रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

आपण व आपली दैवते (बुद्धी देवता) भाग १


दर वर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचे न चुकता आगमन होत असते. श्री गणपती बाप्पा जसे येतात तसे परत ही जातात ; वर्षानुवर्षे ही परंपरा सुरू आहे ; कुठे खंड पडत नाही ; कुठे गौरीसोबत परत जातात तर कुठे अनंत चतुर्दशीला जातात. अनंत चतुर्दशीला विराट जनसमुदायाच्या उत्साहाच्या उधाणात सार्या सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होत असते. गणपतीच्या  विसर्जन यात्रेत 'गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लौकर या' अशी आर्त विनवणी आपण करतो. कारण काय तर त्या मंगलमुर्तीच्या सहवासाला आपण पारखे होत आहोत अशी उचंबळून येणारी जाणीव. गणपतीचे विसर्जन झाले की आपल्या  घरातील लाडकी व्यक्ती परगावी गेल्यावर जी स्थिती आपल्या मनाची होते तशी स्थिती होत असते. गणपतीच्या विसर्जनानंतर एक दोन दिवस मनाला रितेपणं आल्यासारखं वाटतं. पण एक दोन दिवसानंतर ते बुद्धीचे दैवत आपल्या मनाला अलगद आपल्या कर्माच्या वाटेवर आणून सोडते आणि आपलं दैनंदिन जीवन सुरू होते.

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, पांडूरंग शास्त्रीजींच्या शद्बात गणपती विसर्जन (मग तो भाद्रपद चतुर्थीचा असो वा माघी चतुर्थीचा असो)  म्हणजे " जे सान्त आहे त्याला अनंतात, साकाराला निराकारात, व सगुणाला निर्गुणात विलीन करतो. साकार भगवान मूर्तीत आहे तर निराकार भगवान सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. जीवनातही व्यक्तीपूजेपासून सुरूवात करून तत्वपूजेत त्या आरंभाचे आपण पर्यवसान केले पाहिजे. शेवटी आपण तत्त्वच प्रमाण मानले आहे. सारांश गणपतीचे विसर्जन, म्हणजे विराट पूजेचा आरंभ. म्हणजेच सर्वत्र भगवान पाहणे होय."  समाजवर निरपेक्ष प्रेम करावे अशा अर्थाची  Whatsapp वर एलआयसीतील एका मित्राने अनंत चतुदर्शीला एक पोस्ट पाठविली होती. ती अशी आहे,  The act of Visarjan teaches you to let go of something u love deeply. Visarjan teaches you to surrender to faith over intellect. It also teaches us what we love we may have to leave, so love unconditionally. शास्त्रीजीं प्रमाणे सर्वात देव पाहणे आपल्यासारख्यांच्या आवाक्याच्या पलिकडे असले तरी गणेशोत्सवाच्या काळात कमीत कमी आपण सारे एक आहोत, आपण सारे बंधू आहोत ही भावना गणेशोत्सवात वृद्धीगंत होत जाते. मग आपोआप सर्वांशी प्रेमाने व गुण्यागोविंदाने राहण्याचा प्रयत्न आपल्याकडून होत असतो. त्यामूळे हा उत्सव सर्वत्र  शांतपणे पार पडतो. हा त्या मंगलमूर्तीच्या सहवासाचा परिणाम होय. मग तो घरातला गणेशोत्सव असो वा सार्वजनिक मंडळाचा. आपले सारे सणवार उत्साह निर्माण करणारे आहेत ह्यात बिलकूल शंका नाही. तरी गणेशोत्सवाचा थाट जागृती निर्माण करणारा आहे असे जाणवते. अबाल-वृद्धांपर्यंत समाजातल्या सर्व थरातल्या वर्गाला मंगलमूर्तीची भूरळ वा मोहिनी पडत असते. आपल्या घरात, गावात,  सोसायटीत, काॅलनीत आराध्य दैवताचा वावर असतो ही भावना आपणास आपोआप सत्कर्माकडे घेऊन जाते. त्यामूळे आपले चंचल मन व्यापक बनते. मन व्यापक झाले की ते स्थिर होते. त्यामूळे आपल्यातला विवेक जागृत होऊन बुद्धीचा बहुतांशी सदुपयोग होतो. इथे सर्रास या शब्दाऐवजी बहुतांशी हा शद्ब वापरला आहे,  ह्याचे कारण आपल्या धार्मिक उत्सवात काही अनिष्ट प्रथा शिरत आहेत. काही त्रूटी आहेत. काळानुसार त्या दूर करून काही सुधारणा करण्यास तसेच पर्यावरणासंबंधीची खबरदारी घेण्यास वाव आहे ही बाब नाकारता येत नाही. तसे पाहता इतर धर्मियांच्या सणवारात काही ना काही दोष असतातच. परंतु त्याबाबत आपण काही विचार मांडला तर आपल्या येथील तथाकथित सेक्यूलरीस्ट विचारवंत, संपादक मंडळी आपल्याला हिंदू दशहतवादी असे लेबल चिकटवयास तयार असतात. त्यावरील उत्तर राजकीय स्वरूपाचे असल्याकारणाने इथे देणे अनुचित आहे. म्हणून त्याबाबत या ठिकाणी न बोलणे हेच इष्ट ठरते.


पुजनीय पांडूरंग शास्त्रीजींनी गणेश चतुर्थी ह्या विषयावरील आपल्या लेखात म्हटले आहे की, "अध्यात्मिक दृष्ट्या असे मानले जाते की आपल्या इंद्रियाचा एक गण आहे. ह्या गणाचा पती मन आहे. कोणतेही कार्य सिद्धीस न्यावयाचे असेल तर आपला हा गणपती (म्हणजे आपले मन) ठिकाणावर असला पाहिजे. म्हणून गणपतीला प्रथम पूजण्याचा अर्थ असा आहे की, कार्याच्या प्रारंभापूर्वी मनाला शान्त व स्थिर करायचे ज्याच्यामूळे काही विघ्ने उभी न व्हावीत व कार्य सुखरूपपणे पार पडावे." म्हणून श्री गणेशाला बुध्दीची देवता म्हणतात. पहील्या पुजेचा मानही गणपतीचा असे आपले धर्मशास्त्र सांगते. प्रत्येक शुभ कार्यात त्याचेच प्रथम पूजन होते. विवाहाचा प्रसंग असो, वा लक्ष्मी पूजनाचा, कोनशिलाचा असो, वा कुंभ स्थापनेचा समारंभ असो; मंदिरात भगवंताची प्राणप्रतिष्ठापना करायची असली तरी प्रथम पूजन गणपतीचेच. गणपतीची मूर्ती नसली तरी सुपारीचा गणपती बनवावा लागतोच. ओंकाराला पदार्थ सृष्टी मध्ये आणावयाचे काम गणपतीच्या मूर्तीने केले आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजाने म्हटले आहे,
             अकार चरणो युगल | उकार उदर विशाल |
              मकार महामंडल | मस्तकाकारें |
' अ ' कार म्हणजे गणपतीने घातलेले पद्मासन,  ' उ ' कार म्हणजे विशाल पोट आणि ' म ' म्हणजे त्याचे मस्तक. अशी रसमय कल्पना ज्ञानेश्वर माऊलीने केलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली, लोकमान्य टिळक, पांडूरंग शास्त्रीजी सारख्या विभूतींनी गणपती बाप्पांच्या उत्सवाचे आपल्या समाज जीवनातले महत्त्व जाणले होते.  त्यावरून तरी असे म्हणावेसे वाटते की श्रीगणेशाला बुद्धीची देवता का म्हटले जाते ह्याबाबत कोणाची शंका नसावी. पांडुरंगशास्त्रीजींने एके ठिकाणी म्हटले आहे की "आपल्या पुराणांची भाषा भावगर्भित तशीच लक्षणा व रूपके यांनी भरलेली असते. बुद्धिशाली माणसाने स्वतःची बुद्धी कसाला लावून भावगर्भित अर्थ शोधून काढून आनंद प्राप्त करून घ्यावयासा असतो आणि बालबुद्धीने ती गोष्ट वाचून आनंद प्राप्त करावयासा असतो. "

एखाद्या शूभकार्याचा आपण प्रारंभ करतो तेव्हा पुष्कळदा प्रारंभ ह्या शब्दाऐवजी कार्याचा श्रीगणेशा केला असे म्हणण्याचा प्रघात आहे. ह्याचा अर्थच असा आहे की बुध्दीची उपासना केल्याशिवाय कुठेचेही कार्य तडीस जात नाही.  म्हणूनच म्हटले जाते,  Action without vision never get succeeded. विचारपूर्वक कृती केल्यानेच कार्यात यश मिळते. जे लोक आपल्या कार्याची नीट आखणी करून त्यानुसार आपल्या आत्मविश्वासाच्या बळाने संपुर्णतः झोकून कार्य करतात त्यांना यश मिळते, असे अनेक विचारवंताचे मत आहे. ते खरे आहे. त्यावरून आपण असे म्हणू शकतो की ' बुध्दी म्हणजे, कार्याची प्रथम आखणी करणे. तदनुसार आत्मविश्वास व निश्चयाच्या बळावर कार्य तडीस नेण्याची शक्ती.' पण शक्ती अजमाविल्याशिवाय कार्य तडीस कसे जाणार ? Vision without action is of no use. म्हणून नियोजन, आत्मविश्वास, निश्चय  आणि कर्तव्य-तत्परता ह्याचा समूच्चय म्हणजे बुद्धी असावी. अध्यात्मात तीन शक्ती महत्वाच्या मानल्या जातात. त्या म्हणजे इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. म्हणजे मन, बुद्धी व श्रम. म्हणजेच भक्तीयोग, ज्ञानयोग व कर्मयोग. काहींचे असे म्हणणे आहे की बुद्धी म्हणजे विचार करण्याची शक्ती. विचाराचा प्रारंभ वा उगम मनातून होत असतो. परंतू मन म्हणजे काय, आपल्या शरीराच्या कुठच्या भागात असते, त्याची शल्यचिकित्सा करता येते का, याबाबत आधूनिक विज्ञान ठोस उत्तर देऊ शकलेले नाही. पण ते चंचल असते हे सर्वांनी मान्य केलेलं आहे. ते स्थिर राहण्यासाठी प्राणायाम, ध्यान, साधना, योगाभ्यास तसेच वैद्यकीय शास्त्रातील ॲलोपथी, आयुर्वेदीय, होमोयोपथी, इत्यादी शाखांनी उपाय ही शोधले आहेत. काळाचा महीमा असा आहे की आज मानवाने आर्टीफिसीयल इन्टीलिजेंन्सचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. परंतु  बुद्धीची ठोस व्याख्या करता आली असावी का ह्याबाबत आपण सांशक आहोत. तरीही आधूनिक विज्ञानाने आयक्यू IQ  नावाची संज्ञा शोधून काढलेली आपण पाहतो. ती ही जमेची बाजू आहेच की. इमोशनल कोशन्स ह्या संकल्पनेवर चिकित्सा होत आहे हे आधूनिक विज्ञानाचे चमत्कार आहेत. असे अनेक वैज्ञानिक चमत्कार मानवाने केले आहेत, ते आपल्यात विराजमान असलेल्या बुद्धीच्या जोरावरच ना ! आपल्याकडे असलेल्या बुध्दीच्या सामर्थ्याने आपण बुद्धीचे ही दोन प्रकार मानले आहेत. एक सुबुध्दी आणि दुसरी दुर्बुध्दी. तसेच गुणाचेही  सद्गगूण व अवगूण; वृत्तीचे  दुष्टवृत्ती व सत्प्रवृत्ती ; आपल्या कृतीचे चांगले-वाईट, किंवा पाप-पुण्य असे प्रकार मानले आहेत. 

मानव आणि इतर प्राणीमात्रात सर्वात महत्वाचा फरक हा आहे की आपल्याकडे बुद्धी आहे. ह्या बुद्धीच्या जोरावर मानव इतर प्राण्यापेक्षा अति प्रगत, अति शक्तीमान ठरला आहे. सर्वशक्तीमान कोण तर तो ईश्वर ! मानव सर्वशक्तीमान आहे असे मानता येत नाही. कारण आपण सृष्टी निर्माण केलेली नाही. तसेच आज विज्ञानाच्या आधाराने आपल्याला जे काही विश्वासंबंधी ज्ञान प्राप्त झाले ते ही एका कणाएवढेच असावे कारण आपल्या सुर्यमालेसारख्या अनेक सुर्यमाला आहेत हे विज्ञानाचे म्हणणे आहे. फार तर इतर प्राण्यांपेक्षा मानव शक्तीमान ठरला आहे असे म्हणावे. आणि तसे  सिद्ध झाले ही आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेली बुद्धी ही एक प्रकारे आपल्या मध्ये विराजमान असलेल्या ईश्वराचे एक छोटे  स्वरूप आहे. म्हणजेच बुद्धी ही एक देवता आहे असे मानले तर ते पोथीनिष्ठ ठरते असे होत नाही. आपल्याला हे पटते, पण  सार्यांनांच हे पटते असे नाही. काहींना देव- दैवते हा शब्द खटकतो. ते ही स्वाभाविक आहे म्हणा.  गेली काही वर्षे मला ही माझ्यात थोडक्या प्रमाणात असलेली बुद्धी स्वस्थ बसू देत नव्हती. बुद्धीचा देव ही कल्पना खरोखरीच वेडगळ असावी का ? सारे काही वैज्ञानिक पातळीवरून पडताळून पाहता येते का? त्यातून मानवी जीवनाचे प्रयोजन काय आहे हे शोधता येते का, मानवा समोरील आव्हाने, समस्या ह्यावर समाधानकारक उत्तरे मिळून ह्या पृथ्वीवर शांती आणि सुखाचे नंदनवन साकारले जाणार का असे अनेक प्रश्न मनात उभे राहात आले आहेत. शालेय जीवनात प्रत्येक इयत्तेत भाषा विषयाच्या प्रश्नप्रत्रिकेत 'विज्ञान वरदान की शाप '  ह्या विषयावर निबंध लिहीण्याचा प्रश्न असायचा. त्यावेळी निबंधाच्या रेडीमेड पुस्तकाच्या व गुरूजन वर्गाने दिलेल्या मुद्याच्या आधारावरून निबंध लिहीत असे. ह्या गोष्टीची आज आठवण अशासाठी होते की ,विज्ञान वरदान की शाप असा प्रश्न कुठल्याही परीक्षेसाठी जर विचारला जातो तर  विज्ञान हे जसे दैवत आहे, तसे ते पिशाच्च ही आहे, हे जगभरातल्या सर्वच शिक्षण संस्थांनी मान्य केले आहे असे दिसते. वरदान म्हणजे देव-देवता आणि शाप म्हणजे पिशाच्य. मग दैवत ह्या शब्दाला हरकत का असावी. देव-देवता, पंथ, उपासना, सांप्रदायिकता--पुरोगामीत्व, विकास-मागासलेपणा, प्रगती-अधोगती, धर्म-अधर्म, पाप-पुण्य, अध्यात्म- भौतिकवाद, विज्ञानवाद इत्यादी विषय बौद्धीक पातळीवरचे मानले जातात. या विषयाचा आवाका फार मोठा आहे. त्यात आपण पडलो सामान्य कुवतीचे, म्हणून तर आपण सामान्यजन. पण चर्चा व संवाद करायला आपल्याला कोणी अडविणार नाही हे तर खरे आहे. आजच्या युगाने सोशल मिडीया द्वारें आपल्याला दिलेली मौलिक संधी का सोडावी हा विचार करून यावर चर्चा व संवादा द्वारे लेख मालिका सुरू करावी असे ठरविले आहे. पुढल्या एक दोन आठवड्यात 'ओम नमोजी आद्या, देवा तूंची गणेश, सकळार्थमतिप्रकाश, तसेच हें शब्दब्रह्म अशेष, तेचि मूर्ती सुवेष ' असे ज्ञानेश्वरीच्या सुरवातीस माऊलीने म्हटले आहे. त्यापासून चर्चेला सुरूवात करू या. नंतर  बुद्धी व बुद्धीचे प्रकार, मन व बुद्धी , बुद्धी व श्रद्धा, बौद्धिक पातळी, अध्यात्म, बुद्धीप्रामाण्यवाद, इत्यादींचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो तसेच विविध क्षेत्रातील तज्ञांची मतें काय आहेत ह्यावर आपण टप्प्या-टप्प्याने पुढे चालत राहू या. तुर्तास आज इथेच थांबू या.

रविवार, १ सप्टेंबर, २०१९

इम्रानखान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ


मंगळवार दिनांक २७ आगस्ट २०१९ रात्री घरी परतल्यावर टिव्ही ऑन केला तर NewsX चॅनेलवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान ह्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंबंधी केलेल्या वक्तव्यावर चर्चा सत्र सुरू होते. चर्चा सत्रातील सर्व मान्यवरांनी इम्रानखानच्या वक्तव्यावर कडक ताशोरे ओढले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपाला देशवासियांनी एकजुटीने विरोध करावा असे मत मांडले. एकूण चर्चेचा सुर व स्वरूप पाहून समाधान वाटले. प्रथम इम्रानखान ह्यानी त्यांच्या देशाला संबोधन करताना, काय म्हटले आहे ते पाहू या. इम्रानखानने म्हटले की, ' काश्मीर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गुंडगिरी सुरू केली आहे ; मोदी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एजंडा राबवित आहे ; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदूची फॅस्टीट संघटना आहे.' इतर न्यूज चॅनेलवर इम्रानखान यांच्या वक्तव्यावर चर्चा सत्र झाले की नाही ह्या संबंधीची मला कल्पना नाही. पण बुधवारच्या मटा मध्ये इम्रानखानच्या वक्तव्यासंबंधी साधी बातमी ही नव्हती. बहूतांश प्रिन्ट मिडीया आणि इलेट्राॅनिक्स मिडीयाने इम्रानखानच्या या वक्तव्याची दखल घेतली नाही, म्हणून हा लेख प्रपंच.

