रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

कर्मण्येवाधिकारास्ते मा फलेशू कदाचन | (भाग १ )

 


भगवद्गीतेचा मी काही मोठा अभ्यासक नाही. माझी बुद्धी तशी यथातथाच. म्हणून माझी गीतेवरील श्रद्धा बौद्धिक प्रामाण्यावर आधारलेली नाही. ती भोळी भाबडीच. मागे मी ५ मे २०१८ ला  तस्मात उत्तीष्ठम् कौंतेय युध्दनिश्चयः | व ३ जूनला चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः| या दोन श्लोकांवर चर्चा केली आहे. तब्बल दोन वर्षानंतर मी भगवद्गीतेतील एका श्लोकावर चर्चा करावयास बसलो आहे. यावरूनच सिद्ध होत आहे की मी अध्यात्म क्षेत्रातला एक सामान्यातला अति सामान्य असा विद्यार्थी आहे.

अलिकडे ' मृत्यु सुशांत पण महाराष्ट्र सरकार का अशांत' या लेखात चंदेरी दुनियात आपलं नशीब उजळ्याचे स्वप्न पाहात मुबंईत आलेल्या युवक-युवतींची कशी फसगत होते, त्यातील अनेक जण नैराश्याच्या गर्तेत कसे जातात यावर चर्चा करीत ' सध्याच्या युगात प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे म्हणून कुठेतरी Level of ambition and level of satisfaction यामध्ये सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करणें गरजेचे आहे.' असे मी म्हटले आहे. मी एलआयसीत विकास अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतांना,  एजंटांशी व्यवसाय वृद्धीच्या संदर्भातील चर्चेत अनेक वेळा वरील वाक्यावर भर देत असे. या वाक्यावर भर देण्याचा माझा दृष्टोकोण स्पर्धेच्या नशेत आपल्या आरोग्याची हेडसांळ होऊ नये असाच होता व आज ही तसाच आहे. कारण शरीर माद्यं खलू धर्मसाधनः हा ऋषीमूनीनी दिलेला सल्ला मानावा हा हेतू होता. शरीराची हेडसांळ झाली की आजारपण येते. त्यातून औषधोपचाराचा खर्च, अशक्तपणा येतो आणि सक्तीची विश्रांती येते. त्यामूळे व्यवसायासाठी उपलब्ध असलेला वेळ निष्कारण खर्ची पडतो. शेवटी Time is money किंवा Time is the best  natural resources, the God has given to the man हे विसरता येत नाही.' समय बहुमूल्य है, पर जीवन अमूल्य है' असे वाक्य राष्ट्रीय महामार्गावर लिहीलेले असते, ते तर त्रिकालातीत सत्य आहे यावर माझी श्रद्धा आजही कायम आहे. पण Level of ambition and level of satisfaction मधील सुवर्णमध्य काढा असे फक्त बोलायला सोपे आहे हे सतत जाणवते. हिंदीमधील प्रख्यात साहित्यीक प्रेमचंदजीचे एक वाक्य आठवते, ' दुसरोंको उपदेश देना कितना सहज और सरल है ! ' ते मला ही लागू पडते याची जाणीव मला एलआयसीच्या सेवेत असतानाच होत असे. ती आज ही कायम आहे.

शेवटी श्रीमद्भगवद्गीतेतील अध्याय २ श्लोक क्रमांक ४७
' कर्मण्येवाधिकारास्ते मा फलेषू कदाचन '  या श्लोकात वरील प्रश्नाचे उत्तर सापडते का ते पाहू या असे ठरले. म्हणून हा श्लोक चर्चा करण्यासाठी निवडला. प्रयत्न करणे हे आपल्या अधिकारात आहे असे भगवंताने म्हटले आहेच की !  शिवाय या श्लोकावर चर्चा करणे हे काही दृष्कृत्यं तर मूळीच नाही. मग भय कसले? इथेच चर्चेला सुरूवात करणार होतो पण लक्षात आले की, भय आहे पण ते लेखाचा विस्तार वाढेल यासंबंधीचे. म्हणून या चर्चेचे छोटे  भाग करता येतील का असा विचार केला तेव्हा उत्तर सापडले. या श्लोकाचे भाग पाडता येतात हे ध्यानात आले.  कर्मण्येवाधिकारास्ते यावर प्रथम चर्चा केली की पहिले दोन भाग होतील. मग मा फलेषू कदाचन याकडे वळता येईल.  प्रत्येक कार्याला निवृत्ती आणि प्रत्येक जीवाला मृत्यु हे अंतिम सत्य योगेश्वराने सांगितले आहेच, म्हणून लेखात काही त्रूटी राहिल्या तर त्या परम योगेश्वराकडे सोपवितो. 

प्रथम कर्म म्हणजे काय  यावर चर्चा करणे आवश्यक आहे. प्राथमिक शाळेत असताना आम्हाला मराठीच्या पुस्तकात मी कोण? असाच काहीसा धडा होता आणि त्यात खालील वाक्ये व प्रत्येक वाक्या समोर माणसाचे चित्र. पण प्रत्येक वाक्याच्या समोरच्या माणसाचे चित्र भिन्न दाखविलेले होते.
१)चाक फिरवितो गरागरा मडकी बनवितो भराभरा मी कोण?
२)कापड घेतो, कात्रीने कापतो, दोरा घेतो, कपडे शिवतो मी कोण?
3) लाकूड घेतो, करवितेने तुकडे करतो नंतर ते तुकडे जोडतो, टेबल खुर्ची कपाट बनवितो मी कोण?
पुढे, अशाच प्रकारची प्रश्नात्मक वाक्ये व प्रत्येकाच्या समोर  दाखविलेल्या चित्रावरून त्याचा वर्ण वा व्यवसाय ओळखावयाचा. एकंदरीत कुंभार, शिंपी, सुतार, लोहार, शेतकरी, या सर्वांची कामे कोण कोणती आहेत हे बालवयात समजले होते आणि स्मरणात ही आहे. पण कर्म हा शब्द कुठे काही कोणाच्या वाट्याला वाईट प्रसंग आल्यावर ' हे ज्याच्या त्याचा कर्माचे फळ, भोग आता ' अशी वाक्ये समज आल्यावर सर्वत्र ऐकू येऊ लागली.  तेव्हा कर्म याचा अर्थ समजला. पण वाईट कृत्य इथपर्यंतची ती मजल. आणखिन समज वाढली आणि पुढे भगवद्गीता अर्था सकट वाचायला लागल्या नंतर कर्माचा व्यापक अर्थ थोड्या फार प्रमाणात समजू लागलो.

सोप्या व साध्या शब्दात, कर्म म्हणजे आपल्या पोटापाण्यासाठी प्रत्येक मनुष्याने केलेला उद्योग. हे उद्योग भिन्न भिन्न असतात. त्यालाच आपल्या संस्कृतीत वर्णव्यवस्था असे म्हटले जाते. ही जातीव्यवस्था नव्हती. त्यात दोष निर्माण झाले. हे मान्य पण समाजबांधवात प्रयत्न पुर्वक  समरसतेचा भाव जागृत करीत राहिलो तर कालाऔघात ते दोष निघून जाऊ शकतात. त्यावर स्वतंत्र चर्चा केलेला ' अस्पृशता एक बडी भूल ' २९ आक्टोबर १९१८ ला पब्लीश केलेल्या लेखात वाचता येईल. असो. 

शालेय पुस्तकातील त्या धड्यावरून कुंभाराचे कर्म  मडकी बनविणे, शिंपीचे कर्म कपडे शिवणे, हे बालपणापासून मनात ठसले आहे ते आज ही पुसले गेले नाही ही सुद्धा त्या योगेश्वराचीच कृपा. प्रत्येक माणसाला कर्म हे जन्मतः चिकटलेले असते. सुताराचा मुलगा सुतार बनतो, शेतकर्यांचा मुलगा शेतकरी होतो, वाण्याचा मुलगा वाणी, डाॅक्टराचा मुलगा डाॅक्टर अशी लांबलचक यादी बनेल. आजच्या विज्ञानाने माणसाच्या शरीराच्या जीन्सचा अभ्यास केल्यावरून ही यादी तयार झाली असे आपण मानतो.  ते खरे आहे. व्यवसायावरून आडनाव ही जोडले गेल्याची उदाहरणे विद्यमान आहेत. व्यवसायिकांच्या पितरांच्या पिढ्या म्हणजे मुळ कूलपुरूषापर्यंत आपण मागे गेलो तर आपल्या लक्षात येते की व्यवसायाची दृष्टी ही सृष्टीतूनच प्राप्त झालेली असते. चातुर्ण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः या लेखात मुलतः सृष्टी विविधतेने नटली आहे तसेच Imbalance is the feature of universe या शाश्वत सत्यावरच या विश्वाचा प्रचंड पसारा सुस्थितीत आहे, असे मांडले आहे. त्या विश्वाचा आपल्या कल्पनेपलिकडे असलेला पसार्याचे वैशिष्ट असे आहे की पंचमहाभूतांचे स्वरूप भिन्न; सर्व ग्रहांच्या कक्षा, गती, आकार, गुरूत्वाकर्षण भिन्न आहे. तरीही तो पसारा सुस्थितीत आहे. आपण तो लेख वाचू शकता. एकंदरीत वर्गरहीत समाजव्यवस्था ही कल्पना फक्त कागोदपात्री राहते. बळजबरीने वर्गरहित समाज निर्माण करणे हे निसर्गालाच मानवणारे नाही. हा मुद्दा पटविण्यासाठी मी त्या लेखात सविस्तर लिहले आहे. तरी इथे सारांश रूपाने मांडले की व्यक्ती तितक्या प्रकृती, जशी दृष्टी तशी सृष्टी  इत्यादी Laws of nature वरून कर्म म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहचण्यास मदत होईल असे वाटते.

पहीले उदाहरण आपण भूमातेचं घेऊ या.  या पृथ्वीवर माणूस जन्माला येण्या अगोदर पर्वत, नद्या, जंगल, डोंगर वृक्ष वेली उगवलेल्या असाव्यात.  जमिनीतून अन्न मिळते हे ज्यांच्या लक्षात आले, त्यांना बी-बियाणे पेरून तांदूळ, गहू इत्यादीचे पीक काढण्याची बुद्धी लाभली ते शेतकरी झाले. ज्यांनी जमिनीत पावसाचे पाणी मुरते हे लक्षात आले त्यांनी विहीरी खणल्या. हे खोदकाम करताना जिथे जमिनीतून खनीज कोळसा धातू इत्यादी वस्तु आढळल्या तेव्हा त्यांच्या बुद्धितून खाण उद्योग (माईनिंग), लोखंड, हिरे, स्टील घडविणारे व्यवसायी बनले.  भाताचे पिक काढले की ते साफ करावेसे वाटले ते साफसफाईच्या उद्योगात शिरले. म्हणजे भात -गहू गिरण्याचा व्यवसाय करणार्यांचा वर्ग निर्माण झाला. माणसाच्या गरजोपयोगी वस्तूंची निर्मिती सुरू झाली की, वाटप व्यवस्था आली, ग्राहक तयार झाले मग विक्री आली.  वाटप, विक्रीचा विचार वा कल्पना मनात ज्यांच्या मनात रूजल्या ते ट्रक ओनर्स, व्यापारी झाले. ज्यांना डोंगर नद्या, पर्वत, पाहून मनात मुर्तीमंत पावित्र्य साकारले ते तत्वज्ञानी, कवी, लेखक मंडळी म्हणून नावारूपास आली.  प्रत्येक व्यक्तीत बुद्धीची पातळी तसेच कल्पना शक्ती भिन्न स्वरूपाची असते. ही सृष्टीचीच करामत.म्हणून  जशी दृष्टी तशी सृष्टी. पण या ही अगोदर जशी बुद्धी तशी दृष्टी हा ही एक नैसर्गिक नियम असावा. कारण डोळ्यांनी आपण जे पाहातो ती नजर असावी जेव्हा बुद्धीची साथ मिळाली की दृष्टी बनते. म्हणजे सामान्यजनांकडे असते ती. त्यापुढची दुरदृष्टी. तिथे फार मोठे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर महाजनांपासून ते महामानव, ऋषीमुनी, महर्षी, देवर्षी, विभूती, अवतारी पुरूष मग प्रत्यक्ष ईश्वराची रूपे विराजमान असतात. बुद्धीमत्तेचं हे एक विश्व.  पण याचा अर्थ असा नाही की जन्मतः दृष्टहीन समाजबांधवांना बुद्धी वापरता येत नाही. दिव्यांग समाजबांधवात इतर इंद्रियात शक्ती निसर्गच जन्मतः अधिक देत असतो. ते स्पर्शाने तसेच अव्यक्त शक्तीतून ही सृष्टीचे चित्र रेखाटत असतात. सर्व मानवजात एकाच कल्पनेने व एकाच पद्धतीची बौद्धिक पातळीची असती तर मानवी जीवन प्रगत झालेच नसते. विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनचे एक वाक्य मला फार भावले आहे, ते वाक्य असे आहे, Imagination is more important than knowldge. अगदी ईश्वराची कल्पना भिन्न असल्यामूळे धर्म सांप्रदाय निर्माण झाले. आपल्या आकाशगंगेतील  सुर्य एकच आहे. पृथ्वी एकच आहे. पृथ्वी कधीपासून स्वतःभोवती व सुर्याच्या भोवती फिरू लागली याचे खास ज्ञान मानवाला झाले असे म्हणता येत नाही. आपण अनुमान काढले आहे. त्यातून दिवस-रात्र चक्रानुसार आपण आपल्या सोयीसाठी  पौर्वात्य व पाश्चीमात्य देश  अशी जगाची विभागणी केली की नाही. पण हे सर्वभेद म्हणजे सृष्टीचे सौंदर्य आहे. ' मेळवूनिया पंचमहाभूताचा मेळ, अंबे त्वा रचिला ब्रम्हांड गोळ ' अशी अंबामातेची आपण स्तुती करतो, त्या अंबामातेच्या विविध रूपातली ही विविधता आहे. पण त्यात मेळ आहे. सुर्य म्हणजे तेज. समुद्राच्या (आप) पाण्याची वाफ करतो, आकाशात ती वाफ साठली जाते. ते आकाश एक पंचमहाभूत,  त्या समुद्राच्या पाण्याचे वाफेचं  ढगात रूपातंर करताना खारट पणा काढते. कसे ते फक्त ईश्वरालाच ठाऊक. मग वायु त्या ढगांना घुसळवितो आणि वर्षा ऋतूत पिण्यायोग्य जलाचा वर्षाव होतो. जमीन ( पृथ्वी- धरणीमाता ) पाणी घेते व आपल्या अन्न देते. पंचमहाभुतांमध्ये परस्पर सहकार वा कोआर्डीनेशन विराजमान असेल तर मानवजातीत भिन्न व्यवसाय वा विभिन्न रूप, बुद्धी , भाषा भिन्न असली तरी सहकाराच्या तत्वावर मानवी जीवन संघर्ष रहीत राहू शकते. मुंबईतील हिर्याचे बाजार केंद्र म्हटल्या जाणार्या पंचरत्न इमारतीच्या दर्शनी भागावर एक वाक्य कोरल ' Path of co-operation is so narrow that an individual and the society can not walk on it.' इथे थोडसं विषयातंर झाले पण ते आवश्यक होतं त्यामूळे कर्म म्हणजे काय तर स्वधर्म इथपर्यंत आपण पोहचलो. स्वधर्म म्हणजेच भौतिकदृष्ट्या प्रकृतीच्या (सृष्टीच्या) गुणांच्या (सत्व, रज, तम) प्रभावाखाली मनुष्याच्या मानसिक व शारीरिक स्थितीला अनुसरून आलेले कर्म. स्वभावतः उत्पन्न होणार्या कर्मात प्रवृत्तं होण्याची क्षमता असा ही अर्थ निघतो.  म्हणूनच श्रीकृष्णाने अर्जूनाला पुढे ' स्वधर्में निधनं श्रेयः परधर्मो भयावहः' असा उपदेश तिसर्या अध्यायात ३५ व्या श्लोकात केला आहे.

आपण या भागातील  कर्माचा अर्थ, जगाचे व्यवहारी रूप डोळ्यासमोर ठेवून काढला आहे. पण भगवान श्रीकृष्णाने  अध्याय ३ मध्ये  यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्भबन्धनः असे म्हटले आहे. भगवान श्रीविष्णूला संतोष मिळावा म्हणून जे कर्म केले जाते त्याचे नाव यज्ञ आहे. ते तू कर असे म्हटले आहे. असे न केले तर(अन्यत्र) ती कर्मे भौतिक जगात बद्ध करतात. म्हणजे चांगल्या व वाईट, दोन्ही प्रकारच्या कर्माना आपआपली फळे असतात. वर चौथ्या परिच्छेदात, ' मग भोग आपल्या कर्माची फळे असे सर्वत्र ऐकू येते ' असे जे मी  म्हटले आहे, तिथेच आपण परत आलो आहोत.  आपल्या चर्चेने वर्तुळ पूर्ण केले आहे. म्हणजे ही चर्चा थांबविण्याची वेळ आली आहे असे वाटते. कारण आपली चर्चा भले अध्यात्मिक विषयावरील असली तरी त्यातील गोडी  Law of diminishing utility नुसार कमी होत जाईल. म्हणून इथे थांबाव असे वाटले. पण त्या अगोदर माझ्या वाचनात आलेली एक कथा जिचे शिर्षक ' कर्म ' आहे ती सादर करून या लेखाची समाप्ती करतो.
               --- कर्म ---
एकदा एक राजा हत्तीवर बसून आपल्या राज्यात निरीक्षण करण्यास फिरत होता. फिरता फिरता एका गावातील दुकानासमोर राजा थांबला. प्रधानाला बोलावून म्हणाला, ' का कोण जाणे मी या दुकानदाराला कधी पाहिले नाही पण मला या दुकानदाराला फाशी द्यावे असे वाटते. प्रधान बुचकळ्यात पडला. तो काही बोलायच्या अगोधरच राजाची स्वारी पुढे निघून गेली होती. प्रधानाने ते दुकान बघून ठेवले. दुसर्या दिवशी प्रधान त्या दुकानापाशी जातो. दुकानात त्या दुकानदारा शिवाय कोणी नव्हतं. प्रधानाने आसपासच्या गावकरी मंडळीशी चौकशी करता तो चंदनाचा व्यापारी असल्याचे समजले. प्रधान त्या दुकानात जातो. दुकानदाराकडे सुवर्ण वर्णाचे सुगंधी वासाचे उच्च प्रतिचे चंदन होते. मात्र कोणी खरेदीदार नसल्याने तो वैतागला होता. चौकशी करता कळले की लोक नुसते दुकानात येतात वास घेतात आणि दर ही न विचारता निघून जातात. म्हणतात ना, ' रिकामे मन सैतानाचे घर ' मग काय त्या दुकानदाराला बर्याच वेळा राजाला मरण यावे असे वाटत होते. राजा वारला की परिसरात दुसरे चंदनाचे दुकान नसल्याने राजाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मोठ्या प्रमाणात चंदनाची खरेदी होईल आणि चार पैसे हातात येतील.

