रविवार, ३१ मार्च, २०२४

लोकसभा निवडणूका २०२४ . राजकीय पक्षांची दिशा व दशा . (भाग -२ )



पुर्वी राज्यसभा व विधानपरिषदे च्या निवडणूकांवर फारसी चर्चा होत नसे. आणि झाली तरी ती वर्तमान पत्रातल्या छोट्याशा कोपर्यात बातमीतून दिसत असे. आता काळ बदलला आहे. सोशल मिडीयावर सर्वसामान्य मतदार राजकीय घटनांवर आपली प्रतिक्रीया देऊ लागला आहे. कोण्या एकेकाळी राज्यसभेच्या निवडणूका बहुतांशी बिनविरोध होत असत. तरी ही पक्षांतर्गत स्पर्धा काल ही होती व आजही आहे. ज्यांना विधानसभा व विधान परीषदेत जाण्याचं तिकीट मिळाले नसेल त्यांना शेवटी राज्यसभेचे तिकीट मिळावे अशी इच्छा असते. इच्छूकांना तिकीट न मिळाल्याने त्यांच्या नाराजीचे दर्शन पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांना होत असते. नंतर अशा नाराज नेत्यांची यादी राजकीय पक्ष करून ठेवतात व जेव्हा वेळ येईल तेव्हा त्यांना सोयीने तिकीट देत असतात.

प्रत्येक पक्षांच्या नेत्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांचे तिकीट हवे असते. कारण या दोन्ही सभेच्या सदस्यांकडे विकास निधी अधिक येत असतो. म्हणजे खर्या अर्थाने लोकनेता पद प्राप्त होत असते. हे नेतापद त्यांना आपणच मतदानातून देत असतो. ते रास्त आहे की नाही यावर किती ही चर्चा आपण केली तरी ती वांझ ठरेल. तसेच पक्ष कुठलाही असो पक्षाला निधी देऊ शकेल अशांना लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणूकाचे तिकीट मिळण्याची संधी अधिक असते. असे का होते या प्रश्नाचं उत्तर राजकीय व्यवस्था तसेच मतदारांच्या मानसिकतेत दडलेले आहे. शेवटी आजचे युग हे पैशाचे आहे आणि निवडून येण्याची शक्यता अजमावताना उमेदवाराच्या आर्थिक स्थितीचा विचार होत असतो.

या उलट राज्यसभा आणि विधान परिषदेचे सदस्यपद हे एक प्रकारे कागदावरील लोकनेतेपद समजले जाते. कारण या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांच्या संख्यावरून राज्यात व केंद्रात प्रत्यक्षात सरकार अस्तित्वात येत नसते. ही एक तसे म्हटले तर आपल्या लोकशाहीतली उणीव आहे असे जाणवते. ही उणीव भरून काढण्याचा मार्ग नाहीच असे म्हणता येत नाही. त्यासाठी सर्व पक्षांची सहमती असणे आवश्यक असते. सध्या तरी तशा प्रकारची सहमती नजिकच्या भविष्यात होईल असे वाटत नाही.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकाचे तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची सोय म्हणून राज्यसभेचे तिकीट दिले जाते. यात तथ्यांश असला तरी तो कमी प्रमाणात असतो. कारण शेवटी Politics is an art of managing people. या संदर्भात अधिकांश तत्व हे आहे की, प्रत्येक राजकीय पक्षाला मग तो सतेवर असो वा नसो प्रशासकीय ज्ञान असलेल्या नेत्यांची ही गरज असते. म्हणून बहुतांशी निवृत्त झालेले सेनादल, पोलीसदल, व प्रशासनातले अधिकारी वर्गांना राज्यसभा व विधान परिषदेचे सदस्यत्व सर्व पक्ष देत असतात. त्यातील काहींना मंत्रीपद दिलेले आपण पाहातो.

माजी पंतप्रधान डाॅ मनमोहनसिंग हे थेट पंतप्रधानपदावर दोन टर्म म्हणजे दहा वर्षे राहिले ते राज्यसभेच्या दारातून. पण हे का शक्य झाले याचे कारण युपीए आघाडीला लोकसभेच्या निवडणूकात बहूमत प्राप्त झाले होते. काँग्रेसमधील इतर जेष्ठ नेते जे लोकसभेतून निवडणून आलेले होते तसेच राज्यसभेतील नेते जे प्रदिर्घ काळ राजकारणात होते अशांपैकी एखाद्याला पंतप्रधानपदी बसविले असते तर ते सोनिया गांधीना डोईजड ठरणारे होते. म्हणून मनमिळाऊ मनमोहनसिंग यांना पंतप्रधानपदी बसविले. येथुनच सर्वात जुना, मोठा, व प्रदीर्ध काळ सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षात सन २००४ ते २०१४ पर्यंत समांतर सत्ताकेंद्र उभे राहिले. हाच तो काळ देशातील जनतेने कधी पाहिला नव्हता इतका प्रचंड भ्रष्टाचार केंद्र सरकाराच्या दरबारात झाला.  डाॅ मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते पण ते नामधारी राहीले.

युपीएच्या काळातील किंगफिशर एअरवेजचे मालक विजय मल्यांनी भारतीय बॅकांचे जवळपास ९००० कोटीचे कर्ज बुडविले आहेत. त्यावरील केसची सुनवाणी करताना अलिकडे इंग्लड मधील जस्टीस अरबौनाट यांनी भारतीय बँकांनी सर्व नियम धाब्यावर बसून इतके कर्ज विजय मल्ल्यांना दिले कसे यावर ताशोरे मारले आहेतच. पण पुढे जाऊन ते स्पष्टपणे म्हणाले आहेत की, ' विजय मल्ल्यांना बँकानी कर्ज द्यावे असा लेखी आदेश देणारे तत्कालीन पंतप्राधान डाॅ महनमोहनसिंग आणि अर्थमंत्री सी चिंदबरम यांना अधिक जबाबदार का मानण्यात येऊ नये? ' या काळात काँग्रेसने राहूल गांधी यांना युवराज म्हणून पुढे आणले होते. त्यावेळी त्यांनी मनमोहनसिंग सरकारचा वटहुकूम भर रस्त्यात फाडला होता. सन २०१९ मधील निवडणूक प्रचारात कसलाही पुरावा हाती नसतांना राहूल गांधीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ' चौकीदार चोर है ' असा आरोप करीत धुमाकूळ घातला होता. राहूल गांधीना इतकी चाड असेल तर तर डाॅ मनमोहनसिंग आणि सी चिदबंरम वर इंग्लड मधील कोर्टाने जवळपास आरोपी ठरविले असल्यामुळे खंबीर भूमिका घेऊन पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांसंबंधी नाराजी व्यक्त करावयास हवी. पण तसे ते करीत नाही.

सर्वात मोठे चोर गांधी घराणेच असावे. कारण राहूल गांधींना सरकारमध्ये मंत्रीपदाची ऑफर वेळोवेळी दिली तरी त्यांनी स्विकारली नाही. मंत्रीपदाची गरज नव्हती. कारण सुपर प्रायमिनिस्टर सोनिया गांधी च होत्या. जे काही आर्थिक घोटाळे करावयाचे होते ते फोनवरून करता येणारच होते ते ही नामनिराळे राहून. म्हणजे विजय मल्ल्यांना मिळालेल्या कर्जात कमिशन म्हणून काहीतरी रक्कम गांधी घराण्याला मिळाली असावी. म्हणून मोदी सरकारने विजय मल्ल्यांच्या केस मध्ये कसून तपास करण्याची गरज आहे. कारण युपीए सरकारच्या काळात देशाच्या संपत्ती व संसाधनांची झालेल्या प्रंचड लूटीचा विसर मतदारांना अजुनही पडला नाही  

                                   क्रमशः--

बुधवार, १३ मार्च, २०२४

लोकसभा निवडणूका २०२४ राजकीय पक्षांची दिशा व दशा . (भाग १)



शनिवारी दिनांक १६ मार्च २०२४ ला लोकसभेच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या. प्रचाराची धामधूम निदान भाजपाची आठवडाभर अगोदरच सुरू झाली होती. भाजपा नेहमीच निवडणूकांच्या मुड मध्ये असतो असे सर्वच मिडीया हाऊसेस म्हणत असतात. भाजपाला हे एक आगळे-वेगळे वैशिष्ट्य जनसंघाच्या (आताचा भाजपा) स्थापनेपासून राष्ट्रीय व सनातनी मूल्याधिष्ठीत विचारसरणीच्या निरंतर उपासनेतून प्राप्त झाले आहे. विरोधी पक्ष व प्रान्तीय स्तरावरील पक्षांची विचारसरणी ही इतर देशातून आयात झालेली आहे, पण जेथून आयात झाली तिथेच तिचा पराभव झाला आहे. या सत्यावर डोळेझाक करीत विरोधी पक्ष आपल्या विचाराची व प्रचाराची दिशा व पद्धत आहे तशीच ठेवत आहे. त्यामूळे त्यांची स्थिती आहे तशीच राहात आहे.

आता होऊ घातलेल्या निवडणकांच्या प्रचारात विरोधी पक्ष आणि मोदी सरकार मधील जी काही आरोंप-प्रत्यारोंपाची लढाई होईल, त्याचे स्वरूप मागील दोन निवडणूक प्रचाराचं ॲक्शन रिप्ले सारखेच राहील असे दिसते.' फिर एक बार मोदी सरकार ' असा नारा देत भाजपा मोदी सरकारने केलेल्या लोककल्याणांच्या योजनांची भली मोठी यादी प्रचारसभेत देत राहणार तर दुसर्या बाजूला विरोधी पक्ष अघोषीत आणिबाणी, संघाचा सांप्रदायिक एजंडा, लोकशाही धोक्यात, संविधान धोक्यात, ईडी, सिबीआय, आयटी इत्यादी संस्थेच्या धाडी असे आरोप करताना दिसतील. इंडी आघाडीतले काही नेते असे आहेत की ते मोदी सरकार विरूद्ध असे काही टिप्पणी करतात की त्यातून भाजपालाच फायदा होत आला आहे.