प्रथम आपण इम्रानखान यांनी असे वक्तव्य का केले असावे यावर चर्चा करू या. एकंदरीत जम्मू आणि काश्मीर राज्यातील ३७० आणि  ३५ अ कलम हटविल्यानंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. भारताने बालाकोट वर एअर स्ट्राईक करून पुलवामा वर केलेल्या हल्ल्याचा बदला घेतला. भारत असा काही बदला घेईल असे पाकिस्तानला वाटले नाही तसेच आतंरराष्ट्रीय समुदायाला ही वाटले नाही. आतापर्यंत सहिष्णूता आणि विश्वशांतीच्या स्वप्नात रमलेल्या भारताच्या ओळखीची सवय जडेलेले सारे जग खडबडून जागे झाले. पाकिस्तान तर गोंधळलेल्या स्थितीत गेला. काय करावे असा प्रश्न पाकिस्तानला सतावू लागला. आंतरराष्ट्रीय मंचावर दशहतवाद्यांचा खात्मा झाला पाहीजे असे सतत मांडत राहण्याची भारताच्या नीतीने  सार्या जगाला आपलेसे करून घेतल्या मुळे बड्या देशाची भारतावर डोळे वटारण्याची हिम्मत झाली नाही. पण पाकिस्तानची मात्र जगभर नाच्चकी झाली. युद्धनीतीमध्ये असे म्हटले जाते की ' शत्रूला प्रथम बेसावध करून गाठायचे म्हणजे त्याला गोंधळात टाकावयाचे. मग आपोआप शत्रूमध्ये अस्वस्थता निर्माण होते. अस्वस्थतेतून शत्रू पक्ष अस्थिरतेकडे सरकतो मग शत्रू आपोआप दिशाहीन होतो. पाकिस्तानात गोंधळाची, अस्वस्थेची, अस्थिरतेची स्थिती झाली असतानाच भारत सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्यातील कलम ३७० व कलम ३५ अ तडकाफडकी हटवून दोन्ही प्रेदशाचा ताबा आपल्याकडे घेतला. काश्मीरचे स्वतंत्र अस्तीत्व संपले आहे. तिथे भारतीय संविधान लागू झाले आहे. तेथे कुठल्याही स्थानिक पक्षांची चाललेली मनमानी पुढे सुरू राहणार नाही. आता काश्मीरमध्ये काही ऊठाठेव वा आगळीक केली तर तो भारताच्या सार्वभौमत्वा वर हल्ला मानण्यात येईल. त्यावर भारत पाकिस्ताला सडेतोड उत्तर देईल आणि सोबत देशांतर्गत अलगावाद्यांच्या कारवाया मोडीत काढू शकेल. एका अर्थाने भारताने आपली जम्मू व काश्मीर संबंधीची  भूमिका फक्त पाकिस्तानलाच नव्हे तर सार्या जगापुढे मांडली आहे. वाचकांना ठाऊक असेलच की पाकचे पंतप्रधान इम्रानखान यांचा अलिकडे अमेरीकेचा दौरा झाला तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इम्रानखान समवेत झालेल्या चर्चेत काश्मीर प्रश्नात अमेरिका मध्यस्थी करावयास तयार आहे असे आश्वासन दिले होते. ते हवेत विरण्याच्या आत जी ७ च्या निमित्ताने फ्रान्स येथे झालेल्या संयुक्तिक पत्रकार परिषदेत  ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्न हा भारत व पाक ह्या दोन देशामधील आहे हे स्पष्ट केले. स्पष्ट केले असे म्हणण्या ऐवजी स्पष्ट करावे लागले असेच मानू या. हा भारताच्या परराष्ट्र नीतीचा, अतंर्गत व बाह्य सुरक्षा नीतीचा विजय आहे हे सार्यांना मान्य करावे लागते.

जम्मू आणि काश्मीर राज्यासंबंधी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाने एका दगडात अमेरिका व पाकिस्तानला बेजार करून टाकले. असे ऐकीवात आहे की इराणचे पंख छाटण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानच्या भूमीची गरज होती. इतकेच नव्हे तर तालीबानचा सतत द्वेष करीत आलेल्या अमेरिकेने, पाकिस्तानला  तालिबान संघटनेची मदद घ्यावी अशी आज्ञा ही दिली होती. मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्यातील कलम ३७०, व कलम ३५अ तडकाफडकी रद्दबदल करून पाकिस्तानालाच जखडून ठेवले. अमेरिका व इराण ह्याच्यात जो काही दुरावा निर्माण झाला आहे त्याबाबत भारताची भूमिका स्पष्ट आहे. ती म्हणजे भारत अमेरिकेच्या सांगण्यावरून नाचणार नाही. अफगणिस्तानात अमेरिकेने केलेल्या लष्करी कारवाईत भारताने वाजपेयीचे सरकार असताना अमेरिकेला लष्करी साहाय्य देण्याचा तसेच आपल्या भूमीचा वापर करण्यासंबंधी स्पष्ट नकार दिला होता. काश्मीर मधील कलम ३७० व कलम ३५  रद्द झाले असल्यामूळे  जम्मू आणि काश्मीर प्रश्नासंबंधी चर्चा करायची म्हटले तर पुन्हा १९४७ च्या पुर्वपदावर जावे लागेल. म्हणजे पाकिस्तानने बळजबरीने हिसकवलेला पाक व्याप्त काश्मीर भारताला परत करावा अशी अट टाकूनच भारत चर्चा करेल आणि ती ही द्विपक्षीय स्वरूपाचीच राहील. तसेच वेळ पडल्यास पाकव्याप्त काश्मीर लष्करी बळावर घेण्याचा पर्याय ठेवू शकतो असे अप्रत्यक्ष रित्या जगाला कळविले आहे. ह्या बाबत युनोचा ही हस्तक्षेप चालू शकणार नाही. म्हणून भारत सरकारचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवित असल्याचा आरोप इम्रानखानने केला आहे.  शेवटी जिहादी मनोवृत्तीच्या लोकांना सर्वत्र जिहादच दिसतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर इम्रानखानने केलेला आरोप म्हणजे स्वतःच्या देशातील जिहादी मनोवृत्तीच्या विरोधी पक्षांच्या आरोपातून आपली सुटका करण्यासाठी जिहादी मनोवृत्तीच्याच इम्रानखानने केलेली ही कवायत आहे. या पलिकडे इम्रानच्या वक्तव्याला फारसा अर्थ नाही.

आता आपण इम्रानखान यांनी संघावर केलेल्या आरोपांची आपल्या देशांतर्गत राजकीय स्थितीवर काय परीणाम झाले आहेत आणि काय होतील यावर चर्चा करू या. इम्रानखानने संघावर केलेल्या आरोपाला भारत सरकारने कवडीची ही किंमत दिली नाही. आपल्या कडील संघ व भाजपा द्वेष्टे वर्तमानपत्रे व इलेट्राॅनिक्स मिडीयाने इम्रानखानने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टिकेची साधी बातमी ही दिली नाही. भारत सरकारने इम्रानखानच्या वक्तव्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि आपल्या देशातील विरोधी पक्षांनी इम्रानच्या वक्तव्याकडे केलेलं दुर्लक्ष ह्यात जमीन आस्मानाचा फरक आहे. समजा मटा, लोकसत्ता, लोकमत इत्यादी वर्तमानपत्रे, व एनडीटिव्ही सारख्या न्यूज चॅनेलनी इम्रानखानने संघावर केलेल्या टिकेची बातमी जर दिली असती तर त्या वर्तमान पत्राच्या तसेच न्यूज चॅनेलच्या संपादकांना वाचक आणि श्रोते ह्यांनी म्हटले असते, की ' तुम्ही सुध्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशाच शब्दात गेली नव्वद वर्षे टिका करीत आहात ना ! तुम्ही इम्रानखानचे सगे सोयरेच आहात की !' आपली कुंचबणा होऊ नये म्हणूनच ह्या मंडळींनी इम्रानखानने संघावर केलेल्या टिकेला प्रसिध्दी देण्याचे टाळले आहे. आपली कातडी वाचविण्याच्या नादात इम्रानखानने त्यांच्या भारतातील (राहूल गांधी सिताराम येचूरी, मणीशंकर अय्यर, शरद पवार लालू मुलायम ममता बॅनर्जी इत्यादी मंडळी) हितचिंतकांनाच अडचणीत आणले आहे. इम्रानखानने संघावर टिका केल्यानंतर विरोधी पक्षांची मंडळी व मिडीयातील त्यांचे भाट मित्र चूपचाप बसले आहेत. त्यांचेच शब्द इम्रानखानने त्यांच्या घशात लोटले आहेत. म्हणून त्यांची तोंडे बंद आहेत. इम्रानखानने संघावर केलेल्या आरोपाचा आपल्या येथील तथाकथीत पुरोगामी मंडळींनी निषेध नोंदविला असता तर ते अप्रत्यक्षरित्या संघाचे समर्थक ठरले गेले असते. बरं चुप राहूनही या मंडळींचा फायदा झाला, असेही नाही. कारण चूप राहिल्याने देशवासियांना संदेश काय पोहचला, तर हाच की 'राष्ट्रप्रेमी संघापेक्षा यांना इम्रानखान पंसद पडला आहे. आपल्या देशातील विरोधी पक्षांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.'

बुधवारी २८ आगस्ट च्या दिवशी पत्रकार परिषद चालू असताना, पाकचे पंतप्रधान इम्रानखान सैरभैर झालेले NewsX च्या कॅमरामनने अचूक रित्या दाखविले. त्यावरून पाकिस्तान किती दिशाहीन झाला असावा ह्याचा अंदाज येऊ शकतो. पाकिस्तान सोबत अमेरिका ही काश्मीर संबंधी हतबल झालेली दिसते. भारतावर दादागिरी अमेरिकाही करू शकत नाही. पण काही तरी केले पाहीजे व करावेच लागते याचेच नाव आहे राजकारण. मग ते देशांतर्गत हो वा जागतिक पातळीवरचे असो. भारतात संघाला विरोध करणारी मंडळी आहेच. त्यातच कलम ३७० व ३५ अ  हटविल्याच्या विरोधात कोर्टात याचीका ही दाखल झाल्या आहेत. हीच सोय समजून इम्रानखानने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टिका केलेली दिसते. म्हणून इम्रानखानचा बोलाविता धनी अमेरिका, चीन तसेच मुस्लीम आतंकवादी संघटना, आएएस, पाक लष्कर आणि आपल्या येथील राहूल गांधी, मणीशंकर अय्यर, केरळचे डावे मंडळी तसेच ख्रिस्ती आणि मुस्लीम धर्मगुरू, अनेक विदेशी कंपनीच्या मदतीने सुरू असलेले एनजीओ इत्यादी असू ही शकतात.

इम्रानखानचा बोलविता धनी कोणी का असेना, पण संघावर इम्रानखानने जी टिका केली आहे ती आपल्या देशातील विरोधी पक्ष संघावर टिका करतात त्या धाटणीची आहे. इथेच पाणी मुरतयं अशी देशातील बहूतांश मतदारांची भावना आहे आणि अशी भावना २०१४ पासूनच झालेली आहे म्हणून तर विरोधी पक्षांना सलग दोनदा दारूण पराभव स्विकारावा लागला. आपल्या देशांतर्गत राजकारणाचे असे स्वरूप येण्यामागे विरोधी पक्षांचे धोरण कारणीभूत आहे. पाकिस्तानचे विरोधी पक्ष स्वतःच्या देशहिताची बूज राखून व्यवहार करतात. पुलवामा येथे भारतीय जवानांना दशहतवाद्यांतर्फे मारले तेव्हा त्यांनी मानवतावादी भूमिका घेऊन इम्रानखानवर टिका केली नाही पण बालाकोटवर दशहतवाद्यांचे अड्डे भारताने उडविले त्याबद्दल इम्रानखानवर कडक ताशोरे ओढले. दशहतवाद्यांवर केलेला हल्ला हा आपल्या देशावरच हल्ला असे पाकमधील विरोधी पक्ष मानतात. ह्यातून आपल्या येथील विरोधी पक्ष व त्यांचे पाठिराखे पत्रकार, संपादक आणि स्वयंभू विचारवंत काहीतरी बोध घेतील असे वाटले होते. पण निराशाच पदरी आली. सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही ना !

भाजपाला तसेच ज्या पक्षांनी ३७० व ३५ अ कलम हटविण्याच्या संदर्भात राज्यसभेत पाठींबा दिला आहे अशा सार्या पक्षांच्या बद्दल जनसामान्यांमध्ये एक प्रकारचा आदर निर्माण झालेला दिसतो. ह्याचा अर्थ नजिकच्या भविष्यात देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अभिप्रेत असलेली सांस्कृतिक  राष्ट्रवादाची संकल्पना मूळ धरू लागल्याचे दिसू लागेल. संघाला अस्पृश मानणार्या विचारवंतांची वाटचाल वैचारिक रित्या दिवाळखोरीच्या मार्गावर सुरू झालेली ठळकपणे दिसू लागेल. नक्षलवादी, डाव्याच्या इतर संस्था, मदरेसातून धार्मीक उन्माद शिकविणारे मौल्लवी वर्ग, निवडणूकीत राष्ट्रवाद्यांचा पराभव करण्याचे पत्रक काढणारे काही अतिशहाणे ख्रिस्ती धर्मगुरू, इत्यादींचे कंबरडे नजिकच्या काळात मोडले जाईल असे दिसत आहे. मेवाणी, कन्हैय्या, हार्दिक पटेल सारख्या जातीय द्वेष पसरविण्यारांना त्यांची जागा दाखविली जाईल,  भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांची अब्रू वेशीवर टांगली जाईल. प्रतिष्ठीत, विचारवंत, राजकीय अभ्यासक म्हणून गणलेली गेलेली काॅग्रेस व डाव्या पक्षांची पिल्लावळांची नशा उतरवली जाईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इम्रानखानच्या वक्तव्यावर काही प्रतिक्रीया देईल असे वाटत नाही. कारण आजवर संघ आपल्यावर होणार्या टिकावर सतत दुर्लक्ष करून देश व समाज हिताय कार्यें करूनच उत्तर देत आलेला आहे. तसेच ३७० व ३५ अ संबंधीत सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून सरकार सकट सर्वांनी संयम राखावा असा सल्लाही संघाने दिला आहे. संघ प्रथम राष्ट्राचेच हित पाहतो, सत्ता कोणाची ही असू द्या. केंद्रातील मोदी सरकार मध्ये अनेक मंत्री संघाचे स्वयंसेवक आहेत. खुद्द आपले पंतप्रधान तर संघाचे प्रचारक होते. त्यामुळे केंद्र सरकार संघाने दिलेला सल्ला मानेल आणि सतत संयम राखून जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख संबंधीचे धोरण सर्वसमावेशक ठेवील व सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास ह्या धोरणातून जनसामान्यांना दिलासा देईल असा विश्वास वाटतो. आणखिन एक गोष्ट स्पष्ट दिसते ती ही की , ३७० व ३५ अ कलम हटविल्याच्या निर्णयावर चर्चा अधून मधून होत राहील व  प्रत्येक वेळी काॅग्रेस व मित्र पक्षांचे नेते दिशाहीन झालेले पाहावयास मिळालेले दिसतील. तशी अवस्था येणे आपल्या लोकशाहीच्या वाटचालीच्या दृष्टीने अयोग्य आहे, पण  बुडत्याचा (आपल्या देशातील संघ-भाजपा द्वेष्टे राजकीय पक्ष व पुरोगामी पत्रकार, संपादक व पुरोगामी विचारवंत इत्यादींचा) पाय खोलात जातो ना ! आपण काय करू शकतो?
मञ

शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

आता लक्ष ३७० कलम वरून ४२० वर



जम्मू आणि काश्मीर राज्यासंबंधी असलेले कलम ३७० हटविल्यानंतर प्रिन्ट मिडीया, इलेट्रानिक्स मिडीया, सोशल मिडीया सकट सार्यांचे लक्ष आयपीसी कलम ४२० वर सरकले आहे. देशात अनेक वर्षे चालेल्या भ्रष्टाचाराला शिताफीने आपल्या पदामूळे मिळालेल्या शक्तीतून व आपल्या वकिली व्यवसायातील बुद्धीच्या जोरावर वाचा फोडू न देणारे देशाचे माजी अर्थमंत्री,  ४२० टोळीचा मुकादम उर्फ चिदमंबरम यांना अटक झाली आहे. या लेखाचे शिर्षक पाहून आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न उठला असेल की जम्मू - काश्मीर संबंधीचे ३७० कलमाचा, भारतिय दंड संहिताच्या ४२० कलमाशी काय संबंध आहे ? कारण असे की गेल्या सत्तर वर्षात जम्मू आणि काश्मीर राज्यात असलेल्या ३७० कलमाच्या आडोशाने काश्मीर मधील स्थानिक पक्षांच्या नेत्यांनी इतकी माया जमविली आहे की, हळूहळू भारतीय दंड संहितेचे ४२० कलम त्यांच्या गळ्याभोवती पाश आवळलेले दिसू लागेल. पी सी चिदमंबरमच्या अटकेने सुरूवात झालेली आहे. 

