बुधवार, २० मे, २०२०

महाराष्ट्रातील राजकारण --- थोडसं मागे वळून


                            
लाॅकडाऊनच्या काळात ही आपल्या देशात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेतच. कोरोना बाधीत रूग्णाच्या संख्येत आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे तसा राजकारणातील आरोप-प्रत्यारोपातही पहीला क्रमांक लागतोय असे दिसू लागलं आहे. पालघर येथे दोन साधूंची हत्या झाली. त्याबाबत  सरकारचे उत्तर काय होते,  ' दोषी लोकांवर कारवाई करू.' असेच आले. तसे उत्तर येणे गैर नाही पण या प्रकाराला भाजपा धार्मिक रंग देत आहे असा आरोप भाजपावर का व्हावा, तो ही सरकार मधील पक्षांनी करावा ? मुख्यमंत्र्यावर सोशल मिडीयावरून टिका झाली म्हणून शिवसैनिकांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांची मारझोड करावी ? हे कसले आणि कुठले राजकारण ?  कोरोनाच्या दशहतीला आपण सारेजण तोंड देत आहोत त्यामूळे फारसे काही राजकारणा संबंधी लिहू नये असे मला वाटत होते आणि तसे पथ्य मी पाळले. पण विधान परिषदेच्या निवडणूका ज्या निवडणूक आयोगाने पुढे ढकललेल्या होत्या, त्यावर ही राजकारण झाले, ते ही सत्ताधारी पक्षाकडून.  ही घटना पाहिल्यानंतर व ऐकल्यानंतर मनात जे विचाराचे काहूर माजले ते शेवटी कुठे तरी शेअर करावे असे वाटले म्हणून हा लेख प्रपंच.

पालघर मध्ये काय घडले हे सर्वश्रूत आहे. त्यावर राजकारण करू नका असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले. हेच जर काॅग्रेसच्या राजवटीत घडले असते आणि शिवसेना विरोधी बाकावर असती तर शिवसैनिकांनी काय केले असते यावर मुख्यमंत्र्यासह सर्व मंत्र्यानी अंतर्मूख होऊन विचार करावयास हवा. कोरोना संकटामूळे जनता कर्फ्यू असताना गावकर्यांनी दोन साधूची हत्या केली, ही काही मामूली बाब आहे का? साधुंचा जीव काय आणि चोरांचा जीव काय यांत फरक नसतो. जीव हा शेवटी आपल्या देशबांधवांचा. चोरांना सुद्धा मारण्याचा अधिकार जमावाला नसतो. हे त्या जमावाला माहित नव्हते काय? माहिती नव्हतं असे कोणी म्हणत असेल तर तो जमाव लोकांचा होता की पिसाळलेल्या कुत्र्यांचा? तो जमाव गावकर्यांचा होता हे मान्य, मग कुठे गेले ते कलम १४४ जे कोरोनाच्या संकटापासून वाचविण्यासाठी लावले होते? त्याची पण चोरी झाली का? मुळात गावकरी अशा रितीने कर्फ्यू असताना जमले कसे? तेव्हा गृहखाते काय करत होते?  दोन साधूंची हत्या झाली म्हणून भाजपा धृविकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे असा उलटा थयथयाट सरकार का करीत आहे ? आणि काय हो, साधूंच्या हत्या संबंधी आवाज उठविणे हे काही संविधाना विरूद्ध आहे काय? साधूंचा जीव मुस्लीम मौल्लवी, ख्रिस्तांच्या फादर पेक्षा क्षुल्लक वाटतो का? साधूच्या वेशातले ते टगे असतील असा समज झाला असेल तर  तुमच्या सरकार मध्ये टगे लोक नाहीत का?  वांद्रे येथे परप्रांतीय मजूराचा अचानक मोठ्या संख्येने जमाव होतो तेव्हा गृहखाते काय करत होते? लाॅकडाऊनमूळे सलून बंद होती म्हणून ते खाते स्वतःची हजामत करीत होते का?

प्रश्न घडणार्या घटनां पेक्षा सरकारमधील लोकांच्या प्रतिक्रीयांचा आहे. कारण तेच सर्वात मोठे लोकशाहीचे मूल्य आहे. शिवसेनेला सरकारमध्ये असताना कसे वागावे याची जाणीवच नाही. युतीतील सरकारात शिवसेना निम्मा भागिदार होती. त्या वेळी जीभेला हाड नसावे अशा रितीने आजचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपावर पाच वर्षे सतत टिका करीत होते. आता तर युतीतून बाहेर पडून एक तृतीयांश पण सत्ता वाटेला आली नाही. पण सरकार मध्ये आहातच ना, मुख्यमंत्रीपदावर आहात ना,  मग भाजपाने केलेल्या टिकेवर शिवसेनेने सरकार म्हणून जे काही उत्तर द्यावयाचे आहे ते विधानसभेत द्यावे, पत्रकार परिषदेत द्यावे. शिवसैनिकांनी कायदा हातात का घेतला? त्या शिवसैनिकांची मानसिकता दोन साधूंची हत्या करणार्या गावकर्यांपेक्षा वेगळी कुठे आहे ?  त्या शिवसैनिकांनी सामाजिक अंतर कायद्याचा भंग केला आहे तो ही जाणून-बुजून.मग त्यांच्यावर ही कारवाई व्हावयास हवी. आपल्या नेत्याला मागच्या दारातून सत्ता घ्यावयास लागली या गोष्टींचा शिवसैनिकांना इतका संताप येत असेल तर त्यांनी प्रथम आपल्या पक्षाची शक्ती वाढविण्याचे प्रयत्न करावयास हवे. पण ती सुद्धा वेळ हातातून गेली. कारण आता एक नव्हे दोन पक्षांच्या सोबत बसली आहे. इतकी वर्षे मुंबई महापालिका तुमच्या ताब्यात आहे, आज मुंबई कोरोनाच्या दशहतीत सापडली आहे, आपले प्रयत्न अपूरे पडत आहेत, मनुष्यबळ कमी पडते आहे, अशा वेळी तुमच्या नेत्यावर तुमची भक्ती दाखविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांवर दादागिरी काय करता ? त्यापेक्षा तुमची शक्ती लागू द्या प्रशासकीय कामाला मदतनीस म्हणून. नुसती ठोकशाहीच्या भाषा का करीत बसला आहात ? भाजपा विधानसभेत सर्वात मोठा पक्ष व मुख्य विरोधी पक्ष आहे. त्याने मुख्यमंत्र्याची आरती ओवाळायला हवी का? तुम्ही युतीत सत्तेत होतात तेव्हा सरकारवर टिका करण्याचा हक्क तुम्हाला संविधान ने दिला होता का?  यावर विचार करून मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना सबूरीचा सल्ला द्यावयास हवा.  माझे तर स्पष्ट मत आहे की, महाराष्ट्रातील हे सरकारच अनैतिक आहे. निवडणूक पुर्व युती वा आघाडी केलेले पक्ष जिंकले तर त्यातील पक्षाने निवडणूकीतील विरोधी पक्षाशी आघाडी करून सत्ता काबीज करण्यास प्रतिबंध घालण्यासाठी एक कायदा यावयास हवा. तसे बील पास करून कायदा आणावयाची संधी केंद्र सरकारच्या हाती आगाऊपणा करणारे शिवसैनिकच देतील असे दिसते. संपूर्ण बहूमत असलेले मोदी सरकार ती संधी सोडेल असे वाटत नाही. जम्मू आणि काश्मीर राज्यातील कलम ३७० व कलम ३५ अ तडकाफडकी रद्द करताना जगाची पर्वा न करणार्या पंतप्रधान मोदींना तुम्ही अजूनही समजू शकला नाहीत याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्रातील काही फॅशनेबल पुरोगामी पत्रकार -संपादक मंडळींना याविषयी काय वाटते ते अजूनही जनतेपर्यंत आले नाही. म्हणे आम्ही लोकशाहीचा चौथा आधारस्थंभ ? हे  कुठले लोकशाहीचे आधारस्थंभ? हे तर मिंधे घराणेशाहीचे.

या मिंध्या लोकांवर काही अधिक बोलू नये असेच वाटते. पण त्यांचा मिंधेपणा उघडकीस आणण्यात सोशल मिडीयावर बंदी कुठे आहे ? शेवटी सोशल मिडीया हा मिडीयाचा भाग आहेच की ! पंतप्रधान मोदीच्या काळात पत्रकार व संपादकीय मंडळीचे फाजील लाड केले जात नाही. ही त्यांची व्यथा असू शकते. पण मोदी पंतप्रधानपदी नव्हते तेव्हा तरी तुम्ही कुठे वाजपेयी-अडवाणींची स्तूती करीत होतात? विरोधी पक्षांनी वाजपेयींचे एक मताने सरकार पाडले आणि देशावर तेरा महिन्याच्या आत पुन्हा निवडणूक आणली. वाजपेयींचे सरकार १ मताने पाडले होते त्यातील खरा सुत्रधार अर्थात खलनायक आपले शरद पवार होते. याच शरद पवारांनी १९७८ साली स्वपक्षीय मुख्यमंत्री वसन्तदादांच्या पाठीमागून खंजीर खुपसून मुख्यमंत्री पद काबीज केले होते. त्यांना जाणता राजा कोणी व कशी पदवी दिली याचे मला आश्चर्य वाटते. कारण स्वपक्षाच्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खूपसण्याचे पेंटट औरंगजेबाच्या नावावर आहे. दिल्लीत स्वतःच्या पक्षाच्या खासदारांची संख्या कमी असताना वाजपेयींचे सरकार पाडण्याचा उद्योग शरद पवारांनी केला होता. कारण दिल्लीतील तख्तावर अस्थिरता वाढवावी व एक काॅम्रोमाईज नेता म्हणून आपली निवड होईल व आपण पंतप्रधानपदी बसू असा त्यांचा होरा होता. पण दिल्लीत यांची डाळ शिजण्याच्या अगोदरच करपली. आता शरद पवारांची काय स्थिती आहे? जीवाचे रान करूनही महाराष्ट्रात आमदाराची संख्या साठाच्या पलिकडे जात नाही, आणि मागच्या दाराने सत्तेत आले. दुसरे ते रोखठोक बोलणारे, सत्तेची आम्ही पर्वा करीत नाही अशा बढाया मारत पाच वर्षे महाराष्ट्रात व केंद्रात सत्ता भोगली तीही राजीनामे खिशात ठेवत. त्यासंबंधी दोन्ही काॅग्रेसने टिंगल उडविली, सोशल मिडीयावर ही टिंगल झाली. ती बेशरमपणे सहन करीत शेवटी २०१९ ला सत्ता चोरण्यात ही अग्रेसर राहिले. तरी ही जोडी (शरद पवार व उद्धव ठाकरे) महाराष्ट्रातल्या काही महान पत्रकार व संपादक मंडळीसाठी एक जाणता राजा व दुसरा होऊ पाहात असलेला जाणता राजा असे वाटत असेल तर ते का व कसे हे फक्त त्या पुरोगामी पत्रकार व संपादक मंडळींनाच  ठाऊक.