सोनिया गांधी आणि राहूल गांधी काँग्रेसचे सर्वेसर्वा झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कारभारात विदेशी शक्तीचा हस्तक्षेप वाढला. तसाच प्रकार बहुतांश इतर सर्व विरोधी पक्षांत घडू लागला. वेळोवेळी शेतकरी मोर्चा व धरणे, दिल्लीत मुस्लीम बांधव भगिनींचा ठिय्या, केरळ, पश्चीम बंगाल, तामिळनाडू, आन्ध्र इत्यादी राज्यात हिंदुच्या मंदिरांच्या विश्वस्त पदावर अल्पसंख्यांकांना बसविणे, खलिस्तान चळवळीला देत असलेले प्रोत्साहन, विरोधी पक्षांची दशहतवादी व नक्षलवादी बाबत असलेली सहानुभूती, महाराष्ट्रात मविआ सरकार असताना ते ही लाॅकडाऊन काळात झालेल्या सनातनी संन्याशाच्या हत्या, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यास विरोधी पक्षांनी टाकलेला बहिष्कार, हिंदूत्व, राष्ट्रवाद इत्यादी शब्दांची विरोधी पक्षांना असलेली ॲलर्जी, विरोधी पक्षांचा नारा Minority First या विरोधात भाजपाचा नारा Nation First, सबका साथ सबका विकास, सन २००४ ते २०१४ युपीए काळात झालेला प्रचंड भ्रष्टाचाराचे मतदारांना असलेले स्मरण इत्यादी सर्व गोष्टी भाजपाच्या पथ्यावर पडत आले आहेत.  तसेच या निवडणूकात ही पडणार आहेत, असे दिसत आहे. मोदी सरकारकडून सर्जिकल स्ट्राईकच्या पुरावाची मागणीतून विरोधी पक्षांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला होता. म्हणूनच मतदारांची खात्री झाली आहे की मोदी सरकार व भाजपाला देशात सध्यातरी पर्याय नाही.

मागील लेख मालिकेत राज्यसभा व लोकसभेच्या निवडणूकांमधील फरक, पक्षांतराची लागण, पुढील काळात देशातील विविध राजकीय पक्षांचे स्वरूप कसे राहील, काही राज्यातील विशेषतः जिथे अलिकडे विधानसभेच्या निवडणूका झाल्या आहेत तिथे लोकसभेच्या निवडणूकात कोणता पक्ष सरस ठरेल इत्यादीवर चर्चा करू या असे म्हटले होते. त्यावर आपण चर्चा करणार आहोतच. या शिवाय दक्षिण भारतात भाजपाने प्रचारात घेतलेली आघाडी यावर ही चर्चा होईल.

विदेशी आणि देशी लिबरल मंडळीना हिंदू, हिंदू संस्कृती, हिंदूत्वा बद्दल द्वेष आहे. पण असा द्वेष त्यांच्यात आला, याचे एकमेव कारण हे आहे की ब्रिटीश राजवटीत आपल्या देशाचा प्राचीन काळापासून चालत आलेली संस्कृती, दैवते, इत्यादी संबंधीत आपल्याला न्युनगंड वाटावा म्हणून आपला इतिहास पद्धतशीरपणे बदलून टाकला. या विषयाचा आवाका फार मोठा आहे. असे असले तरी हा विषय स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक निवडणूकात संघ व भाजपाला झोडपण्यासाठी विरोधी पक्ष व त्यांची समर्थक लिबरल मंडळी व मिडीया हटकून निवडणूकाचा मुद्दा म्हणून वापर करीत आले आहेत. म्हणून त्यावरील एक स्वतंत्र लेखमालिका तयार करीत आहे. लौकरच ती पब्लीश होईल अशी हमी देऊन मी या लेखमालिकेच्या विषयाकडे वळतो.
 
प्रथम आपण पक्षांतराची लागण, व पक्षांमधील फूट यावर चर्चा करू या. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसचे २३ जेष्ठ व अनुभवी असे नेते अगोदरच बाहेर पडले आहेत. पण त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला नाही. याचा अर्थ असा नाही की त्या २३ जणांत नवा पक्ष स्थापन करण्याची धमक नाही. पण स्थिती अशी झाली आहे की गेल्या दहा वर्षातील मोदी सरकारच्या कामगिरीमुळे देशांतर्गत व आतंरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाची पत व दबदबा यात इतकी वाढ झाली आहे की ' काँग्रेस ' हा शब्द नव्या पक्षाचे सरनेम म्हणून घेतले तरी मोदी सरकारचा आपण पराभव करू शकेन अशी जिद्द त्या जेष्ठ नेत्यात राहिली नसावी. याचे एकमेव कारण म्हणजे राहूल गांधींच्या नेतृत्वातील विद्यमान काँग्रेस पक्ष दिशाहीन झालेला आहे.

प्रत्येक राज्यात काँग्रेसचे काही नेते काँग्रेस श्रेष्ठीच्या कार्यपद्धतीमुळे नाराज आहेत. काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी नेत्याचा चेहरा नाही. पंतप्रधान मोदींना टक्कर देऊ शकेल असा नेता काँग्रेस मध्ये नाहीच आणि काँग्रेस प्रणित इंडी नावाच्या आघाडीत ही नाही. देशातील विद्यमान राजकीय स्थितीत काँग्रेस मध्ये निदान नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांना सांभाळून घेईल असा नेता असता तर ती २३ जेष्ठ नेते मंडळी काँग्रेस पक्षातून बाहेर पडली नसती. या मंडळीपैकी एक ही नेता आजपावेतो ना भाजपात गेला ना समविचारी पक्षांत. याचा अर्थ असा आहे की ही मंडळी काँग्रेस चे हरवलेले रूप शोधत असावेत किंवा काँग्रेस मध्ये राम राहिला नाही अशी खात्री त्यांना झाली असावी. पक्षांतर करावे तर कुठल्या पक्षात हा पेंच त्यांच्या समोर आहे. विद्यमान काँग्रेस पक्ष चीन देशाला आंदण म्हणून दिला असल्याने पेचात पडलेल्या या नेत्यांची आपण चीनच्या साह्याने गळचेपी करू असे काँग्रेस श्रेष्ठींना वाटत असावे. त्यातूनच राहूल गांधींना उठसूठ काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचे खच्चीकरण करण्याची घातकी सवय लागली आहे.

मागे कुठल्या तरी एका लेखात मी एक शंका व्यक्त केली आहे की ' लहान बालकांच्या एखाद्या खेळण्या मध्ये जसे बडबड करणारे यंत्र बोलते तसेच काहीतरी राहूल गांधीचे झाले असावे? ' नफरत नही आणि प्यारकी दुकान ' हे वाक्य म्हणतांना ते फक्त आपली नफरत ओकत असतात. कुठल्यातरी इतिहासाच्या पुस्तकात वाचलेले वाक्य मला आठवले आहे ते असे आहे ' शाही घराणेशाही मध्यें तिसर्या वा चौथ्य्या पिढीतले वंशज सर्वनाशास कारणीभूत ठरतात.'

काही प्रान्तातले काँग्रेसचे नेते व प्रान्तीय पक्षांचे नेते एक तर भाजपात जाऊ इच्छीतात किंवा भाजपाच्या एनडीए त येऊ इच्छीतात. इतकेच नव्हे तर देशांतर्गत राजकारणावर भाजपाचा प्रभाव इतका वाढला आहे की प्रान्तीय पक्षांना फूटीची लागण झाली आहेच, हळुहळू दक्षिणेतील प्रान्तीय पक्षांतही नजिकच्या काळात फूटीचा रोग जडलेला दिसेल.

अकाली दल, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस मधील काही नेते पक्षांतर करून भाजापात जाण्याची शक्यता आहे. पक्षांतराची कृती फार सोपी आहे. पक्षांतराचा निर्णय घेण्यासाठी ज्या नेत्याला भाजपात प्रवेश घ्यावयाचा आहे, त्याला भाजपाच्या प्रान्तींय नेत्याशी चर्चा करावी लागते. नंतर राष्ट्रीय स्तरावर बैठक होऊन प्रवेशा संबंधीत अटी,करार इत्यादी वर समझोता होऊन निर्णय होतो. म्हणून पक्षांतराला उशीर होतो. पक्षांतर करणारे विरोधी पक्षांच्या नेत्यांचे शुद्धीकरण होते असे म्हणत भाजपा ही वाॅशिंग मशीन आहे असा टोमणा ऐकू येत असतो. तसे टोमणे विरोधी पक्षांकडून होणे हे मी स्वाभाविक मानतो. पण वाॅशिंग मशीन मध्ये Quick असे ऑप्शन असते. ते बटन दाबले की वेगाने कपडे धूतले जातात. म्हणून मशीन मध्यें टाकलेल्या कपड्यातील जीर्ण कपडे फाटण्याची शक्यता असते. हे सत्य विरोधकांना ठाऊक नसावे. असो. यावर अधिक टोमणेबाजी मला जमणार नाही.

काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असला तरी अनेक राज्यात प्रान्तीय पक्ष काँग्रेस पेक्षा अधिक शक्तीशाली आहेत. म्हणून काँग्रेस पक्षांचे नेते पक्षांतर करताना शक्यतो ते ज्या प्रान्तांतून प्रतिनिधीत्व करत असतात तेथील प्रान्तीय पक्षां पेक्षा भाजपाचा पर्याय स्विकारतील असेच दिसते . कारण देशात भाजपा इतका शक्तीशाली झाला आहे की केंद्रातील सत्तेवरून भाजपाला पायउतार करण्याची ताकद कुठल्याही पक्षात राहिली नाही. खासदार असो वा आमदार यांना केंद्राकडून विविध योजना राबविण्यासाठी निधी मिळत असतो. त्यातून काही विकासाची कामें केली की लोकनेता किंवा समाजसेवक अशी पदवी प्राप्त होते. आपलं कौतूक वाढावे, किर्ती मिळावी असे कोणाला वाटत नाही ? म्हणून भाजपेतर पक्षांतील नेत्यांना भाजपाचा पर्याय किफायतशीर वाटत असेल तर त्यात नवल ते कसले?

अनेक वर्षे काँग्रेसने सत्ता राबविली ती विरोधकांवर मेहरबानी करून नव्हे तर फोडा आणि झोडा या ब्रिटीश राजवटीतील कुटील नीतीचा उपयोग केला होताच की ! म्हणून विरोधी पक्षांतील नेते भाजपात प्रवेश करत असतील तर भाजपावर टिका करण्यात काही अर्थ नाही. काॅग्रसने मॅक्सम्युलर आणि मेकाॅलेने लिहलेल्या भारताच्या खोट्या इतिहास अभ्यासक्रमाच्या आधाराने सत्ता राबविली हे सर्वश्रूत आहे. 

सन १९९० पासून ज्या राज्यात प्रान्तीय पक्ष नव्हते तिथे काँग्रेस मधील नाराज नेतागणांचा कल प्रान्तीय पक्ष स्थापन करण्याकडे होऊ लागला. या अगोदर काँग्रेसमध्ये सन १९९५२, १९५६, १९६९, १९७७-७८ या काळात फूट पडलेल्या आहेत. पण त्याकाळात फुटलेल्या गटाचे स्वरूप प्रान्तीय नव्हते. सन १९९० पासून प्रान्तीय पक्षांची संख्या वाढू लागल्यामुळे सन १९९६ ला देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्यामुळे काँग्रेस व इतर भाजपेतर पक्षांच्या पाठींब्यातून काँग्रेस प्रणित आघाडी नावाचे सरकार केंद्रात अस्तित्वात आले आणि कर्नाटक मधील प्रादेशिक नेते देवेगौडा हे देशाचे पंतप्रधान झाले.

इथूनच प्रान्तीय पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधानपदाची खुर्चीचे स्वप्ने पडू लागली. तशीच स्वप्ने आजच्या इंडी तील नेत्यांना ही पडत आहेत. हे एक महत्वाचे कारण आहे ज्यामुळे विरोधी पक्षांची एकजूट होत नाही. मग ही मंडळी भाजपाचा पराभव तरी कसा करणार? असा प्रश्न पडलेल्या मतदारांचा वर्ग मोठा आहे. पण विरोधी पक्षांची तळी उचलणार्या मिडीयातील लिबरल मंडळींना त्याचे काही सोयर-सूतक नाही. भाजपावर मात्र फेक न्यूज आणि फेक विडीओज् रिलीज करून ही मंडळी टिका करीत असते. पण दिवाळीच्या सणातील काही फटाके जसे फूस होतात तसेच विपक्षांच्या आरोपी रूपी फटाके निकामी ठरतात. खोट्या आरोपांतून भाजपाचे कसलेही नुकसान होणार नाही कारण मतदारांचा असा एक मोठा वर्ग आहे जो अशा नेहमीच्या आरोपांकडे ढुंकूनही लक्ष देत नाही.

क्रमशः

गुरुवार, ७ मार्च, २०२४

राज्यसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील तीन काॅग्रेस नेत्याचें पक्षांतर (भाग-३ आणि भाग-४)

महाराष्ट्रातील तीन काॅग्रेस नेत्यांनी केलेल्या पक्षांतरावर तिन्ही मिडीयात झालेली चर्चा आपण ऐकली आहे. त्यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे सर्वात अधिक चर्चा अशोक चव्हाण यांचा भाजपातल्या प्रवेशावर झाली आहे. ती चर्चा लोकसभेच्या निवडणूकांच्या निकाल (विशेषतः मराठवाड्यातील निकाला) पर्यंत सुरू राहील असे वाटते. याचे कारण असे आहे की अशोक चव्हाण हे महाराष्ट्र काॅग्रेसमधील एक मोठे प्रस्थ आहे. ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.  एक कुशल प्रशासक म्हणून गणले जाणारे व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री असलेले स्वर्गीय शंकरराव चव्हाणाचे ते पुत्र आहेत. चव्हाण कुटुंब हे काॅग्रेस हायकमांड गांधी परिवाराशी सर्वात अधिक जवळीक असलेल्या निष्ठावंत काॅग्रेसी घराण्यापैकी एक असे मानले जाते. त्यामूळे अशोक चव्हाण यांच्या भाजपा- प्रवेशासंबंधीत हा स्वतंत्र भाग ठेवावा लागला.

महाराष्ट्रातील काॅग्रेसचे दोन मातब्बर नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अलिकडच्या मविआ सरकारचे उपमुख्यमंत्री राहिलेले बाळासाहेब थोरात यांनी ' अशोक चव्हाण काॅग्रेस मधुन बाहेर जावयास नको होते असे म्हणत दोघांनी आपले दुःख व्यक्त केले.' पृथ्वीराज चव्हाण यांना पत्रकाराने अशोक चव्हाणांनी काॅग्रेस सोडल्यामुळे काॅग्रेसचे महाराष्ट्रात नुकसान होईल का या असा प्रश्न विचारला तेव्हा उत्तर दिले की 'अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काॅग्रेसला नक्की तोटा होईल. '

महाराष्ट्रातील विद्यमान राजकीय स्थिती अशी आहे की काॅग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेते मंडळी संभ्रमात आहेत.
त्यामूळे पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी दिलेली प्रतिक्रीया अप्रत्यक्ष रित्या काॅग्रेस हायकमांडनी अशोक चव्हाण यांना भाजपात जाण्याअगोदर रोखायला हवे होते, असे सुचविलेले असावे. हा एक प्रकारे काॅग्रेस हायकमांडकडे मवाळ भाषेत नोंदविलेला निषेध आहे असे मला वाटते. याला आधार काय आहे असा प्रश्न आपल्याला पडला असावा. याचे उत्तर हायकमांड राहूल गांधी यांनी अशोक चव्हाणांची सन २०१९ पासून केलेल्या मानहानीत दडले आहे. अशोक चव्हाण हे राहूल गांधीच्या चमत्कारीक वागण्याचे बळी पडलेल्या अनेक जेष्ठ काॅग्रेसच्या नेत्यांच्या हालाखीच्या स्थितीचे एक प्रतिनिधीक स्वरूप आहे.  

सन २०१९ पासून अशोक चव्हाण यांची काॅग्रेस हायकमांडने म्हणजे राहूल गांधींनी जी मानहानी केली आहे ती फारशी ऐकावयास आली नाही. त्याचा थोडा-फार तपशील माझ्या वाचनात आणि ऐकण्यात आला आहे तो लेखात मी पुढे देणार आहे. अशोक चव्हाण काॅग्रेसचा राजीनामा देऊन लागलीच दुसर्या दिवशी भाजपात प्रवेश करून थांबले नाहीत तर भाजपा द्वारे राज्यसभा निवडणूकीचा अर्ज ही दाखल केला याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. वरवर पाहता हा तडकाफडकी घेतलेला निर्णय आपल्याला वाटतो, पण तसा नाही हे या लेखमालिकेचे भाग-३ आणि भाग-४ वाचल्यानंतर तुम्हाला खात्री होईल अशी मला आशा वाटते.

आपल्या येथील न्यूज चॅनेल्स आणि प्रिन्ट मिडीया बहुतांशी असे आहेत की ते सतत भाजपाची कोंडी कशी करता येईल यात मग्न असतात. म्हणूनच अशोक चव्हाण यांचे पक्षांतर भाजपाने आदर्श सोसायटीतील भ्रष्टाचाराला ईडीचा धाक दाखवून घडवून आणले आहे असा आरोप करीत आहेत. यावर अशोक चव्हाण यांनी बहुतांश सर्व चॅनेल्स वर शांततेने उत्तर दिले की ' हा  शिळ्या कडीला उतू देण्याचा प्रकार आहे.' 

