीले. याचे कारण विरोधी पक्षांनीच सतत मोदींना लक्ष्य केल्यामुळे भारतातील संसदिय प्रणालीचं स्वरूप निवडणूका पुरता अध्यक्षीय प्रणालीत रूपांतर केले आहे. सारा दोष विरोधी पक्षांनाच द्यावा लागेल.
  
मोदी सरकार चे धोरण अगदी स्पष्ट आहे. राष्ट्रहित सर्वोच्च, मोदींची लोकप्रियतेचा व्यवस्थित फायदा उठवून विदेशी शक्तींना डिप्लोमासीच्या आधारें तोंड देण्यासाठी मोदी- एस जयशंकर आणि अजित डोवल, यांचे त्रिकूट. गरज पडल्यास संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि सीडीएफ असा एक गट तर मोदी- शहा, नड्डा, हेमंत बिस्वास, योगीजी व फडणवीस हा दुसरा गट निवडणूक संबंधींतले धोरण, उमेदवार निवड हे काम पाहिल. तर तिसरा गट असेल नितीन गडकरी, सितारामन, अश्विनी, आणि चॅनेल वरील भाजपाचे प्रवक्ते. अर्थात हा मी कयास बांधला आहे. पण एक गोष्ट मात्र मी इथे ठामपणे सांगु इच्छितो की भाजपा देशान्तर्गत विरोधी राजकीय शक्तींना व बाह्य शक्तींना ही पुरून उरेल. पण हे कसे शक्य होईल या संबंधित आपली चर्चा होत राहील.  
                 धन्यवाद !
               वन्दे मातरम !

राष्ट्रीय स्तरावरील राजकारण भाग-२

 

ज्यांना आपण सर्वसाधारणपणे पंतप्रधान पदाचे उमेदवार मानतो आहोत त्यांचा स्वभाव, व्यक्तीमत्व, कार्य आणि राजकारणाची जाण या चार कसोटीवर कोण सरस ठरेल ते आपणच ठरवावे. तसेच कुठला पक्ष संघटन व नेतृत्वात सरस आहे ते ही आपण ठरवावे. मला जे आकलन झाले आहे ते पुढे ठेवतो आहे.


एखाद्या तांत्रिक(यंत्राच्या साह्या ने तयार केलेला पक्षी) पक्षाला जसे  शिकविले आहे, तसे तो बोलत असतो, तसेच काही तरी राहूल गांधींच होतंय हे आपणांस पदोपदी जाणवते. पंतप्रधान पदाचे हे विरोधी पक्षातले पहिले उमेदवार आहेत. पण करीत काय आहेत?  राहूल गाधीं एक कलमी कार्यक्रम करीत आहेत तो  म्हणजे  मोदी आणि अदानीवर टिका करीत राहणे. अतिशय गंभीर बाब म्हणजे आपल्या देशाच्या लोकशाहीचा इंग्लंड मध्ये जाऊन राहूल गाधींनी अपमान केला. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा जिथे वैदिक काळात गणराज्य व्यवस्था होती अशा आपल्या देशाचा अपमान केला आहे. वैदिक काळात भारतवर्षात गुरूकुलं होती. त्यावेळी इंग्लंड मधील लोक जंगलात राहात होते, असे व्हाॅईसराय लार्ड कर्झनने म्हटलेलं आहे.  ' राहूल गांधींके बारेंमें इंग्लंड स्थित मूल भारतवासियोंकें मन में नफरत पैदा करनेवालें स्वयं राहूल गांधी है | ऐसे आदमी क्या भारत जोडेंगे ? ' ही  इंग्लंड मध्ये राहात असणार्या एका भारतीयाने सोशल मिडीया वर टाकलेली पोस्ट माझ्या वाचनात आली आहे. वस्तुतः जगभरातल्या देशात जिथे मोदी ssमोदी असे म्हणत पंतप्रधान मोदींचा सत्कार, स्वागत होते, तिथे हे युवराज राहूल गांधी कुठल्या बेस वर  काय बरगळले आहेत ? चीन हा सर्वात शांतीप्रिय देश आहे असा हा राहूल गांधींचा शोध ! त्यात राहूल गांधींचा दोष नाही. त्यांच्या मागील पितरांकडून ते वाक्य pass on होत आलेले असावे.  ज्यांना भारत ही आपली पितृ आणि मातृभूमी वाटत आहे असे लोक  ' भारत हाच देश जगातला शांतप्रिय देश काल होता, आज आहे आणि उद्या ही राहील.' असेच म्हणत असतात.

आपणच सारासार विचार करून ठरवा की राहूल गांधी कुठे चुकले आहेत ? त्यांच्या बोलण्यात तारताम्य नसते. लोक त्यांची औकात काढतात. ''I am amazed at Rahul Gandhi's lack of intellect, forget his lack of integrity." This is what Suhail Seth a Successful Businessman, Columnist, Key-Note speaker has said about Rahul Gandhi. सुहेल सेट जे म्हणाले त्याचा मराठी भाषेतला संक्षिप्त व साधा अर्थ आढ्यात नाही तर पोहर्यात येणार कोठून? हाच होतो. खरं पाहता 'पप्पू ' हा शब्द गोड बालकाला लाडाने गोंजारून मारलेली हाक आहे. आपल्या देशातील पुढची पिढी आपल्या नातवाला पप्पू हे टोपण नाव ठेवतील की नाही अशी शंका वाटू लागली आहे. 