महाराष्ट्रात भाजपाची ताकद म्हणे स्व. बाळासाहेब ठाकरे मुळे वाढली. असे म्हणण्यात मराठी न्यूज चॅनेल्स व वर्तमानपत्रे अग्रेसर आहेत. त्यात तथ्य जरूर आहे. पण त्यामूळेच आख्या महाराष्ट्रात भाजपा वाढला असे मानणे अतार्कीक आहे. कारण शिवसेना तरी कुठे आख्या महाराष्ट्रात पसरली होती?  शिवसेना राजकारणात येणाअगोदर जनसंघ म्हणजे आताचा भाजपा २०वर्षापुर्वी (१९५२) पासून  स्पष्ट हिंदुत्वाची भूमिका घेऊन नेते व कार्यकर्त्यांच्या बळावर जम बसवित आला आहे. सामान्यतः कुठल्याही दोन पक्षांच्या आघाडीत वा युतीत दोघांचा ही फायदा होत असतो. शरद पवारांना ही काॅग्रेस सोबत आघाडी करून फायदा मिळतोच की ! महाराष्ट्रातील राजकारण शरद पवार विरूद्ध बाळासाहेब ठाकरे अशा दोन धृवाभोवती राहण्याची एक व्यवस्थित योजना फार पुर्वीपासून  मिडीयातील मिंधी मंडळी राबवत आली आहे. पण फारसा फायदा दोघांना ही मिळाला नाही. कारण मुंबई व महाराष्ट्र, काॅग्रेसचा गड होता. स्व. बाळासाहेब ठाकरेंचा करिश्मा मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत सुरूवातीला कुठे चालत होता ? तेव्हा बाळासाहेब मार्मीक मधून हताश होत आपली व्यथा संपादकीय व व्यंगचित्रातून मांडीत असत. तर दुसरीकडे  शरद पवारांना काॅग्रेस मध्ये असूनही शंकरराव चव्हाण, नासिकराव तिरूपडे यांनी जखडून ठेवले होते. नंतर दो हंसोका जोडा म्हणजे विलासराव देशमूख व सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवारांना जखडून ठेवण्याचे कार्य केले. त्यावेळी ब्राह्मण -ब्राह्मणेतर वाद  हे नाणे महाराष्ट्रातील राजकारणात सर्रास वापरले जात होते, जेणेकरून महाराष्ट्रात जनसंघाला स्पेस मिळवून द्यायचे नाही. आज ही मागच्या दाराने सत्ता मिळवित आम्ही ब्राह्मणाचे हिंदुत्व मानत नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी म्हटल्याचे ऐकले आहे, तर त्यांचे चेले सामनाचे संपादक संजय राऊतने मंदिरामधील देव-देवतांवर सडकून टिका केली. तुमचे हिंदुत्व असे असेल तर मुख्यमंत्र्यांनी शपथविधी करण्यासाठी मुहूर्त शोधून ब्राह्मणाकरवे पुजा का करून घेतली ? महाराष्ट्र जाती-जमातीत विभागून ठेवण्याच्या कुटील नितीत आजच्या सरकारमधील तिन्ही पक्षांची पुर्वीची  नेतेमंडळी होती.

आज जे सत्तेवर आहेत, त्यांच्या पुर्वाश्रमीच्या नेत्यांच्या काळातच मुबंईतील गिरणी कामगार देशोधडीला गेला. हे येथे नमूद करणे भाग आहे. कारण बहुतांश गिरणी कामगार मराठी होता.  मुंबईतील  कापड गिरण्या तसेच इतर उद्योगधंदे साम्यवाद्यांच्या विद्रोही कामगार संघटनांच्या उपद्रवापासून वाचविण्या साठी  मराठी माणूस अशा  भावनिक आवाहानातून शिवसेना स्थापन झाली. पण मुंबई अंशातच राहिली. ज्या गिरणगावात कापूस- शेतकरी व कामगारांच्या घामातून वस्त्रयज्ञ सुरू होता, तिथे आज टोलेजंग हाय-फाय इमारती दिसतात. कारण मुंबई अंडरवर्ल्ड गुंड व बिल्डरांच्या घशात गेली. मराठी अस्मितेचे गारूड पचविण्यासाठी वेळीच ग्रामीण भागासाठी स्वतंत्र रित्या विकासाचे धोरण अमंलात आणले गेले असते तर  सोयी-सुविधा बाबतीत गाव व शहरांमध्ये इतकी प्रचंड प्रमाणात तफावत दिसली नसती. सारी धोरणे शहरांना केंद्रभूत मानून अमंलात आणल्यामूळे  मुंबई सारख्या शहरावर नको तितकं ओझं पडले. आज मुबंई व मुबंईच्या आसपासच्या नगरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात का दिसतो यावर जरा खोलवर जाऊन विचार केला तर झोपडपट्टीची भरमसाठ वाढ हे एकमेव कारण दिसते आहे. परप्रांतीयांना हाकलून द्या असे एकाने म्हणावे, तर उत्तरेकडील प्रांतातले नेते  (ते ही काॅग्रेस व काॅग्रेसचीच पिल्लावळे भिन्न नाव धारण केलेले) येथे येऊन मुंबईतील हिंदी भाषिकांचा कैवार नाटकाचे प्रयोग करीत राहीले. बस मतांचे गणित साधले, काम फत्ते झाले. कोणाचे काम फत्ते झाले ? त्यावेळी ना भाजपाचे मुंबईवर राज्य होते, ना भाजपाची हिंदी भाषिकांना भडकावून देणारी नाटक कंपनी होती. आज जे सत्तेवर आहेत यांचेच पुर्वाश्रमीचे नेतेमंडळी आपआपली व्होट बँक तयार करून सत्ताधिश व कोट्याधिश ही झाले.

नंतर बाळासाहेबांनी आपली राजकीय कूस बदलली व हिंदुत्व कार्ड हाती घेतले. तोपर्यंत भाजपाने वनवासी, आदिवासी, भटक्या, विभूक्ती, ओबीसी, इत्यादी समाजात सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि सामाजिक समरसतेचे नेटवर्क उभे केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी आपल्या प्रपंचावर तूलसी पत्र ठेवून जिथे जिथे रचनात्मक व विधायक कामें केली, त्या त्या प्रांतात भाजपा बलवान होत गेला.  नंतर महाराष्ट्रात सेना -भाजपा युती झाली. तेव्हा ही शिवसेना ७० च्या आसपास राहीली. बाळासाहेबांचा करीष्मा भाजपाला फायदेशीर ठरला असेल तर  शिवसेनेला भाजपाच्या दुप्पटीने फायदेशीर ठरायला हवा होता. पण तसे झाले नाही. या सत्याचा शोध भाजपा- विरोधी मराठी मिडीयांनी घ्यावयास हवा होता. पण तसा प्रयत्न केला नाही. म्हणूनच शिवसेनेला लोकांचा मिळालेला प्रतिसाद हा स्थायी स्वरूपाचा ठरला नाही. त्यातूनच अनेक मातब्बर नेत्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. हा इतिहास आहे.  शिवसेनेमूळे भाजपाची शक्ती वाढली असा प्रचार करणे म्हणजे आपला मुलगा परीक्षेत नापास झाला की दुसर्याचा पास झालेला मुलगा आपल्या वडीलाकडे शिकवणीसाठी येत होता असे टुणटुणे वाजविल्या सारखे ठरले. महाराष्ट्रात भाजपाला कोंडीत पकडण्याचे कार्य हे तिन्ही पक्ष करीत होतेच. ही काही २०१९ ची नवीन गोष्ट नाही.  १९९५ नंतर सेना-भाजपा युती बाळासाहेबांच्या हयातीतही सत्तेवर आली नाही. आणि तब्बल दहा वर्षे काॅग्रेस आघाडीने महाराष्ट्रावर राज्य केले. दिल्लीत यूपीएने देश लूटला, तर महाराष्ट्र युपीएच्या धाकट्या बहिणीने लुटला. नंतर मोदी नावाचा झंझावात आला आणि महाराष्ट्रात भाजपा प्रथम क्रमाकांवर आला. महाराष्ट्रात भाजपाचे बळ फक्त बाळासाहेबांमूळेच वाढले असे म्हणणे ही शिवसेनेला हवी असलेल्या सहानुभूतीसाठी सबब होती. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर लागलीच आलेल्या विधानसभा निवडणूकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवून शिवसेना जेमतेम भाजपाच्या आमदार संख्येच्या अर्ध्यावर पोहचली. बाळासाहेबांच्या मृत्युनंतर मतदारांना केलेले भावनिक आवाहन, शिवसेनेच्या प्रचार सभेचे वारंवार दृष्य दाखविणे, मोदी-शहा जोडी मुंबईचे वैरी, बूलेट ट्रेनचा फायदा गुजराथी लोकांना, मुख्यमंत्री पदासाठी लोकांची पसंती उद्धव ठाकरेला सर्वाधिक इत्यादी गोष्टी वारंवार न्युज चॅनेलांनी टिव्ही वरून दाखविण्याचे सौजन्य शिवसेनेच्या चरणी वाहीले. तरी  २०१४ सालच्या निवडणूकीत शिवसेना ६५ वर अडकली. याचे कारण राजकारणात यश मिळविण्यासाठी एका विशिष्ट ध्येयाने प्ररीत झालेले कार्यकर्ते निर्माण करणे गरजेचे आहे.  ' संप, बंद, सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करणार्यांच्या पक्ष 'अशी प्रतिमा शिवसेनेची झाली. त्यामुळे मुंबई -महाराष्ट्रातल्या व्यापारांनी व उद्योजकांनी आपला बिस्तरा येथून उचलला व इतर प्रातांत गेले. संप सम्राट व कामगारांचे नेते जार्ज फर्नांडीसंना शेवटी उपरती येऊन भाजपावासी झाले.  ही वस्तुस्थिती माहित असूनही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठोकशाहीला तिलांजली दिली नाही.  उलट आपल्याच केडरबेस मित्र पक्ष भाजपाचे खच्चीकरण करण्यासाठी आपली शक्ती खर्च केली. ती शक्ती आपल्या पक्षाच्या संघटन कार्यात वापरली असती तर शिवसेनेला महाराष्ट्रात क्रमांक १ पटकाविता आला असता. शेवटी ससा व कासवाच्या शर्यतीत जसा कासव जिंकला तसा भाजप जिंकला. काळ बदलला आहे. वाडवडीलांच्या पुण्याईने निवडणूका जिंकता येण्याचा काळ संपत येत आहे याचे भान घराणेशाही पक्षांना ( मग ते लालू असो वा मुलायम पवार असो वा ठाकरे आणि पवार ) अजून आलेले दिसत नाही. ठोकशाही, दादागिरीला न जुमाणारा  मोदी नावाचा झंझावात २०३४ पर्यंत राहील असे भाजपा विरोधक पत्रकार शेखर गुप्ता ही म्हणू लागले आहेत.  केवळ मोदी विरोध करून सत्ता मिळणे कठीण आहे असे शेखर गुप्ता सारखे म्हणत असतात. पण ज्यांची मने द्वेषाने माखली असतील अशा पत्रकार व संपादक मंडळींना कोण समजावून देणार ? काही ना काही कारण काढून  मोदी आणि भाजपावर टिका करीत आहेत. कोरोना संकटाला सुरूवात होते न होते तेवढ्यात विरोधी पक्षांच्या हातात सत्ता असलेल्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी, (त्यात आपले मुख्यमत्री ही आले)  केंद्र सरकार आम्हाला निधी कमी देते अशी रड सुरू केली आहे. सुरवातीलाच रड केली की मोदी सरकारवर अपयशाचे खापर फोडणे सोपे जाईल. इतके तोकडे ध्येय ठेवून मविआ सरकार महाराष्ट्राचा कारभार चालवित आहे. त्यातून हाती काय लागेल हे सांगण्याची गरज नाही.