कलम ३७० हटविल्याच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट करताना, काॅग्रेस व काॅग्रेसचे मित्र पक्ष तसेच त्या पक्षांचे चमचे पत्रकार, संपादक, राजकीय अभ्यासक, पुरागामी विचारवंत व गल्लीबोळातले कार्यकर्ते म्हणत आहेत की ' देशाच्या आर्थिक आघाडीवर झालेल्या पिछाडीवरून जनतेचे लक्ष दूर नेण्यासाठी जम्मू आणि काश्मीर राज्यात असलेले ३७० कलम हटविण्याचा निर्णय घेतला आहे.' आता पी चिदमबरांना अटक झाल्यानंतर काॅग्रेसची प्रतिक्रीया Political Vendetta अशीच राहीली आहे. ३७० कलम हटविण्याचा व चिदमबरांना अटक करण्याचा निर्णय ह्यात मोदी सरकारचे राजकारण आहे अशी बोंब विरोधी पक्ष मारत आहेत. मी म्हणतो, हो ह्या निर्णयात राजकारण आहेच, पण ते योग्य वेळी खेळले गेले आहे. कारण ३७० कलम वाजवीपेक्षा अधिक काळ टिकले आणि त्याचे दुष्परीणाम देशाला भोगावे लागले अशी भावना जनमानसात झाली होती. तसेच २००४ ते २००९ ह्या काळात जो भ्राष्टाचार माजला त्याचे मूळ सुत्रधार श्री चिदमंबरम आहेत अशी चर्चा झालेली दिसली आहे. त्यामूळे मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयात राजकारण आहे, असे म्हणण्याऐवजी हे निर्णय राजकीय स्वरूपाचे आहेत असे म्हणणे अधिक संयुक्तीक वाटते.  विरोधी पक्षांना मला विचारावेसे वाटते, ' तुमच्यात दम होता तर तुम्ही  काश्मीरी नेत्यांची दाढी कुरवळीत का बसलात ?' देशाच्या अर्थकरणाचा गाडा चालविताना महसूल कसा वाढवता येईल, ह्याचा विचार सरकारला करावा लागतो, तसेच महसूलाचा विनियोग कूठल्या कारणांसाठी होतो, कुठे अनाठीयी खर्च होतो, कुठे भ्रष्टाचार झाला आहे हे सुद्धा पहावे लागते.  गेली सत्तर वर्षे ४२० गिरी करणार्यांची मोदी सरकारने आरती ओवाळयाला हवी होती  का ? अटकेपुर्वी पी सी चिदमंबरम २७ तास गुहेत का लपले होते ? पिनल कोड च्या ४२० कलमान्वयें अटक होईल म्हणून घाबरले होते का? चिदमबरम सारखा निगरगट्ट राजकारणी आपली अटक होऊ नये ह्यासाठी घाबरलेला असणें शक्य नाही. ते काॅग्रेसच्या नेत्यांसोबत खलबते करीत होते. असे खुद्द चिदमबरानीच म्हटले आहे. माझा अंदाज असा आहे की चिदमबरम ह्यांनी आपल्या २७ तासांच्या अज्ञातवासामध्यें  काॅग्रेसच्या हायकमांडा पासून ते वर्कींग कमेटीच्या सदस्यांना ब्लॅकमेल करण्यात घालविला असणार. म्हणून काॅग्रेस कार्यालयात हजेरी दाखवून चिदमबरांनी आपल्या २७ तासाचा अज्ञातवास संपविला. चिदमंबरम ह्यांना अटक करण्यासाठी सिबिआयच्या अधिकार्यांना चिदमंबराच्या घराच्या भिंतीवरून प्रवेश करावयास लागला ह्यात काय मोठा पराक्रम चिदमबरांनी दाखविला? काॅग्रसच्या काही मोजके  कार्यकर्ते धरणे करून बसलेले पाहीले, पण त्यात जान दिसली नाही. दिसणार तरी कशी ? पापाचे भागिदार कोणी नसतो. लालू यादवाचे काय झाले आहे ? मित्र पक्ष म्हणून वेळोवेळी काॅग्रेसचे केंद्रातील सरकार ज्यांनी वाचविले, त्या लालूकडे आज ढुंकूनही कोणी काॅग्रेसचा नेता पाहात नाही. तशीच अवस्था चिदंमबरांची होईल असे दिसते.

देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे, ह्या आरोपाला जनतेने भाजपाला सलग दोनदा केंद्रातल्या सत्तेवर बसवून उत्तर दिले आहे. ह्याचा अर्थ असा नव्हे की आर्थिक आघाडीवर सारं काही ठिक चालले आहे. देशातील जनतेने मोदींना दुसर्यांदा सत्तेवर बसविले आहे ते केवळ आश्वासनामूळे निवडून दिलेले नाही. काॅग्रेस व मित्र पक्षांचा कारभार इतका वाईट होता की जनतेला मोदी शिवाय पर्याय दिसलाच नाही. तसे पाहता सध्या जगातल्या प्रत्येक देशाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. समाजवादी अर्थरचनेचा स्विकार करून देशाचा बट्ट्याबोळ करून ठेवला होता तो काय भाजपाने करून ठेवला होता का ? आज देशाच्या प्रत्येक राज्यातील सहकार व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, महामंडळे, साखर कारखाने, औद्योगिक संस्थामधील कारभार राजकीय नेत्यांच्या सरजंमशाही वृत्तीमुळे दिवाळखोरीच्या  मार्गावर आहेत. उद्योग जगतातील काही खाजगी कंपन्यांचे सीइओ, एमडी इत्यादींचे वेतन व भत्ते वाजवी पेक्षा अधिक आहे.  अशा कंपन्यांना सार्वजनिक बँकातून घेतलेल्या कर्ज फेडीचे भानच राहीले नाही. आणि ज्यांच्या संगनमताने त्या उद्योगपतींना कर्ज दिले गेले असे शिर्षस्थ बँक अधिकारी व राजकीय नेत्यांना देशाची तिजोरी खाली होत आहे त्याचे सोयरसुतक राहीले नाही. या अवस्थेचं मूळ  मोदी सरकार सत्तेवर येण्यापुर्वीचे आहे. ह्या सत्याकडे दुर्लक्ष करून मोदी सरकारवर टिका करणारे स्वतःला अर्थतज्ञ समजून घेत असतील तर त्यांना अडवणार कोण ? सत्तेवरून काॅग्रेस पायउतार झाल्यामूळे अशा टिकाकारांचा आर्थिक लाभ नाहीसा झाला आहे. त्यातून त्यांना येणार्या नैराश्यातेन ते मोदी सरकारवर टिका करीत असतात. १९९१ साली तत्कालीन अर्थमंत्री डाॅ महनमोहन सिंगाना आर्थिक उदारीकरण स्विकारयला का व कसे भाग पडले ह्याची कारणे काॅग्रेसजनांनो तुम्हाला ठाऊक नाहीत का? बरं ज्यांनी डाॅ मनमोहनसिंगाना अर्थ खात्याचे मंत्री बनविले त्या पंतप्रधान नरसिंहरावांना श्रेय तुम्ही का दिले नाही? नंतर काॅग्रेसनेच डाॅ मनमोहनसिंगांना पंतप्रधान पदावर बसविले.  सत्तेवर असताना काॅग्रेसने डाॅ मनमोहनसिंगाचा मान किती राखला हे आपण पाहिले आहेच. डाॅ मनमोहनसिंगांच्या बाबतीत डाव्या पक्षांची भूमिका विचित्रच दिसली. पंतप्रधानपदी असताना डाव्यांनी मनमोहनसिंगाना  बरेच छळले होते. पण पंतप्रधानपदी मोदी विराजमान झाल्यानंतर डाव्या पक्षांनी डाॅ मनमोहनसिंगाचे कौतूक करावयास सुरवात केली. का ? तर म्हणे ते मोदीपेक्षा सालस होते. सालसपणा काय कामाचा? २००४ ते २०१४ पर्यंत अनेक आर्थिक घोटाळे झाले तेव्हा काय करीत होते हेच सालस पंतप्रधान डाॅ मनमोहन सिंग? अनेक प्रकल्प असे आहेत की ज्या संदर्भात देशातील वैज्ञानिकांनी ग्रिन सिग्नल देऊनही विरोध होत असल्यामूळे एक तर अर्धवट राहीले आहेत किंवा सुरू झालेलेच नाही. त्यामुळे त्यासाठी केली गेलेली गुंतवणूक, नियोजन खर्च डब्यात गेला आहे. सरकार दरबारातील निर्णय शक्तीला लकवा झाल्याचा अनुभव आपण घेतला आहे. देशाच्या पंतप्रधानपदी जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ असूनही उपीए २ च्या काळात देशाच्या इतिहासात कधी झाला नव्हता इतका भ्रष्ट्राचार झाला. त्याचे दुष्परीणाम आपण आता भोगत आहोत. म्हणून मोदी सरकारला भ्रष्टाचार संबंधीच्या केसेस वर कारवाई करण्याचे कार्य हाती घ्यावे लागले. आजच्या आर्थिक उदारीकरणाच्या युगात इतर विकसनशील, तसेच अविकासित देशात ही भष्ट्राचार झालेल्या घटना बाहेर पडत असल्याचे दिसत आहेत. भ्रष्ट्राचार केलेल्या नेत्यांची केवळ चौकशी सुरू होताच, राजकीय आकसापोटी ह्या चौकशी होत आहेत अशी ओरड करण्यात काय अर्थ आहे ? ज्यांची चौकशी सुरू झाली व सुरू होईल त्या नेत्यांचे हात स्वच्छ असतील तर घाबरून जाण्याचे काही कारण दिसत नाही. प्रशासनात झालेल्या भ्रष्ट्राचाराचा शोध घेऊन शिक्षा द्याव्याच लागतील.तरच आर्थिक गाडा रूळावर येऊ शकेल व भविष्यात भ्रष्ट्राचार करावयाचे धाडस कुठलाही नेता करणार नाही.

कुठल्याही देशाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी  प्रशासन पारदर्शक असणे ही बाब सर्वात महत्त्वाची  असते. गेली अनेक वर्षे आपल्या देशाचा कारभार दिल्लीस्थित ल्युन्टिन्स मंडळी तर्फेच चालविला जात होता. ह्या मंडळीला खान मार्केट लाॅबी असे ही ओळखले जाते. डावे म्हणून मिरविणारे विचारवंत, ईलेट्राॅनिक्स व प्रिन्ट मिडीयाचे मालक, संपादक मंडळी, विविध औद्योगिक संस्थांचे उच्च स्तरीय अधिकारी,  राजकीय नेते, नोकरशहा, सुप्रीम कोर्टातील वकील आणि दुर्दैवाने न्यायधिश मंडळी इत्यादींचा समावेश असलेल्यांच्या एका टोळीचे नाव  ल्यूटीन्स असे आहे. देशातील शाळा काॅलेज मध्ये इतिहास विषयाचा अभ्यासक्रम हीच मंडळी ठरवित असते. भगवा दशहतवादाचे खोटे रूप तयार करण्यात ह्या सर्वांचा हात आहे. भारत नावाचे राष्ट्र ह्या भूमीत अस्तित्वात कधी नव्हतेच, उलट इंग्रजांच्या राजवटीमूळे आपण प्रगत झालो असे इतिहासाद्वारें भासवून विद्यार्थी तयार करण्याच्या कारखान्याचे मालक सुध्दा हीच मंडळी होय. म्हणूनच ख्रिस्ती, व मुस्लीम धर्मगुरू राष्ट्रवाद्यांचा पराभव करा असे पत्रक काढण्याचे धाडस करू शकले आहेत. सरकार दरबारात काम करणार्या नोकरशाहीला हाताशी धरून देशाचा कारभार करणारी ही एक आंतरराष्ट्रीय टोळी आहे, तिचे भारतात एक ऑफीस आहे तिथेच ह्या ल्युटीन्स मंडळीची ऊठबैस असते. सरकारी अधिकार, भत्ते, निवासस्थाने पटकावून राजरोस सरकारच्या खजिनाची उधळपट्टी ह्याच मंडळीने केली आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था सतत दुसर्या देशाच्या विशेषतः इंधन, व शस्त्रात्रे विकणार्या देशावर अवलंबून ठेवण्यामागे ह्याच टोळीचा हात आहे. ' राजा कालस्य कारणम् ' म्हटले जाते ते काही चूक नव्हे.

आजही देशात प्रतिष्ठेच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी होत असते. ती थांबवून पैसा उत्पादन कार्यासाठी, वा रोजगार वाढविण्याच्या प्रकल्पात उपयोगात आणला तर हातून खरी समाजसेवा घडू शकते. अनेक मंगल व धार्मिक उत्सवात पाणी, ऊर्जा व इंधनाचा वारेमाप वापर होत आहे, तो थाबंवयास हवा. देशाचे राजकारण व अर्थकरण लोकानुनय विषयाभोवती सतत राहात आले आहे.  त्यामूळे महत्वाच्या बाबीवर सरकारचे नरम धोरण आर्थिक घसरणीला कारणीभूत ठरते. जनतेला फूकट गोष्टी देण्याची राजकीय पक्षांमध्ये होत असलेली स्पर्धा देशाच्या तिजोरीवर ताण आणत असते. आम्हां भारतीयांची दाग-दागिन्यात वाजवी पेक्षा अधिक होत जाणारी गुंतवणूक, आमच्या समाज व्यवस्थेत लुप्त झालेली काटकसर नावाचे मूल्य, विवाहासारख्या मंगल कार्यात दिसणारा बडेजाव त्यातून पाणी, ऊर्जा ची होणारी उधळपट्टी अन्नाची नासाडी इत्यादी अनेक छोटी-मोठी कारणें आहेत, ज्यातून देशाची अर्थव्यवस्थेला बाळसे धरण्यात अडथळे निर्माण होत आहेत. बेभरवशाचे पर्जन्यमान व देशाच्या काही भागात होत असलेले दुष्काळाचे दुष्टचक्र व अकाली कोसळणार्या गारगोटीमुळे पिकांचे होणारे नुकसान हे ही एक महत्वाचे कारण आहे. त्यातून जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा होऊन महागाई होत असते. मानवी हक्काचे कार्यकर्ते, सर्वधर्म समभावाचे खोटे झेंडे हातात घेऊन टिव्ही चॅनेलवर मिरविणारी तथाकथीत पुरोगामी मंडळी, काही विरोधी पक्ष जे सतत सर्वधर्म समभावाचा जप करीत असतात अशी ढोंगी पुरोगामी मंडळी  समान नागरी कायद्याला विरोध करीत आहेत. त्यामूळे मुस्लीमांची लोकसंख्या वाढत आहे. वाढती लोकसंख्या हे अर्थव्यवस्थेच्या गतीसाठी स्पीडब्रेकर ठरत आहे. काश्मीर खोर्यात दशहतवाद्यांच्या कारवायांमुळे, तेथील विकास कार्यासाठी खोर्याने दिलेला महसूल वाया गेला आहे. अर्बन व भूमीगत नक्षलवादी, जिहादच्या नावाखली पाक पुरस्कृत दशहतवादी, विविध जाती-जमातीच्या हक्कासाठी अंदोलन करणारी मंडळी, सतत सार्वजनीक मालमत्तेची नासधूस करीत असतात..अशा लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेवर अमाप खर्च होतो शिवाय नासधूस झालेल्या मालमत्ताच्या नुतनीकरणावरही खर्च होत असतो.  बँकांकडून उद्योगपतींना होणार्या कर्जपुरवठ्यातील त्रुटीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे बँकाच्या बुडीत कर्जात वाढ होत गेली. बहुतांश  ठिकाणी अनुउत्पादीक बाबीसाठी कर्ज पुरवठा झालेला दिसत आहे. या बाबतची माहिती आता सर्वसामान्यांकडे रोज येत असते. म्हणून राष्ट्रवादाची भूल देऊन मोदी पुन्हा सत्तेवर बसले आहेत असा आरोप विरोधी पक्षांची मंडळी करीत असली तरी त्याकडे मतदार फारसे लक्ष देत नाहीत. राष्ट्रवादाची कास धरणारा पक्षच राष्ट्र हितासाठी ठोस निर्णय घेऊ शकतो. देशाभोवती असणार्या अनेक प्रश्नांची वेळीच सोडवणूक केली गेली नाही. त्यामूळे त्या सार्या प्रश्नांचे रूपातंर गंभीर समस्यात होऊन बसले. त्याच समस्यांना मुळापासून उखडून टाकण्याचे कार्य भाजपा सरकार करीत आहे अशी भावना सर्वसामान्यात होत आहे. त्यामूळे काही प्रसारमाध्यमें सामान्यांचा बुध्दीभेद करीत असले तरी त्यांचा हेतू साध्य होताना दिसत नाही.

जम्मू आणि काश्मीर राज्याचे ३७० कलम हटविण्याचा निर्णय असो की आपीसीच्या ४२० कलमान्वयें पी चिदमबंरम ह्यांना झालेली अटक हे दोन्ही निर्णय प्रशासकीय व राजकीय स्वरूपाचे आहेत. हे निर्णय  राजकीय आकसापोटी घेतले आहेत असे विरोधी पक्ष म्हणत आहेत. विरोधी पक्षांच्या तशा प्रतिक्रीया येणे ते ही राजकारणच आहे. राजकारणातील घाण साफ केल्याशिवाय आपली अर्थव्यवस्था सुधारणार नाही. त्यासाठी कालावधी लागेल इतकं सामान्य ज्ञान जनतेला आहे व त्यासाठी ती थांबायला तयार आहे. असेच एकंदरीत ह्या दोन्ही निर्णयावर देशभर होणार्या चर्चेतून दिसत आहे.

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१९

जम्मू काश्मीर संबंधीत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

देशातील घाऊक पक्षांतराबाबतचा लेख पब्लीश करीत असतानाच जम्मू-काश्मीर संबंधीत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतल्याची बातमी न्यूज चॅनेल वर झळकली. ह्यातील लडाख हा विधीमंडळ नसलेला केंद्र शासित प्रदेश झाला आहे तर जम्मू-काश्मीर हा सुद्धा केंद्रशासीत प्रदेश राहील पण तिथे विधीमंडळ राहणार आहे. ह्या निर्णयामूळे जम्मू-काश्मीर ह्या राज्याला लागू असणारे कलम ३७० आणि ३५ अ आपोआप निकाली ठरले आहेत. या दोन कलमामूळे जम्मू -काश्मीर राज्यात अलगावादी आणि दशहतवादी सत्तेचे दलाल तर तेथील स्थानिक पक्ष राज्याचे सुलतान झालेले आपण पाहीले. देशभर काॅग्रेस पक्षाचे स्वरूप   'सत्तेतील वाटेकरींचा समूह ' जसे झाले तसेच जम्मू काश्मीर राज्यातील स्थानिक पक्षांचेही स्वरूप आपण पाहात आलो आहे. कारण सत्तेची नशा.

