गुरुवार, १७ मे, २०१८

मध्यरात्रीचं नाट्य



कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीतील प्रचाराची  लढाई आता जनादेशावरून सुरू झाली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात प्रथमच मध्यरात्री सुप्रीम कोर्टात गेलेली लढाई तीन तासाहून अधिक काळानंतर तात्पुरता संपली आणि भाजपाच्या येडूरअप्पांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला. 


येडूरआप्पांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला, म्हणजे कर्नाटकात भाजपाची सत्ता आकारास आली असे नाही. लोकशाहीतील प्रथेनुसार येडूरआप्पांना बहूमत सिध्द करावे लागणार आहे. आणि त्यानंतर त्यांना बहूमत सिध्द करता न आले तर काॅग्रेस आणि जेडीसला संधी मिळणार आहे. केंद्रात १९९६ साली भाजपाला सर्वात मोठा पक्ष म्हणून तत्कालीन  राष्ट्रपती महोदय स्वर्गीय डाॅ शंकर दयाळ शर्मा ह्यानी अटलबिहारी वाजपेयींना सरकार स्थापन करण्याची संधी दिली. त्यावेळी विरोधी पक्षांनी ना राष्ट्रपती महोदयासमोर धरणे धरले ना सुप्रीम कोर्टाचा दरवाजा खडखडला. वाजपेयी बहुमत सिध्द करू शकले नाहीत. नंतर विरोधी पक्षांनी आघाडीचं सरकार स्थापन केले. संसदीय पंरपंराचं  इतकं आदर्श उदाहरण डोळ्यासमोर असताना काॅग्रेस व जेडीएस ह्या पक्षांनी इतकी घाई करावयास नको होती. 


विरोधी पक्ष तसेच त्यांचे समर्थक  आजचा भाजपा अटलबिहारी वाजपेयी आणि अडवणीचा नाही अशी ओरड करतात. त्यात तथ्य आहे. पण आजची काॅग्रेस तरी नेहरू, इंदिरा आणि राजीव गांधीची कुठे राहीलीय? १९८९ साली राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील काॅग्रेस सर्वात अधिक खासदार निवडून आलेला पक्ष होता. तरीही राजीव गांधींनी जनादेशाचा आदर केला होता. अटलबिहारीविषयी सर्व विरोधी पक्षांना आदर आहे. परंतू त्याच वाजपेयींच केवळ एका मताने सरकार पाडले आणि देशावर दोनदा निवडणूका लादल्या. तेव्हाच खर्या अर्थाने भाजपामध्ये आक्रमक नेतृत्व जन्मास आले होते. आज लोकशाहीच्या नावाने ओरड करणार्या विरोधी पक्षांनी पक्षांनी ' जे पेरिले ते उगवते' किंवा 'जे आपण देतो ते आपल्याकडे फिरून येते ' हा निसर्गाचा नियम स्विकारून लोकहिताची कामे करण्यासाठी झोकून घेणे आवश्यक आहे. 


काॅग्रेस आणि जेडीएस ह्यांना येडूरआप्पांचा शपथविधी होऊ द्यावयाचा नव्हता. तसेच भाजपाही आपल्या नेत्याचा शपथविधी उरकून करण्याच्या घाईत होता. ह्यामागे तिन्ही पक्षांना आपले आमदार आपल्यासोबत राहतील की नाही ह्याची शाश्वती नाही असेच दिसते. जर कुमारस्वामीचा शपथविधी झाला असता आणि भाजपाचे आमदार कुमारस्वामी सोबत आले असते किंवा अजूनही आले  तर त्याचं काॅग्रेस आणि  जेडीएस स्वागत करणार नाहीत का? इंदिरा गांधीच्या काळात हरियाणाचं संपूर्ण मंत्रीमंडळच काॅग्रेसमध्ये सामील झालेली घटना आपण अनुभवली आहे. साम दाम भेद दंड वापरून सत्ता मिळविण्याचा प्रकार माजी  पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधीकडूनच वारसहक्काने सर्व पक्षात पसरलेला आहे. हे सत्य नाकारता येत नाही.


सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्या पुन्हा सुरू होणार आहे. त्यामूळे काॅग्रेस आणि जेडीएस साठी संधी संपली असे नाही. एस आर बोम्मई संबधीतील निर्णय जो बोम्मई ह्यांना दिलासा देणारा होता तरी येडूरआप्पांना प्रथम समर्थकांची यादी कोर्टात सादर करावी लागणार आहे. तिथेही येडूरआप्पांना अपयश येऊ शकते. तिथे यश मिळाले तरी विधानसभेत बहूमत सिध्द करावे लागणारच आहे. जे काही होणार आहे ते पाहायला मिळेल पण ते लोकशाहीच्या संकेतानुसार होत आहे. अलीकडे देशातील राजकारण गतीमान झाले आहे.वारंवार राज्याच्या विधानसभांच्या निवडणूकानंतर खंडीत जनाधार येत असतो. सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणारच असल्यामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला आपोआप घटनेतील कलमाचा दर्जा प्राप्त होत असल्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने त्रिशंखू निकाल आला असता incumbant पक्षाचं समर्थन गैर लागू करण्यात यावे. कारण जनादेश त्या पक्षाच्या विरोधात असतो.उरलेल्या पक्षांनी आघाडी करून सरकार स्थापन करण्याचा मार्ग अवलंबवावा. तरीही सरकार स्थापन करता येत नसेल तर राष्ट्रपती राजवट लागू करून पुन्हा निवडणूका घ्याव्यात. परंतू देशाच्या अर्थव्यवस्थेवर उगीच खर्चाचा बोजा टाकणेही प्रशस्त नाही अशावेळी incumbant पक्षाला सरकारमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची तरतुद असावी. फक्त पुर्वीच्या सरकारमधील म॔त्री असलेल्या सदस्यांना सरकारमध्ये स्थान देणे टाळावे. म्हणजे जनादेशाचा खरा मान राखला  जाऊ शकतो. अर्थात राजकीय पक्षाकडे परस्पर सहमती दाखविण्याची दानत असावयास हवी. कदाचीत उद्या ज्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे ते खंडपीठ निदान भविष्यात तंटे टाळण्यासाठी सरकारला सल्ला देण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्या न्यायालयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार पण त्याचवेळी मध्यरात्रीही काॅग्रेस व जेडीएसच्या  तक्रारीची दखल घेऊन सुनावणी सुरू करणार्या सरन्यायाधिशांना सलाम करण्यासाठी राजकीय पक्ष  कंजुषी करणार नाहीत अशी आशा बाळगू या.
                             जय न्यायदेवता !

बुधवार, १६ मे, २०१८

रस्सीखेच सत्ता स्थापनेची



कर्नाटक राज्याच्या विधानसभेच्या झालेल्या निवडणूकीत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहूमत मिळाले नाही. त्यामुळे सत्तेसाठी रस्सीखेच आणि घोडा-बाजार होणार हे निश्चीत. मागील लेखात मी शेवटी निष्कर्ष काढला होता की काँग्रेस सत्तेवर राहात नाही. प्रथमदर्शनी कर्नाटकातील लोकांनी काँग्रेसला सत्तेवरून खाली ओढले आहे. असाच ह्या जनादेशाचा अर्थ आहे. जितक्या काँग्रेसच्या जागा कमी झाल्या त्या कुठल्या पक्षाकडे गेल्या तर भाजपाकडे. जेडीएसच्या दोन जागा आणि ' इतर ' संज्ञाखाली कमी झालेल्या जागा कोणाकडे गेल्या? भाजपाकडेच. संपूर्ण लढतीचं स्वरूप काँग्रेस विरूध्द भाजपा असेच होते. जेडेएसच्या जागा वाढण्याऐवजी कमी झाल्या आहेत. सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालाकडून बोलाविणे येणे क्रमप्राप्त आहे. अशाच प्रकारे कर्नाटकमधील एस आर बोम्मई सरकार संबंधीतल्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सिंगल लार्जेस्ट पक्षाला सरकार स्थापण्यासाठी बोलाविण्यात यावे असा निकाल दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयातील निकाल आपोआप दंडक पाळला जातो. श्री कश्यप ह्यांच्यासारख्या घटनातज्ञाच्या म्हणण्यानुसार कोणी प्रथम दावा केला ह्या बाबतीत संविधानात उल्लेख नसावा असेच वाटते.

काँग्रेसच्या वतीने असे म्हटले जाते की जेडीएस आणि काँग्रेसच्या आघाडीकडे संख्याबळ आहे. म्हणून सरकार बनावयास ह्या आघाडीला बोलावयास हवे. संख्याबळानुसार बोलाविले पाहीजे, हे गृहीत धरता येत नाही. ह्याची कारणे दोन आहेत. एक ही आघाडी निवडणूकपुर्व नाही. दुसरे कारण म्हणजे काँग्रेस आणि जेडीएसचे संख्याबळ घटले आहे. जरी ही आघाङी निवडणूकपुर्व नव्हती तरी संख्याबळ आहे, म्हणून सरकार स्थापनेसाठी राज्यपाल बोलावू शकतात पण ह्या आघाडीला सरकार स्थापण्यासाठी प्रथम बोलावू शकत नाही. हाच बोम्मईंच्या खटल्यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा अर्थ आहे. सर्वाधिक जागा जिंकून आलेल्या पक्षाला सरकार स्थापण्याची संधी देऊन त्या पक्षाला सरकार स्थापन करता आले नाही तर राज्याच्या स्थैर्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस आघाडीला सरकार बनविण्यासाठी राज्यपाल बोलावू शकतात. पण बोलाविलेच पाहीजे असाही नियम नाही. राष्ट्रपती राजवट ठेवण्याचा किंवा सहा महीन्यासाठी विधानसभा स्थगित करण्याचा अधिकार मात्र राज्यपालांना आहे. 

काँग्रेस आणि जेडीएसच्या आघाडीला सरकार स्थापण्यासाठी राज्यपालांनी संधी द्यावी असे मानले तर ह्या दोन आघाडीतील कमी संख्या असलेल्या जेडीयुचा मुख्यमंत्री बसू शकत नाही. काँग्रेस आणि जेडीएसच्या व्होट शेअरींग च्या प्रश्नावरून भाजपाला संधी मिळूच नये असा आग्रह करू शकत नाही. कारण संविधानातही सर्वात जास्त जागा कुठल्या पक्षाला मिळाल्या आहेत ह्याच निकषावरून सत्ता स्थापनेसाठीच्या दाव्याचा विचार व्हावा असेच नमूद आहे आणि स्वातंत्र्यानंतर आजपावेतो जितकी सरकारे स्थापन झाली आहेत ती ह्याच निकषाच्या आधारे होत आली आहेत. पुर्णतः कायद्याचा अर्थ लावून पहावयाचे झाले तर राज्यपाल खर्या अर्थाने विधानसभेचा नेता निवडण्यासाठी संधी देत असतात. तेही सर्व निवडून आलेल्या सदस्यांना. ते आमंत्रण कुठच्या पक्षाच्या नेत्याला दिलेलं नसतं. त्या न्यायाने सरकार बनविण्याची संधी दोघां स्पर्धकांना एकत्र मिळू शकते. परंतु परस्पर सहमती आणि सांमजस्यावर भर अधिक देण्याची प्रथा आहे. केवळ कायदा काय सांगतो हेच बघणे इष्ट नसते. ज्या ज्या ठिकाणी संविधानामधील शर्ती वा नियमांचा अर्थ लागत नसतो तेव्हा राज्यपाल वा राष्ट्रपतींच्या विवेकावर सारं काही संविधानने सोपाविलेले आहे. जस्टीस सकारीया आयोगाने राज्यपालकडे कुठले पर्याय उपलब्ध असतात आणि ते स्विकारण्याची रीत ह्या बाबतची माहीती देतानाही Discretion lies with governer असेच म्हटले आहे. एकंदरीत Ball is in governer's court असे म्हणण्याचा प्रघात का आहे हे आपण समजून घ्यावे हेच अपेक्षित मानले गेले आहे.

मग प्रश्न येतो हा की भाजपा आणि पीडीपी ह्रा दोन्ही पक्षांना जम्मु आणि काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्याची संधी का दिली गेली? ह्याचं कारण असे की ह्या दोन्ही पक्षातील एकही पक्ष निवडणूकपुर्वी सत्तेत नव्हता. इथे काँग्रेस हा incumbant पक्ष होता. म्हणजे जनादेश काँग्रेसच्या विरोधात आहे. म्हणून त्या पक्षाला किंवा त्याने पाठींबा दिलेल्या पक्षाला सरकार बनविण्याचा हक्क प्राप्त होत नाही. ह्याचा अर्थ व्होट शेअरींगसाठी भाजपा, जेडीएस आणि इतर पक्षाची मतदान टक्केवारी एकत्र घेणे आवश्यक आहे. गोव्यातली स्थिती वेगळी दिसत असली तरी निवडणूक होण्याअगोदर काही काळासाठी एकत्र असलेल्या पक्षांची फेरजूळणी होऊन आघाडी निर्माण झाली आणि सरकार स्थापन झाले. तरीही ती व्यवस्था पुर्णतः कायद्यानुसार झाली असे म्हणता येत नाही. परंतु काँग्रेसनी ह्याबाबतीत न्यायालयात दाद मागितली नाही. ह्याचे कारण काँग्रेस मानसिक रित्या पराभूत मनस्थितीत होती असेच मानले पाहीजे. राजकारणात संधी दडविणे हे ना शहाणपणाचे मानले गेले, ना न्यायालयात अज्ञान क्षम्य मानले आहे.

वर मांडलेलं माझ विवेचन भाजपाला झुकते माप दिल्यासारखे वाटत असले तरी काँग्रेस पराजीत झाली आहे हे कोणालाही मान्य करावेच लागते. तसेच जेडीएस ही विजयी झाली आहे असे ही मानता येत नाही. कर्नाटकमध्ये कोणाचंही सरकार स्थापन झाले तरी पंतप्रधान मोदींनी प्रचारात भाग घेतल्यानंतर पारडे भाजपाकडे झुकले ही वस्तुस्थिती पुसली जात नाही.