आज अनेक युवक भाजपाच्या म्हणजे मूळ जनसंघाचा ही अभ्यास करीत आहेत .जनसंघाची स्थापनाच देशाच्या व बहुसंख्याकांच्या (हिंदुच्या) हिताकडे दुर्लक्ष करणार्या काॅग्रेस, समाजवादी व डाव्या पक्षांच्या धोरणाला विरोध करून एक सक्षम पर्याय निर्माण करण्यासाठी झाली होती. भारतात सांस्कृतिक राष्ट्रवाद व समान नागरी कायदा स्विकारल्याशिवाय देशाच्या फाळणीतून  हिंदु-मुस्लीम समाजात पसरलेले विष खाली उतरणार नाही अशी स्पष्ट भूमिका जनसंघाच्या निर्मिती पासून ते आजतागायत भाजपा घेत आलेला आहे. त्यात बदल केला नाही. ते ही एक महत्वाचे कारण आहे ज्यामूळे भाजपाला महाराष्ट्रातही चांगले यश मिळू लागले. या संदर्भात साहित्यिक मधु मंगेश कर्णिकांनी केलेली टिपणी लक्षात घेण्यासारखी आहे. त्या टिप्पणीत साहित्यिक मधू-मंगेश कर्णिक म्हणतात ' शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे अंगावर घेतलेल्या शाल सारखं आहे. गरज नसेल तेव्हा अंगावरून काढावी व गरज पडेल तेव्हा पांघरावी. पण भाजपाचे हिंदुत्व त्याच्या रक्तात आहे, आपल्या शरीराला चिकटलेल्या त्वचेसारखं, ते कधीही न काढता येणारं.  त्यामूळेच  मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, गुजरात इत्यादी राज्यात भाजपा तगड्या काॅग्रेसला पर्याय ठरला व नंतर कर्नाटक, ईशान्य भारतातील राज्यें, गोवा, महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिला. असे यश मिळविण्यासाठी नेते व कार्यकर्त्यांनी घाम गाळावा लागतो. नेत्यांनी राजेशाही थाटात आदेश देऊन मतें मिळत नाहीत. आकाशात धुमकूतु जसा उगवतो तशा पद्धतीने फक्त निवडणूकीच्या काळात रोखठोक भाषणे करून पक्ष वाढत नसतो. हे शिवसेना, काॅग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षांनी ध्यानात ठेवून राजकारणातील आपली पुढील वाट निश्चित करावी, ज्यातून संघ व भाजपा वरील टिके पेक्षा महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी असतील. तरच तुमच्या आघाडी सरकारच्या नावातील विकास या शब्दाला अर्थ राहील. 

जाता जाता महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणूकीच्या निमित्ताने रंगलेल्या राजकारणावर थोडीशी चर्चा करू या. लेख लिहीत असतानांच विधान परिषदेच्या ९जागां साठी होणारी निवडणूक टळली व सर्व पक्षांनी सांमजस्य दाखवून उमेदवारांची बिनविरोध निवड झाली ही बातमी कळली. आनंद वाटला. त्याबद्दल सर्व पक्षांच्या नेत्यांचे व निवडून आलेल्या उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन ! गुंता सुटला पण जे राजकारण झाले ते इतिहास जमा झालेच ना ! उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून कोरोनाचे संकट येई पर्यंत मविआंच्या नेते मंडळीत शरद पवार असतानां आपल्या मुख्यमंत्र्याना विधान परिषदेचे सदस्यत्व देऊ का शकले नाहीत? पवारांना इतकं लहानसे काम जमले नाही, मग लोकांची कामें कशी होणार ? शिवसेनेच्या विद्यमान आमदारला राजीनामा देऊन विधानसभा किंवा विधान परिषदेवर उद्धव ठाकरेंना का जाता आले नाही, त्यासाठी राज्यपाल महोदयांनी आडकाठी घातली नव्हती. सन्माननिय राज्यपाला द्वारें विधान परिषद साठी ज्या दोन जागा होत्या त्यातील एक मुख्यमंत्र्यासाठी मागता? संविधानाची रचना मविआ सरकारासाठी मांडली आहे का?  राज्यपाल महोदय राजकारण करीत आहेत असे नाटक जाणून- बुजून केले. सर्वसामान्य राजकीय कार्यकर्त्यांना ही बाजू कुठे माहीत आहे ? माविआचे कार्यकर्ते सोशल मिडीयावर बेडूकासारखे उड्या मारत मे महिन्याच्या मध्यान्हात डराव ऽऽ डराव करीत आहेत. उद्धव ठाकरेंना  निवडून येण्यासाठी भराव्या लागणार्या फार्म सोबत आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत कुठला, आपली मालमत्ता किती इत्यादी गोष्टी मॅनेज करता करता त्यांच्या हातून वेळ निघून जाणार हे माहित असल्यामूळे राज्यपालांवर खापर फोडावे लागले का? इत्यादी प्रश्नांची उत्तरे महाविकास आघाडी सरकारचा उदोउदो करणार्या वार्ताहार व संपादक महाशयांनी आपले सूत्र नावाच्या अपत्या मार्फत शोधून काढावीत आणि जनतेसमोर मांडावीत हेच त्यांच्या पत्रकारितेला शोभून दिसेल. अन्यथा पुढे महाविकास आघाडीच्या पराभवात ढोंगी पुरोगामी पत्रकार मंडळी ही कारणीभूत ठरतील.

गुरुवार, १४ मे, २०२०

मुक्काम पोस्ट लाॅकडाऊन वरून भाग (3)


लाॅकडाऊन कधी उठेल हे आजही सागता येत नाही. म्हणून या लेखमालिकेचा तिसरा भाग आपल्या समोर ठेवतो. जेव्हा कधी लाॅकडाऊन संपेल तेव्हा आपण घराबाहेर पडणार आहोत पण पुर्वी सारखे नाही हे लक्षात ठेवावे लागणार. कारण कोरोना पाहूणा म्हणून आलेला होता व तो गेला आणि लाॅकडाऊन उठला असे होणार नाही.  लाॅकडाऊन उठविताना नागरिकांनी आपआपली काळजी कशी घ्यावी यासंबंधीच्या सूचना आणि सोबत कुठल्या गोष्टी टाळाव्यात याचीही माहीती प्रशासन देणार आहे. याचा अर्थ हाच की कोरोना माझ्या घरात न आणण्याची जबाबदारी माझी स्वतःची आहे, हे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याने लक्षात ठेवलेले बरे. लाॅकडाऊन नंतर वैयक्तीक व सार्वजनिक जीवनात घडल्या जाणार्या घटनांवर मग त्या कुठच्याही क्षेत्रातल्या का असेना कोरोना महामारीची छाया असणार हे निश्चीतच. व्यंगचित्रकार स्वर्गीय आर. के. लक्ष्मण यांची आठवण येते. आज ते हयात असते तर त्यांच्या व्यंगचित्रातील काॅमन मॅन सोबत अखिल मानव जातीवर हसत असलेला कोरोना विषाणू दिसला असता. तर राजकीय विषयावरील भाष्यात हाच कोरोना जगभरातील राजकीय व्यवस्थेवर एखाद्या राक्षसाप्रमाणे आक्राळविक्राळ रूप घेऊन खावयास तयार असलेला दिसला असता. कारण कोरोनाचा जन्म जगभरातील सत्ता आपल्या ताब्यात राहावी या ईर्षेने पेटलेल्या जागतिक महासत्तांच्या पशूवत व्यवहारातून झाला आहे असे जवळपास स्पष्ट झाल्याचे दिसते.

या लाॅकडाऊनच्या काळात आपण रोज टिव्ही चॅनेल्सवरून  कोरोना संबधींत बातम्या, चर्चा, उपचार  विडीओ, इत्यादी पाहातो व ऐकतो आहोत.  यातील बहुतांश सारे कार्यक्रम व चर्चा तटस्थेने होत नाहीत असे अनुभवास येते. अलिकडे कोरोना विषयावर विडीओ काँन्फरन्स द्वारे एक भाषण लाईव्ह ऐकले. कोरोना महामारीच्या संकट काळातील आपल्या देशाचे वर्तमान व भविष्य यावर भाष्यं करणारे ते एक व्याख्यान होते असे म्हणावेसे वाटते . सदरहू कार्यक्रमात सन्माननीय व्याख्यात्यांनी एक वाक्य तर सोडाच पण एका शब्दानेही राजकारणाला स्पर्श केला नाही. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटलं असेल, पण ते सत्य आहे. माझ्या कानाने मी ऐकले आहे. त्या व्याख्यानाचे सार माझ्या सुमार कुवतीच्या साह्याने काढलेले असले तरी ते आपल्याला नक्की आवडेल. कारण सोन्याचा कुठल्याही प्रकारचा आणि कसाही दागिना घडवून घेतला तरी शेवटी ते सोने चकाकणारच ना. म्हणून ते व्याख्यान आपल्याशी शेअर करीत आहे.

"नमस्कार मंडळी !
आज आपण अभूतपुर्व स्थितीत या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. कोरोना महामारी ही या शतकाच्याच नव्हे तर मानवाच्या इतिहासातील सर्वात भयानक  व दुःखद घटना आहे.  दुसर्या जागतिक महायुद्धापेक्षा अधिक देश या महामारीने प्रभावित झाले. जवळपास १८५ देशांना कोरोना विषाणूने आपल्या विळख्यात ओढले आहे. मानवी इतिहासात कधी नव्हती इतकी जिवीत व वित्तहानी झाली आहे. आजपावेतो जगभरात ४३४४१०१८ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे आणि २९७१९७ इतके लोक मृत्यमूखी पडले आहेत. आरोग्य,उद्योग, कृषी, व्यापार, वाहतूक, शिक्षण, कला इत्यादी सार्या व्यवस्था कोलमडून पडल्या आहेत. असे म्हटले जात आहे, की २००८ साली जगभर जी आर्थिक मंदी आली होती, ती दिड वर्षापर्यंत टिकली. पण कोरोना महामारीतून येत असलेली आर्थिक मंदी तीन ते चार वर्षापर्यंत टिकू शकेल. काही जण म्हणत आहेत, की जसे सनावली मांडताना आतापर्यंत  BC म्हणजे Before Chriest आणि AC म्हणजे  After Chriest अशी जी रीत आहे, त्यात बदल होऊन कोरोनाचे संकट टळल्यानंतर  Before Corona आणि After Corona अशी कालगणना केली जाईल, इतकं मानवी जीवन उध्वस्त झाले आहे. 

लाॅकडाऊन नंतर उद्योग क्षेत्राला लिक्वीडिटी क्रंन्चला सामोरे जावे लागेल ; मजूर वर्ग जो भयभीत होऊन आपआपल्या गावाला गेला आहे, तो परत येणार नाही; मग उत्पादन करणार्या कारखांनाच्या चाकांची गती व खटखटाट आवाजाची तीव्रता कशी वाढेल ? उत्पादन क्षेत्र मंदावले की हायवे वरून दिवस-रात्र सुरू असलेल्या माल वाहतूक करणार्या वाहनांची रांग च् रांग कशी दृष्टीस पडेल?  सेवा क्षेत्रात सेवा देणारा मुख्य वर्ग म्हणजे बँका, व पत पुरवठा संस्था. त्यांच्यासमोर एनपीएचे आव्हान असेल तर सेवा घेणार्या वर्गाची पाऊले मंदगतीने पडतील, मग ते क्षेत्र तरी कसे गतीने पुढे सरकणार ? अनेक कामगार व कर्मचारी आपल्या नोकर्या गमावून बसलेले असतील, मग त्यांची क्रयशक्ती तरी कशी वाढेल? आरोग्य, कृषी, लघुउद्योग, पर्यटन, व्यापार, शिक्षण कला, क्रिडा इत्यादी सर्वच क्षेत्रांत अनेक समस्या आ वासून उभ्या असतील. पण निराश होऊन कसे चालेल? ' Every cloud has silver shinning.'  प्रत्येक आपत्तीतच तिचे इष्टआपत्तीत रूपातंर करण्याची संधी असते. पण संधी गमावून बसावयाचे नसते. 'Opportunity means a course of action which is immediately possible.' कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा तत्परतेने करावयाचा उपाय जो होता तो म्हणजे लाॅकडाऊन. तो भारत सरकारने धाडसाने इतर देशापेक्षा तत्परतेने घेतला. या बद्दल जग कौतूक करीत आहे.