महाराष्ट्रातील काॅग्रेसच्या तीन नेत्यांनी काॅग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर, महाराष्ट्रात काॅग्रेसमध्ये भूकंप होणार अशा बातम्या न्यूज चॅनेल्सवरून प्रसारीत केल्या जात असतांना तसे काही घडेल असे मला वाटले नाही. कारण महाराष्ट्रातल्या कुठच्याही काॅग्रेस नेत्याला नवा पक्ष स्थापन करावयाचा असेल तर त्यांना नव्या पक्षाच्या नावा मागे काॅग्रेस हे सरनेम लावणे आवश्यक आहे. पण तसे करण्यासाठी एक ही नेता पुढाकार घेणार नाही. त्यांच्या समोर राष्ट्रवादी काॅग्रेसची हालत काय झाली याचे चित्र प्रत्यक्ष दिसत आहे. काॅग्रेसचा राजीनामा देऊन अनेक नेत्यांना बाहेर पडण्याची इच्छा झालेली असू शकते.  असे नेते शिवसेना व राष्ट्रवादी काॅग्रेस पेक्षा भाजपात जाण्याची शक्यता अधिक आहे. शेवटी राजकीय नेत्यांना ही त्यांच्या भवितव्यात स्थिरता कोठे मिळेल याचा हिशोब करावा लागतोच. पण---- 

याचा धसका मात्र लिबरल पत्रकार-संपादक आणि राजकीय अभ्यासक मंडळींनी घेतला आहे. म्हणूनच ती मंडळी काॅग्रेसला राजीनामा देणार्या नेत्यांना भाजपा ईडीची भिती दाखवते असा आरोप करीत असतात. त्यांना तसा आरोप करण्याची इतकी सवय झाली आहे की जोपर्यंत भाजपाचं सरकार केंद्रात येत जाईल तो पर्यंत लिबरल मंडळींचा असा आरोप ऐकावयाची तयारी आपल्याला ही ठेवावी लागेल असे स्पष्ट जाणवते. 
                                     क्रमशः-

(या लेखमालिकेचा चौथा आणि शेवटचा भाग सोबत जोडला आहे.)
-------------------------------------------

राज्यसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील तीन काॅग्रेस नेत्यांचे पक्षांतर (भाग - ४)

H/W News English (Editorial) या न्यूज चॅनेल्सचे एमडी सुजीत नायर यांनी अलिकडे त्यांच्या चॅनेल्सवर अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरा संबंधीचे विश्लेषण केले आहे. ते करीत असताना सुजीत नायर यांनी म्हटले आहे की, " मविआ सरकार स्थापन होताना अशोक चव्हाण यांना विधानसभेचे सभापद हवे होते. त्यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविलेले होते. त्यामूळे एखादे मंत्रीपद घेण्यात त्यांना स्वारस्य नव्हते. तसे त्यांना वाटणे हे  स्वाभाविक होते. मविआ आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना ही अशोक चव्हाणांची मागणी रास्त वाटली होती आणि त्यांनी तसे मविआ च्या कोअर बैठकीत संमती दिली होती. पण काॅग्रेसच्या श्रेष्ठींनी अशोक चव्हाणाची विनंती धुडकावून लावली. बरे इतकं करून ही काॅग्रेस श्रेष्ठी अर्थातच राहूलबाबा थांबले नाहीत. त्यांनी अशोक चव्हाण यांना हलक्या खात्याचे मंत्रीपद स्विकारण्याचा आदेश दिला. हा आदेश म्हणजे अगोदरच दुखावलेले अशोक चव्हाण यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होय."

H/W News English (editorial) एम डी सुजीत नायर यांनी अशोक चव्हाण यांच्या बाबत घडलेल्या आणखिन दोन घटनाचं स्मरण करून देतात. सन २०१९ ला अशोक चव्हाण महाराष्ट्र काॅग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळी विधानसभेच्या निवडणूकी साठी नवी दिल्लीत काॅग्रेस श्रेष्ठींकडे निधी मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी राहूल गांधींनी दखल ही दाखविली नाही. त्यांना ' परत जावे ' असा आदेश दिला होता.' भिक्षा देऊ नका पण कुत्रा तरी आवरा ' अशा मनःस्थितीतून अशोक चव्हाण मुंबईत परत आले.

अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरावर विश्लेषण करताना सुजित नायर यांनी सन २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीच्या धामधुमीतली एक ऑडीओ क्लीप दाखविली आहे. त्या ऑडीओच्या सत्यते बाबत नायर जबाबदारी स्विकारीत नसले तरी त्यांनी अशोक चव्हाणांच्या पक्षांतराचे विश्लेषण करताना दाखविले आहे की अशोक चव्हाण यांनी पक्षांतर केले असे म्हणण्यापेक्षा काॅग्रेसने त्यांना हाकलून दिले आहे असे आपल्याला ही पटू लागते. ती ऑडीओ क्लीप थोडक्यात अशी आहे --

चंद्रपूर येथील लोकप्रिय नेते भालू दातुरकर यांनी शिवसेनेतून काॅग्रेस मध्यें प्रवेश केला होता. तेथील बहुतांश काॅग्रेस कार्यकर्त्यांना लोकसभेसाठी भालू दातुरकरांनी तिकीट मिळावे असे वाटत होते. पण काॅग्रेस श्रेष्ठींनी विनायक बांगडेंना तिकीट दिल्याचे जाहीर केले. लागलीच चंद्रपूर येथील एका जिल्हा स्तरावरील काॅग्रेस नेता फोन वरून बोलत आहेत-- 
' अहो अशोकराव, विनायक बांगणेंना  तिकीट का दिले, ते निवडून येणार नाहीत .' त्यावर अशोक चव्हाणांनी उत्तर दिले, ' मी हायकमांडशी तुमची बाजू मांडली, पण इथे माझे कोणी ऐकून घेत नाहीत. सर्व निर्णय मुकूल वासनिक घेतात. मी काय करू, मीच अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या मनःस्थितीत आहे हे आपल्या सर्व जिल्हा कार्यकर्त्यांना सांगा.'

मला ही आठवतंय की त्यावेळी अशोक चव्हाण काॅग्रेस काॅग्रेसचा राजीनामा देऊन भाजपात जाणार अशी बातमी न्यूज चॅनेल्स वर व्हायरल झाली होती. अनेक जेष्ठ  नेत्यांची पदोपदी मानहानी केलेली आहे व आज ही करीत आहेत. स्वतः राहूल गांधींना वारस हक्काने काॅग्रेसची इस्टेट मिळाली, काॅग्रेसचे सर्वेसर्वा पद मिळाले आहे. देशाचा इतिहास माहीत नाही, भूगोल माहीत नाही. धड बोलता येत नाही. असे काॅग्रेस श्रेष्ठींच्या घराण्यातले हे युवराज उठसूठ असे काही प्रताप करतात की त्यांना भाजपाचा स्टार प्रचारक म्हणून लोक हिणवू लागले आहेत. अलिकडे काही न्यूज चॅनेल्सनीं अशोक चव्हाण यांनी  काॅग्रेस पक्षांचा राजीनामा दिल्याचे वृत्त सांगतांना यात आश्चर्य काय ते? असे म्हटलेले मी ऐकले आहे.

एकंदरीत महाराष्ट्रातील काॅग्रेसच्या तीन नेत्यांचे पक्षांतर हेच दर्शविते की काॅग्रेस मध्यें आता राम राहीला नाही अशी काॅग्रेस नेत्यांची भावना झाली आहे. विरोधी पक्ष व त्यांच्या समर्थक पत्रकार - संपादक व लिबरल अभ्यासकांनी भाजपावर किती ही आरोप केले तरी काॅग्रेस मधून भाजपात आयारामाची संख्या वाढतच जाणार आहे. ज्या काही राज्यात काॅग्रेस शक्तीशाली आहे तिथल्या काॅग्रेस मध्ये फूट ही पडणार आहे. इतकेच नव्हे तर दक्षिणेकडील प्रांतीय पक्षांना ही फूट व पक्षांतराची लागण पसरत जाणार आहे. या जगात सारं काही बदलत जात असते. बदल हा सृष्टीचा स्थायीभाव आहे. जे उपजे ते नाश पावते वा रूप बदलते.

येणार्या लोकसभेच्या निवडणूकां, त्याचा प्रचार, विरोधी पक्षांची इंडी आघाडी, भाजपाने दक्षिण भारतात मारलेली मुसंडी,  निवडणूकांच्या निकालाचे ओपिनीयन पोल पाहता देशातील राजकारणाचा प्रवाह कसा असेल, विविध राजकीय पक्षांचे स्वरूप कसे बदलत जाणार, लोकसभा व राज्यसभा निवडणूक आणि त्या संबंधित उमेदवारांची निवड करण्याची राजकीय पक्षांची दृष्टी व अपरीहर्ता  इत्यादी विषयांवर लौकरच एक छोटी लेखमालिका ती ही लोकसभेच्या निवडणूकांची घोषणा होण्याअगोदरच मी पब्लीश करणार आहे. तो पर्यंत माझा आपल्याला रामराम !
               जय श्रीराम !


बुधवार, ६ मार्च, २०२४

राज्यसभाची निवडणूक आणि महाराष्ट्रातील तीन काॅग्रेस नेत्यांचे पक्षांतर (भाग-२)

मिलिंद देवरा हे मूलतः काॅग्रेसचे असले तरी त्यांच्या प्रभावाची व्याप्ती त्यांचे पिताश्री मुरली देवरांच्या प्रभावा इतकी व्यापक नाही. मिलिंद देवरा यांची व्याप्ती फार तर दक्षिण मुंबई मतदार संघात एक दोन विधानसभा क्षेत्रापुरता मर्यादीत असावी. याचे कारण राष्ट्रीय स्तरावरील काॅग्रेसचे सर्वेसर्वा राहूल गांधी झाले तेव्हापासून ज्या काॅग्रेसच्या नेत्यांची मूले-मूली राहूल गांधीच्या वयाची असतील  त्यांचे खच्चीकरण सुरू झाले आहे. म्हणूनच आन्ध्र प्रदेशाचे लोकप्रिय मुख्यमंत्री के सी आर यांच्या अकस्मात अपघाती मृत्यू नंतर त्यांचे चिरंजीव जगन रेड्डी मुख्यमंत्री व्हावेत असे तेथील जनतेला वाटत होते. पण राहूल गांधीनी जगन रेड्डीला मुख्यमंत्री केले नाही. शेवटी काय झाले आन्ध्र प्रदेशात काॅग्रेसचे नामशेष झाली. ज्योतिराध्य सिधींया फुटले, सचीन पायलटची अवस्था तळ्यात की मळ्यात अशी करून ठेवली आहे. महाराष्ट्रात सुनिल दत्त यांची कन्या प्रिया दत्त, सुशीलकुमार यांची कन्या प्रणिती शिंदे, पंतगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम, विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित व धिरज इत्यादींची कुचंबणा होत असल्याचे ऐकिवात आहे. ही झाली महाराष्ट्रातील काॅग्रेस नेत्यांची अपत्यांची यादी. देशभरातील काॅग्रेसच्या जेष्ठ नेत्यांची व त्यांच्या राजकीय वारसांची अवस्था याहून अधिक केविलवाणी झालेली आहे.