स्वातंत्र्यानंतर लागलीच पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला. तेव्हा काश्मीरच्या महाराजाने काश्मीर संस्थान भारतात विलिनी करणाच्या करारावर सही केली. मग भारताने काश्मीरला आपले लष्कर पाठविले. लष्कर पाठविण्यासाठी अंहिसेचा पुजारी, आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी ही संमती दिली होती. अशी माहीती भारताचे माजी परराष्ट्र सचीव श्री पार्थसारथी शर्मानीं एका चॅनेल वरील चर्चेत भाग घेताना दिल्याचे मला आठवते. आपले लष्कर पाक पुरस्कृत हल्ल्याला सडेतोड उत्तर देत काश्मीर मध्ये घुसले. लष्कर संपूर्ण काश्मीर वर आपले वर्चस्व प्रस्थापित करीत असताना देशाचे पहीले पंतप्रधान पंडीत नेहरूनीं काश्मीर प्रश्न युनोत नेला व युद्ध थांबले. त्यामूळे एक तृतीयांश काश्मीरचा भाग आजही पाकीस्तानाकडे राहिला. ज्याला आपण पाक व्याप्त काश्मीर (POK) म्हणतो. तोच भाग पाकिस्तानने दशहतवाद्यांचा अड्डा बनविला व आपली कायमची डोकेदुखी ठरली. पण दोन तृतीयांश भाग जो स्वतंत्र भारताच्या हाती आहे, तिथेही आपले हक्क गहाण ठेवल्यासारखी स्थिती झाली. ३७० कलमन्वाये व नंतर ३५ अ ह्या कलमान्वये जम्मू काश्मीर हे राज्य भारताच्या इतर राज्याहून भिन्न राहीले. ही कलम तशी तात्पुरता होती. पण ह्याच कलमाच्या आधारे काश्मीर खोर्यातील मुस्लीम नेते काश्मीर ही आपली जहागिरी समजून राजेशाही सारखे ऐषारामी जीवन जगू लागले. सामान्य काश्मीरी जनता आजही मागासलेली राहीली. लोकसंख्याच्या आधारावर मुस्लीम बांधवांनी पाकिस्तान मिळविले. हिंदूच्या कत्तली करून, जे वाचले त्यांना फाटक्या वस्त्रात, तर महीलांच्या अब्रू लुटून निर्वासित करून भारतात पाठविले आणि येथून मुस्लीम बांधव जे स्वखुषीने गेले ते सन्मानाने पाठविले. वर आपण ५१ कोटी रूपये पाकला दिले. हा इतिहास वाचताना, लिहीताना ज्ञानपीठ विजेते वि स खांडेकर ह्यांनी एके ठिकाणी काय म्हणाले होते ते इथे मांडावेसे वाटते. " व्यक्ती व्यक्तींशी जितक्या सहृदयतेने वागते, तितका सदभाव एका धर्माचा, एका राष्ट्राचा किंवा एका वर्गाचा घटक या नात्याने दुसर्या धर्मातल्या, राष्ट्रातल्या अथवा वर्गातल्या घटकांशी व्यवहार करताना ती प्रगट करू शकत नाही. व्यक्तीमनात कविमनाचा थोडाफार अंश असू शकतो. पण समुदायाचे मन हे मुख्यतः टीकाकाराचे मन असते. समूहाचे प्रेम जागृत करणे हे मोठे अवघड काम आहे, पण त्याच्या द्वेषाला किंवा सूडबंध्दीला सहज आवाहन करता येते, अहिंसा हे सुसंस्कृत मानवी जीवनातले एक महत्त्वाचे मूल्य असले तरी व्यक्तीमन व समाजमन यांतल्या अंतराकडे दुर्लक्ष करून त्याचा पुरस्कार करणार्याच्या वाटेला शेवटी अपयश आल्यावाचून राहात नाही. " शेवटी पाकिस्तानात लोकशाही रूजली नाही, तिथे कधी लष्करशाही येईल याचा नेम नसतो. तिथे नेहमीच उमरावांचेच राज्य राहीले आहे. तिथे सामान्य जनता भिकेला लागलेली आहे. दुसर्या बाजूला काश्मीर धगधगते राहिले. इथल्या काही मुस्लीम बाहूल भागात पाकिस्थान जिंदाबाद करीत पाकचा ध्वज हातात घेतलेले युवक पाहिले, इसिस , लष्कर, तत्सम दशहतवादी संघटनात सामील झालेले युवक ही दिसले.  द्विराष्ट्राच्या सिध्दांताचे दुहेरी अपयश आपल्या हाती आले. भारत लोकशाहीवादी देश आहे. इथे सर्वसामान्यांचे राज्य हवे की अशीच सुलतानशाही असावी ह्या प्रश्नांचा विचार काॅग्रेसने कधी केला नाही. भारतातील इतर प्रदेशात लोकशाहीच्या मार्गाने हळूहळू भाजपाचे वर्चस्व वाढत गेले. भारत बदलत आहे असे म्हटले जाते ते ह्याच बाबी मूळे.

आता आपण म्हणाल, काश्मीरमध्ये विधानसभा होतीच की ! मग तेथे सुलतानशाहीच्या विरूद्ध मतें देऊन भाजपाची सत्ता का येत नाही? ह्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की जम्मू, काश्मीर व लडाख अशा तीन विभागाचे हे राज्य. जम्मू व लडाख या विभागांचे क्षेत्रफळ ही मोठे, लोकसंख्या ही अधिक आहे, असे असूनही त्या राज्याच्या विधानसभेतील लोकप्रतिनिधींची संख्या जम्मू व लडाख साठी कमी ठेवून काश्मीर खोर्यातील जनतेसाठी अधिक जागा ठेवल्या गेल्या, का व कुणामूळे ? त्याचे उत्तर म्हणजे हेच ते ३७० कलम. एकाच राज्यात दोन विभागातील लोकावर अन्याय होत असेल तर आपण लोकशाहीचा जप का करतोय ? ३७० कलम व ३५अ कलम ह्याबाबत सोशल मिडीयावर भरपूर माहीती आलेली आहे त्या संबंधी अधिक माहीती देण्याची आवशक्यता नाही. मी जो मुद्दा मांडतोय तो लोकशाही मुल्यें व जनसामान्यांच्या भावनेशी निगडीत आहे. आजही भारताततल्या बहतांश नागरिकांना संपूर्ण जम्मू-काश्मीर राज्य हे मुस्लीमबाहूल आहे असे वाटत आले आहे. का तर जेव्हा बघावं तेव्हा वर्तमानपत्रात व न्यूज चॅनेलवर काश्मीर खोर्यातील वार्ता व फोटो आणि त्या पण कुठल्या तर आज दशहतवाद्यांनी अमक्या ठिकाणी हल्ला केला, निष्पाप नागरिक मेले, आपले जवान शहिद झाले या पलिकडे दुसरे काहीच नाही. दशहतवाद्यांना मदत करणारे आपले मुस्लीम बांधव आपल्या सेनादलाकडे शरण आले, अशी बातमी ना ऐकावयास मिळाली, ना वाचावयास मिळाली ! त्यामूळे काश्मीर जणू मुस्लीमबाहूल राज्य आहे, असेच भारतीयांना वाटत आले आहे. तिथे कधीही हिंदू बांधव मुख्यमंत्री झालेला दिसला नाही. एकाच आई च्या तीन मुलांपैकी दोन मुलांना सापत्न वागणूक दिली गेल्यामूळे ज्याचे लाड केले गेले त्याचीच नांतवडे, मुख्यमंत्री होणार ना ! हिंदू बांधव मुख्यमंत्री झाला नाही आणि कधीही होऊ शकणार नव्हता. प्रश्न हिंदू मुख्यमंत्री होण्याचा नाही. ह्याहून खरा व मोठा प्रश्न म्हणजे काश्मीर खोर्यीतील नेत्यांनी इतकी वर्षे सत्ता उपभोगून राज्यातील जनतेला काय दिले आहे ? काश्मीर खोर्यातील युवकांची माथी भडकावून त्यांना पोलीसावर, जवानांवर दगड मारण्यासाठी वापरले. ना शिक्षणाची सोय ना रूग्णालयाची सोय, ना रोजगार ! काश्मीर खोरेच जणू पाक पुरस्कृत दशहतवाद्यांना आदंण दिले असेच वाटत राहिले. जम्मू - काश्मीर राज्य हे शेख अब्दूल्ला, मुप्ती मोहमंद, सोझ, लोन, हूरीयत, इत्यादी घराण्याची मालमत्ता होऊन बसली. कोणाच्या जोरावर ? ३७० कलमाच्या, ३५अ कलमाच्या, पाक पुरस्कृत दशहतवाद्यांच्या ! असे होत असूनही जम्मू काश्मीर राज्यासाठी केंद्र सरकार निधी देते ते कोणाच्या खिशातून ? देशातल्या सर्व नागरिकांच्या आयकरातून जमा केलेल्या रकमेतूनच की ! मौज कोण करणार तर शेख अब्दूल्ला , मुप्ती मोहमंद, सोझ, हुरियत इत्यादींचे कुटूंबिय ! किती वर्षे ह्या घराण्यांची मौज चालणार ? इथे हिंदू-मुस्लीम भेद करण्याचा प्रश्नच नाही. लोकशाहीत प्रत्येक राज्यात संविधानाने दिलेले हक्क आणि सवलती राज्यातील जनतेला मिळायला हव्यात. तिथे विभागीय भेद नसावा, जाती भेद नसावा. तसेच देशातील प्रत्येक राज्याचा कारभार भारतीय संविधाननुसार चालावा त्यातही राज्या-राज्यात भेदभाव नसावा, इतका साधा हा लोकशाहीचा अर्थ आहे. त्यामूळे जम्मू-काश्मीर राज्यासंबंधी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा लोकशाही राज्यप्रणालीच्या मूलभूत तत्वाशी सुसंगत आहे. ह्या बाबत दुमत असू नये.

दुसरा प्रश्न असा आहे की भाजपा प्रणीत आघाडी सरकारला असा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? विरोधी पक्षांशी सल्ला मसलत करण्याची गरज होती का? भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात जम्मू काश्मीर मधील ३७० वे कलम तसेच ३५ अ कलम काढून टाकण्याचे वचन दिले होते. जनतेला फसवून हा निर्णय घेतलेला नाही. भाजपाला पुन्हा केंद्रातली सत्ता जनतेने दिली त्यात ह्या वचनाचा ही वाटा होताच. त्यामूळे पंडीत जवाहरलाल नेहरूनीं काश्मीर प्रश्न आतंरराष्ट्रीय समुदायाकडे सोपविला होता तो आपोआप निकाली निघाला. केद्र सरकारच्या ह्या निर्णयाबाबत जगभरातील कुठल्याही देशाला हस्तक्षेप करता येणार नाही. कारण हा निर्णय लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकार आणि राष्ट्रपती महोदयातर्फे घेतलेला आहे. विरोधी पक्षांशी फक्त आंतरराष्ट्रीय बाबी संबंधीत सल्ला-मसलत घेण्याची प्रथा आहे, ती ही फक्त प्रथा, कायदेशीर दायित्व वा बंधन नव्हे. आजच्या विरोधी पक्षांचे वर्तन पाहता त्यांना अंधारात ठेवून हा निर्णय घेण्याचे टाळले असावे. तसे पाहता स्वातंत्र्यानंतर लागलीच पाकिस्तानने आक्रमण केले होते आणि आपले लष्कर आगेकूच करीत असतांना पंतप्रधान पंडीत नेहरूनी काश्मीरचा प्रश्न यूनोत पाठविला तेव्हा विरोधी पक्षांशी सल्ला-मसलत केली होती का?  त्याहून या संबंधीं गुप्तता पाळण्याचे एक म्हत्त्वाचे कारण आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असावे असा अंदाज आहे. ते कारण मी ह्या लेखाच्या शेवटी देत आहे.

तिसरा महत्वाचा प्रश्न. काश्मीर कायमचे धगधगते राहीले आहे मग तिथे जनक्षोभ झाला तर काय करावे? जनक्षोभ केव्हा होतो आणि का होतो ? संविधाना नुसार केंद्र सरकारने निर्णय घेतला नसेल तेव्हा जनक्षोभ होतो. केंद्र सरकाच्या ह्या निर्णयाबाबत जनक्षोभ होईल असे दिसत नाही. काही हितशत्रूनीं तसा प्रयत्न केल्यास तो अनूचीत ठरेल. तसा प्रयत्न देशाविरूध्द बंड समजले जाईल. त्यावर सरकार कठोर उपाय करू शकते. श्रीलंकेच्या सरकारने एलटीटीच्या प्रभाकरन ने केलेल्या बंडाचा निप्पात केला की नाही? काटेरी झुडपांना कलम करता येत नाही, ३७० व ३५ अ ही काटेरी झुडपांना केलेली कलमं होती. त्यांचा झुडपा सकट नायनाट होणे गरजेचं होते. बाकी सरकारने आश्वासनांची पूर्ती केली नसेल, किंवा एखाद्या निर्णयाने व्यवस्थेत गोंधळ झाला तर जो जनक्षोभ होतो, तो समर्थनीय ठरतो व त्यासाठी जनतेला शांततापूर्ण आंदोलनाचा मार्ग खूला असतो. शिवाय पुढील निवडणूकीत ह्या सरकारचा पराभव करण्याचे हत्यार जनतेपाशी असतेच.

चौथा प्रश्न देशातील अल्पसंख्याकाच्या भावना दुखावतील का? हा प्रश्न काल्पनिक आहे. कारण अल्पसंख्याक ह्या देशात जितके सुखी आहेत तितके जगाच्या पाठीवर कुठेच नाही. आणि अल्पसंख्याक तरी कोणाला समजावे ? संविधाननुसार किती टक्के लोकसंख्या असावी म्हणजे त्याला अल्पसंख्याक म्हणून मान्यता मिळते ह्याचे उत्तर ज्यांना माहीत आहे, त्यांनी हा प्रश्न उपस्थित करू नये. संविधानात एखाद्या समाजाला अल्पसंख्याक मानण्यासाठी निर्धारीत लोकसंख्याचे जे प्रमाण आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक लोकसंख्या मुस्लीम बांधवाची ह्या देशात आहे.  काश्मीरमध्ये जे समाज अल्पसंख्याक आहेत त्याबाबत इतकी वर्षे अन्याय झाला आहे त्याचा कैवार घेण्यासाठी विरोधी पक्ष पुढे आले होते का  ? काश्मीरी पंडीत निर्वासितासारखे इतर राज्यात स्थिर झाले. विरोधी पक्षांचा पराभव ज्या कारणांमूळे झाला त्याबाबत ते पुन्हा पुन्हा आपला आग्रह मांडत राहीले तर त्यांची राजकीय दृष्ट्या दिवाळखोरी झाली आहे असेच मतदार मानतील. विरोधी पक्षांना मिळेलेली मतें तरी आपल्या पेटीत यावी असे वाटत असेल तर त्यांनी ह्याबाबत उगीच प्रश्न निर्माण न करणे हे राजकीय शहाणपणाचे ठरेल.

पाचवा प्रश्न आंतराष्ट्रीय समूदाय काय म्हणेल? मी अनेकवेळा मांडत आलो आहे की विसाव्या शतकाच्या पुर्वार्धात जगभरात उदयास आलेली राष्ट्रवादाची कल्पना संपणारं नाही. आपल्या देशातील महापुरोगामी विचारवंत राष्ट्रवादाला व्यसन मानून आक्रमक राष्ट्रवाद म्हणत हिणवतात पण त्याला आधार काही नाही. त्यांच्या वैयक्तीक जीवनातील ऐषरामी सोयीसवलतीचा प्रश्न असतो. असे ऐकीवात आहे, की अमेरिका इराणला जेरीस आणण्याच्या तयारीत आहे. इजरायल व सौदी अरेबियाची अमेरिकेला साथ आहे. इजरायलच्या चारी बाजूने अरेबियन देशाचा विळखा आहे त्यामूळे इजरायला अरेबियन राज्ये आपआपसात भांडत असतील तर ते हवेच. एक दुसर्याचे भांडण लाभ तिसर्याचा हा व्यवहारीक दृष्टीकोन इजरायलचा असू शकतो. सौदी अरेबियाला इराण सुफी पंथीय मुस्लीमाचा देश असल्यामूळे तो सामर्थ्यवान बनू नये ही तगडी इच्छा. ह्या त्रिकूटाला इराणला जेरीस आणण्यासाठी पाकिस्तानच्या भूमीची तसेच तालीबानची ताकद हवी आहे. त्याबदल्यात अमेरिका काश्मीर प्रश्नात त्रयस्त पक्षाची मदत भारत-पाकने घ्यावी असा प्रस्ताव ठेवणार आहे. पाकिस्तानची तयारी न असायला कारण काहीच नाही. Beggars do not have choice. ज्यांनी स्वातंत्र्यानंतर दास्यच स्विकारले आहे त्या देशाबद्दल आपल्या येथील विचारवंतांना पुळका असेल तर तो पुळका नसून ही विचारवंत मडळी व राजकीय पक्षांचे नेते दास्य वृत्तीचेच असावेत. आपण कितीही राजकीय रित्या विरोधात असलो तरी आपण एक आहोत ही भावना सदैव मनात ठेवणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण आपल्या घराच्या अंगणात चर्चेला आणता येणारा सोपा विषय नाही. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा, भाजपा, संघ ह्या संबंधी आपल्या मनात अडी असली तरी एक गोष्ट निश्चीतपणे स्विकारावी लागते ती म्हणजे जनमताचा कौल त्यांना मिळालेला आहे. आतापर्यंत आतंरराष्ट्रीय स्तरावरील राजकारणात आपल्या देशाला महत्वाचे स्थान ह्या मंडळीने मिळवून दिले आहे. काश्मीर संबंधी प्रश्न युनोत पुन्हा उभा करण्याची अमेरिकेची संभाव्य शक्यता जाणून तसा प्रयत्न अमेरिकेला करू द्यावयाची संधीच मिळू नये , ह्या हेतूने ३७० व ३५ अ ही कलमं गुप्तता पाळून तडकाफडकी रद्द करून टाकली असावीत. आता काश्मीर हा भारताचा केवळ वाचेने नव्हे तर कागदावर लेखी स्वरूपात अविभाज्य भाग झाला आहे. ह्या संबधीत कुठल्याही देशाला हस्ततक्षेप करण्याचा अधिकार युनो देऊ शकत नाही. राष्ट्रहिताच्या तसेच आतंरराष्ट्रीय पातळीवरील सामररिक दृष्ट्या संवेदनशील विषयासंबंधीचे निर्णय गुप्त रित्या घेणे हे आवश्यक असते. ते प्रत्येक देशाचे नैसर्गिक स्वातंत्र्य असते. देश स्वतंत्र राहीला तरच लोकशाही जिवंत राहते हे सामान्यज्ञान आहे.