कर्नाटकमध्ये Anti-incubancy नव्हती असे काँग्रेस प्रवक्त्याचे म्हणणे मला थोड्याफार प्रमाणात पटते. तसेच त्रिपूरामध्येही incumbant सरकारला इतका विरोध प्रचाराच्या वेळी दिसला नव्हता हे ही थोड्याफार प्रमाणात खरे मानले तरी जी काही विकासाची कामें त्रिपूरातील आणि कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांनी केलेली आहेत ती पुरेसी नव्हती किंवा त्यात आधुनिकतेचा अभाव जनतेला जाणवला असावा.

गेल्या वर्षी हिंदुस्थान टाईम्सच्या जूलै महीन्यातील एक तारखेच्या अंकात श्री शिव विश्वनाथनने Why South finds BJP more acceptable now ह्या मथळ्याखालील लेखात म्हटले आहे, "The new aspirational and mobile, global South Indian is more ready for BJP and Modi than epic battles of ideology and electoral politics". श्री शीव विश्वनाथन हे केवळ राजकीय विश्लेषक नसावेत. ते समाजशास्त्रज्ञ अधिक असावेत. म्हणून त्यांनी दक्षिण भारतातील युवकां मध्ये मोदीविषयींचं आकर्षण वाटते असे म्हटले होते ते सत्यात उतरण्याची सुरूवात झाली आहे, हे मान्य करावे लागते.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक प्रचार काळात 'सामना' वृत्तपत्राने मोदी आणि अमित शहांवर आग ओकण्याचे काम केले. तसेच सर्व मराठी चॅनेलवरून भाजपा मराठी लोकांच्या विरोधात आहे, हे सतत बिंबविण्याचे काम केले गेले. तरीही भाजपाची सरशी झाली. कर्नाटकात 'भाजपा हा हिंदी भाषिकाचा पक्ष' असा प्रचार केला. शेवटी काय झाले? भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या. 'भारत बदलत आहे ' हे वाक्य बीबीसीचे जेष्ठ वार्ताहार मार्क टूलीचे आहे. 

कर्नाटकातला जनादेशाचा अर्थ लावण्यासाठी पुर्वग्रह बाजूला ठेवूनच आपल्या चूका काय आहेत ह्याबाबत विरोधी पक्षांनी चिंतन करावयास हवे. केवळ चिंतन नव्हे तर बूथ पातळीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे घाम घाळावा लागेल. तो ही केवळ सरकार विरूध्द मोर्चे काढून, जाळपोळ आणि मालमत्तेचं नुकसान करून नव्हे तर संघाच्या विधायक कार्याचा आदर्श स्विकारून. तेव्हाच भारत बदलत आहे ह्याची जाणीव विरोधी पक्षांना होईल. सरमजांमशाही व घराणेशाहीच्या पध्दतीने पक्ष चालविण्याचे दिवस हळूहळू संपत आले आहेत. हाच खरा बोध कर्नाटकासहीत अलीकडे इतर राज्यात झालेल्या निवडणूकाच्या निकालाचा आहे. 

भाजपाने त्रिपूरा आणि कर्नाटकामधील निवडणूकीत विजय मिळविला ही बाब सहज व सोपी नव्हती. दोन्ही ठिकाणी anti-incumbancy फारशा प्रमाणात जाणवली नाही. तरीही तिथे कम्युनिस्ट आणि काँग्रेसचा पराभव होतो. त्यामागील कारणे काय आहेत? मोदींचा विकास पुरूष अशी जी प्रतिमा भारतीय मतदारात झालेली दिसते ती खोडून काढण्यात विरोधी पक्षांना अपयश येत आहे. डिसेंबर  महीन्यात Weekly ह्या साप्ताहीकानेही नरेंद्र मोदीची लोकप्रियता कर्नाटकातही विरोधकांना भारी पडेल असेच अनुमान काढलेले आहे. सर्व विरोधी पक्षाकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कधी नव्हता इतका टिकेचा भडीमार होत आहे. त्याचाही समाचार संघ नव्हे तर मतदारच भाजपाला मते देऊन घेत आहेत. खोट्या असहिष्णुतेचा मुद्दा किती वर्षे वापरणार हो? आणि तशी ओरड करीत देशद्रोही घोषणा करणार्याला सहाय्य करण्याच्या कृत्याचा निषेध मतदार मतपेटीद्वारा करीत आहेत. गुजरात माॅडेलवर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष सतत झाडून फक्त टिका करीत आहेत, पण पर्यायी विकासाचं माॅडेल विरोधी पक्ष दाखवू शकत नाही. जो पर्यंत साम्यवादी, माओवादी, दशहतवादी इत्यादींना हाताशी धरून हिंदू समाजाचे विभाजन, अल्पसंख्याकांचे लाड आणि असहिष्णूतेची पिटविली जाणारी बोंब इत्यादी कृत्ये विरोधी पक्ष करीत राहतील तो पर्यंत भारतीय मतदार भाजपा आणि मोदींना देणारा पाठींबा थांबवतील असे दिसत नाही.

शनिवार, १२ मे, २०१८

न्यायमूर्ती चेलमेश्वरांची निवृत्ती आणि राजकारण



सर्वोच्च न्यायालयाचे चार बंडखोर न्यायाधिशापैकी न्यायमूर्ती श्री चेलमेश्वर येत्या जून महीन्यात निवृत्त होत आहेत. दरम्यान न्यायालयांना तीन आठवड्याची ऊन्हाळी सुटी सुरू होत असल्याकारणाने सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने प्रथेनुसार त्यांच्या निवृत्ती निमित्त निरोप समारंभाचे आयोजन केले आहे. परंतु वैयक्तीक कारण देऊन न्यायमूर्ती चेलमेश्वराने निरोप समारंभ नकार दिला आहे.त्यांनी निरोप समारंभ घ्यावा असा आग्रह बार असोसिएशन धरणार असल्याचे वृत्त आहे. परंतू न्यायमूर्ती चेलमेश्वर काही प्रतिसाद देतील असे वाटत नाही. कारण जाता जाता न्यायालयाच्या प्रशासनाला तक्रारींचा पाढा ऐकविला आहेच. जरी न्यायमूर्ती चेलमेश्वरनी निरोप समारंभास होकार देऊन समारंभ पार पडला, तरी त्या समारंभाला शोभा येईल असे दिसत नाही, तसेच त्यावर फारशी चर्चाही होणार नाही. कारण एकदा का तुमचं नाव बंडखोर असे झाले की ते पुसता येत नाही. मग तुम्ही कितीही उच्चपद भूषविले असले तरी. असे कां?

लोकशाही राज्य प्रणाली ही कायद्यापेक्षा परस्पर समंजसपणावर अधिक खुलून दिसते. जितक्या अधिक उंचीच्या पदावर तुम्ही आरूढ होता, तितक्या अधिक प्रमाणात तुमच्याकडून समंजसपणा अपेक्षित असतो. लोकशाही असो वा हूकुमशाही, एक पक्षीय राजवट असो वा राजेशाही, शेवटी राज्याचा वा देशाचा कारभार चालण्यासाठी एक सर्वमान्य (मग ती लिखीत असो वा नसो) प्रथा असते. त्या प्रथेनुसार सर्वच क्षेत्रात प्रत्येक पातळीवरील उच्च स्थानावरील अधिकार्याला उठसूट आव्हान देणे अभिप्रेत नसते. आव्हान-प्रतीआव्हान अशा खेळाला अंत नसतो. म्हणून बंडखोरीच्या अगोदर सारासार विचार करावयास हवा असतो. त्यालाच विवेक म्हणतात आणि तो कोणाकडे अधिक असावा लागतो? "ज्यांच नियत कार्यच मूळी समाज-मनातील विभिन्न प्रकारची बंडखोरी शाबूत ठेवण्याचं आहे अशा कडून". अशा व्यवस्थेतेचं नाव आहे न्यायमंदिर. त्या मंदिरातील पूजारीच मंदिराची नासधूस करू लागले, तर समाज खपवून घेत नाही. ह्याला जगभरातील बहूतांश देशाचा इतिहास साक्षी आहे. व्यक्ती कितीही मोठी असली तरी समाजापेक्षा मोठी नसते. माझ्या वाचनात आलेलं एक सुदंर वाक्य आठवले. ते असे आहे. "There are some eternal principles which never change even time changes . One of them is, when there is a conflict between individual and group then group's intrest must prevail. When there is a conflict between group and institution, institution's intrest must prevail. And when there is conflict between institution and nation latter's intrest must prevail."

मी वर म्हटले आहे, की आव्हान-प्रतीआव्हानाला अंत नसतो. सर्वोच्च न्यायालयातील प्रशासकीय बाबी हाताळण्याचे सर्वोच्च अधिकार कोणाला तरी असायला हवेत की नाही? मग ते सरन्यायाधिशानांच असणार की नाही? मानवी जीवन पशू-पक्ष्याप्रमाणे केवळ सामुदायिक नसते. ते सामाजिक असावे लागते, नव्हे असतेच. कारण आपला जन्म माणूस म्हणून झाला आहे. त्यामूळेच काही शाश्वत सिध्दांताची जाण आपल्यात जन्मतः असतेच. त्याचचं नाव माणूसकी.

सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधिशांच्या पत्रकार परिषदेवर मी "सर्वोच्च न्यायालय राजकीय आखाडा?" अशा शिर्षकाचा लेख ब्लाॅगवर जानेवारी महीन्यात प्रसिध्द केला आहे. त्या लेखात मी न्यायालयात राजकारण आहे असा निष्कर्ष काढला आहे. त्यानंतर ह्या संदर्भात घडलेल्या घटना पाहता ह्या लेखात न्यायालयीन कामकाजाबाबत झालेल्या राजकीय हस्तक्षेपाच्या इतिहासावर चर्चा करणे आवश्यक झाले आहे.

आतापर्यंत काही हायकोर्टातील न्यायधिशांवर भष्ट्राचाराचा आरोप होऊन त्यावर खटले झाले आहेत. परंतु बंडखोरी आणि ती ही सर्वोच्च न्यायालयात असे प्रथमच आपण अनुभवली. ती बंडखोरी फसली. न्यायमूर्ती लोय्यांच्या मृत्युसंबंधीची पुनर्विचार याचिका फेटाळली गेली. मग सरन्याधिशावर महाभियोग चालविण्याची खटपट झाली. ती ही असफल झाली. आता न्यायमूर्ती चेलमेश्वर निवृत्त होत आहेत. मग आणखिन काही राजकीय चाली सुरू होतील, त्याही एकापाठोपाठ एक. ह्यापाठीमागचं कारण कोणते? घसरत जाणारे राजकारण हेच होय.

आपल्या देशात अनेक वर्षे सत्तेत राहिलेला पक्ष म्हणजे काँग्रेस. काँग्रेस सरकारच्या काळात न्यायालयाच्या प्रशासकिय कामात सरकारचा हस्तक्षेप, तसेच पक्षपात घडत नव्हता, असे म्हणता येणार नाही. माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधींनी आपली निवडणूक अवैध ठरल्यानंतर राष्ट्रपती तसेच न्यायपालिकेच्या संविधानत्मक रचनेला किती मान दिला होता हे आपण अनुभविले आहे. सरन्यायधिशांच्या निवडीसंबंधात तसेच तेथील प्रशासानिक बाबी ह्याबाबतीत काँग्रेसच्या कारकिर्दीत पक्षपाताच्या घटना केव्हा व कशा घडल्या यासंबंधी भाजपाच्या नेत्यांनी एक यादीच अलीकडे जाहीर केली. भाजपाने असे पाऊल का उचलले? सर्वोच्च न्यायालयात झालेल्या बंडखोरी मुळेच ना! सर्वोच्च न्यायालयात प्रशासकीय कामासंबंधी मतभेद होत आलेले असावेत आणि ते ही स्वाभाविक आहे. परंतु आतापर्यंत अशा मतभेदाचं प्रदर्शन होऊ न देण्याची खबरदारी पूर्वाश्रमींच्या न्यायाधिशानी घेतली आहे ना! मग अलीकडे असे काय घडले की चार न्यायमूर्तींनी लक्ष्मणरेषा ओलाडंली? एकच कारण ते म्हणजे सोनीया गांधींनी मोदीबाबत स्विकारलेला सुडाचा प्रवास.(मौतका सौदागर हे उद्गारच मोदींच्या राजकीय प्रवासातील यशाची एक भली मोठी शिडी ठरली)

काँग्रेस हा पक्ष स्वातंत्र्य लढ्याच्या पुण्याईच्या जोरावर अनेक काळ केंद्रात तसेच सर्व राज्यात सत्ताधारी राहीला. स्वातंत्र्य लढ्याची पुण्याईचा वापर काँग्रेसचे नेते करतील अशी स्पष्ट कल्पना महत्मा गांधीजींना झाली असावी. म्हणून त्यांनी काँग्रेस विसर्जीत करण्याचा सल्ला दिला होता. परंतु तो सल्ला काँग्रेसच्या नेत्यांनी स्वाभाविकरित्या मानला नाही. कारण त्यांना स्वातंत्र्यापुर्वीच सत्तेची सवय झाली होती. तशी सवय लावण्यामागे वरवर पाहता ब्रिटिशांची उदार नीती दिसत असली तरी त्यामागे ब्रिटिशांचा कुटील डाव होता. पहील्या महायुध्दानंतर ब्रिटिशांची हाडे खिळखिळीत झाली होती. त्यामुळे भारतातील सत्ता टिकविण्यासाठी काँग्रेसमधील मवाळ नेत्यांना गोंजारीत, भारतीयांना शोभेचे का होईना सत्तेत प्रतिनिधित्व देण्यास सुरवात केली होती. एका बाजूला काँग्रेसमधील मवाळ नेत्यांमध्ये सत्तेत सामील होण्यासाठी स्पर्धा निर्माण करीत भारतीय समाजात हिंदू-मुस्लीम, हिंदू-दलीत अशा दूहीची बीजें ब्रिटिश राज्यकर्त्यांनी पेरली. दुसर्या बाजूल जहाल नेत्यांना आणि क्रान्तीकांरकांना एकाकी पाडून क्रूर शिक्षा देण्याचे काम सोपे केले. पुढे दुसर्या महायुध्दात सुरवातीला जर्मनीने इंग्लड तसेच रशिया, फ्रान्स ह्या देशाच्यांच नाकाला फेस आणला होता. जर्मनीचा पराभव झाला पण इंग्रजांचा न मावळणारा सुर्य मावळला. तरीही स्वांतत्र्य देताना आधूनिक जगतात आपले स्थान बळकट करण्यासाठी जाता जाता ब्रिटिशांनी देशाची फाळणी करण्याइतका मुजोर बॅरिस्टर जीना आणि मुस्लीम समाजात भरविला होता. ज्याची फळे आपण आजही भोगत आहोत. त्यातील एक कडवट फळ आपण चाखतोय, ते म्हणजे पाक पुरस्कृत दशहतवाद आणि काश्मीर समस्या. दुसरं कडू फळ नक्षलवाद आणि तिसरं कडवट फळ म्हणजे काँग्रेस नेत्यांच्या सत्तेच्या सवयीचं नशेत झालेलं रूपातंर आणि ससंर्गातून देशातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना सत्तेच्या नशेची झालेली लागण. 