आपल्या राजाला त्या अनोळखी दुकानदाराला का फाशी द्यावी असे वाटत होते याचा उलगडा झाला. प्रधानाने थोडे चंदन खरेदी केले व राजमहलात परतला, आणि राजा दरबारात येण्याअगोदर प्रधानाने ती चंदनाची पुडी सिंहासनाच्या समोर ठेवली. राजाने ती पुडी उघडून पाहिले तेव्हा राजा त्यातील सुवर्ण वर्णाचे चंदन व त्याच्या सुगंधाने मोहीत झाला. राजाने प्रधानाला विचारले '' कोठून हे चंदन आणले? ' प्रधानाने त्या दुकानदाराचे नाव व गावाचं नाव व रस्त्याचे नाव म्हणजेच, काल रस्त्यात पाहिलेल्या दुकानाचे नाव सांगितल्यावर राजा म्हणाला  ' अरेरे, काल मला उगीच त्या दुकानदाराला फाशी द्यावीसी वाटती. राजाने प्रधाना मार्फत त्या दुकानदाराला सुवर्णमुद्रा दिल्या. हळू हळू राजा आपल्या भेटीला येणार्या अनेक लोकांना चंदनाची भेट देऊ लागला. त्यामूळे त्या दुकानातून मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी करू लागला. आता त्या दुकानदाराला राजा दिर्घायु होवो असे वाटू लागले. राजा व दुकानदाराशी चांगली मैत्री झाली.

आपल्या मनात इतरांविषयी चांगले विचार व दयाळूपणा आणला तर इतरांच्या ही मनातून ही चांगल्या भावना आपल्या पर्यंत येतात व आपला उत्कर्ष होतो.आपण जे देतो तेच परत आपल्याकडे येते. मग कर्म म्हणजे काय,  विचार हेच खरे कर्म. 

आपल्याला ही कथा आवडली असावीच. जसा विचार तसा आचार व जसा आचार तसा आपल्या जीवनाला आकार येत असतो. त्यातून निरपेक्ष भावनेने कर्म करणे शक्य होत असावे. मला वाटतं, हेच ते उच्च कोटीचे कर्म असावे जे श्रीकृष्णाने अर्जूनाकडून यज्ञ अपेक्षिले होते.

               जय योगक्षेमं |
                जय योगेश्वर ||

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

विरोधी पक्ष असहाय्य तर मोदी सरकार स्वयंप्रेरित


बाॅलीवूड मधील कारभार हा समांतर अर्थव्यवस्थेतून चालविला जातो आणि तिथला कारभार हा देशाच्या सार्वभौमत्वला आव्हान दिल्यासारखा ठरत असेल तर केंद्र सरकार सुशांतसिंगच्या संशयास्पद मृत्यूच्या निमित्ताने खोलवर जाऊन माहिती काढण्याचे प्रयत्न करू इच्छीत असणार अशी शक्यता मागच्या लेखात मी वर्तविली होती. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार ड्रग्ज माफीयांचा शोध घेण्यासाठी  सुशांतसिंगच्या आसपास वावरणार्या सर्वांच्या नार्को टेस्ट्स झाल्या. एनसीबीने आपला मोर्चा सारा खान, दिपिका पदूकोण सारख्या सिनेतारकांकडे वळविला. त्यावरून केंद्र सरकार ड्रग्ज माफीयांचा कसून शोध घेऊ लागले आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यामूळे देशाचे राजकारण जे दोन महिलाभोवती फिरत होते त्याची व्याप्ती वाढती आहे. सुशांतसिंगच्या मृत्यु तपासातून दिशा सालियनच्या मृत्युचे धागेदोरे सापडल्याची बातमी आली आहे. सुशांतसिंगचा मृत्यू तपास कार्य कुठपर्यंत आला आहे याबाबत सीबीआय तर्फे अधिकृत बातमी आलेली नाही. त्यावर न्युज चॅनेल्सवरून  राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांची आरोप-प्रत्यारोपांच्या  फैरी झाडल्या जात आहेत. एम्स मधून फाॅरेन्सिक रिपोर्ट संबधीचा अहवाल हाती आलेला नाही असे एम्सच्या अधिकार्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. सीबीआयने लागलीच रिपोर्ट दिला असता तर  
" इतक्या लौकर सीबीआयने रिपोर्ट दिला म्हणजे खोटा रिपोर्ट आधीच तयार केलेला होता. सीबीआय स्वायस्त राहीलेली नाही." अशी ओरड विरोधी पक्षांनी केली असती. सामान्य समज अशी आहे की सारे पुरावे नष्ट करून सुशांतसिंगच्या मृत्यूच्या तपासात ६५ हून अधिक दिवस एफआयआर न दाखल केलेल्या केसचा मुळापासून शोध घेऊन अहवाल तयार करण्यास वेळ लागणारच की ! इतके तारतम्य मविआच्या समर्थक मिडीयाने व कार्यकर्त्यानी बाळगावयास हवे की नाही ? ज्या पद्धतीने एनसीबी, ईडी, व सीबीआयने तपास सुरू केलेला पाहता, सुशांतसिंगच्या मृत्युबाबतचे सत्य बाहेर येईलच पण त्याहून अधिक महत्वाचे म्हणजे ड्रग्ज माफीया, व बाॅलीवूड मधील डाॅनगिरी या संबंधीचा जो तपास सुरू होत आहे त्यामूळे देशातले राजकारण ढवळून निघेल अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामूळे या प्रकरणाला वेगळे वळण लागणार आहे असे गृहीत धरून जस जशा गोष्टी बाहेर येत जातील तस तशा  प्रिन्ट इलेट्राॅनीक्स व सोशल मिडीयावर चर्चासत्रांच्या मालिका सुरू झालेल्या दिसू लागतील. आपण ही सारेजण त्यात ओढले जाणार आहोत. त्या अनुषंगाने आपल्यासोबत प्राथमिक संवाद साधावा म्हणून हा लेख प्रंपच.

प्रथम महाराष्ट्र सरकार जे फक्त अशांत होते, ते कसे सैरभेर होऊ लागले आहे  यावर चर्चा करू या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेना नेता व सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक श्री संजय राऊत याच्यांत अलिकडे एका हाॅटेलमध्ये गुप्त बैठक झाली. त्या बैठकीसंबंधी मिडीयातील संपादक मडंळी तसेच राजकीय अभ्यासक वेगवेगळे अंदाज बांधू लागले आहेत. ही भेट होती की संजय राऊतांनी स्वतः  फडणवीसांची भेट मागितली होती का यावर ही चर्चा होत आहे. श्री फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीत काय घडलं, काय ठरलं हे तर सध्या तरी गुलदस्त्यातच राहील असे वाटते. पण त्यातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की, आता  महाराष्ट्राच्या राजकारणाची सुत्रे शरद पवारांकडून ती देंवेंद्र फडणविसांकडे येऊ लागली आहेत.श्री फडणवीस व राऊत यांच्यात भेट झाल्याचे कळल्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पाठोपाठ काँग्रेसचे अध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात हे ही मुख्यमंत्र्यांना भेटले. महाविकास आघाडीचे सरकार कधी पडणार याची भाजपा एखादा चातक पक्षी पावसाची वाट पाहात असतो, तशी वाट पाहात आहे अशी जी टीका मविआ सरकारचे समर्थक संपादक महाशय व मविआचे कार्यकर्ते करीत होते ती सारी मंडळी तोंडघशी पडल्याचे दिसते. अर्थात ती मंडळी हे सत्य मान्य करणार नाहीत हा भाग वेगळा. मविआ आघाडीचा संजय नावाचा सेनापती, एका ब्राम्हण नेत्यांच्या दारात याचना करण्यासाठी गेल्यामूळे, राजाची नेमणूक फडणवीस करू लागले आहेत अशी राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी जातीयवादी  टिका करणार्या मविआ सरकारचा जाणता राजा ही गोंधळून गेल्याचे दिसत आहे.  बिहारमधील निवडणूका जिंकण्यासाठी सुशांतसिंगच्या मृत्युचा तपास सीबीआय कडे दिला या आरोपाचा ही फुगा फुटला. वस्तुतः बिहारमधील निवडणूका जिंकण्यासाठी सुशातसिंगच्या मृत्युचा तपास सिबीआयकडे देण्याची गरज भाजपाला नव्हतीच. कारण बिहारमधील काँग्रेस मृतावस्थेत आहे. आरजेडीचे श्री लालू यादव कारावास भोगत आहेत. पंतप्रधान श्री  मोदींच्या लोकप्रियतेला ग्रहण लागण्याची बात तर दूरच राहिली, उलट एक हाती सत्ता जिंकण्याची मोदींची ताकद आजही शाबूत आहे, असे श्री शेखर गुप्तासारखे डाव्या विचारसरणीचे पत्रकार ही मान्य करतात. बिहारचे मुख्यमंत्री श्री नितीशकुमारांना हे फार लौकरच कळले होते. म्हणून ज्यांच्यासोबत सत्तेसाठी शय्या केली होती अशा काँग्रेस व राजदला धक्का देत नितीशकुमारांनी भाजपाच्या पाठींब्यावर आपलं मुख्यमंत्रीपद राखले. म्हणजे वारा वाहातो तशी पाठ फिरवून संधीसाधूगिरी केली नितिशकुमारांनी. पण काही मिडीयातील मंडळीनी भाजपावर केद्रातील सत्तेचा दुरूपयोग केला अशी टिका केली. महाराष्ट्रात युतीधर्म शिवसेनेने पाळला नाही, पण टिका झाली भाजपावर. आता मविआ मध्ये आघाडी धर्माची वाट लावण्याची कृती प्रथम कोण करणार या प्रश्नातले रहस्य संपले आहे. कारण तिन्ही घटक पक्ष म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काॅग्रेस व काॅग्रेस या पैकी  कोणीही आघाडी धर्म मोडू शकतो. तिन्ही पक्ष आपआपल्या सोयीचा व फायद्याचा अभ्यास करीत आहेत. पण राजकारणाची सुत्रे पंतप्रधान मोदींच्या हातात अलगद येऊन पडली आहेत. त्यामूळे सेना व राष्ट्रवादी मध्ये भाजपाशी जवळीक साधण्यासाठी स्पर्धा लागलेली दिसू शकेल. हे पाहता महाराष्ट्रातील काॅग्रेस नेत्यांनी सत्तेवर लाथ मारून आपलाच पक्ष भाजपाचा सच्चा विरोधक आहे असे दाखवून महाराष्ट्रातील आपले संघटन मजबूत करण्याकडे लक्ष देणे हितकारक ठरेल. कारण शिवसेनेशी सत्तेत भाग घेतल्यामूळे काॅग्रेसचा एक वर्ग नाराज आहे. ते काहीही असले तरी मविआ सरकारच्या तिन्ही घटक पक्षात परपरस्परांविषयी अविश्वास आहे हे काही लपलेले नाही. त्यातून महाराष्ट्र सरकार गडगडले तरी पुरोगामी संपादक मंडळी भाजपा वरच टिका करील. 

आज देशभर विरोधी पक्षांची जी दुरावस्था झाली आहे त्याचे खरे कारण डाव्या पक्षांपेक्षा अधिक डावे बनण्याची इतर विरोधी पक्षांना लागलेली चटक हे होय. मी चटक हा शब्द का वापरला याचे कारण राजीव गांधी फाऊन्डेशनला चीन देशाकडून भरघोस मदत मिळाली आहे हे उघडकीस आल्यामूळे इतर छोटे-मोठे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पक्षांना चीनी पैशाची हाव झालेली असणारच, कदाचीत मदत मिळाली असावी. अशी चटक लागलेल्या पक्षांच्या कळपात, जे हिंदूच्या देवांची चेष्टा करून बसले असे श्री संजय राऊत आणि आम्हांला ब्राह्मणी हिंदुत्व पटत नाही असे म्हणणारे  श्री उद्धव ठाकरे या दोघां नेत्यांमूळे शिवसेनेचाही समावेश झाला आहे. शिवसेना किंवा राष्ट्रवादी पक्षाला गोंजारून राजकारणात काही ही होऊ शकते असे बोल मराठी मतदारांच्या मुखातून बाहेर येऊ नयेत याची भाजपाने खबरदारी घेणे योग्य ठरेल. शेतीविषयक बिलाच्या पाठींब्यासाठी नवीन पक्ष एनडीएत सामील होण्याची चिन्हे दिसताना २०१९ चा भाजपा वर नमूद केलेली खबरदारी घेण्याची म्हणा वा राजकीय धक्कातंत्र अमंलात आणण्याची शक्यता अधिक आहे. याची चाहूल अकाली दल एनडीएतून बाहेर पडला त्यावर भाजपाने केलेल्या सपशेल दुर्लक्षातून दिसते.

भारतीय राजकारणात १९६७-६८ साली आघाडी सरकारच्या कल्पनेचे सारे श्रेय समाजवादी नेते डाॅ. राम मनोहर लोहीया व जनसंघाचे तत्कालीन अध्यक्ष पंडीत दिनदयाळ उपाध्याय यानां जाते.  पुढे मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखालील जनता पार्टीचे सरकार, विश्वनाथ प्रतापसिंगच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार, देवेगौडा, गुजराल, चंद्रशेखर इत्यादी पंतप्रधानांची सरकार का पडली याचे कारण भाजपेतर पक्षांनी आघाडी धर्म पाळता नाही. परंतु भाजपा मग तो वाजपेयी-अडवाणीच्या काळातील असो वा मोदी-अमित शहांच्या  विद्यमान काळातील असो त्याने आघाडी वा युती धर्म प्रामाणिकपणे निभाविलेला आहे. रामजन्मभूमी, जम्मू आणि काश्मीर मधील ३७० कलम, समान नागरी कायदा इत्यादी आपले मुद्दे भाजपाने बाजूला ठेवले होतेच की. हे ही एक कारण आहे ज्यामूळे इतर विरोधी पक्षांतील नेते भाजपात प्रवेश करताना अधिक संख्येने दिसत आहेत. महाराष्ट्र म्हणा वा बिहार या दोन्ही राज्यात भाजपा प्रबळ बनत चालला आहे याचे कारण भाजपाने स्वार्थी वृत्तीने ना नितिशकुमारांचा खांदा वापरला ना बाळासाहेबांचा खांदा वापरला. महाराष्ट्रात युती सरकारच्या काळात शिवसेनेने सत्तेत राहून ही मोदी सरकारवर टिका केली तरी श्री देवेंद्र फडणवीस च्या नेतृत्वाखालील भाजपाने संयम दाखविला हे आपण पाहीलं आहेच. त्यामूळेच जसा बिहार मधील समाजवादी नावाचा पक्ष नामशेष झाला तसाच शिवसेना पक्ष स्वतःच्या कर्माने नामशेष होण्याच्या मार्गावर दिसला तर त्यात आश्चर्य वाटू नये. सांप्रत स्थितीत महाराष्ट्रात  शिवसेना व राष्ट्रवादीला आणि बिहारमध्ये नितीशकूमारांना भाजपाचा आधार हवासा आहे. भाजपा नितीशकुमारांना प्रेमाने वागविण्याच्या मनःस्थितीत आहे पण शिवसेनेला आता हिंदू मतांमध्ये भाजपा भागिदार करून घेईल असे वाटत नाही. हिंदू हिताचे कार्य तर सोडाच पण मराठी हिताच्या कामांकडे ही स्वर्गीय बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेने दुर्लक्ष केले आहे. 