सारं जग आजच्या लाॅकडाऊन मध्ये मानवी जीवनावर चिंतन करीत आहे. मानवी जीवनाचं प्रयोजन काय आहे. अंतीम गंतव्य स्थान काय आहे यावर चर्चा होत आहे, जी आपल्या येथे प्राचीन काळापासून होत आलेली आहे. आज आपण बाजारात भाजीपाला आणायाला जात नाही ; हाॅटेलमध्ये तयार जेवण घेण्यासाठी जात नाही;  जे घरात आहे ते शिजवून खात आहोत; जीवनाचं गाडं तर चाललं आहे, ते तर थांबले नाही. मग प्रश्न पडतो की जगण्यासाठी माणसाला किती गोष्टींची गरज आहे ? किती गोष्टी आपण अनावश्यक रित्या खरेदी करीत असतो ? असे सर्वत्र ऐकू येते. हे एक प्रकारचे आत्मपरीक्षणच नव्हे काय? लाॅकडाऊनच्या काळाच्या अगोदर अनावश्यक खरेदीत जाणारा वेळ  कुटुंबातील सदस्यां समवेत जाऊ लागल्यामूळे कुटुंब संस्थेत पिता-पुत्र, सासू-सून, आईवडील-मुले इत्यादी नातसंबंधातून परस्परांना मिळणारा आधार एक दमडी न मोजता अनुभवास मिळत असल्याचे लोक सांगत आहेत. टिव्ही चॅनेलवरून दिसणारे रूग्णालयें, रूग्ण, ऐकू येणारी मृताची संख्या इत्यादीतून जीवन किती क्षणभंगूर आहे हा विचार सर्वत्र चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. पर्यावरण क्षेत्र साफसुत्र दिसते. सूर्याच्या सोनेरी किरणांनी शोभिवंत झालेल्या हिमालयाच्या पर्वतराशीं आपलं मोहक दर्शन घडवित आहे. एकंदरीत आधूनिक विकास हा खरा विकास आहे कि एक आभासी जीवन; सध्याच्या जीवनशैलीत काही बदल करावेत की काय ; आजच्या आर्थिक विकासाचे जीडीपी, जीएनपी इत्यादी  मापदंड टिकाऊ की कामचलाऊ ठरू लागतील ; विकासाच्या धोरणात विकेद्रिकरणावर भर देता येईल का ; पर्यावरण स्नेही, व कमी ऊर्जा खाणारे व गावोगावी रोजगार निर्माण करणार्या लघुउद्योगांना ही विकासात स्थान देता येईल का ; मानवी जीवनात स्थायी स्वरूपाचे परिवर्तन करता येईल का ; आज या लाॅकडाऊनमध्ये जे वैराग्य दिसते ते स्थायी स्वरूपाचे असेल की ते केवळ स्मशान स्वरूपाचे ठरून पुन्हा आपले आहे तसे रूटीन सुरू होईल; इत्यादी प्रश्नाने आपल्याला अंतर्मूख होऊन विचार करावयास लावले आहे.

एके काळी आपला भारत देश विश्वगुरूपदी विराजमान होता. तो विद्यमान स्थितीत अखिल मानव जातीला कल्याणाचा मार्ग दाखविण्यात महत्वाची भूमिका निभावू शकेल का? यावर ही विचार सुरू झालेला आहे.  कोरोनाशी लढत देत असताना सदैव नागरी सुविधा तसेच भविष्य निर्वाह सारख्या बाबींवर सरकारी व्यवस्थेवर अवलंबून असलेला अमेरिकन समाज आज भयभीत आहे. आपल्या सुरक्षेसाठी तेथील लोकांची आंतरॲनिमेशन खरेदी करण्यासाठी जागोजागी झुंबड पडलेली आहे. आज जागतिक समाजात  ' आपण व आपले घर बरे ' असे मानून घरातून कोणी बाहेर पडत नाही, अशी स्वार्थी वृत्ती दिसते. या उलट भारतात अजब चित्र दिसते. भारतात सर्वत्र सेवाभाव जागृत झालेला दिसतो. भारतीय समाज परस्पराला सोशल डिस्टन्सिंग पाळत मदत करीत आहे. केवळ कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांनाच नव्हे तर गोरगरीब, व प्रवासात ताटकळत राहिलेल्या समाजबांधवांना कोणी रेशन देतो तर कोणी भोजन देत आहे. प्रत्येक जण आपआपल्या परिने प्रत्यक्ष रणागंणात काम करणार्या डाॅक्टर्स, नर्सेस, रूग्णालयातील व प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस व सुरक्षा दल इत्यादी मंडळींना जेवण, नाश्ता, चहापाणी देत आहे. उद्योजक, हाॅटेल्स मालक, व्यापारी, स्वयंसेवी संस्था, मंदिरे -गुरूद्वार इत्यादी धार्मिक संस्था, अन्य छोट्या-मोठ्या चॅरीटेबल संस्था, व्यावसायिक वर्ग, कला-चित्रपट क्षेत्रातील मंडळी,  चाकरमनी, छोट्यातील छोटे व्यापारी, व लघुउद्योजक सारे आपआपल्या परिने आर्थिक मदत सरकारकडे देत आहेत. कोणी वैद्यकीय उपकरणांची मदत देत आहेत, तर कोणी मनुष्यबळ पुरवित आहेत. भारतीय समाजाचा एक जगावेगळा  व्यवहार पाहून सारं जग चकीत झाले आहे. भारत सरकारच्या लाॅकडाऊनच्या धाडसी निर्णयाचे कौतूक होत आहे. जाती -जमातीत विभागलेला, वैचारिक दृष्ट्या मागासलेला, शिस्तहीन, निर्णय घेण्यात विलंब व हेडसाळ करणारा देश अशी  टिंगल उडविणारे अनेक देश भारताकडे आज आशेने पाहू लागले आहेत.

लाॅकडाऊन उठविल्यानंतर काय पाहावयास मिळेल? मागे म्हटल्याप्रमाणे उद्योजकांसमोर उत्पादनासाठी लिक्विडीटीची समस्या असेल ; बँकांना एनपीए, विद्यार्थ्यासमोर परीक्षांचा निकाल, पुढे ढकलेल्या परीक्षा, नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेश इत्यादी बाबीवरील प्रलंबित निर्णय;  मजूर, नोकरदारांनी गमाविलेला रोजगार; छोट्या-मोठे व्यावसायिक, व्यापारी,  कृषी माल उत्पादक, हाॅटेल्स, पर्यटन, ट्रान्सपोर्ट, कुटीरोद्योजक इत्यादींनी गमाविलेले ग्राहक , अशा नाना समस्यांनी प्रत्येक क्षेत्र ग्रासलेले दिसेल. त्यावर उपाययोजना शोधून मार्ग काढावा लागेल. मग प्रश्न पडतो की मार्ग कसा शोधावा? यावर विचार करता दोन महत्वाची सुत्रे समोर येतात. संवेदनशील सरकार आणि सक्रीय समाज.

संवेदनशील सरकार म्हणजे काय? लाॅकडाऊननंतर उग्र समस्यांनी ग्रासलेल्या बहूतांश क्षेत्रासाठी अनुकूल व पुरक नीती तयार करावी लागेल, व्यवस्था उभी करावी लागेल, ज्या द्वारें उद्याजकांना, व्यावसायिकांना, व्यापारी, शेतकरी वर्गाला लागणार्या निधीची उपलब्धता होईल.  उत्पादन क्षेत्रातील जटील नियमात बदल करावे लागतील. सरकारतर्फे काही उद्योग -व्यवसायांचे Hand Holding करावे लागेल. सर्व क्षेत्रात उत्पादनाला सुरूवात होणे आवश्यक आहे.  पण केवळ संवेदनशील सरकार वर अवलंबून राहाता येणार नाही. कोरोना महामारीने एका युगाचा अंत झाला आहे व नव्या युगात आपला प्रवेश होईल हे समाजाने ही लक्षात घेणे आवश्यक आहे. कोरोना आपत्ती काळात आपल्या समाजाच्या अंगभूत सेवाधर्माचे दर्शन झाले आहे, ते असेच पुढे चालू राहावयास हवे. कारण त्यातून नव्याने उभी राहिलेली आव्हाने पेलाविण्याची समाजात एक स्थायी स्वरूपाची शक्ती निर्माण होते. त्यालाच आपल्या संस्कृतीत युगधर्माचे पालन करणे असे म्हटले जाते व त्यातूनच समाजाच्या सक्रीयतेचे दर्शन होते.

सक्रीय समाज म्हणजे काय? सरकारच्या नीती- निर्धारणात समाजाने स्वयंस्पुर्तीने, सुचना, सल्ला देणे अभिप्रेत असते. त्यासाठी समाजातील विभिन्न क्षेत्रातील बांधवांनी आपआपले गट बनवून सखोल अभ्यास करून आपआपल्या क्षेत्रासंबंधीच्या अडचणी, व उपाय याचा एक आराखडा द्यावा व सरकारने त्यावर विचार करून धोरण तयार करावे. सक्रीय समाज निर्माण करणे ही एक निरंतर चालत राहणारी प्रक्रीया असते. प्रत्येक बाबतीत समाज बांधवांत वेळोवेळी एक समान ध्येय व समान भाव उत्पन्न करीत राहणे हीच ती प्रक्रिया होय. याला समाज घडविणे असे ही म्हटले जाते. चिनी वस्तूवर बहिष्कार घाला असे म्हणून समाजमन तयार करीत राहावेच पण पोस्ट कोरोना सिनॅरिओत प्रथम आपल्याला चीन मधून आयात होणार्या वस्तूंचा पर्याय निर्माण करावयास हवा. याचा अर्थ मग ती खेळणी असो की, इलाॅट्रानिक्स वस्तू असो अशांचे उत्पादन देशात सुरू व्हावयास हवे. बिग बिझनेस हाॅऊसेस, बँका, पत पुरवठा संस्था, सरकार, इत्यादींनी एकत्र बसून विचार करावा. अशा वस्तुंच्या उत्पादनात जिथे जिथे लघुउद्योजकांना सहभाग देता येईल तो दिला पाहिजे. सरकारने उत्पादन, व्यापार, आणि वाहतूक व्यवसायाला पुरक वातावरण उत्पन्न करावयास हवे व आपल्या संवेदनशिलतेचे दर्शन घडवावे.