स्वातंत्र्यानंतर पंडीत नेहरूंचा उदोउदो पाहून काही मातब्बर नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि प्रजासमाजवादी पक्ष काढला. काही कट्टर समाजवादी आणि साम्यवादी नेते हेतूपुर्वक काँग्रेसमध्ये राहीले आणि आजही आहेत. आजही डाव्या विचारसरणीचे तसेच समाजवादी पक्ष काँग्रेसला कडवा विरोध करीत नाहीत. जे चित्र राजकीय व्यवस्थेत दिसत आहे, तेच चित्र न्यायालयात आणि नोकरशाही व्यवस्थेत उमटत गेले. व्यक्ती प्रशासनात असो वा न्यायालयात, राजकीय विचारसणीचा अंगिकार हा स्वाभाविक रित्या होत असतो. त्याबद्दल आक्षेप असण्याचे काही कारण नाही. अगदी राष्ट्रपती पदावरही राजकीय पक्षाचे नेते विराजमान झालेले आपण अनुभविले आहे. इथे प्रश्न राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या वर्तनाचा नसून नोकरशहा तसेच न्यायालयात मोठाली पदे भुषविल्यांच्या वर्तनाचा आहे. जी. पार्थसारथी सारखे परपराष्ट्र खात्यातील सेवेतील राजदूत किंवा माधवराव गोडबोले सारखे प्रशासकीय सेवेतील उच्च पद भुषविलेले अधिकारी आजही टिव्ही चॅनेलवरील चर्चेत भाग घेताना राजकीय अभिनिवेशात न येता समतोल भूमिका घेत असताना दिसतात. काही नोकरशहा त्यांच्या पसंतीनूसार राजकीय पक्षात सक्रीयही होतात. त्यासंबंधीही कोणाचा आक्षेप नसतो. न्यायालयात सन्मानीय न्यायाधिश म्हणून ज्यांनी देशसेवा केली आहे अशापैकी बहूतांश न्यायाधीश सन्मानाने समाजकरण करतात. त्यापैकी फारसे सक्रिय राजकारणात दिसत नाहीत. अशापैंकी काही निवृत्त न्यायधिशांनीही चार न्यायधिशांच्या बंडाबाबत नापसंती व्यक्त केली आहे. जे काही निवृत्त न्यायाधिश राजकारणात दिसतात ते बहूतांशी साम्यवादी असावेत असा माझा होरा आहे. कारण साम्यवाद्यांना मनातील क्रान्ती त्यांना शांतीने झोपू देत नाही. आजही रशियाचे प्रमूख पुतीन आणि चीनचे जिनपिंग ह्यांनी आपआपल्या देशात स्वतःची सत्ता बळकट कशी केली ते आपण पाहात आहोत. साम्यवादात भांडवलशाही मान्य नाही. पण त्याशिवाय गत्यंतर नाही. मग एक पक्षीय राजवटीतून सरकारमधील लोकच भांडवलदार झालेले दिसतात. पैसा आणि अमर्याद सत्ता ही एक नशा झाली की ती विकृती बनते. अशा विकृतीचे उदाहरणे बहूतांश साम्यवाद्यांच्या राज्यात अधिक आढळतात. कारण तिथे प्रजेला स्वातंत्र्य नसते. इंदिरा गांधीच्या काळातही अशी विकृती आपण अनुभविली आहे. कारण त्यांनाही साम्यवाद्यांनी घेरले होते. पण इंदिराजींच्या काळात अमेरिका आणि रशिया ह्या दोन महाशक्तीमध्ये सत्तेचं एक शीतयुध्द होतं, म्हणून त्यांच्या कारभारावर साम्यवादी स्टाईलची छाया पचली गेली. त्यातही जनतेने त्यांना १९७७ च्या निवडणूकीत मोठा झटका दिला होता. त्यानंतर त्यांनी फारसं साम्यवाद्यांच्या आहारी जाणे टाळले. सोनिया गांधीच्या कारकिर्दीतही बरेच साम्यवादी फॅशनचे लोक काँग्रेसमध्ये पाळले गेले आहेत. इतकेच नव्हे तर हिंदू समाजाला शक्तीहीन करण्याचे प्रयत्न केले गेले. साम्यवाद्यांना आणि त्यांच्या मार्गदर्शनाने कारभार करणार्या काँग्रेसच्या माता-पुत्राला माझा प्रश्न आहे कि तुम्ही धर्म ही अफूची गोळी मानता, मग फक्त हिंदू समाजाच्या नावाने बोंबा का मारता? तुमच्या विचारसरणीत प्रजेच्या स्वातंत्र्याला काय स्थान आहे? न्यायाधिश बंड करीत आहेत इतकं स्वातंत्र्य उपभोगता आणि वर मोदींनी स्वातंत्र्याची गळचेपी सुरू केली आहे अशी ओरड कशी मारू शकता? २०१४ च्या निवडणूकीत न भूतो असा पराभव तुम्ही चाखला. प्रत्येक राज्यातून तुमची हाकालपट्टी होत आहे, तरीही तुमचे डावपेच अति टोकाचे का दिसत आहेत? असं वागणं म्हणजे एक प्रकारचे बायपोलर ड्रीप्रेशन असावे का? उत्तरे तुम्हीच शोधावीत. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा जितका तुम्ही मोदींचा द्वेष कराल तितकं तुमचं नुकसान वाढत जाणार. तसेच हे ही ध्यानात असू द्या जर काही न्यायाधिशांनी आपल्या पसंतीच्या राजकीय पक्षाच्या सोयीसाठी बंडखोरी सुरूच ठेवली तर सरकार प्रमूख आणि न्यायालयाचे प्रमूख किर्तन करीत बसतील असे वाटत नाही.

आजच्या भाजपाचे नेतृत्व वाजपेयी आणि अडवाणी ह्यांच्यासारखे नेमस्त नाही हे मान्य. पण सोनीया गांधीच्या नेतृत्वातील काँग्रेस ना नेहरूंची काँग्रेस, ना इंदिराजींची वा राजीव गांधीची राहीली. २००९ मध्ये काँग्रेस जिंकली ह्याचं मुख्य कारण डाव्या पक्षांनी तत्कालीन पंतप्रधान डाॅ. मनमोहनसिंगांची केलेली कोंडी. त्यातून डाॅ. मनमोहनसिंगबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण झाली आणि काँग्रेस विजयी झाली. सोनीया गांधीची समजूत झाली की त्या इंदिरा गांधीपेक्षा महान झाल्या. अंहकार वाढत गेला. आपण विजयी होतच राहणार अशी ठाम समजूत. बस देशाला लूटूया हेच धोरण झाले. काँग्रेसने भ्रष्टाचाराचे शिखर गाठले. मोदींचा पराकोटीचा द्वेष केला आणि हिंदू समाजाचं पध्दतशीरपणे खच्चीकरण करण्यासाठी सत्ता राबविली गेली. सर्वच संस्थांचा कारभार ढोंगी मानवतावादी आणि ढोंगी सर्वधर्मसमभावाल्यांच्या हाती गेला. सेनादलाचे पंख छाटले गेले. आज सेनादलाचे प्रमूख काश्मीर संबंधातील आजादीचे नारे लावणार्यांना कडक शब्दात समज देत आहेत. प्रशासनात आणि सेनादलातील निर्णयासंबंधी त्या त्या अधिकार्यांना स्वतंत्रता देण्यात आली आहे. त्यामूळे कामातील तत्परता आणि पारदर्शकतेचं दर्शन होत आहे. जेव्हा नेता स्वतःच्या दायित्वाशी प्रामाणिक राहतो, शासन कार्यक्षम बनते. जेव्हा नेता अकार्यक्षम आणि अप्रामाणिक असतो, तेव्हा शासन डळमळते. असा कारभार करण्यासाठी, राहूल गांधीकडे परिपक्वता येण्यास किती काळ जाईल हे फक्त काळच ठरवू शकतो. 

भाजपातही वाचाळवीर आहेत पण काँग्रेसच्या मणीशंकर अय्यरसारखी देशद्रोहाची भाषा ते करीत नाहीत. मणीशंकर अय्यर ह्यांच्या निवासस्थानी पाक राजदूतासमवेत जी बैठक झाली तिचं आयोजन सोनीया गांधी ह्यांनी केले होते. त्या बैठकीत माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहनसिंग होते. ही बाब धक्कादायक होती. डाॅ. मनमोहनसिंगांवर सोनीया गांधीची किती हुकमत चालते हे ही दिसून आले. परवा पंतप्रधान मोदींजींची पाक पुरस्कृत दशहतवाद्यांतर्फे हत्या घडवून आणण्याचा कट उघडकीस आल्याचं वृत्त आहे. ह्यावरून अय्यर ह्यांच्या घरी झालेली बैठक तसेच जेएनयुतील साम्यवादी विद्यार्थ्यांनी केलेल्या पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा ह्या देशद्रोहाच्या स्वरूपाच्या होत्या असे भाजपातील वाचाळवीर मानीत असतील तर ह्यात चूक ती काय? भाजपाला मतदारांचा प्रतिसाद जो वाढताना दिसत आहे त्यासंबंधी विचार करता माझ्या एका मित्रानी म्हटलं कि जितकं श्रेय मोदींना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आहे तितकेचं श्रेय विरोधी पक्षाकडे जाते. सोनीया गांधींनी २००४ साली दाखविलेला पंतप्रधानपदाचा त्याग हे केवळ नाटक होतं हे ही आता मतदारांना कळून चुकले आहे. काँग्रेस, साम्यवादी, एनसीपी, तृणमूल, डीएमके, सपा बसपा इत्यादींना पंतप्रधान मोदीच्या लोकप्रियतेचा आणि त्यांच्या राजकीय चालींचा सामना करणे जड झाले आहे. त्यामूळे हे सारे पक्ष सैरभैर होताना दिसत आहेत. ह्यांच्या मुखीया सोनीया गांधीच आहेत. कारण निवडणूकीत लागणारा पैसा त्यांच्यापाशीच आहे. तोही कर्नाटकात उघड झाला आहे. केवळ पैसा आणि प्रतिष्ठा ह्या दोन गोष्टीसाठी अशा पक्षांच्या नेत्यांनी आखलेल्या डावपेचात काही न्यायाधिशांनी सामील व्हावे ही गोष्ट आपल्या लोकशाहीला काळीमा लावणारी आहे. न्यायमुर्ती चेलमेश्लरानी निरोप समारंभ नाकारून काय साधले? आपल्या न्यायव्यवस्थेबद्दल जनतेच्या मनात किती आदर आहे, ह्याची जाणीव ह्या चार बंडखोर न्यायधिशांना नाही का? भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या न्यायव्यवस्थेचा गौरव होत आहे. न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन इतर साथीदार न्यायमूर्तींचे मन वळवून निरोप समारंभ होऊ द्यावा. झाले तितके पुरे असे मानून ह्या न्यायधिशांनी राजकीय पक्षांच्या आहारी जाण्याचे टाळणे हेच योग्य होईल. सन्मानाने निवृत्त व्हावे व सन्मानाने उर्वरीत आयुष्य जगावे. हीच न्यायाधिशांच्या जीवनाची खरी दिशा आहे. कारण लोकशाहीत समाजाचे खरे दिशादर्शक न्यायाधिशच असतात असेच प्रत्येक भारतीय मानतो. आशा करू या न्यायमूर्ती चेलमेश्वरांची निवृत्तीनंतरची वाट विकृतीची ठरणार नाही. कारण नेते जन्माला येतात का ह्याबद्दल मनात संदेह आहे. पण न्यायाधीश जन्मलाच यावे लागतात. कारण न्यायाधिश हे निवृत्ती (म्हणजे ज्यांची वृत्ती सदा स्थिर अशी वृत्ती) जोपासणारी मंडळी मानली जाते.

शुक्रवार, ४ मे, २०१८

कर्नाटकात घनघोर लढाई ?