सुशांतसिंगच्या संशयास्पद मृत्युनंतर बाॅलीवूड जगतचे खरे रूप उजेडात येऊ लागले आहे. त्यामूळे मला असे वाटते की बाॅलीवूडचा काळा बुरखा फाडून सफाई करत, करत बाॅलीवूडचे होलीवूड होण्याची गरज आहे असे जनमानस तयार करून पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील मविआचे घटक पक्षांचे कंबरडे मोडतीलच पण आपल्या  आत्मनिर्भर भारताच्या कल्पनेत चित्रपट क्षेत्राचा ही समावेश करतील. चित्रपट निर्मीतीला इंडस्ट्रीचा दर्जा देऊन एक रेग्यूलरी अथाॅरिटी ठेवून संपूर्ण कारभार व व्यवहार पारदर्शक करण्याचे कार्य भारताच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि सामरिक सुरक्षेच्या दृष्टीने अतिआवश्यक बनले आहे. ड्रग्ज माफीयांना पकडण्यासाठी सुरू केलेली मोहीम, सीबीआय, इडी, आयटी इत्यादीं एजन्सीने सुरू केलेला धडाका, हे आता राजकारणातले निव्वळ नाटक राहीले नाही. हे भारतावर पैशाच्या जोरावर मानवी हक्क, महिला हक्क, पर्यावरण, सेवा, इत्यादीच्या नावाखाली बनावट नोटा, ड्रग्ज, शस्त्रात्रे, हिंसा, आंदोलने, धर्मातंर, युवकांचा बुद्धीभेद, लव जिहाद इत्यादी दुष्यकृत्यें करणार्या अनेक लाॅब्या,व  अमेरिकेतील जार्ज सोरोसची द ओपन सोसायटी फाॅऊन्डेशन्स इन इंडिया,  इंग्लडमधील ॲम्नेस्टी इंटरनॅशनल  इंडीया सारख्या अनेक मोठ्या, अनेक छोट्या, रजिस्टर्ड, नाॅन रजिस्टर्ड अशा ३१ लाख एन्जीओने लादलेल्या युद्धाचा खात्मा करावयाचा आहे. या कारवाई दृष्टीने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणणे किंवा आमदार फोडून सरकार पाडणे इतकं क्षुल्लक काम मोदी सरकार करील असे वाटत नाही. काळाच्या रेट्यातच ते आपोआप पडेल. वरील विवेचनात अकाली दलाची एनडीए तून एक्झीटचा उल्लेख केला आहे, त्यावर आता थोडी चर्चा करून लेखाच्या शेवटाकडे जाऊ या.

भाजपा प्रणित एनडीएचा घटक पक्ष अकाली दलाने शेती विषयक बिलास विरोध केला आणि एनडीए मधून  बाहेर पडला आहे. त्याबाबत फारशी चर्चा झाली नाही. याचे कारण अकाली दल पंजाब पूरता सिमीत आहे. मोदी सरकारने अकाली दलाच्या निर्णयास फारसे महत्व दिले नाही. याचे पहीले कारण आहे, पंजाबमधील विधानसभा निवडणूकीत अकाली दलाचा दारूण पराभव झाला आहे.  दुसरे कारण, मोदी सरकारकडे संसदेत धडधाकट बहूमत आहे. तिसरे कारण असे की एनसीबीने ड्रग्ज माफीया विरोधात सुरू केलेल्या मोहिमेत अकाली दलाला अडचणीत टाकण्याची संधी हाती आलीच आहे तर तिचा वापर करीत भाजपा 
' ड्रग्जको ना बोलो और पंजाब बचाओ ' किंवा Say No to Drugs and Save Panjab अशा घोषणा देत अभिनव चळवळ हाती घेऊ शकते. जम्मू आणि काश्मीर मध्ये पीडीपीशी युती करून सत्तेत सहभागी होऊन भाजपाने काश्मीर खोर्यातील प्रशासन, पोलीस कारभार, अलगावादी व त्यांना मिळणारा पैसा, स्थानिक टोळ्या, पाक पुरस्कृत दशहतवाद्याचें अड्डे इत्यादीची सारी माहिती हाती घेतली आणि योग्य वेळी तेथील सत्तेला लाथ मारली. तशीच पद्धत  भाजपा पंजाबमध्ये जम बसविण्यासाठी राबविणार असे दिसते. पण हे करताना भाजपा घाई करणार नाही. ड्रग्ज माफीयांचे पंजाबमध्ये जिथे जिथे अड्डे आहेत ज्यात अकाली दलाच्या नेत्यांचीही भागिदारी आहे, ते उडविले जातील. ही कृती अखिल भारतीय स्तरावरील असेल हे कर्नाटकातील कारवाई वरून एव्हाना सार्या विरोधी पक्षांच्या लक्षात आले असणारच. त्यामूळे पंजाब मधील अकाली दल व काॅग्रेसला हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून पाहात बसावे लागेल. अकाली दल हा पक्ष पुर्णपणे बादल घराण्याच्या ताब्यात गेला असल्यामूळे अकाली दलातील असंतुष्टांची मदत भाजपा घेईल. पंजाब काँग्रेसचे बळ हे सोनीया गांधी व राहूल गांधीचे नाही. ते आहे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंहाचे. पंजाबमध्ये नवज्योत सिंधू व मुख्यमंत्री अमरिंदरसिंह मध्ये जो छत्तीसचा आकडा निर्माण झाला आहे त्यावर भाजपाचे बारकाईने लक्ष आहेच.  काँग्रेस अंतर्गत दुफळीचा फायदा भाजपाला होईल. सोबत ॲन्टी-ड्रग्ज चळवळीतून भाजपाला जो जनतेचा पाठींबा मिळेल तो ही जमेस धरला तर भाजपा पुढील विधानसभा निवडणूकीच्या वेळी पंजाबमध्ये शक्तीशाली बनलेला पहावयास मिळेल.  शेतमाल खरेदी- विक्रीवर बादल घराण्याची असलेली मक्तेदारी मोडण्यात नवीन कायद्याचा अत्यंत खुबीने वापर भाजपातर्फे केला जाईल. महाराष्ट्रातही शेतमालासंबंधीच्या दलालांची मक्तेदारी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांची विशेषतः सुप्रिया सुळेंची म्हणजे शरद पवारांची आहे. बहुतांश प्रांतात स्थानिक पक्षांच्या नेत्यांच्या हातात शेतमाल विक्रीची मक्तेदारी आहे. तीच मोडून टाकण्याचे कार्य मोदी सरकार देशभर हाती घेईल यात कुठलाही संदेह नाही. संसदेत शेतीविषयक बिले पास झाली आहेत. विरोधकांनी गोंधळ घातला पण आपण शेतकर्यांच्या हितासाठी हा गोंधळ घातला असा संदेश शेतकर्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पार पाडण्यात नेहेमी प्रमाणे विरोधी पक्ष कमी पडणार आहेत. त्यातही भाजपेतर सार्या पक्षांच्या नेत्यांविरोधात भ्रष्टाचार, बेनामी संपत्ती, विदेशी फंडीग, देशाशी फितूरी, गुन्हेगारी, आयकर, फेरा, असे अनेक खटले कोर्टत दाखल झालेले आहेत. त्यामूळे ते असहाय्य आहेत. 

काँग्रेस संसदेतील प्रमूख विरोधी पक्ष आहे. पण तो पक्ष  चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा मांडलिक झाल्याचे चित्र उभे आहे, ते कधी पुसले जाणार? त्यामूळे वेळोवेळी चीन द्वारें आपल्या देशाच्या सीमावर होणारी आगळीक मुळे  काँग्रेसचेच नाव अधिकाधिक बदनाम होत आहे. चीनच्या आगळिकेला भारत सडेतोड उत्तर देऊ शकतो असे सामरिक विषयाचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. तसेच एकंदरीत चीनला एकाकी टाकण्याचे जे प्रयत्न जागतिक पातळीवरून दिसत आहेत तो एक मोठा अडसर चीन समोर आहे. चीनने कुठे आगळिक केली की राहूल गांधी पंतप्रधान मोदीवर व्टिटरवरून टिका करतात. त्यातून काँग्रेसचा जनाधार  खंगावत आहे याची फिकीर काँग्रेसलाच पडलेली नाही. देशातील प्रमुख विरोधी पक्ष दिशाहीन झाला आहे. इतर सारे प्रांतीय पक्षांचे स्वरूप घराणेशाहीत झाले आहे. त्यामूळे नवा मतदार प्रांतीय अस्मीतेला राष्ट्रीय स्तरावरील निवडणूकीत फारसा प्रतिसाद देण्याच्या स्थितीत नसतोच. एकंदरीत सुशांतसिंगच्या मृत्यूच्या तपासातून जे राजकारण सुरू झाले आहे ते, ड्रग्ज माफीया, हवाला माफीया, बाॅलीवूड माफीया, एन्जीओ माफीया, दाढीवाले माफीया, सफेद झग्गेवाले माफीया, डावे माफीया, शेतमाल दलाल-माफीया, ढोंगी सर्वधर्मसमभावी माफीया, ढोंगी प्रान्तीय  माफीया, इत्यादींचे अड्डे नेस्ताबूत करीत पुढे सरकत जाईल असे वाटते. कारण राज्यशास्त्राच्या अभ्यासात म्हटले आहे की  When government machinery fails, judiciary becomes proactive and when opposition party is helpless, the  ruling party becomes proactive.

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

काॅंग्रेस फूटीच्या उंबरठ्यावर ? भाग 2


प्रश्न काॅंग्रेस मध्ये फूट पडणार का या पेक्षा काॅग्रेसची मालकी जी गांधी परिवाराकडे आहे ती संपुष्टात येईल का आणि काॅंग्रेस मध्ये सामूहीक नेतृवाचा उदय होईल का हा अधिक महत्वाचा प्रश्न आहे. या बाबत दूमत होणार नाही. पण या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी काॅग्रेसच्या वाटचालीचा इतिहास पाहावा लागेल. भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूच्या निधनानंतर एका गरीब कुंटुबातील काॅंग्रेसचा कार्यकर्ता आपल्या कार्यशैलीने प्रभाव पाडत पंडीत नेहरूंच्या सरकारमध्ये मंत्रीमंडळातील मंत्रीपदावर बसलेले श्री लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधानपदी विराजमान झाले. याचा अर्थ पंडीत नेहरूंनी काॅंग्रेस हा पक्ष आपल्या  वंशाची मालमत्ता व्हावी असा प्रयत्न केला नाही हे प्रांजळपणे मान्य करणे आवश्यक आहे. भारताच्या आतापर्यंतच्या पंतप्रधानांपैकी सर्वात अधिक सनदशीर पंतप्रधान म्हणून लाल बहादूर शास्त्रीजींचा नंबर पहीला लागतो असे माझे प्रांजळ मत आहे. पण दुर्दैवाने पाकिस्तान विरूद्ध १९६५ साली झालेल्या युद्धात ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताने मोठा विजय मिळविला, अशा लाल बहादूर शास्त्रींचा रशियात भारत-पाक मध्ये तह करण्यासाठी गेले असता अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वार्ताने भारतवासीयांना प्रंचड दुःख झाले. सर्वसाधारणतः आकस्मिक निधनाच्या वार्तेवर  लौकर विश्वास बसतच नाही. साम्यवादी रशियात जिथे प्रसारमाध्यांवर सरकारचे नियंत्रण असते, तिथे शास्त्रीजींचा मृत्यू झाला. म्हणून भारतीय जनतेला शंका-कुशंकानी घेरले. त्यासंबंधी अलीकडे एक चित्रपट ही प्रदर्शित झाला. त्याबाबत येथे चर्चा करणे प्रशस्त नाही.

पुढे पंतप्रधानपदी पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी विराजमान झाल्या. त्या कशा पंतप्रधान झाल्या व  काॅंग्रेसमधील इतर जेष्ठ नेत्यांपैकी पंतप्रधानपदी बसू का शकले नाही याबाबत ही चर्चा झाली पण तेव्हा आजच्या सारखे अद्यावत माहिती व तंत्रज्ञानाच्या अभावी पडद्यामागील घटना कधी बाहेर आल्या नाहीत. इंदिरा गांधी रशियाच्या पाठबळाने पंतप्रदानपदी बसल्या याचा ओझरता उल्लेख मी लेखाच्या पहिल्या भागात केले आहे. इंदिरा गांधी यांची कार्यपध्दत रशिया व चीन या देशातील एक पक्षीय साम्यवादी राज्यपद्धीतीची असल्यामूळे काॅंग्रेस मध्ये उभी फूट पडली. अर्थात ती फूट नव्हती. उलट पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पक्षांवर ही आपले नियंत्रण हवे होते. म्हणून त्यांनी राष्ट्रपतीपदाचे काॅंग्रेसचे उमेदवार निलम संजीव रेड्डी यांच्या विरोधी पडद्यामागे अपक्ष उमेदवार वि वि गिरी यांना पाठींबा देऊन विजयी केले. एका अर्थाने खुद्द पंतप्रधानाने आपल्या पक्षात बंड केले व ते यशस्वी झाले. आपल्या पक्षात पंतप्रधानपदाचा स्पर्धक निर्माण होऊ नये यासाठीच त्यांनी कामराज योजना म्हणजे साठ वर्षे वय पुर्ण झालेल्यांनी राजकीय पद भूषविता येणार नाही असा नियम काॅंग्रेस कार्यकारिणीत पास करून घेतला. तेव्हाच काॅंग्रेस मध्ये उभी फूट पडली. मोरारजी देसाई, स का पाटील इत्यादी बुजूर्ग नेत्याच्या गटाला सिन्डीकेट काॅंग्रेस व इंदिरा गांधीच्या गटाला इन्डीकेट काॅंग्रेस हे नाव पडले. मूळ काॅंग्रेसची बैलजोडी हि निशाणी गोठली गेली. दोन्ही गटाना भिन्न निवडणूकीचे चिन्ह देण्यात आले. तेथूनच काॅंग्रेसची मालकी इंदिरा गांधीकडे जाण्याचा मार्ग खुला झाला. १९७१च्या निवडणूक जाहिरनाम्यात रशियाच्या सल्ल्यानूसार समाजवादाच्या आधारावरील अर्थव्यवस्था व गरीबी हटाव अशा घोषणा जाहीर करून इंडीकेट काॅंग्रेस प्रचंड बहुमताने सत्तेवर आरूढ झाले. त्यानंतर थोड्याच अवधीत इंडीकेट काॅंग्रेसला इंदिरा काॅंग्रेस असे नाव प्राप्त झाले. नंतर इंदिरा इज इंडीया असे भौमतीक सुत्राच्या आधारावर रशिया, चीनच्या धर्तीवर  एक व्यक्तीय, व एक पक्षीय राज्यव्यवस्था निर्माण करीत आपल्या लोकशाहीचे बळ कमी होऊ लागले. इंदिरा गांधीनी आपल्या धाकट्या, संजय नावाच्या मुलाला  काॅंग्रेसचे सरचिटणीसपद देऊन काॅंग्रेस पक्षात हळूहळू  घराणेशाही प्रस्थापित केली. पुढे भ्रष्टाचार, महागाई , बेकारी, वाढली. सत्तेचं केंद्रीकरणत होत गेले. काॅग्रेसच्या विरोधात लोकांची नाराजी वाढली. लोकांचा असंतोष वाढला. या असंतोषाचे जनक सर्वोदयी जयप्रकाशजी नारायण ठरले. विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले. त्यातच  खुद्द इंदिरा गांधीनी आपल्या मतदार संघात अवैध मार्गाचा अवलंब करून विजय मिळविला होता असा निकाल एका  खटल्याच्या सुनावणीत अलाहाबादच्या न्यायालयाने दिला. त्यातूनच राजकारणात संधी दिलेल्या आपल्या संजय नावाच्या धाकट्या मुलाच्या सल्ल्याने देशात पंतप्रधान इंदिरा गांधीनी देशात आणिबाणी आणली. सिंडीकेट काॅंग्रेसच्या नेत्यासकट सर्व विरोधी नेत्यांनां तुरूगात डांबले गेले. प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य स्थगित केले. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली. भारतात लोकशाही ऐवजी एकाधिकारशाही आली.  पुढे १९७७ च्या निवडणूकीत सिन्डीकेट काॅंग्रेस, विरोधी पक्षांनी निर्माण केलेल्या जनता पार्टीत विलीन झाली. व इंदिरा काॅंग्रेसला अधिकृत काॅंग्रेस पक्ष असे मानण्यात येऊ लागले.१९७७ च्या निवडणूकीत काॅंग्रेसचा दारूण पराभव झाला. खुद्द इंदिरा गांधी व त्यांचे पुत्र संजय गांधी यांचा आपआपल्या मतदार संघात पराभव झाला. त्यानंतर १९७८ साली इन्डीकेट काॅंग्रेस मध्ये फूट पडली. देवराज अर्स, यंशवतराव चव्हाण, ए के ॲन्टनी, प्रियरंजनदास मुन्शी, के उन्ननीकृष्ण, इत्यादी नेतृत्वाखाली एक नवीन काॅग्रेस  पक्ष उदयास आला. 

पुढे जनता पार्टीचे सरकार अंतर्गत मतभेद होऊन गडगडले. पुढे १९८० सालच्या लोकसभेच्या निवडणूकीत इंदिरा काॅंग्रेसला प्रचंड बहूमत मिळाले. नंतर यंशवतराव चव्हाणच्या नेतृत्वाखाली अनेक नेत्यांनी काॅंग्रेसमध्ये वापसी केली. सिन्डीकेट काॅंग्रेसचे अस्तीत्व अगोदरच नष्ट झालेले होते. हात या चिन्हाची इंदिरा काॅंग्रेसच अधिकृत ठरली. पुढे संजय गांधी विमान अपघातात मृत्यु पावले. नंतर इंदिरा गांधीनी एयर इंडीयात पायलटची नोकरी करणारे पुत्र राजीव गांधीना काॅंग्रेसचे सरचिटणीस नेमले. इंदिरा गांधीची दुर्दैवी हत्या झाली. स्वाभाविकपणे घराण्याचा वारस म्हणून पंतप्रधानपदी व काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी राजीव गांधी विराजमान झाले. इंदिरा गांधीच्या मृत्यूची सहानभूती मिळावी म्हणून राजीव गांधींनी १९८४ साली मध्याविधी निवडणूका घेऊन प्रचंड विजय मिळविला.  त्यानंतर बोफोर्सच घोटाळा झाला म्हणून विश्वानाथप्रताप सिंगने काॅंग्रेस मध्ये बंड करून विरोधी पक्षांच्या साहय्याने विशेषतः चांगला केडर बेस व लोकसंपर्काच्या जोरावर शक्तीशाली झालेल्या भाजपाच्या साहय्याने १९८९ साली काॅंग्रेसचा पराभव केला व स्वतः पंतप्रधानपदी विराजमान झाले. दरम्यान भाजपाने अयोध्येत रामजन्मभुवीवर श्रीराम मंदिर उभे राहावे यासाठी अध्यक्ष लालकृष्ण आडवाणीची रथ यात्रा काढली.  जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण राजीव गांधीची ऐन निवडणूक प्रचाराच्या काळात दुर्दैवी हत्या झाली. मतदानाचे पुढील काही चरण थांबविण्यात आले. पुढील चरणाच्या  निवडणूकीत काॅंग्रेसला सहानुभूती मिळून काॅंग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेवर आला. त्यावेळी काॅंग्रेसचे अध्यक्षपदी तसेच पंतप्रधानपदी वयाच्या जेष्ठतेच्या निकषावरून नरसिंहराव विराजमान झाले . म्हणजे काॅंग्रेस मध्ये सामूहिक नेतृत्व पुन्हा रूजू झाले असा अनुभव आला पण तो तेवढ्यापुरताच टिकला. काॅंग्रेसच्या बहुमताची मक्तेदारी संपली. पुढे जनमत खंडीत येऊ लागले, आणि देशात आघाडी सरकाराचे पर्व सुरू झाले. राजकीय अस्थिरता आली. शेवटी निवडणूकीत भाजपा सर्वाधिक जागा मिळून भाजपा आघाडीचे सरकार आले आणि प्रधमच भारतिय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले.