ह्या निर्णयाने आतंरराष्ट्रीय समीकरणे बदलतील का असाही एक उपप्रश्न आहे. मी काही त्या विषयाबाबतचा तज्ञ नव्हे पण एकंदरीत जे वाटते ते असे आहे की आजही जगात साम्राज्यवादाची लालसा असणारे देश आहेत. प्रत्यक्षात युध्द आजच्या आर्थिक जगतात कोणाला ही परवडणारे नसले तरी सुध्दा आर्थिक दृष्ट्या महाशक्ती बनण्याचे स्वप्न कुठल्याही देशाला पडू शकते. म्हणून तर बडी राष्ट्रे शस्त्रात्रे विकण्याचा धंदा करीत आहेत. पण शस्त्रात्रे बनविण्याचे कसब इतर मित्र देश जे दुबळे आहेत त्यांना देतील का ? नाही. आपला देश शस्त्रात्रे बनण्यात स्वावलंबी होणे किती गरजेचे आहे हे आपल्याला समजू लागले ह्याचे श्रेय भाजपाला द्यावे लागते. विश्वशांतीच्या स्वप्नाळू अवस्थेतून आपण जागे झालो ह्याबाबतचे श्रेय माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनाही निश्चीत जाते. भाजपा व संघानेही इंदिरा गांधीच्या काही निर्णयाचे कौतूक केले आहे. म्हणून भाजपा सरकारच्या काही निर्णयाबाबत भाजपाला श्रेय देण्याचे औदार्य विरोधी पक्षांनी दाखवयास हवे. इराणला जेरीस आणण्याच्या प्रयत्नात इजरायल व सौदी अरेबिया अमेरिकेच्या सोबत असले तरी भारताशी असलेले संबंध ते मोडणार नाहीत. त्या त्रिकूटातही एकवाक्यता असेलच असेही नाही. अमेरिका भारताच्या विरोधी गेली तर युरोप, रशिया, जपान आस्ट्रेलिया, इराण आपल्या सोबत राहतील. इजरायल सुध्दा काश्मीर प्रश्नात भारतासोबत राहील. चीनला आजच्या घडीला पाकिस्तानात केलेली गुंतवणूकीची काळजी आहे. तिथे अस्थिरता निर्माण होणे चीनलाच जाचक ठरू शकते. फार तर आपल्या गुतूंवणूकीचे नुकसान होऊ नये इतपर्यंत चीन कार्यरत होईल बाकी बाबतीत चीन तटस्थ राहील.

शेवटचा प्रश्न आपल्या देशात ह्या संबंधीच्या प्रतिक्रीया कशा असतील ? देशभरातून सामान्यजनांकडून सरकार वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संघ परिवार सरकारच्या साहसाचे कौतूक निश्चीत करेल पण संयम बाळगा असा सल्ला ही देणार. आणिबाणी नंतरच्या निवडणूकीत काॅग्रेसचा पराभव झाल्यानंतर तत्कालीन सरसंघचालक पुजनीय बाळासाहेब देवरसांनी आणिबाणीतील कृत्याबाबत काॅग्रेसला क्षमा करा आणि देश हिताच्या कार्याला लागा असे जाहिररीत्या म्हटल्याचे मला आठवते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रहिताला प्राधान्य प्रथम देतो. काॅग्रेस सरकारने असा निर्णय घेतला असता तरी काॅग्रेसचे ही कौतूक केले असते. मला वाटतं पंतप्रधान मोदी ह्याबाबत देशाला उद्देशून भाषण देणार असतील तर ते ही संयम राखा असे आवाहन करीत जम्मू काश्मीर आणि लडाखच्या देशबांधवाचे राहणीमान उंचाविण्याचे आश्वासन देतील आणि त्या संबंधी विरोधकांचेही सहकार्य मागतील. विरोधकांनी आपल्याला विश्वासात घेतले नाही ह्याबाबत फार ताणून धरण्याची भाषा करू नये. सरकारचा हा निर्णय देशबांधवाच्या हिताचा समजून हा भाजपाने विजय मानू नये. आपण काही दुसर्या देशाचा प्रदेश जिंकलेला नाही हे सत्य जाणावे आणि ' सबका साथ सबका विकास, सबका विश्वास ' ह्या ध्येयाकडे लक्ष देत रहावे. ह्यातच सत्ताधारी पक्षाचे शहाणपण असते हे लक्षात ठेवले तर ते अधिक प्रशंसनीय ठरेल.

सोमवार, ५ ऑगस्ट, २०१९

घाऊक पक्षातंर व काॅग्रेस मुक्त भारत


अलिकडे देशात तसेच अनेक राज्यात काॅग्रेस व काॅग्रेसचे मित्र पक्षांचे नेते पक्षांतर करीत भाजपात प्रवेश करीत आहेत. त्यावर प्रिन्ट, ईलेक्ट्रानिक्स तसेच सोशल मिडीयावर चर्चा होत आहे. ह्या तिन्ही प्रकारच्या मिडीयात राजकीय अभ्यासक, संपादक मंडळी, व विविध पक्षांचे नेते मंडळी व कार्यकर्ते आपआपल्या परिने सोयीस्कर अर्थ काढून वक्तव्यें करीत आहेत. हे स्वाभाविक असे मानले तरी त्यावर उपाय सुचविताना कोणी दिसत नाही. 

पंतप्रधान मोदींनी सोळाव्या लोकसभेच्या प्रचारात काॅग्रेस मुक्त भारत अशी घोषणा केली होती, त्यावेळी अनेक पुरोगामी संपादक मंडळी आणि राजकीय अभ्यासकांनी मोदींची खिल्ली उडविली होती. पंतप्रधान मोदींचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर अडीच वर्षेच पुर्ण झाली असतांना टिव्ही वरील चर्चेत मोदी सरकारवर टिका करताना जेष्ठ पत्रकार श्री प्रकाश बाळ ह्यांनी मोदींना उद्देशून म्हटले होते की, " काॅग्रेस मुक्त झालीं आहे ना, आपणास बहूमताने जनतेने सत्ता दिली आहे नां, मग करा की आश्वासने दिल्याप्रमाणे कामें ? " श्री प्रकाश बाळ ह्यांना भाजपाचे राज्यसभेत बहूमत नव्हते हे माहित होते तसेच इतकी वर्षे राजकीय अभ्यासक म्हणून समाजात वावरत असल्यामूळे त्यांना हे देखील ठाऊक होते की संसदेच्या दोन्ही सभागृहाची मान्यता मिळाली तरच बहूतांश बीलांच कायद्यात रूपांतर होते. मुद्दा हा की काॅग्रेस आणि मित्र पक्षांचा सतत पाठिराखा म्हणून वावरणारी संपादक व राजकीय अभ्यासक मंडळीं, भाजपेतर पक्षांच्या वर इतकी निष्ठा दाखवितात, की त्या पक्षांचे नेते ही त्या प्रमाणात आपल्या पक्षाशी निष्ठावान राहात नाहीत. बहूतांश पत्रकार, संपादक, व पुरोगीमी विचारवंतानी भाजपेतर पक्षावर अधिक निष्ठा दाखविण्याचा उतावेळपणा अनेक वेळा केला आहे आणि आज ही करीत आहेत. आज काॅग्रेस व त्याच्या मित्र पक्षातील नेते भाजपात जात असल्यामूळे ते तोंडघाशी पडले आहेत.

पक्षातंराचे जनकत्व तसे पाहता काॅग्रेसच्या नेत्या व माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीकडे जाते. इंदिरा गांधींच्या पश्चात सहानुभूतीच्या लाटेवर १९८४ साली झालेल्या निवडणूकीत काॅग्रेसला प्रचंड बहूमत मिळाले. पण त्यानंतर काॅग्रेसला आहोटी लागली व काॅग्रेसचे नेते आपल्या पक्षातून बाहेर पडू लागले. तेव्हा पक्षांतर रोखण्याचा उपाय करावा असे काॅग्रेसला वाटले व पक्षातंरा संबंधीचा कायदा काॅग्रेसने आणला. त्या कायद्यानुसार ज्या लोकप्रतिनिधीला पक्षांतर करावयाचे असेल त्याने/ तिने पक्षांतर केल्यानंतर संसद तसेच विधानसभा सदस्याचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी अशी अट वा तरदूत अस्तित्वात आली. म्हणजे पक्षातंर बंदीच्या कायद्याचे ही जनकत्व काॅग्रेसकडे जाते. पक्षात बंडाळी माजवून स्वतंत्र पक्ष, वा आघाडी निर्माण करणे किंवा दुसर्या पक्षात जाणे असे प्रकार व संख्या काॅग्रेस व काॅग्रेसच्या मित्र पक्षांत अधिक आहे. ह्याचे कारण साम्यवादी पक्ष वगळता इतर काॅग्रेस सकट सार्या विरोधी पक्षांची जातकूळी वा रचना " विभिन्न भागातील खानदानी प्रमुखांना एकत्र करून राज्यातील एका खानदानी घराण्याच्या किंवा केंद्र स्तरावरील एका खानदानी घराण्याच्या चरणी आपली निष्ठा वाहून सत्तेतील आपला वाटा घेणे " या अघोर सिध्दांतावर आधारलेली आहे. जगातल्या एकाही विद्यापिठात राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातील पक्षीय राजकारण प्रकरणात अशा प्रकारचा सिध्दांत नाही. राजकीय पक्षांचे असे घाऊक घराणेशाहीचे स्वरूप फक्त भारतात आढळते. त्यामूळे घाऊक पक्षांतराची लाट ही आपल्या देशात येणार ह्यात नवल ते कसले, आणि त्यावर भारतभर चर्चा तरी का हवी ? चर्चा हवी आहे पण ती  देशभरातील  राजकारणात काही खानदानी घराण्यांची मक्तेदारी झाली आहे त्यावर झाली तर ती आपल्या लोकशाहीला खरा अर्थ प्राप्त करून देईल असे वाटते.

देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या अकाली निधनानंतर इंदिरा गांधीच्या काळात काॅग्रेस फुटली व काॅग्रेसचा कारभार वर नमूद केलेल्या सिद्धांतानुसार सुरू झाला. तेव्हाच खर्या अर्थाने भारत काॅग्रेस मूक्त झाला आहे. आणखिन खोलात जाऊन विचार केला तर असे ही म्हणता येईल की जेव्हा महात्मा गांधीजींनी काॅग्रेस विसर्जीत करावयास सांगितली होती तेव्हाच भारत सच्च्य्या काॅग्रेसला मुकला. मला वाटतं हे सत्य सच्च्या गांधीवाद्यांनी मान्य करावयास हवे. त्याही अगोदरच्या काळात मागे जाऊन विचार केला तर आपल्याला दिसून येते की  लोकमान्य टिळकानंतर ब्रिटीश सरकारने आपली सत्ता अधिक काळ टिकावी म्हणून  काॅग्रेसची  जाज्वल्य राष्ट्रवादी (जहाल) गट व मवाळ गट अशी फाळणी केली. पुढे जहाल गटाला नामशेष केले. बहुतांश काॅग्रेसमधील जहाल नेत्यांना क्रान्तीचा मार्ग अवलंबावा लागला असे दिसते. लोकमान्य टिळकांच्या काळात काॅग्रेसचे हिंदू स्वरूप कोणालाच खटकत नव्हते म्हणून ' वंदे मातरम् वेद मंत्राहून वद्य असा मंत्र ' ठरला होता.  पुढे ब्रिटीश सरकारने हिंदू-मुस्लीम मध्ये भेद निर्माण करून सच्ची काॅग्रेस संपविलीच पण त्यासोबत अखंड हिंदूस्थानची फाळणी केली.  

इतर पक्षातील नेते भाजपात प्रवेश करीत आहेत ह्या मागे मोदी सरकार दबावाचे राजकारण खेळत आहे, विरोधी पक्षांच्या नेत्यांना भ्रष्ट्राचाराच्या केसेस मध्ये अडकाविण्याची धमकी देत आहे असे अनाठायी आरोप आज भाजपावर होत आहेत. खरं म्हणजे 'कर नाही त्याला डर का असावे ? ज्या महात्मा गांधीजींनी सत्यमेव जयते सोबत निर्भयतेचा उपदेश दिला त्याच काॅग्रेसची मंडळींना भ्रष्टचाराच्या खोट्या केसेला घाबरून पक्ष सोडून जाण्याची गरजच काय आहे ?  ह्या प्रश्नाचे उत्तर शरद पवार का देत नाहीत ?

काॅग्रेस व इतर पक्षांना नामशेष करण्याचा कट मोदी सरकार करीत आहे हा आरोप बिनबुडाचा आहे. काॅग्रेसचे मित्र पक्ष व देशातील प्रादेशिक पक्ष ही सारी मंडळी पुर्वी काॅग्रेसमध्येच होती. काॅग्रेसला सत्तेची चव स्वातंत्र्यपुर्वकाळातच लागली होती. लागली होती असे म्हणण्यापेक्षा ब्रिटीश सरकारने लावली होती, असे म्हणणे अधिक उचीत ठरेल. भारतीयांना प्रांतीय स्तरावर सत्तेत प्रतिनिधित्व ( काही अधिकार नसलेले सत्तेच्या शोभेचे बाहूले ) देण्याची पद्धत सुरू झाली त्यातून सत्तेत विविध समाजगट निर्माण झाले. म्हणून काॅग्रेसला राजकीय पक्ष म्हणण्यापेक्षा सत्तेतील वाटेकरी लोकांचा समूह असे म्हणावेसे वाटते. हा समूह गट प्रथम विविध पक्षात विभागला गेला. म्हणजे काॅग्रेसला कमजोर केलं ते काॅग्रेस मंडळीनीच. आता उरली सुरली खानदाने भाजपात जाऊ लागली आहे. स्वातंत्र्य पुर्व काळात मुस्लीम लिग हा पक्ष निर्माण झाला तो ब्रिटीश सरकारच्या फोडा व झोडा ह्या कूटील नीतीतून झाला. मुस्लीम लिगला गोंजारण्याचे तत्कालीन  काॅग्रेसच्या नेत्यांच्या प्रयत्नात काॅग्रेस मध्ये हिंदू हिताची चर्चा ही थांबली. लोकमान्य टिळकांच्या काळात काॅग्रेसचे धोरण राष्ट्रीय अस्मिताच्या सिध्दांताला अनुसरून होते. म्हणून शिवजयंती व गणेशोत्सव राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरे करण्यास सुरूवात झाली. लोकमान्य टिळकावर लखनौ करार केल्याबद्दल आरोप झाले. पण त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट सांगितले होते की, " मुस्लीमांना ह्याहून काहीही अधिक दिले जाणार नाही आणि मुस्लीमांनी राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष केले तर त्यावर काॅग्रेसने कठोर पावले उचलविण्यास कुचराई करू नये."  काॅग्रेस मध्ये हिंदू हित जपले जात नाही, ब्रिटीश सरकार फोडा व झोडा नीती सोडणार नाही असे दिसू लागल्याने टिळकांच्या महानिर्वाणानंतर काॅग्रेस मधील जहाल गटाला क्रान्तीचा मार्ग अवलंबवा लागला. त्यांचे नेतृत्व स्वातंत्र्यवीर सावरकार करीत होते. त्यातूनच हिंदू महसभा हा हिंदूत्ववादी पक्ष निर्माण झाला. दरम्यान मुस्लीम लिगची स्थापना झाली होतीच. रशियात कामगार वर्गांचा उठाव झाला व जगात साम्यवादा बद्दल आकर्षण वाढले. त्याचा परिणाम काही प्रमाणात देशातील युवकांना साम्यवादाबद्दल आकर्षण स्वातंत्र्य पूर्व काळातच निर्माण झाले होते. त्याच काळात काॅग्रेसचे क्रियाशील कार्यकर्ते पुजनीय डाॅ केशव बळीराम हेडगेवार ह्यांनी काॅग्रेसचे कार्य करण्याचे सोडून दिले. राजकारणाच्या माध्यमातून देशाच्या समस्या सुटणार नाहीत असे निदान काढून राष्ट्रीय बाण्याची हिंदुची एक संघटना  नागपूरला स्थापन केली, तिलाच आज वटवृक्षाचे स्वरूप झालेले पाहात आहोत. तिचेच नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. पुढे स्वातंत्र्यानंतर पंडीत नेहरूच्या मंत्रीमंडळातील मंत्री डाॅ शामाप्रसाद मुखर्जीनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन थेट नागपूरात संघाचे द्वितीय सरसंघचालक पुजनीय गोलवकर गुरूजींची नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी संघाच्या प्रचारकांची मागणी केली. तेव्हा गोलवलकर गुरूजींनी, अटलबिहारी वाजपेयी, पंडीत दिन दयाळ उपाध्याय, नानाजी देशमूख, कुशाभाऊ ठाकरे सारख्या प्रचाराकांना संघाच्या कार्यातून मूक्त केले, मग डाॅ शामा प्रसाद मुखर्जींनी १९५२ साली भारतीय जनसंघ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. तोच आताचा भाजपा आहे.  ढोबळ मानाने भारतात, स्वातंत्र्य पूर्व काळात काॅग्रेस, हिंदुत्व व साम्यवादी अशा तीन राजकीय विचारप्रणाली अस्तित्वात होत्या. मुस्लीम लीग पक्ष खरे म्हणजे स्वतंत्र भारतात फळ्यावर नावा पुरता पण राहू नये. कारण धर्माच्या नावाखाली पाकिस्तान निर्माण झाले. तरी सुद्धा मुस्लीम लीगचे दृष्कृत्यें विविध दशहतवाद्यांच्या गटातून सुरू आहेतच. हे ही एक महत्वाचे कारण आहे, ज्यामूळे  हिंदुत्व पक्ष म्हणजे भाजपाला आज सर्वाधिक पंसती मिळत आहे. त्यामूळे आज काॅग्रेस, काॅग्रेसचे मित्र पक्ष, साम्यवादी पक्षांची पडझड होत आहे. कदाचित भविष्यात प्रादेशिक पक्षांनी घराणेशाही सुरू ठेवली तर त्यांची अवस्था ह्या नामशेष होणार्या पक्षांसारखी होण्यास सुरूवात होईल. काॅग्रेसचा इतिहास व स्वातंत्र्या पुर्व काळात असलेले राजकीय प्रवाह ह्या संबंधीचा उहापोह ह्यासाठी केला कि त्यातून काॅग्रेसच्या पडझडी मागचे खरे कारण काय हे शोधता यावे.