कर्नाटकात विधान सभेच्या निवडणूकीतला प्रचार आता शिगेला पोहचत आहे. ह्या लेखाचं शिर्षक घनघोर लढाई पण प्रश्नार्थी द्यावेसे वाटले, ह्याबद्दल आपणांस आश्चर्य वाटू नये. कारण इथे काँग्रेस विरूध्द भाजपा असा सामना नाही. इथे तिरंगी लढत आहे. विविध सर्वे त्रिशंखू विधानसभेची शक्यता वर्तवित आहेत. ही निवडणूक काँग्रेससाठी जीवन-मरणाचा प्रश्न झालेला आहे. कारण काँग्रेसला सत्ता राखावयाची आहे. शिवाय राहूल गांधीकडे काँग्रेसचे नेतृत्व आल्यानंतरची ही पहीली निवडणूक आहे. असे असले तरी काँग्रेसला सत्ता राखण्यात अपयश आले तर काँग्रेस राहूल गांधींना अपयशाचे धनी मानणार नाही. अपयश मुख्यमंत्री सिद्धरामय्याच्या माथीं मारून काँग्रेस राहूल गांधीचा बचाव करील. ह्या उलट भाजपाला गमाविण्यासारखे काही नाही. त्यामुळे भाजपा काँग्रेससारखा गोंधळलेल्या स्थितीत दिसत नाही. पुढील वर्षी होणार्या लोकसभेच्या निवडणूकाची ही तालीम आहे हे भाजपाचे नेते जाणून आहेत. म्हणून बुथ स्तरावरील मतदानाचा नीटपणे अभ्यास करून भाजपाने तयारी केलेली दिसते. लोकसभेच्या २८ जागा असलेले हे राज्य. त्यामुळे ह्या राज्याची ही निवडणूक काँग्रेस तसेच भाजपा ह्या दोन राष्ट्रीय स्तरावरील पक्षाच्या दृष्टीने महत्वाची आहे, माजी पंतप्रधान देवेगौडाचा जनता दल( सेक्युलर) हा पक्ष दुर्लक्ष करण्याइतका कमजोर नाही. कारण रामकृष्ण हेगडे ह्यांच्या कारकिर्दपासून समाजवादी विचार मानणारा मतदार कर्नाटकात आजही अस्तित्वात आहे. त्यातही ह्या पक्षाचे नेते देवेगौडांनी भारताचे पंतप्रधानपद भूषविलेले आहे. त्यामूळे पुढील वर्षी होणार्या लोकसभेतील निवडणूकीसाठी लोकसभेच्या २८ जागामधून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या तयारीसाठीची एक संधी म्हणून ही निवडणूक आहे असे देवेगौडा मानत आहेत. ह्याचा अर्थ असा आहे की विरोधी पक्षांमध्ये ममता बॅनर्जी, शरद पवार, चंद्राबाबू, वायएसआर, के राव, इत्यादींच्या मांदियाळीत पंतप्रधानपदाचे एक स्पर्धक म्हणून देवेगौडा ही  तयार आहेत हे स्पष्ट आहे. ओवीसींचा पक्ष स्वतंत्रपणे लढत आहे. तथाकथीत सर्वधर्मसमभावाच्या पक्षांना मानणार्या मतदारांच्या मतांची विभागणी होणार असे दिसते.

एकंदरीत काँग्रेसच्या प्रचाराचं स्वरूप पाहता, एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, ती म्हणजे काँग्रेस पक्षाला कर्नाटकातील सत्ताधारी म्हणून विकासाच्या कामाची जंत्री देता येत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या प्रचारात मोदी विरोध ठळकपणे दिसत आहे. जाती-जमाती मध्ये भेद करूनही काँग्रेसला गुजरातमध्ये  incumbant भाजपाची २० वर्षाची सत्ता हस्तगत करता आली नाही. राज्याचा स्वतंत्र झेंडा तयार करून सिद्धरामयैना  प्रादेशिक अस्मितेचं राजकरण करावे लागत आहे. लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा देण्यासंबंधीचा ठराव पास करून हिंदू मताचं विभाजन करण्याचा घाट काँग्रेसला घालावा लागला. मुस्लीम समाजाला गोंजर्ण्याचे नाटक वठवावं लागत आहे. ऑट्राॅसिटी ॲक्ट संबंधीच्या कोर्टाच्या निर्णयावरून मोदींना घेरण्याची काही गरज नसताना काँग्रेसने दलीत बांधवांना चेतावून धुमाकूळ घातला. न्यायमुर्ती लोय्यांच्या मृत्युसंबंधीची याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळून लावली. आता तर सरन्यायधिशांच्या विरोधात महाअभियोग सुरू करण्याची खटपट काँग्रेसने सुरू केली आहे. काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षाकडे भाजपाच्या विरोधात बोलण्यासारखे मुद्दे नाहीत. ह्यांची राजकीय जाण सर्वधर्मसमभाव आणि असहिष्णुता ह्या दोन विषयापुरती सिमीत झालेली दिसते. अलीकडे विद्वान पत्रकार कुमार केतकरने एक मुद्दा विरोधी पक्षासाठी दिला आहे. म्हणे २०१९ च्या निवडणूकी नंतर मोदी पंतप्रधान झाले तर लोकशाही संपुष्टात येणार. ज्यांनी इंदिरा गांधीच्या काळातील आणिबाणीला पाठींबा दिला होता, अशा पत्रकार, संपादकांच्या मुखात लोकशाहीचे नाव शोभत नाही. तो आणखिन एक कन्हैया कुमार, वयवर्षे ३५. अजूनही जेएनयु मध्ये शिकत आहे आणि आजादीचे नारे देत आहे. ह्या दोन्ही कुमारांना चीनमधील स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या व्यवस्थेचा अभ्यास करावयास पाठवयाला हवं. निदान ह्या दोहोमार्फत ह्या विषयांवर एक छान प्रबंध तरी जगाच्या हाती लागेल. 

पंतप्रधान मोदींच्या विरोधात आग ओतूनही काँग्रेसला गुजरातमध्ये नौतिक विजयातच समाधान मानावे लागले. कर्नाटकाच्या प्रचारातही मोदींना लक्ष्य करीत काँग्रेस फार मोठी चूक करीत आहे. कर्नाटक राज्याचा कारभार तुमच्या हातात असून तुम्ही मोदींच्यावर टिका करीत आहात, ही बाब तार्कीक दृष्ट्या मतदारांना कितपत पटेल? त्यामुळे मोदींच्या विरूध्द केलेला प्रचार कर्नाटकात काँग्रेसच्या अंगलट येण्याची शक्यता अधिक आहे. कारण हा पूर्णतः नकारात्मक प्रचार आहे.तसेच निवडणूकीच्या सामन्याचं स्वरूप मोदी विरूध्द राहूल असे होईल. आणि ह्यामध्ये राहूल गांधीची सपशेल हार होऊ शकते. चाणाक्ष मोदीनी कर्नाटकतील प्रचाराची सुरूवात  राहूल गांधीवरच टिका करून केली. गुजरातमध्ये ख्रिश्चन चर्चच्या बीशपचा 'राष्ट्रवादी शक्तींना पराभूत करा' असा आदेश सोशल मिडीयावर व्हायरल होताच काँग्रेसचा पराभव निश्चीत झाला. तसेच लिंगायत समाजा संबंधीचा निर्णय काँग्रेसला महाग पडण्याची चिन्हे दिसत आहेत. कर्नाटकाचे मुख्यमंत्री हे मुळचे जनता दल( सेक्युलर) पक्षाचे. म्हणजे समाजवादी. समाजवादी मंडळीचं एक खास वैशिष्ट्यं म्हणजे स्वपक्षातील फितूरांना हे कधी जवळ करीत नाहीत. त्यामुळे जनता दल( सेक्युलर) निवडणूकीनंतर काँग्रेसला सहकार्य करील असे वाटत नाही. उलटपक्षी आपल्या मुलाला मुख्यमंत्रीपद मिळवून देवेगौडा केंद्रात मोदीं समवेत बसू शकतील. हा अंदाज सत्यतेकडे अधिक जात आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी साॅफ्ट हिंदुत्वाचं कार्डही खेळत आहेत आणि दुसर्या बाजूला साम्यवादी, माओवाद्यांची साथही घेत आहेत. भरीस भर म्हणून लालू प्रसाद यादवांना भेटायला जात आहेत. लालू प्रसादांना भेटावयास जाण्याची गरज निदान ह्या घटकेला राहूल गांधींना नव्हती. मागेही मी एका लेखात म्हटलं होते की काँग्रेसने लालूप्रसाद यादव आणि साम्यवाद्यांपासून दूर रहावयास हवे. आजही प्रत्येक भारतीय नागरिकास चीनची दादागिरी सहन होत नाही. तसेच लालू प्रसाद यादव हे भ्रष्टाचाराचे मोठे किंग आहेत हे बिहारचा काही भाग वगळता भारतीय जनमनास पटले आहे. सोनिया गांधीकडे काँग्रेसचे नेतृत्व आल्यापासून हिंदूचं खच्चीकरण सातत्याने होत आले, अशी धारणा जनमानसात झालेली आहे. मी स्वतः राजकारणात (१९७५ ते १९८३ ) प्रत्यक्ष काम केलेलं आहे. ग्रामीण भागात अनेक कुटंबे, गावे, तालूके वर्षोनवर्षे काॅग्रेसच्या मतपेट्या होत्या, तिथे आता भाजपाचा झेंडा प्रत्येक कुटंबात दिसू लागला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आपुलकी वाटू लागली. हे सार घडतयं ते केवळ मोदींच्या करिष्म्यामुळे नव्हे. राष्ट्रीय स्वयंसंवक संघाचं विधायक कार्य  भाजपाला उपयोगी पडतेच. पण सोनीया गांधीच्या धोरणामुळे काँग्रेसची हिंदूविरोधी जी प्रतिमा तयार झाली आहे त्याचाही  भाजपाला फायदा होत  आहे. गांधी हत्या, भगवा-आतंकवाद, बाटला हाऊस, सौराबुद्दीन, इशरत जहाॅचं  एन्कांउटर्स  ह्या सर्व मुद्यांचा न्यायालयात बुरखा फाटला आहे. कर्नाटकात बारा हिंदू समाज बांधवांच्या झालेल्या हत्या आणि त्यासंदर्भात आरोपींचा शोध करण्यात सिद्धरामैयांनी जी  ढिलाई दाखविली आहे ती काॅग्रेसला महाग पडण्याची शक्यता आहे. आज  जरासं कुठे, हिंदू समाज वा सणावर टिका झाली की सोशल मिडीयावर अनेक युवक आक्रमक होताना दिसत आहेत. त्यापैकी कित्येक जण भाजपा वा संघाशी प्रत्यक्ष संपर्कात नसलेले आहेत. ही ना लाट, ना क्रान्ती. ही हिंदू समाजात झालेली उत्क्रान्ती होय. काँग्रेस धुरीणांना हे कळतयं; पण वळत नाही अशी स्थिती झाली आहे. राहूल गांधी कितीही मंदिरात जाओ, पण फारसा उपयोग सध्या तरी होणार नाही. ह्याचं कारण हा फार्स आहे, असे लोकांना वाटत आहे. काँग्रेस धुरीणी विशेषतः सोनिया गांधीं पुत्रप्रेमाने अंध झालेल्या आहेत. त्यात कुमार केतकर, कपिल सिबल सारखे तज्ञ अवती-भोवती. काँग्रेस श्रेष्ठी कमालीच्या गोंधळलेल्या स्थितीत असावेत किंवा नॅशनल हेराॅल्डचं भूत त्यांना स्वस्थ बसू देत नसावे. घाईगर्दीने निर्णय घेत एका-मागोमाग हातून चूका घडत आहेत. आपल्या देशाच्या सरन्यायधिशांच्या विरोधी महाभियोग ही एक मोठी घोडचूक आहे.अनेक जेष्ठ, अनुभवी काॅग्रेस नेत्यांना हा निर्णय  पसंत नाही. सर्वसाधारण मतदारांना काँग्रेसची कृष्णकृत्ये कळत नाहीत, अशा भ्रमातच श्रेष्ठी वावरत असतील तर 'विनाशकाले विपरीत बुध्दी' ह्या पलीकडे आणखिन काय म्हणावं? काँग्रेस साम्यवादाची बटीक होत आहे. हाच मोठा अडसर काँग्रेसच्या पुनर्उभारणीत झाला आहे. आजही विरोधी पक्षाकडे ना राष्ट्रीय पातळीवर मोदींच्या तोडीचा नेता, ना काही ठोस कारणें ज्यांच्यावरून ते मतदारांना मोदींपासून दूर नेऊ शकतील. अशा स्थितीत कर्नाटकात होऊ घातलेली ही लढाई घनघोर दिसत असली तरी प्रत्यक्षात मोदींच्या प्रचारसभांचा धडाका सुरू होताच  काँग्रेसच्या हातातून कर्नाटकाची सत्ता निसटत असल्याचे चिन्हे दिसू लागले आहेत.

मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

जशी इच्छा तसा मार्ग


अलीकडे Whats App वर एक पोस्ट आली. ती अशी आहे, "Desires dictates our priorities, priorities shape our choices, and choices determine our actions". वाक्य फार छान आहे. त्या वाक्यातील Desires ह्या शब्दाने मला प्रभावीत केलं. लेख लिहिण्याची इच्छा झाली. वरवर पाहता ही पोस्ट साधी आणि सरळ वाटते. मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्रातील प्रयत्न,यश, तसेच उन्नतीशी निगडीत असलेलं तत्व आहे. पण हाव, स्पर्धा, कलह, आणि अवनती इत्यादी परस्पर विरोधी बाबाशीही तेच तत्व निगडीत असलेले दिसले. मग त्या पोस्टमधील तत्वाचा दोन्ही बाजूचा विचार अंतर्भूत असावा असे ठरले. म्हणजे प्राधान्यावरून गाडी पुढे सरकली. मानव्याचा इच्छा आणि दिशा ह्या बाबतची निवड (choices) लेख लिहिता लिहिता जुळून येतील असे वाटले आणि लिखाणाच्या कृतीस प्रारंभ झाला.