मिलिंद देवरा हे ही राहूल गांधीच्या खडूस वृत्तीचे बळी ठरले आहेत. म्हणून त्यांनी काॅग्रेसचा राजीनामा दिला. भाजपाचा पर्याय त्यांच्या साठी सोपा नव्हता. याचे कारण मुंबई महापालिकेच्या मागील निवडणूकात भाजपाने शिवसेनेला आणलेला घाम त्यांनी पाहिला आहे. एकनाथ शिंदेच्या हाती शिवसेना आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आले असले तरी एकनाथ शिंदेचा ठाणे व इतर मतदारसंघात मराठा म्हणून प्रभाव असेल पण मुंबईत नाही. त्यामूळे भले आता राज्यसभेचे तिकीट मिळाले असले तरी ही बाब महाराष्ट्रातील दक्षिण मुंबईतून विधानसभाचे तिकीट मिळण्यासाठी अडथळा ठरणार नाही इतकी जाण मिलिंद देवरांकडे असेलच. कारण विधानसभेची निवडणूक जिकण्या इतकी धमक मिलिंद देवरात आहे हे एकनाथ शिंदेंना ठाऊक आहे. याचा अर्थ ' मेरा भी भला दुसरोका भी भला ' हा व्यवहारच की ! महाराष्ट्रातील लिबरल मंडळी मिलिंद देवरांच्या पक्षांतरावर टिका करीत नाही. कारण मिलिंद देवरा भाजपात गेले नाहीत. शिवाय मुरली देवरा लिबरल मंडळींचे एक आश्रयदाते होते. लिबरल मंडळी ही जगातील सर्वात मोठी टोळी पण तितकीच ती ढोंगी ! 

आता आपण बाबा सिद्दिकी या काॅग्रेस नेत्यांच्या पक्षांतरावर चर्चा करू या. सिद्दिकी यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस मध्ये प्रवेश केला. याचे कारण त्यांना मुंबईत कृपाशंकरांची गच्छन्ती झाल्यापासून काॅग्रेस कमकूवत होत गेली याची पुरी जाण आहे. तसेच अखिल भारतीय स्तरावरून काॅग्रेसचा प्रभाव संपतो आहे. त्यामूळे त्यांना  प्रान्तीय स्तरावरील राजकीय नेत्याचा आधार घ्यावा असे वाटणे स्वाभाविक होते. सिद्दिकींना भाजपा किंवा एकनाथ शिंदेच्या पक्षात जाण्याची इच्छाच मुळी झाली नसावी. याचे कारण हे दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी आहेत. देशाच्या फाळणीनंतर काॅग्रेसचे सोकाॅल्ड सेक्यूलर धोरणातून मुस्लीम बांधवांमध्ये जी मानसिकता झाली आहे ती सिद्दिकी मध्ये वारस हक्काने प्राप्त झालेली आहे. आम्ही पिढ्यान पिढ्या काॅग्रेसचे आहोत असे मिरवून घेण्याची एक प्रथा मुस्लीम बांधवात झाली आहे. 

काॅग्रेस, साम्यवादी, व समाजवादी पक्ष आणि बहुतांश प्रान्तीय पक्षांनी अल्पसंख्यकीय बांधवात हिंदु समाजाची भिती दाखविण्याचे जे खूळ घातले ते इतके खोल गेले आहे की ते भूत त्यांच्या मानेवर सतत बसलेले आहे. ते तसेच राहावे या साठी ब्रिटीश राजवटीत लार्ड मेकाॅले आणि मॅक्झमेल्युर या जोडीने तोडून-  मोडून भारताच्या इतिहास विषयाचा जो अभ्यासक्रम सुरू केला होता तो अजूनही तसाच ठेवला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून संघ-जनसंघ व आताचा भाजपावर बहुतांश विरोधी पक्ष आणि लिबरल मंडळी जहरी टिका करीत आहेत. त्यात त्यांना यश मिळावे यासाठी मुस्लिम बांधवासाठी जवळपास सर्वच क्षेत्रात अनेक सोयी सवलती देणे सुरू केले आहे. ते बंद करता येत नाही. कारण त्यासाठी मोदी सरकारला केंद्रात आणि बहुतांश राज्यात दोनतृतियांश बहुमत असणे गरजेचे आहे. त्यातूनच अल्पसंख्याक विशेषतः मुस्लीम बांधवात या स्पेशल दर्जाचे व्यसन जडले आहे. 

बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांचा पक्ष सोयिस्कर वाटण्याचे महत्वाचे कारण हे आहे की अखंडीत राष्ट्रवादी पक्षांची मुंबईत शक्ती कमी होतीच ती आणखिन कमी झाली असावी. मुंबई सारख्या काॅस्मोपोलिटीयन शहरात एखादा मुस्लीम चेहरा पक्षांत असावा असे अजित पवारांना ही वाटले असणारच. त्यातही बाबा सिद्दिकी यांची मतपेटी इनटॅक्ट आहे. 

पक्षांतर हा विषय आपल्या सारख्या सामान्यजनांना तसा फारसा आवडत नसला तरी आपण त्यावर चर्चा करीत असतो व आपले मतप्रदर्शन ही करतो. म्हणून मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दिकी या दोन नेत्यांचे पक्षांतर आणि नवीन पक्ष निवडीतील शहाणपणाला मला दाद द्यावीसी वाटते. स्वतःहाला फार मोठे राजकीय अभ्यासक म्हणून मिरवित आहेत या पेक्षा राजकीय नेते अधिक चतूर असतात. कुठल्याही काॅलेजमधून पोलिटीकल सायन्स या विषयाची पदवी न घेता त्यांना राजकीय वार्याची दिशा अचूक कळते.

बाबा सिद्दिकी आणि मिलिंद देवरांच्या पक्षांतरावर लिबरल मंडळींनी फारशी टिका केली नाही. याचे कारण हे दोन्ही नेते भाजपात गेले नाही. देशातल्या लिबरल मंडळींना गेली दहा वर्षे भाजपा, मोदी सरकार व संघ परिवारावर टिका करण्याचे इतके व्यसन जडले आहे की त्यांना कोण्या नेत्याने भाजपात वा एनडीएत प्रवेश केला तरी ते भाजपालाच दोष देत बसतात. संघ-भाजपाची ॲलर्जी हीच ओळख त्यांना ठेवायची असते. कारण तो त्यांचा व्यवसाय आहे. या व्यवसायात भरपूर पैसा मिळतोच सोबत आतंरराष्ट्रीय स्तरावर विचारवंत असा बिल्ला लावून चमकायला मिळत असते. 
                                     क्रमशः--

---------------------------------------------

राज्यसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील तीन काॅग्रेस नेत्यांचे पक्षांतर (भाग -१)

सामान्यतः लोकसभेच्या निवडणूका जवळ येतात तेव्हा आपल्या देशातील राजकीय क्षेत्रात पक्षांतर नावाच्या विषाणुचा प्रादुर्भाव वाढतो आणि काही राजकीय पक्षांना पक्षांतराची लागण होते. पण राज्यसभाच्या निवडणूकांच्या वेळी असे फारसे काही होत नसते. या वेळी तसे घडले याचे कारण लोकसभेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. काल-परवाच राज्यसभेच्या ५६ रिक्त झालेल्या जागावर निवडणूका झाल्या. त्यापैकी ४१ जागावर उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर तीन राज्यात १५ जागावर निवडणूका झाल्या. त्यातील कर्नाटकात अपेक्षेप्रमाणे काॅग्रेसचे ३ व भाजपाचा १ उमेदवार निवडून आले. हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश मध्यें क्राॅस व्होटींग झाल्यामूळे तेथील निवडणूकांवर मिडीयावर गरमा-गरम  चर्चा झाली. यापैकी हिमाचल प्रदेश मध्यें काॅग्रेसचे जेष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवींचा पराभव झाला. हिमाचल प्रदेशमध्ये काॅग्रेसची सत्ता आहे. काॅग्रेसच्या आमदारांची आणि सोबत अपक्ष आमदारांची क्राॅस वोटींग ची संख्या इतकी झाली की तेथील सरकारवर विरोधी पक्ष अविश्वासाचा ठराव आणण्याची शक्यता निर्माण झालेली दिसते . याचा अर्थ असा की हिमाचल प्रदेश मधील सरकारवर काॅग्रेस पक्षातच अविश्वास निर्माण झालेला दिसतो. 

एखाद्या सत्ताधारी पक्षातील आमदार-खासदारांचे मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाले की त्या पक्षात उभी फूट पडली असे समजले जाते. हिमाचल प्रदेश मध्ये तसे काही घडले नाही. सन १९६९ आणि सन १९७७ मध्ये काॅग्रेस मधील फूटी नंतर अलिकडील पक्ष फूटीचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेस हे होत. त्यावर ही चर्चा या लेखमालिकेत करण्याचे मी ठरविले होते पण या लेखमालिकेचा विस्तार आणखिन तीन भागाने वाढला असता. म्हणून ही लेखमालिका आपण महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणूकाच्या निमित्ताने काॅग्रेसच्या तीन नेत्यांनी केलेल्या पक्षांतर पुरता मर्यादीत ठेवणे मला उचीत वाटले. 