माझे उत्तर आहे ' राहूल गांधींना जबरदस्तीने राजकारणात आणले गेले असावे. तो त्यांचा प्रांत नाही. त्यांना राजकारणात आणले, ठिक आहे. आपल्या देशात बाॅलीवुड आणि राजकारणात वारसशाही आजपावेतो गैर मानली नाही, म्हणून हा निर्णय स्वागतार्ह होता. पण थेट पंतप्रधान बनण्याची इच्छा कशी, काय आणि का लादली गेली ? मला तर राहूल गांथीं ची किंव येते. एका साधारण दुर्बिणीने आकाशातील चंद्र पाहणे वेगळं आणि अंतराळात जाऊन चंद्रावर पाऊल ठेवणे हे किती किती कठीण कार्य आहे हो ! विद्यार्थ्यीची ज्या विषयात गती आहे त्याच क्षेत्रात विद्यार्थ्याला पुढे विजश्रीदेवी हार घेऊन उभी असते. हे शाश्वत सत्य आहे. याचे भान नसलेल्या (हे भान येणार तरी कसे हो) आईने आपल्या बाळाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामूळे  पुष्कळदा राहूल गांधीचे वागणे विक्षिप्त असते. 

कुत्रीम रित्या आधुनिक विज्ञानाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने कुत्रीम बुद्धी माणसाच्या मेंदूत देण्याचे प्रयोग अस्तित्वात आले आहेत की नाही हे मला ठाऊक नाही. पण पुढे-मागे आले तरी जन्मजात शरीर, रंग, नाक, कान डोळे, वजन, बुद्धी, श्रवणशक्ती, ग्रहणशक्ती स्मरणशक्ती इत्यादी बाबीत पुढे किती ही कुत्रिम उपाय केले तरी त्याचा उपयोग होईल असे वाटत नाही. तसे करणे हे ही अनैसर्गिक ठरेलच. या शिवाय तो छळवाद ठरतो. म्हणजेच फौजदारी गुन्हा ही ठरू शकेल. बस माझे उत्तर इथे संपले. कारण सन २०१७ साली गुजरात विधानसभा निवडणूकातील त्यांच्या यशाचे मी कौतूक केले होते.पण आता माझा भ्रमनिरास झाला. तो ही कायमचा ! '

पंतप्रधान पदाचे दुसरे उमेदवार केजरीवाल यांनी लाज-शरम काय म्हणतात, ती पुर्णपणे सोडली आहे. आपल्या दिल्लीतील सरकारचे दोन बडे मंत्री इडी च्या चौकशीतून जेलमध्ये गेले आहेत. तरी उसने आवसान आणत  कट- कारस्थानं व थापा त्यांच्या सुरू आहेत.  मागे मी केजरीवाल संबंधी म्हटले होते, की दिल्ली आणि पंजाब मधील निवडणूका विदेशी पैशाच्या ताकदीने जिंकल्याची पोल खोलली जाईल, जेव्हा या विदेशी शक्ती ची ओळख पटेल, तेव्हा केजरीवाल यांचा पक्ष भुईसपाट होईल. हा लेख लिहीताना केजरीवाल यांना कोर्ट द्वारे समन्स पाठविण्यात असल्याची बातमी आता हाती आली आहे. उत्तर प्रदेशाच्या समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना हाती घेऊन ममता बॅनर्जीच्या मोदी हटावाच्या गर्जना वाढत आहेत. पण त्या गर्जानांचा आवाज इतका मोठा झाला आहे  की जणु काही त्या देशाच्या माजी पंतप्रधान असाव्यात. 

आता आपण येथून थेट पश्चमेकडील राजस्थान मध्ये पोहोचलो तर तिथे दृश्य काय आहे ते पाहू या. मुख्यमंत्री गेहोलोत आणि सचीन पायलट याच्यांत सतत शाब्दिक चकमकी होत आहेत. मोदी हटाव या मोहिमेत दोघे नेते फारसे दिसले नाहीत. इथे काॅग्रेस विरूद्ध भाजपा असाच सामना असतो. काॅग्रेसला ॲन्टी इन्कबन्सी ला सामोरे जावे लागेल. त्यातच सचिन पायलट नवा पक्ष काढणार अशी बातमी आहे. मग मोदी विरोधी लाट कशी निर्माण होणार?  इथे  सत्ताथारी पक्षाला जनताच पाय उतार करते. राजस्थानचं महत्वाचं वैशिष्ट हे आहे की येथील कुठल्या ही नेत्याला  पंतप्रधान पदाची लालसा निर्माण झालेली दिसत नाही. पण काॅग्रेस श्रेष्ठींचा  ' हम करें सो कायदा ' या वृत्तीमुळे पंजाब प्रमाणे हा प्रान्त काँग्रेसच्या हातून कायमचा जाण्याची शक्यता आहे.