'इच्छा असेल तर मार्ग दिसतो' हे वाक्य आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. विशेषकरून विद्यार्थी दशेत असल्यापासूनचे. एखाद्या विषयात कमी मार्क्स मिळाले, की त्या विषयाचे शिक्षक हमखास हे वाक्य म्हणून दाखवित असत, मग ते शिक्षक भाषा विषयाचे असोत वा नसोत. उद्देश हाच की विद्यार्थ्यांनी अधिक गुण मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी अधिक गुण मिळविण्याची इच्छा धरायला हवी; फलंदाजाने अधिक धावा काढण्याची इच्छा धरावी; विम्याच्या एजंटाने अधिकाधिक ग्राहक मिळवावेत अशी इच्छा धरावी; उत्पादक क्षेत्रातल्या मंडळींनी अधिकाधिक उत्पदानाची इच्छा धरावी; संशोंधकांनी अधिकाधिक क्षेत्र पादांक्रान्त करावयास हवेत; विक्रय क्षेत्रातल्या मंडळींनी अधिकाधिक आपला माल विक्रीची इच्छा धरावयास हवी. हे सारं जग विविध इच्छा-आकांक्षाने ओतप्रोत भरलेलं आहे. म्हणूनच तर हे जग अव्यहातपणे चालत आले आहे. There is no human being without any desires. अगदी ज्यानां कसलीही इच्छा नसणार्या अशा आपल्या साधू संतानाही इच्छा होती. कुठली? तर आपल्या कल्याणाची. हा फरक आपण आणि संत मंडळीत. शास्त्रज्ञांनाही मी देवदूत मानतो. बहुतांश शास्त्रज्ञांच्या मनात मानवाचं जीवन कल्याणमय आणि सुखमय होवो हीच इच्छा असते; मग तिचं स्वरूप आंतरिक शक्तीत होते; पुढे त्यांची ही आतंरिक शक्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही त्यातून मानवाच्या गरजांचा शोध सुरू झाला; पुढे संशोधनाचं काम सुरू झालं; नवे शोध लागले; नवीन शोध लागत राहणार; अखिल मानव जातीचं जीवन सुकर होत गेले आणि होत राहणार. परंतु त्यांच्या शोधांचा दुरूपयोग करण्यांची इच्छा जगभरातल्या राजकीय नेत्यांत होऊ लागली आणि त्यातून विनाशाचं संकट उभं राहिलं, त्यात शास्त्रज्ञांचा दोष नाही.

वरील पोस्ट मधील पहीलं वाक्य आहे, Desires dictates our priorities. आपल्या इच्छेनुसार आपण आपले प्राधान्य वा पर्याय शोधत असतो. म्हणजे आपल्या इच्छा बर्याच असतात म्हणून आपण प्राधान्याचा वा पर्यायाचा शोध घेत असतो. असाही अर्थ निघू शकतो. पण ज्या लेखकाने हे वाक्य सांगितले आहे, त्यांनी निश्चीतपणे एक ठोस मानशास्त्रीय सिध्दान्त मांडला आहे.  जो आपल्या जीवनातल्या यशासाठी आवश्यक असतो. तो सिध्दान्त कुठला? " Without an aim, man is like a wall clock without cell ". ध्येय, गरज, आणि इच्छा ह्या तशा भिन्न गोष्टी दिसत असल्या तरी ध्येय आणि गरज ह्यांची जननी इच्छा हीच असावी.  

एकदा एका गरीब शाळकरी विद्यार्थ्याने 'मी मोठा झाल्यावर उद्योगपती होणार ' ह्या विषयावर निबंध लिहीला. सर्व विद्यार्थ्यांनी आपआपल्या परीने निबंध लिहीले. कोणी मी शिक्षक होणार, कोणी डाॅक्टर होणार, कोणी इंजिनियर, कोणी पायलट असे ठराविक साच्यातलेच निबंध लिहले. शिक्षकाने सर्व विद्यार्थांचे निबंध वाचले. पण त्या गरीब विद्यार्थाने लिहीलेला निबंध वर्गशिक्षकाने न वाचताच, तू कसला उद्योगपती होतोय, असे म्हणत त्याने लिहिलेल्या निबंधांच्या कागदाचे दोन तुकडे करून कोपर्यात भिर्कावून दिले आणि म्हणाले, उद्या दुसरा निबंध लिहून आण. तो गरीब विद्यार्थी आपल्या घरी रडत रडत परतला. घर कसले? घोड्याचा तबेला हेच घर. त्याचे वडील एका रेसकोर्सच्या मालकाकडे घोड्याची निगा राखण्याचे काम करीत असे. आपला मुलगा रडत येत आहे, हे पाहील्यावर वडीलाने मुलाला कुशीत घेतले आणि काय झालं ह्याची विचारणा केली. मुलगा रडत रडत म्हणाला "बाबा, मी लिहलेला निबंध गुरूजीने फाडून टाकला. हे बघा ,फाडलेल्या निबंथाचे हे तुकडे." त्या मुलाचे वडील थोडेफार शिकलेले होते. आपल्या मुलाचं सांत्वन करीत ते म्हणाले "बेटा, आपण गरीब! उद्योगधंद्याला फार फार पैसे लागतात. माझे वडील ह्याच शेठजीकडे कामाला होते. माझे वडील गरीब. म्हणून मी ही गरीब राहीलो." त्यावर मुलगा म्हणाला "बाबा, मी ह्या शाळेत कसा जाऊ? सर्व विद्यार्थी माझी चेष्टा उडवितात."  त्यावर त्याचे वडील म्हणाले, "थोडे दिवस ह्या शाळेत जा, आपण दुसर्या शहरात रहावयास जाऊ. मी तिथे दुसर्या शेठजीकडे नोकरी करीन." कसंबसं ते शैक्षणीक वर्ष मुलाने त्या शाळेत पूर्ण केलं. त्यानंतर वीस-पचवीस वर्षे लोटली. तो मुलगा ज्या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत शिकला, त्या शाळेचा सुवर्ण महोत्सव होता. जे त्याचे वर्गशिक्षक होते, ते आता शाळेचे मुख्याधापक झाले होते. आजी-माजी विद्यार्थी -पालक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत समारंभ झाला. प्रमूख पाहूण्याचं खास सत्कार झाला. त्याने शाळेला देणगी दिली होती. त्यांच भाषण सुरू झाले. त्यानी प्रथम आभार शाळेचे आभार मानले आणि म्हणाले " मित्रहो पचवीस वर्षे पूर्वी मी ह्या शाळेत शिकायला होतो. इयत्ता पहिले ते पाचवी पर्यंत. पुढे ते म्हणाले आज जे मुख्याध्यापक आहेत, ते माझे वर्गशिक्षक होते; मी आज आपल्यासमोर उद्योगपपती म्हणून उभा आहे, ह्याच श्रेय आजच्या मुख्याध्यापकांना जाते. मीच तो गरीब विद्यार्थी आपल्या वडीलासोबत घोड्याच्या तबेलात राहणारा. इयत्ता पाचवीत असतांना मी उद्योगपती होणार असा निबंध लिहीला होता. त्यावेळी ह्या मुख्यध्यापकांनी वर्गात मी लिहिलेला निबंधचा कागद फाडून टाकला होता." असे म्हणत त्यांनी आपल्या खिशातून ज्यावर निबंध लिहीला होता, त्या कागदाचे तुकडे बाहेर काढले. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट झाला. मुख्याध्यापकाकडे कोणी पाहीलेही नाही. ही कथा काल्पनिक असली तरी अनेक उद्योगपतींच्या, जीवनातील यशाशी साधर्म्य दाखविणारी आहे. सारांश हाच की जबरदस्त इच्छा असली की कुठलेही क्षेत्र पादक्रान्त करता येते. हा झाला मानसशास्त्रीय सिध्दांत. 

"Economics is a science of human behaviour between scare means and unlimited wants. अमर्याद गरजा आणि त्या पुर्या करण्याच्या साधन-सामुग्रीची कमतरता ह्यातून मानवाचा जो मनोव्यापार होतो त्याचेच नाव अर्थशास्त्र. बाजारातून शूज घेतले की पायमोजे घ्यावे लागतात. पाॅलीशची डबी, ब्रश हे ही घ्यावे लागते. ह्या गरजाच होत. शूज घेण्यची कल्पना ही मूळ इच्छा. मग पावसाळ्यासाठी वाॅटरफ्रूप शूज घेणे ही गरज ओघाने निर्माण होते. अशा प्रकारे वाढत जाणार्या गरजांचा उद्योजक अभ्यास करतात, मग वस्तू निर्मीती करतात. प्रत्येक वस्तूच्या निर्मीतीला स्पर्धकही असतात. एकदा का निर्मीती क्षेत्रात स्पर्धा आली की विक्री क्षेत्रातही स्पर्धा निर्माण होते. हळूहळू स्पर्धेत टिकणे ही गरज नव्हे तर इच्छा बनून राहते असा हा इच्छेचा खेळ आहे. आम्ही दिवाळी- दसरा इत्यादी सण साजरे करतो. तेही कुटूंबियासमवेत. परंतू ह्याच दिवसात व्यापारी आपआपली दूकाने उघडी ठेवतात. म्हणून आपली खरेदीची इच्छा पूर्ण होते. व्यापारानांही आपल्या कुटुंबासमवेत सण साजरे करावयाची इच्छा असते. परंतु शेवटी प्राधान्य(Priroity) आपला माल खपावा ह्यालाच दिले जाते. हा झाला उद्योग व व्यवसायातील यशाची निगडीत असलेला अर्थशास्त्रीय सिध्दांत.

जगभरातील सर्व साधू-संत, गेल्या दोन शतकातील थोर नेते, उद्योगपती, शास्त्रज्ञ ह्यांचे एका मूलभूत तत्वावर एकमत आहे, ते म्हणजे आयुष्यात काही भव्य दिव्य कामगिरी करावयाची असेल, तर मनुष्याची आंतरिक ओढ सर्वात महत्वाची असते. स्वतःच्या भावनांची ओळख असणे ही जीवनाची गुरूकिल्ली आहे. स्वामी मुक्तानंद म्हणतात, 'प्रथम स्वतःवर प्रेम करा. म्हणजे स्वतःला ओळखा. स्वतःला हीन, दीन मानू नका.' बहिष्कृतेचा शाप असूनही एकलव्य, कर्णाने आपले बलकौशल्य सिध्द केले. बालवयातच पोलीओमूळे दोन्ही पाय निकामी होऊन आपल्या आंतरिक इच्छेवर बीऐ, एमए टेक्स्टाईल डीझायनिंग अशा पदव्या घेत फॅशन टेक्नाॅलाॅजीमध्ये आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविणारी गीता कॅस्टोलिनो ही बालमोहन शाळेतील अपंग विद्यार्थिनी, ही दंतकथा नसून हकीकत आहे. इच्छा म्हणजे आंकाक्षा. म्हणजे मनाच्या गाडीचं इंधन, ऊर्जा. जितकी आकांक्षा मोठी तितकी प्रगतीची गती अधिक. 'आंकाक्षा पुढती गगन ठेंगणे' ही अतिशोयक्ती नाही तर ते एक सत्य आहे. आकाशावर नेम धरावा, फार तर तो झाडाच्या शेंड्यापर्यंत जाईल. आता माणूस इतर ग्रहावरही जाण्याच्या तयारीत आहे. प्रथम वेडगळ वाटणार्या कल्पना माणसाने मूर्त स्वरूपात आणल्या. संत रामदास स्वामी म्हणतात "उत्कट भव्य तेची घ्यावे, मिळमिळीत अवघे टाकावें!" ही सृष्टीच मूळी चैतन्याचा अविष्कार आहे. सार्या सजीव प्राण्यांमध्ये मानवाने आपली उत्क्रान्ती केली ती केवळ आकांक्षाच्या बळावर. ह्यालाच म्हणतात आत्मीक शक्तीची अनुभूती. सोsअहं!

प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा तशा भिन्न असतात तसेच स्थल-कालानूसारही बदलत असतात. त्यामूळे त्याची गणती न करता येण्यासारखी. 
                           'जशी दृष्टी तशी सृष्टी'
                           'जसा देश तसा वेष' 
                           'जशी माती तशी रूची'
                           'व्यक्ती तितक्या प्रकृती'
                           'जशी प्रकृती तशी मती' 
                           'जशी मती तशी आसक्ती' 
                           'जशी भक्ती तशी विरक्ती' 
इत्यादी सारे नैसर्गिक सिध्दान्त. ह्या संबंधी मी 'चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः' ह्या लेखात सविस्तर चर्चा केली आहे. अगदी इतर प्राणीमांत्रातही इच्छा ठासून भरलेली असते. हा सृष्टीचा नियम आहे. आपण जग जवळ आले असे म्हणतो. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्रान्तीमूळे आपण असे म्हणत असलो तरी विश्व प्रसरण पावत आहे, ही वस्तूस्थिती आहे. मानवी जीवनातील ज्ञानाच्या कक्षा वाढत आहेत. त्याला मर्यादा नाही. त्यामूळे मनात इच्छा निर्माण होणाची जी एक स्वाभाविक प्रक्रीया आहे तीचं सुध्दा विस्तारणं ओघाने होत असावे. त्यामूळेच वरील पोस्टमध्ये Desires, Prirorities, Choices, Actions हे अनेकवचनी रूपात दिसत आहेत. पण इच्छा, प्राधान्य, निवड ह्या सार्या गोष्टी जूळून आल्या तरी  Without action the combination of desire, prirority, and choice  would be just a fiction.