एखाद्या राज्यात राज्यसभेचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले तर मिडीयात फारशी चर्चा होत नसते. कारण त्यातून त्यांचा टीआरपी वाढत नसतो. महाराष्ट्रात या खेपेस सहा ही उमेदवार बिनविरोध निवडून येऊन ही राज्यसभेच्या निवडणूकांचा विषय चर्चेचा बनला. कारण महाराष्ट्रातील जे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले, त्यातील तीन उमेदवार मिलिंद देवरा, सिद्दिकी, आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या नेत्यांनी काॅग्रेसला रामराम ठोकला, आणि त्यांनी अनुक्रमें शिवसेना, राष्ट्रवादी काॅग्रेस आणि भाजपा पक्षात प्रवेश केला. नंतर त्या तिघांनी राज्यसभेच्या निवडणूकीचा अर्ज भरला आणि  बिनविरोध निवडणून आले. पक्षांतर सारखी घटना ती ही राज्यसभेच्या निवडणूकीच्या निमित्ताने झाली ही एक आगळी-वेगळी घटना आहे असे मला वाटते. म्हणून लेखमालिकेचा हा प्रपंच ! चर्चा  इथे आपण काॅग्रेसच्या तीन आमदारांनी केलेलं पक्षांतरांचे कारण व स्वरूप यावर चर्चा करू या. 

महाराष्ट्रात तीन काॅग्रेस नेते पक्षांतर करून लागलीच राज्यसभेवर निवडून आल्याची घटना  देशातील इतर राज्यात झालेली नसावी असे मला वाटते. असे असले तरी महाराष्ट्रात अशी घटना घडली याचे मला आश्चर्य वाटले नाही. कारण  " सन २०१९ ला भाजपा-सेना युतीला पूर्णपणे जनादेश मिळून ही उद्धव ठाकरेंनी काॅग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेस सोबत जवळीक करून मुख्यमंत्रीपद मिळविले. कारण काय तर म्हणे मला अमित शहांनी मुख्यमंत्रीपद देण्याचे कबूल केले होते. हा उद्धव ठाकरेंचा पोरकटपणा मानावा का? बंद खोलीतली चर्चा हा काही पुरावा ठरतो का? भाजपा सोबत ५ वर्षे केंद्र आणि राज्य स्तरावर सत्ता भोगली तरी सतत भाजपावर टिका करण्याचा उपद् व्याप करणार्या उद्धव ठाकरेंचा हा पोरकटपणा असू शकत नाही. मला तर अजुनही वाटते की, उद्धव ठाकरें यांनी सन २०१९ च्या विधानसभा निवडणूक प्रचारात शरद पवार सोबत बंद खोलीत बैठक घेऊन काॅग्रेस आणि भाजपाचे उमेदवार पाडण्याचा डाव आखला होता. तो डाव यशस्वी झाला. कारण भाजपाच्या नेत्यांना उद्धव ठाकरे दगाबाजी करणार नाहीत अशी ठाम खात्री होती. तशीच खात्री  काॅग्रेसच्या नेत्यांना सुद्धा शरद पवारासंबंधी होती. शेवटी भाजपाचे व काॅग्रेसचे संख्याबळ सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीच्या निकालात कमी झाले. असे मी मागे एका लेखात लिहले आहे. "

त्यावर काही भाजपाच्या विरोधकांनी मला प्रश्न विचारला होता की उद्धव ठाकरे आणि पवारांची बंद खोलीत चर्चा झाली होती याचा पुरावा आहे का ? मी त्यांना उत्तर दिले ' अमित शहांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देईन असे आश्वासन दिले होते याचा पुरावा तूमच्याकडे आहे का ?'  त्यांच्याकडून मला उत्तर मिळाले नाही. मग त्यांच्या कडून उत्तराची वाट पाहणे मी सोडून दिले. यापुढे ' बंद खोलीतली चर्चा ' सारख्या सबबी सांगण्यार्या नेत्यांना जनतेचा विश्वासघात केला असे कलम कायद्यात ठेवून राजकारणातून हद्दपार या शिक्षेची तरतूद व्हावी असे वाटते. 

गेल्या साडेचार वर्षात म्हणजे सन २०१९ पासून महाराष्ट्रात कधी झाले नव्हते इतके घाणेरडे राजकारण झाले. याला सर्वस्वी उद्धव ठाकरे व शरद पवार आणि त्यांची तळी उचलून धरणारे चमचे पत्रकार-संपादक मंडळी व समर्थक कार्यकर्ते आहेत. मविआचे सरकार स्थापन केल्यानंतर या दोघांना स्वर्ग दोन बोटे उरला होता अशा थाटात यांचा वावर सुरू झाला होता. सुरूवातीस शरद पवार यांनी तर जाहीर केले की 'त्यांना इतर राज्यातून भाजपाला देशभर पर्याय निर्माण करण्यासाठी आमंत्रणे येत आहेत.'  शदर पवार यांची उंच भरारी मारत सर्वात अधिक उंचीवर गेलेल्या पंतगासारखी झाली होती. शेवटी जोरदार वारा वाहू लागला आणि ते पंतग गटांगळ्या खात एका जुनाट झाडावर धाडकन आपटले व फाटक्या स्थितीतच अडकले. त्या काळात  उद्धव ठाकरें यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची म्हणजे जणू राजेशाहीतील महाराजाचे मोठे अलिशान आसन वाटू लागले होते.  आपल्या लहरीप्रमाणे राज्यकारभार करू लागले. शेवटी कुर्हाडीचा घात कुर्हाडीनेच केला. या गदारोळात महाराष्ट्रात तीन मुख्यमंत्र्यांचे सरकार अस्तित्वात आलेले आपण पाहिले. यातील दोन मुख्यमंत्र्याचे सरकार कोसळले आणि एका मुख्यमंत्र्याचे म्हणजे एकनाथ शिंदेंचे सरकार सत्तेवर बसल्यापासून मुदत संपेपर्यंत टिकेल असे स्पष्ट दिसत आले आहे. याचे कारण  सन २०१९ च्या निवडणूकीत जनादेश मिळून ही फडणवीसांना सत्तेपासून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी कारस्थान रचून दूर ठेवले. शेवटी नियतीने उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे पक्षच उध्वस्त करून टाकले. या घटनेची महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नोंद झाली आहे ती कधी पुसली जाणार नाही. 

राज्यसभेच्या निवडणूकांची घोषणा झाल्यापासून महाराष्ट्रातल्या न्यूज चॅनेल्सवर भाजपा, काॅग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेस कोणाला तिकीट देणार, घोडा बाजार, कुठल्या पक्षांत आणि कोण बंडाळी करणार यावर जोरदार अंदाज बघायला व ऐकावयास मिळू लागले.  अकस्मात रित्या भाजपाने आपल्या तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यात एका दिवसात काॅग्रेसचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा ही समावेश होता. मग काॅग्रेसने एका नावाची घोषणा करून टाकली. नंतर शिवसेनेने (एकनाथ शिंदेनीं) काॅग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केलेल्या मिलींद देवरा यांना तिकीट दिले. या घाईगर्दीत राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रमूख अजित पवार यांनी ज्यांचा राजसभेचा कालावधी अजून ही संपलेला नाही अशा प्रफूल पटेल यांच्या नावाची घोषणा केली. आपल्या पक्षात राज्यसभेवर जाण्यास उत्सूक असलेल्या नेत्यांमधील स्पर्धेचं ओझं अजित पवारांवर होते. त्यातून त्यांनी इतर कोणापैकी सहकार्याला तिकीट दिले असते तर ते ओझे एक प्रकारे स्वतःच्या गळ्यात ओंडका बांधल्या सारखी स्थिती झाली असती आणि येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणूक प्रचारात पदोपदी अडथळा निर्माण करणारे ठरेल याची जाणीव अजित पवारांना झाली असेलच. म्हणूनच त्यांनी प्रफूल पटेल यांना तिकीट देऊन स्वतःची जी काही कोंडी झाली होती ती झटकून टाकली आणि आपल्या पक्षाची घडी आहे त्या स्थितीत ठेवली. 

इतकं होऊनही महाराष्ट्रातील न्युज चॅनेल्स तसेच लिबरल मंडळींनी भाजपाने चौथा उमेदवार उभा केला नाही यावर टिका सुरू ठेवलीच. लिबरल मंडळीची अशी टिका म्हणजे साप साप म्हणून भूई थोपाटण्याचा प्रकारातली आहे. भाजपाचा चौथा उमेदवार निवडून आला असता पण भाजपाने त्यावर सखोल विचार केला असावा आणि शेवटी चौथा उमेदवार उभा केला नाही असे मला वाटते. लिबरल मंडळींची स्थिती ही नेहमीच जित्या सारखी असते. त्यांची खोड मेल्यावाचून जात नाही हेच खरे. अशोक चव्हाणांच्या पक्षांतर संबंधीची कारणें न शोधता किंवा माहीत असुनही  भाजपाने त्यांच्यावर आदर्श घोटाळ्यातून इडी कारवाईचा दबाव आणला म्हणून अशोक चव्हाणांनी भाजपाचा आश्रय घेतला अशी टिका आपल्या सवयी आणि सोयीनुसार करीत लिबरल मंडळी करीत आहेत. या संबंधीची चर्चा आपण या लेखाच्या तिसर्या भागात करणार आहोत. आता आपण मिलिंद देवरा आणि सिद्दीकी या काॅग्रेस नेत्यांच्या पक्षांतराचे स्वरूप सोबत जोडलेल्या भाग २ पाहू या.

                                    क्रमशः---  







सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

गीतरामायण ऐकताना - भाग ४


' शरयू तीरावरी अयोध्या ' हे पद सुरू झाले. मनुनिर्मित अयोध्या नगरीचे  वर्णन ऐकताना डोळ्याचे पारणे फिटले. माझे मन इक्ष्वाकु कुलाचा धर्मपरायण राजा दशराथाच्या काळात गेले. मराठीतील रामायणावरील जी काही पुस्तके वाचली आहेत आणि गीतरामायणाचे जे काही कार्यक्रम पाहिले, ऐकले आहेत त्यातून जे काही मला उमजले आहे ते आपल्या समोर मांडतो आहे. 