कर्नाटकाच्या निवडणूकांची घोषणा झाली आणि लागलीच  काॅग्रेसेच भुतपुर्व मुख्यमंत्री सिद्धरमैय्या  आणि डी के शीवकुमार मध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. तरी मोदी  हटाव या मोहिमेत दोघे ही सामिल आहेत. इथे भाजपचं काही खरे नाही पण काॅग्रेस अंतर्गत असलेली स्पर्धा आणि परस्परातला द्वेष काॅग्रेसला महाग पडू शकतो की नाही ? त्यातच तिथे भुतपुर्व पंतप्रधान देवेगौडा यांचा पक्ष आपली शक्ती आहे तितकी सुरक्षित ठेवून आहे असे ऐकिवत आहे. या शिवाय मोदींचा करिष्मा कमी झालेला नाही आणि राहूल गांधींनी लंडन मध्ये पाजळलेले ज्ञान कर्नाटकातील नवयुवकांना किती पसंद पडले याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.  झारखंड मध्ये मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री मध्ये दुरावा दिवसेंदिवस वाढत आहे.  मोदी हटाव ही मोहीम ते थोड्या फार प्रमाणात  चालवित आहेत. पण ती चालविण्यात त्यांना स्वारस्य किती आहे हे त्यांनाच ठाऊक आहे. काॅग्रेस श्रेष्ठींना ही अचूक अंदाज घेता येईल असे मला वाटत नाही. छत्तीसगड चे मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि प्रदेश काॅग्रेस चे अध्यक्ष मोहन मरकाम यांच्यातला तिढा सोडविण्यात काॅग्रेस श्रेष्ठी दुर्लक्ष करीत आहेत. तिथे तिची  स्थिती पंजाब सारखी होईल.

तामिळनाडूत भाजपा चा पुढील  लोकसभेत होऊ घातलेल्या प्रवेशाची  मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी लौकरच धास्ती घेतलेली दिसते. कारण तामिळनाडू त संघाच्या कार्याचा प्रभाव वाढला आहे. या शिवाय या राज्यातील भाजपाला के अण्णामलाईच्या रूपाने एक कणखर नेतृत्व लाभले आहे. म्हणून स्टॅलिन यांना भाजपाची दखल घ्यावी लागली आहे. ईडी, सीबीआय,इत्यादी एजन्सींना न्यायालयीन निर्णायामुळे  मिळालेल्या स्वातंत्र्य मुळे स्टॅलिन यांना ही समन्स येण्याची शक्यता वाढली आहे.

सन २०२४ च्या लोकसभेच्या निकालानंतर देवेगौडा प्रमाणे आपल्या माथ्यावर  पंतप्रधान पदाचा मुकुट बसेल या आशेतून तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव हे ही मोदी यांच्यावरच टिका करीत आहेत. असे हे चौथे पंतप्रधान पदाचे उमेदवार सध्या स्वतःच्या राज्यातल्या कारभारा पेक्षा विरोधी पक्षांची आघाडी करण्यात फिरत आहेत. यश किती मिळेल फक्त तेच जाणो !
                                   क्रमशः
(लेखाचा भाग -३ सोबत जोडला आहे तो कृपया वाचावा ) 

शनिवार, १५ एप्रिल, २०२३

राष्ट्रीय स्तरावरील राजकारण भाग- १



मागे मी राष्ट्रीय स्तरावरील राजकारण - (धावता  आढावा) या शिर्षकाचा लेख लिहीला होता. त्यानंतर जवळपास दोन महिने लोटले आहेत. देश-विदेश मध्ये अनेक घटना घडल्या  आहेत, होत आहेत त्याचे नावच राजकारण आहे. कोरोना नंतर एखादी नैसर्गिक घटना घडली तरी त्याच्या मागे कोणाची तरी राजकीय चाल आहे. असा अंदाज ही काढला जातो. तसे पाहता आजचा लेख मागील  लेखाचाच पुढील भाग आहे. हा विषय न संपणारा असा आहे. त्यामुळे या लेखापासून एका लेख मालिकेची सुरूवात झाली असे हे गृहीत धरू या. राजकारण हा विषयच पुढे सरकत जाणारा आहे, नदीच्या प्रवाह सारखा !

पण जिथे खड्डा दिसला की तिथे नदीचे काही पाणी शिरते. तो खड्डा भरला की प्रवाह पुढे जात राहतो. त्या खड्डयातले पाणी लागलीच डबके बनते. नदी सागराला मिळे पर्यंत डबक्याची संख्या खुप वाढलेली असते. राजकारणाचा प्रवाह असाच असतो. पण नदीतले सारे पाणी डबक्यात जात नाही. पण डबक्याची संख्या वाढत जाते. राजकारणाचे ही तसेच काहीसें होत असते. नदी ही आपली आईच असते. म्हणून आपण गंगामैय्या, नर्मदामाता, गोदामाई असे संबोधितो . ती परोपकारी असते. ती सुद्धा धरणीमातेला आई मानत असावी. म्हणून ती त्या खड्डयात दिलदारपणे आपले जल ओतून पुढे जाते. पुढे ती पठारी मैदानात मानवासाठी ती हळूहळू थांबत थांबत आपला प्रवास करते. इतकेच नव्हे तर मानवाने शेतीसाठी, पिण्यासाठी तिचे पाणी अडविले तरी कां कूं करीत नाही.  तिचे जे जल खड्डयात पडते त्याला डबक्याचे रूप आपणच देतो. 

मुळात जमिनी वरील खड्डे एक तर मुसळधार पावसाने होतात वा माणसाने आपल्या ऐहिक सुख-सोयी साठी केलेले असतात. कवी आणि कवीयत्रींच्या दृष्टीतून ते खड्डे म्हणजे धरणीमाते वर झालेल्या जखमा होत. ते खड्डे आपल्यासाठी म्हणजे धरणी- पुत्रासाठी सुद्धा जीवघेणे असतात. त्या खड्डयावर पंचायत समिती व महापालिकेतील रस्ते सुधारक समिती लागलीच औषधोपचार करीत नाहीत. इथेच आपली म्हणजे जनसामान्यांची हतबलता असते.  