नंतर बदलत्या काळाचे आव्हान स्विकारावे म्हणून गांधी घराण्याची सून असलेल्या सोनिया गांधीकडे काॅंग्रेसचे अध्यक्षपद आले. पण काॅग्रेसला एक हाती सत्ता त्या आणू शकल्या नाहीत. पण काॅग्रेसच्या आघाडीची सत्ता आणू शकल्या. तेथूनच काॅंग्रेस पुर्णतयः गांधी परिवाराची मालमत्ता झाली. सोनीया गांधीनी स्वर्गीय इंदिरा गांधीची नक्कल केली पण शेवटी त्यांच्याच नेतृत्वाखाली काॅग्रेस रसातळाला पोहचली. याचे कारण सोनीयांच्या काळात काॅग्रेसचे स्वरूप हिंदू विरोधी होऊ लागले. भगवा आंतकवाद नावाचे काल्पनीक अस्त्र उभे करून हिंदु संन्याशांना छळले. हिंदु मंदिराच्या चाव्या अहिंदूच्या हाती ठेवण्यात आल्या. ख्रिस्ती मिशनरी आणि जिहादी मौल्लवी उघड उघड भाजपाविरोधी मतदान करण्याचे फर्मान काढू लागले. राहूल गांधी तर पाक व चीनच्या भुमिकेला साजेसे असे वर्तन करू लागले. भ्रष्टाचाराने कळस गाठला. या सगळ्या घटना  युपीए म्हणजे सोनीयाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारच्या दहा वर्षात घडल्या. भाजपा व विशेष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदु हिताय भूमिका व विधायक कार्यामूळे भाजपाचा जनाधार वाढत गेला. भाजपाची धु'रा आक्रमक व जनहिताच्या कार्याचा सम्राट म्हणून नावारूपास आलेले गुजरातचे मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदीकडे आले. २०१४ साली नरेंद्र  मोदीच्या लाटेत भाजपाचे सरकार आले ते आज ही कायम आहे. तेव्हापासून काॅग्रेस विकंलाग झालीच पण इतर विरोधी पक्षात सुद्धा भाजपाला  झुंज देण्याइतके त्राण राहीले नाही. त्यामूळे मुख्य विरोधी पक्ष असे जेमतेम का असेना काॅग्रेसचे स्थान अस्तित्वात आहे. आज नाही म्हटले तरी देशात जितके घराणेशाहीचे पक्ष आहेत त्या सर्व पक्षांच्या वारसांपेक्षा राष्ट्रीय पातळीवर फक्त गांधी घराण्यांचेच  राहूल व प्रियंका गांधी वड्रा यांचा वावर आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यामूळे काॅग्रेसची मालकी आज ही सोनीया गांधीकडेच आहे आणि पुढेही राहील. इथे एक प्रश्न आपल्या मनात येतो की मतदार  घराणेशाही का पंसत करतात? का एका व्यक्तीची लाट निर्माण होते. शेवटी माणूस हा प्राणी आहे. पशु-पक्षीत जसे अनुकरणियता अस्तीत्वात आहे ती माणसातही असते. बाजारात एखाद्या कपड्याच्या दुकानात सेल लागला की ग्राहकांची झुंड उडते. कारण स्वभाव. आपले शरीर पंचमहाभूतांने बनलेले आहे. तेज म्हणजे प्रकाश. सूर्याची किरणे जिथे अडथळा निर्माण होतो तेथून परावर्तीत होऊन जिथे अडथळा नाही तिथे विसवतात. वायू म्हणजे वारा जिथे पोकळी दिसते तिथे घुसतो. आप म्हणजे जल ते पाणी नदिचे असो वा पावसाचे ते खाली उतरत वाहत जाते. जिथे खड्डा दिसला तिथे साचते. तो खड्डा भरला की पुढे वाहात वाहात मोठ्या खड्यात म्हणजे समुद्राला मिळते. माणसाचे वर्तन व आचरण असेच असते. मानसशास्त्रात याला ग्रुप सायकाॅलजी म्हणतात. इतर देशातही राजकारणात व्यवसायात, धंद्यात घराणेशाही आहेत. तिथले ग्राहक एखाद्या प्राॅडक्ट ब्रँन्डचे चाहते बनतात. कारण स्वभाव. आजच्या घटकेला राजकरणातील घराणेशाहीच्या ब्रँन्डमध्ये काॅग्रेसचा ब्रँन्ड अधिक सरस आहे. भारतातील कुठचाच प्रान्त स्तरावरील पक्ष काॅग्रेसच्या पेक्षा अधिक खासदार निवडून आणू शकणार नाही तो पर्यंत काॅग्रेसच मुख्य विरोधी पक्ष राहील. म्हणजे काॅग्रेसच्या २३ बंडखोरांना वेगळा पक्ष स्थापन करावा लागेल. पण त्याच्यांकडे ही पंतप्रधान मोदींना आव्हान देण्या इतका सशक्त नेता नाही. त्यातही बंडखोरांपैकी कोण्या एकाचे नेतृत्व इतर विरोधी पक्ष स्विकारणार नाहीत. म्हणून काॅग्रेसची आज जी वाटचाल चालू आहे ती तशीच राहणार आहे.

गांधी परीवाराविरूद्ध जे खटले उभे आहेत त्यासंबंधीत काही हालचाल होऊन गांधी परिवाराला कारावास झाला तर कदाचित काॅग्रेस मधील बंडखोर नेत्यांचा निदान काॅग्रेसच्या परिघात विजय मिळाल्या सारखे वातावरण तयार होऊ शकेल. पण त्यातही गोच अशी आहे की नेतृत्व कोणी करावे याबाबत संम्रभ होऊ शकतो. पण इतक्या लौकर गांधी परिवारा विरूध्दात असलेल्या न्यायालयीन खटल्याचा निकाल लागेल अशी शक्यता फार कमी आहे. कारण न्यायालयात प्रचंड केसेस पडलेल्या असतात. त्यातच लाॅकडाऊनचा काळामूळे न्यायालयातील कामाचा भार फारच मोठा झालेला असेल. या शिवार काॅग्रेस गांधी घराण्याच्या ताब्यात राहणे, राजकारणासाठी भाजपाच्या फायद्याचे ठरतच आहे.  दुसरे असे की एकाच वेळी काॅग्रेस, व बाॅलीवूड जगत, नक्षलवाद, ड्रग्ज माफीया, जिहादी इस्लामी, ख्रिस्ती मिशनरी इत्यादींशी सलगी असणार्या भाजपेतर पक्षांना व मिडीयांना एक्सपोज करणे, म्हणजे सर्व पक्षांच्या मूळावर घाव घातल्या सारखे होऊ शकते. त्यातून त्यांना एकत्र येण्याची संधी मिळू शकते. हे पंतप्रधान मोदी जाणतात. म्हणून हळूहळू स्लो पाॅईझनचा डोस भाजपेतर पक्षांना देणे ही भाजपाची म्हणा वा मोदी-शहा या जोडीची रणनीती राहील असे वाटते. 

एकंदरीत बेरोजगारी, महागाई, मंदी, इत्यादी समस्या असूनही आपल्या नाकार्तेपणा मूळे विरोधी पक्षांनी राजकारणाची सारी सुत्रे मोदीकडें सोपविली आहेत. बरं त्यातही पंतप्रधान मोदी सुत्रे हालवित असताना राष्ट्रहिताला तिलांजली देऊन स्वार्थ साधत नाही ही जमेची बाजू विरोधी पक्ष लक्षात घेत नाहीत. त्यातही भाजपाचे वैशिष्य हे आहे की तो पक्ष इतर पक्षांपेक्षा सांघिकतेत सर्वात सरस आहे. तिथे सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान होऊ शकतो हे प्रत्यक्षात अनुभवास आल्यामूळे आजच्या नव्या पिढीला भाजपाची ओढ लागली आहे. सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोरोनाशी लढतीतील,  तसेच वादळ, पूर इत्यादी आपत्तीतले योगदानाचा भाजपाला फायदा होत असतो.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उभारलेल्या सेवा प्रकल्पातून केवळ परिश्रम करणारे व त्यागी स्वयंसेवकांच्या शक्तीच्या जोरावर असंख्य गरीब समाजबांधवांना आत्मनिर्भर करून सर्वसमावेशक हिंदू जीवन पद्धतीच्या यज्ञाचे जे अहोरात्र दर्शन घडवित  आहे
त्याचा ही फायदा भाजपाला होत आहे. त्यामूळे काॅग्रेस मध्ये फूट पडो वा ना पडो सध्या तरी भाजपा सर्व पक्षांना भार पडत राहील. सध्या तरी भाजपा नरेंद्र मोदींना पर्याय निर्माण करेल अशी शक्यता नाही. त्यामूळे पंतप्रधानपदी श्री नरेंद्र मोदीच राहणार आहेत. तोवर राहूल गांधी व काॅग्रेस हेच विरोधी पक्षांचे नेतृत्व करीत असताना दिसतील. असे असले तरी घराणेशाहीचे जे पक्ष आहेत त्याकडे नजर फिरविली तर समाजवादी मध्ये अखिलेश व त्याचे काका, राष्ट्रवादी व शिवसेनेतील  काका -पुतण्या, डीएमके, तृणमूल, बहूजन विकास पक्ष, इत्यादी पक्षात कलह निर्माण झालेले दिसतातच. तसाच प्रकार राहूल व प्रियंकात ही असू शकतो. पण त्याची वाच्यता बाहेर पडेल अशी सुतराम शक्यता नाही. म्हणून  इतर विरोधी पक्षांमधील स्पर्पेत आज तरी काॅग्रेस वरचढ आहे व भविष्यातही राहील असे दिसते.

काँग्रेस फूटीच्या उंबरठ्यावर? भाग 1

सध्या भारतातील राजकारण दोन महिलाभोवती फिरत असल्याने काॅग्रेस पक्षात जे काही घडते आहे त्यावर फारशी चर्चे होताना दिसत नाही. परंतु तसे पाहता हा राष्ट्रीय स्तरावरील विषय आहे. म्हणून चर्चा कराविसी वाटते. म्हणून हा लेख प्रपंच.


भारतीय राष्ट्रीय काॅग्रेसमध्ये सध्या काय चाललंय किंवा काॅग्रेस या पक्षाची सद्यस्थिती कशी आहे यावर लिखाण वा चर्चा करावयाची असेल तर प्रथम काय शिर्षक ठेवावे असा प्रश्न पडला. काॅग्रेस दुफळीच्या उंबरठ्यावर असे शिर्षक ठेवले असले तरी तरी उभी फूट काॅग्रेसमध्ये पडेलच असे निश्चीतपणे सांगता येत नाही. सोनिया गांधींनी पक्षाची सुत्रे हाती घेतल्या नंतर काॅग्रेम मध्ये प्रथमच २३ नेत्यांनी नेतृत्वासमोर आव्हान उभे केले. त्या आव्हानात किती दम आहे हे कळावयास वेळ लागेल. म्हणून अमेरिकेला जाण्या अगोदर २३ बंडोबा काॅग्रेसच्या नेत्यांकडे असलेली जबाबदारी काढण्याची एक तात्पूरता छोटीशी कारवाई करून सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेत गेल्या आहेत. श्रीमती सोनिया गांधीं सोबत राहूल गांधी ही गेले आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. पण दोन सर्वोच्च नेते अमेरिकेत का व कसे जातात, राहूल गांधीनी तरी थांबावयास हवे होते अशी चर्चा ऐकू येते पण ती निरर्थक आहे. कारण आजपर्यंत सोनिया गांधींना काय आजार आहे हे देशाला कळलेले नाही. विरोधी पक्षाचे एक मोठे नेते या नात्यांनी नव्हे तर दहा वर्षे युपीए सरकार काळात NAC च्या प्रमूख म्हणून जबाबदारी ज्यांनी सांभाळली त्यांच्या आजाराचे कारण गुपीत ठेवणे ही बाब लोकशाही मुल्याशी सुसंगत नाही. राहूल गांधीना सर्वात कोण चांगले ओळखत असेल त्या सोनिया गांधीच. तेवीस नेत्यांनी काॅग्रेसमध्ये बंडाचा झेंडा हातात घेतला असताना राहूल गांधी आपल्या गैरहजेरीत उगीच नसती आफत निर्माण करतील असे त्यांना वाटत असावे. बंडखोरांवर तात्पुरता जबाबदारीचे पद काढून घेण्याची एक छोटीसी कारवाई करण्याची चाल सोनिया गांधी खेळल्या. पण राहूल गांधींना सोबत घेऊन एक मोठी चाल त्या खेळल्या आहेत. त्यामूळे काॅग्रेसचा कारभार त्यांनी एकप्रकारे लाॅकडाऊन केला आहे. श्रीमती  सोनीया गांधी उपचार घेऊन परत आल्यानंतर, काही दिवस विश्रांतीचा काळ संपला की काॅग्रेसचे कामकाज सुरू होईल. तो पर्यंत आपण जी काही चर्चा करणार आहोत ती केवळ अंदाज बांधण्यापूरता सिमीत राहणार हे ओघाने आलेच.

संसदेचे पावसाळी अधिवेशन फारसे वादळी ठरेल असा अंदाज कोणी मांडला असेल तरी त्यातून विरोधी पक्षांच्या हाती काही लागणार नाही. कारण सरकारला घेरण्यासारखे प्रश्न असले तरी सारे विरोधी पक्ष आपआपल्या पक्षांतर्गत समस्याने त्रस्त आहेत. फक्त पंजाब मधील काॅग्रेस सुस्थितीत आहे. तरी तिधे ही नवज्योतसिंग सिध्दू बंड करताना दिसत आहेत. महारष्ट्रातही अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण  या दोघां नेत्यांचे पटत नाही. देवरा, प्रिया दत्त, संजय निरूपम, इत्यादी बंडाच्या तयारीत आहेत. राजस्थानमध्ये सचीन पायलट व अशोक गेहलोत याच्यांत समेट झालेला असला तरी तिथे पुन्हा बिघाड होणार नाही असे ठामपणे म्हणता येत नाही. दक्षिणेतील तेलंगण,व आन्ध्र मधील काॅग्रेसने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. कर्नाटकात जेडीयुच्या नादी लागून सर्वाधिक जागा मिळविणार्या भाजपावर कुरघोडी केली. ती अंगाशी आली. शेवटी भाजपा तिथे ही काॅग्रेसच्याच मूळावर घाव करणार. कारण जेडीयुची छाती फुगण्याची शक्ती नव्हतीच. महाराष्ट्रात शिवसेनेच्या व पवाराच्या नादी लागून काॅग्रेसने आपला पारंपारीक मतदारांनाच दुखाविले आहे. पश्चीम बंगालमध्ये काॅग्रेस डाव्यांच्या नादी लागली त्यामूळे ममताने स्थान भक्कम केले. ममताचे स्थान डळमळीत होणार होतेच पण विरोधी पक्षाची स्पेस काॅग्रेस गमावून बसली. ती जागा भाजपाला भरून काढण्याची संधी देऊन बसली.