लाॅकडाऊन नंतरच्या जगात अमेरिका व युरोप देशाच्या अर्थव्यवस्था कोलमडलेल्या अवस्थेत असणार. तिथे आर्थिक मंदी असणार. त्यामूळे जगात ही आर्थिक मंदी असणार.  जागतिक बाजारपेठेत युरोप व अमेरिकेतील मंदी मूळे एक पोकळी निर्माण होईल. चीन आक्रमक नीती अवलंबून ती व्यापून टाकण्याचा प्रयत्न करणार, हे तर निश्चीत. आपला देश ती पोकळी भरून काढू शकतो का? आपले उद्योजक हे आव्हान स्विकारतील काय ? यासाठी सरकारने आधी म्हटल्याप्रमाणे पुढाकार घेऊन कर सवलती, सुलभतेने पतपुरवठा करावयास हवा. उत्पादन वाढीसाठी जे जे शक्य आहे ते सारे सरकारने केले पाहीजे. आपल्या येथील उद्योजकांमधील उद्यमशीलता, तंत्रज्ञ व विज्ञान शाखेतील तज्ञांचे नैपूण्य वर्ल्ड क्लास आहे. यापैकी बहुताशांनी पोस्ट कोरोना सिनॅराओमध्यें राष्ट्रोत्थानासाठी आपआपली तयारी सुरू केली आहे.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच विविध स्वयंसेवी संस्था ज्या एकत्रीतपणे कोरोना आपत्तीत सेवाधर्म निभावीत आहेत त्या सर्वांनी सक्रीय समाज निर्माण करण्याच्या दिशेने कार्य सुरू केले आहे. आपत्तीचे इष्टापत्तीत रूपातंर करण्याचे जे प्रयत्न सुरू झाले आहेत, त्यांसंबधीची माहिती सविस्तर देणे आज शक्य नाही पण संक्षिप्त रित्या देतो.
१)गुजरातमध्ये जानेवारीपासूनच प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी पुढाकार घेऊन India Techno Eco Fouram उभा केला आहे. आपआपल्या कंपनीला पॅकेज मिळावे अशी संकूचित भावना न ठेवता या फोरमने  प्रत्येक छोट्या-मोठ्या संस्था, काॅर्पोरेट सेक्टर्सशी, सहकारी संस्थांशी डिजीटल संपर्क केला आहे. त्यांच्या अडचणी तसेच त्या संबंधीत त्यांना आवश्यक वाटणारी उपाययोजना यावर चर्चा होऊन एक प्रारूप गुजरात सरकारकडे सुपूर्द केले आहे.
२)महाराष्ट्रात पार्क म्हणजे  Policy Advocacy and Research Centre स्थापन झाले आहे. कोरोना मूळे कोणकोणते क्षेत्रे अधिक प्रभावित झाले आहेत, त्याची गटवारी निर्माण करून प्रत्येक गटाचा अभ्यास सुरू केला आहे. विभिन्न अडचणी व त्यावर मात कशी करता येईल यावर मते घेऊन तज्ञांना सामील करीत सरकारशी संपर्क होणार आहे.
३) महाराष्ट्र किसान संघाने ही कृषी मालाचे उत्पादन, वितरण, त्यासंबधीतील अडचणी, त्या क्षेत्रात नवीन तंत्र आणता येईल का यावर विचारमंथन सुरू झाले आहे.
४) महाराष्ट्र व गुजरात मधील दोन विद्यापिठांच्या
उप- कूलगुरूंची एक ऑनलाईन बैठक झाली. तिथे ही अभ्यासक्रमात Skill Development हा विषय प्राथमिक स्तरावरून सुरू करता येईल का, ग्राम विकासात अशा शिक्षणाचा उपयोग कसा करता येईल इत्यादीवर चर्चा होऊन एक निश्चीत धोरणासाठी सरकारकडे आराखाडा सुपूर्द करण्यात येईल.

देशभरात असे अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. याबाबत आपल्याला माहिती वेळोवेळी मिळत राहील. आज इथे चर्चा करताना हे वर्ष २०२० असल्यामूळे माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॅ अब्दूल कलाम यांनी INDIA-2020 मधील PUFRA संकल्पना (म्हणजे Providing Urban Facilities To Rural Areas) मांडली होती ती डोळ्यासमोर दिसते. या संकल्पनेत गावोगावी शहरी सुधारणा, रूग्णालयें, अत्याधुनिक शिक्षण संस्था निर्माण व्हाव्यात, ॲग्रोबेस उद्योग, माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांचे ऑफीसेस, इत्यादीचा समावेश आहे. शहरात पोटापाण्यासाठी गेलेला खेड्यातील कामगार वर्ग आज आपआपल्या गावी भय व चिंताने ग्रस्त होत आपल्या गावी परतला आहे, त्यांच्या कौशल्याचा व शक्तीचा उपयोग आत्मनिर्भर खेडी उभारण्यासाठी सुरूवात करावयास हीच वेळ आहे. हीच वेळ आहे स्वेदशी नीती अमंलात आणण्यासाठी.  स्वदेशी नीती  केवळ विदेशी वस्तूंचे उत्पादन व  उपभोगाशी निगडीत नाही. ती एक मानसिकता आहे. स्वदेशी भाव जागृत व्हावयास हवा.  तो एक स्वभाव बनला पाहीजे. समाजाचा तसा स्वभाव बनण्याचे कार्य म्हणजे सक्रीय समाज निर्मितीचे एक अंग आहे. कोरोनाच्या संकटात अनेक स्वयंसेवी संघटना, मंदिरे, गुरूद्वार, मठ इत्यादी संस्था, अन्य चारीटेबल संस्था, हाॅटेल्स, इत्यादी हातात हात घालून सेवायज्ञात एक होऊन काम करीत आहेत. हा एकोपा टिकला पाहीजे. सेवाधर्म फक्त आपत्तीतच निभावयाचा का? दुसरी आपत्ती येण्याची वाट पाहावयाची का? लाॅकडाऊनमध्ये झुग्गी-झोपडीत राहणार्या गरीब, दलित, उपेक्षित, पिडीत अशा समाज वर्गाशी आपण जोडलो गेलो आहोत. तो नररूपी नारायण मानावा. त्याच्याशी सतत संपर्क साधा, सेवा करीत राहा. देव मंदिरात तसाच समाजात ही असतो. सामाजिक समरसतेचा भाव हा उपासनेचा मंत्र आहे तो सेवाच्या माध्यमातून कृतीत यावा. एक व्यापक स्प्रेक्टम बनवून लोकशक्तीचे नेटवर्क तयार होईल आणि  तेच समाजातील सज्जनशक्तीचे इन्फ्रास्ट्रक्चर होय ज्या द्वारें सेवायज्ञ निरंतर सुरू ठेवता येईल व ठेवावा ही लागेल कारण एका गीतकाराने म्हटले आहे ,
            अपनेही विजयपर, हमारा विश्वास है पुरा |
         पर स्वेद और रक्तका, कूंड अभीतक है अधूरा || "
                              वन्दे मातरम |
मित्रहो,  हे भाषण रविवार १मे रोजी झालेले आहे. भाषणाचे वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चीम क्षेत्रीय प्रचारक माननीय अतुलजी लिमये हे होते.  त्यांच्या भाषणातील  कोवीड१९ ची बाधा झालेल्या रूग्णांची व मृत्युची संख्या ही गुगल्स वरून अपडेट केलेली आहे. माननीय अतुलजींचे भाषण हिन्दीत झाले. त्या भाषणाचा अनुवाद करून सार काढण्याचे काम माझ्या कुवतीनूसार केले आहे. आपण भाषण वाचले, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार मानतो, आणि  मुक्काम पोस्ट लाॅकडाऊनवरून- भाग ३ ची समाप्ती करतो. 
                                धन्यवाद !

शुक्रवार, १ मे, २०२०

मुक्काम पोस्ट लाॅकडाऊनवरून (भाग २)



कोरोना महामारीमूळे जगातील बहूतांश देशातील सार्या व्यवस्था बदलणार आहेत. आज आपण आपल्या देशातील अर्थव्यवस्थेवर चर्चा करणार असलो तरी   आजच्या युगात जगातील अर्थव्यवस्थेचं स्वरूप कसे आहे यावर थोडी नजर न देता आपली चर्चा पुढे रेटता येत नाही. आर्थिक उदारीकरण व जागतिकरणामूळे जग बदलले. पण ते तितकेच आभासी बनले, नको असलेल्या वस्तू ही गरजा बनल्या, असे आता सर्वत्र ऐकू येत आहे. यात तथ्य आहेच. त्यावर चर्चा करण्या अगोदर प्रथम एक कथा सादर करतो. 

एका गावात एक शेतकरी असतो. तो आपल्या शेतात पिकविलेल्या भाताच्या पिकाची झोडणी केल्यानंतर निघालेल्या  पेंढ्याची विक्री एका दुधवाल्याला करतो. त्या पेंढ्याची रक्कम रूपये पाचशे दुधवाल्याने शेतकर्यास दिलेली नसते. शेतकर्याल्या वाण्याकडे असलेली रूपये पाचशेची आपली उधारी फेडावयाची असते. म्हणून अंगणात  संवगड्याशी खेळत असलेल्या आपल्या मुलाला दुधवाल्याकडून पाचशे रूपये आणावयास सांगतो व शेतावर जातो. शेतकरी सध्याकाळी शेतावरून घरी परततो. रात्री झोपताना शेतकर्याची पत्नी, मुलाने दुधवाल्याकडून आणलेली पाचशे रूपयाची नोट देते. दुसर्या दिवशी सकाळी उठून शेतकरी ती पाचशे रूपयाची नोट घेऊन वाण्याकडे जातो. शेतकरी ती नोट आपल्या खिशातून काढून पाहतो तर, ती नोट बनावट. शेतकरी मोठ्या हिम्मतीने ती नोट वाण्यास देतो. दुकानासमोर गर्दी असल्याने वाणी ती नोट आपल्या तिजोरीत ठेवतो. दुसर्या दिवशी सकाळी तो वाणी नजिकच्या तालूक्याच्या ठिकाणी किराणा मालाच्या घाऊक विक्रत्याकडे आपली उधारी देण्यासाठी जातो. सोबत आपल्या गल्यात काल जमा झालेल्या पैशाची रक्कम घेऊन जातो. त्या शेठजीची उधारी फेडतो व नवीन माल उधारीवर घेऊन वाणी आपल्या दुकानात परततो. बहुतांश व्यापार जगात महिन्याच्या शेवटच्या शनिवारी उधारीची परतफेड होत असते. तो दिवस शेवटचा शनिवार असल्यामूळे त्या घाऊक विक्रेत्याकडे म्हणजे शेठजीकडे रिटेलर्सची  गर्दी फार होती. त्यामुळे तो घरी उशीरा पोहोचतो. गेले दहा पंधरा दिवस त्या शेठजीकडे फर्नीचरचे काम सुरू होते. रात्री जेवण उरकल्यानंतर त्याच्या पत्नीने सांगितले की, " त्या सुताराला उद्या ॲडव्हान्समध्ये पैसे हवेत. त्याला प्लाय विकत घ्यावयाचे आहे. तुम्ही सकाळी ऊशीरा ऊठणार आहात. त्यामूळे वीस हजार रूपये काढून माझ्याकडे द्या. मी सकाळी सुताराला देईन."  शेठजी वीस हजार रूपये पत्नीकडे देतो. दुसर्या दिवशी सकाळी तो सुतार प्रथम शेठजीकडे जातो आणि ते वीस हजार रूपये घेऊन जातो. पाच हजाराचे प्लाय घेऊन तो शेठजीकडे प्लाय आणून काम सुरू करतो. बाकी पैसे आपल्याकडे ठेवून संध्याकाळी घरी परततो. रात्री त्याच्या पत्नीने सांगितले, की दुधवाल्याचे गेले पाच महीन्याचे आपण पैसे देणे आहे ते उद्या त्याला हवे आहेत."  तो सुतार पंधरा हजार रूपये आपल्या पत्नीने कडे देतो, आणि सांगतो की ज्यांची ज्यांची उधारी आहे ती देऊन टाक." सुताराच्या पत्नीने बहुतांश सर्वांची उधारी फेडली. सुताराकडून आपली उधारी वसूल झाली म्हणून दुधवाला आनंदाने घरी परततो. दुधवाल्याने त्याच्या नोकरांना महिन्याचा पगार दिला. त्यात एक शेतमजूर जो दुधवाल्याच्या घरी रोज सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत गायी-म्हशी धुणे व  गुरांचा गोठा सफाई करण्याचे काम करतो, त्याचे ही दीड हजार रूपयाची मजूरी दिली. तो शेतमजूर ही खुष झाला. तेथून तो नेहमीच्या वेळी म्हणजे सकाळी  दहा वाजता शेतकर्याच्या शेतावर नित्याप्रमाणे कामावर जातो आणि मागच्या महीन्यात काही कारणास्तव दिड हजार रूपये अडवान्स घेतले होते ते परत करतो. शेतकरी पैसे खिशात ठेवतो. शेतीचे काम आटोपले व सध्याकाळी शेतकरी घरी येतो. आपल्या पाकीटातून मजूराने दिलेले पैसे काढतो आणि पाहातो तर आवाक झाला. परवा वाण्याला दिलेली पाचशे रूपयाची नोट त्यात दिसली. शेतकरी मनोमनी हसला व पैसे तिजोरीत ठेवले. पत्नीने हसण्याचे कारण विचारले, तेव्हा तो ती  पाचशेची नोट दाखवित म्हणाला, ' ही नोट बनावट आहे आणि हीच ती नोट मला प्रथम दुधवाल्यानी परवा दिली होती. तीच मी सकाळी वाण्याला दिली होती. ' पत्नी म्हणाली, मग त्यात हसायला काय झाले? मजूराला ती नोट परत द्या आणि बदलून घ्या. शेतकरी म्हणाला, ' ही नोट बनावट आहे पण ही पाचशेची नोट किती लोकांकडे जाऊन परत आपल्याकडे आली असेल, याचा मला अंदाज बांधता आला नाही म्हणून मी हसलो.' पण तिचे समाधान झाले नाही. ती म्हणाली ' तुमचा अंदाज गेला चूलीत. त्या मजूराकडे ती नोट परत करा व  पाचशे रूपयाची खरी नोट घ्या.'  त्यावर शेतकरी उत्तरला ' परवा आपण वाण्याची उधारी फेडली ती याच नोटानेच ना !  कशाला त्रागा करतेस? '