इथे मला 'अनोखी रात' या हिन्दी सिनेमातील गीतकार इंदीवरांचे स्व मुकेश यांनी गायलेले गीत आठवले -
"ओह रे ताल मिले नदीके जलमें | 
   नदी मिले सागरमे    
सागर मिले कौनके जलमे | कोई जाने
    ना रे ||ओह रे ताल.. "

मागे महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि सुनावणी या लेखात River can go no reverse  या सत्याचा ओझरता उल्लेख केला होता. त्याची सत्यता पटवून देणे राहीले होते. ते कार्य इथे पुरे करण्याचा प्रयत्न करीत आहे. 
नदीचा प्रवाह म्हणा, वा पावसाच्या पाण्याचा प्रवाह हा एक धर्म आहे. तो प्रवाह उतरता असतो. का तर सार्या मानवाचं हित व्हावे म्हणून.  राजकारणाचे  मूलतः ' राजधर्म ' असे  नाव आपल्या संस्कृतीत  आहे. पण राजधर्माला उतरती कळा लागते तेव्हा त्याचे रूपांतर राजकारण असे होते. इंग्रजी मध्ये Politics असे म्हणतात. राजधर्मा ला जगातल्या कुठल्याच भाषेमध्ये नाव नाही.असो.  कवी इंदिवर पुढे सागराचे पाणी कुठल्या जलात जाते हे माणसास माहीत नसते हे सांगून आपली हतबलता किंवा आपल्या शक्तीच्या मर्यादा दाखवून जातात.

सागाराच्या जलाचे सूर्य वाफेत रूपांतर करतो. नंतर ती वाफ आकाशात जाते. पुढे आकाश त्या खारट वाफेचे आपल्या मानवी तर्कांच्या पलिकडे जाऊन गोड जलात रूपांतर करून ढगांच्या रूपात साठवण करते. पुढे वायू ढगांची घुसळण करून  पुन्हा धरणीमातेकडे पावसाच्या रूपात परत येते. परंतु ते पाणी गोड कसे होते याचे रहस्य मानवाला शोधता आलेले नाही. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या विज्ञान निबंध पुस्तकात  निसर्गाचा देव असे एक स्वतंत्र प्रकरण ठेवले आहे. या चर्चेचं सार  हा एक 
' निसर्गाचा धर्म ' आहे. तसेच समाजाला व्यवस्था, राज्याला व्यवस्था असते. अशा व्यवस्थेचे जनकत्व भारताकडे जाते असे अनेक पाश्चिमात्य व पौर्वात्य विचारवंत,  आणि देशी-विदेशी इतिहास विभागाने उजेडात आणले आहे. माणूस राजधर्माला राजकारणाचं रूप देतो. राजकारण म्हणजे गजकर्ण ही व्याखा रूढ झाली याला आपणच जबाबदार आहोत. गजकर्ण म्हणजे खाज. खाज हा रोग म्हणजे आत्मनाश. राजकारणातून म्हणजे सत्तेच्या हव्यासातून युद्धाची खाज निर्माण होऊन महायुद्धे होतात. त्यातूनच सर्वानाश होतो. हा मानव जातीचा इतिहास आहे.

आपल्या येथीलच नव्हे तर जगातील  सर्वच देशात कुठलाही राजकीय पक्ष धुतल्या तांदळ्या सारखा स्वच्छ नाही. आपण संसदीय पद्धत स्विकारली आहे. इथे विजयी झालेल्या पक्षांच्या संसद सदस्यांनेच आपला नेता निवडावयाचा असतो. पुढे तोच नेता देशाचा पंतप्रधान होतो. त्या पदाची शान संसदेतील सर्वच सदस्यांनी राखावी अशी अपेक्षा असते. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पतंप्रधानपदाची शान राखावी वा ना राखावी हा वाद बाजूला सारू या. विरोधी पक्षांचे चुकतंय कुठे तर ते केंद्र सरकारवर टिका करीत नाहीत. ते फक्त मोदीजींना टार्गेट करीत आहेत. ते ही नीच पातळी गाठून. म्हणून आपल्या येथील विरोधी पक्ष डबक्यां सारखी झाली आहेत, असे मला वाटू लागले आहे. असे म्हणताना  माझे मन कष्टी होते. पण विरोधी पक्षातील सर्वच मंडळी डबकी आहेत तसेच सत्ताधारी पक्षात डबकी नाहीत असे ही नाही हे सत्य मी स्विकारतो की !

पंतप्रधान मोदींना  नऊ वर्ष सतत टारगेट करीत नीच पातळी गाठून टिका करणे  हे लांचनास्पद नव्हे 
काय ?आजचा सामान्यतला सामान्य मतदार ही विचार करतो आहे की आपल्या बापजाद्यांपासून कधी नव्हे ते सुख गेली आठ-नऊ वर्षे मिळू लागले आहे; ज्यांनी आपल्याला शौचालय दिले; घरें दिली; रेशन पुरविली ; बँकेत पैसे जमा केले ; वीज दिली ;  गॅसच्या टाक्या दिल्या, अशा नरेंद्र मोदी व भाजपा वर विरोधी पक्ष इतकी टिका का करीत आहेत असा प्रश्न विचारत आहेत. ही ग्राऊन्ड रिॲलिटी बनली आहे. भाजपाचे समर्थक नसलेले प्रभू चावला आणि शेखर गुप्तासारखी जेष्ठ संपादक मंडळी प्रत्येक निवडणुकांचा सर्वे करताना हातचे काही न राखता हे सत्य मान्य करीत आहेत. मोदी वर सतत टिका  करून नुकसान विरोधी पक्षांचेच होत आहे ना ? पण लक्षात कोण घेतोय ? 