अशा स्थितीत गांधी परिवार च्या विरोधात नॅशनल हॅराॅल्ड व इतर तत्सम  मालमत्ते संबंधीतल्या केसेस बाबत केंद्र सरकार खंबीर पावले उचलण्याची तयारी करू लागले तर काॅग्रेसच्या वाटचालीचे स्वरूप पुर्णतयः १९६९ च्या काळातील काॅग्रेस सारखे झालेले दिसू शकते. म्हणजे गांधी परीवाराची इंडीकेट काॅग्रेस व ज्या २३ नेत्यांनी बंड केले आहे, त्यांची सिंडीकेट काॅग्रेस अशी उभी फूट पडण्याची शक्यता आहे. कारण ज्या २३ काॅग्रेसच्या नेत्यांनी बंड केले आहे त्यात नावाजलेले कपील सिब्बल, अभिषेक मनु संघवी, शशी थरूर सारखे अभ्यासू आणि अनुभवी नेते आहेत. त्यांना  नॅशनल हॅराॅल्डची केस गांधी परिवाराला अडचणीची ठरणार असे वाटत ही असावे. म्हणून अगोदरच काॅग्रेसला फूल टाईम अध्यक्ष मिळत नसल्याचे निमित्त तयार केले असण्याची शक्यता आहे. काॅग्रेस मध्ये अनेक मोठाली पदें घेऊन गांधी परिवाराशी पंगा घेण्याची हिम्मत अनेक काॅग्रेसजनांना कोठून प्राप्त झाली या प्रश्नाचं उत्तरच तेच असावे. दुसरीकडे राहूल गांधीभोवती पिंगा घालणार्या नेत्यांमूळे काॅग्रेसमधील बंडखोर नेत्यांना स्वतःच्या परिवारातील सदस्यांना व नातेवाईकांसाठी काॅग्रेस मध्ये जम बसविण्याची संधी मिळणार नाही अशी खात्री झाली असावी हे ही एक कारण असू शकते. राजकारणात जम बसविण्यासाठी लागणारा पैसा व अनुभव या बंडखोर नेत्यांकडे आहेच, म्हणून त्यांना बंड करण्याची हिम्मत झाली असावी. अर्थात स्वतःच्या अंसतोषाचे जनक स्वतःच असणारे नेते अधून मधून प्रत्येक पक्षात  दिसत असतात. ते  लोकांच्या असंतोषाचे जनक असलेल्या लोकमान्य टिळकांचे वारसदार नाहीत. तसे ते दावा करीत ही नाहीत. कारण ते हास्यास्पद वाटेल हे ते पक्के जाणतात. पण भारतिय राजकारणात आयाराम-गयाराम अशी खासदार- आमदारांची एक स्वतंत्र जमात निर्माण करण्याचे जनकत्व त्याच्याकडे जातेच. आपण फार तर त्यांना शरद पवारांचे वारस म्हणून समजू शकतो. श्री शरद पवारांनी असे प्रयत्न केले पण शेवटी त्यांना वेळोवेळी काॅग्रेसच्याच आश्रयाला जावे लागले हा इतिहास आहे.

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीच्या दुर्दैवी निधनानंतर काॅग्रेसवर गांधी परिवाराचा प्रभाव राहू लागला आणि काॅग्रेसला सुद्धा गांधी परिवारा शिवाय तरणोपाय राहीला नाही हे आपण पाहतो. त्यामूळे अमाप संपत्तीचे मालक असलेले गांधी घराणे सहजा सहजी काॅग्रेसची मालकी सोडणार नाही. इंदिरा गांधीनाही रशियाच्या पाठींब्यामूळेच काॅग्रेसवर वरचष्मा दाखविता आला असे ऐकू येत असे. त्यावेळी माहिती व तंत्रज्ञान शाखेत इतकी प्रगती झाली नव्हती. म्हणून राजकारणात घडलेल्या प्रत्येक घटनांची माहीती गुप्त राहीली गेली. 

आज अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत ट्रप्म यांना रशियाचे सहाय्य मिळाले असे केवळ ऐकूच आले असे नव्हे तर त्यासंबंधीचा तपास ही होऊ लागला असे वृत्त ही सर्वांच्या कानी येऊ शकले. आज अत्याधूनिक शस्त्रांत्राची अमाप साठवण व आपल्या देशातील एनजीओच्या मार्फत पैसा पुरविणारे अशी बडी राष्ट्रे दुसर्या देशातील राजकारण, निवडणूका, परराष्ट्र खाते, उद्योग, व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान, कृषी आयात-निर्यात, इत्यादी क्षेत्रात  व्यापार, आर्थिक गुंतवणूक, व संरक्षण सज्जतेच्या करारांच्या नावाखाली आपला दबाव वाढवित असतात. या शिवाय गुप्त हेर,  दुसर्या देशांच्या नेत्यांना, माध्यमांना आपले दास बनविण्याचे कार्य करतात त्यासाठी स्वतंत्र विभाग ही असतोच. हा एक नवीन प्रकारचा विस्तारवाद होय. तेच आंतरराष्ट्रीय राजकारणचे स्वरूप झाले आहे. जगातील काही देशांना भारतात गांधी घराण्याचीच सत्ता असणे हे फायदेशीर ठरलेले आहे. त्यामूळे अशा देशांची आजही काॅग्रेस, आणि ती ही गांधी घराण्याचीच, हीच पहिली पंसती आहे. म्हणून सोनीया गांधीना राहूल गांधीचे वय पाहाता काॅग्रेसची डागगुजी करण्याची काही घाई दिसत नाही. त्यातही  पंतप्रधान मोदीशी टक्कर देणे राहूल गांधीना अशक्यच आहे. म्हणून संसदेतला सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळते आहे तितके सोनिया गांधीना पुरेसे आहे. म्हणूनच २३ बड्या काॅग्रेस नेत्यांना पक्षातून बडतर्फ केले नाही. सचिन पायलटला सांभाळून घेतले. त्याचे कारण ही तेच असावे. सचिन पायलटला समाजाविणे काॅग्रेसला सोपे पडले आहे. कारण ज्योतिरादित्य सिंधीया नावाचा दोन नंबरचा स्पर्धक काॅग्रेस सोडून गेला आहे. सचिन पायलट व ज्योतीरादित्य सिधींया मध्ये स्पर्धा नव्हती असे कसे मानता येईल, उलट पक्षांतर्गत स्पर्धा ही अधिक कडवी असते. दोन देशांच्या सर्वोच्च नेत्यांची शिखर परिषद ही त्या दोन्ही देशात व्यापार, उद्योग, संरक्षण इत्यादी क्षेत्रात सहकार्य व संबंध वाढविण्यासाठी असली तरी अशा शिखर परिषद घेऊन आपआपल्या देशात आपल्याला स्वपक्षातील स्पर्धक निर्माण होऊ नये हा हेतू साध्य केला जात असावा असेच मला वाटते. प्रत्येक देशाचा प्रमूख हा विरोधी पक्षांतील नेत्यांपेक्षा स्वपक्षातल्या स्पर्धकापासून अती सावध असतो. कारण सत्तेच्या राजकारणाचा मार्गच तसा असतो. चीनच्या राष्ट्रप्रमुखाच्या बाबतीत असाच प्रकार उद्भवत असल्याचे वाचनात आले आहे. 

आज तरी भाजपाला मोदी शिवाय पर्याय नाही. म्हणजे सोनीया गांधीना वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. इतर विरोधी पक्षातून मोदींना टक्कर देण्याइतका सक्षम नेता नाही ही बाब काॅग्रेसच्या पथ्थावरच पडलेली आहे. या शिवाय २३ बंडखोर नेत्यांपैकी एकाद्याचे नेतृत्व विरोधी पक्ष मानतील ही शक्यता नाही. म्हणजे काॅग्रेसमध्ये उभी फूट पडून ही काॅग्रेसचे काही नुकसान होणार नाही आणि भाजपाचे मूळीच होणार नाही. उलट या २३ बंडखोरांनी वेगळा पक्ष काढला तर भाजपाला फायदाच होईल.  त्यामूळे स्वपक्षात राहूल गांधींना स्पर्धक निर्माण न करणे हीच सोनीया गांधीच्या राजकारणाची सध्याच्यी प्राथमिकता झाली आहे. त्यांचे मन ही तेच सांगत आहे. त्यामूळे  खेडोपाडी हाताचा पंजा ही निशाणी पोहचलेल्या सर्वात जूना राजकीय पक्ष जो काॅग्रेस आहे, त्याची मालकी सोनीया गांधी सोडून देण्याची सुतराम शक्यता नाही. आपल्या येथे न्यायलयातील खटल्याचा निकाल लागेपर्यंत एक पिढी स्वर्गवासी झालेली आपण अनुभवत आहोत. त्यामूळे राजकारणातील नेत्यांना कुठल्याही न्यायालयीन खटल्याची फारशी भितीच उरली नाही. फार फार दोन टर्म सत्तेविना रहावे लागेल पण राजकीय नेता म्हणून मिरविण्याचे अनेक फायदे त्यांच्या बँकेत जमा होतच असतात. शिवाय समाजव्यवस्थेतला मान आणि त्यांच्या बेनामी संपत्तीवरील कब्जा संपलेला आहे असे एकही उदाहरण सापडत नाही. म्हणून काॅग्रेसची वाटचाल आज जशी आहे तशी राहणार आहे. त्यात फारसा फरक पडणार नाही.

काॅग्रेसमध्ये उभी फूट पडली तर गांधी परिवाराचे काय होईल हा प्रश्न ही तितकाच महत्वाचा आहे. त्यावर ही चर्चा होणे गरजेचे आहे. त्यासाठी कृपया भाग २ पाहा.

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

दोन महिलांभोवती फिरणारं राजकारण


सध्या मुंबापुरीत दोन महिलांभावती राजकीय वादळ घोंघावत आहे. मला जाण आल्यापासून वेधशाळेने आतापर्यंत जितक्या चक्रीवादळाच्या तडाख्याचे अंदाज वर्तविले आहेत त्यातून बहूतांश वेळा वादळ उत्तरेकडे सरकत मुंबई निदान चक्रीवादळापासून बचावली आहे. सध्या दोन महिलाभोवती फिरत असलेले या राजकीय वादळाचं स्वरूप चक्रीवादळात होऊन घोंघावत ते समुद्राच्या उत्तरेकडे सरकत जाईल कि या वादळाचं स्वरूप चक्रीवादळात होऊन मुंबईतील विधानसभेवर तडाखा देईल का असा प्रश्न आपल्या सर्वाना सतावत असणार. म्हणून हा लेख प्रपंच.

रिया चक्रवर्ती आणि कंगाना राणावत या दोन महिलाभोवती फिरत असलेले राजकीय क्षेत्रातील वादळ आपण प्रथमच अनुभवत आहोत. त्रेता युगात जनककन्या व प्रभू रामचंद्राची पत्नी सितेचं हरण झाल्यावर भारतीय राजकारणात रामायण घडले. द्वापार युगात कौरवाच्या दरबारात द्रौपदीचं वस्त्र हरण झाल्यानंतर महाभारत घडले. पण सध्या मुंबईत ज्या दोन महिलाभोवती फिरत असलेल्या या राजकीय वादळातील महिला सिता व द्रौपदी नाहीत हे जितकं सत्य आहे तितकेच या वादळात कोणी श्रीराम नाही, व श्रीकृष्ण नाही, हे ही सत्य आहे. कलियुगात जगभरात जी काही शासनव्यवस्था किंवा जी काही राजनीती आहे त्यातील नीती गायब झालेली आहे, जे काही  राहीलं आहे ते फक्त राज आहे. त्यालाच सत्तेची खुर्ची किंवा राजकारण असे म्हटलं जात आहे. रिया व कंगना या चित्रपट सृष्टीतील आहेत. तस पाहता चित्रपट सृष्टीतील सृष्टी गायब झाली आहे, सुशांतसिंग राजपूत याचा संशयास्पद मृत्यु नंतर त्यासंबंधीच्या चर्चेतून एक पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झालेली आपण पाहात आहोत. त्या पोस्टचा आशय असा आहे की मिडीयाने हा विषय उगीच वाढविला आहे. ' कोण तो सुशांतसिंग, एक ड्रग्ज च्या आहारी गेलेला, श्रीमंत बापाचा सुशांतसिंग नावाचा तो युवक, काय त्याच्या मृत्युशी सामान्यजनांनाचा संबंध? कोरोना सारखी महामारी आटोक्यात आणायचे सोडून, मिडीया का या घटनेला अवाजवी महत्व देत आहे? ' वरवर पाहता ती पोस्ट आपल्याला वास्तवतेकडे घेऊन जाते पण असे दिसत असले, तरी ड्रग्ज पुरविणारी एक लाॅबी आपल्या समाजात आहे, जी समाजाला गेली कित्येक वर्ष पोखरत आहे याकडे कानडोळा करता येत नाही. त्यातही बाॅलीवूडमध्ये चाललेली दादागिरी ही परकीय शक्तीमूळे होत असेल तर हा एक प्रकारचा आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान आहे असे जर केंद्र सरकार मानत असेल तर त्यात केंद्र सरकारला दोष कसा देता येईल? श्रीरामजन्मभूमी संबंधीत आपल्या शासन व्यवस्थेत घडलेल्या राजकारणासंबंधी एक पोस्ट गेली काही वर्ष सोशल मिडीयावर व्हायरल होत असे हे आपल्या स्मरणात असेल. ' राममंदिराची काय इतकी मोठी गरज आहे; देशातील राजकीय नेते उपचारासाठी विदेशात जातात; त्यांना विदेशातील उपचाराचा खर्च परवडतो; म्हणून श्रीरामजन्मभूमीवर सामान्यजनांसाठी  विदेशातील रूग्णालया प्रमाणे एक अद्यावत रूग्णालय बांधवयास हवे.'  अशा आशयाची पोस्ट आपण पाहीली व आपल्याला पटली. वस्तुस्थिती अशी आहे की सुशांतसिंग राजपूताच्या मृत्युनंतर होणार्या चर्चेसंबंधी व्हायरल झालेली ती पोस्ट व श्रीराममंदिरासंबंधी व्हायरल झालेली पोस्ट यामध्ये ही राजकारणच होते. आपल्या देशातील समाजव्यवस्थेत ज्यांना काही रस नाही, ज्यांना फक्त देशातील सामान्यजनांचा खोटा कैवार घेऊन राज्यव्यवस्था व समाजव्यवस्था उलथून पाडावयाची आहे अशा तीन लाॅबी ज्या कार्यरत आहेत त्या लाॅब्या चतुराईने अशा पोस्ट सोशल मिडीयावर टाकत असतात. आपल्या देशात प्रामुख्याने, डावे व नक्षलवादी, जिहादी मुस्लीम आणि ख्रिस्ती मिशनरी या लाॅब्या कार्यरत आहेत. त्यांच्यात उपशाखा, व गट आहेत. त्यांना भारतीय जनतेसंबंधी इतका पुळका असता तर ईशान्य भारतात अशा लाॅब्यांचे सरकार अनेक वर्षे होते तिथे त्यांनी काय मोठी विकासाची कामें केली? तेथील जनता का भाजपाच्या पारड्यात मते देऊ लागली? वरील तिन्ही लाॅब्यांचे गुरू म्हणा वा पालक, हे विदेशी आहेत आणि त्यांच्यामार्फत मिळणार्या पैशावर या लाॅब्या चालविणार्या आपल्या येथील  नेतेमंडळी व विचारवंताना उच्चभ्रू जीवन जगावयास मिळत असते. या लाॅब्यातील मंडळी २०१४ च्या लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर सैरभैर झाली आहे;  त्यांच्या आश्रयास भाजपेतर सारे राजकीय पक्ष गेले आहेत; त्याचेच प्रत्यंतर महाराष्ट्रात आपल्याला आले आहे;  त्याचं गोंडस नाव आहे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार.

सुशांतसिंगच्या मृत्युचे प्रकरण बंद पेटीत ठेवण्याचे कार्य महाराष्ट विकास आघाडीचे सरकार इतक्या तत्परतेने का करीत आहे या संबंधीची शंका केंद्र सरकारला आली असावी आणि त्या शंकेच्या निरसनासाठी म्हणा वा त्यातून महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला नेस्ताबूत करण्यासाठी चालत आलेली आयती संधी हवे तर म्हणा,  केंद्र सरकार अशी संधी साधत असेल आणि त्याला कोणी राजकारण म्हटले तरी त्याबाबत आक्षेप नसावा हे मान्य. कारण जगभरातील प्रत्येक देशात सत्तेचे राजकारण असेच आहे. राजकीय डावपेचात जो पक्ष सरस ठरेल तो विजेता. जो जिता वह सिकंदर ! त्यामूळे पराजित झालेल्या पक्षांच्या समर्थकांना मग ते कार्यकर्ते असो वा पत्रकार संपादक मंडळी असो त्यांच्या मुखातून ' The people get the government what they deserve ' असे वाक्य येत असते. आपल्या देशात सत्तर वर्षे भाजपाचे समर्थक असे म्हणत होते तर गेली सहा वर्षे भाजपेतर पक्षांचे समर्थक हेच वाक्य मांडत आहेत. वक्त - वक्त की बात है और क्या?

प्रथम आपण रिया चक्रवती भोवती फिरणारं राजकारणावर चर्चा करू या. ही रिया चक्रवती कोण असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला दिसला. सुशांतसिंग निदान प्रथीतयश सिनेकलाकार होता. पण त्याचा मृत्यु हा आत्महत्याचा प्रकार नव्हता, उलट त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं गेलं वा त्याची हत्या केली आहे असे सुशातसिंग राजपूताच्या कुंटुबिंयास वाटले. म्हणून त्यांनी बिहार राज्यात FIR नोंदविली. बिहार मधील पोलीस यंत्रणा महाराष्ट्रात तपास करावयास आली. असा तपास होणे हा महाराष्ट्राचा व पर्यायाने मुंबईतील पोलीसाचा अपमान ज्यांना वाटला त्यांनी आपले मराठी अस्मितेचे राजकीय कार्ड वापरले. मराठी अस्मितेचं कार्ड स्वयंप्रेरणेतून मराठी समाजाने वापरले असते तर त्यात राजकारण नाही असे मानले गेले असते. पण महाराष्ट्रातील मविआ सरकारने, व त्यातही मविआ सरकारमधील प्रमूख घटक पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्याच मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रानेच मराठी अस्मितेचं कार्ड वापरल्यामूळे मविआ सरकार सुशातसिंग राजपूताच्या मृत्यूचे प्रकरण बंद पेटीत ठेवण्याचा प्रयत्न केला अशी भावना मराठी माणसालाही वाटली. हे स्वाभाविक आहे. शेवटी तो एक मतदार या नात्याने ही त्या प्रकरणाकडे पाहात असतो हे मान्य करावयास हवे.