या कथेतील शेतकरी, शेतकर्याची पत्नी, वाणी,  किराणा मालाचा घाऊक व्यापारी  (शेठजी), सुतार, दुधवाला, शेतमजूर इत्यादी मंडळी आपआपल्या जागी व्यवहारीक दृष्ट्या चूकले नव्हतेच. मग चूकले कोण?  ही पाचशेची नोट आहे नकली पण चलनात असल्यामूळे माझ्या अंदाजाप्रमाणे सहजणांची उधारी फेडली गेली आहे. म्हणजे ३००० रूपयाचे कर्ज फिटले असेल.  यालाच आजचे जागतिकरण व आर्थिक उदारीकरण( नव्हे, उधारीकरण) म्हणावे काय?

वरील कथा काल्पनिक पण आज जगभरात जो विकास होत असलेला आपण पाहतो आहोत, तो  कर्जरूपाने म्हणजेच उधारीवर चाललेल्या पैशावर आहे. त्यात काळा पैसा व बनावट नोटांचा सुळसुळाट असावाच. सर्वच क्षेत्रातील उत्पादन मुळात गरजेपेक्षा अधिक झालेली असावे.

उदाहरणासाठी आपण आपल्या येथील रियल इस्टेट मार्केट कडे नजर टाकू या.  मुबंई व एमएमआरडीच्या हद्दीत गेल्या पंधरा ते वीस वर्षात अव्वा ते सव्वा ब्लॅक पैसे देऊन जमिनीची प्रचंड प्रमाणात खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला असावा. त्यावर अनेक टोलेजंग इमारती बांधलेल्या पाहातो. पुष्कळशा अपूर्ण अवस्थेत आहेत. कित्येक पुर्ण पण विकल्या गेल्या नाहीत. किती पैसा अडकला आहे, याचा हिशोब करता येणार नाही. टोलेजंग इमारतीत मध्यम वर्गीय व उच्च मध्यम वर्गीयांना फ्लॅट घेणे परवडणारे नाही. हाच वर्ग आजच्या आर्थिक जगतातला मोठा ग्राहक. हे माहिती असून, सर्वसामान्यांसाठी चार मजली इमारती मोठ्या प्रमाणात बांधल्या नाहीत. तशा बांधल्या असत्या तर बँकेतून सुलभ रित्या फेडण्याइतके कर्जाचा पुरवठा झाला असता व बाजारात मागणी वाढून तिथे अनेक फ्लॅटमध्ये लोक कधीच राहावयास गेले असते व एव्हाना त्याच इमारतीवर बाकी राहीलेला एफएसआय वापरून बांधकाम सुरू झालेले ही दिसले असते. म्हणजे पैसा चलनात राहीला असता की नाही? नितांत गरज व लक्झरी गरज यावर विचार झाला नाही आणि सर्वत्र टोलेजंग इमारती बांधल्या गेल्या. त्यामूळे बराचसा पैसा अडकला गेला असावा. म्हणजे डेड इन्वेस्टमेंट.  जे रियल इस्टेट मार्केट मध्ये झाले तसेच हाॅटेल, रिसार्ट, ॲटोमोबाईल, मोबाईल, माॅल्स, चित्रपटगृहे अशा अनेक क्षेत्रात ओव्हरट्रेडींग झाले असावे. त्यामूळे मंदी येणे स्वाभाविक आहे. कित्येक बँका व पतपेढ्यांनी व्यवसायिक, चित्रपट निर्माते, उद्योजक, बिल्डर्स इत्यादींना ओव्हर क्रेडीड पाॅलीसी द्वारा पैसे दिले असावेत. काही ठिकाणी तर अनुउत्पादक बाबीवर कर्ज दिलेली दिसतील तर काही उत्पादक बाबीच्या नावाखाली घेतलेल्या कर्जाचा वापर चंगळवादाची हौस पुरविण्यात केला गेला असावा.  मल्ल्यासारख्या सारखे मोठे उद्योगपती पासून ते केंद्रीय पातळीपासून ते स्थानिक पातळीवर सो काॅल्ड  उद्योजक, व्यापारी आणि बिल्डर्स  आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी  राजकारण, शिक्षण, सामाजिक, औद्योगीक, बांधकाम व धार्मिक संस्थेत, बँका व पतपेढीतील पैसा वापरूनच आपला जम बसविला आहे. त्याची परतफेड झालेली नाही. म्हणून कित्येक कमर्शियल तसेच सहकारी बँकाचा व अनेक छोट्या मोठ्या पतपेढ्यांचा एनपीए किती वाढला आहे याची नीटपणे चौकशी झाली तर हे आर्थिक उदारीकरण की उधारीकरण आहे हे स्पष्ट होईल.

मी अर्थशास्त्राचा अभ्यासक नाही. ओव्हर ट्रेडींग, ओव्हर रेटींग करून कर्जाचा झालेल्या वाटपा संबंधीचे वरील कथात व परीक्षणात  झालेले वर्णन थोड्याफार फरकाने अतिरंजीत असू शकेल. याबद्दल माझी तक्रार नाही पण आधूनिकेतेच्या नावाखाली नसत्या गरजा वाढल्या ही बाब खरी आहे.  असे असले तरी जग व देश आर्थिक मजबूतीवर चालतात हे नाकारण्यात अर्थ नाही. तसेच समाजातील एन्टर्पनरशिप नावाचा वर्गच लोकांच्या  हाताला रोजगार देऊ शकतो  हे सत्य नाकारता येत नाही.  आज लाॅकडाऊनच्या काळात सर्वच थरातल्या लोकांना विविध शंकाने पछाडलेले असावे. जो रोजगार आहे तो टिकेल का अशा प्रश्नाने काही चितेंत आहेत, तर काही जण नोकरी जाण्याच्या भितीने त्रस्त असतील. कोणी आपले ग्राहक गमाविले जाण्याच्या शंकेने त्रस्त आहेत.  या शैक्षणिक वर्षात ज्यांची मूले दहावी व बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत त्यां पालकांना शंका व भितीने ग्रासले असावे. सर्वांच्या मनात असलेल्या भितीचे स्वरूप भिन्न असणार. लाॅकडाऊन मध्ये आपल्या उपवर मूलां-मुलींचा विवाह कार्यक्रम पुढे ढकलावे लागले असे आई वडील काळजीत पडले असणार. अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेअर बाजार, बँका, आणि पतपुरवठा संस्था. अशा संस्थात गुंतवणूक करणारा एक खास वर्ग जगभरातील प्रत्येक देशात व समाजात असतो. गुंतवणूक या शब्दातच गुंता आहे त्यात कोरोनाच्या दशहतीमूळे हा लाॅकडाऊनचा  काळ व नंतर येऊ घातलेल्या कडाक्याच्या आर्थिक मंदीत  काही उच्च व मध्यम वर्गीय लोक  गुंतवणूक कुठल्या कंपनीत व कशा पद्धतीने करावी याबाबत गोंधळलेल्या अवस्थेत असणार.  या वर्गामूळे बाजारात पतपुरवठा होत असतो. अशा वर्गाने गुंतवणूक कोठे , कशी व किती करावी या बाबत दै मटाच्या २ एप्रिलच्या आवृत्तीत माझे परम मित्र, गुंतवणूक सल्लागार श्री विनायक कुळकर्णी यांनी  सोप्या शब्दात लेख लिहीला आहे. तो लेख सर्वानीं आवर्जून वाचावा असा आहे. 

जागतिकरण व आर्थिक उदारीकरणाने देशातील आरोग्य क्षेत्रात थैमान घातले. प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात, नगरात खाजगी हायफाय डायग्नोस्टिंग सेंटर्स, हेल्थ केअर अन्डर वन रूफ, मल्टी स्पेशालिटी हाॅस्पीटल्स,  हाय-फाय कन्सलटींग रूम्स व मोठ मोठी वैद्यकीय यंत्रे, उपकरणें बसवून अनेक प्रकारच्या चाचण्या सेंटर्स उभी राहीली. या चाचण्या खरोखरच गरजेच्या असतात का,  खाजगी रूग्णालयात दाखल होणे ही प्रतिष्ठेची नशा म्हणावी की जीवाच्या असहाय भितीने, असे प्रश्न अनुत्तरीत राहात आले आहेत. पण सरकारी म्हणजे केंद्र पातळीपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रूग्णालयात स्वच्छतेचा अभाव का? डाॅक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी, औषधे, उपरकरणें इत्यादींची कमतरता का राहीली आहे ? तेथील डाॅक्टर्स पासून ते सफाई कर्मचार्या पर्यंत सर्वच प्रामाणिक , सक्षम, रूग्णप्रेमी, व त्यागी आहेत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे व आजच्या संकटात प्रत्येक मिनीटाला सिद्ध होताना आपण पाहतो आहोत मग पगार वाढ, सुयोग्य व माफक सोयी, अशा त्यांच्या मागण्या पुर्या का होत नाहीत? गाडं अडते कुठे? 