हे लक्षात घेण्यासारखे विरोधी पक्षात मोठे नेतेच राहिले नाहीत. पंडीत नेहरूंच्या कारकिर्दीत बॅ नाथ पै, डाॅ शामाप्रसाद मुखर्जी वैगरै तर इंदिरा गांधीच्या कारकिर्दीत डाॅ राम मनोहर लोहिया, पंडीत दिनदयाळ उपाध्याय अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दंडवते इत्यादी अशी विद्वान आणि अभ्यासू संसदपटू विरोधी पक्षात होती. पुढे २०१३ पर्यंत चांगले संसदपटू  विरोधी बेंच वर पहावयास मिळाले. सन २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपा सत्तेवर आला. त्यानंतर  विरोधी बाकावरील सदस्यांच्या कुवतेची, अभ्यासू वृत्तीची घसरण होत गेली आहे. ही देशाच्या विद्यमान राजकीय स्थितीतली एक मोठी समस्या आहे. 
                                क्रमशः
( लेखाचा भाग २ सोबत जोडला 
आहे .कृपया तो वाचावा )

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष - स्वरूप आणि सुनावणी

 


सध्या सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर जी सुनावणी सुरू झाली आहे त्यावर अधिक आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष हा काही संपुर्ण भारत देशाच्या राजकारणाचे चित्र बदलेल असे नाही. कारण  राजकारणाच्या मैदानात मविआ सरकार स्वतःच्या कर्माने धोबीपछाड झाले आहे. 


मविआ सरकारच्या पतनातून सत्ता संघर्षाची सुप्रिम कोर्टात जी सुनावणी सुरू आहे ती शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटी संबंधित आहे. त्यावर चर्चा करताना आपल्याला एक गोष्ट ध्यानात ठेवावी लागेल ती म्हणजे दस्तुरखुद्द सुप्रिम कोर्ट व केंद्र सरकार यामध्ये ही एक शीत युद्ध सुरू झाल्याचे आपण पाहात आहोत. त्याचं स्वरूप काय आहे, तसेच तशा प्रकारचं शीतयुद्ध केंद्रात भाजपा सत्तेवर आल्यानंतर म्हणजे सन २०१४ पासून का सुरू झाले हा ही एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. या विषयावर वेळ येईल तेव्हा चर्चा होईल. ती वेळ कदाचीत वरील सुनावणी संपल्यानंतर लागलीच येऊ शकते. या घटकेला आपण महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सुनावणी संबंधीत चर्चा करीत  आहोत.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रिम कोर्टात जी सुनावणी सुरू आहे त्या संबंधित अनेक कायदातज्ञांची मतें, विडीओ आपण ऐकतो पाहतो आणि वाचत ही आहोत. केंद्र स्तरावरील राजकारणात पंतप्रधान मोदी जितक्या आत्मविश्वासाने आणि आक्रमकतेने विरोधी पक्षांवर हल्ला करीत आहेत तितक्याच आत्मविश्वासाने आणि आक्रमकतेने देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षांवर हल्ले करीत असल्याचे दिसत आहेत. याचा अर्थ असा आहे की या दोन्ही नेत्यांची लोकप्रियता आणि विश्वासार्हता शिगेला पोहचली आहे. लोकप्रियतेच्या ताकदीतूनच त्यांचा आत्मविश्वास आणि धडाक्याच्या राजकीय चाली अनुभवयास येत आहेत. राजकारण व्यक्ती केंद्रीत होत आहे, तरीही ही बाब जनता स्विकारीत आहे हे सत्य आहे.

वरील सत्याचे भान देशाच्या न्यायव्यवस्थेला असावे. म्हणूनच न्याय व्यवस्था टोकाची भुमिका घेईल असे मला वाटत नाही. या पाठीमागे आणखिन दोन कारणें आहेत. त्यातील पहिलं कारण म्हणजे  भाजपात घराणेशाही नाही. दुसरे असे की मोदीजी आणि देवेंद्रजींचा  कारभार लोकांना त्यातच विशेषतः निवृत्त झालेल्या सनदी, लष्करी अधिकारी आणि निवृत्त वकील मंडळींना ही पारदर्शक व स्वच्छ वाटला आहे. हे सत्य ही न्यायालयाच्या नजरे समोर असावे. अर्थात सुप्रिम कोर्टाने उद्धव ठाकरे गटाच्या वकीलांच्या युक्तीवादावर जे शेरे मारले आहेत त्यावरून मी सुप्रिम कोर्टाच्या येणार्या निकालातील संभावना मांडली आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला बहाल केले आहे. त्या संबंधीत विरोधी पक्ष संविधान धोक्यात आहे अशी बोंबाबोंब करीत आहेत. पण त्यात अग्रणी स्थानावर बहुतांशी पक्ष असे आहेत की त्या पक्षांतर्गत घराणेशाही व हुकूमशाही आहे. इतकं साधं ज्ञान निरीक्षर नागरिकाला ही आहे याची नोंद सुप्रिम कोर्टाने केलेली असावी.