कंगना राणावत ही एक सिनेनटी आहे व ती सुशातसिंगचा मृत्यू आत्महत्या नसून  हत्या आहे असेच सुरूवातीपासून म्हणते आहे. त्यामूळे कंगना राणावत कोण असा प्रश्न उभा राहीलेला दिसला नाही. पण या कंगना राणावतने मुंबई संबंधी POK असा उल्लेख केल्यामूळे ती अधिक चर्चेत आली. त्यामूळे ती मराठीद्वेषी आहे असा प्रचार करावयाची संधी शिवसेनेला मिळाली व त्याचा उपयोग शिवसेना करीत असेल तर वावगे काही नाही, कारण तो ही राजकारणातला एक डावपेच आहे. पण त्यातून सुशांतसिंग राजपूताच्या मृत्युचे कारण शोधणार्या ज्या तीन एजन्सी आहेत त्यांच्या तपास कार्यावर काही विपरीत परीणाम होणार नाही. फार तर मविआ सरकारला कंगानाच्या ऑफीसवर बूलडोझर फिरविल्याने सूड घेण्याचे समाधान मिळालं असेल, फार तर कंगानाच्या अरेरावीतून मराठी माणसाकडून सरकारला थोडीफार शाबासकी मिळाली ही असेल. पण मविआ सरकारने कंगाना राणावतच्या ऑफीसवर न्यायालयाचा निर्णय येण्या अगोदर बूलडोझर फिरविल्यामूळे राज्य सरकारला न्यायालयाकडून चपराक मिळणार हे ही निश्चीत. भरीस भर म्हणून मुंबईतील अनेक बेकायदेशीर बांधकामे मुंबई महानगरपालिका पाडण्याची तत्परता दाखविणार का असा प्रश्न भाजपाचे नेते विचारू शकतात. त्यातून भाजपाला मराठी द्वेष्टा अशी शेलके लावण्याची संधी मविआ सरकारला प्राप्त होत होईल असे दिसत नाही. कारण कंगना राणावतने तिच्या ऑफीसची जागा आहे ती इमारतच शरद पवारांची आहे असा खुलासा केला आहे.  या शिवाय महत्वाची राजकीय घटना म्हणजे मुंबई महानगर पालिकेने कंगनाच्या ऑफीसवर केलेल्या कारवाईची नोंद राज्यपाल महोदयांनी घेतल्याचे वृत्त आले आहे. त्यामूळे केंद्र सरकारला राज्य सरकारवर कारवाई करण्याची संधी प्राप्त असावी असे वाटते. परंतु या संबधी कंगानाने जी याचिका दाखल केली आहे, त्यावर  न्यायालयाचा काय निर्णय येईल यावर अवलंबून आहे. 

हा लेख लिहीताना काही शिवसैनिकांनी निवृत नौदल  अधिकारी श्री मदन शर्मा यांना मारहाण केल्याचे वृत्त आले आहे. शिवसेनेच्या प्रमूखाने युती धर्माची ऐशी तैशी केली. मागील दारातून विधानसभेत प्रवेश केला व मुख्यमंत्रीपद मिळविले. पण ते कशासाठी? निवृत्त नौदल अधिकार्याला मारहाण करण्यासाठी का? कायदा हातात घेण्यासाठी का? राज्य चालविणे म्हणजे शिवसेना चालविणे  नव्हे ? फौजदारी तत्सम गुन्हे वाढत गेले आणि बंद पेटीत ठेवायाचा प्रयत्न वर्तमान महाराष्ट्र सरकार करीत राहिले तर  तिन्ही घटक पक्षांना भविष्यात महाग पडू शकते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जाॅन एफ केनडींचे एक वाक्य आठवले" Political sovereinty  is but a mockery without the means of meeting poverty, illiteracy and disease." कोरोनाशी सुरू असलेल्या लढतीच्या काळात महाराष्ट्राचे मविआ सरकार  एकापाठोपाठ करीत असलेल्या चूका पाहता, Self -dertermination is but a slogan if the future holds no hope असेच म्हणावेसे वाटते. शेवटी बुडत्याचा पाय खोलात म्हणतात ना तशीच गत मविआ सरकारची होऊ पाहात आहे. मविआ सरकार विरूद्ध  केंद्र सरकार अशी राजकीय लढाई जी सुरू झाली आहे त्यातील पहिला सेट बेभान झालेले शिवसैनिक, सामनाचे संजय राऊत व हतबल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी केंद्र सरकारच्या पारड्यात स्वतःहून टाकला आहे. आता या लढाई संबंधीचे धावते समालोचन टिव्ही चॅनेल व वृत्तपत्रातून येत राहिले तर त्याचा दोष मिडीयाला देता येणार नाही. या लढाईतून मराठी माणसाचं काय हित जपलं जाईल हे फक्त मविआ सरकार व त्या सरकारचे समर्थन करणारे संपादक मंडळी व त्यांच्या कार्यकर्त्यानांच काय ते ठाऊक.

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

मृत्यु सुशांत पण महाराष्ट्र सरकार का अशांत ?

दिनांक २० मे रोजी ब्लाॅगवर महाराष्ट्रातील राजकारण या विषयासंबंधी लेख पब्लीश केला आहे. त्यात मी  म्हटले आहे की " जीव सामान्य नागरिकाचा का असेना तो अमूल्य असतो. त्यात भेदभाव करणे म्हणजे लोकशाही मुल्यांची प्रतारणा करणे होय. आपल्या देशाच्या संविधानाने चोरालाही मारण्याचा हक्क कोणाही व्यक्ती वा समाज समूहाला दिलेला नाही. तरीही पालघरला दोन साधूंची हत्या होते तीही कोरोनाच्या महामारीमूळे जमाव बंदी असताना. नंतर दिशा सॅलियनचा अनैसर्गिक मृत्यु , पाठोपाठ आपल्या येथील बाॅलीवूड नावाने ओळखल्या जाणार्या फिल्म-जगतात ज्याने स्वतःच्या मेहनतीने नाव कमाविले, त्या सुशांतसिंग राजपूताचा झालेला अनैसर्गिक मृत्यु.  इत्यादी घटनेतून महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याची निष्क्रियता वा चलाखी स्पष्ट झाली आहे. चलाखी शब्द वापरला याचे कारण आपल्या राज्याचे गृहमंत्री श्री अनिल देशमुखाने, सुशांत राजपूताच्या मृत्युसंबंधीचा तपास सुरू करण्याअगोदरच ' सुशांतने आत्महत्या केली ' असे वक्तव्य केले. तर त्यांचे बाॅस शरद पवारांनी " एका कलाकाराचे प्राणाचे मूल्य काय ते मोठे असे म्हणत, २० शेतकर्यांच्या आत्महत्येसंबंधी मिडीया का लक्ष घालत नाही असा उलटा प्रश्न उभा केला आहे. या शिवाय शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून संजय राऊत या विषयावर एकतर्फी अग्रलेख लिहितात आणि एका पाठोपाठ एकतर्फी व्टिट ही करीत असतात. अलीकडच्या काळात शरद पवार व संजय राऊत सतत काही तरी वाद उत्पन्न करीत असताना दिसत आहेत. या ठिकाणी ज्ञानपीठ विजेते वि स खांडेकर यांच्या एका पुस्तकातील प्रस्तावनेत म्हटलेले बोल आठवले आहेत. ते असे आहे. " तत्त्वबोधासाठी जगात फारच थोडे लोक वाद करतात. अहंकाराच्या समाधानासाठी, विद्वत्तेच्या प्रदर्शनासाठी, पूर्वग्रहाचे प्रिय असणारे पोकळ डोलारे सांभाळण्यासाठीच या जगात वाद उत्पन केले जातात आणि हिरीहिरीने लढविले जातात ! मनुष्य मुख्यतः आत्मपूजक आहे. सत्यपूजक नाही."  वि स खांडेकरांचे निधन १९७६ ला झाले. त्यामूळे आणिबाणीच्या कालखंडाविषयीची त्यांची मतें समजू शकली नाहीत. पण ते शरीराने १९७६ पर्यंत ताठ असते तर त्यांनी ' सत्तेचा व संपत्तीचा माज ' या गोष्टीमूळे  ही वाद उत्पन्न केले जातात हे वाक्य जोडले असते. सुशांतसिंग राजपूताच्या मृत्यु संबंधीत संशयाची सुई महाराष्ट्रातील सरकारमधील मंत्र्यावर व सत्ताधारी पक्षाकडे जी वळालेली दिसत आहे, त्यासंबंधीचा दोष मिडीया तसेच सर्वसामान्यांना देण्यात काही अर्थ नाही. कारण या केसमध्ये शिवसेना, व राष्ट्रवादी पक्षाला इतकं गुंतवावे का लागत आहे, ही केस बंद करण्याची घाई ही मंडळी का करीत आहेत, यातच सारं काही दडलंय आहे. अर्थात संपूर्ण चौकशी होऊन न्यायालयात सुशांतचा मृत्यू हा आत्महत्येचा प्रकार नसून ती हत्या आहे हे सिद्ध होईपर्यंत आपण वाट पाहात बसणे यातच शहाणपण आहे. जगभरातील अनेक कवी व अध्यात्मिक गुरूंनी मृत्यु म्हणजे चिरकाल विश्रांती असे वर्णन केले आहे. त्या अर्थाने मृत्यू सुशांत पण महाराष्ट्र सरकार, सुशांतसिंग राजपूताच्या मृत्युने का अशांत झाले असा प्रश्न आपल्या सर्वांना सतावत आहे. म्हणून हा लेख प्रपंच.

नुकताच सुप्रिम कोर्टाने सुशांतसिंगच्या मृत्युसंबंधीचा तपास सिबीआयकडे सुपूर्त करण्यास हरकत घेतली नाही. असा निकाल देऊन  महाराष्ट्र सरकारने सुशांतसिंगचा मृत्यू अपघाती  म्हणून जी नोंद केली त्यासंबंधी कोर्टाने फटकारले आहे. मुळातच सुशांतसिंगच्या मृत्युनंतर महाराष्ट्र सरकार जे  फक्त अशांत होते त्यात आणखिन भर झाली असून महाराष्ट्र सरकार सैरभैर होण्याची शक्यता वाढली आहे.

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यु संदर्भात शरद पवारांनी जे वक्तव्य केले त्या संबंधी आश्चर्य वाटण्याची गरज नाही. कारण ते हाडामासाचे राजकीय नेते आहेत. ज्या २० शेतकर्यांच्या आत्महत्याकडे मिडीयाने दुर्लक्ष केले आहे असा प्रश्न आज शरद पवार उपस्थित करीत आहेत, त्या प्रश्नांवर राजकीय व्यवस्थेनेच उत्तर द्यवयाचे असते आणि हे शरद पवारांना ठाऊक नाही असे जनता कशी गृहीत धरणार?  महाराष्ट्रातले सध्याचे मविआ सरकारचा जन्मदाता शरद पवार आहेत. मविआ सरकारने शेतकर्यांची आत्महत्या रोखण्यासाठी छोटीशी जरी उपाययोजना केली असती तरी मिडीयाने शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केलेच असते.

सध्या सुशांतसिंगच्या आत्महत्येसंबंधी जी चर्चा होत आहे, त्या पाठीमागील दुसरे कारण म्हणजे मुंबई पोलीसांनी आजपावेतो  सुशांतच्या अनैसर्गिक मृत्युसंबंधी  FIR दाखल केलेली नाही. मग पोलीस दल  तपास तरी कसला करीत आहेत, हा प्रश्न सामान्यजनांना पडला आहे. सिबीयाला विरोध करावयाचा, व बिहारमधून तपास करण्यासाठी आलेल्या पोलीसांचे क्वारनटाईन करण्यातच मुंबई पोलीसांचा वेळ बरबाद झाला. सुशांतसिंगचा मृत्यू खरोखरीच आत्महत्याने झाला असेल तर राज्य सरकारने या केसबाबतचा तपास सीबियाकडे वर्ग करायला हवा होता. त्यामूळे अगोदरच कोरोनाच्या महामारीशी टक्कर देऊन थकल्या-भागलेल्या मुंबई पोलिसांवर या नसत्या उठाठेवेतून अधिकचा ताण पडला नसता. केवळ  फिल्मी दुनियातील मित्रांसोबत मुख्यमंत्र्याचे पुत्र, जे राज्याचे पर्यावरण मंत्री आहेत, ते आदित्य ठाकरें एका पार्टीला उपस्थित राहिल्यामूळे ते आरोपी ठरत नाहीत. इतकं साधं ज्ञान महाराष्ट्र सरकारमधील भल्या, भल्या मंत्र्यांना व पोलीस अधिकार्यांना नसेल हे संभवत नाही. कदाचित आज आदित्य ठाकरे जात्यात आहेत, पण आपण सूपात आहोत या जाणीवाने ही बडी मंडळी बिथरली असावी. जर का आदित्य ठाकरे निर्दोष असतील तर ही केस सिबायलाच काय, बिहार राज्याच्या पोलीसाकडे वर्ग केली तरी ते निर्दोषच सुटतील असा आत्मविश्वास  मुख्यमंत्र्याने व्यक्त करून सिबीयकडे हा तपास सोपविला असता तर मुख्यमंत्र्यांची शान वाढली असती व अनायसे भाजपाला कोंडीत पकडण्याची एक मोठी संधी प्राप्त झाली असती. पण तसे नसावे. सीबीआय तर्फे चौकशी करण्यास केलेला विरोध हे ही एक कारण आहे, ज्यामूळे सुशांतसिंगच्या मृत्यू सबंधीत संशयाची सुई राज्य सरकार मधील नेत्यांवर जात आहे. जेव्हा राज्य सरकार सीबीआय चौकशीस विरोध करते तेव्हा केंद्रातील सत्ताधारी पक्ष आपले राजकीय डावपेच खेळते असे म्हणत राहावयाचे व सुशांतच्या मृत्यूबाबतच्या चौकशी फार्स उरकायला वेळ मिळेल, आणि  या प्रकरणातून आपली सुटका व्हावी हाच उद्देश राज्य सरकारचा होता, असे आज जवळपास सिद्ध झाले आहे. अर्थात जिथे आपल्या पक्षाचे सरकार नसते तेथील राज्य सरकारच्या कारभारातला गोंधळ, हलगर्जीपण वा पक्षपाती व्यवहाराचा फायदा केंद्र सरकार घेण्याचे सोडत नसते, हे ही तितकेच खरें आहे. शेवटी क्षेत्र कुठलेही असो, राजकारणापासून ते मुक्त नसते हे मोठे सत्य.

राजकारणात काम करणार्या मंडळीची दुनिया, चंदेरी दुनिया आणि मिडीया नावाच्या दुनिया मध्ये सत्ता, लोकप्रियता, पैसा, इत्यादी गोष्टींची कमालीची स्पर्धा असते. या तिन्ही क्षेत्रात मैत्री, सत्प्रवृत्ती, नैतिकता, इत्यादी जीवनमुल्यें बहुतांश वेळा आभासी व दिखाव्या स्वरूपाची असतात. कोणाला पटो वा न पटो बाॅलीवूडमध्ये  कोणाची चलती चालावी, तिथे कुणाला बरबाद करावयाचे, इत्यादी बाबी त्या सिनेउद्योगात जो पैसा गुंतवितो तोच ठरवितो. हा पैसा बेनामी असतो व त्याचे सुत्रधार माफीया असतात. त्यांचे निवासस्थानं देशात तसेच देशाच्या बाहेरचे असू शकतात. त्यामूळे प्रशासनाला या क्षेत्रात भरीव बदल करण्यात अनेक अडचणी असू शकतात. पण काश्मीरचे ३७० कलम रद्दबादल करणारे मोदी सरकार काही तरी मार्ग काढून या सिनेउद्योगाला माफीयांच्या तावडीतून सोडतील अशी आशा धरू या. 

काल परवा  टाईम्स नाऊ चॅनेलवर अनुपम खेर यांची मुलाखत सुरू होती. ॲन्करने अनुपम खेर यांना प्रश्न विचारला की, आप हिरो बननेके काबील थे, तो भी आपको, हिरोका रोल क्यों नही मिला, इसकी वजह क्या हैं? यावर उत्तर देताना अनुपम खेर यांनी उत्तर दिले ते असे आहे, ' मैंने साईड ॲक्टरकी भुमिका को स्विकार करके यश, शौनत हासील की है | मुझे हिरोका रोल न मिलनेका दुःख भी नही है | निर्माता, दिग्दर्शकोंने दिया हुआ मौका और दर्शकोंने दिया हुआ प्यार यह मै संपत्ती मानता हूँ | " याचा अर्थ असा आहे की आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रात Level of ambition and Level of Satisfaction यामधील सुवर्णमध्य गाठण्याची कला अवगत करणे आवश्यक असते. हा एक आजच्या युगाचा मंत्र आहे असे समजून पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी या गोष्टीने भारावलेल्या युवकांनी तो मंत्र सतत जपायला हवा असे वाटते. ॲन्करने पुढे सुशांतसिंगच्या मृत्युसंबंधी विचारले तेव्हा अनुपम खेर यांनी ' कुछ तो गडबड है ' असे सूचक विधान केले. सिनेजगतातील इतर कोणाची ही अधिकृत प्रतिक्रीया आली नाही. याचा अर्थ आपल्या येथील सिने-जगत पडद्यावर, किंवा अवार्ड फन्क्शन मधून दिसते तसे नाही याची खात्री पटते.