राहता राहिला प्रश्न भाजपात सामील होणार्या काॅग्रेसी नेत्यांचे काय ? भाजपाचे स्वरूप काय राहील ? भाजपात काही प्रमाणापुरता काही काळापुरता काॅग्रेसी खानदानांची संसद व विधानसभा सदस्यासंबंधीत तिकीट वाटपा पूरता सोय होत राहील पण त्यांची काॅग्रेसमध्ये जशी सुभेदारी होती तशी राहणार नाही. कदाचित काॅग्रेसमधील आयारामांना भाजपात कोंडल्या सारखे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरा एक अंदाज असा आहे की काॅग्रेस खानदानातील युवकांनाही संघ आणि भाजपाच्या हिंदुत्वासंबंधी आकर्षण वाढलेले दिसत आहे.  काही समाजशास्त्रज्ञ, राजकीय अभ्यासक, भारत बदलतोय असे म्हणत आहेत. ह्यात पाश्चीमात्य तसेच पौर्वात्य विचारवंताचा ही सहभाग आहे. ह्याचा अर्थ हाच की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचा प्रभाव वाढला आहे. भारताततील राजकीय अभ्यासकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी, संघाची कार्यपध्दत, संघाचा वाढता प्रभाव ह्यासंबंधी उत्सुकता म्हणून नव्हे तर काळाची गरज म्हणून अभ्यास करणे आवश्यक आहे. गांधी हत्येपासून  झापडबंद स्टाईलने संघावर टिका करणे थांबविणे आवश्यक आहे.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व्याप्ती वाढती आहे, समाजमनावर संघाचा प्रभाव वाढत आहे ह्यात भारतीय समाज चुकत आहे असे मानून पुरोगामी विचारवंत, पत्रकार,  संपादक मंडळी संघाचा द्वेष करीत राहणार असेल तर त्यात ना संघाचे नुकसान होणार, ना भाजपाचे. जे काही नूकसान होत राहील ते विरोधी पक्षांचेच होईल. भाजपा हा संघ परिवाराचा एक सदस्य आहे. संघ राजकारण करीत नाही. तसे पाहता संघ संस्कारक्षम व्यक्ती निर्माण करण्याची एक शाळा आहे. आज प्रत्येक क्षेत्रात संघाचे विविध लोकपयोगी प्रकल्प आहेत. ते प्रकल्प , त्या आश्रमशाळा, ती रूग्णालये, त्या शाळा इत्यादी स्वयंसेवकांच्या पुढाकारने निर्माण झाल्या आहेत. संघ परिवारातील संस्थांची नुसती जंत्री द्यावयाची म्हटले तर एक मोठा अंक पुरा पडणार नाही.  सारं काही सरकार करेल अशा आशेत समाजबांधवांने राहू नये असे संघाचे मत आहे. बरं संघ स्वयंसेवक जी काही समाजसेवा करीत आहे ती ही पुर्णतः निरपेक्ष भावनेने करीत असतात. त्याग ही स्वार्थ भावने सारखी नैसर्गिक नसते. त्यागाची वृत्ती अंगी बाणावण्याचे प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी एक यंत्रणा तयार करावी लागते. संघाकडे तशी यंत्रणा आहे. तिचेच नाव शाखा आहे. ती शाखा कशी असते ह्याबाबतचा अनुभव न घेता संघावर टिका करणे चुकीचे आहे.  संघ स्वयंसेवक स्वतःहून सेवेचं व्रत घेतात. स्वयंसेवकांना संघ फक्त मार्गदर्शन करीत असतो. प्रत्येक स्वयंसेवकांला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात कार्य करण्याची मूभा असते. भाजपातील नेत्यांनी मागितले तरच संघ मार्गदर्शन करतो, अन्यथा नाही. संघाच्या शाखेवर शारिरीक कवायती होतात, त्या पाहून संघात हिटलरशाही आहे असा आरोप करणे हास्यास्पद आहे. बलोपसना ही आपल्या संस्कृतील एक अनोखे जीवनमूल्यं आहे. शाळेतही पीटीचा एक तास असतोच ना ! शाळेतल्या विद्यार्थ्यांनांही योग, लेझीम, शारिरीक कवायती करताना एक साथ सावधान अशा आज्ञा द्याव्या लागतातच की ! संघात हुकूमशाही सारखे आदेश नसतात. तिथे फक्त आज्ञा असतात हे जाणून जे घेत नाहीत त्यांना काॅग्रेस मूक्त भारत ह्या कल्पनेत दोष दिसत असेल तर तो त्यांच्या दृष्टीतला दोष आहे. संघाने कधी ' काॅग्रेस मुक्त भारत ' अशी कल्पना मांडलेली नाही. पंतप्रधान मोदींनी ही स्पष्ट केले आहे, की , " काॅग्रेस मुक्त भारत ह्याचा अर्थ असा आहे की,  काॅग्रेसमध्ये ज्या अनाठायी  कुप्रथा आहेत, दोष आहेत, ते सुधारावयास हवेत."  संघाचे एक विचारवंत म गो वैद्यांनी म्हटले आहे की, " काॅग्रेसने पक्षातील घराणेशाही संपावयास हवी आणि तातडीने नेतृत्व बदलावे." ह्याचा अर्थ नेहरू-गांधी घराणेशाहीतून काॅग्रेसची मुक्तता होणे गरजेचं आहे. एकाच घराण्याची काॅग्रेसवर मक्तेदारी हे काही काॅग्रेसचं मूळ स्वरूप नव्हे, तो काॅग्रेसमधील एक मोठा दोष आहे. काॅग्रेस पासून फुटून ज्यांनी पक्ष निर्माण केले, त्या पक्षांतही हा दोष आहे. हा दोष दूर करण्याचा सल्ला पुरोगामी संपादकांनी, विचारवंतानी भाजपेतर पक्षांना अग्रलेखा द्वारे करावयास हवा. संघ, भाजपा, मोदी ह्यांच्यावर टिका करण्यासाठी आपल्या अग्रलेखाची जागा वाया घालविणे बंद करावे. त्याऐवजी विरोधी पक्ष नेत्यांचे प्रबोधन करावयास हवे.

सारांशाने असे म्हणता येईल की,  काॅग्रेस मुक्त भारत ह्या संकल्पनेने कोणाचा संभ्रम होऊ नये, तसेच कोणी भिऊन जाऊ नये. कुठल्याही एका व्यक्तीचा, एका पक्षाचा, वा एका विचारसरणीचा मृत्यू झाला म्हणून देश चालणार कसा, असा प्रश्न पडण्याचे कारण नाही. वस्तुतः जे शाश्वत ते ही ईश्वर आणि जे नश्वर ते ही ईश्वरच. कारण नाश पावलेले दुसर्या रूपाने जन्मते. ' जे नाशे ते उपजे ' हेच सत्य. आज भाजपाची सरशी होत आहे, ती कायम  राहील असे ही नाही.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या स्थितीतही आपले कार्य जोमाने करीतच राहील. विरोधी पक्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील संघभावना जरी आत्मसात केली तरी त्यात त्यांचे भले आहे, तसेच देशाचे ही भले आहे, त्यातच  देशाचा विजय आहे. " संघौ शक्ती कलियुगे " हाच आजच्या युगाचा मंत्र आहे.  संघ व भाजपाला विरोध करणार्यांनी प्रथम आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे, आणि त्यात कमीपणा ही वाटून घेऊ नये. जो चूकतो तो माणूस आणि जो चूका मान्य करतो तो भला माणूस व चुका मान्य करून सुधारण्याचा प्रयत्न करतो तो सुसंस्कृत.

बुधवार, ३१ जुलै, २०१९

31जूलै - एक क्रांतीवीरके बलिदानकी अनोखी कथा

भारत एक प्राचीन देश है | हमारी संस्कृती भी सबसे प्राचीन है | दुनियाके मशहूर इतिहास तज्ञ विली ड्युरांट कहते है, " मनकी विशुध्दता, परिपक्वता और व्यापकता सिखनेका है तो, दुनियामें सिर्फ एक ही देश है, और वह है भारत ! " लार्ड कर्झन, डाॅ ॲनी बेंझट और अनेक पश्चीमी तथा पौर्वात्य नेता और विचारवंतोने भारतकी गुरूकुल व्यवस्था तथा संस्कृतीका गौरव किया है | भारतकी  एक असामान्य विशेषता यह थी और आजही कायम है, वह है, भारत शांतीप्रिय, सहिष्णू देश है और इसे किसी अन्य देशकी एक इंच भूमीकी भी लालच नही है | लेकीन मध्य युगके अंतिम चरणमें भारतकी अपार सहिष्णूताका अनैतिक लाभ विदेशी आक्रमकोंने लिया और भारतको एक हजार से अधिक वर्षतक गुलामी झेलनी पडी | ऐसा कहा जाता है की, 'युध्दमें जिता हुआ देश ही इतिहास लिखता है और पराजीत हुआ देशके वीरोंने किया हुआ पराक्रमकी गाथा को नजरअंदाज किया जाता है |' यही अनुभव अपने देशके अर्वाचीन (आधूनिक) इतिहास पढते है तो बार बार आता है | लेकीन सच यह है, की अनेक राजा-महाराजा, स्वातंत्र्यवीर, तथा क्रान्तीकारोंने देशके स्वतंत्रताके लिए संघर्ष किया है | किसीके हातमे सत्याग्रह और असहकार ऐसे शस्त्र थे तो किसीके हातमे समशेर तथा पिस्तोल जैसे शस्त्र थे | अपने समाजबांधवोंपर जिन ब्रिटीश अधिकारीयोंने अत्याचार किया, उनको कई क्रांतीकारकोंने चून चून करके रिव्हाॅल्वरसे मौतके घाट उतारा और भारत माता की जय करके फाँसी पर चढ गयें | उनमेसें एक अनोखा युवक क्रांतीकारका आज बलिदान दिन है | उसके साहस, पराक्रम तथा बलिदानकी यह कहानी है |

गरीब परिवारमे जन्म लिया एक बालक, अपनी उम्र तीन थी तब माताको खो बैठता है ; उम्र आठमे पिताको खो बैठता है ; वह बालक और उससे सिर्फ दो साल बडे भाईको एक संन्यासी उठाता है और अमृतसरके अनाथलयमे दाखिल करता है | अनाथालयमे दोनों भाईकी परवरीश अच्छी हो रही थी | पर एक दिन वह बालकमेसे बडा बालका भगवानको प्यारा हो जाता है | नियतीका खेल भी अजीब होता है |आपत्ती आयी तो चारों तरफसे आने लगती है | अब वह बालकके कोई रिश्तेतार जिवीत नही रहे थे | भगवान एक हातसे लेता है, तो दुसरे हातसे देता भी है, ऐसा ही कहा जाता है | अनाथोंका नाथ भगवान होता है | जल्दमे वह बालक जिंदगीका अर्थ समझता है | अनाथालयमें रहकर अनाथालयपर बोझ न बने इस भावनासे अनाथालयमें काम करना छुरू करता है | धिरे धिरे वह अनाथालयके व्यवस्थापनका एक आधार बन गया |

एक दिन उस अनाथालयके नजदिकी बागमे(वैसे तो बागसे ज्यादातर मैदान ही था) एक जनसभा हो जा रही थी | लोगोंकी भीड हुई थी | वह दिन बैसाखी उत्सवका भी था | इसिलीए वहाँ आम जनता भी अपने परिवारके साथ नजदिकके मंदिरमे भगवानका दर्शन लेकर बागमे इकठ्ठा होते रहे | जनसभा छुरू भी नही हुई थी | स्पुर्ती गायनका कार्यक्रम चल रहा था | वह युवक अनाथालयाके तरफसे लोगोंको पानी देनेका काम ऐसे इमानदारीसे कर रहा था की मानों सभी इकठ्ठा हो रहे समाजबांधव अनाथालयके अतिथी है | तब अकस्मात बागके चारों तरफसे फायरिंगकी आवाज आने लगी| लगभग सौ-सव्वासौ सिपाईके बंदूकसे एक ही सेंकद पर सौं से उपर गोलीयाँ बागमे बैठे जमावपर छूट रही थी | बच्चे-माता-बहने रो रहे, तो कोई पानी की पुकार करने लगे | तब नजदिकके अनाथालयका वह युवक बडी बालटी लेकर बागमे गया | पर वह पानी भी किसको दे ? चारों तरफसे गोलीयाँ बरसती थी | लोग इधर-उधर भागते अपनी जान बचानेकी कोशीश कर रहे थे | बागको सिर्फ एक गेट था, वहाॅसे भागनेकी कोशीश सभी कर रहे थे; वहाँ भी भिड हुई ; बडी अफरातफर मच गयी | सभामें तथा बैसाखी उत्सवमें शामील हुये जनसामान्योंको गोलीयोंसे कुचलना चालू था | बालबच्चे, माता-भगिनी, बुजूर्ग किसीको छोडा नही; लोग भागने लगे; पर रास्ता नही था ; कोई कुएमे कुद पडे, पर उनकी भी बचनेकी आकंक्षा नही थी | कोई अपराध नही, कोई चेतावनी नही, फिर भी तत्कालीन ब्रिटीश सरकार निष्पाप तथा निशस्त्र देशवासीयोंकीं बंदुकोंसे खुले आम कत्ल कर रही थी | अनाथालयके उस युवको भी गोली लगी | लेकीन हिम्मतसे जान बचानेकी कोशीश करता रहा, बाहें पाँवमेंसे खून बहता था , दाहें पाँवपर जोर लगाकर सभास्थानसे बाहर पडता है और दौडते दौडते बहूत दूरतक आता है | एक पेडके नीचे ठहरता है | जमीन पर बैठता है , हाथसे मिट्टी उठाता है , अपने ललाटपर तिलक लगाता है और प्रतिज्ञा करता है, ' मै इसका बदला लूंगा | मै जरूर बदला लूंगा | माँ मुझे साहस दे, माँ मुझे शक्ती दे, माँ अब मुझे आशिर्वाद दे |'

देवी और सज्जनों, उस युवकने देखा हुआ अमानुष नरसंहारका दृष्य कहाॅका था ? मैने बचपनमे जागृती नामका एक चित्रपट देखा था | उसमे कवी प्रदीपने रचा हुआ और खुदने गाया हूआ, गीतके स्वर,सूर धून आज भी कानोमे गूंजती है | उस गीतकी वह पंक्तीयाँ ऐसी है --

जालीनवाला बाग देखो  यहाँ चली थी गोलीयाँ,      ये मत पुछो किसने खेली यहाँ खूनकी होलीयाँ,    एक तरफ बंदूकोंकी दनदन एक तरफसे डोलीयाँ,  मरनेवाले बोल रहे थे इन्कलाबकी बोलियाँ |      यहाँ  लगा दी बहनोंने भी, बाजी अपनी जानकी, इस मिट्टीसे तिलक लगाओ धरती है बलिदानकी |      वन्दे मातरम्, वन्दे मातरम्, वन्दे मातरम् || 

देवी और सज्जनों यह घटना १३ एप्रील १९१९ की है | जो सभा स्थान पंजाब प्रांतके अमृतसर शहरका था | उस बागकी मालकी एक जली नामके सद्गृस्थी की थी | इसिलीए उस बाग की पहचान जलीयनवाला बाग हुई | बागको सिर्फ एक प्रवेशद्वार था और वह भी चौडाईमे बहुत कम याने लगभग चार फीटका होगा | बागके चारो तरफसे दस फीट के उचीं दिवारे थी | इससे ही हम अंदाज लगा सकते है की कितने अमानूष नरसंहार ब्रिटीश सरकारने किया था | लगभग पधरासौ से अधिक लोग जख्मी हुये, 331 प्रौढ तथा 41 बालककी मृत्यु हुई थी | दुनियासे हर कोनेंसे ब्रिटीश सरकारकी अलोचना हुई | यह घटना दुनियाके इतिहासके काले पन्नेपर लिखा गया था | वैसे तो अंग्रेजके ऐसे काले कारनामें दुनियाके हर कोनेंमे लिखे हुये है | खुदको सभ्य, न्यायी, सुसंस्कृत ऐसे विशेषतायें चिपकाकर हमारे देशबांधवोंका इस तरह अमानुषतासे संहार करेनेका अंग्रेज अधिकारीयोंको हक कहाँसे आया ? हक, साफ झूठ ! वह तो इंग्लडकी साम्राज्यवादी लालसाकी प्यास बुजानेकी जंगली मनिषा तथा पहले महायुद्धमें हुई जीतकी घमेंडी थी | हिम्मत इतनी थी तो अंग्रेज सरकार और अधिकारी  स्वराज हमारा जन्मसिद्ध हक है  ऐसी पुकार करनेवाले लोकमान्य तिलकजीसें इतने डरतें क्यों थे ? क्यों बार बार लोकमान्य तिलक, स्वातंत्र्यवीर सावरकर तथा अन्या भारतीय क्रान्ताकारोंको जबरन सजा देनेपर इतने उतावले होते थे? सच यह है की अंग्रेजको अपना 1857 का पहला स्वतंत्रताका संग्रामका इतना भय था की फिर कहीं इससे बडा तुफान भारतीयोंमे न आये, इसिलीए खुद अंग्रेज सरकारने 1885 राष्ट्रीय सभा (काॅग्रेसकी) स्थापना कियी | बादमें बस मिठी मिठी बातें मुहपर रखकर भारतीय समाजको विभाजीत करनेकी चाल छुरू कियी | 1857 का स्वतंत्रताका युद्ध हम हार गये लेकीन उस संग्रामसे और लोकमान्य तिलक, लाला लजपतराय, तथा बिपीनचंद्र पाल की जहाल भूमिकासे संस्कार और प्रेरणा लेकर भारी संख्योमे भारतीय वीरोंने अंग्रेज सरकारके खिलाफ सशस्त्र मुकाबला किया है | उनमे वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर बंधू, भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू, बटूकेश्वर दत्त, भगवानदासचरण वोहरा, मदनलाल डींग्रा ऐसे ज्ञात और कई अनेक अज्ञात क्रांतीकारकोओं ने अपना क्षात्रतेज, साहस और पराक्रमका परिचय दिखाकर अंग्रेज सरकरके नाकमे पानी लाया था | ऐसे क्रांतीकारकोंके बलिदान का स्मरण करना यह हमारा फर्ज है | देवी और सज्जनहो, जालीयानवाला बागके हत्याकांडको गये १३ एप्रिलको सौ साल पुरे हुये है | इसी हत्याकांडका बदला लेनेवाले भारत माताका एक सुपुत्र, युवक क्रातीकारक सन 1940 में आजके दिन ही फाँसीपर चढ गया था | उसके पराक्रमको अभिवादन करनेके लिए आजके जैसा उचीत दिन कौनसा हो सकता है ?