सामान्यतः वाचण्यापेक्षा प्रवचन, किर्तन व गायन ऐकण्यात आपला कल अधिक असतो. त्यात ही गीतरामायणाची चव इतकी न्यारी आहे की तिचा आस्वाद घेण्यास आपण सारेजण सदैव तयार असतो. 

श्रीरामांच्या यज्ञमंडपात कुश आणि लव अयोध्या नगरीचे जे वर्णन सांगत आहेत, ते ऐकूनच त्रेतायुगातील आर्यावर्तात कोसल नावाच्या विस्तीर्ण आणि सुपीक प्रदेश, तेथील साम्राज्य याची ओळख होते. शरयू नदीच्या काठी वसलेल्या राजधानी अयोध्या नगरीचे मुर्तीमंत दर्शन घडते. या शहरामधून मोठमोठाले रूंद राजरास्ते व काही ठिकाणी जाणेयेण्याकरिता काढता-घालता येणारे चमकादर पूल,  रस्त्यावर दुतर्फी फळ-फुलांनी बहरलेल्या वृक्ष-वेली पाहता प्रजेला  पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश आपोआप मिळत होता.  

तेथील रस्त्यावर रोज सुवासिक पाणी टाकले जाऊन ठिकठिकाणी फुलांचे मांडलेले उपहार आणि  सुशोभीत सात मजली वाडे इत्यादी ने अयोध्येची शोभा वाढलेली दिसे. नगराबाहेर विस्तीर्ण व रमणीय अशा बाग होत्या. तिथे नगरवासी फिरायला येत असत. काही उपवनात नृत्य, गायनासारखे कार्यक्रम घेता येतील असे मंच ही होते. अयोध्येत ठिकठीकाणी दुध-दुभते, फळे व भाजीपाला आणि किराणा मालांनी भरलेले बाजार होते. एकंदरीत प्रजा सुखी होती. त्यामूळे स्त्री- पुरूष स्वभावाने धार्मिक, सदाचारी व कुटुंब वत्सल होते. प्रजेच्या व राज्याच्या सुरक्षेसाठी सर्वत्र पराक्रमी, मजबूत बांध्याचे असे शस्त्रसज्य सैनिक तैनात असत. तसेच हिमालय विंध्यादी पर्वती भागातून आणलेले शेकडो उंच व शृंगारलेले हत्ती, तसेच सिंध, कांबोज, बल्क इत्यादी देशातून आणलेले हजारो सुंदर व दमदार घोडेही बाग- बगीचा मधून फिरत असताना दिसत असत. हत्ती-घोडे यांचे पालन-पोषण व शिक्षण अशा रितीने केले जात असे की त्यांना आसपास फिरणार्या लोकांपैकी स्वजन कोण आणि शत्रूचे हेर हे ओळखता येत असे. 

सतत सज्ज असलेले सैनिक बेसावध असणार्या शत्रुवर बाण व इतर शस्त्राचा वापर करीत नसत. पण दगा  देणारे शत्रू दिसले तर लागलीच त्यांना यमसदनास पाठवत असत. त्यामुळे तिथे कधी ना दंगा झाला, ना दगा झाला. थोडक्यात यथा राजा तथा प्रजा या सिध्दांतावर आधारलेली ईश्वकू कुळाची सक्षम व लोकाभिमूख राज्यव्यवस्था होती. तत्कालीन सर्वात सुंदर, आदर्श अशी राजधानी अयोध्या नगरी होती. इत्यादी गोष्टींचे दर्शन गद्य रामायण व गीतरामायणातून आजही घडत असते. राम आणि सिता हे सर्वात आदर्श पती -पत्नी असे जोडपं देशातील सर्व प्रान्तातल्या व परदेशातल्या कानाकोपर्यात अजरामर ठरले आहेत.

पराक्रमी, कर्तबगार, प्रजेचा कैवारी आणि विद्वान महाराज दशरथ यांना  तीन पत्नी असून मूलं-बाळं नाहीत हे एक मोठे शल्य होते. ते महाराज दशराथाला आणि तिन्ही पत्नींना सतत सतावत आहे याची साक्ष गदिमांनी खालील ओव्या द्वारें दिली आहे--- 

राजसौख्य ते सौख्य जनांचे

एकच चिंतन लक्ष मनांचे

काय कांज त्या सौख्य-धनाचे

कल्पतरूला फूल नसे का? वसंत सरला तरी .

' सरयू तीरावरी अथोध्या ' या पदातून अयोध्या नगरीचे वर्णन ऐकल्यानंतर त्रेता युगात आपला देश किती समृद्ध होता हे कळते. परकीयांच्या आक्रमणा पुढे देश हरला आणि भारतभूमीचे आम्ही पुत्र गुलामीत गेलो. इस्लामी आक्रमणाच्या अगोदर आपला भारत व्यापारात आणि सुखसाधनात जगात पहील्या क्रमाकांवर होता. इस्लामी आणि ब्रिटीश राजवटीने आपल्या देशाची प्रचंड लूट केली आहे. अजुनही आपली गुलामी मानसिकता संपली नाही. ती लौकरात लौकर ती संपावी अशी रामलल्ला कडे प्रार्थना करतो. 

जसे संपन्न आणि शक्तीमान अशा अयोध्या नगरीचे दर्शन झाले. तसेच नियतीच्या शक्तीचे ही दर्शन गीत रामायण आणि श्रीराम कथां मधून होते. सर्व सुखें पायाखाली लोळण घालीत असले तरी पुत्रप्राप्ती झाली नसण्याचं दुःख दशरत महाराज आणि त्यांच्या तिन्ही राण्यांना पचवायला किती जड गेले होते याचे वर्णन गदिमांनी ज्या शब्दात मांडले आहे त्यातून एक नैसर्गीक, शाश्वत नियमाची म्हणा वा नियतीच्या करामतीची ओळख होते. या विश्वात छोट्या-मोठ्या असंख्य अशा घटना घडतात ज्याचे आकलन आजच्या आधुनिक विज्ञानाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही होत नाही. 

ज्यांना प्रत्यक्ष श्रीरामाचे दर्शन झाले आहे असे संत श्री रामदास स्वामींनी   हे सत्य दासबोध मांडले आहे |        जनीं सर्व सूखी असा कोण आहे ?   विचारें मना तूंचि शोधून पाहे ||       मना त्वां चि रे पूर्वसंचित केले |     तयासारिखें भोगणे प्राप्त झाले || 

दशरथ महाराज केवळ राजा नव्हते. ते विद्वान ऋषीतुल्य व्यक्ती ही होते.  दशरथ राजाला यज्ञ करून पुत्रप्राप्ती झाली. पण वारस नसल्याचे शल्य काही काळ त्यांनाही भोगावे लागलेच. सितेचे पिताश्री जनकराजाचे व्यक्तीमत्व ऋषी-मुनी सारखे होते.  जनक महाराजांनाही सिता सारखे कन्या रत्न दैवीकृपेने धरणीतून प्राप्त झाले.

आपण कोणाच्या पोटी आणि कधी व कुठे जन्म घेणार, आपण कोणाचे पती वा पत्नी होणार, आपल्या पोटी कोण व केव्हा जन्म घेणार, आपल्याला देवाज्ञा कशी, कुठे, व केव्हा होणार इत्यादी बाबीचे भविष्य सांगणारी यंत्रणा मानवा कडे नाही. या संबंधित  आपली हतबलता संत तुकाराम महाराजांनी ' आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना ' या अभंगातून पटवून दिली आहे. तुम्ही देव आहे असे माना वा न माना पण ती यंत्रणा आहे असे जगातील बहुतांश संत-महंतानी म्हटले आहे. ती अदृष्य स्वरूपात आहे. तिचेच नाव आहे नियती. म्हणजेच महाकाळ होय.

समर्थ रामदास स्वामिनी ही म्हटले आहे --

मना सांग पा रावणा काय जाले |      अकस्मात तें राज्य बुडाले ||     म्हणूनी कूडी वासना सांडी वेगीं |   बळें लागला काळ हा पाठिलागीं || 

                                    क्रमशः

                जय श्रीराम !

गीतरामायण ऐकताना - भाग ३



गीत रामायण हे आधुनिक साहित्य सृष्टीतील नक्षत्राचे लेणे आहे. गीत रामायणाची ख्याती अशी आहे की केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर प्रांतात ही आपआपल्या भाषात अनुवादाच्या रूपाने गावोगावी प्रयोग होत असतात.निवडक ' गीत रामायणाचे ' नोटेशन च्या पुस्तकाचे लेखक अशोक सहस्त्रबुद्धे म्हणतात,  " नोटेशन्स बनविणे हे सर्वसाधारणतः कठीण -किचकट व कंटाळवणे आहे. आणि त्यात गीतरामायणाचे नोटेशन्स बनविणे म्हणजे साक्षात शिवधनुष्य उचलण्यासारखे ! पण सदाबहार गीतरामायणाची जादूच न्यारी ! २०  ऑक्टोबरला काम सुरू केले आणि व न कंटाळता केवळ २ महिन्यात २० डिसेंबरला हस्तलिखीत संपविले. या दोन महिन्यात मी राममय झालो, अनेक दिव्य अनुभव आले. यावरून गदिमा व बाबुजींना ५० वर्षापुर्वी किती दैवी-दिव्य अनुभव आले असतील याची कल्पना यावी." अशोकजी सहस्त्रबुद्धे यांनी ग दि मा व बाबूजींच्या कलेची केलेली प्रशंसा समोर ठेवली, याचे कारण माझ्या हातून ' लहान तोंडी मोठा घास ' घेण्याचा प्रमाद होऊ नये. हे आपणास उमगले असावे.  