कुछ तो गडबड है असे अनुपम खेर यांनी म्हटले आहे तीच भावना सुशांतसिगच्या फॅन्सना आणि कुटुंबियांना वाटत आहे. रिया चक्रवर्ती नावाची मुलगी सुशांतच्या जीवनात कशी येते व नंतर तिला त्याच्या पैशाचा, व संपत्तीचा मोह कसा सुरू होतो, त्यातून तिने सुशांतच्या जुन्या नोकराना काढून टाकण्यापासून ते तांत्रीकाची मदत घेणे , सुशांतला विशिष्ट औषधाचा डोस देण्याची सुरूवात कशी केली इत्यादी संबंधीची जी माहिती बाहेर येते त्यावरून सुशांतसिंगचा मृत्यु हा आत्महत्येचा प्रकार नसावा असेच वाटते. गळफास लावून सुशांतसिंगने आत्महत्या केली असेल तर तशा प्रकारचे पुरावे दिसत नाही. ना तिथे पंख्याला जाडजूड दोर बांधलेला दिसला ना टेबल वा खूर्ची सापडली. सुशांतसिगच्या मानेमागील भागात खोलगट भाग दिसणे, गळफासामुळे जीभ बाहेर येते तसे झाल्याचे न दिसणे,  त्याच्या शवाची ॲब्मील्युन्स बदलणे, सुशांतसिंगचे शव नजिकच्या लिलावती हाॅस्पीटल ऐवजी कूपर हाॅस्पीटल जिथे ठाकरे घराण्याचा प्रभाव आहे तिथे पोस्टमार्टम होणे,  रिया चक्रवतीने महेश भटशी, सलमानखानच्या वकीलाशी केलेला संपर्क, सुशांतसिंगच्या डेथ सर्टिफीकेटमध्ये मृत्युची वेळ नसणे, सुशांतचा बँक बॅलन्स कमी होत जाणे अशा अनेक गोष्टी बाहेर येत आहेत, ज्यावरून सुशांतसिंगला पद्धतशीरपणे मारण्यात आले आहे, असा अंदाज बांधता येतो. सुशांतसिंगचा मृत्यू हे एक मोठे कथानक बनत आहे ज्यावरून पुढे मागे चित्रपट निघू शकेल. त्यात आदित्य ठाकरे व त्याचा मित्र दिपेश सावंत, रियाचा भाऊ, सॅम्युयल मिरांडा, दिशा सॅलीयाॅन इत्यादींच्या भूमिका वठवणारे  कलाकार शोधावे लागतील. जस जसा तपास पुढे जात राहील तशी नावें वाढण्याची शक्यता आहे. कारण सुशांतला रियाने सुरू केलेला औषधाचा डोस हा नोव्हेंबर २०१९ पासूनचा आहे असे ऐकीवात आहे. कदाचित हे प्रकरण आदित्य ठाकरेंना ठाऊक असू शकते, आणि कधीतरी हाताबाहेर जाऊ शकते हे ही आदित्य ठाकरेंना समजले असेल. त्यामूळेच या प्रकरणातून आदित्य ठाकरेंना वाचविण्यासाठी शरद पवारांशी संगनमत करून मविआ सरकार आकारास आणले गेले असावे. तेव्हाच आदित्याला मंत्रीपदाचे कवच देण्याचे निश्चीत केलेले असावे. बाकी बाळासाहेबांना शिवसेनेचा मुख्यमंत्री देण्याचे आश्वासन दिले होते हे कारण निव्वळ स्टंटच  होता.

आपल्या येथे जशा राजकारणात लाॅब्या आहेत तशाच, डावी विचारसरणी,  जिहादी, पाक पुरस्कृत  दशहतवाद, नक्षलवाद, इत्यादींचा  सिने-जगतावर  प्रभाव आहे. त्याची कारणें स्वातंत्र्यपुर्व काळापासून पुढे चालत आलेली आहेत. म्हणूनच बाॅलिवूडमधील चित्रपटात नेहमी नायकाचा शेजारी अल्पसंख्याक दिखविला जातो आणि तो नायकाच्या सगेसोयर्या पेक्षा उदार व मदतगार दाखविला जातो. विदेशी पैसा, हवालाद्वारे येणारा पैसा, काळा पैशाने आपला सिनेउद्योग त्रस्त आहे. कदाचित सुशांतसिंगच्या अकाली, अनैसर्गिक मृत्युच्या तपासातून बाॅलिवूड मधील काळी बाजू ऊजेडात येऊ शकेल. असे असले तरी आपल्या समाजाला सिनेनट व नट्या, क्रिकेटर्स तसेच राजकीय नेत्यांना सेलिब्रटी मानण्याची जी ओढ आहे तिच्यामूळे अनेक क्षेत्रात बदल करण्याचे सामर्थ्य असलेल्या समाजाची गती मंदावते, हे ही नाकारता येत नाही. त्यामूळे पैसा, प्रतिष्ठा, आणि प्रभुत्व यांच्या अमर्याद मोहाने माणुसकी विसरलेला समाजाचा वरच्या थराचे ( इलाईट ग्रुपचे) राज्य सर्वत्र सुरू राहते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये हेच घडत आलेले आहे. त्यातूनच सुशांतसिंगला एक तर संपविला असेल वा आत्महत्या करण्यासाठी उद्युक्त केले गेले असावे. त्या संबंधीचे सत्य न्यायालयाच्या निकालातून आपल्याला कळेल.  सिने-जगतातील मंडळी व राजकारणातील मंडळीचा परस्पर जो संबंध आहे, तो नवा नाही. पण त्यातून विलासराव देशमुखाचे मुख्यमंत्रीपद गेले होते, हा अलीकडचा इतिहास नजरे समोर येतो तेव्हा  शरद पवार यांच्या नातवाने (अजितदादा पवार यांचा मुलगा पार्थ ) सुरू केलेला संघर्ष व बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा सिनेसृष्टीतला हाय प्रोफाईल पराक्रमातून महाराष्ट्र सरकार जे अशांत आहे ते कायम स्वरूपाच्या स्मशान शातंतेत जाईल अशी शक्यता वाढली आहे. 

सुशांतसिंग एक हुषार व आपल्या भावी जीवनाची रितसर नियोजन आखणारा कलावंत होता हे त्याच्या डायरीतील नोंदीतून समजते. त्याने शिक्षण क्षेत्रात काही विद्यार्थ्यांना मदत देऊन प्रोत्साहन दिले आहे.  त्यामूळे तो डीप्रेसनमध्ये जाण्याची शक्यता नव्हतीच हे पटते. त्यासाठी मानसशास्त्राचा अभ्यास असणे गरजेचे नाही. तो गुणी होता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आमुलाग्र बदल करण्याच्या प्रयत्नात होता हे सुशांतच्या डायरीतून स्पष्ट झाले आहे. त्याने डायरीत मांडलेल्या कल्पना ऐकल्या की तो एक दूरदृष्टीचा कलाकार होता हे मान्य करावे लागते. " कलेची निर्मिती कोठल्याही विषयाच्या संपूर्ण ज्ञानातून किंवा निव्वळ बौद्धिक जाणीवेतून  होत नाही. कलेचा उगम बुद्धीत नसून तो भावना व कल्पना यांच्या अपूर्व संगमात आहे. विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनने एके ठिकाणी म्हटले आहे की, Imagination is more important than knowledge.  ज्ञाना पेक्षा भावना व कल्पनाशक्ती महत्वाची असते. भावना कुठल्याही अनुभूतीच्या आत सळसळणार्या मानवी जीवनाचे दर्शन देत असते. म्हणूनच  Portrait in a Mirror या इंग्रजी  चित्रपटाचा नायक म्हणतो,
' धार्मिक मनुष्य जी मनःशांती संपादन करू शकतो, तो काही अष्टपैलू पंडीत असतो म्हणून नव्हे; तर त्याच्या अंगी उत्कट श्रद्धा असते म्हणून ! कलावंताचे तसेच असते. तो सर्वज्ञ असला पाहिजे असे मुळीच नाही. पण आपल्या कलादृष्टीद्वारे होणार्या जीवनदर्शनावर त्याची निष्ठा असली पाहिजे. ' अशी शुद्ध बावनकाशी निष्ठा असलेला सुशांतसिगच्या रूपात एक उमदा कलाकार आपण गमाविला आहे. त्यामूळे त्याच्या मृत्युबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत असल्याचे दिसत आहे. शेवटी जन्म आणि मृत्यु या दोन गोष्टींचा अधिकार ईश्वराने आपल्याकडे दिलेला नाही. पण त्यात सत्तेच्या, पैशाच्या, स्पर्धेच्या, अहंकाराच्या बळावर हस्तक्षेप करून कुटील कारस्थानाने  एखाद्याची जीवनयात्रा संपवितात ते नराधमच असतात. त्यांचे ते शौर्य नसून कौर्य आहे. त्यांना त्यांच्या पापाची किंमत मोजावी लागेलच अशी आशा व्यक्त करतो. आज सुप्रीम कोर्टाने सुशांतच्या मृत्यु संबंधीत सीबीआयला चौकशी करण्यासंबंधी याचीकेचा निकाल जाहीर केला व तो सुशांतसिगचे कुटुंबिय व फॅन्सच्या बाजूने दिला आहे. या केस मधील हा पहीला पाडाव होता तो जिंकला आहे. नंतर गुंतागुंताने भरलेली ही केस उभी राहील. आपल्याला फार वाट पाहावी लागेल हे ओघाने आलेच. सुशांतसिंगच्या कुटूंबियांना न्याय मिळो आणि सुशांतसिंगच्या आत्म्यास शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून या लेखाची समाप्ती करतो.
                             
                             हरि ओम ! 

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

राजकारणातले असामान्य असे लोकमान्य


आज शनिवार १ ऑगस्ट २०२० भारतीय असंतोषाचे जनक, स्वातंत्र्यसूर्य लोकमान्य टिळक यांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने लोकमान्य टिळकांचे अष्टपैलू गुण, प्रचंड विद्वत्ता, जाज्वल्य राष्ट्रभक्ती, समाजाबद्दलची त्यांची असीम आत्मियता,  राजकारण- शिक्षण- समाजकारण - प्रबोधन आणि धर्मजागरण इत्यादी क्षेत्रातील त्यांचे अतूल्य कार्य व ते करीत असताना स्थितप्रज्ञ वृत्तीने भोगलेला कारावास व हालअपेष्टा इत्यादी संबंधीच्या स्मृती जागविण्याचा उपक्रम अनेक स्वयंसेवी संघटना व संस्था तसेच वृत्तपत्रे, नियतकालीकांनी सुरू केला आहे. त्याबद्दल या सर्व मंडळीचे कौतूक करावे तितके कमी आहे. आज आपला देश कोरोना रूपी नागाच्या विळखात अडकल्यामूळे आपली अर्थव्यवस्था जी कोलमडली आहे, अशा वेळी, लोकमान्य टिळकांचा स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, हा चतुःसुत्रीचा मंत्र आणि त्यांनी दिलेला
पुनश्च हरी ओम असा स्पुर्तीदायक नारा निश्चीतच देशाला आत्मनिर्भराच्या दिशेने वाटचाल करण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो. या उपक्रमात मी ही सामील व्हावं असा आग्रह माझे परम मित्र श्री प्रमोदजी  बापट यांनी केला. मी तात्काळ होकार दिला खरा पण लागलीच जाणवू लागले की,  लोकमान्य टिळकांच्या चरीत्रातील एखादा प्रसंग लिहणे म्हणजे टिटवीने आपल्या चोचीने महासागराचे जल मापन करण्यासारखे आहे. पण त्यातून एका युगपुरूषाच्या स्मारकाच्या चरणी लीन झाल्याचे समाधान मिळणार आहे म्हणून हा लेख प्रपंच.

आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक नेत्याचे , क्रान्तीकारकाचे योगदान बहुमूल्य आहे. म्हणूनच आपण सर्व स्वातंत्र्यसेनानींची जंयती वा पुण्यतिथी साजरी करतो. आचार्य अत्रे हे एक उत्तुंग व अष्टपैलू व्यक्तीमत्व. त्यांनी आपल्या एका पुस्तकात विद्यार्थी दशेतील आठवणी सांगताना लिहले आहे की  "आम्हां मित्रामध्यें एक असा बोली करार ठरला होता की आमच्यापैकी ज्याला कोणाला लोकमान्य टिळकांचे दर्शन झाले तर त्याने सर्वांना चहा द्यावा. आचार्य अत्रेंना लोकमान्य टिळकांचे दर्शन झाले तेव्हा त्यांनी मित्रांना चहा दिला होता. अत्रेंनी पुढे लिहले होते, '' मला तर एक दिवस लोकमान्य टिळकांचे दर्शन इतक्या जवळून झाले होते की मी त्यांच्या करकरीत उपरणाला हाताने स्पर्श केला तेव्हा मला स्वर्ग दोन बोटे उरला होता." लोकमान्य टिळकांच्यात असलेल्या तेजाचे आचार्य अत्रेंना विद्यार्थी दशेपासून अप्रूप वाटत असे. ते आपल्या त्याच पुस्तकात लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेचे वर्णन करताना म्हणतात, " लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेला लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेले लोकांचे चेहरे जणू आपला आधार हरवल्यासारखे सुतकी दिसत होते." पुढे ते स्पष्टपणे मांडतात की," त्यावेळी सडसडीत बांध्याचे मोहनदास करमचंद गांधी राष्ट्रीय सभेचा नेता म्हणून भाषणाला उभे राहीले, तेव्हा लोकमान्य टिळकांच्या इतकं ओजस्वी व तेजस्वी नेतृत्व राष्ट्रीय सभेला पुढे मिळेल अशी आशा मावळली." अत्र्यांनी लोकमान्य टिळकांच्या मृत्युचे वर्णन ' स्वातंत्र्यसूर्याचा अस्त ' अशा शब्दात केले आहे. आपल्या देशाच्या अर्वाचीन इतिहासात सूर्याची उपमा प्रथमच मिळालेली अशी राजकरणात कार्यरत असलेली पहिली विभूती लोकमान्य टिळक होय. या बाबत दूमत होऊ नये. भारतीय जनता लोकमान्य टिळकांना दैवत मानत असत. याचे कारण ते जनतेला आपले दैवत मानत असत. आचार्य अत्र्यांनी लोकमान्य टिळकांचे वर्णन भारताचे स्वातंत्र्यसूर्य असे केले ते उचीतच होते. वस्तूतः सूर्य कधी मावळत नसतो. आपली पृथ्वी स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरत असते म्हणून दिवस व रात्र चे चक्र सुरू असते. सूर्यनारायण अनादि काळापासून तेजाने तळपळत आहे. तो जीवसृष्टीला आपल्या प्रकाशातून जन्म देतो पण त्या सूर्याला त्याबद्दल उपकाराची भावना शिवत नाही. तो आपल्या प्रकाश देण्याच्या कर्मात इतका समरस होतो की तो प्रकाश देतो हे ही विसरून गेलेला आहे. आपला स्वतःचा मूलगा प्लेग मध्ये दगावला असताना, सारं दुःख विसरून प्लेगच्या साथीने पछाडलेल्या समाजबांधवांच्या सेवेसाठी लोकमान्य टिळक दिवसरात्र अविरतपणे झटत राहीले हे कसले द्योतक मानावे? असे सेवाव्रत राजकारणात दिसते तरी का? महाराष्ट्रात कोरोनाचे आक्रमण तीव्र होत असताना आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरें  घरातून बाहेर ही पडत नाहीत पण सल्ला देण्याचे तेवढे काम नेटाने करीत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत पक्षांतर्गत लढाईचा तमाशा मांडत आहेत. रशियातील श्री निकीता ख्रुश्चेव्ह पक्के खूनशी राजकारणी पण त्यांनी एके ठिकाणी  म्हटले आहे, ' Politicians are the same all over. They promise to build a bridge even where there is no river. '

लोकमान्य टिळक राजकारणात होते पण  ते राजकारणी नव्हते असे सतत वाटते. स्वराज्य हे त्यांचे ध्येय होते. ते आपल्या ध्येयात इतके समरस झाले की ते ध्येयच स्वराज्य लढ्यातील त्यांचे गुरू ठरले असावेत. त्यांनी आपल्या जीवनात जे उद्योग केले ते राजकीय पटलावर केले असे वाटत असले तरी मुख्यतः स्वातंत्र्यलढ्यातले योद्धा म्हणूनच त्यांनी आपले सारे आयुष्य वेचले. स्वामी विवेकानंदांना योद्धा संन्यासी असे गौरविले जाते तसेच लोकमान्य टिळक म्हणजे प्रपंच थाटून ही परामर्थ करणारे संन्यासी योद्धाच की. या ठिकाणी सुप्रसिद्ध समाजसेविका भारती ठाकूर यांनी आपल्या नर्मदा परिक्रमा या पुस्तकात भारतीय संस्कृतीसंबंधी यथोचित वर्णन केल्याची आठवण होते. त्या लिहीतात, " भारतीय संस्कृती जीवन परायण आहे. समग्र जीवनाचा बिनशर्त आणि संपूर्ण स्विकार हे भारतीय संस्कृतीचं मूलतत्व आहे. त्यात पलायानवाद नाही. घरदार सोडून, जबाबदारी सोडून अरण्यात जा, गिरीकंदरात जा आणि मग त्या जीवनात सार्थकता आहे असा त्याचा अर्थ नाही. अध्यात्म म्हणजे तरी काय? जाणलेलं सत्य जगणं म्हणजे अध्यात्म. जगण्याचं कर्म हीच आत्मसाधना. रोजचं जीवन हेच साधनेचं क्षेत्र आणि तेच खरे साधनेचे क्षण. प्रपंचात राहून परमार्थ करणं हीच  खरी तपस्या." लोकमान्य टिळकांचा प्रपंच देशभर व्यापला होता. प्रपंचात राजकारणाला स्थान नसते. फक्त कर्म हेच जीवन  असते. देशकार्यासाठी वाट्याला आलेल्या कारावासातही त्यांची कर्मभक्ती जरापण खंडीत झाली नाही. त्यांच्यातील असामान्य स्थितप्रज्ञ वृत्तीतून ते गीतारहस्य सारखा महान ग्रंथ लिहू शकले असावेत असे वाटते. महात्मा गांधीजींनी गीतारहस्य या ग्रंथावर अभिप्राय देताना म्हटले की " गीतेवरील टिळकांची टिका हीच त्यांचे शाश्वत स्मारक होय. स्वराज्याची लढाई फत्ते झाल्यानंतरही तें टिकूनच राहील. तेव्हा देखील टिळकांचे निष्कलंक चारित्र्य आणि गीतेवरील त्यांची महान टिका यामूळे त्यांची स्मृती चिरप्रेरक राहील. त्यांच्या हयातींत किंवा आता सुद्धा टिळकापेक्षा अधिक व्यापक किंवा सखोल शास्त्रज्ञान कोणाचेंही सापडणे शक्य नाही. गीता आणि वेद यांतून निर्माण होणार्या प्रश्नांचे टिळकांनी केले त्यापेक्षा जास्त व्यवस्थित संशोधन कोणींही केले नाही. अगाध विद्वत्ता, अमर्याद स्वार्थत्याग व आजन्म देशसेवा यामूळे जनता जनार्दनाच्या हृदयात टिळकांनी अद्वितीय स्थान मिळविले आहे."