सन १९९१ ला देशात आर्थिक उदारीकरण व जागतिकरण आले तेथून परतणे अशक्य ठरले. आरोग्य क्षेत्रातील खाजगी संस्यांनी प्रचंड पैसा गुंतवून इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले. पैसा तर बँकातून कर्जाऊ म्हणजे उधारीवरचा. आज कोरोनो सारख्या संकटात यांचा उपयोग का होत नाही, याचा विचार सरकारला करावा लागणार. बरं ज्या काही डाॅक्टर्सनी एकत्र येऊन नवीन थाटाची आरोग्य सेवा उभारली त्यांना दोष द्यवयाचा म्हटला तर वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांची लूट प्रशासन करीत होते त्या प्रश्नाचे काय? म्हणजे यातील काही प्रश्न शिक्षण व्यवस्थेत पास ऑन होतात. शिक्षण क्षेत्रातील खाजगी संस्थांचा कारभार अशाच पद्धतीचा झालेला आहे. अनेक ठिकाणी काळ्या पैशाने जमिनीची खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊन नको तितक्या सोयीने भरलेल्या इन्टरनॅशन्लस शाळा, महाविद्यालयें , तंत्रज्ञान महाविद्यालये उभी राहीली. त्यापैकी कित्येक संस्था  राजकीय नेत्यांच्या मालकीच्या.  त्या ही बँकातून कर्जाऊ रक्कम घेऊन. म्हणजे इथेही ओव्हर ट्रेडींग व सफोस्टीकेट पद्धतीने लूट झालेली असावी. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात असा हा सारा गोंधळ ! श्री नरेंद्र मोदी सत्तेवर येण्याअगोदरचा ! हे येथे नमूद करणे भाग पडते. 

स्वातंत्र्यानंतर सन १९९१ पर्यंत देशात समाजवादी, बहुजन हिताय विचारसरणी अशा काॅग्रेस पक्षाची सत्ता होती. म्हणजे नेहरू-गांधी परिवाराची अनिर्बंध सत्ता होती. सन १९७१ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींनी गरीबी हटावचा नारा दिला. म्हणजे त्यांच्याच पित्यांच्या स्वर्गीय पंडीत नेहरूच्या कारकिर्दीत गरीबी होती. ते सत्य होते. पण एक हजार वर्षाच्या गुलामीनंतर पंधरा-सोळा वर्षात देश आर्थिक दृष्ट्या सबळ होणे अशक्य होते याबाबत दूमत नसावे. इंदिराजी नंतर राजीव गांधी पंतप्रधानपदी आले. मिस्टर क्लीन अशी जाहिरात झाली. पंचायत राज कल्पना मांडली गेली. सरकारी योजनातील पैसा गरीब लोकांकडे पोहचेपर्यंत तो बर्फाच्या गोळ्या सारखा वितळत जातो असे उदाहरण देऊन राजीव गांधीनीं इंदाराजींच्या मृत्यूची सहानभूती मिळविण्यासाठी मध्यावधी निवडूणक जाहीर केल्या व जिंकल्या. राजीव गांधीच्या मृत्यू नंतर १९९१ साली पंतप्रधानपदी काॅग्रेसचे नरसिंहराव पंतप्रधान झाले. त्यावेळी देश कंगाल झालेला होता. देशाचे सोने गहाण ठेवून आपल्याला आंतरराष्ट्रीय दबावा मूळे आर्थिक उदारीकरण व जागतिककरण   स्विकारावे लागले. त्या काळातील अर्थमंत्री डाॅ मनमोहनसिंगाची आज ही स्तुती होत आहे. म्हणजे स्वर्गीय इंदिराजी व राजीव गांधी ह्यांचे आर्थिक धोरण चूकले होते वा करभार दोषपूर्ण होता असाच अर्थ निघतो ना. डाॅ मनमोहनसिंग यांची स्तुती जरूर करा, पण मग त्यांना काही ही राजकीय पार्श्वभूमी नसताना ज्यांनी अर्थमंत्री नेमले असे माजी पंतप्रधान स्वर्गीय नरसिंहरावांची स्तुती काॅग्रेसजन का करीत नाहीत? श्री नरेंद्र मोदींच्या हातात सत्ता आली त्या अगोदर दहा वर्षे सत्ता काॅग्रेस प्रणित सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली पण पंतप्रधानपदी डाॅ मनमोहनसिंग व रिझर्व बँकेवर गव्हर्नर म्हणून अमेरिका स्थित श्रीमान राजन, अशा युपीएची सत्ता होती. त्या काळात सरकार मधील मंत्र्यांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधीही झाले नव्हते इतके मोठाले आर्थिक घोटाळे केले व देश आर्थिक संकटात आणला.  परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार व परकीय गुंतवणूकीत अडथळा निर्माण होऊ नये, देशाची पत टिकावी  म्हणून उच्च स्तरावर गुप्तता पाळण्यात आली. मोदी सरकार स्थिरावल्यानंतर स्वतः पंतप्रधान मोदीनी २०१८ च्या सुरवातीस संसदेमध्ये युपीए सरकारने केलेली आर्थिक दिवाळखोरी आकडेवारीसह मांडली. ते ही विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर संसदेत जहरी टिका केली म्हणून . पंतप्रधान मोदींना युपीच्या काळातील घोटाळ्या ऐवजी अर्थव्यवस्था मजबूत करावयाची होती. म्हणून त्यांनी विश्रांती न घेता अनेक देशाशी संबंध जोडले व परकिय गुंतवणूक आणावयास सुरूवात केली. डाॅ महनमोहनसिंग म्हणजे इकाॅनामीस्ट तर मोदी म्हणजे बिझनेसमॅन. शेवटी हा फरक जगाला दिसला. आज तर ते जगातील मातब्बर नेत्यांच्या पंक्तीत बसले आहेत.  पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी व जीएसटी अंमलात आणले  म्हणूनच अनेक बेनामी कंपन्यांच्या मालमत्ता सरकारच्या ताब्यात आल्या. आयकर रिटर्नस भरणार्याची संख्या वाढली. विक्रीकर कधीच भरला नाही असे छोटे-मोटे व्यापारी, उद्योजक, जीएसटी खाली आले. परकिय गुंतवणूक आणली.  म्हणूनच तर आपण जगात तग धरून राहीलो आहोत. 

हा लाॅकडाऊन संपूर्णतया उठल्यानंतर शिक्षण व सोबत आरोग्य क्षेत्राबाबत राष्ट्रीय पातळीवरून सर्वकष असे धोरण येण्याची गरज आहे. कारण या क्षेत्रातील व्यवस्था हळूहळू एक्सपोज होताना दिसत आहे. तसे पाहता प्रत्येक क्षेत्रातील व्यवस्थे मध्ये बदल होणार आहेत नव्हे फेररचना करावी लागेल असे दिसते. कृषी, ग्राम व्यवस्था, लघुउद्योग इतकेच नव्हे तर कुटुंब संस्था सारख्या इतर सामाजिक व नागरीक संस्था अशी क्षेत्र ही आहेत, ज्यावर आपण पुढे चर्चा करू. 

आज लाॅकडाऊनच्या काळात भाजीपाला व किराणा धान्य व वस्तूंनी सर्वत्र थटलेली दुकानं बंद आहेत. पण यावर  शेतकर्याकडून थेट भाजीपाला घेऊन मुंबईत हाऊसिंग  सोसायटीत विकण्याचा उपक्रम राबविला जात आहे. आपल्या समाजातील अशा वर्गाचे कौतूक केले पाहीजे व पांठीबा ही द्यावयास हवा. एमेझाॅन काय करते? उबर आणि ओला काय करतात? इतर अनेक क्षेत्रात ही नव्या व्यवस्था आकारास येऊ लागतील. लाॅकडाऊन म्हणजे एक नवी स्वदेशी बाण्याची बाजारपेठ उगवण्याची ही पहाट असू शकते. कोरोना व लाॅकडाऊनचा काळ पारतंत्र्याचा मानू या. पुन्हा एकदा स्वातंत्र्याची तुतारी वाजवू या. प्रचंड मेहनत करू या. गरजा, (गरजेतून उद्योग), उद्योग (उद्योगातून रोजगार),  रोजगार (रोजगारातून नवी सृजनशक्ती), शेवटी विकास  असा चतुर्सुत्री अभ्यास करून आपल्या कामगिरीचा  ठसा उमटवणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  कोरोनाच्या आपत्तीतून चांगल्या संधी मिळणार आहेत, त्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन केले आहे. त्या आवाहानाला चांगला प्रतिसाद आपण दिला तर सर्वच क्षेत्रात भारत स्वावलंबी व मजबूत होऊ शकतो. कार्य कठीण आहे पण अशक्य नाही. पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडीया, स्टार्ट अप इत्यादी योजनांवर टिका करणारी मंडळी आपले टिका करण्याचे काम सुरूच ठेवणार आहेत. पण त्यातील काही पक्षांना, काही लोकांना पंतप्रधान मोदीच्या योजना व  विचार पोस्ट कोरोनाच्या काळात पटू लागतील, असे मला वाटते. आपण कोरोना व लाॅकडाऊनच्या काळात आलेले नैराश्य झटकून देऊ या. स्वामी विवेकानंदानीं म्हटले आहे,  'नैराश्य म्हणजे मृत्यू व उत्साह म्हणजे जीवन.'  हा मंत्र डोळ्यासमोर सतत ठेवू या. सोबत सरकारला सहकार्य सुरूच ठेवू.  यापुढील काळात पोलीस,  डाॅक्टर्स, अंगणवाडी, तसेच शासकिय कर्मचार्यांवर हल्ले करणारे मग्रूर लोक, सामाजिक अंतर न पाळणारे मवाली टोळ्या, पालघर जिल्ह्यात धर्मगुरूंची अमानुषपणे हत्या करणारे आधूनिक राक्षस,  विदेशी पैशावर एनजीओ चालवून माजलेला बुद्धजीवी वर्ग, लाॅकडाऊनच्या काळातही शुद्र राजकारण करणारे राजकीय नेते, इत्यादीं मंडळी आज राजकीय व समाज व्यवस्थेत बांडगुळे ठरली आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज उरणार नाही, कारण परिस्थितीचा रेटाच त्यांना राजकीय व्यवस्थेच्या परीघा बाहेर फेकून देईल असे वाटते. कारण 'वेळ कधी सांगून येत नाही ' पण याचे त्यांना भान आहे कुठे?

मुक्काम पोस्ट लाॅकडाऊन वरून (भाग १)


आपण सारे लाॅकडाऊन मध्ये आहोत. मार्च गेला, एप्रिल महिना ही संपला. लाॅकडाऊनमध्ये दोन प्रश्न आपल्यासमोर प्रामुख्याने आहेत ते म्हणजे कोरोनाची दशहत संपून लाॅकडाऊन कधी उठेल आणि कोरोना नंतरचे जग कसे असेल, आपला देश ( विशेषकरून अर्थव्यवस्था व रोजगाराच्या संधी संबंधीत )  कसा असेल? या दोन्ही प्रश्नासंबंधीच्या उत्तराबाबत अनेक जाणकारांची भाष्यें आपल्या पर्यंत विविध माध्यमातून पोहचली आहेत. त्याचा उहापोह करायचा हा प्रयत्न आहे. या शतकाच्या पुढील सर्व घटनांना व्यापून उरणारा हा विषय आहे. त्यामूळे  तसा उहापोह कितीही थोडक्यात करण्याचा प्रयत्न केला तरी एका लेखात पूर्ण होऊ शकणार नाही म्हणून आपल्या चर्चेचा हा पहीला भाग आहे असे समजू या. प्रथम अर्थातच पहील्या प्रश्नावर कोरोनाची दशहत व त्यातून आपल्या वाट्याला आलेला ऐताहासिक लाॅकडाऊन कधी उठेल या प्रश्ना वर चर्चा करू या.