इच्छा शुध्द आहे; प्राधान्याबाबत गोंधळ नाही; निवडही ठोस आहे; कृतीतही हलगर्जीपणा नाही, तरी त्याला यश हूलकावणी देते. असा वर्ग म्हणजे आपला अन्नदाता, शेतकरी. असे का? पाऊस नसला की मेहनत वाया व बीयाणे वाया. पाऊस समाधानकारक ; पीकं तयार; पण नंतर गारपीटाचं संकट. कधी चांगला पाऊस; चांगलं पीक; पण शेतमालाला भाव नाही. असे हे दृष्टचक्र वाट्याला. इथे स्वातंत्र्यापूर्वी मोगल व ब्रिटिश सत्ताधारी; नंतर स्वातंत्र्यानंतर स्वदेशी सत्ताधारी. ह्यां सर्वांच्या  इच्छाशक्तीतच दोष. पावसाच्या पाण्याची साठवणी असो वा नद्यांच्यी जोडणी असो, ह्याबाबत ना इच्छा ना प्राधान्य, मग निवड तरी कशी असणार? कृती राहीली दूरच. ह्याला जबाबदार आपणही आहोतच. इच्छेचं रूपातंर उपभोगात, लालसेत, वासनेत मग निसर्गालाच ओरबडायचं; पर्यावरणाचा र्हास. मग नेमेची पाऊस, हवामान दगा देणारच.  इथेही गरज आहे ती इच्छेला सात्विकाचा आधार जोडण्याची.

इच्छेतून जसे शूभ विचार तयार होतात, तसेच विकारही निर्माण होतात. मनही अशुध्द,अशुभ असावे की काय असा प्रश्न पडतो. अन्यथा 'शुभेच्छा' हा शब्दच अस्तित्वात आला नसता. मनातील शूभसंकल्प पक्का असला, म्हणजे आपोआप बाधा पोषक ठरतात. निंदकच स्तुतिपाठक होतो. पण इच्छेतून विकार बाहेर येऊ लागले की प्राधान्य ही दुर्गंधीमय होते, पाठोपाठ निवड बनते अडगळ. शेवटी कृतीच विकृती होते. 

एकदा एका राज्यातील तरूणांना राजदरबारी नोकर्या मिळावेत अशी इच्छा झाली. त्यानीं तेथील राजाला शुध्द पोटी ही इच्छा व्यक्त केली असती तर प्रश्न नव्हता. परंतू ह्या तरूणांनी राजदरबारातील वृध्दांना काढावे आणि आम्हा तरूणांना नोकर्या द्याव्यात, आम्ही राज्याचा कायापालट करू असे राजापुढे मत मांडले. राजाने म्हटले, "हो, तरूणांची आता भरती करायला हवी. पण तुम्ही मला एका प्रश्नाचे उत्तर द्या. जर तुमच्या राजाच्या डोक्यावर कोणी लाथ मारली तर त्या इसमास काय शिक्षा द्यावी?" कसलाही विचार न करता ते तरूण म्हणाले " महाराज त्या इसमाला लागलीच चौकावर चाबकाचे फटके मारावेत आणि फाशी द्यावी". हाच प्रश्न राजाने आपल्या दरबारातील वृध्द सेवकांना प्रश्न विचारला." त्यावर ते वृध्द सेवक म्हणाले "आम्हांला थोडा अवधी द्या". राजाने त्यांना थोडा अवधी दिला. ते वृध्द सेवक एका कोपर्यात गेले. तोवर ह्या तरूणांनी राजाला म्हटले " बघितलं महाराज, असा हा ह्यांचा वेळकाढूपणा". दरम्यान तिथे कोपर्यात वृध्द सेवकांनी विचार केला, राजाच्या डोक्यावर लाथ मारायची हिम्मत कोणाला होणार? आणि मारणार तरी कशी? महलात तर राजासोबत युवराज आणि राणी असतात. अगदी नजीकचे म्हणून राणी वा युवराज राजाच्या डोक्यावर लाथ मारू शकतात, मग त्यांना शिक्षा आपण कशी सूचविणार? बस ते राजापाशी आले आणि म्हणाले " महाराज त्या इसमाला सोडून द्यावे." राजानी तरूणांना सांगितले  "दरबारातील कारभार बघण्यास ही वृध्द मंडळीच योग्य आहेत. तुम्ही तुमच्या कुवतीनूसार काय तो अर्थ लावा किंवा बोध घ्या." इच्छेचं ईर्ष्यात रूपातंर झाले की काय होतयं ते आपण पाहीलं. तो राजा विवेकशून्य नव्हता. म्हणून पुढचा अनर्थ टळला.

आजकाल इच्छेऐवजी इर्षेची लागण पाहावयास मिळते. स्पर्धेच्या नावाखाली मूळ इच्छेचं स्वरूप नष्ट झाल्याचा अनुभव येतोय. चंगळवाद, उपभोगता, स्त्रीया-मुलींवर होणारे अत्याचार, खून-दरोडे, फसवेगिरी, भ्रष्टाचार, आर्थिक घोटाळे, दशहतवाद, नक्षलवाद, जगभरात निर्माण झालेली साम्राज्यवादाची लालसा, भयानक स्वरूप घेत असलेली शस्त्रस्पर्धा, सत्ताधार्यांच्या सत्तेची भूक ह्या सार्या गोष्टी काय दर्शवीत आहेत? इच्छा ह्या सात्वीक स्वरूपाच्या असाव्या लागतात. नसल्या की प्राधान्य बदलतात, मग हातून दुष्कृत्यें घडतात. मुळ इच्छा सात्वीक स्वरूपाचीच असावी. म्हणजे 'ना लालसा ना वासना'. 'ना प्रेम ना हेवा'. पण विवेक हरवून बसलो की शूभसंकल्पाची जागा अनाठायी, बाधक विकल्प घेतात. "मनी वसे, ते स्वप्नी दिसे" असे आपण म्हणतो. त्याच न्यायाने "मनी वसे,तेच हातून घडते" असे म्हणण्यात का येऊ नये? माणूस म्हणजे देवत्व आणि पशूत्व ह्यामधील एक ताण आहे. सार्याच गोष्टी मनाच्या पातळीवरून करावयाच्या झाल्या तर मनुष्याच्या पदरी दुःख आणि निराशा येते. म्हणून इच्छांना बुध्दीचाही बांध असावा लागतो. त्याला विवेक म्हणतात.स्कंद पुराणात मुनीवर्य यक्षमाताला म्हणतात," गुरूर्रेको विवेकः सदा ध्यायो!" 'मनाला लगाम लावा' असे म्हटले जाते, ते योग्यच होय. सार्या गोष्टी केवळ बुध्दीच्या पातळीवरून सोडविण्याचा प्रयत्नही वेडसरपणा ठरतो, कारण मनाची संवेदनशीलता शुष्क होऊन जाते. फक्त शरीर हाच देह मानला तर शेपूट नसलेला पशू हीच आपली ओळख होईल. म्हणून देवत्वाचा ध्यास हा सर्व प्रकारच्या इच्छा-आकांक्षांना सात्विक आधार बनू शकतो. म्हणजेच प्रवृत्तीकडून संस्कृतीकडे जाण्याचा प्रयत्न करणे. हाच उपाय संत रामदास स्वामीनी दिला आहे. 

          सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे| 
                परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे ||

बुधवार, ४ एप्रिल, २०१८

ॲट्राॅसिटी ॲक्ट,न्यायालयाची ॲक्शन व अंदोलन


अनुसूचित जाती-जमातीच्या मागास व दुर्बळ लोकांवरील अत्याचारांना पायबंद रोखण्यासाठी १९८९ साली भारत सरकारने ॲट्राॅसिटी ॲक्ट पारित केला होता. त्या कायद्यात अशी तरतूद आहे की ज्या व्यक्तीवर वर नमूद केलेल्या समाजातील वर्गावर अत्याचाराचा आरोप असेल तर ॲट्राॅसिटी कायद्याच्या कलम१८ अन्वये त्या व्यक्तीला अटक पूर्व जामीन न देता तात्काळ अटक होत असे. बुधवार २० मार्च रोजी माननीय सर्वोच्च न्यायलयाने डाॅ सुभाष महाजन विरूध्द महाराष्ट्र सरकार ह्या विषयाशी संबंधीत याचिकेवर  सुनावणी करताना विना चौकशी आरोपीला तात्काळ अटक करता येणार नाही असा निर्णय दिला. हा निर्णय देते वेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आरोपी सरकारी कर्मचारी असेल तर त्याला अटक करण्यासाठी आरोपीच्या वरीष्ठ अधिकार्याची लेखी परवानगी घ्यावी लागेल तसेच आरोपी सरकारी कर्मचारी नसेल तर वरिष्ठ पोलीस अधिक्षकाची लेखी परवानगी घ्यावी लागेल अशी अट ही टाकली. आणखिन पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने, दोन्ही प्रकारच्या आरोपींना अटक करावयाची असेल तर अटकेची परवानगी देणार्या अधिकार्याने सोबत कारणें जोडावीत हे ही स्पष्ट केले.

ॲट्राॅसिटी कायद्या संबंधीत  डाॅ सुभाष महाजन विरूध्द महाराष्ट्र सरकार ह्या याचिकेच्या  खोलात न जाता ही, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून स्पष्ट दिसतेय कि सर्वोच्च न्यायालयाला ॲट्राॅसिटी ॲक्टचा दुरूपयोग होत असावा, ह्याची ठाम खात्री झालेली दिसते. त्यामूळे, सर्वोच्च न्यायालयाने वरील निर्णयासंबंधी पुनर्विचार याचिका जी केंद्र सरकारने दाखल केली आहे त्यावर सुनावणी बाकी आहे. त्यामुळे परवा सुरू झालेली  जाळपोळ हा अतातायीपणा वाटतो. सरकारी मालमत्तेची जाळपोळ करून आपण क्रान्तीकार आहोत, अमक्या शहरात आमचाच आवाज आहे असे दाखविण्याची स्पर्धा काही राजकीय पक्षात आहे. याचे भान सुप्रिम कोर्टाला आहे. म्हणून सुप्रिम कोर्टाने २० मार्चच्या निर्णयाला स्टे देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. समाजशास्त्राचा आणि मानसशास्त्राचा  ज्यांचा अभ्यास आहे अशी मंडळी निश्चीतच मान्य करतील  कि एखाद्या कुटूंबात एका मुलाचे अती लाड झाले कि ते मूल डोक्यावर बसते. तद्वतच फार काळापासून सुरू राहीलेल्या आरक्षणाची सवलत, आणि ॲट्रासिटीसारख्या कायद्याचं हत्यार हाती मिळालं की मूल डोक्यावर बसण्याची शक्यता नाही असे कसे मानता येईल? आणि मानले तरी किती काळासाठी? कुटुंबातील इतर मुलांची काळजी घेऊ नये का? आज देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या जातींनांही आरक्षण हवेसे वाटू लागलंय. एकविसाव्या शतकातील महासत्ता होण्याची स्वप्न पाहणार्या आपल्या सारख्या देशात सर्वच समाजबांधवांना आरक्षण हवे असे वाटणे उचीत आहे का? न्यायालयं कधीही भावनेच्या आहारी जाऊन निर्णय देत नसतात. त्यांना राजकीय फायद्या-तोट्याचं गणित मांडून निर्णय द्यावयाचा नसतो. त्यामूळे परवा सर्वोच्च न्यायालयाने म्हटले "आम्ही कोठल्या एका समाजाविरूध्द नाही, ॲट्राॅसिटी कायद्याच्या ढाचाला सुध्दा आम्ही बदललेलं नाही. कायद्यातील सवलतीतून उगीचच दुरूपयोग करण्याची संधी मिळू नये आणि निर्दोष व्यक्तीचा छळ होता कामा नये" हाच आमचा हेतू आहे". 

मुळात ॲट्राॅसिटीचा कायदा पास झाला, त्या वेळेला सत्तेवर भाजपा नव्हता, आणि कायदा सर्वसंमतीने किंवा बहूमताने पास झालेला असला तरी ह्या कायद्यात काही त्रूटी असतील, तर त्याचं खापर वर्तमान मोदी सरकारवर फोडावयाची गरज नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने २० मार्चच्या आपल्या निकालपत्रात स्पष्टपणे म्हटलं आहे कि 'ॲट्राॅसिटीच्या कायद्यातील कलम १८ नुसार, आरोपीला अटकपूर्व जामीन देण्यास पूर्ण प्रतिबंध कोठे आहे?'. सर्वोच्च न्यायालयापेक्षा  कायद्याचा अभ्यास  जाळपोळ करणार्या टपोरी पोरांना वा त्यांच्या नेत्यांना अधिक आहे असे समजावयाचे का आपण? ॲट्रिसिटी 
ॲक्ट संबंधीबाबत ज्या काही शंका-कुशंका असतील त्यावर सरकारशी सहकार्य करून सोडविता येऊ शकतात. त्यासाठी मोदी सरकारला आरोपीच्या पिंजर्यांत उभे करण्याची जरूरी नाही. आणि जाळपोळ, हिंसक कृत्ये करणे हे तर बेशरमपणाचे लक्षण. अगदी तुमच्या मागण्या रास्त असल्या तरीही.

आपल्या येथील राजकीय पक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रीया देताना आम्ही कायद्याचा आणि न्यायालयाचा  मान राखतो असे म्हणतात, पण दुसर्या बाजूने त्या निकालावरून  राजकीय फायदा उठविण्यासाठी समाजातील विशिष्ट वर्गांना हाताशी धरून अंसतोष माजविण्यासाठी अंदोलने करीत सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे, जाती-जमातींत तेढ वाढविण्याच्या धोकादायक खेळी रचत असतात. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पुनर्विचार याचिकेचा निकाल यावयाच्या अगोदरच दलीत बांधवांनी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याचा धूडघूस सुरू केलेला आहे. हे अंदोलन पूर्वनियोजीतच.  हे अंदोलन अजूनही तीव्र ही होण्याची शक्यता आहे. मला प्रश्न हा पडलाय की डाॅ बाबासाहेब आंबेडकरांची भारतिय संविधानाचा शिल्पकार म्हणून पूजा करावयाची , आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी 'माझं नाव बंडखोर म्हणून नोंद होणार नाही ह्याची काळजी घ्या' हा सल्ला दलित बांधव व त्यांचे नेते पाळत का नाहीत? सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल पचविण्याची ताकद जर नसेल, तर अशा लोकांनी आणि त्यांच्या नेत्यांनी डाॅ बाबासाहैब आंबेडकराचं नाव घेण्याचं बंद करावं. अंदोलनं करता येतात, जाळपोळ करता येते, आणि वर आम्ही क्रान्तीचा झेंडा हातात घेतला आहे असे म्हणत मिरवावयाचे हे अनुचीत आहे. खरं म्हणजे क्रान्तीची भाषा करण्यांना मागासवर्गीय का म्हणावे? सवलती घ्याव्यात आणि कर्तव्ये पाळायची नाहीत, हाच स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा, समतेचा अर्थ आहे काय?