निवडणूक आयोग ही एक स्वायस्त संस्था आहे. तिच्या वरील  निकालात सर्वोच्च न्यायालय वाजवी पेक्षा अधिक हस्तक्षेप करू शकत नाही. या संबंधीतला निकाल हाती येण्यासाठी आपल्याला पुढील आठवड्या पर्यंत वाट पहावे लागेल. सध्या एकनाथ शिंदे समर्थक वकील मंडळी व राजकीय अभ्यासक आणि उद्धव ठाकरे समर्थक वकील व अभ्यासक  या सत्ता संघर्षाच्या न्यायालयीन सुनावणीचे विश्लेषण आपआपल्या
सोयीनुसार मांडत आहेत. ते ही स्वाभाविक मानून त्या पलिकडचा विचार करता ज्या काही काॅमन सेन्सच्या तीन गोष्टी आपल्या समोर येतात. त्या मी खाली मांडतो आहे.
१) श्री उद्धव ठाकरें यांनी सन २०१९ च्या निवडणूकांचा युतीच्या सरकारला मिळालेला जनादेशाचा आदर करावयास हवा होता.
२) श्री उद्धव ठाकरें यांनी विश्वास दर्शक ठरावाला सामोरे जावयास हवे होते. 
3) श्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सरकारच्या घटक पक्षांच्या नेत्यांची संमती न घेता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावयास नको होता.

वरील  घोडचुका उद्धव ठाकरें यांच्या हातून घडल्या की धाडसाचे राजकारण करण्याची खाज त्यांना नडली यावर कितीही काथ्याकूट केला तरी उद्धव ठाकरे संपूर्णतः पराभूत झाले आहेत हाच निष्कर्ष  आपल्या हाती लागतो.

मुळात उद्धव ठाकरें यांनी मागील  विधानसभा निवडणूकीतला जनमताचा कौल झुगारून मविआ सरकारचे मुख्यमंत्री पद मिळविले ही राजकारणातील लबाडी मानली जाते. त्याचं (planning) नियोजन शरद पवार आणि उद्धव ठाकरें यांनी निवडणूक प्रचार काळातच केले असावे असा अंदाज मी एका लेखात व्यक्त केली होता. अलिकडे एका न्यूज चॅनेल वरील चर्चा नावाच्या कार्यक्रमात सन २०१९ विधानसभा निवडणुकीतल्या प्रचार काळात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपआपल्या पक्षांचे उमेदवार अधिक निवडून कसे येतील या साठी दोघांनी मिळून  एक स्ट्रॅटेजी आखली होती. त्या नुसार आपआपल्या पक्षांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना सेना आणि राष्ट्रवादी पक्षांचे उमेदवार अधिक निवडून येण्यासाठी जाॅईन्ट प्रयत्न करण्याचे गुप्तपणे आदेश दिले होते.
म्हणजेच क्राॅस व्होटींगचा प्लॅन करून भाजपाचे उमेदवार पाडा असाच तो आदेश होता. याचा अर्थ उद्धव ठाकरे हेच मोठे गद्दार आहेत. यावरून सिद्ध होते की एकनाथ शिंदे आणि त्यांचे सारे सहकारी जे म्हणत आहेत ते सारं खरं आहे. 
 
मविआ सरकार स्थापन झाल्यानंतर सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी मविआ सरकार पंचवीस वर्षे टिकेल अशा बढाया मारण्याचे जे सत्र सुरू केल होतं ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी प्रचार काळात  गुप्तपणे केलेल्या गद्दारीपणातून मिळालेल्या शक्तीच्या जोरावर हे सिद्ध होते.  त्यातूनच पंतप्रधान मोदी आणि भाजपाला मीच शह देऊ शकतो असा अहंकार उद्धव ठाकरेंच्या कारभारातून दिसायाला लागला.

मविआ सरकार जसे स्थिरावत गेले त्या काळात हळूहळू उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात शीत युद्ध सुरू झाले. तसे होणार अशी शक्यता मी ' देश- प्रदेश विद्यमान राजकीय स्थिती ' भाग २ च्या लेखात व्यक्त केली होती. उद्धव ठाकरें यांनी घटक पक्षांना विशेषतः शरद पवारांना फाट्यावर मारून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन मोठ्या थाटात ते मातोश्रीत परतले. यातून उद्धव ठाकरेंचा अहंकार म्हणा वा लहरीपणा दिसतो. उद्धव ठाकरेंची एक लहरी मुख्यमंत्री म्हणून इतिहासात गणना होईल असे भाकित केंद्र- राज्य संघर्ष भाग २ या लेखात केले होते. तसेच 'आघाडीला धर्म नसतो. एखाद्या घटक पक्षाची गैरसोय झाली की आघाडी सरकार कोसळते, अशी गैरसोय शिवसेनेची होईल हे ही मी केंद्र-राज्य  संघर्ष भाग ४ या लेखात म्हटले होते.