वह युवक का नाम है क्रान्तीवीर शहीदे आजम उधमसिंह | उसका जन्म २६ डिसेंबर १८९९ पंजाबके संग्रुर जिल्हाके सुनाम गावमे हुआ था | माता- पिता गरीब थे | एक बडा भाई था | नाम था साधूसिंग | उस दोनो अनाथ बालकोंको चंद्रसिंह नामके एक संन्यासीने उठाया और अमृतसरके अनाथालयमे दाखिल किया | बडे भाईका भी आधार टूट जानेके बाद उधमसिंहने अपनी हिम्मत नही खोयी और धिरे धिरे उसी अनाथालयकी सेवाको ही अपनी गृहस्थी मानी और अनाथालयका एक सच्चा कार्यकर्ता बन गया | जलीयनवाला बागमें अंग्रेज सरकारने अपने देशवासीयोंका किया हुआ संहारके प्रतिशोधकी आग उधमसिंहको चैनसे बैठनै नही देती थी | उसने अनाथालयमे वापस न जानेका फैसला लिया | रोटी और कपडाकी जरूरतके लिए मजदूरी करने लगा, साथमे रातको वाॅचमनकी नौकरी लियी | दिन-रात मेहनत करने लगा | वह पक्का जानता था कि खाली थैली खडी नही रहती है | अपार कष्ट करके पैसा जमाकर, उसने किरायापर एक गाला लिया | वस्तू भांडारका दूकान डाला | अब पैसेकी भी आवक बढी | आसपासके परिसरमे उसे आदर मिलना छुरू हुआ, अब हिम्मत बढी | जालीयनवाला बागके हत्यांकाडका प्रतिशोध की बात वह खुले आम करने लगा | प्रायव्हेट क्लासमे जाकर प्राथमिक शिक्षा भी पुरी कियी | अपने देशमे सिर्फ व्यापारके हेतूके लिये आये , अग्रेंजके एक हजार सैनिकके सामने अपना समाज प्लासीके युद्धमे हार गया, इस इतिहासको अब उधमसिंह अच्छी तरहसे  जान चूका था | समाजके सिर्फ एक वर्गको (क्षत्रिय) हत्यार रखनेकी प्रथा, अपने राजा-महाराजके ऐष वृत्ती और आपसमे वैर, जात-पातमे बटा हुआ समाज, प्रशासन, पोलीस और सेनादल मे अंग्रेजोकी चाकरी कर रहे अपने समाज बांधव, अंग्रेजकी संस्कृतीको अच्छा समझकर अपने संस्कृतीके बारेमे हीन भावना रखनेवाली नयी पिढी, पोलीसको क्रांतीकारकोकी गतीविधीयाँकी वार्ता देनेवाले जासूद भी अपनेही बांधव, जलीयानवाला बागमे नरसंहार करनेवाला पुलीस दलमें अपने ही लोग, यह सारी बातें उधमसिंहके मनको उद्विग्न करती रही |

उधमसिंहकी शिक्षा तो प्राथमिक स्तरके थी, पर कम उम्रमे नियतीके खिलाफ खेली हुई लम्बी लढाईसे मिला काफी अनुभवसे तथा व्यापारी बननेके बाद मिली हुई चतुराईसे उसे मालूम हुआ  की, उसपर भी पुलीसने नजर रखी है | अब उसने दुकानपर एक भरोंसेमंद नोकर रखा | दोपहरको खाना खानेके बहाने वह दुकानसे बाहर पडता था, पर मिलने जाता था क्रांतीकारोंको | राष्ट्रीय वाःडमय तथा वृत्तपत्रे पढना छुरू किया | छुपके, छुपके भगतसिंगसे भी मिलना छुरू हुआ | भगतसिंगके कहनेपर आफ्रिखा मे जानेकी योजना बनायी | अपना अच्छा खासा दुकान बेच दिया | दुकान और उससे मिलनेवाली आमदनीकी उधमसिंहको किधर आसक्ती थी ? उसने पैसा कमाया पर खुदको भौतिक सुख मिलानेके लिए थोडी कमायी थी ? इतना साधा और सामान्य ध्येय ऊधमसिंहका नही था | मनमे जलती हुई प्रतिशोधकी आग और उच्च प्रतीकी राष्ट्रभक्तीकी ज्योत के आधारपर उधमसिंहने फेक पासपोर्ट बनाया और आफ्रीखा चला गया | भारतीय क्रान्तीकारोंकी एक गदर नामकी संघटना थी जिससे उसने खुदको जोडा था | आफ्रिखामें जाकर भगतसिंगने जैसा कहा था वैसे ही गदर संघटनाके प्रमूखको मिला | दुनियाके सामरिक शक्ती तथा आर्थिक शक्तीके रूपमे उस समय इंग्लड एक सुपर पाॅवर थी | आफ्रिकामे जाकर गदर संघटनाके प्रमूखको छुपछुपकर मिलना यह एक तरह जीवन ही दाँवपे लगाना जैसा था | हर पलपर हर कदम पर मृत्युकी छाया पडती थी | लेकीन कहा जाता है ना, God help those who help themselves. आखिर भगतसिंगने जैसा बताया था, वहाॅसे शस्त्रात्रे लेकर उधमसिंह आफ्रीखासे वापस देशमे लौटकर आया ; लेकीन अपना नाम बदलकर ; अब वह बन गया था ' बाप्या ' |

देवीयों और सज्जनों , उधमसिंह आफ्रीकामे कैसा गया, गदर नामकी भारतीय क्रांतीकारकी संघटना कैसी थी, किसने बनायी थी, भारतीय क्रांतीकारकोंका नेटवर्क, इन सब बातोंकी जानकारी स्वातंत्र्यवीर सावरकरके 'स्पूट लेख ' नामके एक मराठी किताबमे रखी है, आप जरूर इसे पढे | दुनियाके सभी देशमे भारतीय क्रांतीकारोंका एक अच्छा खासा नेटवर्क था | इस इतिहासको हमें ना कभी पढाया गया, ना पढनेके लिए साहित्यकी उपलब्धी की गयी | इंग्लड एक सुपर पाॅवर थी, पर इंग्लडके साम्राज्यवादी नीतीयाँके विरोधमें कई देश थे | वैसे तो मानवके साम्राजवादकी लालच का इतिहास सदियों पुराना है | समय समयपर बडे देशके अंदर टकराव और सुपर पाॅवरकी स्पर्धा चलती रही है | इसिका फायदा लेकर भारतीय क्रांतीकारकोंने कई देशोंके प्रमुखओंसे रिश्ता बनाके रखा था | भारतीय स्वतंत्रताकी लढाई सिर्फ देशके भीतर अंग्रेजके खिलाफ राष्ट्रीय सभाके कार्यक्रम, आंदोलन, असहकार तक सिमीत नही थी | क्रांतीकारोंकी चतुराई, उनका साहस, पराक्रम, देशको आझाद करनेमे खासा अच्छा योगदान रहा है |

उधमसिंह आफ्रिखासे बाप्या नाम लेकर वापस तो आया पर पुलीसके जासूदने (जो भारतीय ही था) उधमसिंहकी गतीविधीयाँकी जानकारी सरकारके पास पहूँचायीं | ३० ऑगस्ट १९२७ मे बाप्या याने उधमसिंहको आखिर पुलीसने हिरासतमे लिया | उधमसिंहको पाच सालकी कारावास सजा हुई | पाच सालके बाद उधमसिंह जेलसे बाहर आया | देशके स्वतंत्रताके लिए संघर्ष करनेवाले और कारावासमे जाकर बाहर आये हुये उधमसिंह पर भारतीय समाज गर्व महसूस करने लगा | अब लोग उन्हे उधभसिंहजी ऐसे संबोधन करने लगे | जैसे ही उधमसिंहजी जेलसे वापस आये तो उन्हें पता चला की भगतसिंहको फाँसी दि गयी थी | इस बातसे उधमसिंहजींके क्रोधकी आग मस्तकमें गयी | लेकीन दिलमे राष्ट्रभक्तीकी ज्योत मस्तकको शीतल बनाती थी, और ध्येयपर अटल रहनेकी ताकद भी दे रही थी | उधमसिंहको जेलसे रिहा होनेके बाद एक दुसरे घटनाकी खबर मिली, वह थी, जलीयानवाला बागमे अपने समाजबांधव, माता- बहनों, बाल-बच्चोंका नरसंहार करनेवाले जनरल डायर मर चूका था |

जनरल डायरको आंतरराष्ट्रीय दबावके वजहसे अंग्रेज सरकारने सेवासे बरखास्त किया था | उसे ब्रिटनमें वापस बुलाया गया था | उसके कृत्यपर एक इन्क्वायरी समिती गठीत हुई | पर वह इन्क्वायरी समितीने जनरल डायरको बाइज्जत रिहा किया था | लेकीन जिस तरह जनरल डायरकी मौत हुई उसकी जानकारी मिलनेके बाद ' नियती की भी अपनी स्वतंत्र न्यायव्यवस्था है ' इस बात पर उधमसिंहजीका विश्वास हुआ | जनरल डायर अपने कर्मोंसे ही मर गया | गावमें जैसे ही निवृत्तीका जीवन बिताना छुरू करता है, जनरल डायरको एक के बाद एक बडी बिमारीयोंने पकड ही लिया | ऐसी बिमारीयाँ मानो जलीयानवाला बागके नरसंहारके दृष्कृत्यका नियती उससे हिसाब चूकाती
थी | बिमारियाँ भी इस तरह उसे त्रस्त करती रही जैसे वह नरक की जिंदगी जी रहा था | पहले जाॅन्डीसकी बीमारी, बादमे हार्टकी, उसके बाद पॅरालायझेस ! लगभग पाँच साल बिमारीसे परेशान होकर 10 जुलै 1926 मे वह अपने बहूसे बोला, " बहूँ ,अब प्रभू मुझपर दया करें तो अच्छा होगा, मैंने भारतके जालीयनवाला बागमे हत्याकांडका पाप किया, अब मुझे मेरा तिरस्कार हो रहा है, मैंने वह पाप किया अच्छा नही किया | " उस दिनसे तेरह दिनके बाद जनरल डायरने दम तोडा | जनरल डायरकी बिमारीयाँ और परेशानीवाली मौतकी वार्तासे उधमसिंहके मनको थोडीसी क्यों न हो  शान्ती मिली | वैसे तो उधमसिंहको जनरल डायरसे अधिक गुस्सा गव्हर्नर मायकेल ओडावायर पर ज्यादा था | क्यों की, उन्होंने जालियनवाला बागमे उपस्थित देशवासियोंपर गोलीयाँ उडानेका आदेश दिया था | उधमसिंहजीका पहला लक्ष्य मायकेल ओडवायरको ही उडानेका था | इसिलीए वह बेचैन था |

भगतसिंगके बलिदानके बाद ब्रिटीश सत्ताके हीट लिस्टपर अब उधमसिहंजी का नाम था | फिर वेष, नाम बदलकर उधमसिंहजीने देशसे पलायन किया और इजिप्त गये | अब वह गव्हर्नर ओडवायरको खत्म करनेकी प्रतिज्ञा करके ही देशके बाहर निकल पडे थे, और ओडवायरको खत्म करनेके बाद ही देशमे वापस जाना तय किया था | क्योंकी ओडवायर पर जालियानवाला बागके हत्याकांडका ना इल्जाम था, ना कोई उन्हे हत्यारा मानता था | ओडवायर रिटायर्ड होकर इंगलंडमे शौकसे जिंदगी गुजारता था | उधमसिंहजीने इजिप्तके बाद ॲबेसिनीया, रशिया, फ्रान्स, जर्मन ऐसे एक के बाद देशोमे स्थित भारतीय क्रांतीवीरोंओंसे सलाह-मशहुरा लेनेकी कवायत छुरू कियी | वैसे तो दुनियाके कई देश ऐसे थे जो इंग्लडके साम्राज्यको कमजोर करनेकी मनिषा रखते थे | और उसी देशमें भारतीय क्रान्तीवीरोंका नेटवर्क मजबूत था | १९३६ से१९३९ तक उधमसिंहजीने नाम बदलकर तीन बार युरोप का प्रवास किया था | जर्मन रेडीओ के अधिकारी अब्दूल रहिमान से मिले, रशियाके ताश्कंद, तथा जिनिव्हा निर्वासित देशभक्त सरदार अजितसिंगसे भी मिलकर आये थे | १९३७ मे ईस्ट लंडनके गरीब वस्तीके १५, आर्टीलरी पॅसेजमे एक ८० उमरके अजितसिंहके साथ रहने लगे | जिन देशोंमें जाकर उधमसिंहजीने सैनिकी अधिकारीयोंसे और भारतीय क्रांतीकारोंसे वार्तालाप किया था ,उन्हीसें बहूत नये ढंगके पिस्तूल भी लाये थे | लेकीन ८० उमरके अजितसिंह को भारी गुस्सा आया था लेकीन उसने उधमसिंहजीको अपना गुस्सा दिखाया नही | जब उधमसिंहजी कुछ कामके लिए बाहर गये थे, तो उसने उधमसिंहजीकी शस्त्रोंसे भरी हुई बॅगको टेम्स नदीमें फेंक दी और उधमसिंहजींको घर छोडनेको मजबूर किया |

फिर भी उधमसिंह विचलीत नही हुये | वह जगह उसने छोडी और दुसरे जगह रहने गये | वहाॅ महाराष्ट्रके पुने शहरसे प्रकाशित होनेवाले केसरीके वार्ताहार दत्तोपंत ताम्हणकरसे मिलना छुरू किया | कुछ दिनके बाद उधमसिंहजीने जिसको मारना था उस गव्हर्नसे भी दोस्ती की | कितना बडा साहस और कितनी बडी चलाखी ! जब जब उधमसिंहजी ओडवायरको मिलते थे, तब वह जरूर मनही मनमे बोलते रहे होगे, गव्हर्नर साहब, अब मैं तुम्हें खत्म करूंगा, तब  जमीन तुम्हारी होगी और सुरक्षा दल भी तुम्हारा होगा लेकीन इस बार पिस्तोल मेरा होगा और निशाना भी मेरा रहेगा | अब उधमसिंहजींने उँची कपडे परिधान करना छुरू किया | शिक्षा, पढाई करनेके उम्रमें नियतीद्वारा वंचीत रहे उधमसिंहजीने अबतक सफाईसे अंग्रेजी भी बोलना सिख लिया था | अपने ध्येयको साकार करनेके लिए उधमसिंहजींने अपने ध्येयको ही गुरू बनाया था | उधमसिंहजी हर रोज ओडवायरके घर चायपान करने लगे | ओडवायरने बातों बातोंमे जलीयानवाला बागके हत्यांकाडके समर्थनपर बातें भी कियी | ओडवायरको शक भी नही आया की वह उसके मौतके साथ दोस्ती करके बैठा था |

एक दिन ईस्ट इंडीया असोशियन ॲन्ड राॅयल एशिया सोसायटी द्वारा कॅक्सटन हाॅलमे एक सभाका आयोजन था | उस सभामें प्रमूख अतिथी लार्ड झेंटलंड और गव्हर्नर मायकल ओडवायर इन दोनोंको भाषण था | अब ओडवायरके खास दोस्त बने उधमसिंहजीको उस सभामे स्पेशल पास मिलना तो मामूली बात बनी थी | दिन था १३ मार्च १९४० | बस वही दिन मायकल ओडवायरका खात्मा करनेका उधमसिंहजीने अपना मन बनाया | दोपहरको ही उधमसिंहजीने एक नया सुट खरेदी किया, सिर पर फेल्ट हॅट, नया सुटमे रिव्हाल्वर, चार मॅगेझिनमें पचीस काडसूतें और यदि यह काममें न आये तो बडा चाकू पॅन्टमे डालके शामको चार बजे उधमसिंहजी उस कॅक्सटन हाॅलमे पहूचते है | मुख्य अतिथी लार्ड झेंटलंडका, लार्ड लॅमींग्टनके साथ सभागृहमे आगमन हुआ | तालीयोंसे उनका स्वागत हुआ और दोनो नेता मंचपर  बैठ गये | गव्हर्नर ओडवायर सभागृहके पहले रोके बाहे कोनेसे आखिर आसनपर बैठे थे | उधमसिंहजी ओडवायरसे थोडी दूरी पर थे | सभा छुरू हुई | सभा समाप्त हुई | लार्ड झेंटलंड, लार्ड लॅमींग्टन, मंचसे उतरे और पहले रो मे बैठें गव्हर्नर ओडवायरके पास आकर हस्तालांदोन करने लगे तब उधमसिह॔जीने पिस्तूल चलाया | एक के बाद एक ऐसे छ गोलीयाॅ ओडवायरपर चलायी | हाॅलमे अफरातफर हुई | श्रोता लोग हाॅलके बार निकलनेकी जल्दबाजी कर रहे थे | तब उधमसिंहके पिस्टोलसे निकली दो गोली गव्हर्नर ओडवायरके पीठमे घुसके सिधे बाहर निकली | वह जमीनपर गिरा और तात्काल नरकमे पहुच गया |  दो गोलीयाँ लार्ड झेंटलंडको लगी वे भी जमीनपर गिरे, एक गोलीसे लार्ड लॅमीन्गटनको और एक गोली  सर लूई डेनको लगी, दोनों एक हातसे अंपग बने | लार्ड झेटलंटको अस्पतालमे दाखिल कराया | क्या हो रहा है इस बातको, हाॅलसे बाहर निकलनेवाले श्रोताओंको समझनसे पहले उधमसिंहजी अपना काम पुरा करके हाॅलसे निकल पडे थे | सन 1909 मे स्वातंत्र्यवीर सावरकरके शिष्य मदनलाल डिंग्राजीने सर वायलीको जिस हाॅलमे मौतके घाट उतारा था, उसी हाॅलमे उधमसिंहजीने गव्हर्नर ओडवायरको खत्म करकर ब्रिटन जैसे महशक्तीको हिला दिया |