केवळ दलीत बांधव अंदोलनाला हिंसक स्वरूप देतात असे समजण्याचे कारण नाही. कुठे जातीची अस्मिता, तर कुठे प्रादेशिक अस्मिता पेटविण्याचे काम करीत दंगा, सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ, मोडतोड करणे, असे प्रकार होत असतात. त्यातूनच राजकीय पक्षांच्या नेत्यांना थोरपद प्राप्त होत असते. हे आपल्या राजकीय व्यवस्थेला लागलेली मोठी खोड आहे.  मग कोणी स्वतःला पुरोगामी माना, वा गांधीवादी. सब घोडे बारा टक्के. कोणी छत्रपतींचं नाव घेतात, कोणी राणा प्रतापांचं. कोणी शाहू-फूलेंच तर कोणी पेरियनचं. कोणी राणी पद्मावतीचं. आणि ही नावं ज्यांना परिचीत नाहीत ते अफझल गुरू, तालीबान, लादेन ह्यांची किंवा लेनीन, स्टॅलीन, कार्ल मार्क्स, माओ इत्यादींची नावे घेऊन तोडफोड, जाळपोळ करीत असतात.अलीकडे  कन्हैया, मेवानी सारखे साम्यवादी युवक आजादी, रोटी,कपडा, सर्वधर्मसमभावाच्या गप्पा मारत चमकण्याचा प्रयत्न करीत आहेत. ह्या साम्यवादी युवकांनी चीनमध्ये जाऊन आजादीच्या घोषणा करून दाखवाव्यात. साम्यवादी जेव्हा  स्वातंत्र्य आणि सर्वधर्मसमभाव, अंहिसाच्या गप्पा मारतात तेव्हा वांझ म्हशीने वीस लिटर दूध दिल्याची  बातमी ऐकल्यासारखे वाटते.   

लोकसभेच्या निवडणूकीचे वेध सर्वच पक्षांना लागले आहेत. ते ही स्वाभाविकच आहे म्हणा. प्रत्येक पक्ष आपल्या हिताची काळजी घेणार हे ही ओघाने आलेच. भाजप ही धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे असे मानण्याचे कारण नाही. प्रश्न हा आहे की राष्ट्रीय संपत्तीची नासाडी किती वेळ करीत रहावयाचे? प्रांजळपणे आणि निरपेक्ष भावनेने एवढंच म्हणता येईल कि अलीकडचा तोंडी तलाकासंबंधीचा निर्णय असो, वा पद्मीनी राणीवरील पद्मावती चित्रपटामूळे उठलेलं वादळ असो, कर्नाटकातील लिंगायत समाजाला धार्मिक  दर्जा देण्याचा निर्णय, आणि ॲट्रासिटी कायद्यासंबंधातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असो, ह्या सार्या बाबीशी पंतप्रधान मोदी आणि त्यांचं सरकार ह्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नाही. ह्यातून जे काही अंदोलने उभी राहात आहेत ही फसवी आहेत. तोंडी तलाखा संबंधी रविवार ४ फेब्रवारच्या मटामधील संवाद पुरवणीत लिहिलेल्या आपल्या लेखात मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष श्री शमशुदीन तांबोळींनी शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळेंच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आणि त्या नाराजींतून त्यानी मुस्लीम सत्यशोधकचे संस्थापक आणि विचारवंत दिवंगत हमीद हलवई जे सतत म्हणत असलेले वाक्य, त्या लेखात पेरले आहे. ते असे आहे, "काही पुरोगामी हिंदू मंडळी मुस्लीमांची इतकी बाजू घेतात, कि ती मंडळी मुस्लीमाहून अधिक मुस्लीम वाटतात". दलीत समाजाबद्दल सार्या विरोधी पक्षांना वाटणारी सहानुभूती तसेच लिंगायत समाजाबद्दल काॅग्रेसला वाटणारी सहानुभूती ह्याच प्रकारात मोडते. 

खरं म्हणजे मोदी सरकार विरूध्दच्या लढाईत सरळ मार्गाने जिंकता येणार नाही ह्याची जाणीव विरोधी पक्षांना झालेली आहे.Biggest challenge in front of all opposition parties is Modi's popularaty which is in tact. कर्नाटकातील निवडणूका हे राहूल गांथीच्या कुवतीसंबंधीची ठरणार आहे.  तिथेही Huge antiincumbancy is prevailing against Congress Rule. नोटाबंदी दिवस हा ' काळा दिवस ' मानण्याचा कार्यक्रम फ्लाॅफ ठरला. उत्तर  भारतात काॅग्रेसचे नामोनिशाण राहीले नाही. भाजप शासीत मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधील लढाईत काॅग्रेस कडवी झुंज देण्याइतकी बलशाली नाही. राजस्थान मध्ये काॅग्रेस विधानसभेत भाजपाला कडवी झुंज देईल पण लोकसभेच्या निवडणूकीत काॅग्रेस भाजपावर मात करील असे वाटत नाही. मोदी सरकार विरूध्द भ्रष्टाचारचा आरोप करता येत नाही. भाजपा अध्यक्ष श्री अमीत शहांच्या मुलावर कमाॅडीटी व्यवहारात  भ्रष्टाचाराचा जो आरोप विरोधी पक्ष करीत आहेत, त्यासंबधीचे पुरावे विरोधी पक्षाकडे नाहीत. त्यातही बहूतांश विरोधी पक्षांच्या नेत्यावर  भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामूळे  त्यासंबंधीच्या लढाईत जोश दिसणार नाही. विरोधी पक्षांची आघाडी आकारास येण्यामध्ये महत्वाचा अडसर आहे, तो म्हणजे, प्रादेशिक पक्षातील नेत्यांमध्ये सर्वात सक्षम कोण, हे दाखविण्याची स्पर्धा.  त्यामुळे चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, वायएसआर, के राव, शरद पवार इत्यादी नेते ॲक्टीव झालेले दिसत आहेत. वस्तुस्थिती ही आहे की आपण मोदीजींना हरवू शकतो, ह्याबद्दलचा आत्मविश्वासच विरोधी पक्षाकडे नाही. काही विरोधी पक्ष कुंपणावर बसले आहेत. काही विरोधी पक्ष नैराश्याच्या गर्केत पडले आहेत. त्यामुळे काहीतरी कारणे शोधून विरोधी पक्षातर्फ  हिंसक अंदोलने  केली जात आहेत. ह्यात  त्यांना आणि देशाला काय फायदा होणार आहे  ह्याचं उत्तर जनता २०१९च्या निवडणूकीत देईल. पण तोपर्यंत  'सर्वात मोठी लोकशाही' असा बिल्ला लावून होणारा  रेल्वे रोको किंवा उपोषण, कुठे मार्चा  कुठे हिंसा, कुठे जाळपोळ, कुठे पुतळ्यांची विटंबना पाहात रहावे या पलिकडे आपण मतदार किंवा लोकशाहीचे मालक काही करू शकत नाही. 

शनिवार, १७ मार्च, २०१८

॥ परनिंदा भयावहा ॥

" परनिंदा भयावहा " ह्या वचनावर आधारीत एक ऑडीओ पोस्ट Whatapp ग्रुपवर आली. ती ऑडीओ क्लीप ऐकली. मी मनापासून दाद दिली. त्यात आजच्या समाजाला परनिंदा ह्या रोगाने कसा विळखा घातला आहे ह्याचं वास्तव चित्र समोर उभे राहीलं. परनिंदा भयावहा असे माहित असूनही  ती सवय आहे, स्वभाव आहे, चलता है, यही तो जिंदगी है, असे म्हणत आपण परनिंदा ह्या प्रवृत्तीला हसण्यावरून नेत आहोत, अशी जाणीव झाली. मूळात परनिंदा ही मोठी विकृती आहे. हे ही जाणवलं. माणूस परनिंदा का करतो? आणि परनिंदेची साथ समाजाला विळखा घालेपर्यंत वाढत का जाते, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणे सोपं आहे. कारण बहूतांश आपण सारेच ह्या रोगाचे पेशंट आहोत. पण त्यावर इलाज काय? आणि कुठल्या डाॅक्टराकडे जावे लागेल? उपचार घेतले तर त्या बाधेचा संपूर्ण नायनाट होऊ शकेल का? ह्यावरील चर्चा शेवटी करू. प्रथम परनिंदा रोगाची निर्मीती कोठून सुरू होते, ते पाहू या. 

ईश्वराचं अस्तीत्व कोणी मानो की न मानो, तसेच महाभारत घडले की नाही, ह्यावर मतभिन्नता असली तरी एक साहित्यकृती म्हणून महाभारत सर्वोच्च पातळी वरची आहे. आणि तशी उंची गाठणारी साहित्यकृती ना निर्माण झाली, ना भविष्यात निर्माण होणार. हे ही पटण्यासारखे आहे. महर्षी व्यास हे महाभारताचे लेखक. हस्तीनापूरमधील कूरू वंशात १०० कौरव व पांडव ५ असे का जन्मले? ह्या प्रश्नाच्या उत्तरातच परनिंदा, परपीडा सारख्या दूर्गणांच्या जन्माचे रहस्य दडले असावे असेच वाटते. ह्या विश्वात जिथे म्हणून मानव समाज आहे, तिथे सर्वत्र १०० कौरव आणि पांडव ५ असावेत असे वाटते. आजच्या मानवी समाजाच्या स्थितीचं जे वर्णन वृत्तपत्रातात लेखाद्वारे वा आपल्या साहित्यकृतीतून तत्त्ववेत्ते , साहित्यिक मंडळी तसेच मानसशास्त्रज्ञ, मांडताना दिसत आहे, ते सारं कलीयुगाची जी वैशिष्टे आपल्या पुराणात, गुरू चरीत्रात तसेच वैदिक ग्रंथात वर्णीले आहे, त्याच्याशी मिळतं-जुळतं आहे.  निसर्गात काटेरी झुडपें वाढतात, त्यांच्या वाढीला ना सूर्यप्रकाशाची गरज, ना खतांची वा मशागताची गरज. मानवी मनाची ठोस व्याख्या आधुनिक विज्ञानाला पूर्णपणे मांडता आलेली आहे, असे काही दिसत नाही. पण We get attracted towards bad ideas at faster speed असे मानसशास्त्रही मानते. मानवी मन चंचल आहे आणि त्या चंचलेतेचा कारक चंद्र असतो असे ज्योतिष शास्त्र मानते. ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसला तरी प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला तरी ती व्यक्ती निश्चितच मान्य करेल की आपले मन चंचल आहे आणि विकाराकडे वा विकृतीकडे लौकर धावते. आंबा फणसांची झाडे वाढवावयास वर्षे जातात. हा ही आपला अनुभव आहे. विश्वाच्या उत्त्पत्ती ज्या ऊर्जेने झाली आहे ती ही सकारात्मक (धन) आणि नकारात्मक(ऋण) अशीच आहे. ह्याचा अर्थ परनिंदा, परपीडा हे दोष आपल्यात नैसर्गिक आहेत. परंतु असेच मानावयाचे ठरविले तर नुकताच जन्मलेले बाळ निरागस, निरपेक्ष वृत्तीचे असते हे खोटं कसे मानावे ?

मग आपल्या समोर प्रश्न हा पडतो की जन्मतः आपण निरंकारी, परनिंदेची बाधा न झालेले असतानाही परनिंदा ह्या रोगाला बळी कसे पडतो? कुठल्या वयापासून आपल्याला परनिंदेची लागण होते? बालवयात की पौंगड अवस्थेत? असे प्रश्न उभे राहात असतात. तशा प्रकारच्या शंका येणे हे ही स्वाभिविक आहे. परंतु त्यात रूतण्या ऐवजी शंकेचं निरसन करण्याची जी बुध्दी  ईश्वराने आपल्याला दिलेली आहे. तिचा पध्दतशीर  वापर  केला  की, शंका-कुशंकांचे निरसन करता येते. आधूनिक मानसशास्त्रज्ञ, मानवअनुवंश शास्त्रज्ञही  मान्य  करतात की संस्कारक्षम वय असते, तेव्हा जसे घरात वातावरण असते त्याचा परिणाम बालकांवर होत असतो. अध्यात्मिक गुरू ही असेच म्हणतात.  'संस्कारः एक धनं न क्षीण जायते | ' मानवी बुध्दीला जडत्व असते. अध्यात्म विशेष करून आपल्या संस्कृतीतले, म्हणते की बाळावर संस्कार मातेच्या गर्भात असतांना होत असतात. म्हणूनच 'घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती' ह्या आधारावर गरोदर स्त्रियांना मार्गदर्शन कुठले मिळावे, त्यांनी कोणती पुस्तके वाचावीत इत्यादी संबधी चळवळ सुरू झालेली पाहतो. प्राचीन काळापासून गर्भ संस्कार विधी आपल्या कडे मान्यता पावलेला आहे आणि त्यात तथ्य असावे. परंतु केवळ त्यावरच अवलंबून राहून गरोदर स्त्रीने आधूनिक वैद्यक शास्त्राप्रमाणे आहार, औषधे न घेणे म्हणजे जन्माला येणार्या बालकाला संकटात टाकण्यासारखे ठरते. आधूनिक औषधे, उपचारामुळे जन्मतःच मृत्यू होणार्या अर्भकांची संख्या घटली आहे. मानवाचं आयुर्मन वाढले हे ही सत्य आहे. 