लोकमान्य टिळकांच्या चरीत्रात असे अनेक दाखले मिळू शकतात की त्यावरून त्यांच्या जीवनाचे ध्येय फक्त राष्ट्रसेवा होते. म्हणूनच ते सच्चे राष्ट्रवादी ठरले. लेखाच्या विस्तारभयाने सारेच दाखले इथे देता येत नाहीत. पण त्यांच्या विद्यार्थी दशेपासून ते मृत्युपर्यंतचा सारा प्रवास राष्ट्रभक्तीरूपी ज्योतीच्या प्रकाशाने झळाळलेला होता. त्यांच्यी बालवयात दिसून आलेली कुशाग्र बुद्धी आणि करारीपणा, स्थंभीत करणारा होता.  विद्यार्थी दशेतच बाळ गंगाधर टिळक आपल्या वर्गशिक्षकाला ठणकावून उत्तर देतो '' मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही व मी मार खाणार नाही. '' असे खणखणीत उत्तर देणारा विद्यार्थी ब्रिटीश राजवटीला हादरून सोडणार हे नियतीनेच ठरविले होते. बाळ मॅट्रीकला असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले. एवढा मोठा आघात पण बाळ गांगरला नाही. शांतपणे त्याने आपला अभ्यास चालू ठेवला. मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाला. " माझी शिकण्याची इच्छा होती पण ती तशीच राहीली. पण तुला खुप शिकलेला पाहून मी ती भागविणार आहे. " आपल्या  पिताश्रीचे हे बोल बाळच्या अंतःरकरणात सतत प्रेरणा देत होते. म्हणून आपल्या नातेवाईकांचा "नोकरी कर, घर व संसार सांभाळ " असा उपदेश पाळत नव्हता. तो स्पष्टपणे उत्तर देत होता, " मी स्काॅलरशिप मिळविन, व उच्च शिक्षण घेईनच घेईन. एके काळी आपल्या देशात सोन्याचा धूर निघत होता. दुधातुपाच्या नद्या वाहात होत्या. तिथे आज अठरा विश्वे दारिद्य्र आले आहे. आणि साहेबांच्या इंग्लंडात जिथे लोखंड आणि दगडी कोळसा या पलीकडे काहीही पिकत नाही, तिथे आज भरभराट व समृद्धी आहे. ज्यांनी ही स्थिती केली त्यांची मी चाकरी करू म्हणता? आपल्या आईचे रक्त पिणार्या दुष्ट नराधमांची मी नोकरी करू म्हणता? छेः ! ते कदापि शक्य नाही. मला त्यांना हाकलून द्यावयाचे आहे. आपल्या भारतमातेला मला स्वतंत्र करावयाचे आहे. तिच्या सेवेत मला आयुष्य वेचावयाचे आहे. चाकरी करीन ती फक्त भारतमातेची करीन, विद्यादेवीची करीन. पोटासाठी शत्रूची चाकरी करीन अशी कधी कल्पनाही मनात आणू नका. " बाळचे असे उद्गार ऐकून त्याला उपदेश करायला आलेले नातेवाईक हळूच काढता पाय घेत. पण जाताना आपआपसांत बोलत होते, 'पोर छांदिष्ट आहे, कोणाचे ऐकणार नाही.' ते खरे हो, पण या अचाट कल्पना ! कोठे आपण आणि कोठे इंग्रज ! केवढे त्यांचे साम्राज्य ! काय अचाट त्यांचे सामर्थ्य ! पण हे  मात्र खरे, एवढ्या वयात केवढी ही उंच झेप या बाळची ! बोलण्यात किती कणखरपणा ! जशी काही सिंहगर्जनाच !

मॅट्रीकची परीक्षा नुकताच उत्तीर्ण झालेला हा बाळ राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळा काढणार, स्वराज्यसाठी समाजाची एकता स्थापना करण्यासाठी धर्म जागृती करणार, स्वदेशीची चळवळ उभारणार, युवकांना प्रेरणा देणार, ब्रिटीश सत्तेशी झुंजणार, शेतकरी, कष्टकारी, मजूर, गोरगरीबांना मार्गदर्शन करणार ही सर्व कार्ये नियतीने टिळकांकडून करून घ्यावयाचे ठरविलेले होते. म्हणूनच नियतीने  साहित्य क्षेत्रात व नीतीशास्त्रात जागतिक पातळीवरचे अत्युच्च स्थान  लोकमान्य टिळकांना पटकाविण्यापासून वंचित केले असावे अशी अंतःकरणातील भावना गीतारहस्य ग्रंथावरील अभिप्राय देताना महर्षी  योगी अरविंद यांनी व्यक्त केलेली आहे. त्यावरूनच असे वाटते की  लोकमान्य टिळक राजकारणात होते पण राजकारणी नव्हते. ते आसक्ती आणि विरक्ती मधील परमावधी गाठणारे युगपुरूष होते.

रॅन्डसाहेबांच्या खूनानंतर चहूकडे नाकेबंदी झाली. पटाईत गुप्त पोलीस बोलाविण्यात आले. कसून शोध सुरू झाला पण मारेकरी सापडले नाहीत. तेव्हा सरकारने लोकांचा छळ वाढविला. धरपकड, धमक्या, निरनिराळ्या प्रकारें दडपशाही करायला सुरूवात केली. तेव्हा टिळकांनी केसरीत "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का" असा अग्रलेख लिहून भारतीय जनतेची बाजू अगदी सरळ आणि स्पष्टपणे मांडली. पाठोपाठ " राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे " असा दुसरा लेख लिहिला. आपल्याला कारावास भोगावा लागला तरी त्यांना पर्वा नव्हती. त्यांना भारतीय जनतेवरील अत्याचार पाहवत नव्हता. लेखणी हे शस्त्र वापरणारा अर्वाचीनच नव्हे तर भारताच्या प्राचीन इतिहासातही लोकमान्य टिळकासारखा योद्धा नसावा असे वाटते.

छत्रपती शिवाजी महाराज हे टिळकांचे प्रेरणास्थान होते. त्यामूळे त्यांनी ब्रिटीश सरकार विरूद्धच्या ज्या राजकीय चाली खेळल्या त्यात  निर्भयता दिसत होती. राजकीय किंवा राजकारणातील व्यक्ती बहूतांश आपल्या प्रतिमेला जपतात. म्हणजे एका परिने भित्रे असतात. टिळकांनी, १८९७ च्या सुमारास  केसरीच्या एका अंकात " शिवाजी उद्गार " या नावाची एक कविता प्रसिद्ध केली होती. 
"स्वर्गातून शिवाजी महाराज भारतातील स्थिती पाहात आहेत. आपण पेरलेले गुण त्यांना कुठेच दिसत नाहीत. सगळीकडे दुर्गुणच दुर्गुण दिसतात. हे पाहून त्यांना फार दुःख होते. इंग्रजांना ही ते सांगतात की, मी सुरत लुटली तेव्हा तुम्हाला धक्का लावला नव्हता याची जरा आठवण ठेवा." असा त्या कवितेतील आशय होता. त्याच अंकात शिवाजी उत्सवातील, टिळकांच्या भाषणातले एक वाक्य लिहले होते की, " म्लेच्छांना येथे राज्य करण्याचा ताम्रपट कोणी दिलेला नाही." सरकारने टिळकावर राजद्रोहाचा आरोप ठेवला. टिळकांच्या काही मित्रांनी माफी मागण्याची कल्पना मांडली. टिळकांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले," राज्ये फुकट मिळत नसतात. त्या करीता बलिदान करावे लागते." टिळकांच्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीतून साकार झालेले अग्रलेख लोकांच्या हृदयाला साद घालीत असत. देशाच्या सर्व प्रातांत टिळकांच्या भाषणांचा कार्याचा प्रभाव पडत गेला. कुशाग्र बुद्धीचे टिळक जनतेशी संवाद वा भाषण करताना अंतःकरणातून बोलत असावेत. त्यांची ओघवती हृदयस्पर्शी भाषेतील मातृभूमीची भक्ती व ब्रिटीश सरकारवर कडाडून प्रहार करण्याच्या पद्धतीतून अनेक युवकांनी टिळकांनी स्वराज्यरूपी मांडलेल्या अग्नीकूंडात उडी मारली आणि सशस्त्र क्रान्तीचा मार्ग स्विकारून यश ही मिळविले. स्वराज्य, स्वदेशी, विदेशी मालावर बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुःसुत्रीचे देशभर जाळे विणले गेले. बंगालच्या फाळणीविरूद्ध त्यांनी केलेली जागृती इतकी ताकदवान ठरली की सरकारला बंगालची फाळणी रदबादल करावी लागली. टिळक बोले देश डोले अशी स्थिती देशभर झाली होती. जनतेच्या सुखदुःखात ही ते सहभागी होत असत. कामगार असो, मजूर असो, शेतकरी असो की छोटा व्यापारी जिथे जिथे सरकारने अन्याय केला असेल तर ते केवळ अग्रलेख लिहून थांबत नसत तर ते प्रत्यक्ष दुःख निवारण्यासाठी लोकात जात असत. म्हणून त्यांना तेल्याबोळाचे टिळक अशी उपाधी मिळाली. म्हणूनच साम्यवाद्यांनाही टिळक आपलेसे वाटत होते.

लोकमान्य टिळक धर्मभिमानी होते. पण हिंदू समाजातील दोष नाहीसे व्हावेत या मतावर ही ते ठाम होते. अन्यथा त्यांची आगरकरांशी इतकी घनिष्ठ मैत्री जडलीच नसती. राजकीय सत्ता पदरात पाडून घेतल्याशिवाय सामाजिक सुधारणा होतील पण त्या स्थायी स्वरूपाच्या ठरतील का या बद्दल ते सांशक असावेत. दुसरे कारण असे होते की ब्रिटीश सरकार आपली सत्ता मजबूत करण्यासाठी फोडा आणि झोडा हे तंत्र वापरणार हे टिळकांच्या लक्षात आले होते. स्वराज्य प्राप्ती हेच ध्येय जनतेपुढे ठेवले तर सारा भारतीय समाज लौकर एकजिनसी होऊ शकतो असा दुर्दम्य आशावाद त्यांच्याकडे होता. ते खर्या अर्थाने लोकमान्य असल्याने जनतेची नाडी तेच सर्वात चांगल्या रितीने ओळखत होते. इंग्रज सरकारला हे माहीत होते म्हणूनच त्यांना कारावास इतर काॅग्रेसच्या पुढार्यांपेक्षा अधिक काळ भोगावा लागला. त्यांना काही सवलती इंग्रज सरकारने दिल्या पण तो पर्यंत त्यांची तब्येत ढासळली होती. म्हणून गोर्या लोकांबद्दल चांगले मत मांडणार्यांनी एक सत्य लक्षात घ्यावयास हवे होते की पहील्या महायुद्धानंतर इंगलंडच्या अर्थव्यवस्थेला झटके बसले होतेच. त्यातच लोकमान्य टिळकांचा फार मोठा प्रभाव क्रान्तीकारकांवर होता. सारे गोरे अधिकारी लढवय्ये व धाडसी होतेच असे नाही. क्रान्तीकारी आपला गेम करू शकतात या भितीने इंग्रज अधिकारी त्रस्त झालेले होतेच.

इतिहासाचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की, १९०५-०७ च्या काळात टिळकांनी कलकत्यात केलेल्या भाषणात काॅग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष दादाभाई नवरोजींना ही इंग्रजासंबंधी भ्रमनिरास झाला होता असे म्हटले होते. इतकेच नव्हे तर दादाभाई सारख्या नेमस्त नेत्यांने  ' आपण परस्पर गळे कापणार नाहीत पण हे परकीय आपले गळे कापणार आहेत. आपला सत्यनाश होणार अशी निराशजनक भाषा त्यांच्या मुखातून येऊ लागली ' हे ही टिळकांनी आपल्या भाषणात विशद केलं. याच सभेत टिळकांनी एक सत्य घटना ऐकवली. महाभारतात पांडवानी कृष्णाला एक तडजोड घडवून आणण्यासाठी पाठविले. पण पांडव व कौरव दोघेही तडजोड अयशस्वी झाली तर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपआपली शक्ती संघटीत करीत होते.' यालाच राजकारण म्हणतात. तुमची मागणी सरकारने फेटाळली तर तुम्ही संघर्ष करण्यासाठी तयारीत आहात काय? तशी तुमची तयारी असेल तर तुमची मागणी नाकारली जाणार नाही. पण संघर्षाची तयारी ठेवली नाही तर मात्र तुमची मागणी नाकारली जाईल यात काहीच शंका नाही- कदाचित कायमचीच. आपल्याकडे काही शस्त्रे नाहीत. पण असण्याची गरज ही नाही. आपल्याकडे अस्त्र आहे. चांगले राजकीय अस्त्र. ते म्हणजे बहिष्कार. लोकमान्य टिळकांची दूरदृष्टी व राष्ट्रभक्ती असामान्य होती. त्यांच्या त्या भाषणाने समाज प्रभावित झाला होता. म्हणून राष्ट्रीय सभेतील जहाल गटाचा म्हणजे लोकमान्य टिळकांचा मार्ग देशासाठी अधिक भला ठरला असता, असे अनेक इतिहासकारांनी व राजकीय अभ्यासकांनी आपले मत नोंदविले आहे.

लोकमान्यांच्या काळात हिंदूना जातीय मानण्यात आले नव्हते. त्यामूळे त्यांनी शिवजयंती उत्सव व गणोशोत्सव राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरे करण्यास प्रारंभ झाला. त्यांनी लखनौ करार करण्यात चूक केली असे काही लोक मानतात. पण त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट सांगितले होते की, " यापेक्षा काहीही अधिक दिले जाणार नाही. तो करार मुस्लीमांनी नाही पाळला तर त्यावर कारवाई करायला हवी." अशी जाणीव टिळकांनी त्यांना दिली होती. पण दुर्दैवाने लोकमान्य टिळकांची इहयात्रा संपली,  तशी स्वातंत्र्यलढ्याची ज्योत ही क्षीण झाली. पुढचा सारा इतिहास आपण सारे जाणतो. जगभरात निर्माण होत असलेल्या विविध राज्यप्रणाली व विचारधाराची लागण आपल्या देशाला झाल्याने विविध राजकीय पक्ष अस्तित्वात आले. प्रांतीय बोर्डावरील निवडणूका व अंतर्गत स्पर्धेमूळे ब्रिटीश सरकारला फोडा व झोडा ही नीती अवलंबविणे अधिक सोपे झाले असे दिसते.

गांधींजीच्या ठायी महात्मा होण्यासारखी वैशिष्टे होती. पण त्यांच्याकडून भगवद् गीतेचा चुकीचा अर्थ लावला गेला असावा. त्यातून  शत्रुमित्रसमभावाच्या नावाखाली मुस्लीमांचे तुष्टीकरण अथवा संतुष्टीकरण सुरू झाले. मग मजल देशविभाजनापर्यंत गेले. मुस्लीमाची तुष्टीकरण करण्याची परंपरा स्वातंत्र्यानंतर ही सुरूच राहिली. इथे हे नमूद करावेसे वाटते की प्रत्यक्ष महात्मा गांधीजींनी (संदर्भ दिल्ली डायरी २६-९-१९४७ ) म्हटले आहे की, जर पाकिस्तानला स्वतःची चूक समजून सुधारणा करावयाची नसेल तर युद्धाशिवाय दुसरा मार्ग नाही.

मुस्लीम राष्ट्रनिष्ठ नेत्यांस महत्व दिल्यास व अराष्ट्रीय प्रवृत्तीच्या नेत्यांस नगण्य केले गेल्यास मुस्लीम समाज हिंदु संस्कृतीत सामावला जाईल . ज्या संस्कृतीने शक, हुण, कुशान या आक्रमकांनाही सामावून घेतले त्या संस्कृतीस आपल्याच समाजातील बाटलेल्या अथवा बाटवलेल्या हिंदुच्या वंशजांस सामावून घेणे बिलकूल अशक्य नाही. केवळ हिंदु संस्कृतीचे कैवारी सत्तेवर आल्यास होऊ शकते असे डाॅ वि वा देशपांडेनी आपल्या राष्ट्रधर्म जागवावा या पुस्तकात शेवटी निष्कर्षाच्या प्रकरणात आशावाद व्यक्त केला आहे.  केंद्रात आता राष्ट्रवादी विचाराचे भाजपाचे सरकार आहे म्हणून डाॅ वि वा देशपांडेचा आशावाद खरा ठरू शकेल अशी अपेक्षा ठेवू या. 

आपण व आपले उत्सव--मातृदिन (भाग १)

आपण व आपले उत्सव-- मातृदिन   देवीयों और सज्जनो नमस्कार ! हमारी मातृभूमी को देव-देवताओंकी भूमी माना जाता है | इसका कारन हमारे यहाँ सृष्टी हर ...