शब्दसम्राट कै ग दि मा आणि स्वरसम्राट बाबूजी म्हणजे कै सुधीर फडके या दोन मराठीचीये नगरीतील आधुनिक ऋषींनी आपल्या प्रखर तपश्चर्येने गीतरामायण रूपी मंगलमय गंगा मराठी भाषेतून प्रवाहीत केली. गीत रामायणाचे कार्यक्रम पुन्हा पुन्हा प्रत्यक्ष ज्यांनी पाहीले आहेत अशी बुजूर्ग मंडळी शरीराने आज थकली आहे, तरीही आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात अधून मधून यु ट्युब वरून गीत रामायणाचे लाईव्ह कार्यक्रम पाहात असतात. मराठी युवक-युवतींना सुद्धा गीत रामायणाने भारावून टाकले आहे. प्रत्येक पिढीला गीत रामायणाने आपल्या कवेत घेतले आहे. ग दि मा च्या भाषेत सांगावयांचे तर --
" छंद जाणतेपणीचा तिर्थे काव्याची धुंडिली | कोण्या एका भाग्य वेळी पुजा रामाची मांडिली || देव वाणीतले ओज शितळले माझ्या ओळी | वाल्मिकींच्या भास्कराचे चांदणे झाली मराठी || " 

श्रीरामजन्मभूमीच्या मालकी संबंधित न्यायालयीन खटल्याची सुनावणी होऊन अयोध्येत  श्रीरामाचे मंदिरच होते असा देशातील सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर रितसर रामज्नमभूमी न्यासाची स्थापना झाली. श्रीरामजन्मभूमी मंदिराचे बांधकाम सुरू झाले आणि ते बहुतांशी पुर्णात्वात जात आहे. 

रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापनाची तारीख जाहीर झाल्यानंतर देशातल्या कानाकोपर्यातील चावडी, चौक चहाच्या टपरी, ग्रामदेवतेच्या मंदिर, शहारातील वाचनालय, मंदिरे अशा सार्वजनिक ठीकाणी लोक रामजन्मभूमी मुक्ती साठी झालेल्या लढाया, त्यातून देशबांधवाचे झालेले बलिदान, न्यायालयीन लढाई इत्यादी विषयावर होत असलेल्या चर्चा पाहिल्या. रामजन्मभूमी मुक्तीचा संपुर्ण इतिहास मिडीयातून पाहीला. फक्त ' रामजन्मभूमीचाच आग्रह का या संबंधीत जनसामान्यांच्या मनात उद्भवलेल्या शंका-कुशंका, प्रिन्ट इलेक्ट्राॅनिक्स व सोशल मिडीयातून  धर्मशास्त्र व अध्यात्म, इतिहास व पुरातत्व, न्यायव्यवस्था, राजव्यवस्था आणि संशोधकीय व्यवस्था इत्यादी क्षेत्रातील अभ्यासकांच्या चर्चेतून बहुतांशी दूर झाल्या आहेत. 

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनाचा मुहूर्त जसा जवळ येत गेला तसा संपूर्ण देश राममय होत गेला. देशभरातील  सार्वजनिक ठिकाणी भजने, किर्तने, शोभा यात्रा, गीत रामायण, रामचरीत मानस, हनुमान चालिसा असे सांस्कृतिक कार्यक्रम होत गेले. शाळा-काॅलेजात राम सप्ताह साजरे होत गेले. कथाकथन, निबंध स्पर्धा, चित्रकला, वकृत्व, रांगोळ्या इत्यादी स्पर्धा कार्यक्रम झाले. देशभरातील रस्ते, घरें, दूकानें, इमारती, सायकली, रिक्षा, स्कूटर, मोटार- सायकली, टांगे, मोटारी, टेम्पों, इत्यादी वाहनांवर  श्रीरामाच्या प्रतिमा असलेल्या भगव्या रंगाच्या भव्य  कटऑट्स, श्रीरामाच्या प्रतिमा असलेले भगव्या रंगाचे ध्वज फडकत असलेले आपण पाहिले. गावें, तालुका व जिल्हे, नगर- उपनगरें मोठी शहरें सर्वत्र रामजन्मभूमी अक्षत निमंत्रणे व श्रीरामजन्मभूमी मंदिराचे प्रतिमाचे वितरण होताना दिसले. संपुर्ण देश राममय झाल्यामुळे एक सामान्य भाविक म्हणून मी अशा कार्यक्रमात सामील झालो. निर्मळ तीर्थक्षेत्री झालेला गीतरामायण कार्यक्रम हा त्यापैकीच एक आहे. 

रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ ला संध्याकाळी ७ वाजता आमच्या गावीं नालासोपारा (प) येथील श्रीक्षेत्र निर्मळ येथील शंकराचार्य समाधी मंदिराचे पटांगण गीत रामायणाच्या कार्यक्रमला आलेल्या रसिक श्रोत्यांनी तुडूंब भरले होते. सामवेद म्हणजे साम गायन. ऋग्वेदातल्या ज्या ऋचा गावयाच्या आहेत त्याचा संग्रह म्हणजे सामवेद ! ऋग्वेदात तीन स्वरांनी उगम झालेल्या संगीताचा प्रवास सामवेदात सप्त स्वराकडे पोहचतो असे मानले जाते.

मी गीतरामायणाचा आनंद प्रथमच घेत होतो असे नाही. पण या खेपेस माझे मन अधिक राममय झालेलं मला जाणवले. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा समारोहाची घोषणा झाल्यानंतरच्या वातावरणाचा हा परिणाम असावा. बरोबर संध्याकाळचे ७ वाजले. स्वर सामवेद संस्थेतर्फे संगीत प्रेमी भाविकांचे स्वागत झाले. माईक निवेदकाकडे आला. जमलेल्या श्रोत्यांची आतुरता शिगेला पोहचली.  पटांगणात आल्यापासून भाविकांची  आपसात होणारी थोडीशी कुजबूज संपली. पटांगणात पीनड्राॅप शांतता पसरली. लागलीच -- 
' श्रीऽऽऽ राऽऽऽम, श्रीऽऽऽ राऽऽऽम , 
श्री ऽऽऽ राऽऽऽम, स्वयें श्री राम प्रभू ऐकती ' कानीं ऐकू आले. गीत रामायण सुरू झाले. विणा व मृदंग अशा साहित्यांनी त्या सुंदर मुलांनी आपल्या कोमल व मधुर कंठानी ते काव्य गाण्यास आरंभ केला, तेव्हा प्रभू रामचंद्रांची व यज्ञमंडपातील सर्व सभाजनांची चित्तवृत्ती तल्लीन होऊन ती सभा चित्रासारखी चित्त झाली होती. 

तशीच निर्मळ या तिर्थक्षेत्रीच्या पटागंणात जमलेल्या भाविकांची सभा चित्रासारखी चित्त झाली. ती दोन छोटी बालके प्रत्यक्ष श्रीरामचंद्राची कुश, लव ही दोन मुलें. त्या कोवळ्या बालकांना ठाऊक नाही, की ते आपल्या पिताश्री समोरच त्यांचे चरीत्र गीत गात आहोत. प्रत्यक्ष देव-देवतांना डोईजड झालेल्या महान पराक्रमी राक्षस रावणाचा पराभव करून त्रैलोक्याचे अधिपती झालेल्या राजाधिराज प्रभू रामचंद्राना गीत गाणारी मूले आपली आहेत हे ठाऊक नाही. ही एखाद्या चित्रपटातील केवळ कल्पना नाही. त्रेता युगात भारतवर्षात प्रत्यक्षात घडलेली ही घटना आहे. 

माझे मन मलाच विचारू लागले,  'आपल्या बाळांच्या वाटेला जन्मतः राजमहाल ऐवजी आश्रम आला हे  प्रभू रामचंद्राना नंतर कळले असेल का? त्यावेळी त्यांना काय वाटले असेल? स्वतःहाचे बालपण राजमहालात गेले याचे त्यांना त्यावेळी स्मरण झाले असावे का, आणि स्मरण झाले असेल तर एक पिता म्हणून प्रभू रामचंद्राची त्याक्षणीं मनःस्थिती कशी झाली असेल, इत्यादी प्रश्न माझ्या मनात उद्भभवले.

अवतारी पुरूषांच्या चरित्राचा ज्यांनी सखोल अभ्यास केला आहे अशा महनीय व्यक्तींच्या प्रवचनातून, लेखांतून आणि पुस्तकातून माझ्या मनात उद्भलेल्या वरील प्रश्नांचे उत्तर मला गवसले ते असे आहे, 'अवतारी पुरूष स्थितप्रज्ञ असतात.' ते खरे ही आहे. स्थितप्रज्ञ या शब्दाची खरी ओळख ही झाली नाही असा मी एक सामान्यजनांपैकी एक, मग अनूभुती कोठून येणार? पण ---- 

अशा विभुतींनां ही नियतीशी पदोपदी टक्कर द्यावी लागली आहे, हे आपण सारे जाणतो. तरीही आपल्याला त्यांची चरित्रगाथा पुन्हा पुन्हा वाचावी, ऐकावी असे वाटते. या संबंधीतले कार्यक्रम मग ते चित्रपट असो वा नाटक, सिरीयल्स असो वा लोककला असो, किर्तन असो की प्रवचन असो, भजन असो वा संगीतमय निरूपण इत्यादींनी आपले मन, आपले कान तृप्त होतात. त्याच क्षणीं साहित्यकार, संगीतकार - गायक, कलाकार, दिग्दर्शक, निर्माता, किर्तनकार, प्रवचनकार,  इतिहास तज्ञ, आणि आयोजक इत्यादींची सुद्धा स्तुती आपल्या मुखातून आपोआप येत असते. त्यापैकी अग्रणी स्थानावर असलेली निर्मिती गीतरामायण होय.  

                                       क्रमशः- 
               जय श्रीराम !


दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...