आपल्या सरकार मधील घटक पक्षांना अंधारात ठेवून उद्धव ठाकरे यांनी सरकारचा राजीनामा देण्या पाठीमागे  दुसरे कारण असे असावे की दिल्लीत राष्ट्रवादी पक्षांचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काॅग्रेस चे अशोक चव्हाण सोबत असताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची दिल्लीत घेतलेली स्वतंत्र भेट हे होय. त्या भेटीचे कारण काय असावे या बाबत लागलीच लिहीलेल्या लेखात अंदाज व्यक्त केला होता. तो ही खरा ठरला आहे. आता उघड झाले आहे की त्या भेटीत उद्धव ठाकरें यांनी स्वतः मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याची तयारी दाखविली होती आणि  पुन्हा भाजपाच्या नेतृत्वाचे युती  सरकार आणण्याची मोदींजींना विनंती केली होती.त्यावर पंतप्रधान मोदींनी ' देखेंगे ' असे उत्तर देऊन उद्धवजींना कात्रजचा घाट दाखविला असावा. घटक पक्षांच्या नेत्यांना न जुमानता मी स्वतंत्र भेट घेतो ही माझी शक्ती आहे हे मोदींजींना दाखवून सुद्धा मोदीजींनी ठाकरें कडून आलेला युती सरकारचा प्रस्ताव कचराच्या टोपलीत टाकला. म्हणून ठाकरेंना राग अनावर झाला असावा.

मविआ सरकार अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रवादी आणि काॅग्रेस या घटक पक्षांची अपरीहार्यता हे आपले शस्त्र आहे, अशी उद्धव ठाकरें यांची ठाम समजूत झाली होती.  हे शरद पवार, अजित पवार, अशोक चव्हाण, थोरात, आणि नाना पाटोळे यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे शेवटची कॅबिनेट बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरें यांना एकाकी सोडून दोन्ही काॅग्रेस चे नेते मंडळीं आपआपल्या घरी गेली. राजकारणातले ते दोन्ही पक्ष वर्तमान स्थितीत मोठे खेळाडू राहिले नसतील पण उद्धव ठाकरे इतकं त्यांना विपरीत बुद्धीने ग्रासले नाही. मुख्यमंत्रीपदाची नशा आणि गुर्मी असलेल्या उद्धव ठाकरेंनी राजकीय खेळी करण्याच्या नादात तडकाफडकी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन  थाटामाटात मातोश्रीवर परतले. त्या थाटामाटाचे नाटक हे काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षांवर शंभर टक्के कुरघोडी करण्याचाच प्रयत्न होय. पक्ष ही गेला, निशाण ही गेलं तेव्हा कुठे आता उद्धव ठाकरेंना विरोधी पक्षांची आठवण झाली. आता त्यांनी इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संपर्क सुरू केला खरा पण मविआ पुन्हा जिवंत होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. जीवंत झालीच तरी ती अशक्त आणि कोमजलेली असेल. 

क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रु आहे. त्यातून माणूस सारासार विचार करण्याची शक्ती म्हणजेच विवेक गमावून बसतो. भगवंताने अर्जुनाला म्हटले आहे, 
क्रोधात् भवती संमोहः 
संमोहात् स्मृति विभ्रमः।
स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो 
बुद्धी नाशात् प्रणश्यति ।।

उद्धव ठाकरे असो वा राहूल गांधी किंवा देशभरातील घराणेशाही पक्षांचे जे वारस हक्काने नेते झाले आहेत, त्यांना क्रोध आवरता येत नाही. याचे कारण मानसशास्त्रात दडले आहे. राजकारणात इतरांना असूया वाटावी इतक्या सहजपणे  विनासायास तरूण वयात नेत्यांमध्ये गणना झाली की पद, सत्ता, लोकप्रियता, व किर्ती प्राप्त होते. त्यानंतर लोकमानसावर आपले अधिराज्य आहे असे अनुभवयास येते. हे अनुभवल्यावर सामान्यतः माणसाला लोभ जडतो. मग त्यातच गुरफटुन जाऊन वरील सर्व गोष्टी वाढत राहाव्यात, किमान कमी होऊ नयेत  या साठी अहंक्रेद्रीत असे वैयक्तिक राजकारण मोठ्या, व्यापक प्रमाणात अशी नेते मंडळी करू लागतात. त्यातून अवतीभवती जे काही घडत असते त्याकडे दक्षतेने, डोळसपणे आणि तटस्थेने पाहण्याची क्षमता गमावून बसतात.

असेच काहीतरी उद्धव ठाकरें आणि राहूल गांधीच्या बाबतीत घडते आहे. काळ हा बदलत असतो. काळाच्या महिमात अनेक शहरें व मानवी संस्कृती जमीनदोस्त झाल्या आहेत. अनेक राजवटी काळाने गिंळकृत केल्या आहेत. भारतिय मतदार बदलत आहे. तो ही काळाचा महिमाच ! पुढच्या वीस वर्षानंतर देशातील राजकीय व्यवस्थेतील घराणेशाहीला घरघर लागलेली दिसेल असा माझा अंदाज आहे.

एकंदरीत महाराष्ट्रातील सत्ता संघर्षा संबंधी मविआ सरकार आकारात आले तेव्हा जो अंदाज मांडला होता तो खरा ठरला आणि शिवसेनेचंच भारी नुकसान झाले आहे. भारतीय राजकारणातला इतका मोठा भूकंप आपण प्रथमच अनुभवला आहे .  मविआ सरकारचे समर्थक मिडीया, अभ्यासक आणि नेते-कार्यकर्त्यांना भाजपाने मविआ सरकार पाडले किंवा शिवसेनवर बदला घेत शिंदे सरकार स्थापन केलं आणि ते अनैतिक व बेकायदेशीर वाटत असेल तर त्यांनी  मविआ सरकार अनैतिक रित्या स्थापन झाले होते हे ही मान्य करायला हवे. कारण ज्या मविआ चे तुम्ही जल्लोष करून भाजपावर टिका करीत होतात त्यातील मोठ्या पक्षातच उभी फुट पडली आहे. आपण ज्याचे समर्थन केले त्या मविआ सरकारनेच आपल्याला तोंडघाशी पाडले आहे ही भावना मविआ सरकारच्या समर्थक मिडिया आणि कार्यकर्त्यांत जागृत होणे गरजेचे आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपल्या नेत्यांना धारेवर घ्यावयास हवे.  नागरिक म्हणून लोकशाहीतले आपले ते कर्तव्य आहेच की ! 