कोरोनाचा फैलाव व त्यावरील उपाय या बाबतीत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळीत ही मतातंरे दिसत आहेत.  स्विडनचे ख्यातनाम इपिडोमीलाॅजिस्ट डाॅ जाॅन जिइसेक यांचे म्हणणे असे आहे की सार्वजनिक आरोग्यबाबत एकंदरीत झालेले दुर्लक्ष आणि त्यातून ढासळलेली रोगप्रतिकार शक्तीमूळे संसर्गजन्य रोगाच्या साथीत मृत्यूची संख्या वाढते असे ते म्हणत आहेत. ते संपूर्ण लाॅकडाऊनला फारसे समर्थन करीत नाहीत.  दुसरे संसर्गजन्य रोगासंबंधीचे डाॅक्टर जे पी मालीयिल लोकांमधील  रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करतात पण पुर्ण लाॅकडाऊनचे समर्थन करतात. डाॅ गॅल्लो यांनी पोलिओची लस एक उपाय सुचविला आहे. आपल्या दिल्लीतील एम्सचे संचालक  डाॅ रणदीप गुरेलियांनी पाच-सहा दिवसापूर्वी कोरोना दशहतीचे स्वरूप वस्तुस्थितीला धरून स्पष्ट केले आहे.  ते मला पटले व भावले ही. ते म्हणतात,
" Stigmatising of Covid-19 patients and families  is resulting in turning up cases late at hospitals, with hightened breathlessness and this could mean increased morbidity and mortality  " त्यानी पुढे म्हटले आहे की  ८० टक्के रूग्ण नीटपणे उपचार व काळजी घेतली तर बरे होतात. १० टक्के रूग्ण अधिक उपचाराने बरे होतात तर ५ टक्के रूग्णाला व्हेन्टीलेटर वर ठेवावे लागते. तर उरलेले ५ टक्के धोक्याची पातळीच्या पलिकडे जाऊन दगाविण्याची शक्यता असते. " थोडक्यात कोरोना बाधित रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होत असलेल्या घुसमटीमूळे रूग्णांना हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात उशीर होतो. त्यामूळे मृत्युदर वाढतो असे डाॅ गुरेलियांनी म्हटले आहे. त्यातून असे दिसते की, कुठेतरी क्वाॅरान्टाईनच्या उपायातून आपल्या येथील रूग्ण व त्याच्या नातेवाईकांच्या मनात अपराधीपणाची वा न्युनगंडाची भावना उत्पन्न होत असावी व त्यांतून रूग्णाला हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात उशीर होत असावा.  सरकार व प्रशासन, वेळोवेळी लोकांना आवाहन करीत आहे की ' भिती सोडा, कोरोनाची बाधा लपवू नका , उपचार घ्या व बरे होऊन घरी जा.' पण प्रतिसाद कमी मिळतो वा उशीरा मिळत असावा.

या पुढील काळात  कुत्रीम विषाणू वा नैसर्गिक जीवाणूंचा संसर्ग होऊन रोगाची लागण अधूनमधून होत राहणार आहे. अशा वेळी आपल्या समाजाची क्वाॅरान्टाईन बाबत गैरसमज व सतराव्या शतकातील मानसिकता टिकून राहिली तर  ही फार गंभीर बाब आहे. रूग्णाला व त्याच्या परिवाराला संपूर्ण समाज आपला आधार आहे असे वाटले पाहीजे. त्यासाठी वातावरण निर्माण करावे लागणार आहे. जनजागृती ही आवश्यक आहेच. शिवाय आपल्या धर्मातील कलमाच्या आडोशाला जाऊन समाजप्रवाह सोबत न येणार्या समाज वर्गाला कडक शब्दात सुनवावे लागेल. अशा वेळी आपल्या मतपेटीचा विचार करून कोण्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अप्रत्यक्ष रित्या आंदोलने छेडण्यास एखाद्या समाज वर्गाला उद्युक्त केले तर त्या नेत्यांना व आंदोलन करण्यांर्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून वठणीवर  आणायला हवे असे वाटते.  कारण लोकशाही व्यवस्थेची जडण-घडणच मुळी  ' बहूजन हिताय ' या ध्येयावर आधारलेली आहे. आणि हे सूत्र संसर्ग रोगाच्या महामारीत जर न पाळले गेले तर देशाचेच अस्तित्व धोक्यात येऊ शकते. पुढचा काळ एक समाज, एक देश हेच राज्यकारभाराचे सूत्र राहणार आहे. आपण एक मतदार, एक नागरिक म्हणून लक्षात ठेवावे की  पुढील काळात संसर्गजन्य रोगाची लागण इतरांना झाली की आपण  सुपात असलो तरी रूग्णासाठी ठेवलेल्या स्वतंत्र जात्यात (म्हणजे रूग्णालय वा क्वाॅरान्टाईन मध्ये) आपण ही असणार आहोत हे सदैव लक्षात ठेवून रूग्णाविषयी आत्मीयता बाळगावी. तसेच आपल्या स्वतःच्या वर्तनाने म्हणजे सामाजिक अंतर न पाळून रोगाचा प्रादुर्भाव वाढू  न देणे हे सध्या आपले केवळ  कर्तव्य मानले जाते ते बंधनकारक करून कठोर शिक्षेची तरतुद करणारा स्वतंत्र कायदा  विद्यमान संसदेने एकमताने संमत करावा जेणे करून समाजाचे भविष्य सुरक्षित करून ठेवता येईल.

दुसरीकडे  ' सामाजिक अंतर ' कायद्याच्या भंग करणार्या अनेक घटना घडतच आहेत. हा लेख लिहीत असताना देशातील कोरोना बाधीत रूग्णाची संख्या ३३००० च्या पुढे गेली आहे आणि मृत्युचा आकडा एक हजाराच्या पुढे गेला आहे. देशातील कोरोना बाधीत रूग्ण बरें झालेल्याची संख्या ७००० च्या पुढे आहे, म्हणजे २४ टक्याच्या आसपास आहे तर मृत्यूदर ३•७ टक्के आहे. याचा अर्थ सोशल डिस्टन्स्टींग चा उपाय यशस्वी ठरत आहे असे दिसते. त्यामूळे लाॅकडाऊनवर टिका करण्याला केंद्र सरकार तर्फे उत्तर मिळाले आहे. कोरोना बाधीत रूग्णाची आपल्या महाराष्ट्रातील संख्या १००००च्या वर गेली आहे. महाराष्ट्राचा देशातील प्रगत राज्य हा मान टिकवयाचा असेल तर किमान केंद्र सरकार इतकी जरी नसली तरी जवळपास जाऊ शकेल अशी कामगिरी करावी लागेल. तशी कामगिरी महाविकास आघाडी सरकार करेल अशी आशा करू या.

केंद्रीय गृह खात्याने  लाॅकडाऊन अंशतः उठविली आहे अशी बातमी हा लेख लिहीत असताना फ्लॅश झाली आहे. त्यासंबंधी खबरदारी कशी घ्यावी अशी मार्गदर्शिका केंद्र सरकारने राज्यांना पाठविली आहे. जे मजूर देशातील विविध ठिकाणी अडकले होते त्यांना आपआपल्या राज्यात परतण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे.  ही व्यवस्था सुरळीत व्हावी अशी अपेक्षा प्रत्येक राज्यातील सरकार पुर्ण करेल अशी आशा बाळगावयास हरकत नाही. आज लाॅकडाऊन अंशतः संपला आहे. पण देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात यावयास जूलै उजाडेल असे तज्ञांचे म्हणणे आहे.  विशेष करून मुंबई व पुण्यातील स्थिती चिंताजनक आहे. कोरोनावरील लस शोधण्याचे कार्य जगभरातील सर्व देशात सुरू आहेत. कोरोना वरील उपायाबाबत तज्ञांमध्ये मतभेद असले तरी दिवस- रात्र संशोधन करण्यात गुंतलेले डाॅक्टर्स, तंत्रज्ञ, वैज्ञानिक आपआपले संशोधन शेअर करीत असतात. ही या लाॅकडाऊनच्या काळातील दिलासा देणारी बातमी आहे. दिल्ली येथील आयआयटी चे प्राध्यापक बिस्वजीत कुंडू यांनी ही एक दिलासा देणारी बातमी आपल्याला दिली आहे.  प्राध्यापक बिस्वजीत कुंडू व त्यांच्या सहकार्यांनी कोरोना उपचारावरील डी - किट तयार करण्यात यश मिळविले आहे. काही भारतीय कंपन्याशी बोलणी होतील व पुढील तीन आठवड्यात स्वदेशी बनावटीचे डी-कीट बाजारात उपलब्ध होतील ते ही कमी किमतीत. या संकटकाळात मेक इन इंडीया  च्या वाटचालीतले हे आपल्या मोठे पाऊल आहे. ' हॅट्स ऑफ टू बिस्वजीत ॲन्ड हिज टिममेट्स !'

या लेखात बहूतांश ठिकाणी मी आशावाद व्यक्त केला आहे. ती एक स्वाभाविक बाब आहे. राजकारणातील विभिन्न इझम पेक्षा आशाइझम चांगलाच होय. आज  बैजू बावरा या गाजलेल्या चित्रपटाची आठवण येते. त्यातील  नैराश्याने ग्रासलेला नायक आपली कैफियत ईश्वरासमोर एका गीतात मांडतो. त्याचे पहीले कडवे खालील प्रमाणे आहे--
" ओ दुनियाके रखवाले, सुन दर्दभरे मोरे नालें,
   सुन दर्द भरे मेरे नाले |
"आश- निराश के दो रंगोसे दुनिया तूने सजायी | "
मानवी जीवन एक प्रवास आहे. कुठे सपाट, चांगला रस्ता, तर पुढे खांच-खळगे व धोक्याच्या वळणानी भरलेला. चित्रपटातील बैजू निराश होता पण ईश्वराशी त्रासिक, वा त्वेषाने असभ्य भाषेत बोलत नाही. तो  
'दो रंगोसे दुनिया तूने सजायी है ' असे भावपूर्ण भाषेतच  बोलतो. शेवटी विख्यात गायक तानसेनशी रंगलेल्या जुगलबंदीत तो विजयी ठरतो.  तानसेनच्या नियमामूळे आपल्या पिताश्रीला देहदंडाची जबर शिक्षा आपल्या डोळ्यादेखत, ते ही बालवयात पाहिलेल्या बैजूच्या मनात सूडबुद्धीचा विचार शिवला नाही आणि तानसेनला जीवदान दिले. तानसेनला जीवदान देताना कुठलाही अंहकार नाही उलट  तानसेनासंबंधी आदर व्यक्त करताना त्याच्या मुखातून सहजबोल आले, ' आज संगीतको संजीवनी मिल गयी है | ' ही आपली संस्कृती व हीच खरी संपत्ती. ती ही जपावी लागेल कारण संकटसमयी तीच आपली शक्ती ठरते असा आपला इतिहास आहे.

विज्ञान व तंत्रज्ञानाने आपले जीवन सुलभ झाले असले तरी जीवनातील आशा व निराशाचा खेळ संपणार नाही असेच वाटते. अन्न, वस्त्र, निवारा, हवा,  पाणी, कपडालत्ता, पैसा, ज्ञान, विज्ञान, इतके जगण्यासाठी असूनही मनुष्य आशेवर जगत असतो. प्रयत्नाने सर्व काही प्राप्त होत असते हे जरी सत्य असले तरी आपल्या नियंत्रणाच्या पलिकडील शक्तीमूळे नको ते घडते व आपल्याला क्लेश देऊन जाते. आपल्या व्यक्तीगत जीवनात अशा घटना घडतात तेव्हा आपण किती हादरतो. पण स्वतःला सावरतोच ना. तशाच घटना देशाच्या बाबतीतही घडतात. आपले काही ही चूकले नसताना आपल्या देशावर लाॅकडाऊनची वेळ आली आहे. ठिक आहे. ' वेळेची एक गोष्ट बरी आहे,  ती कशी का असेना, पण कधी थांबत नाही.' हाच तो शाश्वत नियम आपण लाॅकडाऊनच्या काळात स्मरणात ठेवू या. 

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...