उधमसिंहजी हाॅलसे पर बाहर निकले और भागते रहे लेकीन चारों तरफसे पुलीसकी यंत्रणा काममे लगी थी |  आखिर वह गिरफ्तार हो गये | दुसरे दिन दुनियाभरमके सभी वृत्तपत्रमें उधमसिंहजीका साहस और पराक्रमकी वार्ता फ्रंट पेज पर छपी गयी | अमेरिकन लेखक अपने बर्लीन डायरीमे लिखते है की गांधीको छोडकर सभी हिंदी लोग ओडवायरका वध यह एक दैवी प्रतीशोध मानते होगे | '  जर्मन वृत्तपत्रने हेडलाईन दि ' हिंदी लोगोंपर अत्याचार करनेवाले नराधम सत्ताधीशका खात्मा |" 

बादमे इस घटनाका पुलीस पंचनामा तथा इन्क्वायरी हुई | सबूत एकठ्ठ होकर न्यायालयामे उधमसिहजीके खिलाफ दावा पेश हुआ और सुनावणी हो गयी | न्यायालयमने उधमसिंहजीको उनका निवेदन करनेको कहा तब उधमसिंहजीने न्यायालयमे कहा, " मै मौतसे कभी डर नही गया | जल्द ही मेरा फाँसीसे ब्याह होगा | इसका मुझे दुःख नही है , क्यों की मै मेरे मातृभूमीका एक सिपाई हूँ | ब्रिटीश सरकारने हमारे समाजबांधवोपर अमानुष अत्याचार किये है | अमृतसरमे जनरल डायरने निष्पाप बाल-बच्चे, माता-भगिनी, युवा बुजूर्गोंकी खुले आम कत्ल की है ,इसे मैंने मेरे आँखोंसे देखा है | जनरल डायरने गव्हर्नर ओडवायरके निर्देशसे यह हत्याकांड किया है | एकीस साल मेरे मनमे उस हत्याकांडसे प्रतिशोधकी आग लगी हुई थी | इसिलीए मैने ओडवायरका खात्मा किया | रौलट जैसे काला कानूनके खिलाफ आंदोलन करनेवालोंको उसने घसीटकर मारा, पिटा, जेलमें बंद करके खुले आम दशहत बिठानेकी कोशीश की थी | वह खूनका प्यासा था , एक शैतान था | इसी तरहसे उसको मौत आना जरूरी था | वह मेरा परम कर्तव्य था | यदि मै ओडवायरको खत्म न करता तो हिंदुस्थानपर एक दाग रह जाता | मेरे मातृभूमीके हितके लिए मुझे फाँसी होना इससे बडा आनंद किसमे मिल सकता है | "

न्यायालयने उधमसिंहजीपर लगे आरोपोंसंबंधी ब्रिटीश सरकारके तरफसे दिये हुये सबूतको स्विकार करके उधमसिंहजीको फाँसी की शिक्षा सुनाई | ' यह निर्णय सुनकर उधमसिंहजी थोडेसे भी विचलीत नही हुये | उल्टा उनके मुखपर एक समाधान की चमक दिखी | न्यायालयके निकाल के पुर्व उधमसिंहजीने 42 दिनका फास्टिंग किया था ' ऐसी जानकारी केसरी वृत्तपत्रके लंडनके वार्ताहार दत्तोपंत ताम्हाणेंने दियी | जहाँ मदनलाल डिंग्राजीको फाँसी दिया था उसी कारागृहमे उधमसिंहजीको 31 जूलै 1940 को फाँसी दिया गया | क्रान्तीवीर उधमसिंहजीको मेरे कोटी कोटी प्रणाम |

हर क्रान्तीकारके बलिदानके दिनपर हम उनके बलिदानका स्मरण करें तथा उनके जीवनगाथाका पारायण करे तो हमें सदाकाल प्रेरणा मिलती रहेगी, ऐसा विश्वास व्यक्त कर मै इस दिर्घ कथा-कथनको यहाँ विराम देता हूँ |

गुरुवार, २५ जुलै, २०१९

कर्नाटकातील सत्तेचा खेळ



परवा रात्री पर्यंत विश्वास दर्शक ठरावरील चर्चा सुरू राहिली.  शेवटी मतदान झाले, तेव्हा कर्नाटकातील काॅग्रेस-जेडीएसचे सरकार कोसळले हे दूरदर्शन वरून पाहीले. कर्नाटकात काॅग्रेस मागच्या दारातून पुन्हा सत्तेवर बसली होती तो भूतकाळ आठवला. वस्तूतः काॅग्रेसने जनादेश गमाविला होता. भाजपा सर्वात अधिक जागा जिकलेला पक्ष होता. त्याने सरकार बनविले पण काॅग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रीपद देऊन  सत्ता काबीज केली आणि सर्वात मोठा पक्ष भाजपा सत्तेच्या बाहेर फेकला गेला. जेडीएसला मुख्यमंत्री पदाची हाव होती, ती काॅग्रेसने पुरी केली. पण शेवटी काय झाले, सरकार पडले. त्यापेक्षा जेडीएसने भाजपा समवेत राहून आपल्या संख्याच्या प्रमाणात सत्ता वाटून घेतली असती तर आज ही वेळ आली नसती. पण शहाणपण नावाची अक्कल गौडा घराण्याकडे आहे कुठे? गौडा घराणे राजकारणात आहे, त्यांचे आपण सोडून देऊ, पण भाजपावर टिकेचा भडीमार करणार्या पुरोगामी संपादकांना अक्कल कधी येणार देव जाणो. आता ही ते या घटनेसंबंधी भाजपाला पाच वर्ष कसे झोडपता येईल अशीच कवायत करणार आहेत. 

काॅग्रेस व जेडीएसचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर  एकादाचं मोदी-शहा ह्या जोडीला जमीनीवर लोळवले, अशी शेखी मिरवित विरोधी पक्षांनी आनंद व्यक्त केला.  त्यांच्या सोबत त्यांचे मिडीयातले चमचे होतेच.  तातडीने कर्नाटकात देशभरातील सार्या विरोधी पक्षांनी भली मोठी जाहीर सभा घेतली. मंचावरून विरोधी पक्षांच्या शिर्षस्थ नेत्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून ते असे काही उंचाविले होते की त्यांना आकाश ठेंगणे वाटले असावे. त्यांचे जे एकीचे अभूतपुर्व दृश्य नजरेसमोर आले, त्या पाठीमागे चमचेगिरी करणार्या मिडीयाचे हात होतेच. काय ती मोठी रॅली अहाहा ! काय ती मोठी नैतिकाता ! काय तो रूबाब! काय ते जनतेला भावलेले विरोधी पक्षांच्या ऐक्याचे  विलोभनीय दर्शन ! सार्या विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनांही हत्तीचे बळ आले होते. सोशल मिडीयावरून भाजपा कार्यकर्त्यांचे असे काही खच्चीकरण करीत होते, की त्यांच्या नेत्यांपेक्षां ह्यानांच राजकारण अधिक कळत असावे असे वाटले. पाठोपाठ तीन राज्यातील भाजपाची सत्ता गेली. मग काय, दिल्लीतून भाजपाची गच्छन्ती झालीच समजा, अशी भाषा सुरू झाली. आम्ही निवडून आल्यावर आमचा पंतप्रधान सामापोचराने ठरवू असे ठासून विरोधी पक्ष नेते सांगत होते. त्यांच्यापैकी साधारणपणे सात आठ जणांना आपण पंतप्रधान होऊ अशी आशा ही वाटली होती. पण त्यांच्यापैकी एकानेही लोकसभेची निवडणूक लढविली नव्हती. त्यावरून पुढे काय होणार हे त्यांना प्रचार सुरू झाला तेव्हाच कळले असावे, पण आपल्या कार्यकर्त्यांना आशेवरच जगवावे लागते ना ! म्हणून शेवटपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत राहीले. पुढे काय झाले ते सांगावयाची गरज नाही. फक्त एक सत्य सांगावेसे वाटते ते हे की दुःख अतिव झाले ते विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनाच. घराणेशाही असलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवावयास हवे की त्यांच्या नेत्यांना व त्यांच्या कुटूंबियांना फारसे दुःख होत नाही. ह्याचे कारण त्यांचे आपआपल्या पक्षावरील नियंत्रण यत्किंचीत कमी झालेले नसते. साहेब व साहेबांची मुले म्हणून मिरवता येणे ह्यात खंड पडत नसतो.

कर्नाटकांतील गेल्या वर्षाच्या विधानसभाच्या निवडणूक निकाला नंतर तेथील राज्यपालाने संसदीय प्रथेनुसार भाजपाला सत्ता स्थापण्याची संधी दिली. भाजपाने सत्ता स्थापन केली पण घोडा बाजार करू शकली नाही. म्हणून येडुरप्पाने विश्वासदर्शक ठराव मांडण्याअगोदरच राजीनामा दिला. नंतर जेडीएसला मुख्यमंत्रीपद देऊन काॅग्रेस स्वतः पाठीमागच्या दाराने सत्तेवर आली. त्यावेळी भाजपाची कशी जिरविली असा आनंद व्यक्त करीत राहूल गांधींच्या राजकारणला दाद द्यावी अशी भाषा राजकीय अभ्यासक आणि काही संपादक मंडळीनी केली. कर्नाटकातील मंत्र्यांने राजीनामे दिले ही घटना कर्नाटक सरकारात सामील झालेल्या दोन पक्षांतील अंतर्गत मामला आहे. आपले आमदार आपल्या नियंत्रणात राहीले नाहीत यासाठी काॅग्रेस आणि जेडीयुचे सर्वोच्च नेते कमी पडले आहेत हे सत्य नाकारून भाजपा लोकशाही संपुष्टात आणत आहे अशी ह्या मंडळीनी ओरड सुरू केली. आता तर काॅग्रेस-जेडीएसचे सरकार पडले आहे. तरी ही संपादक मंडळी व विचारवंत नैतिकेचा आव आणत भाजपावरील टिका तीव्र करतील. पुन्हा नव्याने भाजपा व संघाचा राष्ट्रवाद कसा आक्रमक ह्या विषयावर सारे विरोधी पक्ष व त्यांचे मिडीयातील हस्तक व विचारवंत टाॅक शो सुरू करतील. वस्तुस्थिती अशी आहे की, पुरोगामी विचारांचा मक्ता आमच्याकडेच आहे आणि आम्ही म्हणू तोच पुरोगामी विचार असा हट्ट स्वातंत्र्या पासून ही मंडळी धरून आहेत. पण ह्यांचे म्हणणे सर्वसामान्य जनता आता गांभीर्याने घेत नाही हे लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

वस्तूतः लोकसभेच्या निवडणूकीत ज्या पक्षांची दाणादाण उडाली आहे, त्या पक्षांच्या राज्यातील सरकारनेही जनतेचा विश्वास गमाविला आहे, असे मानून भाजपाचे केंद्रातील सरकार घटनेतील कलम ३५६ वापरून विरोधी पक्षांचे सरकार बरखास्त करू शकते. २०१४ च्या  लोकसभेच्या निवडणूकीतील विजया नंतर मोदी सरकारने विरोधी पक्षांचे राज्यातींल सरकार बरखास्त केले नाहीत. अलिकडे बंगाल मधील ममता बॅनर्जीने इतका थयथयाट केला तरी तिथले सरकार बरखास्त केले नाही.  आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडूने मोठा आकडतांडव केला, पण त्यांनाही काही महत्व दिले नाही. ह्या दोन्ही नेत्यांनी जो काय तमाशा केला तो केवळ मोदी सरकारला ३५६ कलम वापरण्यासाठी उत्तेजीत करावे ह्या साठीच होता.  पण मोदी सरकारने त्यांना शहीद होण्याची संधी दिली नाही. तरीही भाजपाने लोकशाहीचा गळा घोटावयास सुरूवात केली आहे असा आरोप विरोधी पक्ष करणार आहेतच. ह्या सगळ्या बाबी निव्वळ राजकीय स्वरूपाच्या आहेत. जगभरातील प्रत्येक देशात राजकारण हे शह-कटशहाने भरलेले असते. त्यामूळे त्यावर फारसे न बोललेलं बरं ! 

मूळ मुद्दा हा आहे, राजकारणातील घोडा- बाजार संपणार कधी? माझे मत असे आहे की भाजपाने कर्नाटकात सतेवर बसू नये. त्याऐवजी तात्पूरती राष्ट्रपती राजवट आणावी वा राज्यापालाने विधानसभा भंग करून पुन्हा निवडणूकीचा मार्ग स्विकारावा. परंतु भाजपा तसे करेल की नाही अशी खात्री देता येत नाही. ह्यात गोम अशी आहे की, भाजपाने जर सरकार स्थापन न केले आणि तसे जाहीर केले तर, पुन्हा काॅग्रेस जेडीएस एकत्र येणार नाहीत असे ठामपणे म्हणता येत नाही. मग दारात सत्ता येत असेल, वा आणली असेल तर ती लाथाडावी तरी कशी हा प्रश्न भाजपा समोर आहेच की. राजकारण हे बेरजेचेही असते, व वजाबाकीचे ही असते. एका पक्षातील सदस्यांची वजाबाकी झाली की दुसरीकडे बेरीज होणार.  Debit what comes in and Credit what goes out. हे व्यवहारातले सुत्र. राजकारण हा झाला आहे व्यवसाय, मग त्याला ही व्यवहारातले नियम लागू होणारच की.

दुसरा प्रश्न, विरोधी पक्षांची मानसिकता कशी आणि केव्हा बदलेल हा आहे. लोकसभेच्या निवडणूकीत लोगोपाठ दोनदा सपशेल पराभवानंतर विरोधी पक्षांना शहाणपण का येत नाही हे कळेनासे झाले आहे. आजकाल विरोधी पक्षांचे नेते भाजपात जात आहेत ह्यावरही इतर पक्ष भाजपालाच जबाबदार मानतात. बहूतांश विरोधी पक्षांची नेतेमंडळी राज्य स्तरावर वा केंद्र स्तरावर सतत सत्तेत राहीली आहे. ही मंडळी सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. ह्याचे कारण सत्तेची चव. सत्तेची चव मादक असते. ती चव मिळेनासी झाली की अस्वस्थता येत असावी. बहूतांश विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजकारण हा आपल्या खानदानाचा व्यवसाय मानला. त्यामूळे ह्या सर्वांची मूलं-मूली, सुना, पुतणे भाचे, जावई, नातवंडे -पोतवंडे सरकारी महलात जन्माला आलेली आहेत. त्यांचे काय, ही चिंता विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेडसावत आहे. प्रादेशिक पक्षांची स्थिती ह्याहून भिन्न नाही. डाव्याची खोड अशी आहे की ते देव, धर्म काही मानत नाहीत, तरीही हिंदू धर्मियांचे खच्चीकरण करावयाचे पण दुसर्या बाजूला ख्रिस्ती आणि मुस्लीम धर्जणी भूमिका सोडावयाची नाही असे त्यांचे आज पर्यंतचे धोरण. नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सुंभ जळाले तरी पीळ जात नाही असे म्हणतात  ना, तशी डाव्या पक्षांची अवस्था आहे. इतर विरोधी पक्ष जे भाजपाला विरोध करतात त्यांचा सर्वधर्मसमभाव हा डाव्या पक्षासारखाच आहे. त्यामूळे ते ही गटागंळ्या खात आहेत. ही सारी मंडळी सतत संघ -भाजपाला पाण्यात पाहायची सवय मोडणार कधी ? दोन लोकसभेच्या निवडणूकीत सपाटून मार खाल्ला आहे तरी सुधारणा करणार नसतील तर २०२४ सालच्या निवडणूकीतले भविष्य काही महीन्यातच दिसू लागेल.

भारतीय जनतेला आज खराखूरा, सर्वधर्म समभाव  हवा आहे. देशाचे नेतृत्व कणखर नेत्यांकडेच असावे अशी सर्वसामान्यांची भावना आहे.  जनसामान्यांच्या समस्याची जाण सरकारला असावी, लोकांना भ्रष्ट राजकीय नेते नकोसे झाले आहेत मग ते कुठल्याही पक्षाचे का असेना ! दशहतवाद, नक्षलवाद, तसेच परकीय पैशातून कार्यरत असलेल्या एनजीओंच्या कृष्णकृत्यांचा समूळ नायनाट हवा आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत कुठलाही गाफीलपणा नको. ज्याच्यांवर भ्रष्टाचारांचा आरोप आहे व त्यासंबंधीतले  जितके खटले आहेत ते लौकरात लौकर निकाली लागून त्यांना लोकशाहीत शिक्षा होते असे मतदारांना दिसायला हवे. सरकार देशाच्या सर्वांगिण विकासाचा( शेती, उद्योग, उर्जा, जल, इत्यादी क्षेत्रातील) ध्यास घेऊन काम करणारे असावे, आणि त्यातून आश्वासन दिल्याप्रमाणे रोजगार निर्माण व्हावयास हवा अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. जर विद्यमान केंद्र सरकार वरील समस्यांची समाधानकारक सोडवणूक करेल, तरच ते पुन्हा २०२४ साली सत्तेवर येऊ शकेल, अन्यथा काॅग्रेस आघाडी सरकारला जो धडा मतदारांनी दिला तसा मोदी सरकारलाही देतील हे निश्चीत. पण त्यासाठी वर नमूद केलेल्या समस्यांपैकी सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय सुरक्षा, दशहतवाद, नक्षलवाद, इत्यादी संबंधी भाजपाचे धोरण आम जनतेला पसंत पडलेले दिसते ही वस्तुस्थिती विरोधी पक्षांनी मान्य करावयास हवी व त्यानुसार आपला व्यवहार लोकांच्या पंसतीस उतरेल असा करावयास हवा ना ! नाही तर आहे, आपलं पुन्हा 
' येरे माझ्या मागल्या ! '

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...