निवडणूक पुर्वी अमित शहांनी उद्धव ठाकरेंना मातोश्री बंगल्यावर मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिले होते असे जे ठाकरे म्हणाले होते ते  का म्हणून खरे मानावे ?  महाभारतल्या संजयला महर्षी व्यासांनी जशी दिव्य दृष्टी दिली होती तशा प्रकारची दिव्य दृष्टी मविआ च्या कोण्या कार्यकर्त्याला मिळाली होती आणि त्याने मातोश्री बंगल्यातील तो संवाद पाहिला ऐकला आणि पुढे असा पुरावा घेऊन आजपर्यंत तरी कोणी सुप्रिम कोर्टाकडे गेलं नाही.

अनेक कायद्याच्या अनेक कलमांचा अभ्यास करून, मविआ सरकारला सुगावा लागू न देता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले. याचा अर्थ फक्त गद्दारीच असे कसे मानता येईल? गृहखाते काय करीत होते ? याचा अर्थ सरकार मधील दोन घटक पक्षांपैकी एकाने तरी गद्दारी केली असेल असे कोणी मानले तर ते गैर कसे ठरेल ? सकृतदर्शनी हा उद्धव ठाकरे सरकारचा राज्य कारभारातला हलगर्जीपणाच आहे.

मविआ सरकारचे  समर्थक मिडीया, नेते मंडळी, आणि कार्यकर्त्यांनी मविआ सरकार स्थापन केले तेव्हा मोदी-शहा आणि फडणवीस यांची कशी जिरविली असे म्हणत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना जसे चाणक्य म्हणून गौरविले तसे मोदी-शहा, फडणवीस-शिंदे यांना महाचाणक्य अशी उपाधी देऊन गौरवयाला हवे. हे जमत नसेल तर त्यांनी शांत मनाने २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीच्या तयारीला आताच लागावे. जीव तोडून काम करा यातच त्यांचं आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं हित आहे. आपण बे चा पाढा जसा बे एके बे, बे दुणे चार असे म्हणतो तसा राजकारणाचा पाढा नसतो. राजकारण एके राजकारण आणि राजकारण दुणे राजकारणच असते. आता सत्ता संघर्षाच्या सुनावणी संबंधी मला जे वाटतं ते आपल्या समोर मांडून या लेखाची समाप्ती करतो.

सर्वोच्च न्यायालय सुद्धा कचाट्यात सापडले असावे. एक नैसर्गिक नियम आहे. River can go no reverse. सर्वोच्च न्यायालय पुन्हा ठाकरें सरकारला स्थानापन्न करू शकेल अशी शक्यता फारच कमी आहे. कुठल्याही न्यायाधिशाला आपण मोठ्या वादंगाला कारणीभूत व्हावं असे वाटत नसते. सन २०१७ साली उघडरित्या बंड केलेल्या न्यायाधिशांनी पुढे बंडाचे निशाण खाली उतरविले आणि शांततेने निवृत्ती स्विकारली हे आपण पाहिले आहे. (या संबंधीचा लेख ब्लाॅगवर आहे. तो कृपया वाचावा)

शेवटी संसद हीच जनमताची प्रतिनिधी आहे आणि तीच लोकशाहीतील राणी आहे. हे सत्य न्यायालयांना ही मान्य असते. सन २०२४ ला लोकसभेच्या निवडणूका आहेत याची जाणीव घटनापिठाला असणार. अशा स्थितीत न्यायालय राष्ट्रपती महोदयांना फार तर एकनाथ शिंदेचं सरकार बरखास्त करण्याचा सल्ला देईल. पण ठाकरे सरकारला जिवंत करतील ही शक्यता फार फार कमी आहे. कारण संसद म्हणजेच कायदा बनविणारी संस्था. म्हणजेच केंद्र सरकार; तेच मोदी सरकार ! ज्याच्या कडे दोन्ही सभागृहात मजबूत बहुमत आहे. ते सरकार सुप्रिम कोर्टाच्या या सुनावणीतून बरखास्त होणार नाही. दुसरे असे आहे की मोदी-शहांना येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळण्याची खात्री असणार. त्यामूळे 
'निवडणूक पुर्व दोन वा अधिक पक्षांची युती वा आघाडी असेल तर निकाला नंतर त्यातून   कुठल्याही पक्षाला बाहेर पाडण्यास मज्जाव असेल ' अशा प्रकारचे बील संसदेत या वर्षात मंजुर करण्यात येईल असे वाटते. कदाचीत सुप्रिम कोर्ट ही आपल्या सुनावणीत तसा सल्ला देईल. बंड केलेले न्यायाधिश जसे सरन्यायाधीश पदी बसल्यावर शांतपणे निवृत्त झाले तीच परंपरा पुढील सरन्यायाधीश पाळतील असे वाटते. सुप्रीम कोर्टाने आजपावेतो केंद्र सरकार विरूद्ध टोकाचं भांडण केलेलं नाही. त्यामूळे अधिक चर्चा करण्याची गरज या घटकेला उरली नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याची वाट पाहू या.


दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...