साधारणतः एखादं बालक सात वा आठ वर्षाचं होत असते तेव्हापासून त्याला घरात रागाने कोण आणि काय म्हणतयं, प्रेमाने कोण म्हणतयं आणि कसे म्हणतय, इतकंच काय विनोद, चेष्टा, निंदा ह्या संबंधातील घरात होणार्या चर्चा, घरातल्या मंडळींचे अहिर्भाव ते बालक ग्रहण करीत असते. मग हळूहळू वयात यावयास सुरूवात झाली की परनिंदेची लागण त्याला होत असावी. ह्या सृष्टीतील सगळेच प्राणी अनुकरण प्रिय असतात, असे आजचे विज्ञान सांगते. परंतु इथेही एक प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या न्यायाने पाहता, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र बुध्दी, आणि स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती, घेऊनच जन्मते, त्याचे काय? त्यामूळे नैसर्गिक नियम, तसेच अनुकरणीयता, ह्या दोहोंपलीकडे काही कारणे असतात, ज्यामूळे परनिंदाचा रोग जडतो. आता त्यावर थोडेसे बोलत बोलत परनिंदेच्या रोगातून मुक्त कसे होता येईल हे पाहू.

परनिंदेला सर्वात अधिक पूरक आणि माणसाचा सर्वात मोठा शत्रू कुठला, तर तो अहंकार. तसा तो जन्मतः असतो. त्याचं मूळ स्वरूप स्व. ह्या स्व चा परीणाम असा असतो कि आपण पाहूणे म्हणून कोणाकडे गेलो आणि त्या यजमानांच्या घरातील लहान मुलाला आपलं नाव विचारलं तर ते मूल झटकन नाव सांगत नाही. कारण त्याला ती त्याची वस्तू वाटते. म्हणजेच मालकीची भावना. हा माझा अनुभव आहे. अर्थात ह्याबाबत मतभिन्नता, अपवाद ही असू शकतात. पण अंहकारामुळेच मनुष्य परनिंदा करू लागतो. हे सत्य आहे. मी बुध्दीमान पराक्रमी, कर्तृत्ववान असा माणसाला गर्व होतो, तेव्हा त्याला इतरेजन कःपदार्थ वाटू लागतात. कोणाला रूपाचा, कोणाला ज्ञानाचा, कोणाला श्रीमंतीचा, असे हे गर्वाचे प्रकार. समाजातल्या प्रत्येक थरातील लोकामध्ये अहंकाराचे असे प्रकार दिसतात. आणि हे प्रकार आपल्या अवती-भोवती लोकांच्या तूलनेतून होत असतात. परनिंदेच्या स्वरूपात सापेक्षवाद लागू होत असतो. त्यामुळे अंहकार आणि त्यातून जडलेला परनिंदेचा रोग ह्या दोहोंचं स्वरूप आणि पातळी समाजातील आर्थिक, व शैक्षणिक थरानुसार भिन्न असते. 

दुसरे कारण दांभिकता. स्वतःच्या अंगी गुण नसतात ,म्हणून  परनिंदेचा रोग जडतो. अशी व्यक्ती बढाया मारण्यात पटाईत असतात. परंतु गम्मत अशी आहे कि, तशा इसमाची निंदा करताना आपण सारे परनिंदेचे रूग्ण बनतो. आपण त्या इसमास काय म्हणतो, "अहो आपल्या पायाखाली काय जळते आहे, ते आधी पहा! 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण' असे काय कामाचे?". परनिंदेचं लोण हे अशाच तर्हेने पसरत असावे. हा प्रकार समूह मानसशास्त्राशी निगडीत असावा. 

मत्सरामुळे मनुष्य परनिंदा करतो, मत्सरी वृत्ती कर्तृत्त्वहिनतेतून उत्पन्न होत असावी. गुणाची पारख नसल्यामुळे मनुष्य निंदाशील बसतो. ज्यांच्या अंगी योजकता नसते, किंवा आळस शिरलेला असतो, अशी माणसे परनिंदेचे रूग्ण बनतात. ज्यांच्या समोर ध्येय नाही, वेळेचा सदुपयोग करण्याचा विचार ज्यांच्या मनाला स्पर्श करीत नाही, असे लोक परनिंदेत अधिक मग्न होत असावेत असे मला वाटते.

परनिंदा संदर्भातील आपण जी वर चर्चा केली, त्यात ज्या षढरिपूंचा उल्लेख केला आहे ते आपल्यातही कमी अधिक प्रमाणात असतात. चांगले कार्य पार पाडावयाचे असल्यास 'मी' बाजूला ठेवून 'आम्ही' ह्या शब्दाच्या नुसता प्रयोग केला तरी कार्य तडीस जाते. सहकाराच्या तत्वावर मोठमोठे प्रकल्प, उद्योग, चळवळी उभ्या राहील्या आहेत. हा आपला सार्वत्रिक अनुभव आहे. जी काही प्रगत राष्ट्रे आपण पाहतो, ती जरी विज्ञानाच्या आधारामुळे प्रगत झाली असली, तरी तेथील लोकामध्ये परस्पर आदर देण्याची वृत्ती आहे, हे ही एक कारण आहे. कोणी कोणाला टाकून बोलत नाहीत. देशबांधव परस्परांना उमेद देत असतात. आपल्या राजकिय पक्षांमधील संसदेत चाललेली भांडणं, गोंधळ आपण टिव्ही वरून पाहतो, त्यामुळे परनिंदेच्या विकृतीने समाजाला विळखा घातला आहे ह्या बद्दल आश्चर्य वाटत नाही. ज्या मंडळीने समाजाला दिशा द्यावयाची त्याचं वागणं हे असे आहे. 'राजा कालस्य कारणम्।' असे म्हणून त्या मंडळींना गप्प करता येत नाहीं. कारण लोकशाहीत आपणच खरे राजे. परंनिदा ही फार घातक आहे. व्यासमूनींच्या महत्वाच्या दोन वचनातील हे वचन 'पापाय पर पीडनम्।' परनिंदेचे दुष्परीणाम आपल्या दिसत नाही. It is like slow poisioing. व्यक्ती आणि समाजाच्या मनाला किड लागते. निंदेमुळे कालापव्यय होतो. शारिरीक, मानसिक शक्तीचा क्षय होतो. अनेकांची जीवने विनाकारण उध्वस्त होतात. निंदा ज्यावर होते ती व्यक्ती मानसिकरित्या हतबल होण्याची शक्यता असते. आणि निंदा करणार्याच्या मनातील सकारात्मक ऊर्जेचा साठा संपू लागतो आणि शेवटी ती व्यक्ती ही मनोरूग्ण बनण्याची शक्यता असते.

विकोपाला गेलेल्या परनिंदेवर मात करण्यासाठी उपाययोजना करावयाची असेल तर प्रथम 'आपण सारे परनिंदेचे समान रूग्ण आहोत' अशी भावना ठेवली की स्वतः पासून सुधरावयाची इच्छा निर्माण होऊ शकते. Charity begins at home. आसक्ती आणि विरक्तीच्या पलीकडे गेलेले तुकाराम महाराज देवाकडे "बालपण देगा देवा" असे मागणे मागतात. का? त्यांची वृत्ती, आचरण बालमनासारखे स्वच्छ निर्मळ झाले नव्हते का? झाले होतेच की. मग विठ्ठल माऊलीकडे त्यांनी असे मागणें का केले असावे? निवृतीच्या किंवा परमसिध्दीच्या परम टोका कडच्या प्रवासाकडे असताना त्यांनी देवाकडून बालपण मागितले. ह्याचा अर्थ त्या प्रवासातही ते आत्मपरिक्षण करीत असावे. अजूनही आत्मशुध्दी होणे आवश्यक आहे असे त्यांना जाणवत असावे. सार्या संताची चरीत्रे वाचल्यानंतर त्यांनी जे काही देवाकडे मागितले ते आपल्यासाठीच. त्यांचा प्रत्येक शब्द सुविचार. ह्याचा अर्थ हाच की आपण सार्यांनी बालकांसारखे निरागस होण्याचा प्रयत्न करणे. "जसा विचार, तसा आचार; जसा आचार ,तसा जीवनाला आकार." हे सूत्र अध्यात्मिक गुरू मांडतात. आधूनिक वैद्यकशास्त्रही हेच म्हणते. ह्याचा अर्थ हाच की विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोहोंचा संगम घालावा. म्हणजे आपण षढरिपूवर आपण मात करू शकतो. 

माझ्या बहूतांश लेखामध्ये मी विज्ञानाची कास सोडली आहे असे दिसणार नाही. ह्या विश्वातील रहस्यें ही विज्ञानाच्या आधारेच सुटणार. शास्त्रज्ञही आधूनिक ऋषीमुनीच. युरोपातील प्रबोधन काळाचा आपल्या समाजावर सकारात्मक बदल झाला आहे हे ही मी मानतो.(चिज्ञपट आणि समाजमन हा लेख कृपया पहावा) विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनची दोन वाक्ये मी सतत लक्षात ठेवतो, ती अशी आहेत, पहीले "The most mystrious thing in this universe is the universe itself." आणि दुसरे "The immagination is more important than knowledge." म्हणजेच विश्वातील रहस्ये शोधण्याचा प्रवास अनंत आहे. तसेच आपल्या मनात उत्पन्न होणार्या नवीन कल्पनांना वार्यावर सोडू नये. कारण तशा कल्पनांतूनही ज्ञानाची निर्मीती होत असते, असेच आईन्स्टाईन साहेबांना सुचवावयाचे होते असे वाटते. पुढे जाऊन असेही म्हणता येईल की, जसे अध्यात्मात तप, ध्यान, जप, योग असे उपचार करून मनाला स्थिर करून परनिंदेची विकृती कमी करता येते, तसेच विश्वातील रहस्यें शोधण्यात रत झाले कि आपोआप परनिंदेची विकृती कमी होत जाते. ह्याला पुरावा काय? असं काय म्हणता राव, जेव्हा शास्त्रज्ञ विश्वाची रहस्ये शोधण्यात गर्क होतात तेव्हा ते आपोआप विश्वमय होतात. ते लौकीक दृष्टीने एखाद्या देशाचे नागरिक असले तरी , त्यांच्या मनात सार्या मानवी जीवनाचे कल्याणच असते. त्यांच्या मुलाखती, चरित्रे धुंडाळून पाहा. थोडक्यात काय अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही विश्वाच्या वा त्या परमात्म्यावरील निष्ठेच्या परम टोकाकडे घेऊन जाणारे दोन मार्ग आहेत पण शेवटी एके ठिकाणीच मिळणार.

मित्रहो, अध्यात्मिक रित्या उन्नत होत जाणे, वा वैज्ञानिक संशोधनात रत होणे हे दोन्ही उपाय आपल्या सारख्या सामान्यजनांना पेलवणारे नाहीत. अधून मधून संत साहित्य वाचणे, विज्ञानातील गमती-जमती ऐकणे, हास्यविनोदाचे वावडे टाळणे, एखादा छंद जोपासणे, सामाजिक बांधिलकी जपणे, इत्यादी गोष्टी करता येतात आणि आपण करीतही असतो. पण गडबड कूठे होते? जेव्हा आपण एकत्र जमतो, तो एक गोंधळ ठरतो. मग सार्वजनिक उत्सवासाठी जमलो असो वा कुणाच्या घरात मंगल कार्यासाठी जमलेले असो.  When many people sit together , it becoms crowd हा आपला दोष आहे. आणि तिथेच पुन्हा अहंकार जागृत होतो आणि परनिंदा सुरू होते. म्हणून संत मडंळीनी सतत नामस्भरण करावे असा सल्ला दिला. भगवंताने गीतेत सर्वात सोपा उपाय दिला आहे ज्यावर मी मागच्या लेखात तसेच इतर लेखात ही चर्चा केलेली आहे. तो सोपा उपाय  म्हणजे  'नियतं कुरू कर्म त्वम्।' तोच अंमलात आणण्याचा प्रयत्न करू या, उद्याच्या नववर्षाच्या सुमूहूर्तावर. क्यों की किसीने कहा है " हम अपने कर्ममें इतने जुटे रहो की हमें दुसरोंकी निंदा करनेका समय ना मिले!"

आपण असे मानतो कि परमेश्वर सर्वत्र आहे. आणि जे काही आपण बोलू त्याला तो तथास्तु तथास्तु असा आशिर्वाद देत असतो. म्हणून आपण चांगले बोलावे. वाईटालाही वाईट म्हणू नये. कारण तशा प्रकारच्या उच्चारामुळे वाईटपणा वातावरणात फैलतो व कुठेतरी रूजतो आणि फोफावतो. आपल्या येथे अशी म्हण आहे की "नकट्याला म्हणू नये नकटे व धाकट्याला म्हणू नये धाकटे!". उद्या आपलं नव वर्ष आगमन करीत आहे. "प्राणीमात्रा जीवे लागे बर्या शब्दे "  हा समर्थ रामदास स्वामीच्या उपदेशाची आठवण करूनच नवे वर्षे येत असते.  गेल्या चैत्र प्रदिपदे पासून मी ब्लाॅगवर आपल्याशी संवाद साधावयास सुरूवात केली.  ह्या वर्षअखेरचा हा शेवटचा लेख आपल्या पदरात ठेवला आहे. आपण सार्यानी वेळोवेळी चांगल्या सुचना दिल्या, प्रतिक्रीया दिल्या, माझं कौतुकही केले. त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी राहीन. असेच प्रोत्साहान मला देत राहा, अशी विनंती करतो. आपल्या सर्वाना तसेच आपले परिजन इष्ट-मित्रांना हिदू नववर्ष सुखाचे, समृध्दीचे जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून मी इथे विराम घेतो.
धन्यवाद !
जय योगेश्वर !

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...